मुंबई, दि. 8 जानेवारी 2024 |पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ ते १० जानेवारी दरम्यान गुजरातचा दौरा करणार आहेत. ‘व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद-२०२४’चे उद्घाटन करतील. मुंबईतील गिरगाव चौपाटीचे ऐतिहासिक महत्त्व आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. आगामी काळात चौपाटीवर पर्यटकांचा ओघ आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. महापुरुषांची जीवनगाथा उलगडवून दाखविणारा लेझर शो चौपाटीवर लवकरच सुरू होणार आहे. शिवसंकल्प अभियान अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीमधील राजापूरमध्ये कार्यकर्ता मेळावा घेणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे जाऊन पाहणी करणार आहेत. मालाड स्थानकात ते चर्चगेट लोकल सुरू करा, अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेव दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
लक्षद्वीप हा गुगलवर सातत्याने सर्वाधिक शोधला जाणारा कीवर्ड बनला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच येथे भेट दिली होती.
भारत हा बांगलादेशचा खूप चांगला मित्र असल्याचं बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटलं आहे. 1971 आणि 1975 मध्ये त्यांनी आम्हाला साथ दिली. आम्ही भारताला आपला शेजारी मानतो. भारतासोबत आमचे चांगले संबंध आहेत याचे मला खरोखर कौतुक वाटते.
पश्चिम बंगालचे डीजीपी राजीव कुमार म्हणाले की, ज्याने कायदा हातात घेतला आहे किंवा कायदा मोडला आहे, त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू.
22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अभिनेता रणदीप हुड्डा याला निमंत्रण मिळाले आहे.
सोलापूर | सोलापूर जिल्ह्यात कोरोनाच्या JN1 या व्हेरिएंटची एन्ट्री झाली आहे. बार्शीत JN1 कोरोनाचे 2 रुग्ण सापडले आहेत. दोन्हीही JN1 रुग्ण या महिला आहेत. दोन्ही रुग्णावर घरीच उपचार सुरु आहेत. दरम्यान 2 रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाने नागरिकांना दक्षता घेण्याचं आवाहन केलं आहे.
आसाम | “राहुल गांधी यांची भारत न्याय यात्र आमच्यासाठी महत्त्वाची नाही. राहुल गांधी स्वतःच्या मस्तीसाठी यात्रा करतील. या यात्रेमुळे नागरिकांचं आणि जनतेचं काहीही भलं होणार नाही. राहुल गांधी परिपक्व नाही. राहुल गांधी वयाने मोठे आहेत मात्र त्यांची विचार करण्याची क्षमता ही लहान मुलाप्रमाणे आहेत. आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही”, असं केंद्रीय मंत्री किरण रिजीजू म्हणाले.
विरार | मुंबईला लागून असलेल्या विरारमध्ये शिवसेना शिंदे गटाने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले आहे. विरार पश्चिम ग्लोबल सिटी परिसरात महापालिकेने तात्काळ पाणी सुरू करावे, या मागणीसाठी हे आंदोनल करण्यात आलं. तसेच महापालिका सुर्या प्रकल्पाचे 100 MLD अतिरिक्त पाणी मिळूनही पुरवठा करत नसल्याचा आरोप शिंदे गटाने केला.
शिंदे गटाचे तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांच्या नेतृत्वात सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान हे आंदोलन करण्यात आलं. मात्र त्यानंतर पोलीस आणि अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. महिन्याभरात पाणीपुरवठा करु, असं आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर आंदोनल स्थगित करण्यात आलं.
पुणे : भाजप आमदार नितेश राणे शरद मोहोळच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळने काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. 5 तारखेला शरद मोहोळची गोळ्या घालून करण्यात आला होती हत्या.
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या जागा वाटपासंदर्भात उद्या इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. शिवसेनेकडून संजय राऊत, विनायक राऊत सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुप्रिया सुळे बैठकीत सहभागी होणार आहेत. काँग्रेसकडून नाना पटोले, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण बैठकीत सहभागी होणार आहेत.
धुळे : मराठा समाजाचे मुंबईत ट्रॅक्टर घुसन असा नारा देत सकल मराठा समाजाच्या वतीने धुळ्यात ट्रॅक्टरची नोंदणी सुरु केलीय. 20 जानेवारी रोजी मुंबई येथे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात धुळ्याहून देखील हजारो बांधव मुंबईला जाणार आहेत. मुंबईला जाण्यासाठी ट्रॅक्टरची आजपासून नोंदणी सुरु करण्यात आली आहे. धुळ्यातील साखळी उपोषण स्थळी ही नोंदणी करण्यात येत आहे. सुमारे 400 ट्रॅक्टर मुंबईला धुळ्यातून जाणार आहेत.
बीड, चकलांबा : एकदा मराठा आरक्षण मिळू दे मला बघायचे आहे तुझ्यामध्ये किती दम आहे. याला (भुजबळ) किती वळवळ करतो ते बघू. आता आरक्षण मिळाले की हिसाब बरोबर करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिला. त्या एकट्याने मराठ्यांचे नुकसान केले आहे. आता आपल्याला मुंबईला जायचे आहे. मुंबईला जाणाऱ्या मुलांना मायेची साथ द्या. ती मुले एक इंचही मागे हटणार नाही असेही ते म्हणाले.
पुणे : पवार साहेब ८४ वय असूनही इतकं काम करताहेत. मग, दादासाठी अडचण कशाला? त्यांचा करिअर ग्राफ बघा. माझं आयुष्य सगळं सोशल मीडियावर आहे. मी देखील १६ तास काम करते. अजित पवार यांनी रोहित पवार याच्यावर वक्तव्य केलं. पण, दादा आता सिनियर सिटिझन आहे. दादापेक्षा रोहित छोटा आहे आणि रोहितच्या वयात पवार साहेब मुख्यमंत्री होते, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.
बीड : जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. ५४ पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. परळीत याबाबत पत्रकार परिषद घेऊन या पदाधिकारी यांनी आपली भूमिका विषद केली. काही जणांना विचारात न घेता निवडी करण्यात आल्या आहेत ते ही पदाधिकारी शिंदे सेनेत जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे शिवसेनेतील पदाधिकारी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे असे जिल्हाप्रमुख सचिन मुळक यांनी सांगितले.
चंद्रपूर : राज्यात नुकताच जाहीर झालेला तराठी परीक्षेचा निकाल वादात सापडला आहे. टीसीएस कंपनीच्या नॉर्मलायझेशन या नव्या मूल्यमापन पद्धतीला परिक्षार्थ्यांचा विरोध आहे. मूल्यमापन पद्धतीमुळे परीक्षेचा कालावधी तीन ते चार दिवस वाढल्याने विचित्र निकाल आले आहेत. त्यामुळे ही तलाठी भरती परीक्षा एमपीएससी मार्फत घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. सरकारच्या धोरणा विरोधात घोषणाबाजी करत चंद्रपूरच्या तलाठी भरती परिक्षार्थ्यांनी गुणवत्ता यादी जाळली.
रत्नागिरी : राज्यात आम्ही स्वच्छता अभियान सुरू केलं याची काही लोकांना पोट दुखी सुरू झाली. मी फिल्डवर काम करणारा मुख्यमंत्री आहे. घरात बसून काम करणारा नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. आपण युती धर्म पाळणारे आहोत. टीका करणाऱ्यांचा नंबर कुठे आहे हे त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होतो याची तुम्हाला पोटदुखी का? असा सवाल करतानाच अब की बार पैतालीस पार अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
हिंगोली : दोन समाज एकमेकासमोर येईल. मनोज जरांगेंच्या भूमिकेमुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे मनोज जरांगे आणि ओबीसी समाज यापैकी कुणालाही आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देवू नये अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे.
अहमदनगर : तलाठी भरतीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय. तलाठी भरती पारदर्शक झाली असून याच संस्थांमार्फत राज्यातील वेगवेगळ्या विभागाच्या 75 हजार जागांची भरती सुरू आहे. अतिशय पारदर्शक भरती प्रक्रियेत कोणालाच हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे आपण कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचे विखे यांनी म्हटलंय.
आपले आरक्षण कुठे आहे याचा शोध घेतला आणि मराठा समाजाचे आरक्षण ओबीसीमध्ये असल्याचे कळले. मराठ्यांनी लढा उभा केला, आणि ते घ्यायचे ठरवले. मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या म्हणजे एका नोंदी वर चार जणांना लाभ झाला म्हणजे 2 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळाले, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
माझं कुटुंब, माझी जबाबदारी, इतकेच सरकारचे काम नाहीये, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
एसटी दरात महिलांना 50 टक्के सूट दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
नव्या व्हेरियंटचा कोरोनाच्या शिरकाव झालाय. या रुग्णाचे प्रकृती स्थिर असून कुठलाही त्रास नाहीये. मात्र अनेक महिन्यानंतर कोरोना रुग्ण नंदुरबार आढळल्याने, प्रशासनाकडून उपाय योजना करण्याला सुरुवात.
पुण्यात अंगणवाडी सेविकांचं थाळीनाद व धरणे आंदोलन सुरू आहे. अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र राज्य तर्फे पुण्यातील समाज कल्याण आयुक्तालयाच्या बाहेर आंदोलन सुरू आहे. अंगणवाडी सेविकांना योग्य आणि वेळेवर मानधन मिळावं, पेन्शन द्या ,वेतन श्रेणी मिळावी अशा त्यांच्या मागण्या आहेत.
आम्हाला अनेक वेळा राबवून घेत योग्य मोबदला दिला जात नाही , असा अंगणवाडी सेविकांचा आरोप असून मागण्या मान्य होई पर्यंत आंदोलन करण्यावर अंगणवाडी सेविका ठाम आहेत.
लासलगाव(नाशिक) – कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांच्या मुला मुलींची लग्न रखडली. कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे ५० टक्क्याहून अधिक बाजार भाव कोसळले. प्रति शेतकऱ्याचे दीड ते तीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान होणार. या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 500 ते 550 कोटींचा फटका बसणार असून तर राज्यातील शेतकऱ्यांना 1200 ते 1500 कोटींचा फटका बसेल.
जागावाटपाची जबाबदारी आजपर्यंत का पार पाडली नाही, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला.
राहुल नार्वेकर निर्णय देत नाहीत, हे चुकीचं आहे. नार्वेकरांनी कोर्टाला सांगावं निर्णय देत नाही, असंही ते म्हणाले.
दिल्लीतील मविआच्या बैठकीचं मविआला निमंत्रण आलेलं नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांनी २० तारखेला मुंबईत आंदोलन करू नये यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. आज दुपारी २ वाजता सुनावणी होणार.
खासदार संजय राऊत यांनी शिर्डी दौऱ्यात मोजक्या पदाधिका-यांसोबत साईदर्शन घेतले आहे. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कट्टर विरोधक प्रभाताई घोगरे यांचीही उपस्थिती होती.
पुणे पोटनिवडणुक लवकरात लवकर घ्या, या उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सार्वत्रिक निवडणुकीला थोडाच अवधी बाकी आहे, त्यामुळे पोटनिवडणुक होईल का? यावर प्रश्न चिन्ह आहे. याचिकाकर्त्यांना चार आठवड्यांची मुदत देत पुढील सुनावणी सात आठवड्यांनी ठेवली आहे. पोटनिवडणूकीबाबत कायद्याची स्पष्टता करू असे सर्वोच्च न्यायालय म्हटले आहे.
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त 11 जानेवारी आणि 13, 14 आणि 15 जानेवारी रोजी कांदा लिलाव बंद राहणार आहे.
तीन दिवस बाजार समितीतील कांदा बंद राहणार. अमावस्या निमित्त 11 जानेवारी कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत.
यवतमाळ – वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोड यांना विचारणा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भावना गवळी यांच्याविरोधातील वातावरण पाहता राठोड यांच्या नावाचा विचार करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.
कोरेगाव भीमा आयोगासमोर प्रकाश आंबेडकरांची आजची उलट तपासणी पूर्ण झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज कोरेगाव भीमा आयोगासमोर साक्ष दिली आहे.
अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर जय्यत तयारी… १००८ शिवलिंग आणि १०० कुंडात होणार महायज्ञ… शरयू नदीच्या तीरावर भव्यदिव रूप पाहायला मिळत आहे…
अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड.उज्ज्वल निकमा यांना निमंत्रण..! अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून 889 जणांना निमंत्रण… यात उज्ज्वल निकम यांचाही समावेश… रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणाचा मला विशेष आनंद असल्याची उज्वल निकम यांची प्रतिक्रिया…
15 दिवसात मराठी पाट्या लावा अन्यथा दुकान होणार सील… महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी असा निर्णय घेतला आहे. 15 दिवसात दुकानांवरील आणि सर्व पाट्या मराठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 15 दिवसात पाट्या मराठीत झाल्या नाहीत तर थेट दुकान सील करण्यात येईल…
पुणे- तलाठी भरतीचा निकाल समोर येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे. निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाला असून जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार या परीक्षेत दोनशेहून अधिक गुण घेत उत्तीर्ण झाल्याचा आरोप केला आहे. तसेच ज्या काही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवार परीक्षेत पास झाल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. त्यामुळे तलाठी भरती पुन्हा एकदा वादात सापडली आहे.
पुणे- कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर फायरिंग करणारा मुन्ना पोळेकरने फायरिंग वेळी पुण्यातील एका नामांकित गुंड्याच्या नावाने घोषणाबाजी केली होती. हल्लेखोरांकडून तपास भटकवण्याचा प्रकार की खरंच हल्ल्यामागे गँगवॉर असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शुक्रवारी पाच जानेवारी रोजी मोहोळ याच्यावर आरोपी मुन्ना पोळेकरने त्याच्या दोन साथीदारांसह फायरिंग केली होती.
नवी दिल्ली – बिल्कीस बानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. गुजरात सरकारने ११ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली होती. ऑगस्ट २०२२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आरोपींची गुजरात सरकारने सुटका केली होती, या सुटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचा निकाल आज न्यायालय निकाल देणार आहे.
१२ ऑक्टोबर २०२३ रोजी न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. न्यायाधीश बिवी नागरत्ना आणि न्यायाधीश उज्जल भुयान यांचं पीठ निकाल देणार आहे. शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच दोषींची सुटका केल्यामुळे न्यायालयानं तीव्र सवाल सुनावणीवेळी उपस्थित केले होते. पण गुजरात सरकारने दोषींची सुटका योग्य असल्याचं म्हटलं होतं.
बातमी आळंदीतून… इंद्रायणी नदीतील प्रदुषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. इंद्रायणी नदी सहाव्या दिवशी ही फेसाळलेलीचं आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रार करण्यात येत आहे. मात्र तरिही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कुंभकर्ण झालंय. त्यांना काही केल्या जागचं येईना…
अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातही मोठा उत्साह पाहायला मिळतोय. श्रीराम मंदिरांचे निमंत्रण व अक्षता वाटप प्रत्येक दुर्गम भागात रामभक्तांकडून करण्यात आलं. मोठ्या जल्लोषात भक्तांनी प्रत्येक गावात आणि शहरात रॅली काढून अक्षता वाटप केलं. मुलांपासून तर महिला व पुरुषांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद यावेळी दिसत होता. ऐतिहासिक सोहळा येत्या 22 जानेवरी ला संपन्न होणार असून गडचिरोली जिल्ह्यातून तीन भक्तांना रामलला येथून निमंत्रण आले.
सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील बोरगावात मोदी सरकार हमी योजनेतील विकसित भारत रथ अडवला. गावातील हर्षवर्धन बोधले आणि प्रमोद भोग या तरुणांनी मोदी सरकारच्या योजनांची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव, कांद्यावरील निर्यात बंदी, सुशिक्षित तरुणांची बेरोजगारी या विषयावर सवाल विचारले. शेवटी महात्मा गांधींच्या प्रतिमा पूजनानंतर विकसित भारत रथ गावातून हाकलून दिला.
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत. आजपासून शहरातील अनेक भागात केवळ एक वेळ सोडण्यात येणार पाणी. शहरातील अनेक भागांमध्ये कमी दाबाने होणार पाणीपुरवठा. नव्या जलवाहिनीचे काम सुरू असल्याने शहरातला पाणीपुरवठा होणार विस्कळीत. शहरात आजपासून 22 जानेवारी पर्यंत नव्या जलवाहिन्यांचे काम राहणार सुरू.
यवतमाळ वाशीममधून उमेदवारी देण्याची महिला प्रदेश कॉग्रेस अध्यक्ष संध्या सव्वालाखे करणार मागणी. पक्षाने जागा काँग्रेससाठी घ्यावी, मी लढण्यास तयार असं सव्वालाखे म्हणाल्या. या मतदारसंघात महिला खासदार 5 टर्म होत्या. त्यामुळे महिलांच्या बाजूचा मतदार संघ असून मी लढण्यास तयार असं संध्या सव्वालाखे म्हणाल्या.
भाजपची लोकसभेसाठी नवी रणनिती. जास्तीत जास्त तरुण उमेदवारांना निवडणुकीत उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न. 40 ते 55 वर्षाच्या उमेदवारांना भाजप निवडणुकीत उतरवणार, सूत्रांची माहिती. जवळपास 145 पेक्षा जास्त तरुण चेहऱ्यांना भाजप निवडणुकीत उतरवण्याची शक्यता. ज्या विद्यमान खासदारांच भाजप तिकीट कापणार, त्यांना पक्षसंघटनेत जबाबदारी देणार.
गडचिरोली जिल्ह्यात तीन दिवसात दोन महिलांचा वाघाने बळी घेतला. गडचिरोलीतील वाकडीच्या जंगलात वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाली, तर अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथे दुसरी महिला ठार झाली. दोन्ही महिला शेतीच्या कामासाठी गेल्या होत्या. पहिल्यांदाच अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथे वाघाची दहश.
मुंबईत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या 6 दरोडेखोरांना मुंबईच्या कस्तुरबा मार्ग आणि जुहू पोलिसांच्या एटीएस पथकाने अटक केली आहे.बोरिवली येथील गेस्ट हाऊस मधून या सहा ही अरोपीना अटक करून त्यांच्याकडून तीन अग्निशास्त्रांसह (बंदुका) ३६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.
मुंबईतील गिरगाव चौपाटीचे ऐतिहासिक महत्त्व आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. आगामी काळात चौपाटीवर पर्यटकांचा ओघ आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. महापुरुषांची जीवनगाथा उलगडवून दाखविणारा लेझर शो चौपाटीवर लवकरच सुरू होणार आहे. २२ जानेवारी अयोध्येत राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्याच दिवशी चौपाटीवर लेझर शोचे उद्घाटन होईल. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर सुरू होणारा हा पहिला लेझर शो असेल. ‘भविष्याचे प्रवेशद्वार’ (गेट वे टू द फ्युचर) असा त्याचा यंदाचा मुख्य विषय आहे. या वर्षी ३४ सहभागी देश आणि १६ भागीदार संस्था या परिषदेत सहभागी होत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ ते १० जानेवारी दरम्यान गुजरातचा दौरा करणार आहेत. या काळात ते ‘व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद-२०२४’चे उद्घाटन करतील. या शिखर परिषदेदरम्यान मोदी जागतिक नेते, सर्वोच्च जागतिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. ‘व्हायब्रंट गुजरात’ विश्व परिषदेचे हे दहावे पर्व गुजरातमधील गांधीनगर येथे १० ते १२ जानेवारी २०१४ दरम्यान होणार आहे.
मालाड स्थानकात सकाळी८:३० ते ९:३० या कालावधीत प्रवाशांची मोठी गर्दी असते. यामुळे मालाड ते चर्चगेट लोकल सुरू करा, अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेव दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.