Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…
दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा...
मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाचा आज नववा दिवस आहे. भूखंड विक्री, गायरान जमीन, कर्नाटक सीमाप्रश्न यावरून विरोधक सरकारला घेरत आहेत. तसंच सत्ताधाऱ्यांकडूनही दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून आदित्य ठाकरे पर्यायाने शिवसेनेच्या ठाकरेगटावर शाब्दिक हल्ला केला जातोय. त्यामुळे यंदाचं अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.
दुसरीकडे चीनसह इतर देशांमध्ये दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यामुळे परदेशातून भारतात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं थर्मल टेस्टिंग करण्यात येत आहे. यासह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये घडामोडी घडत आहेत. या सगळ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदारांसोबत बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सकाळी रामगिरीवर सगळ्या खासदारांची घेतली बैठक,
सगळे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले,
मतदारसंघातील अडचणी मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या,
संसदेत झालेल्या अधिवेशनाचा आढावा घेतला,
सकाळी रामगिरीवर पार पडली बैठक.
-
पुण्यातील कॅम्प परिसरात मध्यरात्री मुलांच्या आश्रमाला लागली आग
पुणे कॅम्प मधील तय्यबीया अनाथ मुलांच्या आश्रमाला आग
अग्निशमन दलाच्या जवानांकडून १०० मुलांची सुखरूप सुटका
इलेक्ट्रिक शॉट सर्किट मुळे लागली होती आग
सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी नाही
-
-
शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधवांची अनिल देशमुखांवर टीका
जेलमधून बाहेर आल्यावर 100 खोक्यांमध्ये कोण कोण होते त्यांची नावं जाहीर करावी
अनिल देशमुख, सचिन वाझे इतरांची नावंही सांगा
सत्ता गेल्यापासून संजय राऊत बावचाळलेले आहेत
त्यांच्याकडे बॉम्ब नव्हे तर लवंगी फटाकाही नाही
-
अनिल देशमुख बाहेर येणार त्यामुळे राऊत कुटुंबियांमध्येसुद्धा आनंदाचं वातावरण
आम्ही त्यांना महाविकास आघाडीचे नेते म्हणून भेटायला जाणार आहोत,
त्यांच्या कुटुंबानी खूप त्रास सहन केवा असेल,
सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना ईडी, सीबीआय, इनकम टँक्स लावली जाते,
पण संजय राऊत बाहेर आले आता अनिल देशमुखही येतील असं सुनील राऊत यांनी म्हंटले आहे.
-
नवी मुंबईतील APMC भाजीपाला मार्केटमध्ये घाणीचं साम्राज्य
नवी मुंबईच्या मार्केटमध्ये सकाळी भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो,
मात्र उर्वरित खराब भाजीपाला हा तिकडेच टाकून दिला जातो, त्यामुळे सर्वत्र भाजीपाला मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य,
तसेच या सडलेल्या भाजीपाल्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे,
या सडलेला भाजीपाल्यामुळे रोगराई पसरण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
-
-
तुनिशाच्या आत्महत्येला मुकेश खन्ना यांनी म्हटलं ‘बालिश’
तुनिशाच्या आत्महत्येला मुकेश खन्ना यांनी म्हटलं ‘बालिश’
हे काही लव्ह-जिहादचं प्रकरण नाही- मुकेश खन्ना
प्रत्येक खान तशा प्रकारचं काम करत असेल हे काही गरजेचं नाही- मुकेश खन्ना
-
नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला पुन्हा मोठं खिंडार
जिल्ह्यातील ठाकरे गटाचे काही माजी आमदार, माजी जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांचा आज शिंदे गटात प्रवेश,
जवळपास ५० पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश,
आज रात्री नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी प्रवेश,
प्रवेश करणारे सर्व पदाधिकारी नागपूरच्या दिशेनं रवाना.
-
तुनिशा डिप्रेशनसाठी कुठलीही औषधं घेत नव्हती, पोलिसांनी केलं स्पष्ट
टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरण
तुनिशा डिप्रेशनसाठी कुठलीही औषधं घेत नव्हती, पोलिसांनी केलं स्पष्ट
सहकलाकार, स्टाफ यांच्यासह एकूण नऊ जणांचे नोंदवले जबाब, वाचा सविस्तर माहिती
-
ICICI बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर, दीपक कोचर अटक प्रकरण
ICICI बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर, दीपक कोचर अटक प्रकरण
प्रकरणात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च हायकोर्टाच्या व्हेकेशन बेंचचा नकार
सुट्टीनंतर न्यायालय पुन्हा सुरू झाल्यावर नियमित खंडपीठाकडे जाण्यास सांगितलं
कर्ज प्रकरणात सीबीआयने केलेल्या अटकेला आव्हान देत त्यांनी उच्च न्यायालयात घेतली होती धाव
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं निमंत्रण
16 जानेवारीला तुळापूरला होणार शंभू सोहळा,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोहळ्याला लावणार हजेरी,
नागपूरात शंभू राज्याभिषेक सोहळ समितीनं दिलं निमंत्रण,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निमंत्रण स्विकारलं.
-
KL Rahul: केएल राहुलची जागा घेण्यासाठी महाराष्ट्राचे ‘हे’ दोन प्लेयर तयार, फक्त संधीची प्रतिक्षा
KL Rahul: सध्या खराब फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलची जागा कुठले प्लेयर्स भरुन काढू शकतात. कोण आहेत ते? जाणून घ्या त्याबद्दल….
-
cristiano ronaldo: अशी गर्लफ्रेंड सगळ्यांना मिळो, रोनाल्डोला दिलं तुमच्या-आमच्या कल्पनेपलीकडचं ख्रिसमस गिफ्ट
cristiano ronaldo: नुकत्याच संपलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये पोर्तुगालची टीम अपयशी ठरली. पण गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जने त्याला लक्षात राहील, असं स्पेशल गिफ्ट दिलय. वाचा सविस्तर…
-
अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
बारामती : टिईटी प्रमाणपत्र नसताना अब्दुल सत्तार यांच्या मुलीला केलं सेवेत कायम…?
हिना कौसर यांचे टिईटी प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याची बाब माहिती अधिकारात उघड,
हिना यांच्या आधार कार्ड, पॅन कार्ड आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यावर वेगवेगळ्या जन्मतारखा,
दुसऱ्या कन्येची माहितीच उपलब्ध नसल्याचे संबंधित विभागाचे पत्र,
माहिती अधिकारात नितीन यादव यांना मिळाली धक्कादायक माहिती,
मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरुनच या नेमणुका झाल्या का..? माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांचा सवाल,
-
उरणच्या जेएनपीटी बंदरात एका कंटेनरमध्ये ब्लॅक इग्वांना प्राणी सापडला
घोरपडीच्या प्रजातीचा हा प्राणी असून हा भारतात सापडत नाही
मेक्सिकोमधून हा कंटेनर आला असून त्यामध्ये चुकून हा प्राणी आला असावा, असा अंदाज
-
आमदार रवी राणांचा संजय राऊतांवर टिकास्त्र
नागपूर : राऊतांनी विदर्भात येऊन बॉम्ब फोडण्याची भाषा करू नये,
त्यांचे आधीच 40 आमदार गेले हा बॉम्ब फुटला आहे,
आम्ही जर बॉम्ब फोडला तर संजय राऊत, उद्धव ठाकरे दिसणार नाहीत,
आदित्य ठाकरे ,उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील,
अडीच वर्षात काय काम केलं हे दाखवावं मी संजय राऊत आणि उद्ध् ठाकरेंना बक्षिस देईन,
आमदार रवी राणांचा संजय राऊतांना आवाहन.
-
शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष उदय आहेर यांचा घरचा आहेर
नाशिक : शिवसंग्रामच्या आमदारांना विनायक मेटे साहेबांच्या विचारांचा विसर पडलाय,
मेटे गेल्यापासून एकाही आमदाराने मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाबाबत आवाज उठवला नाही,
मेटे साहेबांच्या पत्नीला विधानपरिषद का दिली नाही ?
उदय आहेर यांचा सवाल,
शिवसंग्रामचे आमदार विश्वासात घेत नाही – उदय आहेर
मेटे साहेब गेल्यानंतर शिवसंग्रामची घडी विस्कटली ..
-
वादग्रस्त सिल्लोड महोत्सवाची सिल्लोड शहरात जय्यत तयारी
वादग्रस्त सिल्लोड महोत्सवाची सिल्लोड शहरात जय्यत तयारी
सुतमील मैदानावर 1 जानेवारी पासून सुरू सिल्लोड महोत्सव होतोय
1 जानेवारी ते 10 जानेवारी सिल्लोड महोत्सव चालणार आहे
कृषिप्रदर्शन आणि सांस्कृतिक महोत्सवचं सिल्लोड महोत्सवात आयोजन
कृषी प्रदर्शनात तब्बल 700 स्टोल असणार तर
सांस्कृतिक महोत्सवात अजय अतुल पासून सर्वच कलाकार लावणार उपस्थिती
-
नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात मास्क सक्ती
मास्क लावून मंदिर प्रशासनाला सहकार्य करण्याचे भाविकांना आवाहन
काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वारावर मंदिर प्रशासनाच्या वतीने सूचना
बहुतांश भाविकांच्या चेहऱ्यावर मास्क असल्याचे चित्र
-
गोंदिया शहरात भरली कुस्तीची दंगल
मागील २२ वर्षा पासून सुरु आहे कुस्तीची दंगल,
महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधील कुस्ती पटू सामील,
मुलींनी देखील घेतला सहभाग,
कोरोना च्या तीन वर्षा नंतर करण्यात आले आयोजन,
१५० च्या वर लोकांनी घेतला सहभाग.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वसंत मोरे यांची आज भेट होण्याची शक्यता
राज ठाकरे यांच्या पुण्यातील मागील अनेक कार्यक्रमांना वसंत मोरे अनुपस्थित होते.
पक्षकार्यालयात राज ठाकरे आल्यावरही वसंत मोरे यांनी अनुपस्थिती लावली होती
मात्र आज मनसे नेते वसंत मोरे आणि राज ठाकरेंची प्रत्यक्ष भेट होणार आहे.
धायरी येथील मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला राज ठाकरे उपस्थित राहतील
-
जेजुरीत खंडोबा मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्कसक्ती
जेजुरीत खंडोबा मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्कसक्ती
देवस्थान समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मास्क घालणं बंधनकारक
तर भाविकांनीही आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी घेण्याचं आवाहन
देवस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांची माहिती
-
उद्धव ठाकरे आजही विधानपरिषदेच्या कामकाजात सहभागी होणार
रेडीसन ब्लू हॉटेल परिसरातील वाहनांची आजही बीडीडीएस पथकाकडून तपासणी
ब्रुनो या श्वानाच्या मदतीन आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या वाहनाची तपासणी करण्यात आली
-
पिंपरी चिंचवडमध्ये ही गोवर रुग्णांची संख्या वाढतीच
शहरात सध्या गोवर चे निश्चित निदान झालेल्या 35 रुग्णांची नोंद झालीय,तर 462 जण संशयीत आहेत,
ह्यामध्ये सुदैवाने गोवर चा एक ही गंभीर रुग्ण शहरात आढळलेला नाही,
महापालिकेकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू आहे. तरी ही नागरिकांनी मुलांना गोवर लस देण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलंय.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर
पुणे दौऱ्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या जनसंपर्क कार्यालयाचं राज उदघाटन करणार
राज ठाकरे यांचा तीन दिवसीय पुणे दौरा असणार आहे
राज ठाकरे उद्या सहजीवन व्याख्यानमालेत सहभागी होणार
शिवाय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे बैठक घेणार
-
सोलापूर : पाच लाखांची लाच मागितल्या प्रकरणी समाज कल्याण विभागातील शिपायाला अटक
पाच लाखांची लाच मागितल्या प्रकरणी समाज कल्याण विभागातील शिपायाला अटक
आश्रम शाळेतील शिक्षकेचा प्रलंबित पगार काढण्यासाठी दोन शिपायांनी मागितली लाच
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या शिपायाला अटक केली.
दोन पैकी एक शिपाई पळून जाण्यात यशस्वी तर दुसरा लागला हाती.
अशोक जाधव असे अटक केलेल्या शिपायाचे नाव आहे
-
नाशिक शहरातील वाहतुक पोलिसांची कारवाई सुसाट
नाशिक : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई,
दहा महिन्यांत तब्बल 1 लाख 18 हजार नाशिककरांना दंड,
पहिल्यांदा पाचशे तर दुसऱ्यांदा दीड हजार रुपये दंड आकारणी,
एकूण 1 कोटी 28 लाख 57 हजार रुपयांचा दंड,
काही वाहनचालक वाहतूक पोलिसांना देखील नाही जुमानत.
-
औरंगाबाद शहरात आढळला दुसरा कोरोना बाधित रुग्ण
औरंगाबाद शहरातील संजय नगर परिसरात आढळला कोरोना बाधित रुग्ण
कोरोना बाधित रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू
शहरात दुसरा रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
-
टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
दुपारी 3 वाजता मिरा रोड इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
-
उचगाव ग्रामपंचायत निवडणुकीवरून कोल्हापुरात वातावरण तापणार
उचगाव ग्रामपंचायत निवडणुकीवरून कोल्हापुरात वातावरण तापणार
उचगाव ग्रामपंचायतची फेर निवडणूक घेण्याची ग्रामस्थाची मागणी
निवडणूक प्रक्रियेत शासकीय अधिकारी आणि सतेज पाटील यांच्या स्वीय सहाय्यकाने हस्तक्षेप महाडिक गटाकडून आरोप होतोय
विजय साजरा करता येतो तसा पराजय ही पचवता आला पाहिजे,
सतेज पाटील पाटील यांचा महाडिक गटाला टोला
-
नववर्ष स्वागतासाठी केडीएमसीची विविध चौकात रोषणाई
नववर्ष स्वागतासाठी केडीएमसीची विविध चौकात रोषणाई
पालिकेच्या आव्हानानंतर लोकसहभागातून विविध चौकात विद्युत रोषणाई
डॉक्टर आणि विकासकांनी केलेल्या विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
-
पुणे मेट्रो अंशत: बंद राहणार
आज आणि उद्या मेट्रो अंशत: बंद राहणार
वनाज ते गरवारे महाविद्यालय स्टेशन दरम्यान मेट्रो बंद राहणार
वनाज ते गरवारे महाविद्यालय स्टेशन दरम्यान सिग्नलिंगची चाचणी
आज आणि उद्या पहाटे 3 ते दुपारी 2 चाचणी होणार
Published On - Dec 27,2022 7:26 AM