LIVE | दहावी-बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर

| Updated on: Feb 16, 2021 | 11:58 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

LIVE | दहावी-बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर
Breaking News

पुणे : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दहावी-बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार येत्या 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे. तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान होणार आहे.

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Feb 2021 08:12 PM (IST)

    दहावी-बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर

    पुणे – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र  दहावी या दोन्ही परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. येत्या एप्रिल-मे 2021 मध्ये या परीक्षा पार पडणार आहे.यानुसार दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार असून बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान होणार आहे.

  • 16 Feb 2021 07:22 PM (IST)

    अजिबात हयगय नको, कडक कारवाई करा, शक्य तिथे कंटेन्मेंट झोन बनवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

    कोविडविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

    लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे

    लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे, त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई केलीच पाहिजे

    कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा, एकेका रुग्णांचे किमान 20 तरी संपर्क शोधलेच पाहिजेत

    सर्व काही व्यवहार सुरू झाले आहेत, निर्बंध शिथिल केले आहेत त्यामुळे तरुण वर्ग घराबाहेर पडला आहे, त्यात जणू काही कोरोना संपला असे सगळे वागत आहेत, परिणामतः आपल्याच घरातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना आपण धोक्यात आणतो आहोत

    मधल्या काळात आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवून राज्याचा आरोग्य नकाशा तयार केला. यातील सह व्याधी रुग्णांची परत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरू करा

    ज्या ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉक डाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्या

    जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा

    गेले वर्षभर आपण कोरोनाशी लढतांना विविध क्षेत्रांसाठी नियम ( एसओपी) ठरविली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही हे गंभीर आहे. विशेषतः इतके दिवस थांबलेले लग्न समारंभ सुरू झाले आहेत, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रम कुठल्याही आरोग्याच्या नियमविना होतांना दिसतात. उपाहारगृह, हॉटेल्सच्या वेळा आपण वाढविल्या आहेत मात्र नियमांचे पालन होतांना दिसत नाही स्थानिक प्रशासनाच्या पथकांनी अशा सर्व ठिकाणी भेटी देऊन तत्काळ कारवाई केली पाहिजे

    ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांवर परवाने रद्द करण्याची कडक कारवाई प्रसंगी केली पाहिजे

    लोकांमध्ये बेफिकिरी आली असली तरी स्थानिक प्रशासन व पोलिसांत कर्तव्यात ढिलाई नको

    हॉटेल्स, उपाहारगृहे यांना वेळा वाढवून दिल्या आगेत मात्र नियम पाळत नसतील तर लगेच कडक कारवाई करा

    सार्वजनिक ठिकाणी पालिकांनी जंतुनाशक फवारणी नियमित करणे सुरू करावी

    गावागावात जाऊन फिरत्या वाहनाद्वारे लोकांच्या चाचण्या वाढवा

    ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या फिल्ड हॉस्पिटलमधील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरू आहेत का याची खात्री करा.ही सुविधा वापरण्याची वेळ येऊ नये पण तयारीत राहा

  • 16 Feb 2021 04:48 PM (IST)

    नारायण राणे यांची पत्रकार परिषद

    जे बोलावं ते करुन दाखवावं असे मंत्री हवे. पण अशी धमक सध्या कुठल्याही मंत्र्यांमध्ये दिसत नाही.

    हे सरकार महिलांवर अत्याचार करण्यांना पाठबळ, ताकद देत आहे. कुंपण शेत खात आहे. या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आरोप झाले. कुणावरही कारवाई नाही. सगळ्यांना अभय देणाचं काम या सरकारने चालवलं आहे.

    आम्ही दोघेही मुख्यमंत्री झालो. नबाव मलिक त्या स्पर्धेतच नाहीत. ते फार लांब आहेत. तुम्ही स्वप्नही पाहू नका

    संजय राठोड, आदित्य ठाकरेंच्या समर्थनात मोर्चे निघतात. त्यांच्या मोर्चाला परवानगी मिळते. पण शिवजयंती साजरी करयाला मिळत नाही.

  • 16 Feb 2021 11:10 AM (IST)

    “उद्धव ठाकरे सरकार चालवतात की माफियांची टोळी”: भाजप नेते किरीट सोमय्या

    “उद्धव ठाकरे सरकार चालवतात की माफियांची टोळी”, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.  संजय राठोडांचा राजीनामा नाहीतर हकालपट्टी करायला हवी, असं किरीट सोमय्या म्हणाले.

  • 16 Feb 2021 11:07 AM (IST)

    मुंबईत डॉक्टरची आत्महत्या, नायर हॉस्पिटलमधील घटना

    मुंबईत डॉक्टरची आत्महत्या, नायर हॉस्पिटलमधील घटना, मयत डॉक्टरच नाव डॉ. तुपे, ते पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी होते, आग्रिपाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद, आत्महत्येचा कारण अद्याप स्पष्ट नाही

  • 16 Feb 2021 09:59 AM (IST)

    वीजतोडणीच्या भीतीनं पुणेकरांनी भरले 113 कोटी रुपये वीजबिल

    पुणे – वीजतोडणीच्या भीतीनं पुणेकरांनी भरले 113 कोटी रुपये वीजबिल,सलग 10 महिने वीजबील न भरल्यानं महावितरणने सुरू केली होती कारवाई,वीजबील भरणा करणारा पुणे जिल्हा राज्यात अव्वल क्रमांकावर,सलग 10 महिने वीजबील न भरणाऱ्यांची संख्या तब्बल 5 लाखाच्या घरात,3 लाख घरगुती ग्राहकांचा समावेश, पुणे परिमंडलात 413 कोटी 28 लाख रुपये थकबाकी,त्यापैकी 113 कोटी 22 लाख रुपये झाले जमा,

  • 16 Feb 2021 09:50 AM (IST)

    शिवसेना नेते संजय राठोड यांचा वनमंत्रिपदाचा राजीनामा, सूत्रांची माहिती

    BREAKING | शिवसेना नेते संजय राठोड यांचा वनमंत्रिपदाचा राजीनामा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर राजीनामा पाठवल्याची सूत्रांची माहिती, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी राजीनामा

  • 16 Feb 2021 08:38 AM (IST)

    महावितरणचा जिल्ह्यातील वीज ग्राहकांना शॉक, आता पर्यंत 1 हजार 624 वीज कनेक्शन तोडले

    कोल्हापूर – महावितरणचा जिल्ह्यातील वीज ग्राहकांना शॉक, आता पर्यंत 1 हजार 624 वीज कनेक्शन तोडले, लॉकडाऊन काळातील थकीत वीज न भरलेल्या ग्राहकांवर कारवाई च्या मोहिमेला सुरुवात, ग्रामीण भरतील कनेक्शन तोडण्यावर महावितरणचा भर,ग्राहकां मधून संताप, कनेक्शन तोडलेल्या भागांची नाव गुलदस्त्यात ठेवण्याचा महावितरणचा प्रयत्न

  • 16 Feb 2021 08:37 AM (IST)

    औरंगाबाद महापालिकेत कर्मचाऱ्यांची मेगाभरती, 953 वेगवेगळ्या पदांची होणार भरती

    औरंगाबाद महापालिकेत कर्मचाऱ्यांची मेगाभरती, 953 वेगवेगळ्या पदांची होणार भरती, 953 पदांना राज्य सरकारने दिली मंजुरी, लवकरच भरती प्रक्रियेला होणार सुरुवात

  • 16 Feb 2021 08:36 AM (IST)

    औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक घोषीत

    औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक घोषीत, 21 मार्चला होणार जिल्हा बँकेसाठी मतदान, तर 22 तारखेला मतमोजणी करून लागणार निकाल, बँकेच्या 21 संचालकांसाठी होणार मतदान, 15 फेब्रुवारी पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास होणार सुरुवात, सध्या औरंगाबाद जिल्हा बँकेवर आहे काँग्रेसचे वर्चस्व, यावेळी जिल्हा बँकेवर ताबा मिळवण्यासाठी शिवसेनेची रस्सीखेच सुरू

  • 16 Feb 2021 08:01 AM (IST)

    नाशकात मनपा स्थायी समितीची उद्या विशेष महासभा

    नाशिक – मनपा स्थायी समितीची उद्या विशेष महासभा, महापालिका असगुक्तांकडून 2000 कोटींचे अंदाजपत्रक येण्याची शक्यता, कोरोना मुळे यंदाच्या वर्षी मोठी वित्तीय तूट निर्माण होण्याची शक्यता, मनपावर सध्या सुमारे 1600 कोटींचे दायित्व असल्याने कर्ज काढण्यावर मर्यादा

  • 16 Feb 2021 08:01 AM (IST)

    नागपुरातील मोडिकल आणि डेंटलच्या 15 विद्यार्थ्यांना कोरोना

    नागपुरातील मोडिकल आणि डेंटलच्या 15 विद्यार्थ्यांना कोरोना, वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या 15 विद्यार्थ्यांवर कोव्हिड रुग्णालयात उपचार सुरु, मेडिकलचं वसतीगृह झालं कोरोनाचं हॅाटस्पॅाट,  सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती, जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीची चिंता

  • 16 Feb 2021 08:00 AM (IST)

    1 मे पासून सुरू होणार ‘नाशिक वन फिफ्टी वन’

    नाशिक – 1 मे पासून सुरू होणार ‘नाशिक वन फिफ्टी वन’, नाशिक जिल्हा निर्मितीला दीडशे वर्ष झाल्याने होणार महोत्सव, महोत्सव निमित्त जिल्ह्याची ओळख देशपातळीवर अधोरेखित करण्याचा प्रयत्न, तीन टप्प्यात महोत्सवाचं नियोजन, पालकमंत्री भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती होणासर स्थापन

  • 16 Feb 2021 07:59 AM (IST)

    दारु पिण्यास पैसे न दिल्याने सराईत गुन्हेगाराचा हमालावर हल्ला, नाशकातील घटना

    नाशिक – दारु पिण्यास पैसे न दिल्याने सराईत गुन्हेगाराचा हमालावर हल्ला, भाजी मार्केट मधून घरी जात असताना हमालावर केला कोयत्याने हल्ला, सराईत गुन्हेगार पोलिसांनी घेतलं ताब्यात, शहरात सध्या तडीपार गुन्हेगारांचा हैदोस सुरू, पोलिसांच्या कठोर कारवाईची प्रतीक्षा

  • 16 Feb 2021 07:59 AM (IST)

    चंदगड तालुक्यातील अडकुर इथं जनावरांच्या गोट्याला भीषण आग, आगीत एका म्हशीचा मृत्यू

    कोल्हापूर -चंदगड तालुक्यातील अडकुर इथं जनावरांच्या गोट्याला भीषण आग, आगीत एका म्हशीचा मृत्यू तर इतर तीन जनावरे गंभीररीत्या होरपळली, शेतकरी प्रशांत पाटील यांच्या शेतातील दुर्घटना, दुर्घटनेत सुमारे अडीच लाखांचे नुकसान, गवताची गंजी आणि इतर पीकही जळून खाक, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

  • 16 Feb 2021 07:57 AM (IST)

    मांडवगण फराटा-आंधळगाव रस्तावर जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणी

    मांडवगण फराटा-आंधळगाव रस्तावर जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणी, रस्त्यावरील खड्यांमध्ये पाणी साचून अपघाताची परिस्थिती झाली निर्माण, या भागातील नागरिकांना जीव मुठीत धरून करावा लागत आहे प्रवास, प्रशासनाला तातडीने कळवून देखील दखल घेतली गेली नाही

  • 16 Feb 2021 07:57 AM (IST)

    घरगुती गॅस सिलिंडरला महागाईचा भडका, 50 रुपये दरवाढीनंतर सिलिंडरचे दर पोहोचले 825 वर

    घरगुती गॅस सिलिंडरला महागाईचा भडका, 50 रुपये दरवाढीनंतर सिलिंडरचे दर पोहोचले 825 वर,  गॅस सिलिंडरच्या वाढत्या मागणीमुळे सर्वसामान्य त्रस्त गॅस सिलिंडरच्या महागाईमुळे अनेकांचं बजेट बिघडलं

  • 16 Feb 2021 07:56 AM (IST)

    सायबर पोलिसांच नाशिककरांना अलर्ट, बनावट क्यु-आर कोडच्या माध्यमातून फसवणूक करणारी टोळी सक्रिय

    नाशिक – सायबर पोलिसांच नाशिककरांना अलर्ट, बनावट क्यु-आर कोडच्या माध्यमातून फसवणूक करणारी टोळी सक्रिय, क्यु-आर कोड देऊन मागवला जातोय चार अंकी कोड, कोड देताच होताहेत अकाउंट मधले पैसे गायब, अनेक नागरिकांची फसवणूक झाल्याचं आलंय समोर, बँके संबंधी माहिती कोणाशीही शेअर न करण्याच्या सायबर पोलिसांच्या नागरिकांना सूचना

  • 16 Feb 2021 07:55 AM (IST)

    अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीनेच केली नवविवाहितेची हत्या, नागपुरातील घटना

    नागपूर : एमआयडीसी, भीमनगर भागात नवविवाहितेची हत्या, पतीनेच केली पत्नीची हत्या, अनैतिक संबंधाच्या निर्माण झालेल्या वादातून केली हत्या, दीप्ती नागमोती असं हत्या झालेल्या पत्नीचे नाव तर अरविंद नागमोती असं आरोपी पतीचे नाव, पतीच्या लग्नापूर्वीच्या प्रेमप्रकरणाची ऑडिओ रेकॉर्डिंग पत्नीने ऐकल्याने निर्माण झाला होता वाद, या वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून केली हत्या, पती फरार असून पोलीस घेताहेत शोध

  • 16 Feb 2021 07:53 AM (IST)

    संजय राठोड राजीनामा देण्याची दाट शक्यता

    पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात विरोधकांच्या टीकेचा जोर वाढल्यानंतर आता राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड हे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे,

  • 16 Feb 2021 07:51 AM (IST)

    महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या वतीने दिले जाणारे साहित्य पुरस्कार जाहीर

    पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या वतीने दिले जाणारे साहित्य पुरस्कार जाहीर, देवा झिंजाड, डॉ. संतोष जाधव, डॉ. द. ता. भोसले, चंद्रमोहन कुलकर्णी, शेखर देशमुख, अंजली ढमाळ यांना पुरस्कार जाहीर, कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिवशी अर्थात मराठी राजभाषा दिनी हे पुरस्कार दिले जातात, रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप, हे सर्व पुरस्कार येत्या 27 फेब्रुवारी, सायंकाळी चार वाजता ज्येष्ठ लेखिका मंगला आठलेकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार

  • 16 Feb 2021 07:48 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होतोय, 24 तासांत जिल्ह्यात 498 नवे रुग्ण

    नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होतोय, 24 तासांत जिल्ह्यात 498 नवे रुग्ण, सहा जणांचा मृत्यू, गेल्या पाच दिवसांत 2558 नव्या रुग्णांची नोंद,  जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 4261 वर, प्रयोगशाळेत क्षमतेपेक्षा कमी चाचण्या, चिंता वाढली, चाचण्या वाढविण्याची मागणी

  • 16 Feb 2021 07:47 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यामधील सरपंच, उपसरपंच निवडीचा मार्ग मोकळा

    पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यामधील सरपंच, उपसरपंच निवडीचा मार्ग मोकळा, खेड,शिरूर,मावळ,बारामती तालुक्यातील काही गावाने सरपंच पदाच्या आरक्षण सोडती बाबत संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती,न्यायालयाने पुणे जिल्हाधिकारी यांना संबंधित ग्रामपंचायतीचे म्हणणे ऐकुन निकाल देण्यास सांगितला होता, त्यानुसार संबंधित याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकुन घेऊन सर्व याचिका फेटाळून लावल्या, यामुळे या चार ही तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निवडीचा मार्ग मोकळा, या चार ही तालुक्यातील निवडणूक कार्यक्रम लवकरच होणार जाहीर

  • 16 Feb 2021 07:47 AM (IST)

    चंदगड तालुक्यातील सोनारवाडी इथल्या नवनिर्वाचित महिला ग्रामपंचायत सदस्याची आत्महत्या

    चंदगड तालुक्यातील सोनारवाडी इथल्या नवनिर्वाचित महिला ग्रामपंचायत सदस्याची आत्महत्या, यल्लुबाई गावडे असं आत्महत्या केलेल्या महिला सदस्याच नाव, बेळगाव जिल्ह्यातील माणिकेरी इथं माहेरी विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या, आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट

  • 16 Feb 2021 07:46 AM (IST)

    नाशकात कोरोनाचा कहर पुन्हा वाढला, कोरोनाबाधित 204 नवीन रुग्ण दाखल

    नाशिक – शहरात कोरोनाचा कहर पुन्हा वाढला, कोरोना बाधित 204 नवीन रुग्ण दाखल, सर्वाधिक 145 रुगब नाशिक महापालिका हद्दीत, तर दोघांनाच कोरोना मुळे मृत्यू झाल्याने भीती कायम, शहर आणि जिल्ह्यात 1234 रुग्णांवर उपचार सुरू, शाळा , महाविद्यालय उघडण्याबाबत प्रशासनाने घाई न करण्याची पालकांची मागणी

  • 16 Feb 2021 07:45 AM (IST)

    नागपूरसह पूर्व विदर्भात पुढेच दोन दिवस पाऊस, गारपीटीचा अंदाज

    नागपूरसह पूर्व विदर्भात पुढेच दोन दिवस पाऊस, गारपीटीचा अंदाज, नागपूर हवामान विभागाने वर्तवला अंदाज, नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना सावधगीरीच्या सुचना,  नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपुरमध्ये पावसाचा अंदाज

  • 16 Feb 2021 07:45 AM (IST)

    उत्तर महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पाचे कार्यालय मराठवाड्याला पळवण्याचा घाट

    नाशिक – उत्तर महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पाचे कार्यालय मराठवाड्याला पळवण्याचा घाट, सर्व प्रकल्प आणि काम होणार नाशिकमध्ये , कार्यालय मात्र मराठवाड्याला, हेव्ही वेट नेते असून देखील उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी मात्र निद्रिस्त, भाजप आमदार देवयानी फरांदे करणार मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार, कार्यालय नाशिक बाहेर जाऊ न देण्याची करणार मागणी

  • 16 Feb 2021 06:35 AM (IST)

    मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर विचित्र अपघात, पाच जणांचा मृत्यू

    रायगड – मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर टेम्पो, ट्रेलर, कारसह मल्टीवेहीकल अपघातात 5 जणांचा मृत्यू, तर 5 जखमी, पुण्याकडून मुबंईकडे जाताना बोरघाट उतरताना फुडमॉल जवळ झाला अपघात, दोन जखमीनां अष्टविनायक (पनवेल) व अन्य दोन वाशी येथे मनपा रुग्णालयात व एकाला ईतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृतांना खोपोली रुग्णालयात पुढील कारवाई करीता हलविण्यात आले आहे.

  • 16 Feb 2021 06:28 AM (IST)

    पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, भाजप आमदार अतुल भाताळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

    बीड : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, बीडची शिवसेना महिला आघाडी आक्रमक, भाजप आमदार अतुल भाताळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, सेना जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण यांनी केलं पुतळ्याचं दहन, बंजारा समाजाची बदनामी थांबवा, शिवसेना महिला आघाडी आक्रमक

  • 16 Feb 2021 06:24 AM (IST)

    पेट्रोलने शंभरी गाठली, धर्माबाद तालुक्यात सर्वात महागडे पेट्रोल

    नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वात महागडे पेट्रोल मिळते, मंगळवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी धर्माबाद येथील पेट्रोल/डिझेल चे दर हे डोळे चक्रावून सोडणारे आहेत

    पेट्रोल – ९९.१७ रुपये लिटर

    डिझेल – ८८.६८ रुपये लिटर

Published On - Feb 16,2021 8:12 PM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.