LIVE | जळगावात रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
जळगावात रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट
जळगाव : रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट
तालुक्यातील आभोडा, मंगरूळ, लालमाती जुनोने परिसरात जोरदार गारपीट
केळी आणि गव्हाचे नुकसान
रावेरच्या तहसीलदार हुशार आणि देवगुणे यांनी पाहणी केली.
-
मुंबईत एनसीबीने ड्रग पेडलर्सला अटक, 9 लाखांची रोकडही जप्त
मुंबई एनसीबीने काल (20 एप्रिल) रात्री 2 ठिकाणी छापा टाकला
मुंबईतील अग्रिपाड़ा आणि मरोल भागात छापा टाकण्यात आला
या छाप्यात एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला असून 9 लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.
एनसीबीने 2 ड्रग पेडलर्सला अटक केली आहे
काल एका फरार आरोपीलासुद्धा एनसीबी अधिकाऱ्यांनी केली होती अटक
-
-
बारामतीत विक्रीसाठी आणलेल्या 20 तलवारी जप्त
पुणे : बारामतीत विक्रीसाठी आणलेल्या 20 तलवारी जप्त
– बारामती शहर पोलिसांनी केली कारवाई
– बांदलवाडी येथे पाठलाग करुन आरोपीला केली अटक
– नितीन मल्हारी खोमणे याने आणल्या होत्या तलवारी
– 20 तलवारी, एक छऱ्याची पिस्तुल पोलिसांनी केली जप्त
-
बुलेटवर असलेल्या प्रेमापोटी चक्क 9 बुलेट चोरल्या, नाशकातील धक्कादायक घटना
नाशिक –
बुलेटवर असलेल्या प्रेमापोटी एका इसमाने चोरल्या चक्क 9 बुलेट
चोरट्याला नाशिक पोलिसांनी नंदुरबार वरून घेतलं ताब्यात
शहरातील वेगवेगळ्या भागातून चोरल्या बुलेट
फ़क्त बुलेट वर असलेल्या प्रेमापोटी चोरले बुलेट
विक्की पाटील याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
रेकी करून विक्की पाटील बुलेट चोरत असल्याची पोलिसांनी दिली माहिती
-
जामखेड शहरात 50 ऑक्सिजन सिलेंडर पोलिसांकडून जप्त
अहमदनगर
जामखेड शहरात 50 ऑक्सिजन सिलेंडर पोलिसांकडून जप्त
खाजगी वेल्डिंग दुकाने, बर्फ फॅक्टरी या ठिकाणी छापे टाकून सिलेंडर घेतले ताब्यात
तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या पथकाने ३५ ठिकाणी टाकले छापे
यातील ९ ऑक्सिजन सिलिंडर ताबडतोब आरोळे हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी देण्यात आले
तर अनावश्यक खाजगी कामासाठी ऑक्सिजन सिलिंडर वापरणाऱ्यांना नोटीस बजावल्या
-
-
सांगलीत बायोमेडिकल कचरा घंटागाडीत टाकल्याबद्दल रुग्णालयाला एक लाखाचा दंड
सांगली- रुग्णालयातील बायोमेडिकल कचरा सांगली मनपाच्या घंटागाडीत टाकल्याबद्दल दुधनकर हॉस्पिटलला 1 लाखाचा दंड
-
शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात, रात्री छोटी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती
शरद पवार काल रात्री पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात
छोट्या शास्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती
रात्रीच शस्त्रक्रिया झाल्याची माहिती
-
नाशिकमध्ये 11 वाजता दुकानं बंद करायला सुरुवात
नाशिक – 11 वाजता दुकान बंद करायला सुरुवात
महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर
दुकान बंद करण्याच्या सूचना दिल्यानंतर अनेक शटर खाली यायला सुरुवात
पहिल्या दिवशी गोंधळाची परिस्थिती
-
सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरण : मुख्य संशयित साहिल फ्लाकोची पत्नी आणि आईची NCB चौकशी
सुशांत सिंग ड्रग्स प्रकरणातील मुख्य संशयित साहिल फ्लाकोची पत्नी आणि त्याची आई दोघांची आज एनसीबी चौकशी करणार
सम्मन पाठवून आज दुपारी चौकशीसाठी बोलावले आहे
सुशांत सिंह ड्रग प्रकरणात संशयित आहे साहिल
अनेक महिन्या पासून एनसीबीच्या रडारवर आहे फ्लाको मात्र अजूनही सापडलेला नाही
-
भाजप नेते प्रसाद लाडांकडून अशोक चव्हाणांचे आभार
भाजप नेते प्रसाद लाड यांनी अशोक चव्हाणांचे मानले आभार… – अशोक चव्हाण यांनी रेमडेसिव्हीर संदर्भात सीबीआय चौकशी व्हावी अशा मागणीचं पत्र गृहमंत्री अमित शाहांना लिहिलं आहे.
गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अशोक चव्हाणांचा मागणीचा पुनरुच्चार करणारं पत्र देणार… राज्य सरकार मनपाच्या भ्रष्टाचाराचीही चौकशी सीबीआयमार्फत करण्याची चौकशी करणार
-
बुलडाण्यात लग्नसमारंभाची परवानगी न घेता पार पडला लग्न समारंभ, वरासह वधू पित्यावर गुन्हा दाखल
बुलडाणा लग्नसमारंभाची परवानगी न घेता पार पडला लग्न समारंभ
चिखली तालुक्यातील धोत्रा नाईक येथील दोन वधू पित्यांवर गुन्हा दाखल
अमडापूर पोलिसांची कारवाई,
लग्नासाठी तहसीलदार यांची 25 लोकांची परवानगी आवश्यक
मात्र विना परवानगी आयोजित केला होता लग्न सोहळा ..
-
बुलडाण्यात आदिवासी नागरिकांना वर्षभरापासून खावटीचा लाभच नाही
बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी भागातील नागरिकांना वर्षभरापासून खावटीचा लाभच मिळाला नाही,
आदिवासी मंत्र्यांनी 2020 मध्ये केली होती मदतीची घोषणा,
कोरोनाची दुसरी लाट आली असताना खावटी मिळाली नाही,
आदिवासी कुटुंबाला मिळणार होते 4 हजार रुपये खवटी,
-
पिंपरी-चिंचवडमध्ये पूर्व वैमनस्यातून 23 वर्षीय तरुणावर टोळक्याचा हल्ला
पिंपरी-चिंचवड –
– पूर्व वैमनस्यातून 23 वर्षीय तरुणावर टोळक्याचा हल्ला
– पिंपरी चिंचवड शहरातील ओटास्किम निगडी भागातील घटना
– शक्तिमान प्रकाश कांबळे असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव
– गुडघी सन्या, अविनाश घोंगडे, प्रसाद बहुले, संतोष वाल्मिकी, दुर्गेश भिलारे, साहिल शेख, योगेश उर्फ किडक्या राजभोग यांनी केला हल्ला
– तलवार काठी ने केला हल्ला, सिमेंटचा ब्लॉक ही टाकला
– हल्ल्याची घटना जवळ असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद
-
नाशकात चक्कर येऊन पुन्हा 11 जणांचा मृत्यू
नाशिक –
चक्कर येऊन पुन्हा 11 जणांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारे चक्कर येऊन मृत्यू होत असल्याने भीतीचं वातावरण
मागच्या आठवड्यात देखील अशा प्रकारे चक्कर येऊन काही जणांचा झाला होता मृत्यू
वाढत्या कोरोनाच्या संकटाला तोंड देत असताना नव संकट
-
मुंबईत यांत्रिकी झाडुने 28 किलोमीटर रस्त्यांची दररोज होणार सफाई
मुंबई
यांत्रिकी झाडुने 28 किलोमीटर रस्त्यांची दररोज होणार सफाई
मुंबईतील रस्त्यांची होणार सफाई
पाच यांत्रिक झाडु खरेदी करण्यात आल्या
मात्र या झाडुंच्या देखभालीसाठी वर्षभराचा खर्च 1 कोटी 45 लाख एवढे
-
पिंपरी-चिंचवडमध्ये मौजमजेसाठी दुचाक्या चोरणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा दरोडा पथकाने ठोकल्या बेड्या
पिंपरी-चिंचवड
– पिंपरी-चिंचवडमध्ये मौजमजेसाठी दुचाक्या चोरणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा दरोडा पथकाने ठोकल्या बेड्या
– त्यांच्याकडून तब्बल 33 लाख रुपयांच्या 35 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या असून त्या विकून मिळालेल्या पैशांमध्ये मौज मजा करत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न
– संकेत आनंदा धुमाळ, श्रीकांत बाबाजी पटाडे आणि सुनिल आबाजी सुक्रे अशी अटक केलेल्या वाहन चोरांची नावे
-
राज्यात पुढील काही दिवस उकाड्याचे, कमाल तापमानात दोन ते तीन अंशानी वाढ होण्याची शक्यता
राज्यात पुढील काही दिवस उकाड्याचे
तीन ते चार दिवसात कमाल तापमानात दोन ते तीन अंशानी वाढ होण्याची शक्यता
हवामान विभागाचा अंदाज
त्यामुळे राज्यात उकाडा वाढण्याची शक्यता आहे
सध्या राज्यात सोलापूर, नांदेड, बारामती, परभणी, जालना, या ठिकाणाचे कमाल तापमान 40 अंशाच्यावर आहे
-
राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री जितेंद्र आव्हाड यांची पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका
राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री जितेंद्र आव्हाड यांची पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका
लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असावा असं मोदीजी सांगताहेत
तुम्ही अचानक देशात लॉकडाऊन जाहीर केला होतात
महाराष्ट्राला किती पाण्यात बघणार?
महाराष्ट्रातील परिस्थितीत लॉकडाऊनचा निर्णय घेतला तो योग्य
आपण लॉकडाऊन घोषित केला त्यांच्या महाराष्ट्रात लॉकडाऊन होता
-
मुंबईत नवी 61 लसीकरण केंद्रे, 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी पलिकेचे नियोजन
मुंबई –
मुंबईत नवी 61 लसीकरण केंद्रे
18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी पलिकेचे नियोजन
तिन्ही रेल्वे लाइनवर स्टेशन परिसरात केंद्रें उभारणार
अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची माहिती
Published On - Apr 21,2021 7:00 PM