LIVE | NIA चे आयजी अनिल शुक्ला यांची बदली

| Updated on: Apr 12, 2021 | 11:54 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | NIA चे आयजी अनिल शुक्ला यांची बदली
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Apr 2021 10:15 PM (IST)

    एनआयएचे प्रमुख शुक्लांच्या तडकाफडकी बदलीच कारण काय? हसन मुश्रीफ यांचा सवाल

    कोल्हापूर :

    एनआयएचे प्रमुख शुक्लांच्या तडकाफडकी बदलीच कारण काय? या बदलीची चौकशी झाली पाहिजे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी

    शुक्ला यांनी परमबीर सिंग यांना मुख्य आरोपी केलं हे केंद्राला मान्य नसावं, परमवीर सिंग माफीचे साक्षीदार होऊ इच्छित आहेत याची आज खात्री झाली, असं मुश्रीफ म्हणाले.

    शुक्लांच्या बदलीवर मुश्रीफ यांनी व्यक्त केला संशय

  • 12 Apr 2021 10:07 PM (IST)

    इचलकरंजीत हॉटेलवर पोलिसांचा छापा

    इचलकरंजी शहरातील kabson’s हॉटेल वर टाकला पोलिसांनी छापा, राजरोसपणे सुरू होते हॉटेल, पोलिसांनी मालकासह 20 जणांना घेतलं ताब्यात, या घटनेमुळे शहरात खळबळ, शिवाजी नगर पोलीस आणि डीवायएसपी बी बी महामुनी यांच्या संयुक्त पथकाची कारवाई, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

  • 12 Apr 2021 08:29 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यातील मनोरा शहरात अवकाळी पावसाला सुरुवात

    वाशिम जिल्ह्यातील मनोरा शहरात अवकाळी पावसाला सुरुवात

  • 12 Apr 2021 08:19 PM (IST)

    इचलकरंजी शहरात भर वस्तीतील घराला भीषण आग

    इचलकरंजी शहरातील भर वस्तीतील घराला लागली आग, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल, रिक्रिएशन हॉल जवळील घराला आग लागल्यामुळे मोठे नुकसान, आगीने रौद्ररूप धारण केले, अग्निशमन दलातील गाड्यांनी आग विझवण्यात लावले शर्तीचे प्रयत्न, आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना केले बाजूला, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी, पोलीस दाखल, भरवस्तीत आग लागल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण, आगीचे कारण अजून समजू शकले नाही

  • 12 Apr 2021 07:53 PM (IST)

    टीव्ही अभिनेता गौरव दीक्षित आणि त्याची परदेशी महिला मित्र यांच्याविरूद्ध एनसीबीची लुकआऊट नोटीस

    टीव्ही अभिनेता गौरव दीक्षित आणि त्याची परदेशी महिला मित्र यांच्याविरूद्ध एनसीबीने लुकआऊट नोटीस बजावली आहे. ड्रग्ज पुरवठा करण्याच्या आरोपाखाली एनसीबी दोघांचा शोध घेत आहे. काही दिवसांपूर्वी एनसीबीने त्यांच्या घरावर छापा टाकला होता, पण ते दोघेही पळून जाण्यात यशस्वी झाले. अभिनेता एजाज खान याच्या चौकशीदरम्यान गौरव दीक्षित आणि त्याचे परदेशी महिला मित्र यांचे नाव समोर आले होते.

  • 12 Apr 2021 07:33 PM (IST)

    पंढरपुरात फडणवीसांचं भाषण सुरु असताना जोरदार पावसाला सुरुवात

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पंढरपुरातील प्रचारसभा सुरु असताना जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी भाषण करताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. हे सरकार पोलिसांच्या भरवशावर खंडणी वसुल करणारे सरकार आहे. या महाराष्ट्रत कारखाने खड्यात घालायचे आणि विकत घ्यायचे काम कोण करतंय? असा सवाल करत फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. या सरकारचे शंभर अपराध भरलेत. या निवडणुकीत तुम्ही यांचा कार्यक्रम करा. मी राज्यात यांचा कार्यक्रम करतो, असा घणाघात फडणवीस यांनी केला.

  • 12 Apr 2021 06:54 PM (IST)

    पोलीस अधिकारी संजय पाटील यांची सीबीआयकडून दुसऱ्यांदा चौकशी

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रात उल्लेख असलेल्या एसीपी संजय पाटील यांची सीबीआयकडून दुसऱ्यांदा चौकशी करण्यात येत आहे.

  • 12 Apr 2021 06:05 PM (IST)

    अनिल देशमुख यांना सीबीआयचं समन्स, 14 एप्रिलला चौकशी

    अनिल देशमुख यांना सीबीआयनं समन्स पाठवलं आहे. सीबीआयकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 14 एप्रिलला चौकशी करण्यात येणार आहे.

  • 12 Apr 2021 05:59 PM (IST)

    रियाझ काझी यांची अटक झाल्यानंतर मेडिकल तपासणी

    सचिन वाझे यांचे सहकारी रियाझ काझी यांना अटक झाल्यानंतर त्यांची मेडिकल तपासणी करण्यात आली.  थोड्या वेळा पूर्वी NIA कार्यलयात डॉक्टर आले होते. रियाझ काझीची तापसणी करण्यात आली.  काझीची तब्येत मात्र नॉर्मल आहे

  • 12 Apr 2021 05:55 PM (IST)

    पुणे शहरात जोरदार पावसाला सुरुवात, डेक्कन ,शिवजीनगर, पुणे स्टेशन परिसरात पावसाची हजेरी

    पुणे शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. डेक्कन ,शिवजीनगर, पुणे स्टेशन परिसरात पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली.

  • 12 Apr 2021 03:41 PM (IST)

    दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करा, अन्यथा आंदोलन करु, विद्यार्थ्यांचा इशारा

    पुणे : राज्य सरकारने दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याऐवजी रद्द कराव्यात किंना ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात. अन्यथा आंदोलन करु, असा इशारा पुण्यातील काही विद्यार्थ्यांनी दिला आहे.

  • 12 Apr 2021 02:55 PM (IST)

    दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

    राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.  दहावीच्या परीक्षा या जूनमध्ये तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

  • 12 Apr 2021 02:28 PM (IST)

    राज्य बोर्डाचे 10 वी आणि 12 वी परिक्षा वेळापत्रक नव्याने जाहीर होण्याची शक्यता – सूत्र

    राज्य बोर्डाचे 10 वी आणि 12 वी परिक्षा वेळापत्रक नव्याने जाहीर होणार?

    कोरोना रूगण संख्या वाढ पाहता तुर्तास परिक्षा पुढे ढकलावी असे मत बैठकीत – सूत्र

    सीएम ठाकरे आणि वर्षा गायकवाड यांच्यात बैठकीत बोर्ड परिक्षा पुढे ढकलावी, नवे परिक्षा वेळापत्रक जाहीर करावे असा सूर असल्याची माहिती – सूत्र

    सीएम आणि शालेय शिक्षण मंत्री याबाबत अधिकृत घोषणा लवकरच करणार असल्याची माहिती – सूत्र

  • 12 Apr 2021 02:01 PM (IST)

    शालेय शिक्षण विभागाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

    – शालेय शिक्षण विभागाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

    – शालेश शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड बी ४ बंगल्यातून वीसी द्वारे बैठकीला ऊपस्थित…

    – १० वी १२ चा परिक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी होत असल्याची सुत्रांची माहीती…

    – कांग्रेस एनसीपीने हा निरेणय केंद्राने घ्यावा अशा मागणी केलीये,

    – काहींनी ही परिक्षा पुढे ढकलावी ही मागणी केलीये…

    – कोवीड स्थिती लक्षात घेत याबाबत काही वेळात होणार महत्वाचा निर्णय

  • 12 Apr 2021 12:45 PM (IST)

    अमरावती शहरातील PDMC हॉस्पिटल जवळ धावत्या रुग्णवाहिकेने घेतला पेट

    अमरावती शहरातील PDMC हॉस्पिटल जवळ धावत्या रुग्णवाहिकेने घेतला पेट

    चालकाच्या सतर्कतेमुळे वाचला रुग्णांचा जीव

    शॉट सर्किटमुळे वाहनाला आग

    आगीत रुग्णवाहिकेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

    -वाहतूक पोलिस व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आग विझविण्यासाठी केली मदत

  • 12 Apr 2021 12:25 PM (IST)

    निवडणूक आयोगाने पंढरपूरची पोटनिवडणूक लावायला नको होती – बच्चू कडू

    सोलापूर –

    खरं तर निवडणूक आयोगाने पंढरपूरची पोटनिवडणूक लावायला नको होती

    राज्याच्या अखत्यारीतील या सर्व निवडणुका आणि पुढे ढकलल्या

    केंद्राने निवडणुका पुढे ढकलल्या असता तर आभाळ कोसळले नसते

    एकदा का निवडणुका जाहीर झाल्या की प्रत्येकाला अस्तित्व दाखवावं लागतं

    पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेत्यांच्या जाहीरसभेसाठी पंढरपुरात होणाऱ्या गर्दीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

  • 12 Apr 2021 12:15 PM (IST)

    पहिली फेज आपण यशस्वी हाताळली तेव्हा या सरकारच अभिनंदन सगळ्यांनी केलं हे विसरू नये – बाळासाहेब थोरात

    बाळासाहेब थोरात –

    आपण गेल्यावेळी दररोज 10 लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली

    बाहेरच्या राज्यातील मजुरांची व्यवस्था केली

    महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चांगलं काम झालं

    केंद्राने काय पॅकज दिल आम्हाला समजलं नाही

    पहिली फेज आपण यशस्वी हाताळली तेव्हा या सरकारच अभिनंदन सगळ्यांनी केलं हे विसरू नये

    आता दुसरी फेज आहे संसर्ग ज्यादा आहे सतर्क पणे सरकार परिस्थिती हाताळत आहोत

  • 12 Apr 2021 12:05 PM (IST)

    राज्यात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, ही वस्तूस्थिती – बाळासाहेब थोरात

    बाळासाहेब थोरात –

    राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर

    राज्यात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, ही वस्तूस्थिती

    आर्थिक पॅकेजबाबत अजित पवार निर्णय घेतील

    कोरोनाची साकळी तोडण्यासाठी लॉकडाऊन

    कठोर निर्णय घ्यावाच लागेल

    जनतेसाठी केंद्राने काय पॅकेज दिलं, थोरातांचा सवाल

    10वी, 12वीचा निर्णय येत्या दोन दिवसात

  • 12 Apr 2021 12:02 PM (IST)

    नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव

    मुंबई बॉम्ब स्फोटातील दोन दहशतवादी, एक नक्षलवादी आणि एका तुरूंग रक्षकासह 9 जणांना कोरोणाने विळखा घातला आहे

    नागपूर मध्यवर्ती कारागृहात आजच्या घडीला 2200 कैदी असून यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी सह मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी सुद्धा आहेत त्यामुळे पुन्हा एकदा कारागृहातील प्रशासनाला कोरोनाचा सामना करावा लागतोय

    विशेष म्हणजे तीन फाशीचे कैदी आणि मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी यांना देखील कोरोना झाला आहे

  • 12 Apr 2021 11:31 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरु

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया सुरु

    ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुर

    पित्ताशयात खडे झाल्याने दोन आठवड्यापूर्वी शस्रक्रिया करण्यात आली होती

    15 दिवसानंतर आज त्यांच्या पित्ताशयावर शस्रक्रिया सुरु

  • 12 Apr 2021 11:12 AM (IST)

    मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनंतर आता आर्थिक गुन्हे शाखेत होणार मोठे फेरबदल

    मुंबई पोलिसच्या गुन्हे शाखेनंतर आता आर्थिक गुन्हे शाखेत होणार मोठे फेरबदल…

    आर्थिक गुन्हे शाखेत ज्या कर्मचारी आणि अधिकारी यांचा चार वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असेल त्यांची बदली करण्यात येणार आहे …

    त्यामुळे अश्या कर्मचाऱ्यांना यापुढे नवीन तपास न देण्याचे निर्देश काढण्यात आले आहेत.

  • 12 Apr 2021 11:05 AM (IST)

    मंत्री नवाब मलिक यांनी बीकेसी कोवीड सेंटर इथे घेतली कोरोनाची लस

    मंत्री नवाब मलिक यांनी बीकेसी कोवीड सेंटर इथे घेतली कोरोनाची लस

  • 12 Apr 2021 10:33 AM (IST)

    बार्शीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त, शेकडो पोलीस उतरले रस्त्यावर

    सोलापूर –

    बार्शीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त

    शेकडो पोलीस उतरले रस्त्यावर

    लॉकडाऊन ला विरोध करण्यासाठी व्यापारी रस्त्यावर उतरण्याच्या शक्यतेने पोलीस बंदोबस्त तैनात

    जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 144 कलम जारी

  • 12 Apr 2021 10:16 AM (IST)

    संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका

    – महाराश्ट्राला बदनाम कऱण्याच कारस्थान मला दिसते – संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका – केंद्र ससरकार फेलीचर आहे कारण केंद्र सरकार – जे सांगते आहे तेच राज्य सरकार करत आहे – या तिन्ही राज्यात भाजपाचे सरकार नाही – केंद्र सरकारने असे आरोप करुन नाही – महाराष्ट्राने आणि मुख्यमंत्री काम चांगले आहे – मुंबई, पुण्यात आणि नागपूरमध्ये बरेच बाहेर राज्यातील लोक येतात – महाराष्ट्राला जे औषध पाहिजे ते मिळत नाही पण – गुजरातमध्ये भाजपा कार्यलयात औषध मिळतात – हे निषेध करण्याची गोष्ट आहे – महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी पण याचा निषेध केला पाहिजे – सभेत देवेंद्र फडवणीस काय हे वेगळे आहे – हे वेगळे प्रकऱण आहे त्यावर काय बोलयांच . – भाजपा आंदोलन जरुन करावं – त्यांचे ते कामच आहे – मुख्यमंत्र्यांना विरोधक काम करु देते नाही – रेमडेसवीर इंजकेशन महाराष्ट्रात मिळत नाही – 1 ते 2 दिवस रांगेत उभे राहवं लागते – पम गुजरातमध्ये भाजपाचे कार्यलयात इजेक्शन मिळतात – हे निषेध करण्यासारखे आहे यावर राजकार करु नाही

  • 12 Apr 2021 10:15 AM (IST)

    संजय राऊतांनी माध्यमांना दिली प्रतिक्रिया

    – कोरोनाची लढाई पंतप्रधानांच्या नेतृत्त्वात होत आहे – जिथे भाजपचे CM आहेत तिथून कोरोना पळाला का? – संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल – राज्याला बदनाम करण्याचं कारस्थान सुरू असल्याची राऊतांची टीका – केंद्रानं संवेदनशीलतेने वागलं पाहिजे – राऊत

  • 12 Apr 2021 09:59 AM (IST)

    सिंचनासाठी गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने 25 हाजार कोटी महाराष्ट्राला दिले – देवेंद्र फडणवीस

    देशामध्ये मोदीजींचे सरकार आल्यानंतर गरीबांना पिण्याचे पाणी मिळाले

    सिंचनासाठी गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने 25 हाजार कोटी महाराष्ट्राला दिले

    ऊस कारखानदारी फक्त मोदीजींमुळेच जिवंत आहे

  • 12 Apr 2021 09:58 AM (IST)

    दामाजीपंतच्या पाठिशी विठ्ठल उभा राहिलाय – देवेंद्र फडणवीस

    संघर्षशिल नेतुत्व आहे समाधान आवताडे

    आपल्याकडे ड्बल इंजिन झाले

    दामाजीपंतच्या पाठिशी विठ्ठल उभा राहिलाय

    समाधानच्या पाठीशी प्रशांत परिचारक

  • 12 Apr 2021 09:57 AM (IST)

    सावकारीपेक्षा जास्त सावकारी या सरकारमध्ये पहायला मिळाली – देवेंद्र फडणवीस

    आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक राज्याने सामन्य माणसाला मदत केली, शेतकऱ्यांना मदत केली

    सावकारीपेक्षा जास्त सावकारी या सरकारमध्ये पहायला मिळाली

    विजेची वसुली ज्या कराप्रमाणे वसुल करण्यात आली, हे लबाड आहेत लबाड

    सभागुहात विरोध केला तेव्हा विज कनेक्शन कापायचं बंद केले

    कोरोनामुळे बिल्डरांना पाच हजार कोटींची सुट सरकारने दिली कारण त्यांना त्यांच्याकडून मालपाणी मिळाले

    लबाडाचा अवतान जेवल्या शिवाय खरे नाही

    या भागामध्ये ते एक पैसाही देणार नाही

    विठ्ठल सहकारी कारखान्याला मी पैसे दिलेत, त्याचा हिशोब अजुन लागत नाही, पैसे कुठे गेले अजुन समजले नाही

  • 12 Apr 2021 09:54 AM (IST)

    तीनही पक्षाचे एकच काम फावड्याला मास्क लावून खा – देवेंद्र फडणवीस

    गेल्या वर्षाभरा मध्ये सभा घेण्याची सवयच गेलीय

    दुर्दैवाने ही पोट निवडणूक लागली

    एका मतदारसंघचि पोट निवडणूक असलीतरी मतदाराना संधी मिळालीय सरकारचा नाकर्ते पणा दाखवण्याची

    महाविकास आघाडी सरकार नसुन महावसुलि सरकार अहे

    केवळ तीनहि पक्षाचे एकच काम फावड्याला मास्क लावून खा

    देशा मध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रअत

    सर्वाधिक मृत्यु महाराष्ट्रात

    लोकशाही नसून लौकशाही आहे

  • 12 Apr 2021 09:38 AM (IST)

    भाजपाचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस मंगळवेढ्यात

    पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुक – भाजपाचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे सभास्थानी दाखल, सोबत सोलापूर लोकसभा खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार प्रशांत परिचारक, खासदार रणजितसिंहजी नाईक निंबाळकर, माजी मंत्री सदाभाउ खोत, माजी मंत्री सुभाष देशमुख उपस्थित

  • 12 Apr 2021 09:08 AM (IST)

    कुर्ला, एलटीटी स्टेशनला लाॅकडाऊनच्या भीतीने गावी जाण्यासाठी परप्रांतिय मजूरांची एकच गर्दी

    – मुंबईच्या कुर्ला, एलटीटी स्टेशनला लाॅकडाऊनच्या भीतीने गावी जाण्यासाठी परप्रांतिय मजूरांची एकच गर्दी

    – गोदान आणि पवन एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी प्रवाश्यांची गर्दी, मात्र सोशल डिस्टोंसिंगचा पुर्णपणे फज्जा

    – पोलिसांकडून नागरीकांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याच्या वारंवार सूचना

    – मजूर वरिग विना तिकिटचं पोहोचले एलटीटी स्थानकात, कसंही करून गावी जायचंय या विचारात स्थानकावर हाजारोंच्या संख्येनं दाखल झाले मजूरांचे तांडे

    – लाॅकडाऊनमुळे काम बंद पडलेयत, काय खाणार, कसं जगणार या भीतीने मजूर वर्गाने धरली घराची वाट

  • 12 Apr 2021 09:02 AM (IST)

    मिक्स इंडस्ट्रियल हायड्रोकेमीकल ऑईलची चोरी, पोलिसांनी केला 43 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

    मिक्स इंडस्ट्रीयल हायड्रोकेमीकल ऑईलची चोरी

    पोलिसांनी केला 43 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

    ५ ट्रान्सपोर्टचे कंपनीचे मालकांना व एका चालकास पनवेल शहर पोलिसांनी केली अटक

    टॅन्कमधील ११,६०० रूपये किमतीचे अंदाजे २०० लीटर ऑईल चोरी

    ऑईल चोरी करुन लोखंडी पिंपामध्ये काढुन अपहार

    ऑईल टॅन्कचे वजन मॅनेज करण्याठी जेवढे ऑईल चोरी केले तेवढे पाणी मिक्स

  • 12 Apr 2021 08:29 AM (IST)

    औरंगाबादच्या आरोग्य विभागासाठी मेगा भरती

    औरंगाबादच्या आरोग्य विभागासाठी मेगा भरती

    कोरोनाच्या संकटात कमी पडणारी आरोग्य यंत्रणा पाहता ही भरती

    घाटी रुग्णालयासाठी डॉक्टर, नर्स तसेच अतिविशेष उपचार तज्ञांसह विविध पदांसाठी आज मुलाखत ..

    आरोग्य विभागाच्या 177 पदांसाठी होतेय मुलाखत..

    ही पदे तीन महिन्यासाठी भरण्यात येणार ..

    100 नर्स तसेच इतर 77 आरोग्य कर्मचाऱ्यांची होतेय भरती

  • 12 Apr 2021 08:01 AM (IST)

    नागपुरात विजेच्या धक्क्याने दोन महिला मजुरांचा मृत्यू

    – विजेच्या धक्क्याने दोन महिला मजुरांचा मृत्यू

    – नागपूर जिल्ह्यातील खलानगोंदी शिवारातील घटना

    – पिकांच्या संरक्षणासाठी शेतात तारांद्वारे सोडला होता वीजप्रवाह

    – कमलाबाई कुमरे, सुशीला दहीवाडे यांचा मृत्यू

    – जलालखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

    – महावितरणची शेतकरी नाना आणि चंद्रशेखर बेले वर कारवाई

  • 12 Apr 2021 07:12 AM (IST)

    बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगांव, जामोद परिसरात आज सकाळी अवकाळी पाऊस

    बुलडाणा

    जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगांव, जामोद परिसरात आज सकाळी अवकाळी पाऊस

    वादळी वाऱ्यासह झाला पाऊस

    कालपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण

    पावसामुळे वातावरणात गारवा पसरला

  • 12 Apr 2021 06:45 AM (IST)

    काश्मीरमध्ये 72 तासांत 12 दहशतवाद्यांचा खात्मा

    काश्मीरमध्ये 72 तासांत 12 दहशतवाद्यांचा खात्मा

    14 वर्षांच्या मुलाचाही समावेश; सुरक्षा दलाची कारवाई

    अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार मारण्यात आलेले दहशतवादी लष्कर-ए-ताेयबा आणि अल बदर या संघटनांचे सदस्य होते

  • 12 Apr 2021 06:37 AM (IST)

    नागपूर मेडिकल कॅालेजच्या निवासी डॅाक्टरांचं धरणे आंदोलन 

    – नागपूर मेडिकल कॅालेजच्या निवासी डॅाक्टरांचं धरणे आंदोलन

    – मेडिकलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर सुरु आहे उपचार

    – आरोग्य संत्रणेवर ताण आल्याने डॅाक्टर करतायत धरणे आंदोलन

    – मेडिकलचे ४० निवासी डॅाक्टर बसले धरण्यावर

    – डॅाक्टरांची अडचण प्रशासनाला कळावी म्हणून धरणे आंदोलन

  • 12 Apr 2021 06:29 AM (IST)

    इचलकरंजीत वडाच्या झाडावर वीज पडल्यामुळे झाडाने घेतला मोठा पेट

    इचलकरंजी

    वडगाव वटार येथील दत्त मंदिर जवळ असणाऱ्या वडाच्या झाडावर वीज पडल्यामुळे झाडाने घेतला मोठा पेट

    घटनास्थळी अग्निशामकची गाडी दाखल, आग विझवण्यात यश

Published On - Apr 12,2021 10:15 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.