LIVE | आज नाशिकमध्ये 481 तर पिंपरी-चिंचवडमध्ये 423 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
नाशिकमध्ये आज 481 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
नाशिकमध्ये आज 481नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 186 जण कोरोनामुक्त झाले आहेत, त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आज चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
-
पिंपरी-चिंचवडमध्ये आज 423 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पिंपरी-चिंचवडमध्ये आज 423 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 319 जण कोरोनामुक्त झाले आहेत, त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आज एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आतापर्यंत 1 लाख 5 हजार 704 कोरोबनाधितांची नोंद करण्यात आली आहे.
कोरोना रुग्ण – 105704 कोरोनामुक्त – 100392 मृत्यू – 1842
-
-
राजीनामा दिला तो फ्रेम करायला नाही, तो स्विकारला आहे: उद्धव ठाकरे
कारण नसताना सरकारची बदनामी करु नका, राजीनामा दिला तो फ्रेम करायला नाही. तो स्विकारला आहे: उद्धव ठाकरे
-
तुमच्या काळातही हीच तपास यंत्रणा होती : उद्धव ठाकरे
प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. गुन्हा दाखल करुन मोकळं होणं म्हणजे न्याय देणं असं होत नाही. ज्या वेळेस घटना घडली त्याच वेळेस तपासाच्या सुचना दिल्यात. कालबाह्या तपास करुन अहवाल सादर करण्याचे आदेश, कुणालाही पाठिशी घालणार नाही. नुसती आदळआपट करण्याचा प्रघात योग्य नाही. तुमच्या काळातही हिच तपास यंत्रणा होती : उद्धव ठाकरे
-
…तर मी आधी शिवसैनिक, संजय राठोड यांचे पत्र
संजय राठोड यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे, “मा. उद्धव ठाकरे जय महाराष्ट्र. अत्यंत व्यथितपणे हे पत्र लिहित आहे. पूजा चव्हाण यांच्या मृत्यूबाबत खरं बाहेर यावं. पूजा चव्हाणच्या कुटुंबाचीही बदनामी होत आहे. मी तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत असलो तरी मी आधी शिवसैनिक आहे. या प्रकरणाचा पूर्ण तपास होऊपर्यंत मी मंत्रिपदावर राहणं नैतिक नाही, म्हणून राजीनामा देत आहे.”
-
-
संजय राठोड यांनी स्वतः राजीनामा दिलाय : उद्धव ठाकरे
न्यायाने वागणं ही आमची जबाबदारी आहे. दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच या सरकारची भूमिका आहे. मात्र, सध्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवायचंच आहे म्हणून काम केलं जातंय. आम्ही म्हणतो तसाच तपास झाला पाहिजे असं म्हटलं जातंय. मात्र, तसा होणार नाही. संजय राठोड यांनी स्वतः राजीनामा दिलाय : उद्धव ठाकरे
-
कोरोना संकटातही कर्जमाफीचे सात हजार कोटी दिलेत : उद्धव ठाकरे
त्यांच्यावेळेस शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत होते. आम्ही ते बंद केलेत. कोरोना संकटातही कर्जमाफीचे सात हजार कोटी आम्ही दिलेत. खोटं बोलायचं ते रेटून बोलायचं हे त्यांना लागू पडतं. केंद्राकडून २९ हजार कोटी येणं बाकी आहे. का तिकडं जाऊन का नाही बोंबलत.
-
वीजेबद्दल जो काही आक्रोश करताय तो पेट्रोल डिझेलबद्दल का नाही? उद्धव ठाकरेंचा सवाल
घायला आम्ही आणि द्यायला कमी असं केंद्रातलं सरकार आहे. वीजेबद्दल जो काही आक्रोश करताय तो पेट्रोल डिझेलबद्दल का नाही. मोदी सरकार सत्तेवर आलं त्यावेळेस भाव 71 रुपये होता. आम्ही धोनी, विराट, तेंडुलकरची सेंच्युरी पाहिली पण सरकारची सेंच्युरी आता पाहातोय. त्यांची कर्जमाफी आता आतापर्यंत होती : मुख्यमंत्री
-
त्यांनी फुकटचे काही सल्ले दिलेत : उद्धव ठाकरे
तुम्ही सोबत असाल तर प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. नुसते आरोप करणं म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात. मराठा आरक्षणावरही ते बोलत होते. त्यांनी मदतीचं आश्वासन दिलंय मी धन्यवाद देतो. प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देणार. त्यांनी फुकटचे काही सल्ले दिलेत : उद्धव ठाकरे
-
दुतोंडी विरोधी पक्ष महाराष्ट्रानं कधी अनुभवला नाही : उद्धव ठाकरे
धारावी पॅटर्नचं जागतिक पातळीवर कौतुक झालं. सरकारचं सोडा पण तुम्ही कोविड यौद्ध्यांची थट्टा करताय. असा दुतोंडी विरोधी पक्ष महाराष्ट्रानं कधी अनुभवला नाही. इतरही काही आरोप केलेत त्या सर्वाची उत्तरं देणार नाही. सावरकरांची जयंती की पुण्यतिथी हे आधी त्यांनी ठरवावं. कर्नाटकात तुम्ही आहात, खाली वर तुम्ही आहात सीमाप्रश्न का सोडवला नाही : उद्धव ठाकरे
-
मला त्यांची किव करावीशी वाटतेय : उद्धव ठाकरे
विरोधी पक्ष नेत्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. काही आरोप केले पण त्याला अर्थ असला पाहिजे. कशात काही नाही आणि आरोप करत सुटायचं ही आता पद्धत झालीय. मला त्यांची किव करावीशी वाटतेय : उद्धव ठाकरे
-
अजित पवार 8 तारखेला अर्थसंकल्प सादर करतील : उद्धव ठाकरे
मी आणि माझ्या सहकारी व्यवस्था करतो आहे. पहिला अनुभव लक्षात घेता, दुसरी लाट थोपवण्याचा प्रयत्न. जिथं रुग्णसंख्या वाढतेय तिथं उपचार वाढवतो आहोत. 8 तारखेला अर्थसंकल्प अजितदादा सादर करतील : उद्धव ठाकरे
-
कोरोनाचा धोका गेलेला नाही, किंबहुना वाढताना दिसतोय : मुख्यमंत्री
उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतं आहे, गेल्यावर्षी याच दरम्यान कोरोनाने राज्यात प्रवेश केला. त्यानंतरचं एक वर्ष कसं गेलं याची आपल्याला कल्पना आहे, कोरोनाचा धोका गेलेला नाही, किंबहुना वाढताना दिसतोय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
-
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा : उदयनराजे
मराठा आरक्षणासंदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी, सारथी संस्था बंद पडण्याच्या मार्गावर : उदयनराजे
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात संवाद साधणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार, संजय राठोड राजीनामा प्रकरणी काय बोलणार यावर सर्वांचे लक्ष
-
पोहरादेवीत महंत कबिरदास यांच्यासह 30 जणांना कोरोनाची लागण
वाशिम कोरोना अपडेट
पोहरादेवी येथील आज पुन्हा 21 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह,
22 फेब्रुवारी पासून पोहरादेवी इथं आतापर्यंत महंत कबिरदाससह 30 जण कोरोना पॉझिटिव्ह,
पोहरादेवी परिसर कंटेन्मेंट झोन,
वाशिम जिल्ह्यात आज आढळले नवे 187 कोरोना रुग्ण…
जिल्ह्यात आज 41 जण झालेत कोरोनामुक्त …
जिल्ह्यात आज कोरोना बाधित 03 रुग्णाचा मृत्यू….
जिल्ह्यात मागील पाच दिवसात आढळले 1011 नवे कोरोना रुग्ण….
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 8934
सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्ण – 1419
आतापर्यन्त डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 7354
आतापर्यंत एकूण मृत्यू – 160
-
अमरावती जिल्हात कोरोनाचा कहर सुरु, तब्बल 892 जणांना लागण
अमरावती कोरोना अपडेट
अमरावती जिल्हात कोरोनाचा कहर सुरूच…
अमरावतीत आज तब्बल 892 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण…
-आज तब्बल 8 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू…
-आज 346 रुग्णांनी केली कोरोनावर मात..
-जिल्हात आतापर्यंत 35117 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण…
आतापर्यंत 29202 रुग्णांनी केली कोरोनावर मात…
-अमरावतीत आतापर्यंत 511 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू …
5404 रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू…
-
पुण्यात दिवसभरात 774 कोरोना रुग्णांची वाढ, 4 जणांचा मृत्यू
पुणे : – दिवसभरात ७७४ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ४२७ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत ०४ रुग्णांचा मृत्यू. ०२ रूग्ण पुण्याबाहेरील. – २६१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २०२७०२. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४९१९. – एकूण मृत्यू -४८५५. -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज १९२९२८. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७४७३.
-
नैतिकतेच्या मुद्द्यावर संजय राठोडांनी राजीनामा : संजय राऊत
नैतिकतेच्या मुद्द्यावर संजय राठोडांनी राजीनामा दिला आहे : संजय राऊत
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची संध्याकाळी पत्रकार परिषद
राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे पाठवू नका, संजय राठोडांची मुख्यमंत्र्याकंडे गळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी 6.30 वाजता पत्रकार परिषद, राठोडांच्या राजीनाम्यावर भाष्य करणार
-
जे कोणी दोषी असेल, त्यांच्यावर कारवाई व्हावी : नवाब मलिक
ज्या पद्धतीने पूजा चव्हाण या प्रकरणी वेगवेगळी चर्चा सुरु होती. माहितीनुसार संजय राठोड यांनी राजीनामा दिलेला आहे. आमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, याचा योग्य ती चौकशी व्हावी. जे कोणी दोषी असेल, त्यांच्यावर कारवाई होईल: नवाब मलिक
-
निष्पक्षपणे चौकशी व्हावी अशीच माझी मागणी : संजय राठोड
मी माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. विरोधी पक्षानं अतिशय घाणेरडं राजकारण केलं. मीडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न केला. माझ्या समाजाची बदनामी केली गेली.निष्पक्षपणे चौकशी व्हावी अशीच माझी मागणी. मुख्यमंत्र्यांकडे मी अशीच मागणी केली आहे. मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, आमदारकीचा नाही. ज्या पद्धतीनं राजकारण केलं केलं, ते लोकशाहीच्याविरोधात आहे, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान आहे. अधिवेशन बंद पाडण्याची भाषा अपमानजनक, कोणत्याही प्रकरणाची चौकशी आधी व्हायला पाहिजे : संजय राठोड
-
सरकारकडून अद्याप घोषणा झालेली नाही : चित्रा वाघ
राजीनामा दिला आहे, याची सरकारकडून अद्याप घोषणा झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबत काहीही भूमिका घेतलेली नाही. गेले १५ दिवस गायब होते. पूजा चव्हाण प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी आहे : चित्रा वाघ
-
अशा परिस्थितीत मंत्रिपदावर राहणं चुकीचं : देवेंद्र फडणवीस
पहिल्याच दिवशी हे प्रकरण आल्यानंतर हा राजीनामा यायला हवा होता. ज्या प्रकारचे पुरावे याप्रकरणी पाहायला मिळतात. ते फार भयानक आहेत. अशा परिस्थितीत मंत्रिपदावर राहणं चुकीचं होतं. कुठेतरी आपल्याला वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याने हा राजीनामा आला नाही. तो राजीनामा स्विकारणार आहे की नाही माहिती नाही. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे, त्या पोलीस अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार आहेत. याप्रकरणी एफआयआर दाखल झालेला नाही. एकतर हा उशिरा आलेला राजीनामा आहे. वाचवण्याचा प्रयत्न झाला. चित्रा वाघ किंवा समाज माध्यमांनी दबाव तयार केल्याने सरकारला उपाय उरला नाही. त्यामुळे राजीनामा घेतला गेला. पण एफआयआर दाखल व्हायला हवा : देवेंद्र फडणवीस
सरकारचा खरा चेहरा खुला झालं आहे. बूंद से गयी वो हौदसे नही आती, पहिल्यांदाच सांगितलं होतं, एफआयआर दाखल झाला पाहिजे. पूजा चव्हाण कुटुंबाबद्दल साहजिक सहानभूती आहे. : देवेंद्र फडणवीस
-
राजीनामा घेतल्याबद्दल स्वागत, उशिरा सुचलेलं शहाणपण : प्रविण दरेकर
राजीनामा घेतला याबद्दल त्यांचे स्वागत, पूजा चव्हाणच्या आत्महत्येचे कारण समोर आलं पाहिजे, ठाकरी बाणा उशिरा का दाखवून त्यांनी राजीनामा घेतला. हे पहिल्याच दिवशी झालं असतं, तर आणखी चांगलं झालं असतं : प्रविण दरेकर
-
वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला.
-
संजय राठोड यांचा राजीनामा
संजय राठोड यांनी आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा दिलाआहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल झालेले फोटो, ऑडिओ क्लिप्स आणि काही व्हिडिओ सर्वांसमोर आल्यांतर त्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. या कारणामुळे मागील कित्येक दिवसांपासून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजपने लावून धरली होती. त्यानंतर आता राठोड यांनी राजीनामा दिलाआहे.
-
वनंमत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यास एकनाथ शिंदे यांचा विरोध
वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना विरोध दर्शविला आहे. याआधी राठोड आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरु आहे. या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी राठोड यांच्या राजीनाम्याला विरोध दर्शविला आहे.
-
वनमंत्री संजय राठोड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक संपली
वनमंत्री संजय राठोड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक संपली आहे. सध्या उद्धव ठाकरे हे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राठोड यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा करीत आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली तेव्हा संजय राठोड यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अपस्थित होत्या.
-
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्याकडे चौकशी होण्यापूर्वी राजीनामा न घेण्याची विनंती केल्याचं कळतंय. संजय राठोड आणि मुख्यमंत्री यांच्यातील बैठक संपली आहे.
-
राजीनामा घ्या, मात्र चौकशी होईपर्यंत मंजूर करु नका- संजय राठोड
वनमंत्री संजय राठोड राजीनामा देण्यास तयार आहेत. ते राजीनामा घेऊन वर्षा बंगल्यावर गेले आहेत. मात्र, जोपर्यंत चौकशी होत नाही, तोपर्यंत राजीनामा घेऊ नये, अशी विनंती संजय राठोड यांनी केली आहे.
-
अष्टविनायकांपैकी एक असलेले पालीचे बल्लाळेश्वर मंदिर 2 मार्च रोजी बंद
रायगड : जिल्ह्यात अंगारकी चतुर्थीला बल्लाळेश्वर मंदिर बंद
अष्टविनायकांपैकी एक असलेले पालीचे बल्लाळेश्वर मंदिर बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
2 मार्च रोजी मंदिर भाविकांसाठी बंद राहणार
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निर्णय
पंच कमिटी आणि सुधागड तहसीलदार यांच्या संयुक्त बैठकीत झाला निर्णय
देवस्थानचे सरपंच धनंजय धारप यांची माहिती
-
संजय राठोड सपत्नीक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
संजय राठोड सपत्नीक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला रवाना, वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, वनमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता बळावली
-
औरंगाबादचं नामकरण करताना अस्मिता कोठे गेली- देवेंद्र फडणवीस
बेळगावच्या बाबतीत आम्ही सरकारसोबत आहोत
मात्र, औरंगाबादचं नामकरण करताना ही अस्मिता कोठे गेली.
राज्यात भ्रष्टाचार वाढला आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात आज बैठक आहे.
मला या बैठकीस निमंत्रण मिळालं त्यामुळे त्यांचे आभार मानतो.
सरकारला आरक्षणासंदर्भात जी मदत लागेल ती सर्व मदत आम्ही देणार
हा मुद्दा राज्याच्या अख्त्यारीतील आहे. आरक्षणाची अवस्था चेंडूसारखी करु नये.
ओबीसी समाजाला सरकारने आश्वस्त करावं.
भारतीय जनता पक्ष राज्यभर ओबीसी हक्क परिषद घेणार आहे. त्यांच्या हक्काचं रक्षण करणार आहे.
काँग्रेच्या मेळाव्यासाठी कोरोना नाही, शिवसेनेच्या मंत्र्यासाठी कोरोना नाही, फक्त शिवजयंतीसाठी कोरोना आहे.
चित्रा वाघ या लढवय्या आहेत. त्यांना सरकारने कितीही त्रास दिला, तरी आम्ही त्या डगमगणार नाहीत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत.
राज्यात अवैध धंदे जोमात सुरु आहेत. त्याला सरकारचे अभय आहे.
हे सरकार अध्यक्षपादाची निवडणूक मुद्दामहून टाळत आहे.
सरकार आपल्याच आमदारांना घाबरलेलं आहे.
त्यामुळे सरकार विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेत नाही.
-
अधिवेशन न चालवणे हे सरकाचे धोरण – देवेंद्र फडणवीस
या अधिवेशनात लक्ष्यवेदी होणार नाही.
या बद्दल आम्ही अधिवेशनात आक्षेप घेणार आहोत
अधिवेशन न चालवणे हे सरकाचे धोरण आहे.
हे सरकार तीन पाटाचं आहे.
कोण कोणत्या पाटावर बसलं आहे. याचा मेळ नाहीये
शेतऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. 90 टक्के सोयाबिन पीक वाया गेला आहे
शेतकऱ्यांना कोणतीही मदत झाली नाही.
या सरकारने शेतमलाचीही खरेदी केली नाही
कर्जमाफी अर्धवट राहिली आहे.
या सरकारने वीजबिलाच संकट नागरिकांना लादलं आहे.
लोकांना न वापरलेल्या विजेचं बील आले आहे.
यांनी 75 लाख लोकांना नोटीस दिली आहे.
लॉकडाऊनमध्ये लोकांकडे पैसै नाहीत. रोजगार नाही
या अशा काळात लोकांकडून वीजबिल वसूल केले जात आहे
ही मोगलाई नाही तर काय आहे. मोगलाईमध्ये रयतेला नागवले जायंच
तशीच स्थिती सध्या राज्यात आहे.
राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत
मंत्रिमंडळातले मंत्रीच यामध्ये आघाडीवर आहेत.
संजय राठोड यांच्या प्रकरणात सर्व फोटो, व्हिडीओ समोर आहेत.
तरी अजून एफआरआय दाखल होत नाही.
ही पोलिसांची लाचारी आहे.
ढळढळीत पुरावे असताना संजय राठोड यांना अटक होत नाही.
पूजा चव्हाण यांच्या फोनवर 45 कॉल आले, हेसुद्धा क्लियर आहे.
संजय राठोड राजीनामा देत नाही, मंत्री राजीमाना देत नाहीत यावरुन मंत्र्याला अभय असल्याचं उघड आहे.
ओरंगबादमध्येही एका कार्यकर्त्यावर आरोप झाले. यामध्ये एफआरआय दाखल होऊनही कारवाई झाली नाही, हे पहिल्यांदाच झालं
पुरावे असूनही कारवाई होत नसेल. मंत्री कायम राहत असतील. तर शक्ती सारख्या कायद्याची गरज काय.
जर मंत्र्यांचा राजीनामा आला नाही तर, शक्ती कायद्याच्या समितीतून भाजपचे आमदार राजीनामे देतील.
हे सरकार लाचार आहे. उद्धव ठाकरे स्वतंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतील अभिवादनसुद्धा केले नाही. एक ट्विटपण केले नाही.
काँग्रेसने सावरकर यांच्यावर जन्मभर अत्याचार केले. सत्तेच्या लाचारीमुळे हे सगळं सुरु आहे.
कोणी किती लाचारी स्वीकारली, हे इतिहास लिहून ठेवतो. काँग्रेसच्या नादी लागून लाचारी स्वीकारु नका
-
पोहरादेवी येथे आज पुन्हा 8 जण कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह
वाशिम : पोहरादेवी येथे आज पुन्हा 8 जण कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह
22 फेब्रुवारी पासून पोहरादेवी इथं यापूर्वी 9 कोरोना पॉझिटिव्ह
आतापर्यंत एकूण पोहरादेवी इथं 17 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
मानोरा तालुक्यातील नागरिक पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या शक्ती प्रदर्शनात हजारो नागरिक होते उपस्थित
पोहरादेवी इथं कालपासून आरोग्य विभागाकडून कोरोना तपासणी शिबीराचं आयोजन
या तपासणी शिबिरमध्ये पोहरादेवी आणि वसंत नगरच्या एक हजार नागरिकांची टेस्ट होणार आहे.
-
परीक्षेत सोशल डिस्टन्सिंगची व्यवस्था नसल्यामुळे आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान गोंधळ
नाशिक -आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान गोंधळ
परीक्षेला आलेल्या विध्यार्त्यांनी घातला गोंधळ
सुरक्षित अंतरावर बसण्याची व्यवस्था नसल्याने गोंधळ
एका वर्गात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसवण्यात आल्याचा आरोप
नाशिकच्या गंगापूर रोड भागात असलेल्या cmcs कॉलेजमधील प्रकार
-
पुण्यात शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंदच
पुणे – शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंदच
– पुणे महानगरपालिका हद्दीत कोरोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून निर्णय
शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग 14 मार्च 2021पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय
या काळात ऑनलाईन शिक्षणास परवानगी
-
हे सगळं करताना महंतांना विचारलं होतं का?, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तृप्ती देसाई आक्रमक
– संजय राठोड यांचा राजीनामा अद्याप घेण्यात आला नाहीय,
– अनेक पुरावे असताना गुन्हा दाखल नाहीय
– हे सगळं करताना संजय राठोड यांनी महंताना विचारलं होतं का ?
-जर राजीनामा घेतला नाही तर हा पायंडा पडेल
-
संजय राठोड यांच्या अडचणी वाढणार, पूजाची आजी पोलिसांत तक्रार देणार
पुणे : पूजा चव्हाण (Pooja Chavan) मृत्यू प्रकरणी मोठी माहिती समोर येत आहे. पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड ( Shantabai Rathore) या पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. याविवाय त्या पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे शांताबाई राठोड त्यांच्या फिर्यादीमध्ये वनमंत्री संजय राठोड ( Sanjay Rathore) यांचेसुद्धा नाव घेणार आहेत.
-
प्रसिद्ध अभिनेत्रीचा गाडी अडवून विनयभंग, मद्यपीस अटक
मुंबई : मराठीतल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा गाडी अडवून मद्यपीने केला विनयभंग
आरोपीने दारू पिवून त्याची गाडी ही या अभिनेत्रीच्या गाडीसमोर उभी केली.
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग अनावर झाल्याने आरोपीने केली शिवीगाळ करत धक्काबुक्की केली
मुंबईतल्या गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना
ही अभिनेत्री मराठी चिञपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेञी असून एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची पत्नी आहे
शुक्रवारी राञी ही घटना गोरेगावच्या जैन हॉस्पिटलच्या गल्लीत मंथन हॉटेलजवळ घडली.
या प्रकरणी गोरेगाव प्रितम वर्मा या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे
-
संजय राठोड मंत्रिपद, आमदारकीचा राजीनामा देणार, पोहरादेवा येथील महंत जितेंद्र महाराजांची माहिती
वाशिम : पुणे येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वन मंत्री संजय राठोड हे आज किंवा उद्या वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे जाणार आहेत. ते आपल्या मंत्रिपदाचासोबतच आमदारकीचाही राजीनामा देणार असल्याची माहिती पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज यांनी दिली आहे. यासंदर्भात पोहरादेवी येथे बैठक होणार असल्याचेही त्यांनी यावेळी त्यांनी सांगितलं आहे.
-
मुख्यमंत्री कोणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत- संजय राऊत
मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत.
माझी मुख्यमंत्र्यांशी रोजच चर्चा होत आहे.
त्यांना कोणत्याही ट्विटची गरज नाही.
माझं ट्विट सर्वसमावेशक आहे. व्यापक आहे.
मुख्यमंत्री माझे मित्र आहेत. मार्गदर्शक आहे.
संजय राठोड यांच्या चौकशी साठी गृहखातं आहे. चौकशी करणारे अधिकारी आहेत.
-
भाविकांविना अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात गुरुप्रतिपदा सोहळा संपन्न
सोलापूर : भाविकांविना अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात गुरुप्रतिपदा सोहळा संपन्न
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने भाविकांसाठी बंद केला आहे प्रवेश
मंदिर समितीचे विश्वस्तांच्या उपस्थितीत झाला लघुरुद्रा अभिषेक
काकड आरतीपासून ते शेजाआरतीपर्यंत भाविकाविना धार्मिक कार्यक्रम
-
वर्धा शहराच्या गोल बाजार परिसरात भीषण आग, 15 विक्रेत्यांची दुकानं जळून खाक
वर्धा – वर्धा शहराच्या गोल बाजार परिसरात भीषण आग
– आगीत जवळपास 10 ते15 भाजी विक्रेत्यांची दुकाने जळून खाक
– वर्धा अग्निशामक दलाकडून आग विझविण्याचा प्रयत्न
– आगीत भाजीपाला, फळ विक्रीचे साहित्य आणि दुकाने जळून खाक
– काही वेळेतच आगीने घेतले रौद्ररूप
– परिसरात नागरिकांची गर्दी
– शहराच्या मुख्य बाजारपेठेत आग लागल्याने खळबळ
– घटनास्थळी पोलिसांसह, अग्निशामक दल दाखल
– भाजी व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान
-
नाशिकमध्ये कोरोना टेस्टिंगमध्ये घोळ, टेस्टिंग लॅब्सना नोटिसा
नाशिक : कोरोना अहवालासंदर्भात खासगी लॅबकडूनच नागरिकांची फसवणूक
– प्रशासनाच्या तपासणीत अहवालांमध्ये आढळली तफावत
– दातार, थायरॉकेयर आणि सुप्रीम डायग्नोस्टिक लॅबला नाशिक जिल्हा प्रशासनाची कारणे दाखवा नोटीस
– तर दातार लॅबला योग्य तो खुलासा येईपर्यंत काम बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
-
नांदेडमधील मुदखेडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, परिसरात खळबळ
नांदेड : अप्लवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार,
मुदखेडच्या अनाथ आश्रमातील धक्कादायक प्रकार,
पिडीत मुलीने मैत्रीणीसह आश्रमातून पलायन करत गाठले किनवट,
किनवटच्या रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुली सुरक्षित,
दोन्ही मुलींना मुदखेडला आणत वैद्यकीय तपासणी,
एका मुलीवर अनाथ आश्रमाच्या आश्रमचालकाने अत्याचार केल्याचे उघड,
अनाथ आश्रमाचा संचालक शिवाजी गुठठे अद्याप फरार,
गुन्हा दाखल करत मुदखेड पोलीस घेतायत आरोपीचा शोध.
-
संजय राठोड आज राजीनामा देणार- सूत्र
मुंबई : संजय राठोड आज राजीनामा देणार, सूत्रांची माहिती
संजय राठोड यांच्या मुंबईतील छेडा सदनबाहेर पोलिसांचा बंदोबस्त
8 महिला पोलिसांची तैनात
– दीड वाजता भाजपची पत्रकार परिषद, काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष
-
भंडाऱ्यात चालला नगर परिषदेचा अतिक्रमणावर हातोडा, 125 दुकानांचे हटवले अतिक्रमण
भंडारा : दुकानांच्या वाढलेल्या अतिक्रमनावर चालला नगर परिषदेचा हातोडा
125 दुकानांचे हटवले अतिक्रमण, 7 हजार रुपयांची केली दंड वसुली
कोरोनाच्या काळात अतिक्रमण हटविल्याने लहान व्यावसायिक अडचणीत
-
तीन दिवसांनंतर नागपुरात रुग्णसंख्या हजारच्या खाली, 984 नवे रुग्ण
नागपूर – तीन दिवसांनंतर रुग्णसंख्या आली हजारच्या खाली
गेल्या 24 तासात 984 नवीन रुग्णांची भर, 10 जणांचा मृत्यू
नागपुरात सध्या 7934 सक्रिय कोरोना रुग्ण
5516 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर 2418 जणांव रुग्णालयात उपचार सुरु
नागपुरात अजून धोका कायम, नागरिकांना काळजी घेण्याच आवाहन
-
राज्याच्या अर्थसंकल्पात बुलडाणा जिल्ह्याला काय मिळणार, जिल्हावासियांचे लक्ष
बुलडाणा : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे जिल्ह्याचे लक्ष
लोणार सरोवर विकास आराखड्या गती मिळणार का, याची सर्वांना उत्सुकता
मागील अर्थसंकल्पात 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती
यावेळी जिल्ह्याला काय मिळणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष
-
नागपुरात मार्च महिन्यात होणार सिरो सर्वेक्षण, चार हजारपेक्षा जास्त नागरिकांची होणार चाचणी
नागपुरात मार्च महिन्यात होणार सिरो सर्वेक्षण
चार हजार पेक्षा जास्त नागरिकांची होणार चाचणी
शहरातील दहा झोनमधील प्रत्येकी 200 लोकांची चाचणी
तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 100 लोकांची चाचणी
तालुक्यातील दोन गावातील प्रत्येकी 50 लोकांची केली जाणार चाचणी
-
पुण्यात खासगी रुग्णालयातही कोरोना प्रतिबंधक लस मिळणार
– पुण्यात खासगी रुग्णालयातही कोरोना प्रतिबंधक लस मिळणार
– पंतप्रधान आयुष्मान भारत जनआरोग्य योजना, महात्मा फुले आरोग्य योजना अशा शासकीय योजनांचे लाभ देणाऱ्या रुग्णालयांमध्येच ही लस उपलब्ध होणार आहे
– केंद्र शासनाने नुकतीच 60 वर्षांपुढील आणि 45 वर्षांपुढील व्याधीग्रस्त नागरिकांना लस देण्यास परवानगी दिली आहे
– या लसीसाठी रुग्णालयांना 250 रुपये दर आकारण्यास परवानगी दिली आहे. मात्र, यातील 150 रुपये रुग्णालयांना शासनाकडे भरावे लागणार आहेत
– पालिकेकडून 42 रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध
– प्रत्येक केंद्रावर 100 या प्रमाणे दिवसाला पाच हजार लस मोफत देण्याचे नियोजन करण्याचे काम सुरु
– आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांची माहिती.
-
पुण्यात कोरोनाचे 739 नवे रुग्ण, 412 जण कोरोनामुक्त
पुणे – गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
– गेल्या 24 तासांत पुणे शहरात कोरोनाचे 739 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
– तर दिवसभरात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.
– गेल्या 24 तासांत 412 रुग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
– सध्या पुणे शहरात कोरोनाचे 260 गंभीर रुग्ण असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
-
कोरोनाला थोपवण्यासाठी नागपुरात मार्केट बंदचं आवाहन
नागपुरात वाढत्या कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी रविवारी मार्केट बंदचं आवाहन
प्रशासनाच्या आवाहनाला शनिवारी नागपुरात संमिश्र प्रतिसाद
काही प्रमाणात दुकान बंद, काही प्रमाणात नागरिक रस्त्यावर
आज कसा प्रतिसाद मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष
-
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढला, नवे 527 कोरोनाग्रस्त आढळले
– नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कायम
– गेल्या 24 तासांत जिल्ह्यात पुन्हा 527 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
– यात सर्वाधिक 393 रुग्ण नाशिक शहरात
– उपचारादरम्यान 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू
– जिल्ह्यात मृत्यूचा एकूण आकडा गेला 2101 वर
-
माणगावमध्ये गाड्यांच्या स्पेअरपार्टच्या दुकानाला भीषण आग
रायगड : माणगावमध्ये गाड्यांच्या स्पेअरपार्टच्या दुकानाला भीषण आग
आगीत स्पेअरपार्टचे दुकान जाळून खाक
कोणतीही जिवीतहानी नसल्याची माहिती
रोहा आणि महाड नगरपरिषदेच्या फायर ब्रिगेडने स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली
Published On - Feb 28,2021 8:14 PM