LIVE Updates | शेतकरी आंदोलनावर केंद्रातल्या वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज : शरद पवार

| Updated on: Mar 31, 2021 | 6:46 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

LIVE Updates | शेतकरी आंदोलनावर केंद्रातल्या वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज : शरद पवार
Follow us on

महाराष्ट्रासह देशातील बातम्यांचे वेगवान अपडेटस टीव्ही 9 मराठीवर Live Updates

 

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Feb 2021 06:33 PM (IST)

    भारतासह जगभरातील लोकांमध्ये आंदोलनाबाबत सहानुभूती : पवार

    या आंदोलनाबद्दल देशातील नागरिकांमध्ये सहानुभूती होतीच, आता जगभरातील इतर देशांमधील लोकांमध्येही या शेतकरी आंदोलनाबाबत सहानुभूती पाहायला मिळत आहे. आपल्या राज्यकर्त्यांनी या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहायला हवं.

  • 06 Feb 2021 06:01 PM (IST)

    शेतकरी आंदोलनावर केंद्रातल्या वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज : शरद पवार

    शेतकरी आंदोलनावर केंद्रातल्या वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. या आंदोलनाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा व्हायला हवी, असंही पवार म्हणाले.


  • 06 Feb 2021 03:04 PM (IST)

    इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत

    इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत पोहचला आहे. ओली पोपच्या रुपात इंग्लंडने  पाचवा विकेट गमावला आहे. पोपने 34 धावा केल्या.

  • 06 Feb 2021 02:59 PM (IST)

    केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना औरंगाबादचं नामांतर का केलं नाही – राज ठाकरे

    केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना औरंगाबादचं नामांतर का केलं नाही, शिवसेना-भाजप दोघांनी उत्तर द्यावं, आता राजकारण कशाला, निवडणुकीच्या तोंडावर संभाजीनगरचा विषय : राज ठाकरे

  • 06 Feb 2021 02:56 PM (IST)

    रिहाना? कोण बाई आहे ती.. – राज ठाकरे

    रिहाना? कोण बाई आहे ती.. कोण कुठली सिंगर.. ती काहीतरी बोलते आणि सरकार तिला उत्तर देतं? तिने ट्वीट करायच्या आधी तुम्हाला तरी माहिती होतं का? भारतरत्नसारख्या व्यक्तींना तुम्ही बोलता? : राज ठाकरे

  • 06 Feb 2021 02:56 PM (IST)

    भाजपला इतकं वाटत असेल त्यांनी वरिष्ठांशी बोलावं, सरकार त्यांचंच – राज ठाकरे

    भाजपला इतकं वाटत असेल त्यांनी वरिष्ठांशी बोलावं, भाजपला आंदोलन करण्याची काय गरज होती, केद्रांत सरकार त्यांचंच आहे, जर त्यांना खरंच प्रश्न सोडवायचा असेल तर त्यांनी केंद्राशी बोलावं, हे सर्व फक्त दाखवण्यासाठी – राज ठाकरे

  • 06 Feb 2021 02:53 PM (IST)

    जनतेने सरकारला प्रश्न विचारायला हवे – राज ठाकरे

    वीज दरवाढीविरोधात पहिलं आंदोलन मनसेचं, सरकारने पहिलं सांगितलं की वीज बिल माफ करु, मग थेट घुमजाव केला, मी स्वत: शरद पवारांशी बोललो, त्यानंतर त्यांना अदानी येऊन त्यांना भेटून गेले आणि सरकारने  वीज बिल माफ होणार नाही हा निर्णय घेतला, जनतेने सरकारला प्रश्न विचारायला हवे, सरकार सर्व कंपन्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत – राज ठाकरे

  • 06 Feb 2021 02:50 PM (IST)

    कृषी कायदे चुकीचे नाहीत – राज ठाकरे

    कृषी कायदे चुकीचे नाहीत, चीन, पाकिस्तानच्या सीमेवरही इतका बंदोबस्त नाही, प्रत्येक राज्याशी चर्चा करुन कायदे करा  – राज ठाकरे

  • 06 Feb 2021 02:49 PM (IST)

    निवडणुकीच्या वेळी माझ्या मागे कधी उभे राहत नाहीत – राज ठाकरे

    निवडणुकीच्या वेळी माझ्या मागे कधी उभे राहत नाहीत, टीका आम्ही सहन करायच्या, बाकीचे पक्ष वाट लावून ठेवतात, त्याचे प्रश्न आम्हाला विचारायचे : राज ठाकरे

  • 06 Feb 2021 02:48 PM (IST)

    अयोध्या दौरा अद्याप ठरलेला नाही – राज ठाकरे

    अयोध्या दौऱ्याची तारीख अद्याप ठरलेला नाही, अयोध्येला जायची इच्छा व्यक्त केली आहे – राज ठाकरे

  • 06 Feb 2021 02:40 PM (IST)

    संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

    – 11 जिल्ह्यात वैद्यकीय मदत कक्षाच काम
    – वाखान्य जोग काम

    – चक्का जाम आंदोलन – सरकार आंदोलन गांभीर्याने घेत नाही
    – मी दिल्ली जाऊन आलो,बघितलं
    – अजून काही लाख लोक सीमेवर येतील

    – शरद पवारांनी सांगितलं शेतकरी हिंसक झाला तर अवघड होईल जबाबदारी तुमची असेल
    – देशातील चार पाच उद्योग पतींसाठी कायदे आणले
    – कायद्यानवर विश्वास नाही

    – सरकारने दोन पाऊल मागे यावं
    – केंद्र सरकार अडमुठे वागत
    – त्यांना देशात अराजक माजवून पोळी भाजायची आहे

  • 06 Feb 2021 02:39 PM (IST)

    तुर पिकाच्या काढणीची लगबग

    अतिवृष्टीच्या तडाख्यातून खरीप हंगामातील एकमेव उरलेल्या तुर पीकाची काढणी सध्या सर्वत्र सुरू आहे. अतिवृष्टीमुळे तुरीच्या पिकात मोठी घट आली असून एका एकरात तीन ते चार क्विंटल तुरीचे उत्पादन होतंय. मात्र तुरीच्या पिकात घट आल्याने तुरीला प्रति क्विंटल सात ते आठ हजाराचा भाव मिळतोय. त्यामुळे निव्वळ खरीप हंगामावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना तुरीच्या पिकाची साथ मिळालीय. दरम्यान, तुरीच्या भावात आणखी वाढ अपेक्षित असून शेतकऱ्यांनी तूर विकण्याची घाई करू नये असे जाणकार सांगतायत. दुसरीकडे तुरीची डाळ शंभराहून अधिक किलो प्रमाणे विकल्या जाणार असल्याने महागाईचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.
  • 06 Feb 2021 02:01 PM (IST)

    गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीच्या महिलांनी थापल्या भाकऱ्या, आंदोलनात किन्नरांचाही सहभाग

    डोंबिवली टाटा नाका परिसरात कल्याण शीळ रस्त्यावर राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटवून भाकऱ्या थापून इंधन दरवाढीचा निषेध केला. विशेष म्हणजे या आंदोलनात एलजीबीटी सेलच्या प्रदेश सचिव माधूरी शर्मा या देखील सहभागी झाल्या होत्या. आजच्या काळात गॅस दरवाढीमुळे सामान्य महिला नागरीक आाणि किन्नर समूदायाला मोठा त्रास आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात आम्ही आंदोलन केले असल्याचे माधूरी शर्मा यांनी सांगितले आहे.
  • 06 Feb 2021 01:55 PM (IST)

    चिपळूणमध्ये गॅस दरवाढीबाबत राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याने केलं चुलीवर जेवण

    केंद्र सरकारने आर्थिक बजेटमध्ये पेट्रोल -डिझेल इंधन व घरगुती गॅसवर लावलेल्या अप्रत्यक्ष अधिकारामुळे सर्व सामान्य जनतेला तसेच शेतकरी वर्गाला व गृहिणींना महागाईच्या आक्रोशला सामोरे जात असताना जनतेला जगणे कठिन झाले आहे. त्यामुळे चिपळूण येथील राष्ट्रवादी महिला पदाधिकारी व कार्यकर्ती यांन कार्यालयासमोर चुलीवर जेवण बनवून गॅस सिलेंडर दरवाढीचा निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर सिलेंडरची रॅली काढून चिपळूण तहसीलदार यांना निवेदन सादर केले. यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हादयक्ष चित्रा चव्हाण यांच्या नेतूत्वखाली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
  • 06 Feb 2021 01:53 PM (IST)

    राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांसोबत मिसळवर चर्चा

    राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांसोबत मिसळवर चर्चा
    – ठाण्याची फेमस मामलेतदार मिसळचा आस्वाद घेणार राज ठाकरे

  • 06 Feb 2021 01:47 PM (IST)

    राज ठाकरे काही वेळात शासकिय विक्षाम गृहात दाखल होणार

    – राज ठाकरे काही वेळात शासकिय विक्षाम गृहात दाखल होणार
    – स्वागतासाठी सगळे सज्ज
    – मनसेचे नेते जमिल शेख यांची ३ महिन्यांपुर्वी हत्या झाली होती, सीसीटीव्हीतही घटना कैद होती, त्यांच्या कुटूंबियांची राज ठाकरे हे भेट घेणार..
    – कल्याणचे शहर अध्यक्ष कौस्तुब देसाई ऊपस्थित आहेतपदाधिकारीही इथे पोहोचले आहेत, नगरसेवक, पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत,
    – आढावा घेतलाय आमचे प्रतिनीधि गिरीश गायकवाड यांनी

  • 06 Feb 2021 01:47 PM (IST)

    शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे आदानी अंबानीचे फायदे आहेत का? – सत्वशीला चव्हाण यांचा सवाल

    शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत का आदानी  अंबानीच्या फायद्याचे आहेत? असा जळजळीत सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी केला. कराड इथल्या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. शेतकऱ्यांचे कायदे करणाऱ्यांना शेती कशी करतात हे माहिती आहे का ?एसी मध्ये बसून शेतकऱ्यांसाठी कायदे करणारे यांचे शेतीतील ज्ञान अल्प असल्याची टिका सत्वशीला चव्हाण यांनी केली.

  • 06 Feb 2021 01:43 PM (IST)

    शेतकरी संघटनाच्या सुकाणू समितीच्या वतीने नर्सिह पोखर्णी इथं रास्ता रोको आंदोलन

    दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीच्या वतीने नर्सिह पोखर्णी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्रसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत कोणतीही चर्चा न करता शेतकऱ्यांच्या विरोधात आणि भांडवलदारांच्या फायद्या साठी जे तीन काळे कायदे केले ते रद्द करावे या मागणी साठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
  • 06 Feb 2021 01:39 PM (IST)

    भिवंडीत रास्ता रोको अंदोलन संपलं, पोलिसांनी प्रमुख पदाधिकारी यांना घेतलं ताब्यात

    भिवंडी अंबाडी येथील रास्ता रोको अंदोलन संपले, पोलीसांनी प्रमुख पदाधिकारी यांना घेतले ताब्यात

  • 06 Feb 2021 01:33 PM (IST)

    भाजपचा एकही नेता शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाही हे दुर्दैव – अजित पवार

    हे बघा तुम्ही मला आता पाणी पिताना पाहिलं ना.. एका झटक्यात बाटली रिचवली का नाही..? पाण्याची बरं का.. अजितदादांच्या वाक्यावर हशा, आताचे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर सत्तेत आल.. आताही शेतकऱ्यांच्याच बळावर.. पण तरीही शेतकरी प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जातं, भाजपचा एकही नेता शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत नाही हे दुर्दैव, जगातल्या कोणत्याच देशात असं संकट शेतकऱ्यांवर ओढवलं नाही.. इतकी भयानक स्थिती भारतात, परदेशातल्या सेलीब्रेटीनं ट्विट केलं म्हणून तुम्ही त्यांना ट्रोल करता..?इतके दिवस तुम्ही का बोलला नाही,  – अजित पवार

  • 06 Feb 2021 01:32 PM (IST)

    आमचे बारामतीकर बघा कसं विरोधकाचं डिपॉझीट जप्त करतात – अजित पवार

    दादा इंदापूरला स्वतंत्र कारखाना द्या,  कार्यकर्त्यांची मागणी, अजितदादा म्हणतात तीन हजाराने नाही तीस हजाराने निवडून द्यायचं, आमचे बारामतीकर बघा कसं विरोधकाचं डिपॉझीट जप्त करतात..

  • 06 Feb 2021 01:29 PM (IST)

    पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

    कृषी कायद्याविरोधात कराडमध्ये आंदोलन सुरु असून कोल्हापूर नाक्यावर रास्ता रोको करण्यात येत आहे.  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

  • 06 Feb 2021 01:28 PM (IST)

    अजित पवार राष्ट्रवादीमुळे उपमुख्यमंत्री, हे ध्यानात ठेवलं पाहिजे – अजित पवार

    मी सभेला आलो.. तेव्हा सगळीकडे पाहिलंस आता जेवढे येथे आहेत ते सगळे असते तर समोरच्याचं डिपॉझीटच जप्त झालं असतं, काहीना वाटलं आता भाजपच येणार.. पण झालं वेगळंच, तुम्ही पक्षाला विसरुन कसं चालेल.. अजित पवार राष्ट्रवादीमुळे उपमुख्यमंत्री.. दत्तात्रय भरणे राष्ट्रवादीमुळे राज्यमंत्री.. हे ध्यानात ठेवलं पाहिजे.., आपण ज्या विचारावर चालतो त्याचं आचरण केलंच पाहिजे, भरणे मामा मंत्री झाले जॅकेट कधी घातलं का..? मी कधी घालतो का..?, आम्ही सकाळी सातपासून काम सुरु करतो.. जनतेच्या कामांना प्राधान्य देतो.. मिळालेली संधी ही जनतेच्या कामासाठी वापरतो

  • 06 Feb 2021 01:26 PM (IST)

    मामा मंत्री म्हणून नवखा आहे,  पण पाठपुरावा करायला चिकट – अजित पवार

    सामान्य प्रशासन विभाग , जे मुख्यमंत्री खातं ठेवतात त्याचं राज्यमंत्रीपद दत्तात्रय भरणे यांच्याकडे, मामा मंत्री म्हणून नवखा आहे,  पण पाठपुरावा करायला चिकट आहे..

  • 06 Feb 2021 01:23 PM (IST)

    आप्पा थोडक्या मतांनी गेले, नाहीतर आज दौंडलाही असाच निधी मिळाला असता – अजित पवार

    पुणे जिल्ह्यात १० जागा राष्ट्रवादीला मिळाल्या, आप्पा थोडक्या मतांनी गेले, नाहीतर आज दौंडलाही असाच निधी मिळाला असता, यशवंत माने तर इंदापूरहून मोहोळला गेले.. आणि तिकडे आमदार झाले, तुमच्या दत्तात्रय भरणे यांना मंत्री केलं.. सार्वजनिक बांधकाम खातं त्यांच्याकडे, रस्त्याची सगळी कामे पठ्ठ्याकडेच, अशोकराव चव्हाणही मदत करतात, इंदापूरचा दूध संघ कधीच बंद पडला..तुम्हाला दूध संघ चालवता येत नाही.. बॅंक चालवता येत नाही.. काय चाललंय..हर्षवर्धन पाटील यांना टोला

  • 06 Feb 2021 01:19 PM (IST)

    केंद्रात सरकार नसलं तरी सुप्रिया सुळे पाठपुरावा करत असतात – अजित पवार

    भिगवणला अडीच कोटी रुपयांचं पोलिस स्टेशन, केंद्रात सरकार नसलं तरी सुप्रिया सुळे पाठपुरावा करत असतात, यावर्षी एक लाख कोटी रुपये कमी येतील,  २५ हजार कोटी जीएसटीचं येणं, साहेब प्रयत्न करतायत,

  • 06 Feb 2021 01:18 PM (IST)

    साडेतीन लाख कोटी रुपयांमध्ये राज्य चालवायचं – अजित पवार

    सामान्य व्यक्तीला मदत व्हावी या हेतूने जिल्हा बॅंक चालवत आहोत,अनेकजण नोकरीसाठी येतात,  गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना संधी, साडेतीन लाख कोटी रुपयांमध्ये राज्य चालवायचं, दिड लाख कोटी रुपये पगारासाठी जातात, उर्वरीत दोन लाख कोटी रुपयात सर्व विभागांना निधी,

  • 06 Feb 2021 01:16 PM (IST)

    कोरोना कुणालाच सोडत नाही,  ना दादाला ना मामाला, अजितदादांची मिश्किल टोलेबाजी

    काळजी घ्या, इथं कुणीच मास्क लावलेला दिसेना,  कोरोना कुणालाच सोडत नाही,  ना दादाला ना मामाला,  दादालाही कोरोनानं सोडलं नाही,  अजितदादांची मिश्किल टोलेबाजी

  • 06 Feb 2021 01:10 PM (IST)

    कोरोना कमी होत असतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोना – अजित पवार

    जनतेच्या प्रश्नांची बांधिलकी लक्षात घेवून राष्ट्रवादी कॉंग्रेस काम करतं, आता आमचं महाविकास आघाडीचं सरकार,  साहेब, सोनियाजी, उद्धवजीनी निर्णय घेत हे सरकार स्थापन केलं, कोरोनामुळे मोठं नुकसान झालं, अनेकांना गमवावं लागलं, कोरोना कमी होत असतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोना

  • 06 Feb 2021 01:09 PM (IST)

    राज्यात कोणाचीही सत्ता असली तरी आपली कामे सुरुच राहिली पाहिजेत – अजित पवार

    इंदापूर – पूर्वी विभागीय कार्यालय कमी जागेत असल्यामुळे अडचण व्हायची, त्यामूळे इंदापूर शहराला शोभेल अशी इमारत उभारली, आता सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका, ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, त्यानंतर इतरही निवडणुका घेण्याचा निर्णय मंत्रीमंडळात घेतला, इंदापूर नगरपरिषद ३३ कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ, राज्यात कोणाचीही सत्ता असली तरी आपली कामे सुरुच राहिली पाहिजेत.

  • 06 Feb 2021 01:03 PM (IST)

    राज ठाकरे न्यायालयातून निघाले

    राज ठाकरे न्यायालयातून निघाले, आता ते ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत,  2014 च्या प्रक्षोभक भाषणाप्रकरणी त्यांना दिलासा मिळाला आहे, न्यायालयाने 15 हजारांच्या दंडावर राजद ठाकरे यांना जामीन मंजूर केला आहे, पुढील सुनावणी 5 मे रोजी, पुढील वेळी गैरहजर राहण्याची मुभा

  • 06 Feb 2021 01:01 PM (IST)

    राज ठाकरे यांना वाशी न्यायालयाकडून जामीन मंजूर

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाशी न्यायालयाकडून जामीन मंजूर, वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी जामीन, 2014 मधील प्रक्षोभक भाषण प्रकरणी दिलासा, पुढची सुनावणी 5 मे रोजी

  • 06 Feb 2021 12:54 PM (IST)

    राज ठाकरेंना वाशी न्यायालयाकडून जामीन मंजूर

    राज ठाकरेंना वाशी न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे, अवघ्या १५ मिनिटांमध्ये हा निर्णय देण्यात आला आहे

  • 06 Feb 2021 12:48 PM (IST)

    राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे न्यायालय परिसरात दाखल

    राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे न्यायालय परिसरात दाखल झाले आहेत, त्यांना आत जाण्याची परवानगीही देण्यात आली आहे

  • 06 Feb 2021 12:34 PM (IST)

    राज ठाकरेंचा ताफा वाशी न्यायालय परिसरात दाखल

    राज ठाकरेंचा ताफा वाशी न्यायालय परिसरात दाखल, इतरांना पुढे जाण्यास पोलिसांचा मज्जाव, फक्त राज ठाकरेंच्या गाडीला न्यायालयात जाण्यास परवानगी

  • 06 Feb 2021 12:31 PM (IST)

    वाशी न्यायालय परिसारत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, कुणालाही आत जाण्यास परवानगी नाही

    वाशी न्यायालय परिसारत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, कुणालाही आत जाण्यास परवानगी नाही, न्यायालयाबाहेर बॅरिगेटिंग

  • 06 Feb 2021 12:23 PM (IST)

    औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाचं ठिय्या आंदोलन, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं

    औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाचं ठिय्या आंदोलन, नरेंद्र मोदी, शरद पवार, उध्दव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्या चेहऱ्यावर काळ्या फुल्या मारलेलं निषेधाचं बॅनर क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनात झळकवण्यात आलं, आंदोलक उतरले रस्त्यावर, पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेणं सुरु, परिसरात प्रचंड गदारोळ

  • 06 Feb 2021 12:16 PM (IST)

    राज ठाकरे मनसे कार्यालयात पोहोचले, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

    राज ठाकरे मनसे कार्यालयात पोहोचले, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत, मनसे कार्यकर्त्यांकडून मनसेच्या कार्यालयाबाहेर औक्षण करत जंगी स्वागत, मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी आणि बॅनरबाजी

  • 06 Feb 2021 12:12 PM (IST)

    राज ठाकरे वाशी न्यायालयाकडे रवाना, न्यायालयात मनसेच्या विधी शाखेचे वकील हजर

    राज ठाकरे वाशी न्यायालयाकडे रवाना, वाटेत मनसैनिकांकडून आतिषबाजी, न्यायालयात विधी शाखेचे वकील हजर, 2014 च्या वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण, राज ठाकरेंच्या भाषणानंतर कार्यकर्त्यांकडून टोल नाक्याची तोडफोड, यापूर्वीही राज ठाकरेंना समन्स बजावण्यात आला होता,

  • 06 Feb 2021 11:57 AM (IST)

    रस्त्यात फाटाक्यांची आतिषबाजी करुन राज ठाकरेंचं स्वागत

    रस्त्यात फाटाक्यांची आतिषबाजी करुन राज ठाकरेंचं स्वागत, ठिकठिकाणी बॅनरबाजी

  • 06 Feb 2021 11:54 AM (IST)

    राज ठाकरेंचा ताफा वाशी टोल नाक्यावर, मनसे कार्यकर्ते ताफ्यात सामील

    राज ठाकरेंचा ताफा वाशी टोल नाक्यावर, मनसे कार्यकर्ते ताफ्यात सामील, हजारोंटच्या संख्येने मनसैनिक राज ठाकरेच्या ताफ्यासोबत न्यायालयाच्या दिशेने निघाले आहे

  • 06 Feb 2021 11:51 AM (IST)

    राज ठाकरेंचा ताफा वाशी टोल नाक्यावर पोहोचला

    राज ठाकरेंचा ताफा वाशी टोल नाक्यावर पोहोचला, टोल नाक्यावर कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणात घोषणा,

  • 06 Feb 2021 11:39 AM (IST)

    राज ठाकरेंचा ताफा फ्री-वेवरुन वाशीच्या दिशेने

    राज ठाकरेंचा ताफा फ्री-वेवरुन वाशीच्या दिशेने,स थोड्याच वेळात राज ठाकरे वाशी टोल नाक्यावर पोहोचतील, हजारो कार्यकर्त्यांची वाशी टोक नाक्यावर गर्दी

  • 06 Feb 2021 11:16 AM (IST)

    राज ठाकरे वाशी न्यायालयाकडे रवाना, सोबत नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर

    राज ठाकरे वाशी न्यायालयाकडे रवाना, सोबत नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर, सध्या ते दादरपर्यंत पोहोचले आहेत, वाशी टोल नाक्यावर मनसे कार्यकर्ते मोठ्या आतुरतेने राज ठाकरेंची वाट पाहात आहेत

  • 06 Feb 2021 11:13 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाशी कोर्टाकडे रवाना

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाशी कोर्टाकडे रवाना, कृष्णकुंजबाहेर मनसे कार्यकर्त्यांची गर्दी, वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी न्यायालयात हजेरी लावणार, वाशी टोल नाक्यावर पाच हजार मनसे कार्यकर्ते जमणार, दोन हजार वाहनं, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत न्यायालयात जाणार

  • 06 Feb 2021 11:04 AM (IST)

    वाशी टोल नाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांची गर्दी, राज ठाकरेंसाठी बॅनरबाजी

    वाशी टोल नाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे थोड्याच वेळात वाशी टोल नाक्यावरुन पास होतील, यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांची टोल नाक्यावर गर्दी केली आहे, राज ठाकरेंसाठी बॅनरबाजी

  • 06 Feb 2021 09:50 AM (IST)

    शेतकरी चक्का जाम करतील, आम्ही पाठीशी – संजय राऊत 

    गाझीपूर सीमेशी संपर्कात, शेतकरी चक्का जाम करतील, आम्ही पाठीशी – संजय राऊत

  • 06 Feb 2021 09:49 AM (IST)

    पाच वर्षांसाठी ठरलं होतं, तेव्हा एका वर्षात निवडणुका होतील माहित नव्हतं – संजय राऊत

    शरद पवार म्हणाले, खुलं त्यामुळे पुन्हा चर्चा होईल, पाच वर्षांसाठी ठरलं होतं, तेव्हा एका वर्षात निवडणुका होतील माहित नव्हतं, तीन पक्ष निर्णय घेतील, तीन पक्षांचं बहुमत असलेलं सरकार, त्यामुळे टाळायला हवं

  • 06 Feb 2021 09:48 AM (IST)

    काँग्रेसला संजीवनी देणं महत्त्वाचं – संजय राऊत

    नानांवर टीका नाही, कौतुक केलंय, संजीवनी देण्याचा उत्साह महत्त्वाचा, काँग्रेस हा देशात महत्त्वाचा राजकीय पक्ष सत्तेत नसला तरीपरंपरा, इतिहास मह्त्त्वाचा, देशात संजीवनी मिळावी, ही आमची इच्छा, परिवर्तन हा अंतर्गत प्रश्न – संजय राऊत

  • 06 Feb 2021 08:58 AM (IST)

    औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन

    आजपासून औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन, क्रांती चौकात सुरु होणार मराराठ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन, मराठा समाजाला आरक्षण किंवा ओबीसीत समावेश करावा यासाठी आंदोलन, सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलनाला होणार सुरुवात, शेकडो मराठा बांधव होणार आंदोलनात सहभागी

  • 06 Feb 2021 08:58 AM (IST)

    उच्च शिक्षण नागपूर विभागाचे सहसंचालक महेश साळुंखे यांची होणार चौकशी

    उच्च शिक्षण नागपूर विभागाचे सहसंचालक महेश साळुंखे यांची होणार चौकशी, आर्थिक देवाणघेवाणीचे संघटनांकडून होते आरोप, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे चौकशीचे आदेश, स्थाननिश्चितीसाठी प्राध्यापकांकडून पैसे मागत असल्याचा होता आरोप

  • 06 Feb 2021 08:57 AM (IST)

    एरंडोल येथील राहूल लहू पाटील हा जवान पंजाब पाकिस्तान सिमेवर शहीद

    जळगाव – एरंडोल येथील राहूल लहू पाटील हा जवान पंजाब पाकिस्तान सिमेवर शहीद, एरंडोल येथील शंकरनगर गांधीपूरा परिसरातील आहे रहिवासी, हा जवान पंजाब पाकिस्तान सिमेवर कर्तव्य बजावत असताना शहीद, ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली

  • 06 Feb 2021 08:57 AM (IST)

    कोल्हापूर मधील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, रुग्णाला दिले वैधता संपलेले सलाईन

    कोल्हापूर मधील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, रुग्णाला दिले वैधता संपलेले सलाईन, पेठ वडगाव येथील महादेव खंदारे यांच्या वर उपचार करताना अक्षम्य चूक, रुग्णाच्या मुलाची जिल्हा शल्य चिकित्सकाकडे तक्रार

  • 06 Feb 2021 08:56 AM (IST)

    कोल्हापुरातील सहा गावांच्या सरपंच निवडीला उच्च न्यायालयाची स्थगिती

    कोल्हापूर : जिल्ह्यातील सहा गावांच्या सरपंच निवडीला उच्च न्यायालयाची स्थगिती, आरक्षण सोडततीच्या रोटेशन मध्ये अनियमितता दिसत असल्याचं स्पष्ठ करत दिली स्थगिती, शिरोळ मधील दोन करवीर मधील दोन तर पन्हाळा आणि भुदरगड तालुक्‍यातील प्रत्येकी एका गावाचा समावेश, सोडतीच्या अनियमितते बद्दल गावातील काहींनी केली होती याचिका, याचिकाकर्त्यांच्या तक्रारीवरून सुनावणी घ्या तोपर्यंत सरपंच निवड करू नका, उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

  • 06 Feb 2021 08:52 AM (IST)

    निगडीतील सराईत गुन्हेगार रोहन चंदेलिया उर्फ चंडालिया याच्या टोळीवर मोक्काची कारवाई

    पिंपरी चिंचवड – निगडीतील सराईत गुन्हेगार रोहन चंदेलिया उर्फ चंडालिया याच्या टोळीवर मोक्काची कारवाई, 10 गुन्हेगारांवर करण्यात आली ही मोक्काची कारवाई,त्यातील 2 आरोपी हे अल्पवयीन, या आरोपींच्या विरोधात दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत, घरफोडी, बलात्कार, असे एकूण 30 गंभीर गुन्हे पिंपरी-चिंचवड शहर, पुणे शहर येथे दाखल आहेत, याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिले आहेत

  • 06 Feb 2021 08:51 AM (IST)

    औरंगाबादेत सोमवार पासून सुरु होणार पाचविचे वर्ग

    औरंगाबाद : औरंगाबादेत सोमवार पासून सुरु होणार पाचविचे वर्ग, आतापर्यंत सुरु झालेत 6 वी पासून 10 वी पर्यंतचे वर्ग, आता सोमवारी 5 विचा वर्गही होणार सुरू, 1 ते 4 थीच्या वर्ग अजूनही रहाणार बंदच

  • 06 Feb 2021 08:49 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यातील पाच गावातील सरपंच निवडीला 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती

    सोलापूर – जिल्ह्यातील पाच गावातील सरपंच निवडीला 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती, सरपंच निवडीसाठी जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आरक्षण सोडतीवर घेण्यात आला होता आक्षेप, पाच गावातील प्रतिनिधींनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती याचिका दाखल, याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर पाच गावातील सरपंच निवडी 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

  • 06 Feb 2021 08:46 AM (IST)

    अवेळी पाऊस आणि वातावरण बदलाचा नागपुरी संत्र्याला मोठा फटका

    अवेळी पाऊस आणि वातावरण बदलाचा नागपुरी संत्र्याला मोठा फटका,  नागपूर जिल्ह्यात मृग बहाराचं 50 टक्क्यांपेक्षा उत्पादन घटलं, मृग बहाराचं उत्पादन घटल्याने संत्राउत्पादक अडचणीत, अंबीया बहाराच्या संत्र्याला दर मिळाला नाही, आता मृगाचं उत्पादन घटलं, संत्राउत्पादक शेतकऱ्यांचं हेक्टरी एक लाख रुपयांपर्यंत नुकसान

  • 06 Feb 2021 08:45 AM (IST)

    उपमुख्यमंत्र्यांचा बारामतीत जनता दरबार, नागरीकांच्या समस्येवर `दादा स्टाईल´ निर्णय

    बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत जनता दरबार, इंदापूरच्या कार्यक्रमापूर्वी बारामतीत जनता दरबाराचं आयोजन, अजितदादांना भेटण्यासाठी नागरिकांची गर्दी, अधिकारी वर्गासोबत अजितदादा घेतायत प्रत्येक नागरिकाची भेट, नागरीकांच्या समस्येवर `दादा स्टाईल´ निर्णय

  • 06 Feb 2021 08:42 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील मिहान प्रशासनाची 12 कंपन्यांना नोटीस, जमीन घेऊन उद्योग सुरु न केल्याने बजावली नोटीस

    नागपूर जिल्ह्यातील मिहान प्रशासनाची 12 कंपन्यांना नोटीस, जमीन घेऊन उद्योग सुरु न केल्याने बजावली नोटीस,  जमिनीची मालकी हक्क सोडण्याबाबत बजावली नोटीस, नागपूरच्या औद्योगिक विकासाला ब्रेक लागल्याची चर्चा,  अनेक कंपन्यांनी मिहानमध्ये जमीन घेऊन उद्योग सुरु केले नाहीत

  • 06 Feb 2021 08:41 AM (IST)

    पुणे म्हाडाच्या ऑनलाईन सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जदारांचे एकाच छताखाली होणार कागदपत्रांची तपासणी

    पुणे : पुणे म्हाडाच्या ऑनलाईन सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जदारांचे एकाच छताखाली होणार कागदपत्रांची तपासणी, अर्ज पात्रतेचे शिबिर दिनांक ०८ ते १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत,  पुणे म्हाडा कार्यालयात शिबिराचे आयोजन, शिबिराची माहिती यशस्वी झालेल्या सर्व अर्जदारांना या कार्यालयामार्फत ईमेलद्वारे कळविण्यात आले आहेत, यशस्वी अर्जदारांनी ईमेलद्वारे कळविलेल्या रकमेचा भरणा करून कागदपत्रांची पूर्तता करून संबधित तारखेपर्यंत शिबिरस्थळी उपस्थित राहण्याचं आवाहन.

  • 06 Feb 2021 08:38 AM (IST)

    नातू-आजीला सूरीचा धाक दाखवत गोधडीत तोंड दाबून ऐवज लुटला, सोलापुरातील धक्कादायक घटना

    सोलापूर : ग्रामीण भागात चोरीचं सत्र कायम सुरुच, रात्री शेतात पाणी देण्यास गेलेल्याच्या घरावर दरोडा, साडेअकरा लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटला, नातवासह झोपलेल्या आजीला सूरीचा धाक दाखवत गोधडीत तोंड दाबून चोरट्यांनी ऐवज लुटला, बार्शी शहरातील घटना, शेतीसाठी रात्री वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी गेल्याची संधी साधून दरोडेखोरांनी साधला डाव, अनोखी सहा जणांच्या विरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 06 Feb 2021 08:35 AM (IST)

    कोल्हापूर तिरुपती विमानसेवा 25 फेब्रुवारी पासून होणार सुरु

    कोल्हापूर : कोल्हापूर तिरुपती विमानसेवा 25 फेब्रुवारी पासून होणार सुरु, लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी 24 मार्च पासून बंद आहे कोल्हापूर तिरुपती विमानसेवा, अकरा महिन्यापासून बंद असलेली सेवा पूर्ववत होणार असल्यानं प्रवासी भाविकांना दिलासा, सेवा सुरु करण्यासाठी इंडिगो कंपनीकडून विमानतळ प्राधिकरणाच्या पत्रव्यवहार, डीजीसीएकडून परवानगीची प्रतीक्षा

  • 06 Feb 2021 08:33 AM (IST)

    सातारा रस्त्यावर कात्रज-स्वारगेट दरम्यान बीआरटी सेवेला पहिल्या दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

    पुणे : सातारा रस्त्यावर कात्रज-स्वारगेट दरम्यान बीआरटी सेवेला पहिल्या दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद, एरवी 25 ते 30 मिनिटे वेळ ज्या प्रवासाला लागत होता, तो आता 12-13 मिनिटांत झाला आहे, पहिल्या दिवशी प्रवाशांचा गोंधळ उडू नये म्हणून पीएमपीने वाहतूक पोलिस आणि 30 सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले, पोलिसांचा खडा पहारा असल्यामुळे काही ठिकाणी झालेली वाहतूक कोंडी लवकर सुटली

  • 06 Feb 2021 06:29 AM (IST)

    मेंढपाळांवर बीडमध्ये हल्ला, विना परवाना मेंढ्या शेतात नेल्याने धारदार शस्त्राने हल्ला

    बीड : बारामतीच्या मेंढपाळांवर बीडमध्ये हल्ला, विना परवाना मेंढ्या शेतात नेल्याने धारदार शस्त्राने हल्ला,
    गेवराई तालुक्यातील देवा पिंपरी येथील घटना, हल्ल्यात दोन मेंढपाळ गंभीर जखमी, अज्ञात शेतकऱ्यांनी केला हल्ला, जखमींवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

  • 06 Feb 2021 06:28 AM (IST)

    महाराष्ट्रातील घडामोडी! नाना गेले, नाना आले, नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर सामनात अग्रलेख

    काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्ष पद दिले ते पाच वर्षासाठी, फक्त एक वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही, ते काही असले तरी यातून आता मार्ग काढावा लागेल, काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचाच अधिकार, पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही यासाठी सावधान राहावे लागेल, काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळत आहे, त्याचबरोबर विधानसभेला नवा अध्यक्ष मिळेल, पटोले हे विधानसभा अध्यक्षपदावरून गेले, पण काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राज्याच्या मुख्य प्रवाहात परत आले, म्हणजे नाना गेले,नाना आले! नानांना शुभेच्छा !

  • 06 Feb 2021 06:25 AM (IST)

    लातुर जिल्ह्यातून पुणे-मुंबई, औरंगाबादकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसवर कारवाई, 28 बसेस आगारात

    लातुर जिल्ह्यातून पुणे-मुंबई, औरंगाबादकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसवर आरटीओची कारवाई, 28 पेक्षा जास्त बस या संपलेले इन्शुरन्स, फिटनेस, न भरलेले कर अशी कारणे दाखवत केल्या जप्त, लातुर शहरातल्या एसटी आगारात ट्रॅव्हल्स बस लावल्या, प्रवाश्यांची तारांबळ वाढली, प्रवाश्यांच्या सुविधेसाठी एसटी बसेसची केली सोय, मध्यरात्री अचानक झालेल्या कारवाईने प्रवाश्यांचे हाल