Maharashtra Breaking News : ससून रुगणालयातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर

| Updated on: Dec 22, 2023 | 7:05 AM

Maharashtra Breaking News LIVE in Marathi : आज 21 डिसेंबर...आजचा दिवस महत्वाचा आहे. राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहे. सामाजिक आर्थिक क्षेत्रातील काही बातम्या समोर येत आहेत. तसंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यासांठी हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra Breaking News : ससून रुगणालयातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर

मुंबई | 21 डिसेंबर 2023 : विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधिमंडळात बोलताना ठाकरे गटावर आणि विशेषत: आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप गंभीर आरोप केले. तर शिंदेंच्या तोंडी भाजपचं भाषण असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी केली. त्यामुळे आता विधिमंडळ अधिवेशनानंतर काय घडतं पाहणं महत्वाचं असेल. याचसोबत राज्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सिंधुदुर्गात ‘जेएन 1’ विषाणूचा रूग्ण आढळला आहे. तर भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला अर्जून पुरस्कार जाहीर झाला आहे. या आणि तुमच्या शहरातील जिल्ह्यातील बातम्या या ब्लॉगमध्ये तुम्ही वाचू शकता. त्यामुळे दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Dec 2023 08:20 PM (IST)

    कोरोना जेएन-वन व्हेरिएंटचा धोका, मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

    मुंबई | देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

    ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाईपलाईन्स, आरटीपीसीआर लॅब, डयुरा/लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी व योग्य पद्धतीने ते कार्यान्वित आहेत की नाही याची खात्री करतानाच लसीकरणाचा आढावा घ्यावा, ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांची माहिती घ्यावी व लसीकरण करण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

  • 21 Dec 2023 06:10 PM (IST)

    ससून रुग्णालयातील शिक्के गेले चोरीला

    पुणे | ससून रुगणालयातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयातील शिक्के चोरीला गेले आहेत. आरोपींनी चोरलेल्या शिक्कांच्या मदतीने बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार केले. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केलीय. बंड गार्डन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी प्रकाश पांडुरंग मोंडकर आणि सत्पाल पवार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. तसेच मोंडकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

  • 21 Dec 2023 05:55 PM (IST)

    छत्तीसगडचे आमदार किरण सिंह देव भाजपचे नवे अध्यक्ष

    आमदार किरण सिंह देव यांना छत्तीसगड भाजपचे नवे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. अरुण साओ उपमुख्यमंत्री झाल्यानंतर किरण सिंग देव यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. किरण देव जगदलपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. देव यांनी भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष, राज्यमंत्री, प्रदेश सरचिटणीस म्हणूनही काम केले आहे.

  • 21 Dec 2023 05:45 PM (IST)

    संसद सुरक्षा प्रकरणातील चार आरोपींना 15 दिवसांची पोलीस कोठडी

    संसद सुरक्षा भंग प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. पटियाला हाऊस कोर्टाने चारही आरोपींना पुढील 15 दिवसांसाठी स्पेशल सेलच्या ताब्यात दिले आहे. त्याला 5 जानेवारीला हजर करण्यात येणार आहे.

  • 21 Dec 2023 05:30 PM (IST)

    पंजाबचे कॅबिनेट मंत्री अमन अरोरा यांना दोन वर्षांची शिक्षा

    पंजाबचे कॅबिनेट मंत्री अमन अरोरा यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका महत्त्वपूर्ण निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने एका कॅबिनेट मंत्र्यासह 9 जणांना शिक्षा सुनावली आहे. 2008 च्या कौटुंबिक कलह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

  • 21 Dec 2023 05:15 PM (IST)

    लोकसभेत गदारोळ करणाऱ्या आणखी 3 खासदारांचे निलंबन

    आणखी तीन खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. तीन नवीन खासदारांच्या निलंबनानंतर आता निलंबित खासदारांची संख्या 146 झाली आहे. लोकसभेत आज निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये नकुलनाथ, डीके सुकेश, दीपक बैज यांचा समावेश आहे.

  • 21 Dec 2023 05:06 PM (IST)

    ब्रिजभूषण सिंग यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संजय सिंग हे WFIचे नवे अध्यक्ष

    या वर्षाच्या सुरुवातीला देशातील दिग्गज कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात आंदोलन सुरू केले होते आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. या कुस्तीपटूंमध्ये बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांचा समावेश होता. भूषणने महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप या सर्वांनी केला होता. या निवडणुकांमध्ये संजय सिंह यांचे पॅनल लोकप्रिय होते. बहुतांश पदांवर त्यांच्याच पॅनलचे लोक विजयी झाले आहेत. संजय हे उत्तर प्रदेश कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष होते. 

  • 21 Dec 2023 04:58 PM (IST)

    थोडी अडचण आहे पण दोन महिन्यात मार्ग काढू – गिरीश महाजन

    जालना : विधान सभेचे सत्र काल संपले. चार दिवस चर्चा झाली. मुख्य्म्नात्री यांनी उत्तर दिले. मागासवर्ग आयोग नेमला. साधन संपत्ती दिली आहे. मराठा आरक्षण द्यायचे आहे. ज्या क्युरी काढल्या आहेत त्या दुर करू. सरकार सकारात्मक आहेत. अंतिम टप्यात आरक्षण आले आहे. 24 तारीख अल्टीमेटम देऊ नका. माझी पत्नी, तिचा भाऊ असे सत्रीफिकेट मिळावे पण तसे नियमात बसत नाही. वडील असतील त्याचे रक्त वंशावळी त्यानाच प्रमाणपत्र मिळेत. यात थोडी अडचण आहे पण आम्ही मार्ग काढू.

  • 21 Dec 2023 04:48 PM (IST)

    तर आता विचार करावा लागेल, जरांगे पाटील यांचा इशारा

    जालना : तुमचे लोक विचारतात सल्ला कोणाचा? स्क्रिप्ट कोणाची. इथे सर्व समाज म्हणून मी लढत आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचा सल्ला घेतला नाही. तुमचे ऐकून मी त्यांच्याबद्दल बोलणे सोडले. माझ्याकडे येणारे सर्व तज्ञ होते. त्यांना माझा शब्द कळला नाही का? सगे सोयरे कळले नाही असे होणार नाही. तुम्ही शब्द दिला म्हणून उपोषण सोडले. पण, आता विचार करावा लागेल असा इशारा जरांगे पाटील यांचा दिला.

  • 21 Dec 2023 04:43 PM (IST)

    तुमच्याकडून होत नसेल तर स्पष्ट सांगा – जरांगे पाटील

    जालना : मनोज जरांगे पाटील हे सगे सोयरे कोण? या एकाच मुद्द्यावर शिष्टमंडळासोबत चर्चा करत आहेत. कायद्यात रक्ताचे नातेवाईक बसतात तेवढे ग्राह्य धरू असे मंत्री महाजन आणि उदय सामंत यांनी सांगितले. त्यावर जरांगे पाटील सरसगटला तुम्ही पर्यायी शब्द द्या म्हणाले होते असे म्हणाले. तज्ज्ञांनी माझे शब्द लिहून घेतले होते. तुमच्याकडून होत नसेल तर स्पष्ट सांगा असेही ते म्हणाले.

  • 21 Dec 2023 04:39 PM (IST)

    प्रतिबंधित औषधाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तीन कोटी रुपयांची औषधे जप्त

    मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. भारतातून ऑस्ट्रेलियात प्रतिबंधित औषधाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 9.877 किलो अॅम्फेटामाईन, झोलपिडेम टार्टरेट 2.548 किलो आणि ६.५३५ किलो ट्रामाडॉलच्या 18700 टॅब्लेट जप्त करण्यात आल्या.

  • 21 Dec 2023 04:28 PM (IST)

    राहुल गांधी आणि खासदार बॅनर्जी यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन

    नांदेड : उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनगड यांच्या अवमान प्रकरणी नांदेडमध्ये भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आंदोलन केले. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे धनगड यांची व्यंगात्मक नक्कल करत असताना राहुल गांधी हे त्याचे चित्रीकरण करत होते. या विरोधात भाजप राज्यभर आंदोलन करत आहे. राहुल गांधी आणि खासदार बॅनर्जी यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला.

  • 21 Dec 2023 04:22 PM (IST)

    संसदेच्या लोकसभा कामकाजाचं सूप वाजलं

    नवी दिल्ली : 17 व्या लोकसभेच्या 14 व्या सत्राचे कामकाजाच आज शेवटचा दिवस. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात 4 डिसेंबर 2023 ला झाली. 21 डिसेंबर 2023 ला संसदेच कामकाज आज एक दिवसा अगोदरच अनिश्चित काळासाठी संपले.

  • 21 Dec 2023 04:19 PM (IST)

    सोयरे म्हणजे पुतण्या होतो का? जरांगे पाटील यांचा रोखठोक सवाल

    जालना : आम्हाला मुंबईला न्यायचं नाही का? जरांगे पाटील यांचा सवाल. जरांगे यांचा एकच शिष्टमंडळाला सारखा एकच प्रश्न ‘ सोयरे म्हणजे कोण’. सरसकटला पर्यायी शब्द तुम्हाला सगे सोयरे दिला होता. आंदोलक म्हणून माझी काय चूक आहे? सोयरे म्हणजे कोण? रक्तमासाचे असणारे? सोयरे म्हणजे पुतण्या होतो का? सोयरे कोण हे कळत नाही का? असा रोखठोक सवाल जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळाला केला.

  • 21 Dec 2023 04:12 PM (IST)

    देशातला कायदा बदलता येणार नाही – गिरीश महाजन

    जालना : ओबीसी आई असेल तिच्या मुलांना ओबीसी आरक्षण मिळू शकत नाही. तसा कायदा आहे ते होणार नाही. रक्तातले सगे सोयरे म्हणजे कोण मला समजून सांगा. विमल मुंदडा केस मंत्री महाजन हे जरांगे पाटील यांना समजून सांगत आहे. देशातला कायदा बदलता येणार नाही.

  • 21 Dec 2023 04:05 PM (IST)

    नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या यादीत आता आ. सत्यजीत तांबे यांचेही नाव

    अहमदनगर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अमोल कोल्हे अशा नेत्यांच्या यादीत आता युवा आमदार सत्यजित तांबे यांचेही नाव जोडले गेलेय. युट्युब चॅनलवर सक्रीय असणारे आमदार सत्यजीत तांबे यांचे दोन लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स झाले आहेत. त्यामुळे युट्युबने त्यांना सिल्व्हर बटण पाठवलंय. सोशल मिडियावर ते विविध विषयावर आपले मत मांडून लोकांच्या संपर्कात असतात. विशेष म्हणजे तरुणाईलाही सत्यजीत तांबे यांची मतं मांडण्याची पद्धत, त्यांचा वावर याची भूरळ पडली आहे.

  • 21 Dec 2023 04:00 PM (IST)

    ….तर ते कोर्टात टिकणार नाही, असं गिरीश महाजन

    नोंदी सापडल्यावर मागेल त्याला आरक्षण द्यावं लागेल. रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र द्या, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. यावर बोलताना, सर्व नातेवाईकांना आरक्षण दिलं तर ते कोर्टात टिकणार नाही, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

  • 21 Dec 2023 03:55 PM (IST)

    आई आणि मामा रक्ताच्या नात्यात येत नाही- गिरीश महाजन

    चुलत भाऊ, मुलगी आणि मुलाला आरक्षण मिळणार, आई आणि मामा रक्ताच्या नात्यात येत नाही.  वडील सोडून आत्या आणि मामाला आरक्षण देता येणार नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.  असं गिरीश महाजन म्हणाले.

  • 21 Dec 2023 03:47 PM (IST)

    आई ओबीसी असेल तर मुलाला आरक्षण द्यावं- मनोज जरांगे

    पात्र व्यक्तींच्या नातेवाईकांना आरक्षण कसं देणार, आई ओबीसी असेल तर मुलाला आरक्षण द्यावं, मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

  • 21 Dec 2023 03:40 PM (IST)

    पोपट परत दिला तरच देईल घटस्फोट, पुण्यातील अजब-गबज घटना

    पत्नीकडून घटस्फोट मिळवून घेण्यासाठी थेट पत्नीला भेट म्हणून दिलेल्या पोपट परत देण्याची मागणी केली आहे. पुण्यात गजब प्रकरण समोर आलं आहे. पुण्यातील हे घटस्फोटासाठी अर्ज केलेले हे जोडपे सध्या आफ्रिकन पोपटामुळे चर्चेत आलं आहे.

    या जोडप्याने पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात केला घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. आफ्रिकन पोपट भेट दिला होता तो पोपट परत दिल्यानंतरच घटस्फोट देईन असं पत्नीने पतीला न्यायालयात सांगितलं.

  • 21 Dec 2023 03:30 PM (IST)

    …नाहीतर समाज म्हणेल हे काय गाजर दाखवत आहेत- मनोज जरांगे-पाटील

    सरकारने त्यांचे तज्ञ आल्यानंतर कागदावर लिहून दिले होते. त्याच्यामध्ये एक दोन शब्द विसरून राहिले असतील. परंतु जे ठरलंय ते सरकारने करणे अपेक्षित आहे. एवढा मोठा सरकार धाडसी निर्णय घेत असेल तर, त्या नोंदीनुसार रक्ताचे नाते असे असणार याबाबत स्पष्ट केली पाहिजे. आता सरकारने स्पष्टपणे सांगितले पाहिजे, समाजाचा मार्ग होईल. सरकारने दिलखुलासपणे चर्चा केली पाहिजे, नाहीतर समाज म्हणेल हे काय गाजर दाखवत आहेत. हा शेवटचा लढा आहे आरक्षण मिळवूनच थांबणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

  • 21 Dec 2023 03:15 PM (IST)

    महाराष्ट्रात गाजलेल्या सनी साळवे खून प्रकरणात दुहेरी जन्मठेपेचे शिक्षा

    महाराष्ट्रात गाजलेल्या सनी साळवे खून प्रकरणात दुहेरी जन्मठेपेचे शिक्षा झाली आहे. चार जणांना दुहेरी जन्मठेपेचे शिक्षा तर एकाला तीन वर्षाची शिक्षा झालीये. सनी साळवे या महाविद्यालयीन तरुणाच्या खून प्रकरणी शिक्षा देण्यात आली आहे. 2018 साली सनीचा खून झाला होता, शिक्षेनंतर नातेवाईकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

  • 21 Dec 2023 02:18 PM (IST)

    संसदेचे हिवाळी अधिवेशन उद्या ऐवजी आजच संपण्याची शक्यता

    नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन उद्या ऐवजी आजच संपण्याची शक्यता आहे. सरकारने सगळे बिल पास केले आहेत. या दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

  • 21 Dec 2023 02:15 PM (IST)

    माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि कुमारस्वामी यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

    नवी दिल्ली : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी एचडी कुमारस्वामी यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे कर्नाटकच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

  • 21 Dec 2023 01:55 PM (IST)

    कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

    संभाजी महाराज पुतळा उद्घाटन प्रकरणावरून कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार सतेज पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी. आठ दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर जिल्ह्यातील सर्व अपुऱ्या विकास कामांची उद्घाटन हिंदुत्ववादी संघटना करणार

  • 21 Dec 2023 01:42 PM (IST)

    मुंबईत दोन ठिकाणी अपघात

    गोरेगाव वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आरे ब्रिजवर कारचा अपघात झाला. मुंबई ते बोरिवली या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी. दोन वाहने एकमेकांवर आदळली. दहिसर येथील आनंद नगर पुलावरही कारचा अपघात झाला. दोन्ही घटनांमध्ये कारचे नुकसान झाले.

  • 21 Dec 2023 01:28 PM (IST)

    सरकारचे शिष्टमंडळ संभाजीनगरात दाखल

    थोड्याच वेळात अंतरवली सराटीच्या दिशेने होणार रवाना. उदय सामंत, संदीपान भुमरे, मंगेश चिवटे दाखल. थोड्याच वेळात गिरीश महाजन होणार सहभागी

  • 21 Dec 2023 01:21 PM (IST)

    संसदेची जबाबदारी आता सीआयएसएफकडे

    गृह मंत्रालयाने सीआयएसएफला या संदर्भात सर्वे करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वे झाल्यानंतरच सीआयएसएफ संसदेचा चार्ज घेणार आहेत. सुरक्षा भंग झाल्यानंतर दिल्ली पोलिसांची सुरक्षा बदलून आता सीआयएसएफ अर्थात सेंट्रल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट फोर्सकडे सुरक्षेची जबाबदारी असणार आहे.

  • 21 Dec 2023 01:02 PM (IST)

    कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्याची शेतकरी आणि व्यापाऱ्यांची मागणी 

    कांदा निर्यातबंदी निर्णयचा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याना एक हजार कोटींहून अधिकचे नुकसान. तर एकट्या नाशिकमधील शेतकऱ्यांचे 250 ते 300 कोटींचे नुकसान. कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्याची शेतकरी आणि व्यापाऱ्यांची मागणी

  • 21 Dec 2023 12:52 PM (IST)

    सातारा- पंढरपूर मार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको

    सातारा- पंढरपूर शेतकऱ्यांनी रोखला आहे. म्हसवड हद्दीतील धुळदेव येथे शेतकऱ्यांनी रास्तारोको केला आहे. रस्त्याच्या कामासाठी दिलेल्या जमीनीचा मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

  • 21 Dec 2023 12:43 PM (IST)

    सोलापूर – उपराष्ट्रपतींच्या अवमानाविरोधात भाजपचे निदर्शन

    सोलापूर – उपराष्ट्रपतींच्या अवमानाविरोधात भाजपने निदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

  • 21 Dec 2023 12:33 PM (IST)

    सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील घेणार भेट

    सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार मनोज जरांगे यांच्याकडे अधिक वेळ मागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. आरक्षणासाठी सुरू असलेल्या कार्यवाहीची माहितीसुद्धा जरांगे पाटील यांना सरकारच्या वतीने देण्यात येईल.

  • 21 Dec 2023 12:21 PM (IST)

    हिंगोलीहून पंढपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीला अपघात, एकाचा मृत्यू, 5 जखमी

    हिंगोलीहून पंढपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या भीषण अपघाता एका वारकऱ्याचा मृत्यू झाला असून 5 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. पंढरपूर-कुर्डूवाडी मार्गावरील बावी गावाजवळ ही दुर्घटना घडली.

  • 21 Dec 2023 12:14 PM (IST)

    आज मुंबई पुणे महामार्गावर पुन्हा दोन तासाचा मेगा ब्लॉक

    आज मुंबई पुणे महामार्गावर पुन्हा दोन तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. गांट्री बसवण्यासाठी दुपारी १२ ते २ या दरम्यान हा ब्लॉक सुरू आहे.

    12.00 ते 2  दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवर ITMS प्रोजेक्ट अंतर्गत महामार्ग पोलिस केंद्र पळस्पे हद्दीत  2 लेग सर्विसेबल Gantry बसविण्यात येणार आहेत. Gantry बसविताना सदर कालावधीत पुणे वाहिनीवरील हलकी वाहने येथुन बोरले टोल नाका मार्गे NH 48 जुना मुंबई पुणे महामार्गाने पुणे बाजूकडे वळवण्यात येतील.

  • 21 Dec 2023 11:59 AM (IST)

    कोल्हापुरात भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात निदर्शने

    कोल्हापुरात भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहेत. संसदेमध्ये उपराष्ट्रपती यांच्याबाबत अशोभनीय वर्तन तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी केलं होतं. त्याचं चित्रण राहुल गांधी यांनी केल्याने भाजपकडून निदर्शनं करण्यात आली आहेत.

  • 21 Dec 2023 11:50 AM (IST)

    अमरावतीमध्ये येत्या 24 डिसेंबरला होणारा ओबीसी मेळावा रद्द

    अमरावतीमध्ये येत्या 24 डिसेंबरला होणारा ओबीसी मेळावा रद्द झाला आहे. वर्धा आणि भिवंडीनंतर अमरावतीमध्ये ओबीसी मेळावा होणार होता. या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार होते.

  • 21 Dec 2023 11:40 AM (IST)

    सरकारला प्रश्न विचारल्याने खासदार निलंबित- शरद पवार

    सरकारला प्रश्न विचारल्याने खासदारांना निलंबित केलं. खासदारांना निलंबित करणं ही चांगली गोष्ट आहे का, असा सवाल शरद पवार यांनी केला. खासदारांच्या निलंबनप्रकरणी विरोधकांंनी संसदेबाहेर आंदोलन केलं. या आंदोलनात शरद पवार सहभागी झाले.

  • 21 Dec 2023 11:30 AM (IST)

    तुळजाभवानी देवीचे प्राचीन, मौल्यवान दागिने चोरी प्रकरणात सात जणांवर गुन्हा दाखल

    तुळजाभवानी देवीचे प्राचीन, मौल्यवान दागिने चोरी प्रकरणात सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. महंत हमरोजीबुवा, महंत चिलोजीबुवा गुरू हमरोजी बुवा, महंत वाकोजीबुवा गुरू तुकोजी बुवा आणि महंत बजाजी बुवा गुरू वाकोजी बुवा या चार महंतांसह मृत सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अंबादास भोसले, सेवेदार पलंगे आणि मंदिरातील अज्ञात अधिकारी, कर्मचारी यांचा त्यात समावेश आहे.

  • 21 Dec 2023 11:20 AM (IST)

    पुण्यात आज शहरभरात पाणीकपात

    पुण्यात आज शहरभरात पाणीकपात करण्यात आली आहे. पुण्यातील सगळ्या भागांचा पाणीपुरवठा आज दिवसभर बंद राहणार आहे. पुणेकरांना अघोषित पाणी कपातीचा सामना करावा लागतोय. जल शुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी कामामुळे आज शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. तर उद्या शुक्रवारीदेखील अनेक भागात उशिरा पाणीपुरवठा होणार आहे. पाणी कपातीचा सामान्य पुणेकरांना मोठा फटका बसला आहे.

  • 21 Dec 2023 11:10 AM (IST)

    बीड- मराठा आंदोलकांना कलम 149 सीआरपीसीची नोटीस

    बीड: मनोज जरांगे पाटील यांच्या इशारा सभेच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना नोटीस बजावण्यात आली आहे. समन्वयकांना नोटिशी दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस प्रशासनाकडून कलम 149 सीआरपीसीची नोटीस जारी करण्यात आली आहे. 125 हून अधिक जणांना या नोटिशी बजावण्यात आल्या आहेत.

  • 21 Dec 2023 10:59 AM (IST)

    Marathi News | कांदा निर्यातबंदी उठवावी

    कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 7 डिसेंबर रोजी कांद्याची निर्यात बंदी केली आहे. परंतु त्यानंतर कांद्याचे दर घसरत आहे. यामुळे काही अटी शर्ती घालून कांद्याची निर्यात करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली कांदा निर्यातदार व्यापारी विकास सिंग आणि मनीष बोरा यांनी ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांची भेट घेऊन ही मागणी केली.

  • 21 Dec 2023 10:47 AM (IST)

    Marathi News | मराठी पाट्या संदर्भात दुकानदारांना नोटीसा

    सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिकेच्या  हद्दीमध्ये मराठी पाट्यांबाबत एकूण नऊ प्रभाग समितीमध्ये सहाय्यक आयुक्तांच्या वतीने 2 हजार 66 दुकानदार आणि आस्थापना यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मराठी पाट्या संदर्भात मनसेने अनेक आंदोलन केल्यानंतर दुकानदार आणि आस्थापनाच्या वतीने मराठी पाट्या लावन्यास  सुरुवात केली आहे.

  • 21 Dec 2023 10:33 AM (IST)

    Marathi News | मुंबई मनपात सर्वाधिक टेंडर घेणारे शिंदे सोबत – राऊत

    मुंबई मनपात सर्वाधिक टेंडर घेणारे शिंदे यांच्यासोबत आहे. त्यांच्यावर अनेक घोटाळ्याचा आरोप आहे. जळगावात कोराना काळात २७ कोटींचे घोटाळा घडला आहे. कोरोना काळातील या घोटाळ्याप्रकरणात गुलाबराव पाटील यांच्यावर आरोप आहे. त्याच्या चौकशीचे पत्र आपण मुख्यमंत्र्यांना दिले असल्याचे राऊत यांनी सांगितले.

  • 21 Dec 2023 10:19 AM (IST)

    Marathi News | उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देणार नाही – ठाकरे

    राम मंदिराच्या प्रतिष्ठापनासाठी उद्धव ठाकरे यांना बोलवणार नाही. ज्यांचे योगदान नाही, त्यांना बोलवण्यात आले आहे. परंतु या लढ्यात ज्यांचे योगदान आहे, त्यांना बोलवले जाणार नाही, असे ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

  • 21 Dec 2023 10:10 AM (IST)

    Marathi News | इडीचे समन्स बेकायदेशीर – केजरीवाल

    इडीच्या समन्सला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिले आहे. मी प्रत्येक कायदेशीर समन्स मानायला तयार आहे , मात्र मला आलेला समन्स हा गेल्या वेळेसारखाच बेकायदेशीर आहे. ईडीचा समन्स हा राजकीय हेतूने प्रेरित आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

  • 21 Dec 2023 09:57 AM (IST)

    निवडणूक आयुक्तांची नियुक्ती येणार सरकारच्या हाती

    मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्षनेता यांच्या समितीला अधिकार देणारे विधेयक आज लोकसभेत सादर केले जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सरन्यायाधीश या समितीत असतील अशी तरतूद करण्यात आली होती. पण त्याऐवजी पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्षनेता यांच्या समितीला अधिकार देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने राज्यसभेत हे विधेयक संमत करून घेतले आहे. आज लोकसभेच्या संमतीसाठी विधेयक सादर केले जाईल.

  • 21 Dec 2023 09:50 AM (IST)

    हिवाळी अधिवेशनात ठोस काहीच मिळाले नाही

    मराठा आणि ओबीसी समाजाला हिवाळी अधिवेशनात काहीच ठोस हाती लागले नाही, असा आरोप काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केला. पीक नुकसानीची पाहणी केली पण त्यातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. सरकारने मराठा समाजाला दिलेला शब्द पाळावा असे वडेट्टीवार म्हणाले.

  • 21 Dec 2023 09:45 AM (IST)

    रेमडेसिव्हिर घोटाळ्याप्रकरणात चौकशी

    कोव्हिड काळातील कथित रेमडेसिव्हिर घोटाळाप्रकरणात पुण्यशिल पारेख यांची काल झाली सहा तास पेक्षा जास्त काळ चौकशी करण्यात आली. पारेख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानण्यात येतात. कोव्हिड दरम्यान आदित्यच्या टीमध्ये ते होते. सामाजिक कार्यासाठी त्यांना या टीममध्ये सहभागी करुन घेण्यात आले होते.

  • 21 Dec 2023 09:40 AM (IST)

    ED चा समन्स बेकायदेशीर

    इडिच्या समन्सला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिले आहे. मी प्रत्येक कायदेशीर समन्स मानायला तयार आहे , मात्र मला आलेला समन्स हा गेल्या वेळेसारखाच बेकायदेशीर आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ईडीचा समन्स हा राजकीय हेतूने प्रेरित आहे. हा समन्स मागे घेतला जावा. माझ्याजवळ लपवण्यासारखं काही नाही.केजरीवाल यांनी लिखित स्वरूपात ईडीकडे उत्तर दिले आहे.

  • 21 Dec 2023 09:35 AM (IST)

    गुंतवणूकदारांची कमाईच कमाई

    वर्ष 2023 मध्ये शेअर बाजारात अनेक गुंतवणूकदारांना कमाईची संधी मिळाली. बाजारात हजारो कंपन्या आहेत. त्यातील 280 कंपन्या महारथी निघाल्या. या कंपन्या मल्टिबॅगर ठरल्या. तर आतापर्यंत शेअर बाजारात 82 टक्के शेअर्सने काहीना काही परतावा दिला. बाजारात चढउतार होत असला तरी गुंतवणूकदारांना मालामाल केले.

  • 21 Dec 2023 09:30 AM (IST)

    सहा आरोपींची एकत्रित चौकशी

    13 डिसेंबर रोजी संसद परिसरातील घुसखोरी प्रकरणात सहा आरोपींची काल रात्री एकत्रित चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.सुरक्षा भंग करणाऱ्या सहा आरोपींना एकत्र बसवून काल रात्री तीन तास कसून चौकशी करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी ही चौकशी केली.

  • 21 Dec 2023 09:25 AM (IST)

    तलाठ्यावर वाळू माफियांचा हल्ला

    गौण खनिज तस्करीला पायबंद घालण्यासाठी गेलेल्या तलाठ्यावर वाळू आणिव माती माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली.हल्ल्यात तलाठी मोडके हे गंभीर जखमी झाले असून तहसील कार्यालयाचे वाहन चालक आडे किरकोळ जखमी झाले आहेत.रात्री 11 वाजताच्या सुमारास महागाव तालुक्यातील काळी टेंभी परिसरात ही घटना घडली.

  • 21 Dec 2023 09:20 AM (IST)

    आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा

    गडचिरोली जिल्ह्यातील सोडे आश्रम विद्यालयात 106 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. त्यातील 65 विद्यार्थी ठणठणीत बरे झाली आहेत. 41 विद्यार्थ्यांवर गडचिरोली सामान्य रुग्णालय व धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोडे येथील शासकीय आश्रम विद्यालयातील विद्यार्थ्यांना भोजनातून विषबाधा झाली होती. विद्यार्थ्यांमध्ये सर्वात जास्त मुलींच्या समावेश होता.

  • 21 Dec 2023 09:15 AM (IST)

    मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप

    मराठवाड्यात आतापर्यंत 3 हजार 462 जणांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.साडेपाच लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्रे मिळण्याचा अंदाज आहे. 1 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत 3 हजार 462 प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. मराठवाड्यात 2 कोटी कागदपत्रांच्या आधारे 27 हजार कुणबी नोंदी शोधण्यात आल्या.एक नोंदीच्या आधारे तब्बल 20 जणांना कुणबी प्रमापत्रे मिळणार. उपविभागीय कार्यालयात कुणबी प्रमाणपत्रे वाटण्याचे निरंतर काम सुरू आहे. सर्वाधिक बीड जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तर सर्वात कमी परभणी जिल्ह्यात 37 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

  • 21 Dec 2023 09:10 AM (IST)

    200 झाडांची कत्तल?

    रेल्वे विभागाने दोनशे झाडे कापण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेपुढे प्रस्ताव पाठवला आहे. बोरिवली ते विरार दरम्यान पाचवी व सहावी मार्गिका टाकण्याचे काम केले जाणार आहे. मीरा भाईंदरमधील जवळपास दोनशे झाडे बाधित होणार आहे. यावर मीरा भाईंदर मनपा वृक्ष प्राधिकरणाची बैठक घेतल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.

  • 21 Dec 2023 09:05 AM (IST)

    चोरट्यांचा धुमाकूळ

    सांगली  जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या धुमाकूळ घातला. गावाच्या पुर्व बाजूला शेतात असलेल्या ऊस तोडणी मजुरांच्या सोळा झोपड्या चोरट्यांनी साफ केल्या. चोरट्यांनी सोने आणि रोख रक्कम तर लांबवलीच शिवाय चटणी मिठही लंपास केले. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. याबाबत आष्ट्या पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 21 Dec 2023 09:00 AM (IST)

    सोने-चांदीची दमदार सुरुवात

    सोने-चांदीने या आठवड्यात दमदार सुरुवात केली आहे. शेअर बाजार चमकला आणि दुपारनंतर घसरला. पण सोने-चांदीची घौडदौड सुरुच आहे. एका आठवड्यापूर्वी रेकॉर्डवर रेकॉर्ड करणाऱ्या मौल्यवान धातूने पुन्हा खेळी खेळली आहे. त्यामुळे ग्राहकांना लग्नसराईत खिसा गरम ठेवावा लागणार आहे. त्यांना जादा दाम मोजावे लागू शकतात.

  • 21 Dec 2023 08:54 AM (IST)

    Maharashtra News : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज ब्लॉक

    मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज ब्लॉक असणार आहे. गॅन्ट्री बसवण्याच्या कामामुळे ब्लॉक घेण्याचा निर्णय. वाहतूक जुन्या मुबई पुणे महामार्गावर वळवण्यात येणार आहे.

  • 21 Dec 2023 08:49 AM (IST)

    Maharashtra News : पुण्यातील हडपसरमध्ये पोलिसांनी काढली गुन्हेगारांची धिंड

    पुण्यातील हडपसरमध्ये पोलिसांनी गुन्हेगारांची धिंड काढल्याचे समोर आले आहे. हडपसरमध्ये गाड्यांची तोडफोड करून आरोपींचा दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केली त्याच ठिकाणी आरोपींची धिंड काढण्यात आली आहे.

  • 21 Dec 2023 08:34 AM (IST)

    Maharashtra News : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार

    सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची भेट घेणार आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार मनोज जरांगेंकडे अधिकचा वेळ मागणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. आरक्षणावरची कार्यवाहीची माहिती जरांगे पाटलांना दिली जाऊ शकते. या शिष्टमंडळात गिरीश महाजन, उदय सामंत, संदिपान भूमरे या नेत्यांचा समावेश आहे.

  • 21 Dec 2023 08:26 AM (IST)

    Maharashtra News : रत्नागिरीत थंडीचा कडाका वाढला

    रत्नागिरीत थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीमुळे कोकणात निसर्गाचा अद्भूत नजारा दिसत असला तरी लोकांना धूक्यातून वाट काढावी लागत आहे. कोकणातील नागमोडी वळणं धूक्यात हरवली आहे. निवळी घाटातील धुक्याचा नजारा डोळ्याचे पारणे फेडणारा.

  • 21 Dec 2023 08:17 AM (IST)

    Maharashtra News : धाराशिवमध्ये जिल्हाधीकारी मराठा संघटनांसोबत बैठक घेणार

    धाराशिवमध्ये जिल्हाधीकारी मराठा संघटनांसोबत बैठक घेणार आहे. इंम्पिरिकल डेटासंदर्भात जिल्हाधिकाऱ्याची आज विशेष बैठक असणार आहे. मुख्य सचिवाच्या निर्देशकानंतर विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधीकारी सचिन ओम्बासे यांनी ही बैठक बोलावली आहे.

  • 21 Dec 2023 08:13 AM (IST)

    Maharashtra News : लातूरच्या बाजारपेठेत तांदूळ महागला

    लातूरच्या बाजारपेठेत तांदळाचे भाव 6 ते 8 रूपयांनी महागले आहे. तर तूर डाळ स्वस्त झाली आहे. 5 ते 10 रूपयांनी तूरडाळ स्वस्त झाली आहे.

  • 21 Dec 2023 07:59 AM (IST)

    नितेश राणे आज नाशिक शहरात येणार

    भाजपा आमदार नितेश राणे आज नाशिक शहरात येणार आहेत. नाशिकरोड परिसरातील एका शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकला येणार आहेत. नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर केले होते.  बडगुजर यांचे सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याचे व्हिडिओ आणि फोटो राणे यांनी सभागृहात दाखवले होते. त्यामुळे राणे यांच्या नाशिकमधील कार्यक्रमाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आहे.

  • 21 Dec 2023 07:57 AM (IST)

    पुण्यातील मुठा नदीत घाणीचे साम्राज्य

    पुण्यातील मुठा नदीत घाणीचे साम्राज्य पाहायला मिळतंय.  पुणे महानगरपालिका पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मुठा नदी प्रचंड घाण आहे.  ड्रेनेज आणि हॉस्पिटलमधील दूषित पाणी नदीत सोडण्यात येत आहे. नदीत सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. पुणे महानगरपालिकेचे नदीपात्रांकडे दुर्लक्ष झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. शहरातील सर्व नदीपात्रांमध्ये कचऱ्याचा ढीग आहे.

  • 21 Dec 2023 07:50 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात थंडीच्या कडाका वाढला

    नंदुरबार जिल्ह्यात थंडीच्या कडाका चांगलाच वाढला आहे.  तापमानात घसरण झाल्याने सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये दहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर सपाटी भागात 15 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अचानक थंडी वाढल्याने रब्बी हंगामातील पिकांना मोठा फायदा होणार आहे. तापमान घसरल्याने गहू हरभरा आणि ज्वारी पिकांना फायदा होणार आहे.  येणाऱ्या काही दिवसात थंडीच्या कडाका असाच कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.  अचानक थंडी वाढल्याने रात्री पिकांना पाणी देणाऱ्या शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना शेकोटीच्या आसरा घ्यावा लागत आहे.

  • 21 Dec 2023 07:45 AM (IST)

    मराठा आरक्षण बाबत सरकारचं महत्वाचं पाऊल

    धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना आदेश… जिल्हाधिकारी मराठा संघटना आणि पदाधिकारी यांची विशेष बैठक घेणार आहेत.  इंपेरीकल डेटा अनुषंगाने तयारी आणि इतर माहिती कशी जमा करायची यासाठी जिल्हाधिकारी घेणार आज सकाळी 10 वाजता बैठक घेणार आहेत.  मुख्य सचिव यांनी जिल्हाधिकारी यांना VC मध्ये महत्वाचे निर्देश दिले आहेत.  धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ . सचिन ओम्बासे मराठा संघटनाशी संवाद साधणार  आहेत.

  • 21 Dec 2023 07:41 AM (IST)

    91 सेवानिवृत्त शिक्षकांची पुन्हा नियुक्ती होणार

    पुणे जिल्ह्यात 91 सेवानिवृत्त शिक्षकांची पुन्हा नियुक्ती होणार आहे. सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकांना पुन्हा संधी आहे. शिक्षक भरती रखडल्याने निवृत्त शिक्षकांना पुन्हा कामावर घेण्यात आलं आहे.  पुणे जिल्ह्यातील 8 तालुक्यात 91 सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य पुणे जिल्ह्यातल्या शिक्षकांच्या रिक्त पदांवर तात्पुरत्या स्वरूपात सेवानिवृत्ती शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलीय.

  • 21 Dec 2023 07:34 AM (IST)

    सिंधुदुर्गमध्ये सापडला ‘जेएन1’ चा रुग्ण

    केरळमध्ये थिरूवअनंतपुरममधील काराकुलम इथं 8 डिसेंबरला कोरोनाच्या ओमिक्राॅन व्हेरियंटचा उपप्रकार असलेल्या ‘जेएन1’चा पहिला रुग्ण आढळला.  त्यानंतर आता महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात ‘जेएन1’ चा एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्व रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीपासून अमेरिका, चीन आणि सिंगापूर या देशांमध्ये ‘जेएन1’ या नव्या व्हेरियंट रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतायेत.

Published On - Dec 21,2023 7:27 AM

Follow us
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.