LIVE | अजित पवारांच्या अध्यक्षेखाली डीपीडीसीची बैठक, भाजपचा बहिष्कार

| Updated on: Feb 08, 2021 | 10:52 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

LIVE | अजित पवारांच्या अध्यक्षेखाली डीपीडीसीची बैठक, भाजपचा बहिष्कार
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Feb 2021 07:47 PM (IST)

    अजित पवारांच्या अध्यक्षेखाली डीपीडीसीची बैठक, भाजपचा बहिष्कार

    अजित पवारांच्या अध्यक्षेखाली डीपीडीसीची बैठक पार पडली. या बैठकीवर भाजपने बहिष्कार टाकला. जिल्हा वार्षिक योजनेत महसूल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्ह्याला 22-23 प्रोत्साहनपर 50 कोटींचा अतिरिक्त निधी देऊ, असे अजित पवार म्हणाले. याला आव्हानफंड असे नाव दिले आहे

  • 08 Feb 2021 06:50 PM (IST)

    मावळ आणि खेड तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडीला स्थगिती

    मावळ तालुक्यातील परंदवडी व खेड तालुक्यातील मेदनकरवाडी, बिरदवडी नाणेकरवाडी येथील सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची सुनावणी मंगळवारी 9 फेब्रुवारी ला आहे. त्यामुळे या तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी न घेता त्या 16 फेब्रुवारी पर्यंत राखून ठेवण्याचा पुणे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिला आहे.

  • 08 Feb 2021 05:56 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 196 कोरोनाग्रस्तांची वाढ, 5 जणांचा मृत्यू

    पुण्यात दिवसभरात 196 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. तसेच पुण्यात दिवसभरात एकूण 219 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात एकूण 110 गंभीर कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहेत.

  • 08 Feb 2021 05:45 PM (IST)

    दबाव टाकून ट्विट करायला सांगितलं असेल तर त्याची चौकशी व्हावी : उदय सामंत

    सेलिब्रिटींवर दबाव टाकून त्यांना ट्विट करायला लावले असेल तर त्याची चौकशी करायला हवी अशी भूमिका उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मांडली. शेतकरी आंदोलन करतोय त्याच्या बाजूने सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने कुणी नाही हे दाखवण्यासाठी हे षडयंत्र असू शकतं, असेही सामंत म्हणाले. तसेच, दबाव टाकून सेलिब्रिटींना ट्विट करायला सांगितले असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, असे सामंत म्हणाले.

  • 08 Feb 2021 05:19 PM (IST)

    संशयित आरोपीला ताब्यात घेण्यावरून औरंगाबादेत पोलीस-जमावामध्ये वाद

    संशयित आरोपीला ताब्यात घेण्यावरून औरंगाबादेत पोलीस-जमावामध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीला ताब्यात घेण्याच्या कारणावरून काल रविवारी मोठा जमाव औरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यालयावर जमला होता. यावेळी पोलीस आणि जमावामध्ये बाचाबाची झाली. तर काही वेळा धक्काबुक्की झाल्याचीही माहिती समोर येत आहे. यात एका व्हिडिओत पोलीस जमावाला शिव्या घालत असल्याचाही प्रकार समोर आला आहे. जमाव जमल्यामुळे आरोपीला पळ काढायला संधी मिळाली. त्यामुळे जमावतील काही जणांवर कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

  • 08 Feb 2021 05:16 PM (IST)

    आंगणेवाडीची यात्रा यावर्षीची यात्रा रद्द, यात्रेत फक्त धार्मिक विधी होणार

    आंगणेवाडीची यात्रा यावर्षीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. यावेळी आंगणेवाडीच्या यात्रेत फक्त धार्मिक विधी केले जाणार आहेत. यावेळी सर्व कोरोना नियम पाळले जातील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

  • 08 Feb 2021 05:00 PM (IST)

    नागपूरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर भाजप आमदारांचा बहिष्कार

    नागपूर विभागीय जिल्हा नियोजन समिती बैठकीवर भाजप आमदारांचा बहिष्कार, बैठकीबाहेर आमदारांची निदर्शने,  गेल्या सरकारच्या तुलनेत DPC चा निधी वाढवून द्यावा. महानगर पालिकेला निधी देण्यात यावा. जानेवारी मध्ये मिळालेला अखर्चित निधी खर्च करायला अधिकचा वेळ द्यावा या मागण्या घेऊन भाजप आमदारांचा बहिष्कार

  • 08 Feb 2021 04:24 PM (IST)

    भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या गाड्यांचा ताफा अडवला

    नागपूर – नागपूरच्या वाडी परिसरात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आहे. वाढीव वीजबिलासंदर्भात निवेदन देण्यासाठी ताफा थांबविण्याचा प्रयत्न केला आहे.

  • 08 Feb 2021 03:10 PM (IST)

    खोणी-वडवली सरपंच निवडणुकी शिवसेना-मनसे वाद पेटण्याची शक्यता, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

    डोंबिवली : खोणी-वडवली सरपंच निवडणुकी शिवसेना-मनसे वाद पेटण्याची शक्यता, पोलिसांचा मोठा बंदोबस्त, सेना मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये सौम्य बाचाबाची, ग्रामपंचायत कार्यालय जवळ कार्यकर्ते जमले, शिवसेने-मनसे मध्ये सरपंचाची चुरस, खोनी वडवली ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीत उत्सुकता कायम, बहुमत गणपूर्तता नसल्याने सरपंच पदाची निवडणूक उद्या

  • 08 Feb 2021 02:35 PM (IST)

    कसारा पोलिसांची गुटखा तस्करी विरुद्ध मोठी कारवाई, 47 लाख 76 हजारचा गुटखा पकडला

    कसारा पोलिसांची गुटखा तस्करी विरुद्ध मोठी कारवाई, 47 लाख 76 हजारचा गुटखा पकडला, कसारा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या चिंतामणी वाडी चेक नाका येथे नाकाबंदी असताना गुटखा तस्करी करणाऱ्या वाहनाला पकडला

  • 08 Feb 2021 02:32 PM (IST)

    जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खासदारांचे नाव मतदार यादीत कायम, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

    नांदेड : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खासदारांचे नाव मतदार यादीत कायम, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश, सहनिबंधकांना मतदार यादीतून नाव वगळण्याचा अधिकार नसल्याचा निर्वाळा, खासदार चिखलीकर यांना मिळाला दिलासा.

  • 08 Feb 2021 01:04 PM (IST)

    इचलकरंजी शहरांमध्ये वीज बिलामध्ये सवलत व माफी व्हावी यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांचा महावितरणवर मोर्चा

    इचलकरंजी शहरांमध्ये वीज बिलामध्ये सवलत व माफी व्हावी यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांचा महावितरणवर मोर्चा, राज्य सरकारने लोक डाऊन काळातील घरगुती शेतकरी वीज बिल माफ करावे व शहरातील यंत्रमाग धारकांना ही सवलत द्यावी,आमदार प्रकाश आवाडे यांनी शहरामध्ये बाईक रॅली काढून महावितरण काढला मोर्चा, आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्षातर्फे शहरांमध्ये काढली बाईक रॅली, आमदार प्रकाश आवाडे यांची महा विकास आघाडी सरकारवर टीका तीन चाकी सरकार किती  दिवस लोकांवर अन्याय करणारा आहे, मोर्चामध्ये तृतीयपंथीयांनी घेतला सहभाग

  • 08 Feb 2021 01:04 PM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराज जयंती पूर्वतयारी बैठक सुरु

    छत्रपती शिवाजी महाराज जयंती पूर्वतयारी बैठक सुरु, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरुय, ऑनलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने बैठकीचे आयोजन, बैठकीला पालिका आयुक्त आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित.

  • 08 Feb 2021 01:03 PM (IST)

    शहरातील खड्डेमय झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करा, पाणी पुरवठा सुरळीत करा, मनमाडमध्ये जेष्ठ नागरिक रस्त्यावर

    मनमाड : शहरातील खड्डेमय झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, पाणी पुरवठा सुरळीत करावा यासह शहरातील इतर समस्या सोडवाव्यात या मागणी साठी जेष्ठ नागरिक उतरले रस्त्यावर, जेष्ठ नागरिकांनी पालिकेच्या गेट समोर सुरू केले धरणे आंदोलन

  • 08 Feb 2021 09:04 AM (IST)

    नाणार रिफायनरी समर्थक प्रवीण दरेकरांची भेट घेणार

    रत्नागिरी – नाणार रिफायनरी प्रकल्प समर्थकांचा पुन्हा एकदा एल्गार, रिफायनरी समर्थक घेणार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट, सोबतच भाजपचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची घेणार भेट, लवकरच नाणार रिफायनरी समर्थक शिष्टमंडळाची भेट घडवून आणणार, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस राजेश सावंत यांचा पुढाकार

  • 08 Feb 2021 09:03 AM (IST)

    नाशकातील खड्डे बुजवायला महापालकेला लागला मुहूर्त, 15 कोटींच्या डांबर खरेदीला स्थायी समितीची मंजुरी

    नाशिक – शहरातील खड्डे बुजवायला महापालकेला लागला मुहूर्त, तब्बल 15 कोटींच्या डांबर खरेदीला स्थायी समितीची मंजुरी, महापालिकेकडील डांबर संपल्याने शहरातील रस्त्यांची झाली होती चाळण,  खाजगी कंपन्यांनी रस्ते खोदले , मात्र डागडुजी न केल्याने नाशिककरांना सोसावा लागतोय मनस्ताप, 4 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शहर खड्डे मुक्त होण्याची नाशिककरांना अपेक्षा

  • 08 Feb 2021 08:50 AM (IST)

    नागपूर शहराला कोरोनाचा काहीसा दिलासा, रविवारी दिवसभरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

    नागपूर शहराला कोरोनाचा काहीसा दिलासा, रविवारी दिवसभरात नागपूर शहरात कोरोना मुळे एकही मृत्यू नाही, तर बाहेर जिल्ह्यातील 2 रुग्णांचा मृत्यू, 360 रुग्णांची 24 तासात नोंद, नागपुरात आता कोरोना प्रभाव काहीसा कमी होत असल्याने आरोग्य प्रशासनाला दिलासा

  • 08 Feb 2021 08:48 AM (IST)

    नाशकात तडीपार गुंडांचा तलवारीने दहशत माजवण्याचा प्रयत्न

    नाशिक – तडीपार गुंडांचा तलवारीने दहशत माजवण्याचा प्रयत्न, कुख्यात तडीपार गोलड्या ला इंदिरानगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या, साऊंनाथ नगर जॉगिंग ट्रॅक वर तडीपार असताना माजवत होता दहशत, बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी दाखल केला गुन्हा

  • 08 Feb 2021 08:48 AM (IST)

    नाशकात जिल्ह्यातील अनेक नागरिकांना कोरोनानंतर लठ्ठपणाची समस्या

    नाशिक : जिल्ह्यातील अनेक नागरिकांना कोरोनानंतर लठ्ठपणाची समस्या, तब्बल 7 हजाराहून अधिक कोरोना ग्रस्तांना बरं झाल्यानंतर लठ्ठपणाने भेडसावल्याच समोर, अनेकांचं वजन 10 ते 12 किलो पर्यंत वाढल्याचं आलं समोर, पोस्ट कोरोना उपचारासाठी डॉक्टरांकडे गर्दी वाढली

  • 08 Feb 2021 08:45 AM (IST)

    औरंगाबादेत पाईपलाईन फुटल्यामुळे जलप्रलय, तीस फुटांपर्यंत उसळल्या पाण्याच्या लाटा

    औरंगाबाद : औरंगाबादेत पाईपलाईन फुटल्यामुळे जलप्रलय, रेल्वे स्टेशन रोडवरील भीषण घटना, पाईप लाईन फुटल्यानंतर उसळले तुफान पाणी, तीस फुटांपर्यंत उसळल्या पाण्याच्या लाटा, अनेक घरात घुसले पाणी, रस्त्यावर आणि सर्वत्र अक्षरशः पाण्याचा आला पूर

  • 08 Feb 2021 07:28 AM (IST)

    चाकण औद्योगिक वसाहतीमधील कंपनीतील कामगाराला अडवून लुटणारी टोळी गजाआड

    चाकण औद्योगिक वसाहतीमधील कंपनीतील कामगाराला अडवून लुटणारी टोळी म्हाळुंगे पोलिसांसोबत गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांच्या ताब्यात,कंपनीतील कामाची वेळ संपल्यानंतर दुचाकीवरुन घरी जात असलेल्या एका कामगाराला सहा जणांनी अडवून लुटल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती, त्यातील सहाही आरोपींना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी आणि म्हाळुंगे पोलिसानी केली अटक

  • 08 Feb 2021 07:26 AM (IST)

    नागपूर महापालिका क्षेत्रातील शाळा आज पासून होणार सुरु

    नागपूर महापालिका क्षेत्रातील शाळा आज पासून होणार सुरु, 5 वी ते 8 वी चे वर्ग होणार आज पासून सुरु, जवळपास 564 शाळा यात असून 1 लाख 40 हजार च्या जवळ विध्यर्थी आहेत, शाळांची तयारी झाली पूर्ण , कोविड साठी घालून दिलेल्या नियमांचं पालन करत होणार सुरु, ज्या पालकांनी संमती पत्र भरून दिले तेच विध्यर्थी शाळेत येणार आहेत, पहिल्या दिवशी पालकांचा किती मिळतो प्रतिसाद याकडे लक्ष

  • 08 Feb 2021 06:27 AM (IST)

    अहमदनगर जिल्ह्यातील निघोज ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांचे अपहरण

    अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामधील निघोज ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांचे राजगुरुनगर-खेड पोलिस स्टेशन हद्दी मधून अपहरण, पुण्यावरून ओझरला देवदर्शनासाठी चाललेल्या सदस्यांना 20 ते 25 जणांनी पाच वाहनांमधून येऊन लाठीकाठी तलवारीचे धाक दाखवून दोन सदस्यांचे अपहरण झाल्याने राजगुरुनगर पोलिस स्टेशन मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल, या आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 363, 365 आणि आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल, सरपंच निवडीला काही दिवस बाकी असताना घडलेल्या घटनने खळबळ

  • 08 Feb 2021 06:25 AM (IST)

    मीरा रोड येथे मैदानात उभ्या असलेल्या गॅस सिलेंडरच्या ट्रकला आग, एकापाठेपाठ एक सात सिलेंडरचा ब्लास्ट

    मीरा रोड : मीरा रोडच्या रामनगरच्या प्रेमनगर परिसरातील एका मैदानात उभ्या असलेल्या एचपी गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकला रात्री दोनच्या सुमारास आग लागली, एक-एक करून जवळपास सात गॅस सिलेंडर बाटल्याचा ब्लास्ट, घटनास्थळी मीरा भाईंदर मनपा अग्निशमन दलाच्या सात गाड्या दाखल, आगीवर नियंत्रण, घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले.

Published On - Feb 08,2021 7:47 PM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.