मुंबई, दि. 5 जानेवारी 2024 | मराठा आरक्षणासाठी मुंबईत येण्याची तयारी जरांगे पाटील यांनी केली आहे. मुंबई बरोबरच गावपातळीवरही आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारने मुंबईला येऊ दिले नाही तर गावपातळीवर महिला मंत्री, आमदार, खासदार यांच्याघरासमोर आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी कार्यक्रम शुक्रवारी दुपारी १ वाजता रायगड जिल्ह्यात होत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे ता. माणगांव, जि. रायगड येथे हा कार्यक्रम होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे दौऱ्यात अजित पवार विविध विकास कामांची पाहणी करणार आहेत. आदित्य ठाकरे 10 जानेवारीला मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदार संघात जाहीर सभा घेणार आहे. राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
अहमदनगर : अहमदनगरमध्ये दिवसभर ढगाळ वातावरणांनंतर आता मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. ऐन थंडीच्या मोसमामध्ये पाऊस सुरू झाल्यामुळे या पावसाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. नागरिकांच्या आरोग्यसह पावसामुळे हरभरा, ज्वारी आणि गहू पिकांवरही मोठा परिणाम होऊ शकतो. अचानक पाऊस आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
राजस्थानमध्ये मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी कार्मिक, उत्पादन शुल्क, गृह, कार्यक्रम, सामान्य प्रशासन असे एकूण 8 विभाग स्वतःकडे ठेवले आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांच्याकडे वित्त आणि पर्यटन विभागासह 6 खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केंद्रीय यंत्रणांसह हिजबुलचा मोस्ट वॉन्टेड कमांडर जावेद अहमद मट्टू याला अटक केली आहे. दिल्लीतील डीएनडीमधून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत आला होता आणि निजामुद्दीनमध्येही हालचाली सुरू होत्या.
पाकिस्तानच्या सुन्नी उलेमा कौन्सिलचे केंद्रीय उपमहासचिव आणि अहले सुन्नत वाल जमातचे प्रवक्ते अल्लामा मसूद-उ-रहमान उस्मानी यांची इस्लामाबादच्या घोरी टाउनमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
बहराइच जिल्ह्यातील एका विशेष न्यायालयाने महसी विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार सुरेश्वर सिंह यांना 21 वर्षे जुन्या एका प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. एसडीएमला धमकी देण्याच्या जुन्या प्रकरणावर सुनावणी करताना कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.
संभाजीनगर | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलाचं लग्न पार पडलं. तर दुसऱ्या बाजूला शहरात पावसाने दमदार हजेरी लावली. छत्रपती संभाजी नगरात मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली.
पालघर | पालघर जिल्ह्यात 8 जानेवारीला 1-2 ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नैऋत्य अरबी समुद्रात सक्रिय चक्रवाताच्या स्थितीमुळे जिल्ह्यात 1-2 ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपात पाऊस होईल.तसेच पुढील 5 दिवस वातावरण अंशत ढगाळ राहण्याची शक्यताही आहे. तसेच पुढील पाच दिवस कमाल-किमान तापमानात चढ उतार दिसून येईल.
मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे यांना अद्याप मैदानाची परवानगी मिळालेली नाही. याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता, ही प्रोसेस आहे, त्यानुसार त्यांना परवानगी मिळेल, मला त्यांनी परवानगी मागितली की नाही याची कल्पना नाही, असे ते म्हणाले.
१२ ते १६ जानेवारी रोजी नाशिकमध्ये २७ व्या ‘राष्ट्रीय युवा महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.या महोत्सवाच्या मॅस्कॉट, लोगो आणि स्लोगन अनावरण आज होणार आहे.नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात हा सोहळा होईल. या अनावरण सोहळ्याला केंद्रीय क्रीडा व सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हे ऑनलाईन उपस्थित राहतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ऑनलाईन उपस्थित राहतील.
सोयाबीनला कमी भाव मिळाल्याने बुलडाण्यात शेतकऱ्याने कोयता दाखवला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला. सरकारने शेतकऱ्याला ताबडतोब सोडवावे. अन्यथा सरकारला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.
जितेंद्र आव्हाड यांचे प्रभू श्रीरामाविषयींचे वक्तव्य हे मूर्खपणाचे आहे. ते प्रसिद्धीसाठी असे वक्तव्य करतात अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तर आव्हांडांच्या वक्तव्यावर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे मौन साधून बसल्याची खोचक टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली आहे.
ज्यांच्यावर संशय आहे अशा सर्वांवर संपूर्ण देशात छापेमारी सुरू आहे. तुम्ही जर काही केलं नसेल तर तुम्हाला घाबरण्याचा कारण नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. देशभरात स्वच्छता मोहीम चालू आहे. मात्र राजकीय आकसासातून अस म्हणण्याचं काही कारण नाही. अधिकारी डायरेक्ट रेड करत नाही .सर्व चौकशी आणि तपासणी करूनच काही संशयास्पद वाटल्यास ते रेड करतात.
अनधिकृत पैसा आहे , २ नंबर वाले आहेत..त्यांच्यावर कारवाई करण्यात आहे. मोठमोठ्या व्यक्तींवर या कारवाया झालेल्या आहे आणि या संपूर्ण देशभरात सुरू आहेत. ते प्रामाणिक असतील तर त्यांना घाबरण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले.
दाऊद इब्राहिम याच्या खेड येथील संपत्तीचा लिलाव झाला. ऑनलाईन पद्धतीने आधीच अर्ज करून ही जमीन विकत घेण्यात आली. ई टेंडरमधून जमीन विकत घेण्यात आली. चार मालमत्तांचा लिलाव करण्यात आला. त्यातील क्रमांक तीनच्या जमिनीसाठी 4 लोकांनी अर्ज केला होता. या मालमत्तेचा 2.01 कोटी रुपयांना लिलाव तर क्रमांक 4 च्या मालमत्तेचा 3.28 लाख रुपयांना लिलाव करण्यात आला.
आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात परशुराम सेवा संघ आक्रमक झाला आहे. जितेंद्र आव्हाड जिथे दिसेल तिथे त्यांचं तोंड काळं करू, मूर्ख माणसाने रामाची आणि ब्राह्मण समाजाची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाषण बंदी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करत परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी आव्हाडांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
आमदार सुनील कांबळे यांनी अशा पद्धतीने मारहाण करणे चुकीचे आहे. आमदार कांबळेंचे नाव कोनशिलेवर नसल्यामुळे त्यांना राग अनावर झाला होता. त्यांनी राग शांत करावा, पुण्याची ही संस्कुती नाहीय. प्रशासनाकडून काही चुका झाल्या असतील त्याला मारहाणीने उत्तर देता येत नाही, असं आमदार रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.
रायगडमधील कार्यक्रमा नंबर एकचा. सर्वसामान्यांना घेऊन सरकार पूढेज जात आहेत. रायगडच्या माणगावमधील शासन पल्या दारी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.
एसटी कर्माचारी बँकेच्या बैठकीमध्ये सदारवर्तेंच्या उपस्थितीवर 9 संचालकांनी आक्षेप घेतला. शरद पवार यांचे विचार येथे चालणार नाहीत, असं सदावर्ते म्हणाले.
ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची चौकशी सुरू आहेत ते सर्व 95 टक्के लोक विरोधी पक्षातले आहेत, आणि नंतर वाशिंग मशीन तर आहेच भाजपचं अशी टिका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केली आहे. या विषयावर मंत्री अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया देत रोहित पवार यांना टोला लगावला आहे
केंद्र सरकारने हिट अँड रन हा कायदा मागे घेतला नसून राष्ट्रपतींनी या कायद्यावर सही करून हा कायदा लागू केलेला असल्याचा आरोप ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ संस्थापक अध्यक्ष रमेश समुखराव यांनी केलेला आहे. तर येत्या काळात हा कायदा रद्द नाही केला तर उग्र आंदोलन छेडणार असल्याचा देखील त्यांनी सांगितलं आहे.
पुण्यातील गुंड शरद मोहोळवर नुकताच गोळीबार करण्यात आल्याची घटना घडलीये. तीन गोळ्या शरद मोहोळवर झाडल्या आहेत.
सध्या जरांगे पाटील यांचा मराठा संवाद दौरा सुरू आहे आणि त्यांच्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. छगन भुजबळ हे मड्यावरच्या टाळूवरचे लोणी खातात आणि भुजबळ हे खाऊन खाऊन बोक्या झाला आहे, असे थेट जरांगे पाटील यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रमध्येच गरज, दिल्लीत फडणवीस यांनी येण्याची गरज नाही. अजित पवार आता लगेच मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती नाही, आता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली चांगले काम सुरुय. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्याने आता लगेच शरद पवार निवृत्ती घेतील असे वाटत नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
चार जणांच्या पथकाने मारला छापा. कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल ताब्यात घेऊन तपासणी सुरू. गेल्या 2 तासापासून ईडी कडून तपासणी सुरू
भाजप आमदार सुनील कांबळे यांच्याकडून पुन्हा एकदा मारहाण. कार्यक्रम संपल्यावर दिली एकाच्या कानशिलात. मंचावरून खाली उतरत असताना मारहाण केल्याचं दृश्यात स्पष्ट. कार्यक्रमाच्या आधीही राष्ट्रवादीच्या वैद्यकीय प्रदेशाध्यक्षाला केली मारहाण. भाजप आमदार सुनील कांबळे वादात
तुरुंगात असलेले आपचे खासदार संजय सिंह पुन्हा राज्यसभेवर जाणार. आपचा मोठा निर्णय. 27 जानेवारीला संजय सिंह यांची राज्यसभेची टर्म पूर्ण होत आहे. 19 जानेवारीला ही निवडणूक पार पडत आहे. दिल्ली कथित दारू घोटाळ्यात आरोपी असलेले संजय सिंह सध्या कारागृहात आहेत.
“सर्व पुरावे तपासल्यानंतरच ती जागा राम मंदिराला दिली. राममंदिर झाले की न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे मशीद बांधावी. राम मंदिर कार्यक्रमासाठी सर्वांना निमंत्रण. हा सोहळा भाजपाचा नाही. रामजन्म भूमी ट्रस्टचां हा सोहळा आहे. ज्याला रामाबद्दल आदर आहे, त्यांनी त्याठिकाणी जावे. मी ही अयोध्येला जाणार आहे” असं रामदास आठवले म्हणाले.
संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांना चौका चौकात उलट टांगून यांच्या चामड्या काढल्या पाहिजेत. त्याशिवाय यांचे डोके ठिकाणावर येणार नाही. जितेंद्र आव्हाड सारखा विकृत माणूस माझ्या जीवनात पाहिला नाही. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांची राऊत यांच्याबरोबर जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका.
22 तारखेच्या होम हवन पुजेच्या साहित्याचा मान महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील केले परिवाराला मिळाला आहे. पूजेचं सगळं साहित्य चंद्रकांत केले परिवाराने मंदिरासाठी दिलं आहे. 200 कलशाने रामाला अंघोळ घातली जाणार. यासाठी सोने , चांदी आणि ताम्र या कलशांचा वापर करणार आहेत. होम हवानासाठी लागणारे लाकूड सगळं पूजेचं साहित्य महाराष्ट्रातून आणण्यात आलं आहे.
ससून रुग्णलयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन झालं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती….
गडचिरोली पेरमिली येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला एक लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. एन्टी करप्शन ब्युरो गडचिरोलीने कारवाई करीत वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद जेनेकर यांना अटक केली आहे. सदर प्रकरणात अधिकारी फिर्यादीला त्रास देऊन नेहमीच मागणी करीत होता… भामरागड तालुक्यातील पेरमिली वनपरिक्षेत्र कार्यालयातच धाड
अंगणवाडी सेविकांचं विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. संपावर गेलेल्या अंगणवाडी सेविकांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोकरीवरुन कमी करण्याबाबत अंगणवाडी सेविकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
राज्यपाल रमेश बैस आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतील. राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
प्रभू श्रीराम काय खायचे माहीत नाही, पण राष्ट्रवादीतले नेते पैसे खायचे हे नक्की , जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ही टीका केली आहे.
मी कामाचा माणूस, मला फालतू मुद्यावर बोलायचं नाही, आव्हाड-रोहित पवारांच्या प्रश्नांवर अजित पवार म्हणाले नो कमेंट्स.
महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करा. १५ दिवसांत सर्व्हेक्षण होऊ शकतं तर जातीनिहाय जनगणनाही करा, असे छगन भुजबळ म्हणाले.
पक्षाने जबाबदारी दिली तर लोकसभा निवडणूक लढवेन. शेवटचा निर्णय महायुतीमधील तिन्ही पक्ष घेतील. असं सांगत हसन मुश्रीफ यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले.
जागावाटपाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. जागावाटपाबाबत मतभेद नाहीत. वंचितला मविआचा महत्वाचा घटक आम्ही मानतो, असे संजय राऊत म्हणाले.
सांगलीतील माधवनगर – मिरज रस्त्यालगत असलेल्या एका शाळेसमोरील रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली.या अपघातात दोन्ही दुचाकी चालक जागीच ठार झाले आहेत.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलाचा विवाह होत आहे. सहारा सिटीतील 70 एकर परिसरात हा शाही विवाह सोहळा होतोय. अडीच हजार स्क्वेअर फुटावर स्वागत समारंभाचा स्टेज उभारला गेला आहे. 50 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह उध्दव ठाकरे आणि राज्यातील बडे नेते उपस्थित राहणार आहेत.
सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीला पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. पुढील सहा महिन्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीला मुदतवाढ देण्याबाबतचा आदेश शासनाने काढला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख तर बार्शीच्या बाजार समितीची सत्ता ही भाजप समर्थक आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडे आहे. शासनाच्या सहकार-पणन विभागाच्या अवर सचिव माधवी शिंदे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. या आदेशानुसार सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
पुण्यात आजपासून 100 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाला सुरुवात होणार आहे. नाट्य संमेलनाच्या उदघाटनाला शरद पवार, सुधीर मुनगंटीवार, उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. गणेश कला क्रीडा मंच सभागृहात संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आहे. संध्याकाळी 5 वाजता शरद पवारांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.
पुण्यात पुन्हा एकदा काँग्रेस नेत्याचे लागलेत, भावी खासदार म्हणून फ्लेक्स लागलेत. पुणे शहराचे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचे फ्लेक्स लागले आहेत. अरविंद शिंदे यांचे भावी खासदार म्हणून पुणे शहरात फ्लेक्स झळकले आहेत. यापूर्वी जगदीश मुळीक, वसंत मोरे आणि प्रशांत जगताप यांचेही भावी खासदार म्हणून बॅनर्स लागले होते. भाजप पाठोपाठ पुणे लोकसभा हा काँग्रेसचा देखील बालेकिल्ला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ आणि केंद्रातील नेते पुणे दौरा करणार आहेत.
अंबादास दानवे यांच्या मुलाच्या लग्नाला सर्वपक्षीय नेते उपस्थित राहाणार आहे. ठाकरे, राऊत, शिंदे, फडणवीस यांना विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांनी विविध विकासकामांची पाहिणी केली. सकाळी 6 वाजतापासूनच अजित पवार यांचा पाहाणी दौरा हा सुरू झाला आहे. पुण्याच्या सरकिट हाऊसची देखील त्यांनी पाहाणी केली.
अब्दुल सत्तार यांच्या शिवीगाळ प्रकरणानंतर नागरिक आक्रमक झाले आहेत. सिल्लोडमधील कसोड गावात सत्तारांचे बोर्ड नागरिकांनी फेकून दिले आहे. सत्तारांच्या शिवीगाळ प्रकरणानंतर वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय.
पंकजा मुंडे यांनी सरकार विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. याशिवाय उसतोड कामगारांच्या प्रश्नांवर पवार-मुंडेची चर्चा झाली आहे. उसतोड कामगारांना 34 टक्के दरवाढ देण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्यात हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे चिंता निर्माण झाली आहे. एक्युआय निर्देशांक 180 पलिकडे गेला आहे. लहान मुलं आणि वृद्धांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात JN1 या कोरोनाच्या उपप्रकाराचे 110 रूग्ण आहेत. राज्या कोरोनाचे एकूण 171 रूग्ण सापडले. कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.
यवतमाळच्या वणी तालुक्यातील निळापुर ब्राम्हणी रोडवरील राजा एक्जीन जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला आग लागली. या आगीत लाखो रुपयांचा कापूस व सरकी जळाल्याची घटना घडली. यावेळी काम करीत असलेल्या 25 मजुरांचे प्राण सुदैवाने वाचले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
शेतकऱ्यांची नवीन तूर बाजारपेठेत येताच तुरीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अमरावतीत नवीन तुरीला 6800 ते 7351 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. एक महिन्यांपूर्वी तुरीला 9 ते 10 हजार रुपये प्रतिक्विंटल दर होता.
रायगड जिल्ह्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे ता. माणगांव, जि. रायगड येथे दुपारी एक वाजता कार्यक्रम होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
आदित्य ठाकरे 10 जानेवारीला मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदार संघात जाहीर सभा घेणार आहेत. सातारा पाटण तळमावले येथे 10 जानेवारी रोजी उबाठा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा व कार्यकर्ते मेळावा होणार आहे.