Maharashtra Breaking News in Marathi : श्रीकांत शिंदे यांना कोणाचे आव्हान? कल्याण लोकसभेत कोण बाजी मारणार?

| Updated on: Mar 07, 2024 | 7:39 AM

Maharashtra Breaking News in Marathi : आज 6 मार्च 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News in Marathi : श्रीकांत शिंदे यांना कोणाचे आव्हान? कल्याण लोकसभेत कोण बाजी मारणार?
Follow us on

मुंबई | दि. 6 मार्च 2024 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौरा मंगळवारपासून सुरु झाला. आज दुपारी १ पर्यंत अमित शाह मुंबईत आहेत. पुणे शहरातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी मेट्रोचे भूमीपूजन ऑनलाईन माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहे. महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठक आज होणार आहे. या बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यात २३ जागा लढवण्याचा प्रस्ताव दिला. ठाणे शहरात आज नमो महारोजगार मेळावा होणार आहे. लोकसभेची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पुण्याच्या बारामती लोकसभा मतदार संघातील भोर तालुक्यातील गावागावात सुप्रिया सुळे यांचे फ्लेक्स लागलेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Mar 2024 06:45 PM (IST)

    कल्याण लोकसभेवर सर्वपक्षीयांचं लक्ष, शिवसेना,भाजप,मनसे आणि उबाठाकडून तयारीला सुरुवात

    कल्याण | श्रीकांत शिंदे यांना मात देण्यासाठी ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे ,सुषमा अंधारे ,वरून सरदेसाई आणि सुभाष भोईर यांचे नाव चर्चेत आहे. तर शरद पवार गटाकडून मंदार मुकुंद केणी ,मनसेकडून प्रमोद उर्फ राजू पाटील सह भाजप नेते आमदार रवींद्र चव्हाण , संजय केळकर ही पक्षाचे आदेश आले तर लढण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.

  • 06 Mar 2024 06:10 PM (IST)

    मुख्यालयातील बैठकीपूर्वी रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी राज्यातल्या नेत्यांची बैठक

    नवी दिल्ली | आगमी लोकसभा निवडणुकी संदर्भात भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठका होणार आहेत. आज महाराष्ट्रासह ओरिसा हरियाणा हिमाचल प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू राज्यांबाबत बैठका होणार आहेत. कोअर कमिटीच्या बैठका होणार आहेत. या बैठकीसाठी गृहमंत्री अमित शहा भाजप मुख्यालयात दाखल झाले आहेत. तर महाराष्ट्राच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री सुधीर मुनगंटीवार रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत पाटील बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.


  • 06 Mar 2024 05:52 PM (IST)

    ओडिशात भाजप आणि बीजेडी यांच्यात युती निश्चित!

    ओडिशात भाजप आणि बीजेडी यांच्यातील युती अंतिम मानली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजप आणि बीजेडी एकत्र लढू शकतात. त्याची संपूर्ण रूपरेषा आज होणाऱ्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत ठरविण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप 13/14 आणि बीजेडी 7/8 लोकसभा जागांवर निवडणूक लढवेल. तर विधानसभेत बीजेडी 95/100 जागांवर आणि भाजप 46/52 जागांवर लढू शकते.

  • 06 Mar 2024 05:35 PM (IST)

    काम पाहून सगळे म्हणतायत, यावेळी 400 ओलांडणार: पंतप्रधान मोदी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये सांगितले की, काम पाहून संपूर्ण देश, पश्चिम बंगाल आणि प्रत्येक माता-भगिनी म्हणत आहेत की, यावेळी एनडीए सरकारने 400 टप्पा ओलांडणार आहे.

  • 06 Mar 2024 05:25 PM (IST)

    राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

    राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांनी क्वारंटाईन करून घेतलं आहे.

  • 06 Mar 2024 05:15 PM (IST)

    अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याची धमकी

    अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या व्हॉट्सॲप नंबरवर जीवे मारण्याची धमकी देणारा ऑडिओ संदेश पाठवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 06 Mar 2024 04:59 PM (IST)

    महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची राजधानी दिल्लीत बैठक

    आज सायंकाळी 6.30  वाजता भाजपच्या राज्यातील नेत्यांची रावसाहेब दानवे यांच्या घरी बैठक होणार आहे. तर रात्री राज्यातील नेत्यांची केंद्रीय अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत होणार बैठक असून या बैठकीला भाजपचे तीन माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष उपस्थित असणार आहेत.

  • 06 Mar 2024 04:45 PM (IST)

    प्रकाश आंबेडकर यांनी जागांचा प्रस्ताव दिला यावर चर्चा – संजय राऊत

    मविआची बैठक संपली आहे. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती संजय राऊत यांनी  दिली. त्यासोबतच आंबेडकर यांनी मविआसोबत यावं अशी प्रमुख नेत्यांची भूमिका असल्याचं सांगितलं.

  • 06 Mar 2024 04:30 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात भरदिवसा निर्घृणपणे हत्या

    सांगली जिल्ह्यातील जत शहरातील विजापूर ते गुहागर महामार्गावर एका तरुणाचा निर्घृणपणे भरदिवसा खून करण्यात आला आहे. अविनाश कांबळे असे मयत तरुणाचे नाव आहे. अविनाश कांबळे हा यापूर्वी वाळूच्या गाडीवर काम करीत होता. यातूनच त्याचे काही जणांशी वैर निर्माण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

  • 06 Mar 2024 04:15 PM (IST)

    बारामती लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट आणि शरद पवार गटाची एकत्रित बैठक

    बारामती लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गट आणि शरद पवार गटाची एकत्रित बैठक सुरू आहे. बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील निसर्ग मंगलकार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे.

  • 06 Mar 2024 04:08 PM (IST)

    इचलकरंजीमध्ये सनदी मळा कापसाच्या गोडाऊनला मोठी आग

    इचलकरंजी असणाऱ्या कबनूर गावातील सनदी मळा कापसाच्या गोडाऊनला मोठी आग लागली आहे. आग विझवण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिका अग्निशामक जयसिंगपूर नगरपालिका अग्निशामक पंचगंगा जव्हार शुगर फॅक्टरीच्या अग्निशामक दहा गाड्या दाखल झाल्या आहेत.

    कापसाच्या गाठी असल्यामुळे आगीचा मोठा भडका उडत आहे,  रमेश केसरवानी आणि सुरेश गुप्ता कापसाच्या कारखान्याला आग लागून कोट्यमधींचे नुकसान झालं आहे.  घटनास्थळी अग्निशामकच्या दहा गाड्या दाखल झाल्या आहेत.

  • 06 Mar 2024 03:57 PM (IST)

    यशपाल भिंगे लवकरच कॉंग्रेसमध्ये येणार, नांदेड लोकसभा लढविणार

    नांदेड : खा. अशोक चव्हाण यांच्यावर जनता नाराज आहे. भाजप विरोधात लढण्याची गरज आहे. त्यामुळे मी नाना पाटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासोबत चर्चा केली आहे. पक्षाने आदेश दिला तर निश्चितपणे लोकसभा निवडणूक लढवणार आहे. आज घडीला अशोकराव चव्हाण यांच्यावर जनता नाराज आहे. काँग्रेसचे दहा टक्के मतदान वाढले आहे, असा दावा यशपाल भिंगे यांनी केला.

  • 06 Mar 2024 03:45 PM (IST)

    कल्याणमध्ये पोलीस आणि रिक्षाचालक यांच्यात वाद

    कल्याण : येथील छत्रपती शिवाजी चौक परिसरात वाहतूक पोलीस आणि रिक्षा चालकात वाद झालाय. कुठल्याच प्रकारची अलाउंसमेंट न करता चौकात तीन रिक्षा उभी करण्याची परवानगी असताना बेकायदेशीर कारवाई करत असल्याचा आरोप रिक्षा चालकांनी केला. तर, नो पार्किंगमध्ये रिक्षा उभी होती म्हणून कारवाई केल्याने वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.

  • 06 Mar 2024 03:33 PM (IST)

    काँग्रेसच्या माजी नगरसेविकेचा भाजपात प्रवेश

    नवी मुंबई : नवी मुंबई काँग्रेसच्या माजी नगरसेविका अनिता शेट्टी यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपात पक्ष प्रवेश केलाय. अनिता शेट्टी या काँग्रेसचे स्थानिक नेते संतोष शेट्टी यांच्या पत्नी आहेत. अनिता शेट्टी यांच्या प्रवेशाने नेरुळ विभागात भाजपाची ताकद वाढणार आहे. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा संयोजक विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आलाय.

  • 06 Mar 2024 03:23 PM (IST)

    भागवत कराड यांची चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका

    संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दीड लाखाची सभा पार पडली. ही सभा यशस्वी झाल्यामुळे चंद्रकांत खैरे यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आहे. संभाजीनगर शहराचा विकास इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यामुळे खुंटला. चंद्रकांत खैरे यांच्या गाडीत मी कधीही फिरायला तयार आहे. स्वतःला काम करता आलं नाही म्हणून मागच्या निवडणुकीत पराभव झाला. 20 वर्षांपासून शहराला पाण्याचा त्रास आहे. मी 140 किलोमीटर वरून गॅस लाईन आणली. चंद्रकांत खैरे 60 किलोमीटर वरून पाणी आणू शकले नाहीत अशी टीका केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केली.

  • 06 Mar 2024 03:15 PM (IST)

    आमदार प्रणिती शिंदे यांना सभेसाठी अटकाव

    मंगळवेढा : दुष्काळी गावभेट दौऱ्यासाठी आलेल्या काँग्रेस आमदार आणि सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना ग्रामस्थांच्या संतापला सामोरे जावे लागले. मराठा आरक्षण आणि 24 गावच्या दुष्काळी गावांचे आंदोलन यातील कार्यकर्त्यांनी त्यांना गावात सभा घेऊ दिली नाही.

  • 06 Mar 2024 02:05 PM (IST)

    आम आदमी पक्षाचा मोठा दावा

    पुणे महापालिकेत पथ विभागाच्या उपअभियंत्याने भ्रष्टाचार केल्याचा आम आदमी पक्षाचा दावा. आपचे रविराज काळे यांनी अधिकाऱ्यांच्या दालनात पैसे असल्याचा व्हिडीओ केला शेअर

  • 06 Mar 2024 01:14 PM (IST)

    रवी राणा यांनी केले मोठे विधान

    खासदार नवनीत राणा यांना अफगाणिस्तानमधून आलेल्या धमकी प्रकरणी ओवीसी यांची देखील चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे. ओवीसी आणि धमकी देणाऱ्यांची लिंक काय आहे हे लवकरचं बाहेर येईल, असे रवी राणा यांनी म्हटले आहे.

  • 06 Mar 2024 01:06 PM (IST)

    अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी

    पाकिस्तान व अफगाणिस्तानमधून धमकी आल्याची माहिती. नवनीत राणा यांना व्हॉटसअपवर क्लिप पाठवून दिली धमकी. नवनीत राणा यांच्या स्वीय सहायक विनोद गुहे यांची पोलीस ठाण्यात तक्रार.

  • 06 Mar 2024 12:50 PM (IST)

    वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मविआचा मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा

    मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मविआने मुंबई महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढला आहे. मुंबईतील प्रश्नांसंदर्भात वर्षा गायकवाड यांनी मविआच्या पदाधिकाऱ्यांसमवेत हा मोर्चा काढला आहे. या मोर्चात कार्यकर्ते आक्रमक झाले असून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घनकचरा व्यवस्थापनसाठी 1200 कोटी रुपयांचं ग्लोबल टेंडर काडून 15 हजार स्वच्छता स्वयंसेवकांना बेरोजगार करणाऱ्या महानगरपालिकेच्या निर्णयाविरोधात वर्षा गायकवाड आक्रमक झाल्या आहेत.

  • 06 Mar 2024 12:40 PM (IST)

    मुंबई-कोल्हापूर, पुणे-वडोदरा वंदे भारत धावणार

    देशभरात वंदे भारत एक्स्प्रेसचे जाळे विस्तारण्यात येत आहे. आता मध्य रेल्वेवर आणखी दोन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहेत. मुंबई ते कोल्हापूर, तेथून पुढे पुणे ते वडोदरा जाणारी वंदे भारत सुरू करण्याचं नियोजन करण्यात येत आहे.

    सध्या मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर आणि सीएसएमटी ते जालना वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहे. आता सीएसएमटीवरून कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.

  • 06 Mar 2024 12:30 PM (IST)

    महाविकास आघाडीची मुंबईतल्या हॉटेल फोर सिझन्समध्ये थोड्याच वेळात बैठक

    मुंबई- लोकसभा जागावाटपावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीची मुंबईतल्या हॉटेल फोर सिझन्समध्ये थोड्याच वेळात बैठक होणार आहे. यासाठी शरद पवार हॉटेल फोर सिझन्सकडे रवाना झाले आहेत. तर संजय राऊत हॉटेल फोर सिझनमध्ये दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरेही मातोश्रीहून रवाना झाले असून थोड्यात वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे.

     

  • 06 Mar 2024 12:20 PM (IST)

    टीईटी परीक्षा ऑफलाइन, राज्य शासनाकडून मान्यता

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यास राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

  • 06 Mar 2024 12:10 PM (IST)

    सातारा- सिल्व्हर ओक इथं होणाऱ्या बैठकीसाठी शरद पवार गटाचे नेते तातडीने मुंबईला रवाना

    सातारा- सिल्व्हर ओक इथं होणाऱ्या बैठकीला तातडीने शरद पवार गटाचे नेते मुंबईला काही वेळात रवाना होणार आहेत. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि सत्यजित पाटणकर हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना होणार आहेत. या बैठकीसाठी साताऱ्यातील शरद पवार गटाच्या नेत्यांना मुंबईला येण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • 06 Mar 2024 11:57 AM (IST)

    Live Update | छत्रपती संभाजीनगर शहरात विद्यार्थ्यांचे आंदोलन

    छत्रपती संभाजीनगर शहरात विद्यार्थ्यांचे आंदोलन… जलसंधारण विभागातील पेपर फुटी प्रकरणी आंदोलन.. वाल्मी येथील जलसंधारण विभागाच्या कार्यालयावर आंदोलन सुरू… पेपर फूट प्रकरणी परीक्षा रद्द करण्याची मागणी…

  • 06 Mar 2024 11:50 AM (IST)

    Live Update | बोर्डाचे पेपर तपासणीवर 63 हजार शिक्षकांचा बहिष्कार

    बोर्डाचे पेपर तपासणीवर 63 हजार शिक्षकांचा बहिष्कार… निकाल लांबण्याची भीती… अंशतःअनुदानित शिक्षकांनी आपल्या मागण्यासाठी टाकला बहिष्कार… दहावी बारावीचे पेपर तापसणीवर बहिष्कार… शासन अनुदानाचा टप्पा वाढवत नाही तोपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्याचा इशारा…

  • 06 Mar 2024 11:40 AM (IST)

    Live Update | जागांबाबत पवार, ठाकरे गटाचे भांडण – प्रकाश अंबेडकर

    जागांबाबत पवार, ठाकरे गटाचे भांडण सुरु असल्याचं वक्तव्य प्रकाश अंबेडकर यांनी केलं आहे. 22 – 18 – 9 असा मविआत फॉर्म्युल, आम्हाला माहिती मिळाली आहे. त्यांच्याध्ये 15 जागांचा तिढा अजून आहे… असं देखील प्रकाश अंबेडकर म्हणाले.

  • 06 Mar 2024 11:16 AM (IST)

    Live Update | काँग्रेस नेते राहुल गांधी 14 तारखेला येणार नाशिक दौऱ्यावर

    काँग्रेस नेते राहुल गांधी 14 तारखेला येणार नाशिक दौऱ्यावर… काळाराम पाठोपाठ राहुल गांधी घेणार त्रंबकेश्वरचे दर्शन… रोड शो नंतर त्रंबकेश्वर, जव्हार मोखाडा मार्गे पुढच्या प्रवासाला जाणार

  • 06 Mar 2024 11:00 AM (IST)

    गावचा कारभार चालवणाऱ्या ग्रामपंचायतीची बिकट अवस्था

    गावचा कारभार चालवणाऱ्या सांगली जिल्ह्यातील 62 ग्रामपंचायतीला इमारतीच नाहीत. कुठे वाचनालय मध्ये तर कुठे भाड्याच्या रूम मध्ये तर काहींची पडझड झाली आहे. यातूनच गावचा कारभार सुरू आहे. जिल्ह्यातील 634 ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत असली, तरी यातील बऱ्याचशा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्‍यकता आहे.

  • 06 Mar 2024 10:50 AM (IST)

    महाविकास आघाडीचं आव्हान नाही

    पुण्यात महाविकास आघाडीचं आव्हान आहे अस वाटत नाही, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले. आम्ही भाजपची जागा कायम राखू. भाजपचा जो कोणी उमेदवार असेल तो निवडून येईल.पक्ष माझ्यावर जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन.लोकांच्या हातात आहे माझ्यावर काय जबाबदारी देणार, असे ते म्हणाले.

  • 06 Mar 2024 10:40 AM (IST)

    रुबी हॉल मेट्रो स्थानकातून पाहिली मेट्रो रवाना

    रुबी हॉल मेट्रो स्थानकातून पाहिली मेट्रो रवाना झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्घाटनानंतर मेट्रो रवाना झाली. त्यांनी ऑनलाईन या मेट्रोचे लोकार्पण केले. रुबी हॉल ते रामवाडी असा मेट्रोचा मार्ग आहे. या मार्गावर एकूण ४ स्थानकं असणार आहेत.

  • 06 Mar 2024 10:30 AM (IST)

    ही तर अमित शाह यांची गँग

    शिंदे गट ही अमित शाह यांनी तयार केलेली वेगळी गँग असल्याचा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला. छत्रपती संभाजीनगरची जागा आम्ही लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • 06 Mar 2024 10:20 AM (IST)

    भाजपला घाम फुटला

    भाजप नेत्यांना आताच घाम फुटला आहे. त्यांची धावपळ उडाली आहे, असा चिमटा खासदार संजय राऊत यांनी काढला. मोदी आणि शाह हे सध्या राज्यातील जनतेची करमणूक करत असल्याचा टोला त्यांनी हाणला.

  • 06 Mar 2024 10:10 AM (IST)

    थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो मार्गाचं उद्घाटन

    थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात मेट्रो मार्गाचं उद्धघाटन होत आहे. रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गिकेचं उद्धघाटन होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन उद्घाटन करतील.

  • 06 Mar 2024 10:00 AM (IST)

    गोंदिया भंडारा लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा

    गोंदिया भंडारा लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचे चित्र आहे. सडक अर्जुनी येथे अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये उद्या राष्ट्रवादीची भव्य जाहीर सभा होत आहे. गोंदिया भंडारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी की भाजपा संभ्रम अजूनही कायम आहे.

  • 06 Mar 2024 09:57 AM (IST)

    महिला सरपंचांची कार्यशाळा संपन्न

    सोलापूर जिल्ह्यातील गाव गाडा सांभाळणाऱ्या महिला सरपंचांची कार्यशाळा पार पडली. सोलापूर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या प्रयत्नातून सर्व महिला सरपंच एकाच छताखाली आले होते. महिला सरपंचांना असणारे अधिकार, गावाचा विकास यासह अनेक विषयांवर महिला सरपंचांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा परिषदे कडून गावाला देण्यात येणाऱ्या योजनेची माहिती सरपंच महिलांना देण्यात आली. गावातील नामधारी असणाऱ्या सरपंच महिलांचे हक्क त्यांना सांगण्यात आले. जिल्ह्यातील महिला सरपंचांचा कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

  • 06 Mar 2024 09:45 AM (IST)

    ग्रामपंचायतीच्या निवडणूक पुढे ढकलण्याचे संकेत

    अमरावती जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतीच्या निवडणूक पुढे ढकलण्याचे संकेत आहेत.  निवडणूक आयोगाकडून अद्यापही मार्गदर्शन नसल्याने निवडणुकी बाबत संभ्रम कायम आहे. अमरावती जिल्ह्यातील 3 ग्रामपंचायत मध्ये सार्वत्रिक तर 64 ग्रामपंचायत मध्ये पोटनिवडणूकीची तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणूका लांबण्याची शक्यता आहे.

  • 06 Mar 2024 09:30 AM (IST)

    निवडणुकीच्या काळात राज्याला मोठ्या मनुष्यबळाची आवश्यकता

    लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्याला मोठ्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे. जवळपास ५ .५ लाख कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी लागू शकतात.  सर्व विभागांनी यात सहभागी व्हावं, असं आवाहन नवे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी केलं आहे. श्रीकांत देशपांडे यांच्याकडून त्यानी सीईओ म्हणून पदभार स्वीकारला. राज्यात जवळपास १ लाख मतदान केंद्रे असणार आहेत.  कोणताही विभाग मतदान कर्तव्यापासून दूर राहू शकत नाही अस सीईओ यांमी म्हटल आहे. शिक्षकांना निवडणूक ड्यूटी नको अस राज ठाकरे आणि काही अपेक्षांचं म्हणणं होतं.

  • 06 Mar 2024 09:16 AM (IST)

    obc मधूनच आरक्षण मिळत नाही, तोवर नोकरभरती न करण्याचा मराठा समाजाच्या बैठकीत ठराव

    जालना येथे काल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकित मराठा समाजाला obc मधून आरक्षण मिळत नाही तोवर नोकरभरती करू नये ,तसेच दडपशाही केल्यास जेलभरो आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा ठराव पारीत केला,सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी होई पर्यत कोणत्याही पक्षा सोबत न राहण्याचा ठराव देखील यावेळी घेण्यात आला. शहरातील मातोश्री लॉन वर समाजाच्या वतीने ही काल रात्री ही बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर याच ठरावाच्या अमलबाजवणी साठी समाजाच्या वतीने सामूहिक शपथ देखील घेण्यात आली.

  • 06 Mar 2024 08:56 AM (IST)

    Maharashtra News | मराठा समाजाकडून धाराशिव लोकसभा निवडणुकीची तयारी

    मराठा समाजाने सुरु केली धाराशिव लोकसभा निवडणुकीची तयारी. मनोज जरांगे यांच्या दौऱ्यानंतर नियोजन बैठका. प्रत्येक गावात एक उमेदवार उभा करणार, ठराव बैठकांचे सत्र सुरु. भुम येथे बैठकाचे सत्र सुरु तर सावरगाव येथे बैठक घेऊन गावातून 3 उमेदवार उभे करण्याचा निर्णय.

  • 06 Mar 2024 08:53 AM (IST)

    Maharashtra News | एकनाथ शिंदेंनी अमित शाहंकडे काय मागणी केली?

    आपल्या पक्षाला लोकसभेच्या 18 जागा मिळाव्यात यासाठीही शिंदे आग्रही होते. राज्यात आपण उठाव केलाय आणि सर्व आमदार-खासदारांना सोबत घेऊन पक्ष वाढवत असल्याचंही शिंदे म्हणाले आहेत. निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या सर्व 13 विद्यमान खासदारांना तिकीट द्या, अशी आग्रही मागणी एकनाथ शिदे यांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे…

  • 06 Mar 2024 08:27 AM (IST)

    Maharashtra news | विशेष तपास पथकाचा अहवाल सदोष ठरविला

    विशेष तपास पथकाने अवैध गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर दोषारोप ठेवत 137 कोटींचा दंड ठोठावला होता. या प्रकरणाने नवे वळण घेतले असून, शासनाने विशेष तपास पथकाचा अहवाल सदोष ठरविला आहे अशी माहिती समोर येत आहे. त्या अनुषंगाने होणाऱ्या कारवाईला स्थगिती दिली आहे.

  • 06 Mar 2024 08:13 AM (IST)

    Maharashtra News | नंदूरबार लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण?

    नंदूरबार लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण राहणार संभ्रम वाढला आहे. आमदार के सी पाडवी यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला. आमदार शिरीष नाईक यांनी उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली. काँग्रेस यावेळी नंदुरबार लोकसभा जिंकणारा उमेदवार देणार. देशात बेरोजगारी महागाई हे सर्व विषय घेऊन निवडणूक लढणार आहे. काँग्रेस नंदूरबार लोकसभेची जागा जिंकणार असल्याचा विश्वास आमदार शिरीष नाईक यांनी व्यक्त केला.

  • 06 Mar 2024 07:56 AM (IST)

    Marathi News | रोहामध्ये काढणार विक्रमी रांगोळी

    रायगडच्या रोहा तालुक्यात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने रोहा तालुक्यातील रोहा शहरानजीक असलेल्या भुवनेश्वर येथील मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याची भव्य विश्वविक्रमी महारांगोळी साकारण्यात येत आहे.

  • 06 Mar 2024 07:44 AM (IST)

    Marathi News | मराठा समाजाचा मूक मोर्चा

    मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर लावण्यात आलेल्या एसआयटी चौकशीच्या विरोधात परभणीत 11 मार्च रोजी सकल मराठा समाज कडून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. परभणीत सकल मराठा समाजाकडून आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

  • 06 Mar 2024 07:28 AM (IST)

    Marathi News | सुप्रिया सुळे यांचे मतदार संघात फ्लेक्स

    पुण्याच्या बारामती लोकसभा मतदार संघातील भोर तालुक्यातल्या गावागावात सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीचे फ्लेक्स लागलेत. उमेदवारी जाहीर होण्याआधीचं फ्लेक्स झळकल्याचे ठिकठिकाणी पाहायला मिळतंय. त्याचबरोबर शरद पवार गटाला मिळालेलं तुतारी चिन्ह आणि नवीन नाव फ्लेक्स द्वारे गावागावात पोहचवण्याचा सुळे यांच्या गटाचा प्रयत्न दिसत आहे.

  • 06 Mar 2024 07:14 AM (IST)

    Marathi News | पुणे रुबी हॉल ते रामवाडी मार्ग आज खुला होणार

    पुणे शहरातील विविध विकास कामांचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार आहेत. ऑनलाईन माध्यमातून या प्रकल्पांचे लोकार्पण अन् भूमीपूजन होणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या मेट्रो मार्गाचे भूमीपूजन आहे. तसेच रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.