LIVE | मुंबई-गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई, 1 कोटींची दारू जप्त

| Updated on: Apr 29, 2021 | 12:16 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | मुंबई-गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई, 1 कोटींची दारू जप्त
Breaking News
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Apr 2021 11:42 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावरील बैठक संपली

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर बैठक संपन्न

    गृहमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त बैठकीला होते उपस्थित

    लॉकडाऊनबाबत चर्चा झाल्याची माहिती

    दिड तास चालली बैठक

  • 28 Apr 2021 11:39 PM (IST)

    शिंदखेडा तालुक्यातील रहीमपुरे गावात घराला भीषण आग

    धुळे : शिंदखेडा तालुक्यातील रहीमपुरे गावात घराला भीषण आग..

    गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घर जाळून खाक

    सुदैवाने जीवितहानी नाही,

    घटनास्थळी पोलीस पोहचले

    अग्निशमन दलचे 2 बंब घटना स्थळी दाखल

    आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू


  • 28 Apr 2021 09:45 PM (IST)

    मुंबई-गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई, 1 कोटींची दारू जप्त

    रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्काची धडक कारवाई

    कारवाईत राज्य उत्पादन शुल्कच्या हाती अवैध दारूचं मोठं घबाड

    तब्बल 1 कोटींची दारू जप्त

    90 हजार विदेशी मद्याच्या दारूच्या बाटल्या केल्या जप्त

    गोव्याहून मुंबईकडे कंटेनरमधून निघाला होता दारूसाठा

    लांजा राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

  • 28 Apr 2021 08:59 PM (IST)

    महाराष्ट्र कोऑपरेटीव्ह बँक घोटाळा प्रकरण, प्रोटेस्ट याचिकेची दुसऱ्या कोर्टात सुनावणी करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी

    महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँक घोटाळा प्रकरण

    प्रोटेस्ट याचिकेची दुसऱ्या कोर्टात सुनावणी करण्याची याचिकाकर्त्याची मागणी

    प्रोटेस्ट याचिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि माजी आमदार माणिक जाधव यांनी दाखल केली आहे.

    माणिक जाधव यांनी नुकताच मुंबई सेशन कोर्टाच्या प्रधान न्यायाधीश यांच्याकडे अर्ज करून ही मागणी केली आहे.

    माणिक जाधव यांच्या अर्जावर आता 5 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

    महाराष्ट्र कॉ ऑप बँकेत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप

    याबाबत अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका केल्यावर हायकोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते

    हा गुन्हा दाखल करून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला .

    आर्थिक गुन्हे तपास करून या प्रकरणात गुन्हा घडला नसल्याचा मुद्दा उपस्थित करून या बाबत क्लोजर रिपोर्ट मुंबई सेशन कोर्टात सादर केला आहे

    त्या विरोधात अण्णा हजारे यांनी मुंबई सेशन कोर्टात प्रोटेस्ट याचिका दाखल केली आहे.

    या याचिकेवर मुंबई सेशन कोर्टातील न्यायाधीश ए एस डागा यांच्या कोर्टात सुनावणी सुरू आहे.

    मात्र,सुनावणी ज्या पद्धतीने सुरू आहे त्याबाबत याचिकाकर्ते अण्णा हजारे आणि माणिक जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    अखेर प्रोटेस्ट याचिका दाखल करणारे माजी आमदार माणिक जाधव यांनी सध्या सुरू असलेल्या सुनावणी प्रकरणी कोर्टावर अविश्वास व्यक्त करत ही सुनावणी दुसऱ्या कोणत्याही कोर्टात करावी यासाठी अर्ज केला आहे.

    हा अर्ज मुंबई सेशन कोर्टाच्या प्रधान न्यायाधीश यांच्या कोर्टात केला आहे. त्यावर आज सुनावणी झाली

    यावेळी माणिक जाधव यांच्या वतीने वरिष्ठ वकील सतीश तळेकर यांनी युक्तिवाद केला.

    यावेळी प्रधान न्यायाधीश यांनी संबंधित न्यायाधीश यांना या खटल्याबाबतचा त्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

    पुढील सुनावणी आता 5 एप्रिल रोजी होणार आहे.

  • 28 Apr 2021 08:07 PM (IST)

    बीडमधील पाटोदा शहरात गोळीबार, अद्याप गुन्हा दाखल नाही

    बीड: पाटोदा शहरात गोळीबार

    जुन्या वादातून झाला गोळीबार

    बंदुकीतून दोन राऊंड फायर

    पाटोदा येथीला शिवाजी महाराज चौकातील घटना

    पोलीस घटनास्थळी दाखल

    पाटोदा शहरात मोठा तणाव

    पोलिसात अद्याप गुन्हा दाखल नाही

  • 28 Apr 2021 07:42 PM (IST)

    गडचिरोली पोलिसांना चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आला

    गडचिरोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून नक्षलविरोधी पोलीस पथक छत्तीसगड सीमावर्ती भागात असलेल्या भामरागड एटापल्ली जंगल परिसरात आपरेशन राबवित होते या पोलिस पथकाला एक गुप्त माहिती प्राप्त झाली पंचवीस ते तीस नक्षलवादी एटापल्ली तालुक्यातील जांबिया गट्टा जंगल परिसरात असल्याची  या माहितीद्वारे कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आला या कोम्बिंग ऑपरेशन नक्षलवाद्यांनी चकमक केली प्रतिउत्तर देत पोलिस विभागाने दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले एक ते दीड तास चाललेल्या या चकमकीत काही नक्षलवादी पण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे

    या चकमकीत दोन जहाल नक्षलवाद्यांचे  सदस्य ठार झालेले असून १-विनय लालू नरोटे नामक नक्षलवादी वर सोडा गुन्हे दाखल असून सहा लाखाचे बक्षीस आहे तर २-मनोहर कानू नरोटे वर 18 गुन्हे दाखल असून आठ लाखाचे बक्षीस आहेत या दोन नक्षलवादी वर हत्या -जाळपोळ -शासकीय मालमत्तेचे नुकसान- भूसुरुंग स्पोर्ट असे अनेक गुन्ह्यात सहभागी होते. याच नक्षल दलमतील नक्षलवाद्यांनी जांबिया कट्टा पोलीस स्टेशनवर ग्रॅनेटनी हल्ला केलेला होता तो ग्रेनेड बॉम्ब फुटला नाही परंतु मोठा हल्ला करण्याचे प्रयत्न या नक्षलवाद्यांनी  केले होते आज पहाटे याच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले

    मागील चकमकीत पण नक्षलविरोधी पोलीस पथकाने मोठी यशस्वी प्राप्त केली पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालून आणि आज जांबिया गट्टा जंगल परिसरात दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालून एक यशस्वी पोलीस विभागाला प्राप्त झाली हे दोन्ही आपरेशन पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले

  • 28 Apr 2021 07:10 PM (IST)

    वाशिममध्ये रोपवनाला भीषण आग, 20 ते 25 एकर जंगल जळून खाक

    वाशिम: मंगरूळपीर तालुक्यातील माळशेलू शिवारातील वनविभागाच्या रोपवनाला अचानक भीषण आग लागली. रोपवनामध्ये मोठ्या प्रमाणात गवत असल्याने आग विझवण्यास अडथळे येत होत. तब्बल 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. पण तरीही अंदाजे 20 ते 25 एकर रोपवन जळून खाक झाले.आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या सदस्यांच्या तत्परतेने 20 ते 30 एकर गवताळ रोपवन वाचविण्यात वनविभागाला यश आले

  • 28 Apr 2021 05:56 PM (IST)

    कोल्हापुरातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस, मलकापूर बाजारात गारांचा खच

    कोल्हापूर : एका दिवसाच्या विश्रांतीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, कोल्हापूर जवळील मलकापुरात जोरदार गारपीट,  मलकापूर बाजारात गारांचा खच, अवकाळी पाऊस आणि गारपीटमूळे शेतीच मोठे नुकसान

  • 28 Apr 2021 04:43 PM (IST)

    उच्च न्यायालयातील वकिलाच्या बंगल्यामध्ये चोरी करण्यासाठी शिरलेल्या चोरट्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

    मुंबईतील कांदवली पोलिसांनी अशा दोन चोरांना अटक केले आहे जे मुंबईतील हायप्रोफाईल विभागांमध्ये बंद अशा बंगल्यांमध्ये घुसून चोरी करून फरार होत होते. कांदिवली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिम भागात राहणाऱ्या उच्च न्यायालयातील एका वरिष्ठ वकिलाच्या बंगल्यामध्ये रात्री हे दोन चोर अचानक चोरीच्या उद्देशाने गेले होते. ज्यावेळेस ते चोर बंगल्यामध्ये शिरत होते त्याच वेळेस वकिलाने आपल्या सीसीटीव्हीमध्ये या चोरांना आत येताना पाहिले. तसेच वकीलाने आधी बंगल्याचे सर्व दरवाजे बंद केले आणि मग पोलिसांना या सर्व घटनेची माहिती दिली. काही क्षणातच कांदिवली पोलीस घटनास्थळी पोहोचून त्यांनी दोन्ही चोरांना पकडले. पकडलेल्या दोन्ही आरोपींची नावे नित्यानंद देवेंद्र वय 20 वर्ष, गणेश देवेंद्र वय पस्तीस वर्ष असे आहेत. सध्या पोलिसांनी आरोपीला पकडले असून ते पुढची कारवाई करत आहेत

  • 28 Apr 2021 03:16 PM (IST)

    सामाजिक कार्यकर्ते शिवदास ढवळे यांचा जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

    नांदेड : शिवदास ढवळे या सामाजिक कार्यकर्त्यांचा जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, कार्यकर्त्याने आत्मदहन केल्याचा अंदाज, लोहा तालुक्यातील चोंडी येथील घटना, रोहयोचे काम चालू असलेल्या ठिकाणी वन्य प्राण्यांची शिकार केल्याची वन विभागाकडे केली होती तक्रार, तक्रारीवर कारवाई होत नसल्याने 28 एप्रिल रोजी आत्मदहन करण्याचा दिला होता लेखी इशारा, पोलीस करताहेत अधिक तपास, प्रकरणात गुंतागुंत असल्याने तपासाअंती येणार सत्य बाहेर.

  • 28 Apr 2021 02:32 PM (IST)

    खडसेंच्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपवर गिरीश महाजन यांची संतप्त प्रतिक्रिया

    नाशिक –

    खडसेंच्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपवर गिरीश महाजन यांची संतप्त प्रतिक्रिया

    ऑडिओ क्लिप ऐकली

    त्यात खडसेंचा दोष नाही

    वाढते वय, अनेक आजार यामुळे खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे

    राष्ट्रवादीत जाऊन त्यांना आमदारकी नाही, त्यांच्या मुलीला लोकांनी नाकारले

    त्यासमुळे त्यांची मानसिकता बिघडली आहे

  • 28 Apr 2021 02:31 PM (IST)

    एकनाथ खडसे यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल

    नाशिक –

    एकनाथ खडसे यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल

    गिरीश महाजन यांच्याबद्दल ऑडिओ क्लिपमध्ये वादग्रस्त वक्तव्य

    पाण्याची समस्या मांडणाऱ्या जामनेरच्या ग्रामस्थासोबत खडसे यांचा संवाद व्हायरल

    आमच्या गावात पाणी नाही – ग्रामस्थाची तक्रार

    “पाणी नाही, तर तुझा आमदार कुठे मेला?”

    “पोरीचा फोन उचलतो तो फक्त”

    खडसे यांच्या वक्तव्याने खळबळ

  • 28 Apr 2021 12:28 PM (IST)

    कोरोना संकटसोबतच आता नाशिकरांना पाणीटंचाईला देखील द्यावे लागणार तोंड

    नाशिक -कोरोना संकटसोबतच आता नाशिकरांना पाणीटंचाईला देखील द्यावे लागणार तोंड

    जिल्ह्यात फक्त 38 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने येणाऱ्या काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता

    नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या धणारात देखील फक्त 45 टक्के पाणीसाठा

    येणाऱ्या काळात पाणीकपात लागू करण्याचे मनपा आयुक्तांनी दिले संकेत

    गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने पाणीटंचाई निर्माण

    येणाऱ्या काळात दुहेरी संकटाला नागरिकांना द्यावे लागणार तोंड

  • 28 Apr 2021 12:06 PM (IST)

    गोकुळ मल्टिस्टेट न करण्याच्या मुद्यावरच स्वाभिमानी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा – राजू शेट्टी

    कोल्हापूर –

    राजू शेट्टी –

    दूध उत्पादकाला न्याय देण्यासाठी आम्ही लढा दिला

    गोकुळ मूळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना आर्थिक स्थर्य आलं

    दुधा दरासाठी अनेकवेळा गोकुळ विरोधात आंदोलन केलं

    लॉकडाऊनच्या काळात दूध उत्पादकांना गोकुळने सांभाळलं

    गोकुळ मल्टिस्टेटला आमचा विरोध आहे

    गोकुळ मल्टिस्टेट न करण्याच्या मुद्यावरच स्वाभिमानी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा

  • 28 Apr 2021 12:02 PM (IST)

    रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीत पुन्हा एकदा स्फोट, स्फोटानंतर केमिकल कंपनीला मोठी आग

    रत्नागिरी-

    लोटे एमआयडीसीत पुन्हा एकदा स्फोट

    फार्मा कंपनीत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती

    स्फोटानंतर कंपनीला मोठी आग

    अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना

    लोटे मधील एम आर फार्मा या कंपनीतील रिऍक्टर चा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे

  • 28 Apr 2021 12:00 PM (IST)

    इचलकरंजी शहरात विजेचा शॉक लागून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू

    इचलकरंजी –

    शहरातील पुजारी मळा परिसरातील विजेचा शॉक लागून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू

    पुजारी मळा परिसरातील भरत केसर वाणी वरच्या मजल्यावर साफसफाई करत असताना महावितरणच्या  तारेला संपर्क होऊन दुर्दैवी मृत्यू

    भारत केसर वाणी याच्या बहिणीचे उद्या होते लग्न या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होऊ लागली आहे

    शहरातील या घटनेमुळे पुजारी मळा परिसरामध्ये केसरवानी परिवारातील नागरिकांनी केली मोठी गर्दी

    केसर वाणी परिवारातील नागरिकांनी केला आक्रोश

  • 28 Apr 2021 11:35 AM (IST)

    यवतमाळात मद्यविक्रीच्या दुकानासामोर मोठी गर्दी

    यवतमाळ :

    मद्यविक्रीच्या दुकानासामोर मोठी गर्दी

    मद्यविक्रीच्या दुकानाबाबत प्रशासनाने मद्यविक्रीबाबत होम डिलिव्हरीची परवानगी देण्यात आली आहे

    तसे पत्र जिल्हा प्रशासनाने पत्र काढले आहे

    आजही होम डिलिव्हरीची सुविधा सुरु झाली असली तरी दारुच्या दुकानावर मद्यप्रेमींनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले आहे

  • 28 Apr 2021 11:33 AM (IST)

    कोल्हापूर गोकुळ दुध संघ निवडणूक, राजू शेट्टी यांचा सत्ताधारी गटाला पाठिंबा

    कोल्हापूर –

    गोकुळ दुध संघ निवडणूक

    राजू शेट्टी यांचा सत्ताधारी गटाला पाठिंबा

    स्वाभिमानी शेतकरी संघटना गोकुळच्या निवडणुकीत सहभागी

    शेट्टी यांचा राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा

  • 28 Apr 2021 10:40 AM (IST)

    माणुसकीला लाजवणारी गोष्ट, मृत पावलेल्या आई जवळ दीड वर्षाचा मुलगा दोन दिवस उपाशीपोटी

    पिंपरी-चिंचवड –

    – माणुसकीला लाजवणारी गोष्ट मृत पावलेल्या आई जवळ दीड वर्षाचा मुलगा दोन दिवस उपाशीपोटी

    – शहरातील दिघी परिसरातील घटना

    – कोरोना भीतीमुळे कोणी घेण्यास झाले नाही तयार

    – अखेर दोन महिला पोलिसांनी चिमुकल्याला दिले बिस्कीट आणि दूध

    – बाळाची प्रकृती स्थिर, शिशुग्रहात दाखल

    – सरस्वती राजेशकुमार असं मृत महिलेचे नाव, पती निवडणूक असल्याने उत्तर प्रदेशमध्ये गेलेला

    – सुशीला गबाले आणि रेखा वाजे असं महिला कर्मचाऱ्यांचे नाव

    – या बाळाला संभाळ करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

  • 28 Apr 2021 10:39 AM (IST)

    गडचिरोलीत नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक, दोन नक्षलवादी कंठस्नान

    गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी व पोलिसांमध्ये चकमक झाली या चकमकीत दोन नक्षलवादी यांना कंठस्नान घालण्यात पोलीस विभागाला यश आले

    नक्षलविरोधी पोलीस पथकाची कारवाई-गडचिरोली पोलिसांना मोठी यशस्वी

    मागील काही दिवस आगोदर नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील जांबिया घट्टा पोलीस स्टेशनवर ग्रेनेड फेकून हल्ला केला होता

    या नक्षल दलमच्या पाटलॉग करण्यासाठी नक्षलविरोधी पोलिस पथक जांबिया कट्टा परिसरात मागील काही दिवसांपासून ऑपरेशन राबवीत होते

    आज पहाटे नक्षल दलम ची माहिती मिळताच पोलिस विभागांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले

    या कोम्बिंग आपरेशनवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला

    प्रतिउत्तर देत पोलीस पथकाने दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले

    काही नक्षलवादी जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे

    एटापल्ली तालुक्यातील जांबिया गट्टा येथील घटना

  • 28 Apr 2021 09:31 AM (IST)

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाणे पार पडला करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा रथोत्सव

    कोल्हापूर

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाणे पार पडला करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा रथोत्सव

    श्रीपूजक,मानकरी आणि मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत रात्री पार पडला सोहळा

    जोतिबा चैत्र यात्रेस च्या दुसऱ्या दिवशी असतो अंबाबाई चा रथोत्सव

    शहरातील प्रमुख मार्गावरून निघते अंबाबाई ची नगरप्रदक्षिणा

    दरवर्षी मोठ्या उत्साहात होणाऱ्या या सोहळ्याला सलग दुसऱ्या वर्षी ब्रेक

  • 28 Apr 2021 08:18 AM (IST)

    शिरुर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 78 किलो गांजा जप्त

    पुणे

    – शिरुर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 78 किलो गांजा जप्त

    – न्हावरे गावाजवळ एका ठिकाणी गांज्याची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करून ठेवलेला 78 किलो गांजा जप्त

    – याप्रकरणी शिरूर पोलिसांनी चार आरुणीन अटक केली सुनील रूपराव पवार ,आकाश सर्जेराव पवार,विशाल कैलास मोहिते,प्रकाश सर्जेराव पवार अशी आरोपीची नावे

    – ह्या आरोपी विरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

  • 28 Apr 2021 07:38 AM (IST)

    नागपुरात सहकारी महिला डॅाक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

    – नागपुरात सहकारी महिला डॅाक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

    – मानकापूर परिसरातील कोवीड हॅास्पीटलमधील धक्कादायक घटना

    – सिनीअर डॅाक्टरचा २५ वर्षीय महिला डॅाक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

    – चेंजिंग रुममध्ये बोलवून महिला डॅाक्टरशी लगट करण्याचा प्रयत्न

    – आरोपी डॅाक्टर नंदू रहांगडालेवर मानकापूर पोलीसांत गुन्हा दाखल

    – आरोपी डॅाक्टरला एक दिवसांचा पिसीआर

  • 28 Apr 2021 07:33 AM (IST)

    अहमदनगरात 10 हजार रुपयांची लाच घेताना पोलीस हवालदाराला अटक

    अहमदनगर –

    10 हजार रुपयांची लाच घेताना पोलिस हवालदाराला अटक

    नगरच्या लाचलुचपत विभागाची कारवाई

    बार्शीकर काळे असे पोलिस हवालदाराचे नाव

    संचारबंदी काळात दारू धंदा सुरळीत सुरू ठेवणे व त्यावर कारवाई न करण्यासाठी घेतली 10 हजार रूपयांची लाच

  • 28 Apr 2021 07:25 AM (IST)

    पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ‘पुष्पक’ या शववाहिनीची सेवा सुरू

    पुणे :

    पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ‘पुष्पक’ या शववाहिनीची सेवा सुरू

    या सेवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना संपर्क साधता येण्यासाठी पीएमपीकडून वायरलेस हेल्पलाईन सुरू

    9921960911 या क्रमांकाची सेवा 24 तास सुरू राहणार

  • 28 Apr 2021 07:24 AM (IST)

    कोरोनामुळे एका महिन्याच्या मुलाचा मृत्यू, औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयातील घटना

    औरंगाबाद –

    कोरोनामुळे एका महिन्याच्या मुलाचा मृत्यू

    औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात झाला मृत्यू

    सोयगाव तालुक्यातील पावरी गावातील मुलाचा मृत्यू

    गेल्या चार दिवसांपासून मुलावर सुरू होते उपचार

    एका महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ

  • 28 Apr 2021 07:23 AM (IST)

    नाशकात लोहमार्ग पोलिसांनी जीवाची पर्वा न करता वाचविले वृद्ध प्रवाशाचे प्राण

    नाशिक –

    लोहमार्ग पोलिसांनी वाचविले वृद्ध प्रवाशाचे प्राण

    जीवाची पर्वा न करता वाचविले प्राण

    नाशिकरोड रेल्वे स्थानकातील थरारक घटना

    चालती गाडी पकडताना प्रवासी पायरीवरून घसरला

    प्लॅटफॉर्म आणि गाडीत अडकलेल्या प्रवाशाला इम्रान कुरेशी आणि राकेश शेडमाके या दोघा पोलिसांनी वाचविले

    रियाज शेख प्रवाश्याचे नाव

    गोदान एक्स्प्रेस मधून पाणी पिण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरला होता प्रवासी

    मुंबईतील घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये घटनेची पुनरावृत्ती

  • 28 Apr 2021 06:40 AM (IST)

    शहापुरातील प्रसिद्ध तांदूळ व्यापारी रमेश अग्रवाल यांच्यावर जीवघेणा हल्ला

    शहापुरातील प्रसिद्ध तांदूळ व्यापारी रमेश अग्रवाल यांच्यावर जीवघेणा हल्ला

    छातीत गोळी लागल्याने व्यापारी गंभीर जखमी

    मंगळवारी राती 8 वाजून 10 मिनिटांनी युनिकौण टूव्हीलरवर बसून तोंडाला काळे मास लावून आले होते दोन हल्लेखोर

    दोन्ही हल्लेखोरांच्या हातात होते दोन रिव्हॉल्वर

    शहापूर तालुका खरेदी विक्री संघाच्या राईसमिळ मधील ऑफिसमध्ये घुसून अग्रवाल यांच्यावर हल्लेखोरांनी केला जीवघेणा हल्ला

    हल्लेखोरांनी अग्रवाल यांच्यावर एक गोळी झाडली व ती त्यांच्या उजव्या छाती मध्ये आरपार घुसल्याने अग्रवाल हे गंभीर जखमी झाले

  • 28 Apr 2021 06:39 AM (IST)

    ठाण्यातील मुंब्रा कौसा या भागात एका खाजगी नॉन कोविड रुग्णालयाला आग

    ठाण्यातील मुंब्रा कौसा या भागात एका खाजगी नॉन कोविड रुग्णालयात मीटर बॉक्समध्ये अचानक लागल्या आगीमुळे रुग्णालयात आग

    यामध्ये एकूण 20 रुग्णांपैकी 6 जण आयसीयूमध्ये उपचार घेत होते त्यांना जवळच्या बिलाल रुग्णालय येथे हलवण्यात आले

    त्यानंतर यामध्ये 3 जण दगावल्याची शक्यता वर्तवली जात आहे

    सध्या icu मधील 6 जण बिलाल रुग्णालय येथे उपचार घेत आहे इतर जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे

    घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल, पोलीस आणि इतर जणांच्या मदतीने रुग्णालय येथे मदत कार्य सुरु आहे

    घटनास्थळी 4 ते 5 अग्निशमन दलाच्या गाड्या उपस्थित