LIVE | उद्यापासून त्रंबकेश्वर मंदिर 15 दिवसांसाठी पूर्णपणे बंद
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
उद्यापासून त्रंबकेश्वर मंदिर 15 दिवसांसाठी पूर्णपणे बंद
नाशिक – उद्यापासून त्रंबकेश्वर मंदिर 15 दिवसांसाठी पूर्णपणे बंद
18 एप्रिल पर्यंत मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे असणार बंद
मंदिर विश्वस्त समितीचा महत्वपूर्ण निर्णय
मंदिरातील अनेक कर्मचाऱयांना कोरोना झाल्याचं निष्पन्न
-
पनवेल मनपाच्या वाढीव मालमत्ता कराला महाविकास आघाडीचा विरोध
पनवेल मनपाच्या वाढीव मालमत्ता कराला विरोध कायम
पत्रकार परिषदेत घेत महाविकास आघाडीने मांडली भूमिका
भाजपाला निवडणूक जाहीरनाम्यातील मालमत्ता कराचा विसर; महाविकास आघाडीचा आरोप
महविकास आघाडीचा विरोध असतानाही बहूमताच्या जोरावर ठराव केला मंजूर
हे तर सत्ताधारी पक्षचा दुटप्पी धोरण म्हणत महाविकास आघाडीचा तीव्र विरोध
करवाढीच्या घेतलेल्या या ठरावाला महाविकास आघाडीच्या 27 नगरसेवकांचा कडाडून विरोध
-
-
मुखमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला अजित पवार उपस्थित
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री विश्वजित कदम जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल
– मुखमंत्र्यांनी बोलावलेल्या व्हीसीला उपस्थित
– थोड्याच वेळात अजित पवार बोलण्याची शक्यता
-
छत्तीसगड राज्यातील बिजापूर सुकमा जिल्ह्यात नक्षली हल्ल्यात 24 जवान शहीद
छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील तोरंम बासागोडा जंगल परिसरात काल दुपारी एक कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. या कोम्बिंग ऑपरेशन वर आठशेपेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये तब्बल चार ते पाच तास चकमक चालली. यामध्ये 24 जवान शहीद झाले आहेत. कोब्रा बटालियन चे 9 जवान, डीआरजीचे आठ जवान, एसटीएफचे 6 जवान आणि बस्तरिया बटालियनचा एक जवान असे एकूण 24 जवान शहीद झालेआहेत.
-
अश्विनी बिंद्रे हत्याकांडातील साक्षीदार पोलीस नाईक निवृत्ती विष्णू कर्डेल याला अटक, कोर्टासमोर हजर
अश्विनी बिद्रे हत्याकांड अपडेट –
अश्विनी बिंद्रे हत्याकांडातील साक्षीदार पोलीस नाईक निवृत्ती विष्णू कर्डेल याला अटक करून साक्षी साठी कोर्टासमोर हजर केले
हजर केल्यानंतर न्यायमूर्ती माधुरी आनंद यांनी त्याचं वॉरंट रद्द केलं. त्यानंतर त्याची उलट तपासणी झाली.
त्यामध्ये त्यांनी कुंदन भंडारींला हॉटेल बंटास् चौकात त्या रात्री १.३० ला सोडले. {ज्या रात्री अश्विनी बिंद्रेची हत्या झाली} ज्या फ्लॅटमध्ये अश्विनी बिंद्रेची हत्या झाली तो फ्लॅट त्याचं चौकात आहे.
-
-
आंबोलीत वस्तीत शिरलेल्या गव्याला नैसर्गिक अधिवासात सोडले
आंबोली गेळे गावात भर वस्तीत गवा शिरल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली
जखमी असलेल्या त्या गव्याला अखेर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले
आंबोली जवळील गेळे गावामध्ये काल शनिवारी एक गवा डोळ्याला इजा झाल्याने भरवस्तीत घुसला होता
त्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
-
यवतमाळमध्ये चपलीच्या गोडाऊनला भीषण आग
यवतमाळ –
यवतमाळ शहरातील पांढरकवडा मार्गावरील मालानी बाग परिसरातील एका चपलीच्या गोडाऊनला भीषण आग
आग नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल
आगीत गोडाऊन जळून खाक
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
-
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट मिळायला सुरुवात
पुणे –
– दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट मिळायला सुरुवात
– दहावी आणि बारावीची परीक्षा देण्यासाठी यंदा ट्रान्सजेंडर मुलांची संख्या वाढली
– बारावीचे 162 विद्यार्थी तर दहावीचे 102 विद्यार्थी देणार बोर्डाची परीक्षा
– पुणे विभागातून सर्वाधिक ट्रान्सजेंडर मुलं परीक्षा देतील
– यंदा बारावीचे 13 लाख 17 हजार 76 विद्यार्थी तर दहावीचे 16 लाख 206 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत
-
पनवेल तळोजा MIDC आग, काटे इंजिनीअरिंग कंपनीत लागली होती आग
पनवेल तळोजा MIDC आग
तळोजा MIDC परिसरात प्लॉट L-82 येथे पहाटे 4 वाजता आगीचे तांडव
काटे इंजिनीअरिंग कंपनीत लागली होती आग
काटे इंजिनीअरिंग इलेक्ट्रॉनिक पार्ट बनवण्याचा कारखाना
आगी नेमकी का लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट
फायर ब्रिगेड ला माहिती मिळताच 3 गाड्या घटनास्थळी दाखल
अथक प्रयत्न नंतर सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी आग आटोक्यात
-
रायगडमध्ये वेगवेगळ्या दोन घटनेत दोन वाहने रस्त्यावर पलटी
रायगड
वेगवेगळ्या दोन घटनेत दोन वाहने रस्त्यावर पलटी झाली मात्र जिवीतहानी नाही
मुबंई पुणा जुन्या हायवेवर खालापुर जवळ पुण्या कडे जाताना ट्रक पलटी झाला वाहतुकीस काही काळ अडथळा मात्र जिवीतहानी नाही, चालक किरकोळ जखमी.
खोपोली पेण मार्गावर वडवळ टोलनाक्या जवळ रस्ता रुदींकरण चालु असल्याने कार पलटी झाली.
सातारा येथील चालक डी ऐ क्षीरसागर मात्र सुखरुप.
-
शिरूर तालुक्यातील कुरूळी येथील शेतात बिबट्याचा बछडा आढळला
पुणे
– शिरूर तालुक्यातील कुरूळी येथील शेतात आढळला बिबट्याचा बछडा
– सध्या साखर कारखाना आणि गुऱ्हाळघरांसाठी शिरूर तालुक्यातील कुरुळी परिसरात ऊस तोड सुरू आहे या ऊस तोडणी मजुरांना बिबट्याचा बछडा आला आढळून
– मादी जातीचा हा बछडा
– ऊस तोड सुरू असताना हा आला आढळून, ऊसतोड मंजूर धास्तावले
– ग्रामस्थांकडून पिंजरा लावण्याची मागणी
-
पाण्याच्या शोधार्थ आलेले पाच गवे विहिरीत पडले, कराड येथील घटना
कराड
पाण्याच्या शोधार्थ आलेले पाच गवे विहिरीत पडले
पाटण तालुक्यातील मोरगिरी धावडे गावातील रात्रीची घटना
वनविभागाला चार गव्यांना वाचवण्यात यश आले तर एका गव्याचा मृत्यू
वनविभागाने क्रेन जेसीबीच्या साहाय्याने प्रयत्न करुन चार गव्यांना जिवंत बाहेर काढले एकाचा मृत्यू
-
पिंपरी-चिंचवडच्या बॅंकेत 5 कोटी 75 लाखांची फसवणूक प्रकरण, माजी नगरसेवक अमर मुलचंदानींवर गुन्हा
पिंपरी चिंचवड
-पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बॅंकेत 5 कोटी 75 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवक अमर मुलचंदानी यांच्यासह सतरा जणांवर गुन्हा
-नियमबाह्य कर्ज मंजूर करून बॅंकेची तब्बल 5 कोटी 75 लाख 63 हजार 56 रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत माजी नगरसेवक अमर मुलचंदानी यांच्यासह सतरा जणांवर गुन्हा दाखल
-आरोपींनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून नियमबाह्य कर्ज मंजूर केले. आरोपींनी कर्जाचे हप्ते थकवून बॅंकेची तब्बल 5 कोटी 75 लाख 63 हजार 56 रुपयांची फसवणूक केली
-
मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे गावात तीन फ्लेमिंगो पक्षाचा मृत्यू , एक गंभीर जखमी
पुणे –
-मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे गावात तीन फ्लेमिंगो पक्षाचा मृत्यू , एक गंभीर जखमी
-उच्चदाब वीज वाहिन्यांना धक्का लागून मृत्यू झाला असल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्याचा अहवाल
-यामध्ये दोन पक्षी मादी जातीचे तर एक पक्षी नर जातीचा तर जखमी पक्षावर उपचार सुरू
-चालू वर्षातील ही दुसरी घटना या पूर्वी 11 फेब्रुवारी ला अशीच घटना घडली होती त्यामध्ये सहा फ्लेमिंगो पक्षाचा मृत्यू झाला होता.
-वडगांव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांची माहिती
-
श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनास येणाऱ्या भाविकांची कोरोना टेस्ट करण्याबाबत प्रशासनाचा विचार रद्द
पंढरपूर –
श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनास येणाऱ्या भाविकांची कोरोना टेस्ट करण्याबाबत प्रशासनाचा विचार रद्द
संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपातील जागेत या टेस्ट होण्याची व्यक्त केली होती शक्यता
पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी केली होती पाहणी
मंदिर समिती सदस्य आणि प्रशासन यांच्यात चर्चा होऊन अंतिम निर्णय झाला रद्द
-
औरंगाबाद जिल्ह्यातील संचारबंदीत पुन्हा वाढ
औरंगाबाद जिल्ह्यातील संचारबंदीत पुन्हा वाढ
राज्य सरकारच्या आदेशानुसार मिशन बिगीन आगेन अंतर्गत वाढवली संचारबंदी..
जिल्हाभरात 30 एप्रिल पर्यंत कायम राहणार रात्री 8:00 ते सकाळी 7:00 वाजेपर्यंत संचारबंदी..
प्रत्येक शनिवारी रविवारी राहणार कडक संचारबंदी ..
आठवडी बाजार तर कोचिंग क्लासेस संपूर्ण राहतील बंद
-
नागपुरात कोरोना बाधितांची आणि मृत्यूंची वाढ कायम, गेल्या 24 तासात 47 रुग्णांचा मृत्यू
नागपूर –
नागपुरात कोरोना बाधितांची आणि मृत्यूंची वाढ कायमच
प्रशासना कडून नियंत्रण मिळविण्यासाठी हालचाली आणि बैठका सुरू
गेल्या 24 तासात नागपूर जिल्ह्यात कोरोना मुळे 47 रुग्णांचा मृत्यू,
3720 नवीन पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद ,
3600 रुगणांनी केली कोरोना वर मात
एक्टिव्ह रुग्ण संख्या -40,820
टेस्ट – 15,593
एकूण रुग्ण संख्या – 237496
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 191411
एकूण मृत्यू संख्या – 5265
-
हातकणंगलेत वाहतूक कोंडीवरून नगराध्यक्षांना शिवीगाळ आणि मारहाण
कोल्हापूर
हातकणंगलेत वाहतूक कोंडीवरून नगराध्यक्षांना शिवीगाळ आणि मारहाण
मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
नगरपंचायत कार्यालयासमोर झाली होती वाहतूक कोंडी
प्रकाश पाटील आणि नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांच्यात हाणामारी
-
शिवाजी विद्यापीठाचा मंगळवारी पदवीदान समारंभ
कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाचा मंगळवारी पदवीदान समारंभ
इतिहासात पहिल्यांदाच पदवीदान समारंभ पार पडला ऑनलाईन
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार कार्यक्रम
दोघेही ऑनलाइन पद्धतीने सहभागी होत करणार मार्गदर्शन
77 हजार 542 पदवी प्रमाणपत्रांचं होणार वाटप
पदार्थविज्ञान विभागातील विद्यार्थी सौरभ पाटील यांना राष्ट्रपती सुवर्ण पदक तर साताऱ्याच्या महेश्वरी गोळे ला कुलपती सुवर्णपदक जाहीर
-
नागपूर महापालिके प्रमाणे आता ग्रामीण भागासाठी कॉल सेंटर
नागपूर –
नागपूर महापालिके प्रमाणे आता ग्रामीण भागासाठी कॉल सेंटर
निर्देश न मानणाऱ्या डॉक्टरांवर पोलिसांमार्फत कारवाई
मौदा, रामटेक, इंदोऱ्याच्या आंबेडकर केंद्रात कोविडकेअर सेंटर
ग्रामीण भागातील खासगी डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांचीही चाचणी
ग्रामीण भागात पोलिसांमार्फत लसीकरण मित्र उपक्रम
खाणी, वीज केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चाचणी व लसीकरण
शहारा सोबत ग्रामीण भागात कोरोना वाढत असल्याने घेतला निर्णय
ग्रामीण भागातील नागरिकांना शहराच्या व्यवस्थे वर निर्भर न राहता सुविधा त्याच भागात सुविधा मिळाव्या
या साठी पालकमंत्री नितीन राऊत यांनी ग्रामीण भागातील प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले निर्देश
-
लॉकडाऊनची भीती, नालासोपाऱ्यात दारुचा स्टॉक करण्यासाठी मद्यपींची वाईन शॉपवर गर्दी
मुख्यमंत्र्याचा लॉकडाऊनचा इशारा
लॉकडाऊनचा इशारा मिळताच शनिवारच्या रात्री नालासोपाऱ्यात दारुचा स्टॉक करण्यासाठी मद्यपींची वाईन शॉपवर गर्दी
अक्षरशः मद्यपींनी वाईन शॉपच्या दुकानासमोर मोठमोठ्या रांगा लावून दारु खरेदी केली आहे.
-
अंबरनाथमध्ये एक अवजड ट्रेलर दुभाजकावर चढून अपघात
अंबरनाथमध्ये एक अवजड ट्रेलर दुभाजकावर चढून अपघात
शनिवारी रात्री 10 च्या सुमारास डोंबिवली बदलापूर पाईपलाईन रोडवर पालेगाव जवळील अपघात
हा ट्रेलर अंबरनाथकडून डोंबिवलीच्या दिशेनं जात होता
पालेगावजवळील मिरची व्हिलेज ढाब्याजवळ हा ट्रेलर येताच अचानक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा ट्रेलर दुभाजकावर चढला
सुदैवानं या घटनेत चालकाला किंवा अन्य कुणालाही इजा झाली नाही
या ट्रेलरवर अवजड लोखंडी पाईप नेले जात होते
या घटनेनंतर हिललाईन पोलीस घटनास्थळी पोहोचले असून ट्रेलर बाजूला काढले
-
आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल कोरोना पॉझिटिव्ह
प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा गायक मुलगा गायक आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल कोरोना पॉझिटिव्ह
-
गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून गोळ्या झाडून उपसरपंचाची हत्या
गडचिरोली –
जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून गोळ्या झाडून उपसरपंचाची हत्या
रामा तलांडी नामक एटापल्ली तालुक्यातील बोरगी येथील उपसरपंचव आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नेते यांच्यावर नक्षलवाद्यांनी एका लग्न समारंभात येऊन गोळ्या झाडल्या
यात रामा तलांडी यांच्या जागीच मृत्यू झाला
एटापल्ली तालुक्यातील बोरगी येथील घटना
Published On - Apr 04,2021 7:27 PM