मुंबई, दि. 7 जानेवारी 2024 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोस्टल रोडची पाहणी करणार आहे. त्यानंतर आयएनएस शिखरा ते ईस्टर्न फ्री वे मार्गावर राबविण्यात येणाऱ्या संपूर्ण स्वच्छता अभियानत सहभागी होणार आहेत. नागपूर जिल्हा बँक सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरण माजी मंत्री सुनील केदार यांना शिक्षा झाली. त्यांच्या जामीन देण्यास राज्य सरकारने जोरदार विरोध केला आहे. अयोध्या विमानतळावरून नियमित उड्डाणे आता लवकरच सुरू होणार आहेत. अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यासाठी राज्यव्यापी संप सुरु आहे. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. गेली दोन महिने खालावलेली मुंबईतील हवेची गुणवत्ता आता काहीशी सुधारली आहे. धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई शहरात उपकरणांसह अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
पिंपरी | तुम्ही जो पर्यंत शिक्षा देत नाही, तो पर्यंत कोणत्याही सुधारणा होणार नाहीत. चांगलं काम केलं तर कौतुक करा, पण काहीच केलं नाही तर आम्हाला सडेतोड उत्तर द्या. आम्ही सुतासारखे तेंव्हाच सरळ होऊ”, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच मोबाईलवर बंदी घाला, अशी मागणीही मनसेप्रमुखांनी केली. पिंपरी चिंचवडमध्ये अखिल भारतीय नाट्य संमेलनात राज ठाकरे यांनी प्रकट मुलाखतीदरम्यान ही मागणी केली.
राज ठाकरे काय म्हणाले?
“आधी मोबाईल वर बंदी घाला, कारण त्याच्यावर जे चालतं ना त्याला सेन्सॉरशिप असं काहीच नाही. त्याला कोणताच आई-बाप ही नाही. मोबाईल बंद झाला तर लोकसंख्या कमी होण्यास हातभार लागेल.”, असं राज ठाकरे यांनी नमूद केलं.
पिंपरी | मला निवडणूक लढायला लाज वाटते, असं मनसेप्रमुख राज ठाकरे पिंपरीत अखिल भारतीय नाट्य संमेलनात म्हणाले. मला निवडणूक लढायला लाज वाटते. कारण गेली 70 वर्षे काय तर माझे आजोबा, काका जे बोलले आज मी ही तेच बोलतोय. अरे तेच ते विषय, मग आपण पुढं कधी जाणार?, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच मनसेप्रमुखांनी कलाकारांचे आभार मानले.
“नाटक, कलाकार, साहित्यिक हे नसते तर कधीच अराजकता आली असती. कारण लोक तुमच्यात गुंतून पडला त्यामुळं दुसरीकडे दुर्लक्ष झालं. तुम्ही जर रात्रीच्या मालिका बंद केल्या तर सासू सुनांमध्ये खरी भांडणं होतील. म्हणून तुमचे आभार”, असं मनसेप्रमुखांनी नमूद केलं.
पिंपरी | मराठी कलाकारांनी एकमेकांना सार्वजनिक शॉर्टफॉर्मने हाका मारु नकात. तुम्ही तुमचा मान राखला नाहीत, तर लोकं तुम्हाला का मान देतील? असा सवाल राज ठाकरे यांनी कलाकारांसमोर उपस्थित केला.
पिंपरी | मराठी माणूस आपला इतिहास विसरतोय. तरुणाई मोबाईल-रिल्समध्ये अडकलीय. आपण जाती-पातीत भांडत आहोत, असं म्हणत राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अखिल भारतीय नाट्य संमेलनात राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत सुरु आहे. मुलाखतकार दीपक करंजीकर राज ठाकरे यांची मुलाखत घेत आहेत. या दरम्यान राज ठाकरे यांनी ही खंत बोलून दाखवली.
ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे प्रदेशअध्यक्ष सुनील तटकरे , भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेनेचे उदय सावंत आणि इतर नेत्यांची बैठक पार पडली. यापुढे आम्ही विभागीय मेळावे घेणार आहे. मी स्वतः, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मेळाव्याला हजर राहणार आहोत. आम्ही एकत्र आलो तसे खाली कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असावा यासाठी जिल्हास्तरावर मित्र पक्षांनी ज्या ज्या सहकाऱ्यांना नेमले आहे ते सहकारी समन्वय साधून मेळावे घेतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुणे : भाजपा मराठा समाजाला वेगळं मराठा म्हणून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासल्याचं आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळाले पाहिजे ज्याचा ओबीसी आरक्षणावर परिणाम होणार नाही. भारतीय जनता पार्टी ताकाला जाऊन भांड लपवत नाही जे आहे ते बिनदिक्कतपणे मांडते. येत्या आठवड्या पंधरा दिवसात मराठा समाजाचे सर्वेक्षण पूर्ण होणार. त्याआधारे मराठा समाज मागास कसा आहे हे मांडू असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
परभणी : पवार साहेब 1995 सालापासून देशाच्या राजकारणात गेले आणि काही ठराविक नेत्यांकडे दिलं होतं तेच लोक आज पवार साहेब थांबत नाही असं म्हणत असतील तर या लोकांना ईडी मागे लागल्यावर हा साक्षात्कार झाला आणि महाराष्ट्राची संस्कृती ते विसरले. बापाचा छत्र हवे असणारे मुलं महाराष्ट्रात आहे अशी टीका मेहबूब शेख यांनी अजित पवार यांच्यावर केली.
सांगली : शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी राजकीय भूकंप होणार या वक्तव्यावरून मंत्री उदय सामंत यांनी टोला लगावला. संजय राऊत यांना अनेक स्वप्न पडत असतात त्यांच्या स्वप्नांना आपल्या शुभेच्छा असा टोला त्यांनी लगावला. पुढची 25 ते 30 वर्षे संजय राऊत यांना अशीच स्वप्ने पाहात राहावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें हेच मुख्यमंत्री राहतील आणि राऊत 25 वर्षे टीका करत राहतील अशी टीकाही त्यांनी केली.
बीड : प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड कशा अवस्थेत होते ते पाहावे लागेल. शब्द माघार घेतल्यानंतर ते कुठल्या अवस्थेत होते हे पाहिले पाहिजे. ते शुद्ध होते का? एखादा माणूस बेशुद्ध अवस्थेत काहीतरी बडबड करतो आणि शुद्ध आल्यावर वेगळं बोलतो. ती अवस्था कोणती होती हे पाहावे लागेल अशी टीका मंत्री धनंजय मुडे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली. प्रभू रामचंद्र काय खात होते त्याला आव्हाड साक्षीदार आहेत का? त्यांच्या आजोबाला तरी माहीत आहे का? असा टोलाही त्यांनी लगावला.
भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर येथील एका घरी पहाटे देवघरात लावलेल्या दिव्याची पेटती वात उंदीर घेऊन गेल्याने घराला आग लागली. या आगीत घरातील साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले . लाखांदूर येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये ही घटना घडली असून या घटनेत बुधेश्वर रघुनाथ रासेकर (४५) यांच्या घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
सांगली : आम्ही गुवाहटीला जाऊन आल्यानंतर सरकार स्थापन झाले. पण, आता सत्तेत पुन्हा तिसरा पक्ष आला. त्यामुळे सत्तेतला वाटा वाढला. तसे झाले नसते तर अनिल बाबर नक्की मंत्री झाले असते. टांगा पलटी करून पुन्हा या मतदारसंघातील काही लोक सत्तेत आलेत असा टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी लगावला. 3 पक्षाच्या समितीमध्ये विद्यमान आमदारांना मदत करायची हे धोरण ठरलेले आहे असेही ते म्हणाले.
यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला दिशा दिली. यशवंतराव यांच्या जवळचे विश्वासू सहकारी म्हणजेच स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे तसेच संगमनेर तालुक्यासाठी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी खूप कष्ट केले. या स्मृती जपण्यासाठीच या सोहळ्याच आयोजन केलं आहे.
या सोहळ्यात आम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे नेत्यांना सुद्धा आमंत्रण दिले. तत्व आणि विचारांशी बांधिलकी जपणारा नेता म्हणजे जितेंद्र आव्हाड. मात्र ही बांधिलकी जपताना थोडाफार इकडे तिकडे होतं त्यात ते बोलून गेले. त्यांनी खेद सुद्धा व्यक्त केला मग काय विषय राहिला. जर कोण काय बोललं हेच काढायचं ठरलं तर खूप अवघड होईल, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
बापाला रिटायर करायच नसतं. बाप बाप असतो, बाप कधी रिटायर होत नसतो. बाप कुटूंबातील उर्जा स्रोत्र आहे, असंं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना टोला लगावला. काहींच 85 वय झाल मात्र ते थांबतच नसल्याचं वक्तव्य पवारांनी केलं होतं.
भाजपाचे जातीवादी आमदार नितेश राणे यांनी सोलापूर मध्ये जातीयवादी दंगल भडकवण्यासाठी, युवकांचे डोके भडकवण्यासाठी निर्माण करण्यासाठी असं त्यांनी वक्तव्य केलं. नितेश राणे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याबद्दल सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलिसांचे आभार मानतो. त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता गुन्हा दाखल केला आहे. तोडफोड दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे, असं ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी म्हटलं आहे.
सोलापूरात हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान झालेल्या दगडफेकीचा आपण निषेध करीत आहे. धर्म आणि जातीवर कोणी तेढ निर्माण करत असेल तर आपण त्याचा निषेध करतो असेही कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.
संगमनेर बस स्थानकासमोर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात बजरंग दल आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे. जितेंद्र आव्हाड आज संगमनेर दौऱ्यावर असून ते येण्याआधीच घोषणाबाजी सुरु आहे. श्रीरामाच्या आहाराबद्दल आव्हाड यांनी वादगस्त वक्तव्य केलं होतं.
ठाणे जिल्ह्यात गुंडगिरी कधीकधी डोकंवर काढते. माझे पोलिसांना आदेश आहेत की सामान्यांना गुंडगिरीचा त्रास होऊ नये याची दक्षता घ्या असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
वय 80 झालं तरी काही जण रिटायर्ड होत नाहीत अशी टीका अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांचे नाव न घेता पुन्हा केली आहे. वय झालं की थांबायचं असतं पण काही जण अति करीत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
काही जण मुंबईत येण्याची टोकाची भाषा करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता केली आहे. आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
5 सप्टेंबर उलटून तीन महिने उलटले तरी शिक्षक पुरस्कार जाहीर झालेले नाहीत. राज्यातील जिल्हा परिषद शाळा खाजगी करणं करून गडदारांनी शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ करण्याचे प्रयत्न सुरू केलेत, असे विनायक राऊत यांनी म्हटले.
शिक्षण खात्याचा बट्ट्यबोल. शिक्षण खात्याला वाऱ्यावर सोडले आहे. शिक्षण खात्याच्या शाळा बंद करायच्या आणि मोठ्या उद्योग जाताना ही प्रॉपर्टी द्यायची. इंग्रजीच्या नावावर मराठी शाळा बंद करायच्याय राईट ऑफ एज्युकेशन ला दुर्लक्ष करायचं. शिक्षणाचा धंदा केला असल्याचे देखील खासदार विनायक राऊत यांनी म्हटले.
अडीच वर्ष ते देखावा करत होते घरी बसून आम्ही घरी बसून नाही रस्त्यावर उतरून काम करत. हा देखावा नाही हा पूर्णपणे प्रधानमंत्री जेथून स्टार्ट होतात किंबहुना तेथून जेव्हा लोकार्पण याचा होईल हा संपूर्ण परिसर जो आहे तो स्वच्छ राहिला पाहिजे म्हणून आम्ही डीप क्लीन अभ्यास सुरू केलेला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अजित दादांची सकाळी कामाची स्टाइल मुख्यमंत्री वापरताना आता दिसतात. याआधी शिंदेना सकाळी काम करताना पाहिलेले नाही. भावाचं कौतुक करत शिंदेना टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शिवसंकल्प यात्रेतून यवतमाळ रामटेक वगळले. या दोन जागा भाजपाच्या गोट्यात जाणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. नुकतीच आयकर विभागाने नोटीस भावना गवळी यांना पाठविली त्यामुळे सुद्धा दौऱ्यातून ही दोन शहरं वगळल्याची चर्चा रंगली आहे. भाजपकडून या मतदारसंघात चाचपणी सुरू आहे.
देशात EVM बाबत संशयाचे वातावरण असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. EVM विरोधात जनाआंदोलन सुरु झाले आहे. सॅम पित्रोदा यांनी देखील EVM वर शंका व्यक्त केली आहे. ओपिनियन पोल करून वातावरण तयार केले जाते. EVM सेट केल्या जातात. 30 टक्के EVM सेट केल जात असल्याचा आरोप त्यांनी केली. याविरोधात लोकांनी रस्त्यावर उतरायला हवे असं ते म्हणाले.
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देण्याची शक्यता आहे. नवीन वर्षांत कर्मचाऱ्यांना लॉटरी लागू शकते. जर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केली तर त्यांच्या पगारात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. कर्मचारी फिटमेंट फॅक्टर वाढीची मागणी करत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एक वाघ तोंडात पाण्याची बाटली घेऊन फिरत असल्याचं चित्र कॅमेरात कैद झालं आहे. मुंबई चे फोटोग्राफर विवान कारापूरकर यांनी ताडोबा सफारी करतांना आपल्या कॅमेऱ्यात हे चित्र कैद केलं आहे. ताडोबाच्या जांभूळडोह परिसरात सफारी दरम्यान नयनतारा नावाची ही वाघीण प्लास्टिकच्या पाण्याची बाटली तोंडात घेऊन फिरत होती. विशेष म्हणजे ताडोबा व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांना प्लास्टिक बॉटल नेण्यावर बंदी आहे मात्र याच परिसरात असलेल्या रामदेगी देवस्थान मंदिरात येणाऱ्या पर्यटकांनी ही बॉटल जंगलात फेकली असावी अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुण्यामध्ये ससून हॉस्पिटलच्या कार्यक्रमात सत्तेत असलेल्या जबाबदार व्यक्तीने पोलिसांना जी वागणूक दिली ते एका जबाबदार व्यक्तीला शोभत नाही. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. वर्दीला काही मान सन्मान आहे. पोलिसासह दुसऱ्या पक्षातील माणसाला मारण देखील चुकीचं असल्याचे त्या म्हणाल्या. राज्यातल्या पोलीस दलाचा मला अभिमान आहे.जितक्या कॉन्फिडंटली मी राज्यात फिरते तशी दुसऱ्या राज्यात फिरत नाही मला राज्य पोलीस दलावर विश्वास आहे. भाजपासोबत आमचे मतभेद मनभेद नाही, असे त्यांनी मत मांडले.
सोने-चांदीने या आठवड्यात ग्राहकांना मोठा दिलासा दिला. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात मौल्यवान धातूमध्ये चढउतार दिसून आला. सुरुवातीला किंमतीत मोठी वाढ झाली. त्यानंतर मौल्यवान धातूत पडझड झाली. ग्राहकांना आज खरेदीची सुवर्णसंधी आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांचा पुणे दौरा… सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शहरातील विविध विकासकामांचे होणार भूमिपूजन… यासह मतदारसंघातील अनेक ठिकाणी सुप्रिया सुळे लावणार हजेरी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर… देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शहर भाजपच्या नवीन कार्यलयाचे होणार उदघाटन… शिवाय नाट्य संमेलन हस्तांतरण सोहळ्याला फडणवीस उपस्थित राहणार… भाजपच्या बैठकीला देवेंद्र फडणवीस लावणार हजेरी
पुणे-लोणावळ्या दरम्यान अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तच्या कामासाठी आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पुणे-लोणावळ्या दरम्यान धावणाऱ्या 12 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त चेन्नई-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसला मेगाब्लॉकमुळे उशिरा धावण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे.
इगतपुरीचे माजी नगराध्यक्ष गोपीनाथ बाबा जाधव यांचे निधन… वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास… सोनंद तालुक्यातील सांगोला येथे घेतला अखेरचा श्वास… कुस्तांचे महर्षी म्हणून संपूर्ण भारतात नाव लोकिक… कुस्त्यांच्या विराट दंगली भरवण्याची सुरुवात त्यांनीच केली
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज पुण्यात बैठक होणार आहे. केंद्रिय आणि प्रदेश पातळीवरील नेते निवडणूकीची रणनीती ठरवणार आहे.
नाटक-सिनेमा पाहाणे मुंबईकरांसाठी महाग होण्याची शक्यता आहे. 2024-25 मध्ये महापालिका रंगभूमी करात वाढीचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव आयुक्तांकडे पाढवण्यात आला आहे. नाटकांची आणि सिनेसांची तिकीटं त्यामुळे महाग होण्याची शक्यता आहे.
भाजप आमदार सुनील कांबळेविरोधात पुण्यात पोस्टरबाजी करण्यात येत आहे. सुनील कांबळे यांनी पोलिसाला केलेल्या मारहाणीचा बॅनरमधून विरोध करण्यात आला आहे. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची कोथरूडमध्ये बॅनरबाजी पाहायला मिळाली. भाजप आमदार बनले आमच्या रक्षकांचेच भक्षक असं बॅनरवर लिहलं आहे.
लोकशाहीमध्ये प्रत्त्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. राज ठाकरे यांच्या टिकेवर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
आपले नेते लाचार आणि मिंध्ये झालेत त्यांना स्वाभिमान उरला नाही. त्यांच्या पाठीचा कणा शिल्लक राहिलेला नाही. राजकीय पद्धतीने जमीनी हडपण्याचं काम सुरू आहे असा जोरदार निशाणा राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांवर लगावला.
भोर तालुक्यातील हातवे बुद्रुक गावातील तरुण बेपत्ता असल्याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुकाध्यक्ष संतोष ज्ञानोबा मोहिते यांच्यावर खंडणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भोर न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आज मोठे पक्ष प्रवेश होणार आहे. मराठी अभिनेते किरण माने हातात शिवबंधन बांधणार आहे. आज मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे.
तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातून अनेक कार्यकर्त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार आहे.
एक देश-एक निवडणूकवर नियुक्त केलीली समिती जनेतेची मत जाणून घेणार आहेत. रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. एक देश, एक निवडणूक यासंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली आहे.
मुंबईतील हवेची गुणवत्ता आता सुधारली आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अनेकदा काही भागांत वाईट ते अतिवाईट हवेची नोंद झाली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यायाठी ठोस पावले उचलली. धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई शहरात उपकरणांसह अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. दरदिवशी ५०० ते ६०० किलोमीटरचे रस्ते धुतले जात होते. आता रोज त्यात एक हजार किलोमीटरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.