LIVE | अहमदनगर जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू

| Updated on: Feb 23, 2021 | 4:07 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | अहमदनगर जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Feb 2021 09:41 PM (IST)

    अहमदनगर जिल्ह्यात संचारबंदी लागू, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे आदेश

    अहमदनगर जिल्ह्यात संचारबंदी लागू, रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे आदेश. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढत होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नियम डावलणाऱ्यांवर होणार कारवाई, लग्न,सभा,मेळावे यासह इतर गोष्टींवर निर्बंध, कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रशासनाचे निर्बंध, अहमदनगर जिल्ह्यात आता रात्री संचारबंदी..

  • 22 Feb 2021 09:19 PM (IST)

    उकळत्या तेलातून कॉईन काढायला लावण्याचे प्रकरण, महिलेच्या विनंतीवरुन गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु

    सोलापूर : उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात उकळत्या तेलातून कॉईन काढायला लावण्याचे प्रकरण,  फिर्यादी महिलेच्या विनंतीवरून सोलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु, आरोपी भगवान धनवे आणि पोलीस कर्मचारी खुने यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होणार, तसेच महिलेच्या पतीविरोधात जातपंचायत निर्मूलन कायदा आणि भा. द. वि. कलम 338 नुसार गुन्हा दाखल होणार, सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु, पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांची माहिती

  • 22 Feb 2021 09:16 PM (IST)

    सिंधुदुर्गातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरावर विनयभंगाचा गुन्हा

    सिंधुदुर्ग: जिल्हा सामान्य रूग्णालयाचे शल्यचिकित्सक डाॅ. श्रीमंत चव्हाण यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, 354 कलमांअतर्गत ओरोस पोलीस स्टेशन मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल, जिल्हा रुग्णालयातील एक कंत्राटी महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल, मागील 2 महिन्यांपासून डाॅक्टर श्रीमंत चव्हाण यांच्याकडून आपल्याला त्रास दिला जात असल्याचे नमूद करत दिली तक्रार.

  • 22 Feb 2021 08:33 PM (IST)

    अकोल्यात लॉकडाऊनचे नवीन निर्देश जारी, चिकन मटणची दुकाने सुरु राहणार

    अकोला : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत अकोल्यात उद्यापासून 1 मार्च पर्यंत लागू असणाऱ्या लॉकडाऊनसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काही नवीन निर्देश जारी केले असून…सुधारित निर्देश खालील प्रमाणे अकोला,मूर्तिजापूर आणि अकोट या शहरामध्ये खालील नियमावली जारी केली आहे.

    यात खाद्य गृहे, रेस्टॉरंट सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत सुरू राहतील..तथापी अशा प्रतिष्ठान मधील किचन व खाद्य गृहे यांना फक्त घरपोच सेवा देण्यासाठी परवानगी राहील.

    दुधाचे घरपोच वितरण सकाळी सहा ते आठ व सायंकाळी पाच ते सात राहील.

    सर्व खाजगी व वैद्यकीय सेवा पशुचिकित्सक सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील.

    सर्व रुग्णालय व रुग्णालयाची निगडित सेवा त्यांच्या वेळेवर सुरू राहतील.

    औषधांची दुकाने जी 24 तास सुरू ठेवण्याबाबत अनुज्ञेय आहेत ती दुकाने तसेच उर्वरित औषधांचे दुकाने सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत सुरू राहील.

    अकोला शहरातील अत्यावश्यक सेवेसाठी पाच पेट्रोल पंप सकाळी आठ ते तीन या कालावधीत सुरू राहील…त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील एक पेट्रोल पंप सुरू राहणार आहे.

    कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने कृषी प्रक्रिया उद्योग हे सकाळी आठ ते तीन वाजेपर्यंत सुरू राहील.

    मास विक्रीचे दुकान व अंडे विक्रीचे दुकान सकाळी आठ ते तीन वाजेपर्यंत सुरू राहील.

  • 22 Feb 2021 07:46 PM (IST)

    राज्यात दिवसभरात 5210 नवे कोरोनाबाधित, सक्रीय रुग्णांची संख्या 53,113 वर

    राज्यात दिवसभरात 5210 नव्या रुग्णांची नोंद, तर 18 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, राज्याचा मृत्यूदर 2.46 टक्के, दिवसभरात 5035 रुग्णांची कोरोनावर मात, राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 53113 वर

  • 22 Feb 2021 07:34 PM (IST)

    पंढरपुरात 24 तासांसाठी लॉकडाऊन

    पंढरपूर :  पंढरपुरात आज रात्री 12 ते उद्या रात्री 12 पर्यंत पंढरपू सह दहा गावात संचारबंदी घोषित करण्यात आली आहे, उद्या माघी एकादशीचा सोहळा, संचाबंदिच्या काळात सर्व दुकाने-आस्थापना राहणार बंद, यात्रेच्या निमित्ताने भाविक एकत्र येण्याची शक्यता असल्याने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने घेतला निर्णय, उप्पर जिल्हाधिकारी संजय जाधव यांची माहिती

  • 22 Feb 2021 07:17 PM (IST)

    वनमंत्री संजय राठोड वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाची अधिकृत माहिती

    वाशिम, दि. २२ : राज्याचे वन, भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड हे आज, २३ फेब्रुवारी रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. २३ फेब्रुवारी रोजी ११.३० वाजता श्री क्षेत्र पोहरागड (ता. मानोरा) येथे आगमन व भेट. दुपारी १ वाजता धामणगाव देव (ता. दारव्हा)कडे प्रयाण करतील.

  • 22 Feb 2021 07:14 PM (IST)

    संजय राठोड यवतमाळमध्ये, उद्या सकाळी पोहोरादेवीला पोहोचणार, समर्थकाचा दावा

    संजय राठोड उद्या सहकुटुंब पोहोरादेवीला जाणार, समर्थकाचा दावा. संजय राठोड यवतमाळमध्ये मुक्कामी असल्याची शक्यता, उद्या सकाळी 9 वाजता घरातून निघून पोहोरादेवीला जाणार, समर्थकाचा दावा

  • 22 Feb 2021 07:10 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 328 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, 13 जणांचा मृत्यू

    पुणे कोरोना अपडेट

    दिवसभरात ३२८ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ३१८ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत १३ रुग्णांचा मृत्यू. यातील ०७ रूग्ण पुण्याबाहेरील. – १७२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १९८२९२. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २९०२. – एकूण मृत्यू -४८३०. -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज १९०५६०. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४४१४.

  • 22 Feb 2021 07:06 PM (IST)

    पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट

    पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट

    आज कोरोनारुग्ण -223 कोरोनामुक्त -105 मृत्यू -01

    आत्तापर्यंत कोरोना रुग्ण -103421 कोरोनामुक्त -98362 मृत्यू -1831

  • 22 Feb 2021 07:03 PM (IST)

    नाशिक कोरोना अपडेट

    नाशिक कोरोना अपडेट –

    आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-226

    आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 224

    नाशिक मनपा- 179 नाशिक ग्रामीण- 34 मालेगाव मनपा- 03 जिल्हा बाह्य- 08

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2090

    आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यू -02 नाशिक मनपा- 01 मालेगाव मनपा- 00 नाशिक ग्रामीण- 01 जिल्हा बाह्य- 00

  • 22 Feb 2021 06:57 PM (IST)

    नाशिक पोलिसांना कोरोना काळात थेट कारवाई करण्याचे आदेश

    नाशिक – मुंबई पाठोपाठ नाशिक पोलिसांना देखील कोरोना काळात थेट कारवाईचे आदेश, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाईचे अधिकार द्यावे, पोलीस आयुक्तांचे महापालिका आयुक्तांना पत्र, नाशिक शहरात आज रात्री पासून संचार बंदी लागू, रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत राहणार संचारबंदी

  • 22 Feb 2021 06:55 PM (IST)

    नागपूर कोरोना अपडेट

    नागपूर कोरोना अपडेट –

    नागपुरात आज 710 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    तर 437 जणांनी केली कोरोनावर मात

    एकूण रुग्ण संख्या – 143843

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 133298

    एकूण मृत्यू संख्या – 4283

  • 22 Feb 2021 06:54 PM (IST)

    कल्याणच्या डी-मार्टमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

    कल्याण – डी मार्टमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, पोलिस कारवाईनंतरही नियमांची पायपल्ली, डी मार्ट बाहेर ग्राहकांची खरेदीसाठी एकच गर्दी, दोन दिवसापूर्वी पोलिसांनी डीमार्ट विरोधात कारवाई केली होती, मात्र तरीही नियमांचे उल्लंघन सुरुच

  • 22 Feb 2021 06:46 PM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यात 210 जण पॉझिटिव्ह

    यवतमाळ : जिल्ह्यात एका मृत्यूसह 210 जण पॉझिटिव्ह, 107 जण कोरोनामुक्त, सद्यस्थितीत जिल्ह्यात 1052 ॲक्टिव्ह रुग्ण, यवतमाळ जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 16 हजार 255, तर 14755 कोरोनामुक्त, एकूण 448 मृत्यूची नोंद

  • 22 Feb 2021 06:23 PM (IST)

    पालघरमधील पोल्ट्री फॉर्ममध्ये 45 कोंबड्यांचा मृत्यू, प्रशासनाची चिंता वाढली

    पालघर : पालघरमधील सूर्या कॉलनीतील सरकारी पोल्ट्री फॉर्ममध्ये अचानक 45 कोंबड्यांचा मृत्यू, या सर्व कोंबड्यांचे नमुने लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार, तीन दिवसात सातत्याने 45 कोंबड्यांचा मृत्यू, प्रशासनाची चिंता वाढली, पोल्ट्री फार्ममध्ये बाहेरच्यांना प्रवेश निशिद्ध

  • 22 Feb 2021 06:18 PM (IST)

    मध्यप्रदेशातून विवाहनिमित्ताने मुक्ताईनगरात आलेल्या मुलीवर बलात्कार, गुन्हा दाखल

    मुक्ताईनगर उचंदा गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मध्यप्रदेशातील मुलगी विवाहानिमित्त आली असताना बलात्कार, आरोपी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात, मुक्ताईनगर पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल

  • 22 Feb 2021 06:15 PM (IST)

    जळगाव जिल्ह्यात रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी, पालकमंत्र्यांचे निर्देश

    जळगाव जिल्ह्यात रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश, शाळा, महाविद्यालय आणि खाजगी शिकवणीसह सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी, जिल्हाधिकार्‍यांची घोषणा. जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर चाप

  • 22 Feb 2021 06:13 PM (IST)

    पालघरमध्ये सरकारी पोल्ट्री फॉर्ममध्ये तीन दिवसात 45 कोंबड्यांचा मृत्यू

    पालघर : सूर्या कॉलनीतील सरकारी पोल्ट्री फॉर्ममध्ये अचानक 45 कोंबड्यांचा मृत्यू, कोंबड्यांचे नमुने लॅबमध्ये पाठवण्यात आले, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, तीन दिवसात सातत्याने 45 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली, पोल्ट्री फार्ममध्ये बाहेरच्यांना प्रवेश निषिद्ध

  • 22 Feb 2021 06:10 PM (IST)

    जळगावमध्ये संचारबंदी लागू, नियमांचे उल्लंघन करण्यांना बसणार चाप

    जळगाव : जिल्ह्यात रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचे निर्देश जळगावच्या पालकमंत्र्यांनी दिले आहेत. शाळा, महाविद्यालय व खाजगी शिकवणीसह सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातल्याची घोषणा जिल्हाधिकार्‍यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चाप बसणार आहे.

  • 22 Feb 2021 05:46 PM (IST)

    मुंबईतील रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ, प्रत्येकी 3 रुपये भाडेवाढ

    मुंबईत एमएमआर रिजनमध्ये ऑटो आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. ऑटो रिक्षाचे भाडे 18 वरुन 21 रुपयांवर तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये करण्याचा निर्णय झाला आहे. परिवहन आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढत आहेत. त्यामुळे ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालक आंदोलनाच्या पवित्र्यात होते. मात्र, भाडेवाढीचा निर्णय होत असल्यानं आता त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, इंधन दरवाढीचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

  • 22 Feb 2021 05:44 PM (IST)

    शिवसेना नेते अनंत तरे यांचं निधन

    शिवसेना नेते आणि ठाणे महापालिकेचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते तसेच एकवीरा देवी ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांचे निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना ब्रेन हेमरेंजचा त्रास होता. या आजारावर त्यांचे दीर्घकाळ उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

  • 22 Feb 2021 05:19 PM (IST)

    भिडे गुरुजींच्या बैठकीला पोलिसांनी परवानगी नाकारली

    कोल्हापूर : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष भिडे गुरुजींच्या बैठकीला पोलिसांनी परवानगी नाकारली, रायगडवर सुवर्ण सिंहासन आणि खडा पहारा याबाबत आयोजित केली होती बैठक, पोलिसांनी करवीर तालुक्यातील वडणगे गावातील बैठकीला परवानगी नाकारली, शिवप्रतिष्ठानमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच होणार होती बैठक, पोलिसांनी कोरोनाचे कारण देत परवानगी नाकारली

  • 22 Feb 2021 05:04 PM (IST)

    मुंबईत सार्वजनिक कार्यक्रम, लग्नसमारंभांमधून कोरोना जास्त फैलावला – सुरेश ककाणी

    मुंबई : मुंबईत सार्वजनिक कार्यक्रम, लग्नसमारंभांमधून कोरोना जास्त फैलावला आणि रुग्णसंख्या वाढली, बार, पब, रेस्टॉरंट, मंगल कार्यालयावर कारवाई सुरु, सध्याचे 82% रुग्ण असिम्पटमॅटिक, 18 % रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले, बहुतांश रुग्ण हे उच्चभ्रू वस्तीतले, नियमांचं पालन केलं तर लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही, सध्या संचारबंदीचा विचार अजेंड्यावर नाही, मास्क कारवाईसाठी पोलिसांचीही मदत घेतली जाईल, पोलिस जो दंड घेतील त्यातील 50% रक्कम महापालिकेला मिळेल आणि 50% रक्कम पोलिस कल्याण निधीसाठी देण्यात येईल, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटर आणि बेडस् पुरेसे आहेत, आधीप्रमाणेच प्रोटोकॉल पाळला जाईल, मुंबईत सध्या नाईट कर्फ्युपेक्षा लोकांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती करण्यावर भर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश ककाणी यांची माहिती

  • 22 Feb 2021 04:50 PM (IST)

    दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार, बोर्डाचे आदेश

    -दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार, ऑनलाईन परीक्षा घेेण्यास बोर्ड अनुकूल नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने घेतला दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा.  दहावी, बारावीची परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटी नसल्याने विद्यार्थ्यी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाहीत. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याबाबत बोर्डाचा आग्रह. राज्यात दहावीचे १६ लाख तर बारावीचे १४ लाख विद्यार्थी

  • 22 Feb 2021 04:45 PM (IST)

    पेट्रोल-डिझेल की मार, क्या यहीं अच्छे दिन है यार? युवासेनेचा केंद्र सरकारला सवाल

    देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलनं केली जात आहेत. मुंबईत देखील मध्यरात्री जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली आहे. वाढत्या महागाईविरोधात युवासेनेकडून भाजप आमदार आशिष शेलार यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रे पश्चिम पोस्टरबाजी होत असल्याचं बघायला मिळत आहे.

  • 22 Feb 2021 04:44 PM (IST)

    वर्धा जिल्ह्यात गेल्या पाच दिवसात 491 रुग्णांची वाढ

    वर्धा जिल्ह्यात मागील पाच दिवसात 491 रुग्ण, जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी लागू केले आहे जमावबंदी आदेश, जिल्ह्यात औषधी दुकाने वगळता सर्व आस्थापना राहणार सात वाजेपर्यंत उघडी, जिल्ह्याच्या शाळा महाविद्यालय पुढील आदेशापर्यंत आहे बंद, नियम न पाळणाऱ्यांनावर कारवाईचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

    मागील पाच दिवसात आढळलेले रुग्ण

    17 फेब्रुवारी – 85 रुग्ण 1 मृत्यू

    18 फेब्रुवारी – 89 रुग्ण 0 मृत्यू

    19 फेब्रुवारी – 108 रुग्ण 0 मृत्यू

    20 फेब्रुवारी – 56 रुग्ण 2 मृत्यू

    21 फेब्रुवारी – 153 रुग्ण 3 मृत्यू

    – जिल्ह्याच्या एकूण 11322 कोरोनाबाधित

    – आता पर्यंत जिल्ह्यात 329 कोरोनाबाधितांचा मृत्यू

    – जिल्ह्यात 679 ऍक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण

  • 22 Feb 2021 04:42 PM (IST)

    शिमगा सण साधेपणाने साजरा करा, उदय सामंत यांचे आवाहन

    रत्नागिरी जिल्ह्यात करोना परिस्थितीचा आढावा घेतल्यावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जे लोक सार्वजनिक कार्यक्रम विनापरवाना करतील त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश आपण दिले असल्याची माहिती तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. लग्नसमारंभ व हॉलच्या बाबतीतदेखील दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. काही दिवसांनी येणारा शिमगा सण हा कोकणचा आपला घरचा सण आहे. मात्र सद्य परिस्थितीचा विचार करता हा सण साजरा करायचा आहे. मात्र तो साधेपणाने साजरा करावा. तसेच जिल्ह्यातील सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धा खो खो स्पर्धा स्नेहसंमेलन इत्यादी गोष्टी काही काळाकरिता बंद कराव्यात, असेही आवाहन सामंत यांनी केले आहे

  • 22 Feb 2021 04:17 PM (IST)

    पूजा चव्हाण आत्महत्या | पुणे पोलीस नीट तपास करत नाही, चित्रा वाघ यांचा आरोप

    पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पुणे पोलीस नीट तपास करत नाही, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप, राज्यातील मंत्र्यांच्या संपर्कात जर संजय राठोड असतील तर त्यांनी पोलिसांना त्यांचा पत्ता द्यावा, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

  • 22 Feb 2021 04:14 PM (IST)

    सातारा जिल्ह्यात नाईट कर्फ्यू, महामार्ग वगळता सर्व ठिकाणी संचारबंदी

    सातारा : सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यत संचारबंदी, महामार्ग वगळता सर्व ठिकाणी संचारबंदी, जिल्ह्यातील शाळा सुरू राहणार, मात्र शाळांमध्ये तपासणी पथके पाहणी करणार.

  • 22 Feb 2021 04:13 PM (IST)

    बुलडाण्यासह पाच नगर परिषदांमध्ये लॉकडाऊन आणखी कडक

    बुलडाणा : बुलडाणा, खामगाव, देऊळगावराजा, मलकापूर आणि चिखलीसाठी लॉकडाऊन आणखी कडक, जीवनावश्यक सोडून इतर सर्व दुकाने बंद, किराणा, औषधी, भाजीपाला आणि पीठ गिरण्यासाठी सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंतची वेळ, दूध विक्रेत्यांना पहाटे 6 पासून सूट, संध्याकाळी 6 ते रात्री 8:30 पर्यंत सूट, या पाचही नगर परिषद शहरांमध्ये रात्री 8 ते सकाळी 8:30 पर्यंत नाईट कर्फ्यू, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन आणखी कडक , आज संध्याकाळी 6 पासून ते 1 मार्च सकाळी 8 पर्यंत नवीन आदेश कायम राहणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  • 22 Feb 2021 04:09 PM (IST)

    अहमदनगरमध्ये विनामास्क नागरिकांवर धडक कारवाई, 248 मंगल कार्यालयाला नोटीस

    अहमदनगर : विनामास्क नागरिकांवर धडक कारवाई, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांची थेट रस्त्यावर उतरून कारवाई, मंगल कार्यालय आणि महाविद्यालयात छापेमारी, 248 मंगलकार्यालयाला नोटीस, तर 2 हजारापेक्षा ज्यास्त नागरिकांवर विना मास्कची कारवाई, तब्बल 2 लाख 30 हजाराचा दंड वसूल, नियम न पाळल्यास कडक कारवाईचा इशारा

  • 22 Feb 2021 03:39 PM (IST)

    दमन दीवचे अपक्ष खासदार मोहन डेलकर मृतावस्थेत, आत्महत्येचा संशय

    दमन दीवचे अपक्ष खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar) हे मुंबईतील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे. मरीन ड्राईन परिसरातील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळला.

  • 22 Feb 2021 03:29 PM (IST)

    आमदारा नितेश राणे यांची सामना, महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर जोरदार टीका

    सिंधुदुर्ग : आता वेगळ्या प्रकारचा सामना आम्हाला वाचायला मिळतोय, बाळासाहेबांच्या काळात हिंदुत्वाचा गवगवा करणारा सामना आम्ही वाचलाय, आता हा उद्धव ठाकरेंचा नवीन सामना मार्केटमध्ये येतोय, इथे हिंदूंना विरोध केला जातो, हिंदूविरोधी सामना वाचायचा आम्ही बंद केलाय, 1 तारखेला अधिवेशन आहे आणि गेल्या आठ दिवसांत मंत्र्यांना कोरोना होण्याच्या बातम्या येताहेत, मंत्र्यांना झालेला हा कोरोना कोविड 19 चा आहे की राजकीय? नितेश राणेंचा सवाल, अधिवेशनात भाजपच्या प्रश्नांना द्यायला यांच्याकडे उत्तर नाही, म्हणून कोरोनाचा आसरा हे राज्य सरकार घेत नाही ना असा प्रश्न पडलाय, डब्लूएचओला पत्र लिहून या कोरोनाबाबत संशोधन करण्यासाठी मी सांगणार आहे, आमदार नितेश राणे यांची जोरदार टीका

  • 22 Feb 2021 02:28 PM (IST)

    यवतमाळमध्ये दुकानाला भीषण आग, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

    यवतमाळ : शहरातील मध्यवस्तीतील नगर परिषद मार्केटमधील दुकानाला भीषण आग, शहरातील दत्त चौक भागातील घटना, एकनिल रक्तपेढीच्या खालच्या दुकानाला आग, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

  • 22 Feb 2021 02:25 PM (IST)

    एनसीबी मुंबई झोनल अधिकाऱ्यांची मोठी कारवाई, बंदी असेलेल ट्रेमोडोल औषध जप्त

    मुंबई : एनसीबीच्या मुंबई झोनल ऑफिसच्या अधिकाऱ्यांची मोठी कारवाई, मोठ्या प्रमाणात ट्रेमोडोल हे बंदी असलेलं औषध जप्त, या औषधांचा ड्रग्स म्हणून वापर केला जातो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीच्या टीमने कुर्ला परिसरात धाड टाकत केली कारवाई, कारवाईत 4 हजार 824 ट्रेमोडोलच्या टॅब्लेट जप्त, याप्रकरणी आरोपी अटकेत, एनसीबीचे मुंबई झोनचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची माहिती

  • 22 Feb 2021 02:20 PM (IST)

    विरोधकांनी राजकारण करू नये, सगळे नियम पाळलेत – एकनाथ शिंदे

    रायगड : विरोधकांनी राजकारण करू नये, आजचा कार्यक्रम हा लोकांच्या हितासाठी असलेल्या प्रकल्पासाठी होता, मोजके लोकप्रतिनिधी या कार्यक्रमात होते, सगळे नियम येथे पाळले गेलेत, मुख्यमंत्रीनी काल सांगितलं आहे, लॉकडाऊन लावायची वेळ आणू नका, नियम पाळा हात जोडून विनंती आहे, एकनाथ शिंदे यांचे जनतेला आवाहन

  • 22 Feb 2021 02:06 PM (IST)

    …तर आम्हाला देखील कर्नाटकचे प्रवाशी महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागेल, सतेज पाटील यांचा इशारा

    कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर संतापले, कर्नाटक सरकारने प्रवाशांना न रोखता त्याची आरटीपीसीआर टेस्ट करून राज्यात प्रवेश करायला परवानगी द्यावी, कर्नाटक सरकार आडमुठी भूमिका घेत असेल तर आम्हाला देखील कर्नाटकचे प्रवाशी महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागेल, कर्नाटक सरकारच्या भूमिकेबाबत केंद्राला माहिती देणार, कर्नाटक सरकारने प्रवाशांची टेस्ट करून त्यांना क्वारन्टाईन करावं आमची काही हरकत नाही, सतेज पाटील यांची कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर टीका

  • 22 Feb 2021 02:03 PM (IST)

    पंतप्रधान कार्यालय बनावट कर्ज योजना रॅकेटचा पर्दाफाश, पोलीस सहआयुक्तांची पत्रकार परिषदेत माहिती

    मुंबई : पोलीस सहआयुक्त मिलिंद भारंबे यांची पत्रकार परिषद, पंतप्रधान कार्यालय बनावट कर्ज योजना रॅकेटचा पर्दाफाश, बनावट अप्लिकेशनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पंतप्रधान कार्यालयाकडून कर्ज मिळवून देतो असे सांगत करीत होते फसवणूक, संजीव कुमार नावाच्या आरोपीने तयार केले 9 अप्लिकेशन्स, काही वेबसाईट बनवल्यात शिवाय काही पेपर्सला जाहिरातीही दिल्या, सायबर पोलिसांनी स्वतः अप्लिकेशन ट्रॅक करून केला उलगडा

  • 22 Feb 2021 01:55 PM (IST)

    विकास करताना पर्यावरणाची हानी होता कामा नये – उद्धव ठाकरे

    रायगड : सुरुवातीचा काळ संकटाचा होता, ऑक्सिजन नाही, बेड नाही अशी परिस्थिती होती, पंतप्रधानांसोबत आमची नीती आयोगाची कॉन्फरन्स होती, त्यात मुख मुद्दा मी मांडला, विकास करताना पर्यावरणाची हानी होता कामा नये, हा विकास कागदावरती गोंडस वाटत असला तरी प्रत्यक्षात अवघड आहे, सुरवातीला तो लॉकडाऊनचा प्रकार, बेड नव्हते व्हेंटिलेटरवर नव्हते, आपलं लक्ष दिल्लीकडे असायला हवं, तटकरे साहेब तुम्ही जाता दिल्लीला, पण आमचं पण लक्ष असायला हवं, तुम्ही दिल्लीत काय करता, मंगळावरच्या पाण्यापेक्षा राज्यातील जव्हार मोखाड्यातील लोकांना पाणी कसं मिळेल हे आपण पाहिले पाहिजे, उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य

  • 22 Feb 2021 01:50 PM (IST)

    अर्थ नियोजन अधिवेशनात मांडू तसं पाण्याचं सुद्धा नियोजन करावे लागणार – उद्धव ठाकरे

    रायगड : काल मी फेसबुक लाईव्हमधून जनतेला हक्काने सूचना दिल्यात, मोर्चा, आंदोलन, मोठ्या कार्यक्रमावर बंदी असताना आजचा हा कार्यक्रम, मला वाटलं गर्दी होते की काय ?, गुलाबराव पाटील यांना म्हटलं की गर्दी नको, मात्र या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी दिसतेय, पुष्पगुच्छ न देता सॅनिटायझर देऊन स्वागत केलं हे बरं केलं, मेट्रोचे कोच भारतात होतहेत, ही आत्मनिर्भरता आहे, आपण सगळं बनवू शकतो, मात्र पिण्याचे पाणी आपण बनवू शकत नाही, जव्हारला मी जाऊन आलो, पालघर जिल्हा तयार झाला मात्र त्याच्याकडे लक्ष देता आलं नाही, तिथे पर्यटन क्षेत्र तयार करायचे आहे, मात्र तिथे पाण्याचा दुर्भिक्ष पाहायला मिळतंय, जसं अर्थ नियोजन आपण 1 मार्चच्या अधिवेशनात मांडू तसं पाण्याचं सुद्धा नियोजन करावे लागणार, उद्धव ठाकरे यांची माहिती

  • 22 Feb 2021 01:47 PM (IST)

    पाण्याचं नियोजन करणं अतिशय महत्वाचं – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    रायगड : या प्रकल्पामुळे अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार, पाण्याचं नियोजन करणं अतिशय महत्वाचं, निसर्गाचं जतन करणंही गरजेचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रायगडमध्ये आयोजित कार्यक्रमात वक्तव्य

  • 22 Feb 2021 01:40 PM (IST)

    मास्क वापरा, कठोर निर्णय घेण्याची वेळ आणू नका : अजित पवार

    1 फेब्रुवारीपासून कोरोनाने डोकं वर काढलंय, त्यामुळे कार्यक्रम साधेपणाने घ्यावा लागतोय, हा कार्यक्रम रायगडसाठी महत्वाचा, 400 कोटी पेक्षा जास्त खर्च यासाठी केला जातोय, शहरीकरण, औद्योगिकीरण वाढतंय त्यामुळं पाणी पुरवठाही वाढवावा लागणार, केंद्राकडून जीएसटीची मोठी रक्कम येणं अजून बाकी, पायाभूत सेवेसाठी आम्ही कुठेही तडजोड करत नाहीत, कोस्टल रोड, मेट्रो, बोगदे, गोवा मुंबई हायवेचे काम सुरू आहे, राजकारण न आणता कोकणचा कायापालट व्हावा, कोरोनाचे संकट वाढत आहे, लॉकडाऊन पुन्हा लागू होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, मास्क वापरा, कठोर निर्णय घेण्याची वेळ आणू नका, येत्या 1 तारखेपासून अधिवेशन सुरु होईल, अजित पवार यांची माहिती

  • 22 Feb 2021 01:34 PM (IST)

    प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन पुढे जायचंय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रायगडमध्ये वक्तव्य

    रायगड : राज्यात कोरोनाचं प्रमाण वाढलं, कोरोनामुळे सर्व कार्यक्रम साधेपणाने साजरे करा, प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन पुढे जायचं, सर्व विकास कामं जोरात सुरु आहेत, पाणी हे जीवन त्याचा योग्य वापर करा, पाण्याचा तुटवडा लक्षात हा प्रकल्प सुरु केला, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे रायगडमध्ये आयोजित कार्यक्रात वक्तव्य

  • 22 Feb 2021 01:27 PM (IST)

    पुणे विद्यापीठात अभाविपचे जोरदार आंदोलन, विविध मागण्यांसाठी सभेत घुसून आंदोलन

    पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काऊन्सिलमध्ये घुसून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जोरदार आंदोलन, विविध मागण्यांसाठी सुरु आहे अभविपीचे आंदोलन, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा जाहीर निषेध करीत केले आंदोलन, विद्यापीठाने परीक्षा शुल्क परत करण्याविषयी या बैठकीत निर्णय करण्याची अभाविपची मागणी

  • 22 Feb 2021 01:11 PM (IST)

    भाजपचे पूर्वनियोजित जेलभरो आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय, वीज बिल माफीसाठी होते आंदोलन

    नागपूर : भाजपचे 24 तारखेला होणारे जेलभरो आंदोलन पुढे ढकलण्याचा भाजपचा निर्णय, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलन पुढे ढकलण्याचा निर्णय, वाढीव वीज बिल माफीसाठी राज्यात 560 ठिकाणी होणार होते आंदोलन, 50 हजार कार्यकर्ते जेलमध्ये जातील असं नियोजन भाजपने केलं होतं, मात्री मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

  • 22 Feb 2021 01:09 PM (IST)

    औरंगाबादेत कोचिंग क्लासेस, शाळा बंद करण्याचे आदेश, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

    औरंगाबाद : कोचिंग क्लासेस आणि शाळा बंद करण्याचे आदेश, औरंगाबाद महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी दिले आदेश, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शाळा बंदचे आदेश, कोचिंग कलासेसमध्ये होणारा जमाव पाहता खाजगी कोचिंग क्लासेही बंद

  • 22 Feb 2021 01:07 PM (IST)

    माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या शाही लग्न सोहळयाबाबत पोलिसांची नोटीस

    पुणे : माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या शाही लग्न सोहळयाबाबत पोलीस देणार नोटीस, हडपसर पोलीस देणार लक्ष्मी लॉन्स चालकाला नोटीस, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर होते उपस्थित, पुण्यातील मगरपट्टा सिटीतल्या लक्ष्मी लॉन्स येथे रविवारी पार पडला होता शाही विवाह सोहळा, हडपसर पोलिसांची माहिती

  • 22 Feb 2021 12:58 PM (IST)

    नाव्हाशेवा पाणीपुरवठा योजना भूमिपूजन सोहळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

    रायगड : नाव्हाशेवा पाणीपुरवठा योजना भूमिपूजन सोहळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सोहळ्याला उपस्थितीती, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे ,आदिती तटकरे कार्यक्रमाला उपस्थित, कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे कार्यक्रमाला 50 जणांची मर्यादा, सोशल डिस्टन्सिंगमध्ये कार्यक्रम सुरू

  • 22 Feb 2021 12:54 PM (IST)

    पोहरादेवी संस्थानला पोलिसांची नोटीस, जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू

    वाशिम : पोहरादेवी संस्थानला मानोरा पोलिसांची नोटीस, मंगळवारी सकाळी राज्याचे वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीला येणार, मात्र जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू, समर्थक येण्याची शक्यता असल्याने गर्दी जमवू नये म्हणून बजावली नोटीस

  • 22 Feb 2021 12:46 PM (IST)

    सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक, अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

    बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस, अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड, बारामतीच्या प्रशासकीय भवनात इच्छुकांची प्रचंड गर्दी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

  • 22 Feb 2021 11:52 AM (IST)

    पुण्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या भेटीला

    पुण्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला, कृष्णकुंजवरील निवासस्थानी जाऊन भेट, पुण्यातील सोमाटणे टोल नाक्यावर टोल माफी नागरिकांना मिळावी अशी मागणी होती, या मागणीसाठी तेथील नेते सातत्याने पाठपुरावा करत होते, त्यासाठी राज ठाकरेंकडे हे शिष्टमंडळ आधीही आलं होतं, ती मागणी पूर्ण झालीये, त्यामुळे राज ठाकरेंचे आभार मानन्यासाठी हे नेते आले होते

  • 22 Feb 2021 11:51 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे लाईव्ह 

    लोणावळा- वर्सोली टोल नाका आणि सोमाटणे- तळेगाव दाभाडे टोलनाका हे दोन टोलनाके मावळ तालुक्यातील नागरिकांना माफ करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती सर्वपक्षीय टोल हटाव कृती समितीने दिली आहे. याचा फायदा एमएच 14 या मावळ भागातील नागरिकांना होणार आहे, सर्व पक्षीय शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेट घेत आहेत , मनसेने हा मुद्दा उठवून धरला होता

  • 22 Feb 2021 11:51 AM (IST)

    नवीन हॉटस्पॉटमधील इमारतींना मॅक्रो कन्टेन्मेंट झोन तयार केले जातील 

    गृह भेटीची संख्या वाढवून सारीचीही तपासणी करण्यात येईल

    नवीन हॉटस्पॉटमधील इमारतींना मॅक्रो कन्टेन्मेंट झोन तयार केले जातील

  • 22 Feb 2021 11:47 AM (IST)

    नागपुरात लॉकडाऊन नाही, पण कठोर निर्बंध : ऊर्जामंत्री नितीन राऊत

    नागपुरात लॉकडाऊन नाही, मात्र कोव्हिड सेंटर पुन्हा सुरु करणार, नागरिकांनी सामाजिक भान जपणं आवश्यक, मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करणार,  7 मार्चपर्यंत आठवडी बाजार, शाळा कॉलेज बंद राहणार

    नागपुरात लॉकडाऊन नाही, पण कठोर निर्बंध, आठवडी बाजार बंद, रिसॉर्ट, मंगल कार्यालय सात मार्चपर्यंत बंद, शाळा, कोचिंग क्लासेस बंद राहणार – ऊर्जामंत्री नितीन राऊत लाईव्ह

  • 22 Feb 2021 11:47 AM (IST)

    नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत – नितीन राऊत

    नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत,

    मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मी जबाबदार मोहिम राबवणार

    हॉटेल, रेस्टॉरंट्सला 50 टक्के क्षमतेपर्यंत परवानगी असेल, परंतू रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ते बंद असतील

    धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रम 7 मार्चपर्यंत बंद राहातील

    मंगल कार्यालयं, लॉन, रिसॉर्ट यांना 25 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना

    केव्हिड सेंटर पुन्हा सुरु करणार, चाचण्यांचं प्रमाण वाढवणार

    नागरिकांनी कुठलंही लक्षण आढळल्या चाचणी करावी असं आवाहन

  • 22 Feb 2021 11:44 AM (IST)

    नागपुरात 7 मार्चपर्यंत आठवडी बाजार बंद

    नागपुरात 7 मार्चपर्यंत आठवडी बाजार बंद, सर्व शाळा, कोचिंग सेंटर्स बंद

  • 22 Feb 2021 11:06 AM (IST)

    बाबा रामदेवच्या कोरोनील या औषधाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध

    बाबा रामदेवच्या कोरोनील या औषधाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन हे पतंजलीला चुकीच्या पद्धतीने प्रमोट करत असल्याचा आरोप, बाबा रामदेव, केंद्रिय आरोग्य मंत्री यांनी डीसीजीआय आणि डब्ल्युएचओने कोरोनीलली मान्यता दिल्याचं केलं होतं स्पष्ट, इंडियन मेडिकल असोसिएशनने कोरोनीलला डब्ल्युएचओने मान्यता दिलीच नसल्याचा केला दावा,  ट्विटचा दिला हवाला, मेडिकल काऊंसिल ऑफ इंडियाच्या कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन केल्याचा आरोप,  हर्षवर्धन हे मानवतेला धोका असल्याचं केलं स्पष्ट, प्रेस रिलीज केली जारी,

  • 22 Feb 2021 10:48 AM (IST)

    महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक सरकारची प्रवेशबंदी

    महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक सरकारची प्रवेशबंदी, 72 तासाच्या आतील कोरोना निगेटिव्ह आवाज जवळ असेल तरच कर्नाटक राज्यात दिला जातोय प्रवेश, महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारची, कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक सरकारकडून कडक तपासणी, निगेटीव्ह अहवाल जवळ नसणाऱ्या वाहनधारकांना पाठवले जातंय, अचानक सुरु झालेल्या तपासणीमुळे प्रवाशांची गैरसोय

  • 22 Feb 2021 09:45 AM (IST)

    अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ कोरोना पॉझिटीव्ह

    नाशिक – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ कोरोना पॉझिटीव्ह, काल शरद पवार यांच्यासोबत लावली होती लग्नाला हजेरी, छगन भुजबळ यांनी स्वतः दिली माहिती, संपर्कात आलेल्या लोकांनी टेस्ट करून घ्यावी – भुजबळ

  • 22 Feb 2021 09:25 AM (IST)

    सोलापुरात शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली

    सोलापूर – शहर आणि जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली, गेल्या सात दिवसांमध्ये शहरात 108 तर ग्रामीण भागात 252 असे 412 पुढे आढळले, सात दिवसात शहरात दोघांचा तर ग्रामीण मध्ये चार जणांचा मृत्यू, शहरात 13 एप्रिल 2020 रोजी आढळला होता कोरोनाचा पहिला रुग्ण, गेल्या महिनाभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट

  • 22 Feb 2021 09:24 AM (IST)

    सांगोला तालुक्यातील चिणके येथील बागेतून पाचशे किलो डाळिंबाची चोरी

    सोलापूर- सांगोला तालुक्यातील चिणके येथील बागेतून पाचशे किलो डाळिंबाची चोरी, अज्ञात चोरट्यांनी दोन डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या बागेतून भगव्या जातीची सुमारे 35 हजार रुपये किमतीचे डाळिंब चोरले, सांगोला येथील मार्केट यार्ड व इतर ठिकाणी डाळिंब चोरट्यांचा शोध घेतला मात्र चोरटे मिळाले नाहीत, माणिक विठ्ठल मिसाळ व संजय विलास जाधव या शेतकऱ्यांच्या शेतातून डाळिंब चोरी, अज्ञात चोरट्यांच्या विरोधात सांगोला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

  • 22 Feb 2021 09:23 AM (IST)

    बीडमध्ये सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणे अंगलट, आयोजकासह 25 जणांविरुद्ध गुन्हा

    बीड : सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणे आलं अंगलट

    आयोजकासह 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    विवाह सोहळ्याला आमदार खासदाराची उपस्थिती

    माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    विवाह सोहळ्यात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

  • 22 Feb 2021 08:45 AM (IST)

    जळगावात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मंडईत शेतकरी व्यापारी मास्क विना

    जळगाव – जळगावात मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मंडईत शेतकरी व्यापारी मास्क विना, कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना भाजी मंडईतील सर्व बेफिकीर, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

  • 22 Feb 2021 08:44 AM (IST)

    कोरोनाचा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राजापुरातील शिवसेनेचा प्रतिसाद

    रत्नागिरी- कोरोनाचा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राजापुरातील शिवसेनेचा प्रतिसाद, राजापूर आणि लांज्यातील शिवसेनेनी केले राजकीय कार्यक्रम रद्द, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांचा राजापूर आणि लांज्यातील कार्यक्रम रद्द, वरूण  देसाई साधणार होते शिवसेनेच्या कार्यकत्यांशी संवाद, वरूण देसाईंसोबत होती शिवसेनेच्या युवा सेनेची दिग्गज मंडळी

  • 22 Feb 2021 08:44 AM (IST)

    नाशकात शहरात अडीच महिन्यात 68 मुलींचे अपहरण, मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्याने पालक चिंतेत

    नाशिक – शहरात अडीच महिन्यात 68 मुलींचे अपहरण, मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्याने पालक चिंतेत, ह्युमन ट्रॅफिकिंग सेल कडून राज्यभरात तपास सुरू, मुलींचं अपहरण करणारी टोळी सक्रिय झाल्याचा पोलिसांना अंदाज, पोलीस तपास सुरू

  • 22 Feb 2021 08:43 AM (IST)

    कोरोनाचा पर्यटकांनी घेतला धसका, सलग सुट्यांमध्ये गणपतीपुळेत पर्यटकांचा ओघ मंदावला

    रत्नागिरी- कोरोनाचा पर्यटकांनी घेतला धसका, सलग सुट्यांमध्ये गणपतीपुळेत पर्यटकांचा ओघ मंदावला, एरवीच्या तुलनेत केवळ 30 टक्केच पर्यटक गणपतीपुळे समुद्रकिनारी, कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि लाॅक डाऊनच्या शक्यतेने पर्यटक धास्तावला, पर्यटक संख्या रोडावल्याने व्यापाऱ्यावर त्याचा परिणाम

  • 22 Feb 2021 08:42 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यातील बंद केलेले कोरोना सेंटर पुन्हा सुरू होणार

    कोल्हापूर – जिल्ह्यातील बंद केलेले कोरोना सेंटर पुन्हा सुरू होणार, रुग्ण वाढीच्या शक्यतेने आरोग्य यंत्रणा अलर्ट, सेंटरमध्ये व्हेंटिलेटर सह आवश्यक सुविधा तयार ठेवण्याच्या प्रशासनाच्या सूचना, सेंटर सुरू करण्यासाठी तयार केली विशेष समिती

  • 22 Feb 2021 08:41 AM (IST)

    नाशिकरोड परिसरात विना मास्क फिरणाऱ्या 43 जणांवर कारवाई

    नाशिक – नाशिकरोड परिसरात विना मास्क फिरणाऱ्या 43 जणांवर कारवाई, कारवाईत आठ हजार रुपयांचा दंड वसूल, दंड भरण्या वरून स्वच्छता विभागाचे कर्मचारी आणि नागरिकांमध्ये वाद, आजपासून मात्र 1000 रुपये दंड आकारला जाणार असल्याने मास्क वापरण्याचं आवाहन

  • 22 Feb 2021 08:40 AM (IST)

    नाशिक : प्रशासनाच्या सर्व विभागांना अलर्ट राहण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

    नाशिक – प्रशासनाच्या सर्व विभागांना अलर्ट राहण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना, सद्यस्थितीत ऑक्सिजन साठा आणि बेड ची संख्या देखिल मुबलक, गरज भासल्यास वाढ केली जाईल असे नियोजन, तर 69 हजारांपैकी 40 हजार कर्मचाऱयांना दिली लस, उरवर्ती शासकीय कर्मचाऱयांना 28 फेब्रुवारी ला देणार लस

  • 22 Feb 2021 08:39 AM (IST)

    नाशकात पालिका प्रशासन आणि पोलिसांची आजपासून शहरात संयुक्त कारवाई

    नाशिक – पालिका प्रशासन आणि पोलिसांची आजपासून शहरात संयुक्त कारवाई, विना मास्क दिसल्यास थेट 1000 रुपये दंड, पोलीस कर्मचारी करणार थेट लग्न मंडपात जाऊन पाहणी, कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता दंडाची रक्कम 500 वरून 1000 वर

  • 22 Feb 2021 08:33 AM (IST)

    नगर औरंगाबाद महामार्गवर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

    अहमदनगर – नगर औरंगाबाद महामार्गवर भीषण अपघात, श्री क्षेत्र देवगड फाटा येथे भीषण अपघात, स्विफ्ट आणि लक्झरी गाडीची समोरा समोर धडक होऊन झाला अपघात, अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू, पहाटे 2 च्या सुमारास घडली घटना, मयत जालना जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती

  • 22 Feb 2021 08:32 AM (IST)

    नागपुरात कोरोना रुग्णांची गेल्या दोन दिवसात 700 वर गेलेली संख्या काल 626 वर आली

    नागपूर – गेल्या दोन दिवसात 700 वर गेलेली रुग्ण संख्या काल 626 वर आली, यात काहीशी कमी आली असली तरी धोका कायम आहे, गेल्या 24 तासात 8 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला, एकूण रुग्णांची सांख्य 143133 झाली असून एकूण मृत्यू 4275 एवढे झाले आहे, काही दिवसात वाढलेल्या रुग्ण संख्येचा भार मेयो , आणि मेडिकल वर पडत असून इथे रुग्णांवर उपचार सुरू आहे, नागपुरात कोरोना वाढीचा धोका कायम , नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन

  • 22 Feb 2021 08:30 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये आठवडाभरात कोरोना रुग्ण वाढले

    पिंपरी चिंचवड – शहरात आठवड्यात कोरोना रुग्ण वाढले, मृत्यू संख्या रोखण्यात यश, शहरात 15 ते 21 फेब्रुवारी या दरम्यान 1430 नवीन रुग्ण संख्या वाढली असली तरी रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे ह्या कालावधीत केवळ 5 रुग्णांचा मृत्यू झाला,त्यामुळे रुग्ण संख्या वाढत असताना मृत्यू रोखण्यास यश, शहरात सध्या 2800 पेक्षा जास्त रुग्ण सक्रिय आहेत

  • 22 Feb 2021 07:43 AM (IST)

    विदर्भात कोरोना रुग्ण वाढत असले तरिही मृत्यूदरात घट

    विदर्भात कोरोना रुग्ण वाढत असले तरिही मृत्यूदरात घट,  विदर्भात गेल्या २० दिवसांत मृत्यूदरात घट,  १ फेब्रुवारीला २.५४ टक्के असलेला मृत्यूदर आला २.४३ टक्क्यांवर, २० फेब्रुवारीपर्यंत विदर्भात २३५ कोरोना मृत्यू, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाण्यात झपाट्याने रुग्णवाढ,  रुग्णवाढ होत असली तरिही मृत्यूदरात घट

  • 22 Feb 2021 07:27 AM (IST)

    पोलादपुरातील लहुळसे गावात घराला आग, आगीत 7 खोल्यांचे जुने घर जळून भस्मसात

    रायगड – पोलादपूर जवळ लहुळसे गावात घराला आग, आगीत 7 खोल्यांचे जुने घर जळून भस्मसात, सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही, शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज, महाड नगर परिषद व एमआयडीसी च्या अग्निशमन दलाने 3 तासांच्या प्रयत्नाने आग अटोक्यात आणली, घरातील जीवनावश्यक वस्तू , किमती साहित्य जळून खाक जवळपास 15 ते 16 लाखांचे नुकसान

  • 22 Feb 2021 07:26 AM (IST)

    नागपुरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस राबविणार मिशन वॉश आउट

    नागपुरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस राबविणार मिशन वॉश आउट, पडद्या मागून टोळ्या चालविणारे गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर, गुन्हेगारांची यादी तयार करून केली जाणार आहे कारवाई, गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी बिट मार्शल कडे असणार

  • 22 Feb 2021 07:21 AM (IST)

    नागपूरात विनामास्क फिरणाऱ्यांवर धडक कारवाई, रविवारी 75500 रुपयांचा दंड वसूल

    नागपूरात विनामास्क फिरणाऱ्यांवर धडक कारवाईची मोहिम, एका दिवसात विनामास्क फिरणाऱ्या 151 जणांवर कारवाई,  रविवारी 75500 रुपयांचा दंड केला वसूल,  गेल्या काही महिन्यात शहरात 33 हजार पेक्षा जास्त जणांवर कारवाई,  नागपूर मनपाने जवळपास दीड कोटींचा दंड केला वसूल

  • 22 Feb 2021 07:20 AM (IST)

    आज नागपूरच्या आठ जलकुंभातुन पाणी पुरवठा होणार नाही

    नागपूर- आज नागपूरच्या आठ जलकुंभातुन पाणी पुरवठा होणार नाही, चार जल शुद्धीकरण केंद्र दुरुस्ती साठी राहणार बंद, नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे महापालिका आणि ओसीडब्लूचे आवाहन

  • 22 Feb 2021 06:20 AM (IST)

    पालघर जिल्हाधिकारी यांची मोठी कारवाई, एकाच रात्री तीन लग्नसमारंभात धाड

    पालघर जिल्हाधिकारी यांची मोठी कारवाई, जिल्हाधिकारी यांची एकाच रात्री तीन ठिकाणी लग्नसमारंभात धाड, 50 पेक्षा अधिक लोक होते लग्नसमारंभात, अवास्तव गर्दी तसेच कोरोना उपाययोजना नियमांचे पालन न केल्याने झाली कारवाई, तीन नवरदेव पित्यांवर गुन्हा दाखल,एकच उडाली खळबळ, शिरगाव जलदेवी रिसॉर्ट, सातपाटी,आणि उमरोळी बिरवाडी ह्या तीन ठिकाणी होत लग्न समारंभ, तीन नवरदेव पित्यासह रिसॉर्ट मालक,केटरर्स,डीजे मालकावर गुन्हा दाखल, सातपटी आणि बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 22 Feb 2021 06:18 AM (IST)

    कल्याणमध्ये हळदी कार्यक्रमात तिघांवर हल्ला, एका महिलेचा मृत्यू

    कल्याणमधील सापर्डे गावात धक्कादायक प्रकार, हळदी कार्यक्रमाचा फायदा एका घरात तिघांवर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला, हल्ल्यात तीनजण गंभीर जखमी, एका महिलेचा मृत्यू तर दोन जणांवर उपचार सुरू, काही दागिने गेल्याची नगरसेवक जयवंत भोईर यांची प्राथमिक माहिती, लूट की दुसरा काही प्रकार याचा तपास सुरू असल्याचा खडकपाडा पोलिसांनीची माहिती, मयत सुवर्णा चिंतामण घोडे,जखमी भरती जगदीश म्हात्रे, पवन जगदीश म्हात्रे

Published On - Feb 22,2021 9:41 PM

Follow us
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.