LIVE | सांगलीमध्ये कुपवाडमध्ये दारूच्या दुकानातून बेकायदेशीर दारूची विक्री
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी (Maharashtra Breaking News Live Updates)
LIVE NEWS & UPDATES
-
सांगलीमध्ये कुपवाडमध्ये दारूच्या दुकानातून बेकायदेशीर दारूची विक्री
सांगली : कुपवाडमध्ये दारूच्या दुकानातून बेकायदेशीर दारूची विक्री
ड्रोनद्वारे मिळवलेल्या फुटेजच्या माध्यमातून प्रकार उघड
पोलिसांकडून दोघांना 20 हजाराचा दंड
सपोनि नीरज उबाळे यांची धडक कारवाई
-
माथाडी आणि मापाडी कामगारांचा एक दिवसीय लाक्षणिक संप
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी आणि मापाडी कामगारांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करावे याकरिता एक दिवसीय संपाचा इशारा देण्यात आला आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी माथाडी भवनात बाजारातील प्रमुख घटकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मार्केट बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारला इशारा देण्यासाठी उद्या एक दिवसाचा संप पुकारला असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले. त्यामुळे बाजार आवारात कोणत्याही गाडीला प्रवेश आणि गाडीतील माल खाली करून दिला जाणार नाही. तरी सुद्धा अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केले नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा बैठकीत घेण्यात आला.
-
-
सचिन वाझे, रियाज काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
सचिन वाझे, रियाज काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
दोघांनाही 5 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी
सचिन वाझे यांनी वकिलामार्फत पेन, कागद आणि कार्बन पेपर मिळावा यासाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने तो फेटाळला आहे.
वैद्यकीय उपचारासंदर्भातली औषधी मिळावी यासाठी दुसरा अर्ज केला होता. मात्र प्रिस्कीप्शन नसल्याने सोबत प्रिस्कीप्शन जोडा असा युक्तिवाद NIA च्या वकिलांनी न्यायालयात केला आहे.
वाझेंनी दैनंदिन वापरात लागणारे साहित्य मिळावं यासाठीही अर्ज केला होता मात्र तोही न्यायालयाने फेटाळला आहे.
-
टिटवाळ्यात विजेच्या धक्क्यामुळे रेल्वेचे तीन कर्मचारी जखमी
ठाणे : टिटवाळा येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या बाजूला लूप लाईनवर ओव्हर हेड वायर विभागाचे काही कर्मचारी काम करीत असताना त्यांना विजेचा धक्का लागला आहे. यामध्ये एकूण तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. कामासाठी वापरण्यात आलेल्या शिडी अचानक सटकल्याने ही घटना आज दुपारी घडली आहे. जखमी कर्मचाऱ्यांची नावे महेंद्र शेलार, सचिन भट आणि श्रवणकुमार अशी आहेत.
-
मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या दिवशी फोन करणारा विनायक शिंदे नसून सुनिल मानेच
उद्योजक मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या दिवशी फोन करणारा विनायक शिंदे नसून सुनिल मानेच
सुनील माने यानेच फोन करून मनसुखला हत्येच्या दिवशी बोलावले होते.
सुनील माने मनसुखच्या हत्येवेळी घटनास्थळी दाखल असल्याची NIA कोर्टात दिली माहिती.
-
-
कळव्यातील महापालिकेच्या रुग्णालयाजवळ एसटी वर्कशॉपमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग
कळवा येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाजवळील एसटी वर्कशाॅपमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग
सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी नाही
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.
-
Virar Covid Hospital fire | मनसेकडून फायर ऑडिटसाठी तीन वेळा पत्रव्यवहार, अखिल चित्रे यांचे ट्विट
मनविसेने फायर ऑडिट साठी तीन वेळा पत्रव्यवहार करून, पूर्वसूचना देऊन सुद्धा प्रशासन झोपुन राहिले आणि आज दुर्दैवी घटना घडल्यावर हाथ सॅनेटाईज करून मोकळे झाले. व्यवस्थेच्या अनास्था,गलथान कारभार तसेच प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच ही घटना घडली आहे, मनसे नेते अखिल चित्रे यांचे ट्वीट
मनविसेने फायर ऑडिट साठी तीन वेळा पत्रव्यवहार करून,पूर्वसूचना देऊन सुद्धा प्रशासन झोपुन राहिले आणि आज दुर्दैवी घटना घडल्यावर हाथ सॅनेटाईज करून मोकळे झाले. @mnsadhikrut
व्यवस्थेच्या अनास्था,गलथान कारभार तसेच प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच ही घटना घडली आहे. #VirarHospitalfire pic.twitter.com/FLAIl0gbW5
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) April 23, 2021
-
Virar Covid Hospital fire | पती गेल्याची बातमी मिळताच पत्नीचा हार्ट अॅटकने मृत्यू
विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयातील आगीची धक्कादायक माहिती मिळताच आपला पती गेल्याचं समजताच रुग्णाच्या पत्नीचे देखील हृदयविकाराच्या झटक्याने ताबडतोब निधन झालं आहे.
चांदणी दोषी असलेल्या निधन पत्नीचे नाव आहे तर कुमार दोशी हे 45 वर्षीय रुग्णाचा या इस्पितळात लागलेल्या आगीत दुर्दैवी मृत्यू झाला होता.
हे दोषी कुटुंब वसईच्या १०० फूट रोड परिसरात राहत होते.
तर चाँदनी दोषी या विरारच्या जिवदानी हॉस्पिटल मधे करोनावर उपचार घेत होत्या रुग्णालयात ठेवल आहे.
-
Virar Hospital Fire | विरार रुग्णालय जळीत प्रकरण अत्यंत चिंतनीय, या चुका दुरुस्त करणे गरजेचे : सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर:– विरार रुग्णालय जळीत प्रकरण अत्यंत चिंतनीय असल्याची भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया, या रुग्णालयात फायर ऑडिट झाले होते का? यात काही मानवी चूक आहे का? याचा शोध लावत कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत, यापुढील काळात या चुका दुरुस्त करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन, महाराष्ट्रासारख्या क्रमांक एक च्या विकसित राज्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळणे गरजेचे असल्याचे मत, मृतांच्या प्रति संवेदना व्यक्त करतानाच या कठीण काळात आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवणे गरजेचे आहे : सुधीर मुनगंटीवार
-
मराठवाड्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे वाढली चिंता
औरंगाबाद –
मराठवाड्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे वाढली चिंता
हिंगोली, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर
काही जिल्ह्यात ऑक्सिजन संपण्याची शक्यता
तर काही जिल्ह्यात एक दिवस पुरेल एव्हडाच ऑक्सिजन उपलब्ध
प्राणवायू उपलब्ध करण्यासाठी सरकारी यंत्रणांना करावी लागतेय कसरत
अपुऱ्या पडणाऱ्या सुविधांमुळे आरोग्य यंत्रणांचा ताण वाढला
-
Virar Covid Hospital fire | सरकारने केवळ निर्बंध करण्याऐवजी रुग्णालयांवर लक्ष केंद्रित करावे : संजय निरुपम
विरार के एक अस्पताल के आग लग गई और 13 लोगों की जान चली गई। ईश्वर मृतकों की आत्मा को शांति दें।उनके परिजनों के प्रति शोक संवेदना। महाराष्ट्र के अस्पतालों में इन दिनों रोज़ आग लग रही है। सरकार सिर्फ़ पाबंदियों पर बयान देने की बजाय जरा अस्पतालों पर ध्यान दे।#COVIDSecondWaveInIndia
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) April 23, 2021
-
Virar Hospital fire | सुप्रिया सुळे यांच्याकडून मृतांना श्रद्धांजली
विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आग लागून काही रुग्ण दगावले.ही घटना अतिशय हृदयद्रावक आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. यात दगावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
— Supriya Sule (@supriya_sule) April 23, 2021
-
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना परिस्थिती गंभीर, एका स्ट्रेचरवर दोन कोरोना रुग्णांना घेऊन जाण्याची वेळ
औरंगाबाद –
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना परिस्थिती गंभीर
एका स्ट्रेचरवर दोन कोरोना रुग्णांना घेऊन जाण्याची वेळ
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील कोविड वार्डातील प्रकार
ऑक्सिजन लावलेल्या दोन पेशंटला एकाच स्ट्रेचरवरून नेलं रुग्णालयात
स्ट्रेचर उपलब्ध नसल्यामुळे एकाच स्ट्रेचर वर न्यावे लागतायत दोन रुग्ण
-
औरंगाबादेत कोरोना रुग्णांना दिलासा देणारी बातमी, ऑक्सिजनचे तब्बल 500 बेड शिल्लक
औरंगाबाद –
औरंगाबादेत कोरोना रुग्णांना दिलासा देणारी बातमी
औरंगाबादेत ऑक्सिजनचे तब्बल 500 बेड शिल्लक
तर कोविड केअर सेंटरमध्ये दोन हजार खाटा शिल्लक
महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांचा दावा
ऑक्सिजन बेड शिल्लक असल्यामुळे औरंगाबाद शहरातील कोरोना रुग्णांना दिलासा
शहरात आणखी 100 व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करणार असल्याची दिली माहिती
-
सोलापुरात उपासमारीने महिलेचा मृत्यू
सोलापूर-
सोलापुरात उपासमारीने महिलेचा मृत्यू
अक्कलकोट रोडवरील प्रकार एसव्हीसएस शाळेसमोरील पुलाखालील घटना
एसव्हीसीएस शाळे समोर रोडच्या कामानिमित्त अतिक्रमण काढण्यात आले होते
यामध्ये अनेकांचे घर अतिक्रमणामुळे काढण्यात आले आहेत
कोरोनाच्या भीतीमुळे या कुटूंबाला कोणीही घर भाड्याने दिल नाही
नाईकवाडी कुटूंब पुलाखालीच करत आहे गुजराण
काळ रात्री उपासमारी मुळे गंगा प्रकाश नाईकवाडी या महिलेचं पुलाखालीच मृत्यू
-
Virar Covid Hospital fire | मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमींना 1 लाखांची मदत
मुख्यमंत्र्यांची घोषणा: विरार रुग्णालय आगीतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमींना 1 लाख
विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख, जखमींना 50 हजारांची मदत
PM @narendramodi has approved an ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF for the next of kin of those who have lost their lives due to the hospital fire in Virar, Maharashtra. Rs. 50,000 would be given to those seriously injured.
— PMO India (@PMOIndia) April 23, 2021
-
Virar Hospital Fire | राजनाथ सिंह यांच्याकडून संवेदना व्यक्त
राजनाथ सिंह यांच्याकडून संवेदना व्यक्त
Saddened by the loss of lives due to tragic fire at a Hospital in Palghar, Maharashtra. My condolences to the bereaved families. Praying for the speedy recovery of the injured.
— Rajnath Singh (@rajnathsingh) April 23, 2021
-
खालापूर टोल नाक्यावर वाहतूक पोलिसांकडून प्रत्येक गाडीची चौकशी आणि तपासणी
खालापूर
खालापूर टोल नाक्यावर वाहतूक पोलिसांकडून तपासणी
प्रत्येक गाडीची चौकशी आणि तपासणी
खालापूर टोल नाक्यावर वाहतूक पोलीस, स्थानिक पोलिस , महाराष्ट्र सुरक्षा बलाची कारवाई
सबळ कारणाशिवाय कुणालाही पुढे जाऊ दिले जात नाही
काल पासून कडक लॉकडाऊनच्या घोषणनंतर अमलबजावणी सुरू
-
Virar Hospital Fire | या घटनेची लवकरात लवकर चौकशी करुन कठोर कारवाई करा : देवेंद्र फडणवीस
आणखी एक विद्धवंसक घटना, विरारमधील आगीच्या घटनेत मृत्यू झालेल्यांप्रती मी तीव्र दुख: व्यक्त करतो. मी त्यांच्या कुटुंबाबद्दल शोक व्यक्त करतो. तसेच जे जखमी रुग्ण ते लवकरात लवकर बरे व्हावे. या घटनेची लवकरात लवकर चौकशी करुन कठोर कारवाई करा, असे ट्वीट भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
One more devastating incident. Deeply pained to know about loss of lives in Virar Covid Hospital ICU fire. My deepest condolences to bereaved families. Wishing speedy recovery to injured #COVID19 patients. We demand an in-depth inquiry & strong action against those responsible.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 23, 2021
-
Virar Hospital Fire | घटनेची सखोल चौकशी करा, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आदेश
विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळल्याने मृत्यू ओढवला. ही घटना अतिशय दुर्दैवी व वेदनादायी आहे. दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली! या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना देण्यात आले आहेत.
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) April 23, 2021
-
Virar Covid Hospital fire | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून चौकशीचे आदेश
मुंबईजवळच्या विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग
आगीत होरपळून 13 जणांचा मृत्यू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून घटनेची दखल, आगीच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश
महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने विरार के विजय वल्लभ कोविड अस्पताल में आग लगने की घटना की जांच के आदेश दिए हैं: मुख्यमंत्री कार्यालय pic.twitter.com/hOQdqbmiRo
— ANI_HindiNews (@AHindinews) April 23, 2021
-
Virar Hospital Fire | एसीच्या स्फोटानंतर दुसरा मजला खाक, 13 रुग्ण होरपळले, विरार रुग्णालयात आग कशी भडकली?
Virar Hospital Fire | एसीच्या स्फोटानंतर दुसरा मजला खाक, 13 रुग्ण होरपळले, विरार रुग्णालयात आग कशी भडकली? https://t.co/OeAXUTIVTx #VirarHospital | #VijayVallabhCovidHospital | #VirarFire | #virar
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 23, 2021
-
Virar Hospital Fire | विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयात भीषण आग, 13 जणांचा मृत्यू
-
Virar Hospital Fire | दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची नावे
दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची नावे
उमा सुरेश कनगुटकर – स्त्री निलेश भोईर – पुरुष पुखराज वल्लभदास वैष्णव – पुरुष रजनी आर कडू – स्त्री नरेंद्र शंकर शिंदे – पुरुष कुमार किशोर दोषी – पुरुष जनार्धन मोरेश्वर म्हात्रे – पुरुष रमेश टी उपायन – पुरुष प्रवीण शिवलाल गौडा – पुरुष अमेय राजेश राऊत – पुरुष शमा अरुण म्हात्रे – स्त्री सुवर्णा एस पितळे – स्त्री सुप्रिया देशमुख – स्त्री
-
Virar Covid Hospital fire | 21 जणांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले : रुग्णालय प्रशासन
विरार पश्चिम भागात विजय वल्लभ कोव्हिड केअर रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात गुरुवारी मध्यरात्री तीन वाजता भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात 90 जण उपचार घेत होते. त्यातील 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण गंभीर अवस्थेत असून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येणार आहे, अशी माहिती विजय वल्लभ कोव्हिड रुग्णालयातील डॉ. दिलीप शाहा यांनी दिली.
Maharashtra | 13 people have died after a fire broke out in the Intensive Care Unit (ICU) around 3am today. 21 patients including those in critical condition have been shifted to another hospital: Dr. Dilip Shah, official, Vijay Vallabh COVID care hospital, Virar pic.twitter.com/0GNUlHlgt4
— ANI (@ANI) April 23, 2021
-
विरारमधील रुग्णालयात अतिदक्षता विभागात आग, 13 जणांचा मृत्यू
मुंबईजवळच्या विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग
आगीत होरपळून 13 जणांचा मृत्यू, तर काही जणांची प्रकृती गंभीर
सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती
Maharashtra | 13 people have died in a fire that broke out at Vijay Vallabh COVID care hospital in Virar, early morning today pic.twitter.com/DoySNt4CSQ
— ANI (@ANI) April 23, 2021
-
कामदा एकादशी निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात द्राक्षाची आरास
आज प्रमुख चार यात्रांपैकी एक असलेली चैत्र यात्रेचा मुख्य दिवस कामदा एकादशी निमित्ताने पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लक्ष्मी टाकळी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी सुरेश टिकोरे यांनी द्राक्षाची आरास केली
देवाचा गाभारा, प्रवेशद्वार, चारखांबि आणि सोळखांबी या ठिकाणी द्राक्ष घडांची आणि पानांची आकर्षक अशी सजावट केली
यामुळे देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्र यात्रा भाविकांविना पार पडत असुन श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी देवाचे नित्योपचार, पूजापाठ हे सुरु आहेत
मात्र भाविकांनि ऑनलाईन दर्शनाच्या माध्यमातून घरी बसुनच श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन घेण्याचे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले
-
विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग, 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
विरारमधील कोव्हिड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग
10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
विरार पश्चिमेकडे विजय वल्लभ नावाचे कोव्हिड रुग्णालय आहे
या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात आज पहाटे 5 ते 5.30 च्या दरम्यान भीष आग लागली
यावेळी आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास 17 रुग्ण उपचार घेत होते
Published On - Apr 23,2021 8:10 PM