LIVE | माजी आमदार अनिल गोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

| Updated on: Feb 15, 2021 | 11:49 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

LIVE | माजी आमदार अनिल गोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Breaking News
Follow us on

 

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Feb 2021 09:28 PM (IST)

    माजी आमदार अनिल गोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

    धुळे : बेताल वक्तव्याप्रकरणी माजी आमदार अनिल गोटे यांच्या विरोधात शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, चिमठाणे गावात जाहीर कार्यक्रममध्ये अनिल गोटे यांनी पोलिसांबद्दल बेताल वक्तव्य केलं होत. त्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 15 Feb 2021 08:26 PM (IST)

    अकोल्यात आज दिवसभरात 76 नवे कोरोना पॉझिटिव्ह  रुग्ण

    अकोला कोरोना अपडेट

    अकोल्यात आज दिवसभरात 76 नवे कोरोना पॉझिटिव्ह  रुग्ण आढळले आहेत.

    ऐकूण कोरोनाबाधितांचा आकडा 12481 झाला आहे

    कोरोनामुळे आतापर्यंत 344 जणांचा मृत्यू

    आज दिवसभरात 50 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

    अकोल्यात सध्या 947  कोरोनाबाधितांवर उपचारा सुरु आहेत

     


  • 15 Feb 2021 07:26 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 193 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, 169 जणांना डिस्चार्ज

    पुणे : दिवसभरात  193 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

    – दिवसभरात 169 रुग्णांना डिस्चार्ज

    – पुण्यात करोनाबाधीत  4 रुग्णांचा मृत्यू

    – 151 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 195187

    – पुण्यात सध्या 1683 ॲक्टिव्ह  कोरोना रुग्ण

    – पुण्यात आतापर्यंत 4801 जणांचा मृत्यू

  • 15 Feb 2021 07:22 PM (IST)

    बारामतीत एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेल्या 3 कोटी 2 लाख रुपयांचा अपहार सात जणांवर गुन्हा

    बारामती : एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेल्या 3 कोटी2 लाख रुपयांचा अपहार

    बारामती शहर पोलिस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल

    ऑक्टोबर  2020 मध्ये एका एटीएममध्ये  50 हजारांची तफावत आढळल्याने केलेल्या परिक्षणात 3 कोटी 2 लाखांचा अपहार झाल्याची बाब समोर

    सिक्युअर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड कंपनीचे शाखाधिकारी संदीप केतकर यांनी दिली फिर्याद

    नितीन चव्हाण, अमरसिंह पवार, महेश पवार, अभिषेक खरात, स्वप्नील आगम, विक्रम भोसले, राजेंद्र जोगदंड या सात जणांवर गुन्हा दाखल

  • 15 Feb 2021 04:57 PM (IST)

    महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 8 मार्चला

    महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाची तारीख ठरली, 8 मार्चला अर्थसंकल्प, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाची तारीख ठरली, 8 मार्चला अर्थसंकल्प, अजित पवारांची घोषणा

  • 15 Feb 2021 04:52 PM (IST)

    मुंबईतील आर. ए. कॉलिनित आग, अग्निशमनाच्या 4 गाड्या गटनास्थळी दाखल

    मुंबई : आर. ए. कॉलिनिमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती होताच येथे अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही आग रॉयल पाल्म सोसायटी जवळील जंगलात लागली आहे.

  • 15 Feb 2021 03:38 PM (IST)

    धनंजय मुंडे यांची पूजा चव्हाण प्रकरणावर मोठी प्रतिक्रिया

    पूजा चव्हाणची हत्या नाही तर पूर्णपणे आत्महत्या आहे. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहेत, मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीत सत्य समोर येईल त्यानंतर अधिक बोलता येईल, असं धनंजय मुंडे म्हणाले.

  • 15 Feb 2021 02:59 PM (IST)

    अरुण राठोड दोन दिवसात मीडियासमोर येईल, नातेवाईकांचा दावा

    पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तिचा मित्र असलेला अरुण राठोड पाच दिवसापासून गायब आहे. मात्र अरुण दोन दिवसात घरी पोहोचेल आणि माध्यमांसमोर बोलेल अशी माहिती त्याचे नातेवाईक देत आहेत. सध्या अरुणचं कुटुंब घरी आल्याने नातेवाईकदेखील गावात पोहोचले आहेत.

  • 15 Feb 2021 02:24 PM (IST)

    Pooja Chavan case : अरुण राठोडचं कुटुंब गावात पोहोचलं, मात्र बंद घरात लाखोची चोरी

    बीड: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, अरुण राठोडचं कुटुंब घरी दाखल, चार दिवसांनंतर अरुण राठोडचं कुटुंब गावात पोहोचले, अरुण राठोडच्या घरात झाली चोरी, लाखो रुपयांचा ऐवज लंपास, ऑडिओ कॉल मधला आवाज अरुण राठोडचा नाही, अरुण राठोडला यात गोवलं जातंय, अरुणची आई मीराबाई राठोड यांची टीव्ही 9 ला प्रतिक्रिया, अरुण अद्याप गायबच, दोन दिवसात अरुण माध्यमासमोर येईल, नातेवाईकांनी केलं स्पष्ट

  • 15 Feb 2021 02:24 PM (IST)

    पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, अरुण राठोडचं कुटुंब घरी दाखल, लाखो रुपयांचा ऐवज लंपास

    बीड : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, अरुण राठोडचं कुटुंब घरी दाखल, चार दिवसांनंतर अरुण राठोडचं कुटूंब गावात पोहचले, अरुण राठोड च्या घरात झाली चोरी, लाखो रुपयांचा ऐवज लंपास, ऑडिओ कॉल मधला आवाज अरुण राठोडचा नाही, अरुण राठोडला यात गोवलं जातंय, अरुणची आई मीराबाई राठोड यांची टीव्ही 9 ला प्रतिक्रिया, अरुण अद्याप गायबच, दोन दिवसात अरुण माध्यमसमोर येईल, नातेवाईकांनी केलं स्पष्ट

  • 15 Feb 2021 12:33 PM (IST)

    राज्यभरात टोलनाक्यावर फास्टटॅग अनिवार्य, मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर आजच्या दिवशी शिथीलता

    रायगड – राज्यभरात टोलनाक्यावर फास्टटॅग अनिवार्य केले असले तरीही मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर आजच्या दिवशी शिथीलता, खालापुर टोलनाक्यावर आज फास्टटॅग तर्फे अनेक स्वयंसेवक फास्टटॅग करिता उपस्थित, अनेक वाहनचालकांकडुन फास्टटॅग सर्विस काढण्यात येत आहे, या करीता फास्टटॅगची प्रक्रिया पूर्ण करुन गाडीच्या काचेवर लावण्याकरिता बारकोड असलेले स्टीकर देण्यात येत आहे, उद्यापासून फास्टटॅग नसलेल्या कारचालकांना मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर फास्टटॅग नसल्यास दुप्पट टोल आकाराली करण्यात येईल

  • 15 Feb 2021 12:24 PM (IST)

    रत्नागिरीतील खेड तालुक्यात एकाच गावात 27 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह

    रत्नागिरी – खेड तालुक्यात एकाच गावात 27 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह, वरवली धुपे वाडीत आढळले २७ कोरोना पॉझिटीव्ह, खेड तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, आरोग्य विभागाची टीम वरवलीमध्ये दाखल, तालूका वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल

  • 15 Feb 2021 11:08 AM (IST)

    माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचे निधन, वयाच्या 91 व्या वर्षी राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

    पुणे- अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना, माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचे निधन, एल्गार परिषदेचे होते अध्यक्ष, सकाळी साडेनऊ वाजता निधन, वयाच्या 91 व्या वर्षी राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, उद्या सकाळी बाणेर मध्ये होणार अंत्यसंस्कार

  • 15 Feb 2021 10:02 AM (IST)

    सोलापुरात चार वर्षात दोन वेळा झालेल्या शेतकऱ्यांना 855 कोटींची कर्जमाफी

    सोलापूर – गेल्या चार वर्षात दोन वेळा झालेल्या शेतकऱ्यांना 855 कोटींची कर्जमाफी, 855 कोटींची कर्जमाफी मिळालेले असताना कर्जांच्या थकबाकीचा आकडा पुन्हा वाढला, 756 कोटी 76 लाख आवर थकबाकीचा आकडा पोचलला, जिल्हा बँकेची बिघडलेली आर्थिक घडी बसविताना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनासमोर मोठे आव्हान, कर्ज माफी जिल्हा बँकेला 855 कोटी रुपये मिळाले, तरीही शेतकऱ्यांकडे 556 कोटी रुपयांची थकबाकी, तर 360 कोटी रुपयांची चालू बाकी, वसुलीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 232 वसुली मिळावे

  • 15 Feb 2021 09:59 AM (IST)

    पोलिसावर चाॅपरने हल्ला, सुदैवाने वाचला पोलीस हवालदार

    पोलिसावर चाॅपरने हल्ला, सुदैवाने वाचला पोलीस हवालदार, दारू मिळाली नाही म्हणून २० वर्षिय तरूणाने हव्ला केल्याची माहिती,  पोलीस आणि चाॅपरमॅनची स्टेशनवर झाटपटी, शिवडी स्टेशन मास्तरच्या आॅफिसचीही नासधूस, आरोपी वडाळा जीआरपीच्या ताब्यात, पोलिसांकडून आरोपीला चोप, फोटो व्हिडीयो हाॅटलाईनला

  • 15 Feb 2021 09:12 AM (IST)

    पुण्यात गेल्या आठ दिवसांमध्ये कोरोनाच्या 2012 रुग्णांची नोंद

    पुणे – पुण्यात गेल्या आठ दिवसांमध्ये कोरोनाचे दोन हजार 12 रुग्णांची नोंद, त्यापैकी 813 रुग्ण पहिल्या चार दिवसांमध्ये आढळले, तर, त्यानंतरच्या चार दिवसांमध्ये कोरोनाच्या एक हजार 199 रुग्णांचे निदान, गेल्या 48 तासांमध्ये 685 जणांना कोरोनाची लागण

  • 15 Feb 2021 09:11 AM (IST)

    कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाअंतर्गत वरिष्ठ महाविद्यालयं 11 महिन्यानंतर गजबजली

    कोल्हापूर – आज पासून राज्यातील महाविद्यालय झाली सुरू, शिवाजी विद्यापीठाअंतर्गत असलेली वरिष्ठ महाविद्यालयं 11 महिन्यानंतर गजबजली, कोरोनाच्या पार्श्वभूमी विद्यालय प्रशासनाकडून घेतली जातेय विशेष काळजी, थर्मल चेकिंग, सॅनिटायझर देऊनच विद्यार्थ्याना वर्गात प्रवेश, 11 महिन्या नंतर भेटले वर्गातले मित्र मैत्रिणी, विद्यार्थ्यांसह शिक्षकां मध्ये उत्साह

  • 15 Feb 2021 09:10 AM (IST)

    खाजगी महाविद्यालयं सुरु करताना शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करा

    नाशिक – खाजगी महाविद्यालयं सुरु करताना शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करा, खाजगी शिक्षण संस्था महामंडळाचे विभागीय अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांचं आवाहन, मास्क , सॅनिटायझर असल्याशिवाय विद्यार्थ्याना प्रवेश दिला जाणार नाही, कोरोना चा वाढता आकडा लक्षात घेता, पुढच्या आठवड्यात आढावा घेऊन पुढचा निर्णय घेऊ

  • 15 Feb 2021 07:47 AM (IST)

    ट्रक पलटी होऊन 15 मजुरांचा मृत्यू, यावल येथील घटना

    यावल तालुक्यातील किनगाव गावाजवळ यावल चोपडा रस्त्यावरील मंदिर हॉटेलच्या समोर वळणावरती किनगाव मधून पपईच्या भरलेला ट्रक मजुरांचा यावलकडे येत असताना रात्री बारा ते एक वाजेच्या दरम्यान खड्डे पडल्याने ट्रक पलटी होऊन यात ट्रक वरती बसलेले 15 मजूर जागीच ठार झालेत, घटनास्थळी जळगाव आणि यावल येथील पोलीस थापा हजर झाला पलटी झालेल्या ट्रक क्रेनच्या साह्याने काढण्यात आला आणि मजुरांनाही काढण्यात आली

  • 15 Feb 2021 07:40 AM (IST)

    राज्यात एकीकडे रेती तस्करी, तर नागपूर जिल्ह्यात मोफत रेती

    राज्यात एकीकडे रेती तस्करी, तर नागपूर जिल्ह्यात मोफत रेती, नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघात मोफत रेती, घरकुलच्या लाभार्थ्यांना मिळते घरपोच मोफत रेती,  रामटेकचे आमदार आशिष जैसवाल यांची माहिती, मोफत रेतीच्या अभिनव योजनेचं सर्वत्र होतेय कौतुक,  ‘रामटेक, मौदा, पारशिवनीत हजारो घरकुलच्या लाभार्थ्यांना मोफत रेती’
  • 15 Feb 2021 07:39 AM (IST)

    गणेश जयंतीनिमित्त शिवाजी रस्त्यावर वाहतुकीत बदल

    पुणे – गणेश जयंतीनिमित्त आज सोमवारी शिवाजी रस्त्यावर वाहतुकीत बदल, शिवाजी रस्त्याकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली, शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची गर्दी अधिक होण्याची शक्‍यता, त्यामुळे शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्‍त राहुल श्रीरामे यांनी याबाबतचे आदेश

  • 15 Feb 2021 07:36 AM (IST)

    पुण्यात दत्तनगर चौकामध्ये एका व्यापाऱ्यावर गोळीबार

    पुणे – रविवारी रात्री दत्तनगर चौकामध्ये एका व्यापाऱ्यावर गोळीबार, विशाल पंजाबी या 32 वर्षीय व्यापाऱ्यांच्या डोक्याला गोळी चाटून गेल्याने ते गंभीर जखमी, त्यांना उपचारासाठी करण्यात खाजगी रुग्णालयात दाखल, दत्तनगर परिसरात पंजाबी यांचे बालाजी ट्रेडिंग नावाचे किराणा दुकान, या ठिकाणी त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार करून तो पसार, गोळीबाराचे कारण समजु शकले नाही, भारती विद्यापीठ पोलीस करतायेत तपास

  • 15 Feb 2021 07:33 AM (IST)

    पुण्यात गुरुवारी पावसाची शक्यता

    पुणे – पुण्यात गुरुवारी पावसाची शक्यता, उत्तर मध्य महाराष्ट्रलगत आलेल्या चक्रवातामुळे पुणे शहरात १६ फेब्रुवारीपासून आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता, यामुळे किमान तापमानात वाढ होऊन ते १६ अंशापर्यंत वाढण्याची शक्यता, १८ फेब्रुवारी रोजी आकाश सामन्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, पुणे वेधशाळेने वर्तवली शक्यता

  • 15 Feb 2021 07:28 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात 24 तासांत 455 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    नागपूर जिल्ह्यात 24 तासांत 455 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभुमीवर मनपा अलर्टवर, नागपूरातील कोरोना हॅाटस्पॅाट परिसरातील कॅान्टॅक्ट ट्रेसिंग, 9 हॅाटस्पॅाट परिसरातील 5000 कॅान्टॅक्ट ट्रेसिंग, कॅान्टॅक्ट ट्रेसिंग केलेल्या 5000 जणांची होणार कोवीड चाचणी, हॅाटस्पॅाट परिसरातील तपासणीसाठी 72 पथकं गठित

  • 15 Feb 2021 07:27 AM (IST)

    ‘पत्नी खर्रा खाते म्हणून घटस्फोट दिला जाऊ शकत नाही’

    ‘पत्नी खर्रा खाते म्हणून घटस्फोट दिला जाऊ शकत नाही’, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय,  हायकोर्टाने पतीचे अपील लावले फेटाळून, नागपूरातील शंकर आणि रिना दाम्पत्याच्या प्रकरणात निर्णय,  शंकरने घटस्फोटासाठी सुरुवातीला कुटुंब न्यायालयात दाखल केली होती याचिका

  • 15 Feb 2021 06:32 AM (IST)

    वाहनाच्या धडक्याने बिबट्याचा जागीच मृत्यू

    अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर  गुजरातच्या दिशेने मनोर दुरवेस साये  येथे  रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडक्याने  बिबट्याचा अपघात  झाल्याने बिबट्याचा   जागीच मृत्यू झाला आहे , एक वर्षाच्या सुमारास  नर जातीचा बिबट्या होता, वनविभाग अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळ  हजर असून  पंचनामा केले जात आहे, अज्ञात वाहनाच्या विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

  • 15 Feb 2021 06:25 AM (IST)

    फास्ट टँग लावा नाहीतर डबल टोल भरा, आज शेवटचा दिवस

    मुंबई – फास्ट टॅग लावा नाहीतर डबल टोल भरा, आज शेवटचा दिवस, देशातील टोल नाक्यांवरील फास्ट टॅगला आता मुजतवाढ नाही, आज अखेरचा दिवस, फास्ट टॅग नसणाऱ्या वाहनचालकांना टोलच्या दुप्पट टोल भरावा लागणार आहे