महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
शरद पवार राष्ट्रवादी नेत्यांची बैठक
राज्याच्या हिताचा विचार करून भूमिका घ्या अशा सूचना केल्याची सूत्रांची माहिती.
अनिल देशमुख यांनी शरद पवार यांच्याकडे पक्ष पाठीशी न राहिल्यावरून नाराजी वेयक्त केली होती
अनिल देशमुख प्रकरणात राज्यातील एनसीपी पक्षाचे नेते देशमुख यांच्या पाठीशी खंबीर भूमिका माध्यमात मांडण्यात कमी पडले यावरून पवारांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली- सूत्रली.
सर्वोच्य न्यायालयाचेया आदेशानंतर सीबीआय चौकशीस देशमुख यांनी जावे. पक्ष पाठीशी राहील कायम असे पवरांनी या बैठकीत सांगितले- सूत्र
मुंबई : सीबीआय अधिकाऱ्यांनी 15 लाखांची लाच घेणाऱ्या दोन आयकर निरीक्षकांना केली अटक
मुंबईमधील बेलार्ड पियर ईन्कम टॅक्स तपास युनिट – 1 मध्ये कार्यरत होते हे दोन्ही आयकर निरीक्षक
तक्रारदाराला चौकशीमध्ये मदत करण्याच्या नावाखाली मागितले होते 15 लाख रुपये
10 लाख आधी आणि 5 लाख नंतर अशा स्वरूपात लाचेची रक्कम स्वीकारताना केली अटक
दोन्ही आरोपींच्या मुंबई आणि दिल्ली घर आणि कार्यालयात सीबीआयने घेतली झाड़ाझाड़ती
आरोपींच्या घर आणि कार्यालयातून तपासादरम्यान 7 लाख रुपये रोख आणि संशयास्पद कागदपत्रे आढळले
पुढील तपास सीबीआई मार्फत शुरू आहे
मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्यांची सिल्व्हर ओकवर तब्बल अडीच तास बैठक चालली आहे.
ही बैठक संपल्यानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड बाहेर पडले आहेत
ते काहीही बोलले नाहीत, चेहऱ्यावर हात धरून ते बाहेर पडले
तब्बल अडीच तासांनी राष्ट्रवादीचे सगळे मंत्री आणि प्रमुख नेते सिल्व्हर ओकमधून बाहेर पडले आहेत.
पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक
भाजपचे उमेदवार समाधान आवताडेंच्या प्रचारासाठी आठवले पंढरपुरात
केंद्रीय मंत्री रामदास आठवले शनिवारी सकाळी 10 वाजता पंढरपुरात सभा घेणार
ठाणे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना ठाणे लाच लुचपत विभाने 5 लाख रुपयांची साच स्वीकारताना अटक केल्यानंतर आज मुरुडकर यांना ठाणे विशेष सत्र न्यायालयाने 11 एप्रिल 2021 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 15 लाख रुपयांची मागणी मुरुडकर यांनी केली होती . एका खाजगी कंपनीला 30 व्हेंटलीटर पुरवण्याकरीता निविदा मंजूर करून देतो असे सांगून पैशांची मागणी केली होती. तर दुसरीकडे मुरुडकर आणि सचिन वाझे यांच्यात काहीही फरक नाही अशा लोकांचे मोठे रॅकेट असून या रॅकेटचा परदा फास करणे गरजेचे आहे अशांवर कडक कारवाई करण्यात यावी असे म्हणत भाजप पदाधिकारी महेश मोरे यांनी मरुडकर यांच्यावर टीका केली आहे.
जालना : घनसावंगी शहरातील हॉटेल व्यावसायिकाला गुंडाची बेदम मारहाण
शितपेय दिलं नाही म्हणून केली बेदम मारहाण
गळ्यात गॅस पाईप टाकून केला गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न
या मारहाण प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल
मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
देवराम मेहता या व्यापाऱ्याला केली मारहाण
जयश्री पाटील यांना अटक करा, मराठा क्रांती मोर्चाची मागणी
– जयश्री पाटील यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या तक्रारीनंतर सुद्धा त्यांनी मराठा समाजाविषयी गरळ ओकने सुरू ठेवल्याचा मराठा क्रांती मोर्चाचा आरोप
– वेळीच अटक करा अशी मागणी अशी मराठा क्रांती मोर्चाची मागणी
वारंवार प्रसारमाध्यमांमध्ये मराठा समाजाविषयी जयश्री पाटील अपशब्द वापरत असल्याचा आरोप
– हीच बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून पोलिसांना स्मरण पत्र देण्यात आलंय
चंद्रपूर : अचानक वातावरण बदलाने नागरिक सुखावले
शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी
असह्य उकाड्याने त्रस्त शहरवासीयांना दिलासा
चंद्रपूरचे यंदाचे आतापर्यंतचे उच्चांकी तापमान 43.8 deg cel
वाढते तापमान आणि मिनीलॉकडाऊनमुळे हतबल झाले होते नागरिक
जोरदार पावसामुळे वातावरण झाले अल्हाददायक
इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले आहे. याविषयीची अधिकृत घोषणा बकिंघम पॅलेसने केली आहे. प्रिन्स फिलीप आणि राणी एलिझाबेथ यांचे 1947 मध्ये लग्न झाले होते. या दाम्पत्याला चार आपत्यं असून आठ नातवंड आहेत. मिळालेल्या माहितीनुसार प्रिन्स फिलीप यांचे विंडसर कॅसल (Windsor Castle) येथे आज सकाळी निधन झाले.
धुळे : शिरपूर तालुक्यातील बोराडी गावात शेतात लागली आग
गोठ्यालाही लागली आग
मालकाने गाय आणि वासराची केली सुटका
मात्र आगीत बैलांचा होरपळून मृत्यू
आग लागण्याचं नेमकं कारण अस्पष्ट
बोराडी गावातील शेतकरी प्रमोद निकम यांचे होते शेत
बैलांचा मृत्यू झाल्याने शेतकरी ढसा ढसा रडला
सांगली : जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यासह एक महिला लेखाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह
जिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे भीतीचे वातावरण
मुंबई : निलंबित एपीआय सचिन वाझेंची रवानगी तळोजा कारागृहात
14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सूनावल्यानंतर तळोजा कारागृहात
वाझेंना घेऊन NIA टीम तळोजा कारागृहाच्या दिशेने
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच मुद्द्यावरुन भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री स्वत:च्या कुटुंबाला सांभाळू शकत नाही, ते महाराष्ट्राला काय सांभाळणार? अशा बोचऱ्या शब्दात राणेंनी टीका केली. राज्याची कोरोना परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार कमी पडलं, असाही टोला राणे यांनी लगावला.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले?
राज्यात डॉक्टर, नर्स, वॉर्जबॉय कमी आहेत. याबद्दल राज्य सरकार केंद्राला टारगेट करत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. पण उपाययोजना करायला महाराष्ट्र कमी पडत आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णांची आणि मृत्यूंची संख्या जी वाढतेय त्याचं गांभीर्य राज्य सरकारला नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे केंद्राकडे बोट दाखवत आहेत. याशिवाय त्यांनी बाकी जे कारणं सांगितले आहेत, डॉक्टर नर्सेस नाहीत, पण ही कुणाची जबाबदारी आहे? जसी माझे कुटुंब माझी जबाबदारी, महाराष्ट्र जर तुमचं कुटुंब असेल तर या सगळ्या गोष्टी उपलब्ध करणं, रुग्णांवर योग्यरित्या उपचार करणं, त्यांना ठणठणीत करणं ही तुमची जबाबदारी नाही का? पिंजऱ्यात का जाऊन बसताय? मातोश्रीच्या बाहेर पडत नाही. कोरोना होईल कसा? जो व्यक्ती कुटुंबाला सांभाळू शकत नाही. तो व्यक्ती महाराष्ट्राला कसं सांभाळणार? कोरोना हाताळायला हे सरकार कमी पडलं आहे. केंद्राकडे का बोट दाखवता.
सचिन वाझेला मुंबईतून फक्त 100 कोटी जमा करायला सांगितले. हे आदेश फक्त अनिल देशमुखांचे नाहीत. राज्यातील सर्व मोठ्या नेत्यांचे हे आदेश आहेत. मग तुम्ही हे जमा केलेले पैसे लसीसाठी का नाही वापरत? ते पैसे कुठे जातात? कुणाकडे जातात? सांगाना कुणीतरी.
राज्यात कोरोना रुग्णांंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रश्नावर भाजप नेते नारायण राणे हे पत्रकार परिषदेत संवाद साधत आहेत. ते राज्य सरकारवर घणाघाती टीका करत आहेत. जो व्यक्ती कुटुंबाला सांभाळू शकत नाही, तो राज्याला काय सांभाळणार. राज्य सरकार कोरोनाला हाताळायला सपशेल फेल ठरलं आहे. हे सरकार कमी पडलं आहे. सरकार केंद्राकडे बोट का दाखवत आहे, असा सवाल राणे यांनी विचारला.
एपीआयला सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये जमा करायला लावले. हे आदेश फक्त अनिल देशमुख यांचे नाहीयेत. हे जमा केलेले पैसै लसीसाठी का वापरत नाहीयेत. हे पैसै कोणाकडे जात आहेत. ते पैसै कोरोनासाठी वापरा की, असा सल्लासुद्धा नारायण राणे यांनी सरकारला दिला. तसेच बेड नाहीयेत, व्हेंडिलेटर नाहियेत, वॉर्ड बॉय नाहियेत याना रिक्रुट कोण करणार. रत्नागिरीमध्ये आरोग्य विभागाला 357 पदं पाहिजेत सध्या फक्त 111 पदं भरली आहेत. सिंधुदर्गमध्ये 316 पदं रिक्त आहेत. ही पदं का भरली नाहीयेत. वर्षभरात 54 हजार रुग्ण दगावले. या सर्व मृत्यूला मुख्यमंत्री जबाबदार आहेत, अशी घणाघाती टीका राणे यांनी राज्य सरकारवर केली.
माझ्या रुग्णालायात एकही जागा रिक्त नाहीये. एवढे पैसे आले यामध्ये एखादं रुग्णालय बांधलं का, एवढं मोठं कलेक्शन असताना एकही अशी सुविधा का केली नाही, असा सवाल राणे यांनी लावला. राज्य सरकर केंद्र सरकारकडे का बोट दाखवत आहे. केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार आपलं अपयश झाकण्याच प्रयत्न करत आहे. एकही मंत्री आपलं काम पूर्ण करत नाहीये. काम न करता कंत्राटदारांना पैसे दिले जात आहेत, असा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला. दीड दोन वर्षे जी बचत केली आहे, ती काढा आणि ती बेड, लसीकरण यासाठी वापरा, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
पुणे
पुण्यातील अनेक लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचा साठा संपलाय,
– लस उपलब्ध नसल्यामुळे शहरातील अनेक लसीकरण केंद्र बंद,
– सकाळपर्यंत लसीकरण सुरु होते, आता लसीकरण बंद करण्यात आलेत,
– लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांना घरी परतावे लागतंय,
– लस उपलब्ध झाल्यावर लसीकरण केंद्र सुरू करणार
कोरोना संकटामुळे एमपीएससीची परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्याच आल्याची माहिती समोर आली आहे. येत्या 11 एप्रिल पासून ही परीक्षा सुरु होणार होती. दरम्यान, आमदार रोहित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी देखील तशी मागणी केली होती.
हिंगोली-
प्रेमीयुगलाची एकाच दोरीने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
कळमनुरी तालुक्यातील गुंडलवाडी येथील घटना
सरवस्ती कऱ्हाळे व अजय डुकरे अस प्रेमीयुगुलाच नाव
घटनास्थळी पोलीस दाखल..
शरद पवार यांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया 12 एप्रिल रोजी होणार आहे
त्यासाठी शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात 11 एप्रिल रोजी ऍडमिट होणार आहे
याआधी त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करून पित्ताशयातील खडा काढण्यात आला होता
ठाणे
ठाण्यातील घोडबंदर रोड कासारवडवली येथील अशोक स्मृती या इमारतीच्या खालील भागात आग लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
आगीवर ताबडतोब नियंत्रण
अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली आहे
या इमारती मध्ये 20 जण अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती
त्यांना बाहेर काढण्यात यश आले आहे
कोणतीही जीवित आणि वित्त हानी झाली नाही
जळगाव –
अंमळनेर तालुक्यातील टाकरखेड रेल्वे स्थानकाजवळ अपघात
अहमदाबादवरुन कोलकत्ता जाणाऱ्या हावडा एक्सप्रेस ला अपघात
रेल्वे क्रॉसिंग वर डंपर आणि एक्सप्रेस मध्ये टक्कर
या अपघातात 2 ते 3 नागरिक जखमी
सेंट्रल रेल्वेचा महत्वाचा निर्णय,
एलटीटी, कल्याण, ठाणे, दादर, सीएसएमटी या ठिकाणी प्लमटफार्म तिकीट्स तातडीने बंद करण्याचा निर्णय, सेंट्रल रेल्वे पीआरओ शिवाजी सुतार यांची माहीती…
मंगळवेढा –
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची थोड्याच वेळात जाहीर सभा
पंढरपूर-मंगळवेढा राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा
मंगकवेढा तालुक्यातील हुलजंती येथे होणार जाहीर सभा
औरंगाबाद –
कब्रस्तानमध्ये एक 25 वर्षीय तरुणाची भोसकून निर्घृण हत्या
रक्त बंबाळ अवस्थेत आढळला कब्रस्तान मध्ये मृतदेह
औरंगाबाद मनपा मुख्यालयला खेटून घडली घटना
मृतदेहाची ओळख आद्यप पटलेली नाही
बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली
रात्रीची संचार बंदी मध्ये घडली हत्या
पोलीस व विविध पथके घटनस्थळी दाखल
मुंबई एनसीबी तर्फे काल ड्रग्स प्रकरर्णी मुंबईमध्ये 4 ठिकाणी छापेमारी
लोखंडवाला, ठाणे, वसई,ओशिवारामध्ये करण्यात आली छापेमारी
यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले असून 4 ड्रग्स पेडलरला घेतलं ताब्यात
मोठ्या हाई प्रोफाइल ड्रग्स पेडलरचा यात आहे समावेश
यांच्या कडून कमर्शियल ड्रग्स जप्त करण्यात आली आहे
नाशिक –
अतिरिक्त शुल्का बाबत तक्रार आल्यास शाळांवर थेट कारवाई
शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी काढले आदेश
शैक्षणिक वर्षात शुल्क ठरवताना पालकांना विश्वासात घेण्याचे आदेश
कोरोना मुळे पालकांची आर्थिक स्थिती नाजूक, शाळांनी अतिरिक्त भार देउ नये
स्नेह संमेलन, वाचनालय, प्रयोगशाळा,अल्पोपहार, बस अशा सुविधांचे पैसे यंदा माफ करण्याची पालकांकडून मागणी
नाशिक –
नियुक्ती दिल्यानंतर देखील हजर न झालेल्या 346 कर्मचाऱ्यांना मनपाची नोटीस
आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत आयुक्त कैलास जाधव यांनी बजावली नोटीस
बेड वाढवले, कोव्हिडं सेंटर उभारले ,मात्र कर्मचारीच अनुपस्थिती असल्याने प्रशासन अडचणीत
शहरातील खाजगी आणि सरकारी रुग्णालय देखील फुल्ल
शहरातील खाजही डॉक्टरांना मदतीला घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न
नाशिक – महापालिकेची आजची महासभा ठरणार वादळी
वाढत्या कोरोना रुग्णासंख्येच्या पार्शवभूमीवर महासभेला महत्व
सेना भाजपात खडाजंगी होण्याची शक्यता
लसीचा तुटवडा, रेमडिसिव्हर साठी होणारी गर्दी , बेड ची कमतरता यावरून सत्ताधार्यांना सेना घेरण्याच्या तयारीत
अमरावती :
अमरावती जिल्ह्यातील संत्राबागेतील आंबिया बहराची फळे अतिउष्णतेमुळे गळत आहे
१५ दिवसांपूर्वी तालुक्यात अवकाळी पाऊस झाला होता
त्यामुळे उष्णतामान कमी होऊन हवेत गारवा निर्माण झाला होता
पण, आता एकाएकी उष्णतामान वाढल्याने हवामानातील या बदलातील परिणामामुळे संत्रा झाडावरील फळे गळत आहे
पुणे –
– शहरातील दुकाने उघडल्यास कारवाई करणार,
– महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश,
– महापालिकेकडून शहरातील अत्यावश्यक वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
– या आदेशाविरोधात शहरातील व्यापारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत आज आपली दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत उघडण्याचे जाहीर केले आहे,
– त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्यास राज्य शासनाच्या नियमांची अंमलबजावनी केली जाईल असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिलाय,
– तसेच शहरात घातलेल्या निर्बंधाची अधिक कडक अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेकडून पोलिसांना आणखी काही अधिकार दिले जाणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
– नागपुरात पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता
– नागपूर हवामान विभागाने वर्तवला पावसाचा अंदाज
– शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणं गरजेचं
– गेल्या काही दिवसांत विदर्भातील तापमान वाढल्याने लोक त्रस्त
– आजपासून हवेची दिशा बदलली, पावसाची शक्यता
औरंगाबाद –
सोमवारपासून औरंगाबाद शहरातील व्यापारी उघडणार दुकाने
व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा निर्णय
आज मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष
निर्णय सकारात्मक असो की नकारात्मक दुकाने उघडण्याचा निर्णय
मात्र दुकाने उघडल्यानंतर कोरोना वाढणार नाही याची घेणार खबरदारी
पुणे –
– लक्ष्मी रोडवर सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल,
– जमावबंदी आदेशाचा उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अॅड. फत्तेचंद रांका यांच्यासह ५८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल,
– आपत्ती व्यवस्थापन व साथ रोग अधिनियमानुसार विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे,
– अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचा सरकारच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी लक्ष्मी रोडवर गुरुवारी सकाळी साडेदहा ते सव्वा बाराच्या दरम्यान आंदोलन केले,
– याप्रकरणी पोलिसांच्या वतीने पोलीस हवालदार गणेश तुर्के यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
नागपूर –
– गॅंगस्टर रणजीत सफेलकर आणि त्याच्या टोळीवर मकोका
– अनेक गुन्ह्यांमुळे नागपूर शहर पोलसांनी लावला मकोका
– सफेलकर टोळीतील डझनभर गुंडांचा पोलीसांकडून शोध सुरु
– निमगडे आणि श्रीवास हत्याकांडानंतर पोलीसांची मोठी कारवाई
– नागपुरात पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता
– नागपूर हवामान विभागाने वर्तवला पावसाचा अंदाज
– शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणं गरजेचं
– गेल्या काही दिवसांत विदर्भातील तापमान वाढल्याने लोक त्रस्त
– आजपासून हवेची दिशा बदलली, पावसाची शक्यता
सचिन सावंत –
जोपर्यंत फडणवीस सांगत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राला लशींचा पुरवठा नीटपणे केला जाणार नाही
भाजपाच्या सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राला केंद्राकडून वेठीस धरले जात आहे
मोदी शाह भेटीत हेच ठरले
मविआ सरकारला बदनाम करण्याच्या नादात महाराष्ट्र बदनाम होत आहे
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आकडेवारी दर्शवून केंद्र सरकारची महाराष्ट्राबद्दल अन्यायकारक आणि भाजपाशासित राज्यांना झुकते माप उघड पाडले आहे
अशास्थितीत महाराष्ट्राकरिता लढण्याऐवजी फडणवीस व जावडेकरांसारखे भाजपा नेते महाराष्ट्र द्रोहच करत आहेत
ठाणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना 5 लाखांची लाच घेताना अटक,
मुरुडकर एकटे नाहीत, यांची मोठी टोळी,
हे प्रकरण सचिन वाझेंसारखं हफ्ता वसुलीचं
भाजपच्या महेश मोरेंचा गंभीर आरोप
मुंबई क्राईम ब्रँच युनिट दहाच्या टीमचा जोगेश्वरी परिसरात रेमेडेसीव्हीर कोरोना इंजेक्शनच्या ब्लॅक मार्केटिंग टोळीवर छापा
एका आरोपीला अटक, आरोपीकड़ून रेमेडेसीव्हीरटे 12 इंजेक्शन जप्त
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या माहिती प्रमाणे मुंबईत अजूनही बऱ्याच ठिकाणी छापे सुरु,
आणखी काही रेमेडेसीव्हीर इंजेक्शन जप्त केल्याची माहिती
या कारवाईत एफडीएची टीमही मुंबई गुन्हे शाखेसोबत