मुंबई, दि. 6 जानेवारी 2024 | भारत आज इतिहास रचणार आहे. चंद्रा मोहिमेच्या यशानंतर सूर्याकडे निघालेले आदित्य एल 1 आज लँग्रेंज प्वाइंट-1 वर पोहचणार आहे. 2 सप्टेंबर 2023 मध्ये इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-1 हे अंतराळात झेपावले होते. राज्यामध्ये सातत्याने करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शुक्रवारी १४६ नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ९३१ इतकी झाली आहे. मुंबईत विनाहेल्मेट चालकांवर पोलिस कारवाईचा वेग वाढत आहे. शुक्रवारी दिवसभरात ३७९६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. फुकट प्रवास करत असलेल्यांना ‘बेस्ट’ने दणका दिला आहे. एका दिवसात ५८ हजारांचा दंड वसूल केला आहे. जोधपूर-भोपाळ पॅसेंजर ट्रेनचे दोन डबे आज कोटा जंक्शनजवळ रुळावरून घसरले. राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. आम्ही ओबीसी एकत्र झालोय त्यामुळे मराठ्यांचं आंदोलन आम्ही सहजपणे अरबी समुद्रात बुडवून टाकू असे ते म्हणाले. आपल्याकडे कोयता, परशु आणि काठी आहे त्यामुळे काळजी करू नका, असे ते म्हणाले. 10 लाख गाड्या, 200 जेसीबीने फुले उधळायला, हेलिकॉप्टरने फुले उधळणारा समाज गरीब आहे म्हणे.असली गरिबी आम्हालाही येऊ दे असे साकडे मी पांडुरंगला घालतो.75 वर्षे सत्तेत बसलेले नाग आहेत त्यांनी तुम्हाला गरीब बनवले.तुम्हीच सत्तेत आहात त्यामुळे त्या जाणत्या राजांना विचारा की सोलापूर जिल्ह्यात सगळे आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य मराठा आहेत. यापुढच्या काळात आता ओबीसी नेत्यांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी केले.
सरसकट आरक्षणासाठी मुंबईला जायचे आहे. 20 तारखेची तयारी ठेवा, असे आवाहन मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. मुंबईला चला. मी म्हणालो होतो मराठ्यांच्या नादी लागू नका. अनेक पोरांचे कल्याण होणार आहे. घराला कुलूप लावून या असे आवाहन त्यांनी केले.
इस्त्रोच्या शिरपेचात अजून एक मानाचा तूरा खोवल्या गेला. इस्त्रोच्या हाती मोठं यश आले आहे. आदित्य एल 1 सूर्याच्या अगदी जवळ पोहचले आहे. हॅलो ऑब्रिटमध्ये ते पोहचले आहे. आता या ठिकाणाहून ते सूर्याशी संबंधित सर्व माहिती जमा करेल.
आमचा शिवसंकल्प हा मिशन ४८ आहे. आम्हाला मोदींचे सरकार आणायाचे आहे. आम्ही ४५ प्लस जागा जिंकणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. जागा वाटपाचे अजून ठरलेले नाही. चर्चा सुरु आहे. पण आम्हाला मोदींना शक्ती द्यायची असल्याचे ते म्हणाले.
शरद मोहोळ हत्या प्रकरणातील 6 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मुख्य आरोपीसह 6 आरोपींना 10 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 2 वकिलांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. काल दुपारी पुण्यातील कोथरूड परिसरात शरद मोहोळची गोळ्या घालत हत्या करण्यात आली होती. या सहा आरोपींचे वकीलपत्र आम्ही घेतलं होतं म्हणून आम्हाला अटक करण्यात आल्याचं या वकिलांचं म्हणणं आहे.
मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला. मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या आहेत, मराठ्यांना सरसगट ओबीसीतून आरक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर टीका करताना त्यांनी, तू कोर्टात लढ नाहीतर नदीने पळ. तू झोपीत नको राहू मराठे सुद्धा तुझ्या आरक्षणा विरोधात कोर्टात लढू शकतात, असे सांगितले.
सरकारने शेतकऱ्यासाठी अनेक फायदेशीर निर्णय घेतले. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. नागपूरच्या अधिवेशनात अनेक निर्णय घेतले यानुळे विरोधी पक्षाला बोलून दिलं नाहr. विरोधी पक्ष फक्त आरोप करत आहे. आपण शेताच्या बांधावर काम करणारे आहोत घरात बसून उंटावर बसून शेळ्या हकणारे नाही- एकनाथ शिंदे
आपण बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचे काम त्यांच्यासोबत युती केली. आज राम मंदिर मोदींनी बनवलं. मोदींनी तारीख सांगितली आता विरोधक कॅलेंडर मध्ये तारीख शोधात बसले आहेत. सरकारने मिशन 48 चे आणि मोदींनी 400 पार घोषणा दिली आहे. महाराष्ट्रात 45पार होणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.
सत्ता आल्यावर टूणकण उडी मारून सीएम झाले. शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांचा रोज प्रवेश सुरू आहे. मी एक कार्यकर्ता म्हणून काम केलं आज मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि करत राहणार- एकनाथ शिंदे
बाळासाहेबांचे विचार पूढे नेण्यासाठी सत्तेवर लाथ मारली. मला पदाचा मोह नव्हता, पक्ष वाचवण्यासाठी साथ सोडली. माझी भूमिका शिवसेनेचे खच्चीकरण थांबवण्यासाठी, अंगणवाडी सेविकांचा प्रश्न आम्ही मार्गी लावणार- एकनाथ शिंंदे
खोटं बोलून त्यांनी शिवसैनिकांचा विश्वास तोडला आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केली आहे. शिवसंकल्प अभियानात ते बोलत होते.
कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार केल्यानंतर पळून गेलेल्या गुंडाना आरोपींना शिरवळ येथून पकडल्याचे पुणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बाळासाहेबांनी अयोध्या येथील राम लल्लासाठी जे कार्य केले आहे. त्या बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून उध्दव ठाकरे यांनी अयोध्येला जायला पाहिजे असं आपलं व्यक्तिगत मत असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
सध्याचे नेते लाचार, मिंधे, पैशांनी वेडे झाले आहेत. त्यांनी स्वाभीमान गहाण ठेवला आहे. सध्याचं राजकारण पाहता मुंबईलाही हात लावायला मागे-पुढे पाहणार नाहीत. उद्या विदर्भ, महाराष्ट्राचाही तुकडा पाडतील असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाला तीस दिवस पूर्ण. कांदा निर्यातबंदी निर्णयामुळे एकट्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 500 कोटींचे नुकसान. तातडीने कांदा निर्यातबंदी खुली करण्याची शेतकऱ्याची मागणी.
सोने, चांदी, दागिने, ताट आहेर भेट. राम मंदिर ट्रस्टचे सचिव चंपतराय यांनी केला स्वीकार. मुलीला जसं लग्नात भेट देतात तस माता जानकीच्या घरच्या लोकांकडून हा सगळा आहेर भेट देण्यात आला.
अनेक कारणांनी नाट्य संमेलन साजरे होण्यास उशीर झाला. हे संमेलन निर्विग्न होत आहे त्याचा आनंद आहे. काळानुरूप नाटक बदलत गेली कौटूंबिक नाटक सह आता ऐतिहासिक नाटक ही होत आहेत. नवनवीन विषय नाटकात येत आहेत,राज्यभर नाट्य संमेलन हा सोहळा रंगणार आहे, असे पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार यांनी म्हटले आहे.
चाळीसगाव चौफुलीवर राऊत यांचा शिवसेनेच्या वतीने जोरदार स्वागत. ढोल ताशाच्या गजरात स्वागत. मोठ्या संख्येने शिवसैनिक पदाधिकारी महिला कार्यकर्ते उपस्थित…
जितेंद्र आव्हाड यांच्या श्री रामाच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. जितेंद्र आव्हाड मोठे आणि अभ्यासू नेते आहेत असं ते म्हणाले. धर्मावर कुणी राजकीय टिप्पणी करू नये असं मतही त्यांनी मांडले.
बारामती अॅग्रो कारखाण्यावर इडीच्या कारवाईनंतर रोहित पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. बारामती अॅग्रो कारखाण्याचा विषय भाजप मोठा असल्याचं दाखवतंय असं ते म्हणाले. भाजपमध्ये गेलेल्यांवर झालेल्या कारवाईचे नंतर काय झाले असा सवालही त्यांनी विचारला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज भाजपची पुण्यामध्ये बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. भाजप युवा मोर्चाचे पदाधीकारी बैठकीला उपस्थित राहाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्यात आज दोन मेळावे आहेत. शिवाजीराव अढळ पाटील यांच्यासाठी ते मेळावा घेणार आहेत. दुपारी 1 वाजता या मेळाव्याचे आजोजन करण्यात आले आहे. श्रीरंग बारणे यांच्यासाठीसुद्धा एक मोळावा घेणार आहेत.
श्री राम मांसाहरी होते अस वक्तव्य केल्याप्रकरणी यवतमाळमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या स्थरातून अनेक प्रतिक्रीया उमटत आहेत. या वक्तव्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली होती.
बारामती ऍग्रोची महत्त्वाची कागदपत्र इडीकडून जप्त करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. काल झालेल्या झापेमारीमध्ये ही कागदपत्र जप्त झाल्याचे सुत्रांनी सांगितले.
१०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलन उद्घाटन समारंभाला सुरुवात… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार उदय सामंत उपस्थिती… अजित पवार अजून आलेले नाहीत… त्यांमुळे त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा…
कोल्हापूरच्या पावनगड परिसरात संचारबंदी आदेश लागू करण्यात आली आहे… पावनगडावरील मदरसा पाडकामाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केली. आज रात्री बारा वाजेपर्यंत राहणार संचारबंदी आदेश लागू असणार आहेत.
राजाराम कारखान्याच्या एम डी नंतर आता माजी अध्यक्षाना माराहण… ग्रामपंचायत वादातून मारहाण झाल्याची माहिती… सर्जेराव माने यांना झाली माराहण.. हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे गावातील घटना… जमावाने गाड्या जाळत तोडफोड केल्याने मोठे नुकसान
अयोध्येत राम मंदिरात पाहायला मिळणार रामायण… १३ वर्षापासून सुरु आहे रामायणातील पात्रांच्या मूर्त्या बनवण्याचं काम… राम मंदिराच्या कॉरिडोरवर पाहायला मिळणार रामायण मूर्तीच्या माध्यमातून… अयोध्येतल्या राम कथा कुंज परिसरात सुरु आहे रामकथा निर्माणाच काम… आसामचे मूर्तीकर रणजीत मंडल बनवत आहेत मूर्त्या
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहर पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपकडून तक्रार देण्यात आली होती. भावना दुखावल्याप्रकरणी व्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी ठाणे पोलिसांच्या मदतीने ठाण्यातून धमकी देणाऱ्या त्या तरूणाला बेड्या ठोकल्या.
अटकेत असलेल्या आरोपीचे देवरिया हत्याकांडाशी कनेक्शन असल्याची माहिती मिळत आहे. चौकशीनंतर आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
मी फक्त ओबीसींसाठी काम करतोय, मला मंत्रीपद आणि आमदारकी महत्वाची नाही असं विधान छगन भुजबळ यांनी केलं. सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यालाही आपला विरोध आहे आणि त्यासाठी लढाई करणार असंही भुजबळ म्हणाले.
कोल्हापुरातील पावनगडावरील अतिक्रमण प्रशासनानं हटवलं. रात्री दोन वाजता सुरू झालेली कारवाई नऊ वाजता संपली. किल्ले पावनगडावरील अनाधिकृत अतिक्रमण केलेले मदरसा हटवण्यात आले. हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाची कारवाई करण्यात आली. किल्ले पावनगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गडाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे.
सहाय्यक अभियंत्यानेच महावितरणच्या अधिकाऱ्यांचं कार्यालय फोडल्याची घटना अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील नान्नज गावात घडली आहे.
प्रल्हाद टाक असं तोडफोड करणाऱ्या सहाय्यक अभियंत्याचं नाव असून थकबाकी वसूल न झाल्याने टाक यांना निलंबित करण्यात आलं होतं. निलंबनाच्या कारवाईने संतप्त झाल्यानेचे टाक यांनी कार्यालय फोडलं.
मराठा समन्वयक योगेश केदार आणि OBC नेते प्रकाश शेंडगे यांची मुंबईत भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. 20 जानेवारीच्या आंदोलनात संघर्षण टाळण्यासाठी ही भेट झाल्याचे समजते.
भेटीदरम्यान दोन्ही पक्षांनी सांमजस्याची भूमिका घेतली. समाजात तेढ निर्माण होऊ नये अशी दोन्ही नेत्यांची भावना आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्याची झाडाझडती घेतली. मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्र लढतील. कुणीही मागच्या दाराने भाजपला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही. कॉंग्रेससोबत चांगली बोलणी झाली असून 2 ते 4 दिवसांत दिल्लीत जाणार आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहे. नाना पटोले आणि खरगे यांच्याकडून जागांसंदर्भात वक्तव्य आलेलं नाही. पण आम्हाला खात्री आहे की आम्ही जिंकू. जो उमेदवार जिंकणार त्याला जागा देणार. काँग्रेसने कोणत्याही जास्त जागा मागितल्या नाही, असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
उत्तर भारतात कडाक्याची थंडी आहे. आणखी पुढील दोन दिवस कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. संपूर्ण अयोध्येत धुक्याची चादर पहायला मिळतेय. २२ जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्या आधीपासून रामभक्त अयोध्येत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीसंदर्भात आज भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली आज संध्याकाळी ही बैठक होणार आहे. सगळ्या राज्यांचे अध्यक्ष आणि प्रभारी या बैठकीत सहभागी होणार आहेत. आजच्या बैठकीमध्ये जबाबदारी निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. राम मंदिर उद्घाटन आणि राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रेबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली- भारत जोडो न्याय यात्रेच्या लोगोचं आज अनावरण होणार आहे. काँग्रेस पक्षाकडून अधिकृतरित्या अनावरण केले जाणार आहे. लोगोसह थीम सॉंगही प्रसिद्ध केले जाणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत लोगो आणि थीम सॉंग लॉन्च केलं जाणार आहे.
अखिल भारतीय नाट्य संमेलन नाट्य दिंडीला मोठ्या उत्साहात सुरुवात झालीय. अनेक मराठी कलाकारांसह पिंपरी चिंचवडकरांनी मोठ्या उत्साहात या दिंडीत सहभाग नोंदवला.
अयोध्येत 22 जानेवारीला उद्घाटनाच्यावेळी पोलीस कर्मचारी स्मार्ट फोनचा वापर नाही करु शकत. अयोध्येत श्रीरामललाच्या मुर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पुण्यात आज भाजपची बैठक. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन. शहर भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे नियोजन. भाजप युवा मोर्चा आणि ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित रहाणार.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुलाबा येथील आयएनएस शिखरा येथे येऊन संपूर्ण स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. तसेच कुलाबा येथील रस्ते, भिंती पाण्याने धुवून स्वच्छ करण्याचे निर्देश मनपा अधिकाऱ्यांना दिले. इथे उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
पिंपरी चिंचवड मधील नाट्य संमेलनात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार का ? हा प्रश्न आहे. पुण्यातील नाट्य संमेलनात काल राजकीय नाट्याचा पहिला अंक झाला. आता उद्याच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या नाट्य संमेलनात राजकीय नाट्याचं दुसरा अंक पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उद्याच्या उद्घाटन सोहळ्याला हजर राहणार असल्याचं कळवलं आहे. त्यामुळं उद्यातरी शरद पवारांसह अजित पवार मंचावर दिसतील, अशी अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानाची आज सुरुवात होत आहे. लोकसभेच्या ‘मिशन-४८’साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानाची घोषणा केली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून या अभियानाला आजपासून प्रारंभ करणार आहेत.
जोधपूर-भोपाळ पॅसेंजर ट्रेनचे दोन डबे आज कोटा जंक्शनजवळ रुळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
नौदलाला मोठे यश मिळाले आहे. सोमालियाजवळ अपहरण करण्यात आलेल्या जहाजावरील १५ भारतीयांसह २१ जणांची सुटका करण्यात आली आहे. आफ्रिकेतील सोमालिया देशाजवळ गुरूवारी एका जहाजाचे अपहरण करण्यात आलं होतं.