LIVE | सीबीआय आपल्या मर्यादा ओलांडून काम करतंय- जयंत पाटील
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
सीबीआय आपल्या मर्यादा ओलांडून काम करतंय- जयंत पाटील
सांगली : अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने केलेल्या कारवाई प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
देशातील आणि राज्यातील कोविडमुळे जी परिस्थिती निर्माण झालीय त्यावरून लक्ष हटवण्यासाठी अनिल देशमुखच्या मागे सीबीआय लावली आहे
देशमुख यांच्या मागे लागण्यापेक्षा हा वेळ जर कोविडला भारतातून बाहेर काढण्यासाठी दिला असता तर चांगली परिस्थिती देशात राहिली असती
देशमुख यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हा अंत्यत भोंगळ स्वरूपाचा आणि मर्यादेचा भंग करून जे सांगितले नाही त्या विषयाला स्पर्श करणारा आहे.
सीबीआय आपल्या मर्यादा ओलांडून महाराष्ट्रामध्ये काम करत आहे…सीबीआयचा राजकीय वापर होतोय
राज्यात मोघलाई लागलीय असे वाटावे असा हा आजच्या अनिल देशमुख यांच्या झालेल्या कारवाईच्या प्रकारावरून वाटते
अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयला 100 टक्के काहीच सापडले नसेल, त्यामुळे FIR दाखल केला
अनिल देशमुख यांच्या घरावर छापेमारी करण्यासाठीच आधी FIR दाखल केली मग छापेमारी सत्र सुरू केले
-
उत्पादन शुल्क विभागाची नाशकात मोठी कारवाई, एक कोटींचा अवैध मद्यसाठी पकडला
नाशिक : 1 कोटींचा अवैद्य मद्यसाठा पकडला
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
गोव्यावरून नाशिकला आणला जात होता मद्यसाठा
येवला टोल नाक्याजवळ उत्पादन शुल्क विभागाने पकडला दारूचा ट्रक
ट्रक मध्ये सिरॅमिक भांड्यांच्या मागे लपवला होता मद्यसाठा
-
-
मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडीजवळ टँकरची बाईकला धडक, एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर सरवली गावाच्या हद्दीत नाशिकच्या दिशेने एलपीजी घेऊन जाणाऱ्या टँकरच्या धडकेत एक दुचाकी स्वार ठार ,एलपीजी गळती होत असल्याने भारत पेट्रोलियम च्या तंत्रज्ञ पथकास केले पाचारण , वाहतूक पाईपलाईन च्या रस्त्याने वळविल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी
-
साताऱ्यात आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न
साताऱ्यात आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न
पुणे जिल्ह्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा झाला प्रयत्न
सातारा तालुका पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल
-
पिंपरी चिंचवडमधील थेरगावमध्ये कारखान्यात स्फोट
पुणे -पिंपरी चिंचवडमधील थेरगाव येथील मॅग्नेशियमची पावडर बनवणाऱ्या कारखान्यात स्फोट
-सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही
-हा स्फोट झाला त्यावेळी 4 कामगार कारखान्यात काम करत होते, हे चारही जण तत्काळ बाहेर पडल्याने कुठलीही जीवितहानी नाही
-आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनस्थळी दाखल,आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
-आतषबाजीच्या फटक्यासाठी या ठिकाणी वात बनविण्याचे काम सुरु होते
-
-
रावसाहेब दानवे यांची राज्य सरकारवर जोरदार टीका
कोरोना महामारी रोखण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. असे जालना जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. आपले अपयश झाकण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचा एकमेव मार्ग अवलंबला आहे. राज्यातील प्रत्येक मंत्री सध्या वेगवेगळे स्टेटमेंट देत आहेत, असे दानवे यांनी म्हटलंय. काल राजेश टोपे यांनी केंद्र सरकारला उद्देशून वक्तव्य केलं होतं की,आम्ही तुमचे पाय धरतो पण आम्हाला मदत करा. यावर रावसाहेब दानवे यांनी मिस्कील टिपणी केली. कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे माहित असूनही राज्य सरकारने काहीही उपायोजना केल्या नाहीत, उलट त्याकडे दुर्लक्ष करून राजकारण करायला सुरुवात केली. दानवे यांनी यावेळेस दावा केला की केंद्राने राज्य सरकारला कोरणा काळात भरपूर मदत केली पण राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवत आहे, असे सुद्धा दानवे यांनी म्हटलंय.
-
दुष्मन असणाऱ्या पाकिस्तानला फुकट लस दिली, राज्याला 400 रुपये का? : नाना पटोले यांचा सवाल
नाना पटोले यांनी घेतली विभागीय आयुक्तांची भेट– सिरम कंपनीने लसीच्या किंमतीत जो भेद केलाय, त्याचा काँग्रेसने निषेध केलाय– लॉकडाऊन जर नसता तर आम्ही आंदोलन केले असते– देशाच्या पंतप्रधानी कोविड संकट समोर नियोजन केले असते, तर आज हि परिस्थिती आली नसती– केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देश अधोगतीला लागलाय– आमचा दुष्मन असणाऱ्या पाकिस्तानला फुकट लस दिली , राज्याला 400 रुपये का ?
– त्यामुळे केंद्राने मोफत लस द्यावी,
– कोरोनावरून लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी अनिल देशमुखांवर कारवाई आहे
– आता लोकांचे जीव वाचवणे हे महत्त्वाचं आहे -
मुंबई-अहमदाबाद हायवेवर पीपीई किट घातलेला मृतदेह आढळला
पालघर
मुंबई अहमदाबाद महामार्गावर ढेकाळे परिसरात पीपीई किट घातलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
महामार्गाच्या कडेला काही अंतरावर मृतदेह आढळल्याने खळबळ
कुजलेल्या अवस्थेत भेटला मृतदेह,
मृताचे कारण अजूनही अस्पष्ट
मनोर पोलीस घटनास्थळी हजर,घटनास्थळीच पोस्टमार्टेम करणार असल्याची पोलिसांची माहिती
मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे
-
अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल; संजय राऊत म्हणतात…
Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल; संजय राऊत म्हणतात…https://t.co/1cTQ7PMVxC#sanjayraut | #shivsena | #AnilDeshmukh | #parambirsingh | #parambirsinghletter | #ncp | #sachinwaze
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 24, 2021
-
माजी गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षावर
गृहमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये बैठक
-
अनिल देशमुखांच्या घरी छापा, सीबीआयकडून गुन्हा दाखल
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल सीबीआयकडून गुन्हा दाखल अनिल देशमुखांच्या घरावर छापेमारी १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी सीबीआयची १० ठिकाणी छापेमारी
-
उसाची एकरकमी एफआरपी देण्याची अट रद्द होण्याची शक्यता, निती आयोगाची शिफारस
कोल्हापूर :
उसाची एक रकमी एफआरपी देण्याची अट रद्द होण्याची शक्यता
केंद्र शासनाच्या निती आयोगाची शिफारस
कारखान्यांनी शेतकऱ्यांशी करार करत दोन ते तीन टप्प्यात एफआरपीची रक्कम देण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव
निती आयोगाच्या प्रस्तावा नंतर राज्य शासनाकडून साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची नियुक्ती
सध्या ऊस दर नियंत्रण कायद्यानुसार चौदा दिवसात एफआरपी देणं आहे बंधनकारक
नव्या प्रस्तावाला शेतकरी संघटनांचा कडाडून विरोध होण्याची शक्यता
-
मुंबई, ठाणे, रायगडसह अनेक ग्राहक विजेचे थकबाकीदार, 693.99 कोटींचे बिल थकले
ग्राहकांनी थकविले 693.99 कोटींचे बिल मुंबई, ठाणे, रायगड मधील विजेचे थकबाकीदार मार्च 2020 पासुन ग्राहकांनी वीज बिल भरले नाही ग्राहक थकबाकी उच्चदाब व घरगुती ग्राहक ड- 180,29 व्यवसायिक ग्राहक – 140,94 कोटी औद्योगिक ग्राहक – 150.85 कोटी इतर वर्गवारीतील ग्राहक -18.3 कोटी पाणीपुरवठा योजना – 7.66 कोटी स्ट्रीट लाईट – 111.57 कोटी कृषी ग्राहक – 4.39 कोटी एकुण 693.99 कोटीची थकबाकी
-
अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय? शिवसेनेचा केंद्राला सवाल
कोरोना संसर्गाने भारतातील यंत्रणा इतकी कोलमडली आहे की, कोरोनाने भारताचा पार नरक केला आहे, अशी जहाल टीका ‘ब्रिटन’चे प्रतिष्ठीत वृत्तपत्र ‘दि गार्डियन’ने केली आहे. मोदी व त्यांच्या सहकाऱयांना देशाचा स्वर्गच बनवायचा होता. त्यासाठीच त्यांनी मते मागितली, पण आता देशाचे स्मशान आणि कब्रस्तान होताना दिसत आहे. कोठे सामुदायिक चिता पेटत आहेत, कोठे इस्पितळे स्वतःच रुग्णांसह पेट घेत आहेत! अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय? असाच प्रश्न देशाची सध्याची भयावह स्थिती पाहिल्यावर पडतो.
-
विरार दुर्घटनेप्रकरणी रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल
विरार दुर्घटनेप्रकरणी विजय वल्लभ रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल#VirarHospitalfire #HospitalFire #MaharashtraFightsCorona https://t.co/hWF5ZOeEKj
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 23, 2021
Published On - Apr 24,2021 10:32 PM