महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
बुलढाणा जिल्ह्यात नायलॉन मांजावर बंदी, जिल्हाधिकारी एस रामामुर्ती यांचे आदेश, पक्षी आणि मानव जिवीतवास धोका होण्याची शक्यता असल्याने घातली बंदी, विक्री, साठवणूक आणि वापरावर बंदी .
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात. अपघातात श्रीपाद नाईक यांना गंभीर दुखापत
– मुच्छड़ पानवालाच्या जयशंकर तिवारी याची एनसीबी कार्यलयात सुरू आहे चौकशी
– सध्या मुच्छड़ पानवाला आहे एनसीबी कार्यलयात
– एनसीबी तपासात त्याचा नाव आला आहे समोर
– अटक आरोपी करन सजनानी हा पानवाला ह्याला देत होता ड्रग
– मुच्छड़ पानवालाच्या केम्पस कार्नर स्थित दुकानातून सापडला आहे काही NDPS पदार्थ
– मुच्छड़च्या भूमिका क़ाय होती …त्याची शुरु आहे सध्या चौकशी
– नाशिकच्या पंचवटी परिसरातील श्रीजी पॅलेसला भीषन आग
– आगीच कारण अस्पष्ट
– अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल
बर्ड फ्लू संदर्भात राज्य सरकारची अधिसूचना जारी
परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढलाय
राज्यातील इतर जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे झालेलं नुकसान किती आहे
जनतेमध्ये अंडी मास त्यासंदर्भात जनजागृती अभियान सुरू
पंतप्रधांनांनी स्वतः लस टोचून घ्यावी, लसीबाबत काही शंका उपस्थित केल्या जात आहेत, त्यामुळं विश्वास निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांनी लस टोचून घ्यावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची मागणी
नवी दिल्ली : देशातील काही राज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाला आहे. बर्ड फ्लूबाबत अफवा पसरु नये, याचीही काळजी आवश्यक आहे. आपली एकजूट आणि एकत्रित प्रयत्न प्रत्येक चॅलेंजपासून आपल्याला बाहेर काढतील, असेही मोदींनी सांगितले
नवी दिल्ली : कोव्हिन नावाचे डिजीटल अॅप बनवण्यात आले आहे. आधार कार्डद्वारे याची नोंदणी केली जाणार आहे. कोरोनाची लस मिळाल्यानंतर दुसऱ्यांदा त्या व्यक्तीला लस कधी दिली जाईल, याचीही यात माहिती असणार आहे. कोव्हिन अॅपवर तातडीने प्रमाणपत्र मिळेल. त्यावरुन कोणाला लस मिळेल, हे समजेल. भारत जे करणार आहे, ते इतर देश फॉलो करतील, त्यामुळे आपली जबाबदारी महत्त्वाची आहे – पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : ड्राय रन हे देखील यश आहे. युनिव्हर्सल व्हॅक्सिनेश प्रोग्रामचा अनुभव आहे. मतदानाची सुविधेचा अभाव आहे. बुथ स्तरावरील रणनीती आपल्याला इथे आपल्यात आणायची आहे. लस देणाऱ्यांची ओळख हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कोव्हीन अॅप आणि लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल, लसीकरणाचा रिअल टाईम डेटा अॅपवर अपलोड करणे प्राधान्य, अन्यथा नुकसान होईल, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.
नवी दिल्ली : आपल्या व्हॅक्सिन जगातील कोणत्याही लसीशिवाय किफायतशीर आहे. भारताला लसीसाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहावे लागले असते तर काय परिस्थिती आली असती विचार करा, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
भारतातील परिस्थितीचा विचार करुन लस तयार करण्यात आली आहे. भारताचा अनुभव कामी येईल, असेही मोदी म्हणाले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. कोरोनाची लस सर्वात आधी कोरोना योद्धांना देण्यात येईल, अशी माहिती मोदींनी दिली.
बीड : पाटोदा तालुक्यातील मुगाव इथे चार दिवसात तब्बल 26 कावळ्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मृत कावळ्यांचा अहवाल पुण्याला पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट आज आला आहे. कावळ्यामध्ये बर्ड फ्लू संसर्गाचे विषाणू आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील चिंचोर्डी गावात शंभर कोंबड्यांचा मृत्यू, तर हिमायतनगर शहरात शेकडो मधमाशा मृतावस्थेत आढळल्या, चिंचोर्डी गावात तीन पोल्ट्री व्यावसायिकांच्या शंभर कोंबड्या दगावल्या, कोंबड्याना दफन करून पशुसंवर्धन विभागाला सूचना दिली.
एल्गार परिषद आयोजकांपैकी एक हर्षाली पोतदारला अटक, फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी कारवाई, मुंबईतील एमआरए मार्ग पोलिसांनी केली अटक
मुंबईत नागरीकांमध्ये बर्ड फ्लूची भीती, भीतीचा थेट परिणाम चिकन आणि अंड्यांवर, मुंबईत अंड्यांचे दर 6 रुपयांवरून आज 5 रुपयांवर, येत्या दोन दिवसांत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर अंडा बाजारात दर 3 ते 4 रुपयांवर येण्याची अंडा व्यापार्यांना भीती
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील आगीत दहा नवजात बाळांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी गंभीर जखमींसाठी 50 हजार, तर मृतांसाठी दोन लाख पंतप्रधान फंडातून मदत जाहीर करण्यात आली आहे
PM @narendramodi has approved an ex-gratia of Rs. 2 lakh each from Prime Minister’s National Relief Fund for the next of kin of those who have lost their lives due to the tragic hospital fire in Bhandara, Maharashtra. Rs. 50,000 would be given to those seriously injured.
— PMO India (@PMOIndia) January 11, 2021
नालासोपाऱ्यातून 4 लाख 25 हजार किमतीचे 85 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, 50 वर्षीय व्यक्तीला अटक, मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई, नालासोपारा पूर्व नगीनदासपाडा परिसरात 9 जानेवारी रोजी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे, अटक आरोपी विरोधात NDPS कायदा कलम 8 (क),20(क), 22 प्रमाणे मिररोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई उच्च न्यायालयाकडून अभिनेता सोनू सूदला दिलासा, मुंबई महापालिकेला 13 जानेवारीपर्यंत काहीही कारवाई न करण्याचे आदेश, BMC नोटिसला सोनू सूदने दिलं होतं कोर्टात आव्हान, रहिवासी इमारतीचा हॉटेल व्यवसायासाठी वापर केल्याचं प्रकरण
पुणे : MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर, 14 मार्चला राज्य सेवा पूर्व परीक्षा, तर 27 मार्चला अभियांत्रिकी पूर्व परीक्षा, 11 एप्रिलला दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त परीक्षा होणार, लोकसेवा आयोगाकडून परीक्षेच्या तारखा जाहीर
आजचा क्षण समाधान देणारा आहे. 2012-13 मध्ये कोस्टल रोडची संकल्पना चर्चेला आली. वांद्रा ते वरळी सी-लींक बांधलं आहे. मुंबई महापालिकेने यामध्ये दोनदा सुधारणा केल्या, नियोजन अप्रतिम केलं. कोरोना काळात सर्व ठप्प असताना वेग मंदावू दिला नाही. ज्या वेगानं काम सुरु आहे त्यामुळं ठरवलेल्या वेळेअगोदर काम पूर्ण होईल, असा विश्वास आहे. रणांगणामध्ये मावळा नसेल तर नेता असून उपयोग नाही. महापालिका आयुक्त,त्यांची टीम, अभियंते यांचं चांगल काम सुरु आहे. मावळा मशीन द्वारे खोदकाम करण्यात येणार आहे.
कंगना रानौत आणि बहिणीला मुंबई हायकोर्टाचा दिलासा, अटक आणि पोलीस कारवाई 25 जानेवारीपर्यंत लांबणीवर, कंगनाला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याची गरज नाही, कोर्टाचे पोलिसांना निर्देश
नाशकात गीते, बागुलांचं शिवसेना कार्यालयात भव्य स्वागत, गीते, बागुल यांची भव्य मिरवणूक, गीते-बागुल यांचं तगडं शक्ती प्रदर्शन, फटाक्यांची आतषबाजी आणि कार्यकर्त्यांची तुफान गर्दी, महिला पदाधिकारी देखील सहभागी
बर्ड फ्लू ग्रस्त मुरुंबा गाव प्रशासनाने केलं बंद, गावात येण्याजाण्यासाठी प्रशासनाने घातली बंद, गावातली दुकानं, वाहनं आणि व्यवहार कडकडीत बंद, गावकऱ्यांना रस्त्यावर फिरण्यासही बंदी, बॅरिगेट लावून रस्ते केले बंद, मुरुंबा गावातील बर्ड फ्लू इतरत्र पसरू नये म्हणून प्रशासनाची खबरदारी
सिन्नरमधील शेतकऱ्यांची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे इच्छा मरणाची मागणी, विविध सहकारी बँकांनी गौडबंगाल करत शेतकऱ्यांना शेकडो पटींनी वसूली मोहीम राबविल्याचा आरोप करत केली मागणी, शेतकऱ्यांच्या नावाने खोटे कर्ज काढून शेतकऱ्यांना फसवणूक केल्याची केली तक्रार, यावर तोडगा तसेच चौकशी न केल्यास जीवन संपवण्याची परवानगी देण्यात यावी ही केली मागणी, प्रहार संघटना झाली आक्रमक
नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी, आज सलग तिसऱ्या दिवशी शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, रुग्ण बरे होण्याच प्रमाणही 97.27 टक्के, रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस घट
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात कचरा उचलणाऱ्या घंटागाडी ठेकेदारांनी पुकारले काम बंद आंदोलन, शहरात ठिकठिकाणी साचले कचऱ्याचे ढीग, पसरली दुर्गंधी, मागील पाच महिन्यांचे 90 घंटागाडी ठेकेदारांचे पैसे महानगरपालिका प्रशासनाने न दिल्याने सुरु केले आंदोलन
परभणी : मुरुंबा गावातील पोल्ट्री फार्ममध्ये शुकशुकाट, बर्ड फ्लू झालेल्या कोंबड्या खड्ड्यात पुरल्या, याच गावातील आणखी दहा हजार कोंबड्या करणार नष्ट
पुणे – सरकारने डोकं ठिकाणावर ठेऊन काम करावं, राज ठाकरे यांची सुरक्षा काढल्याने मनसे नेत्या रुपाली पाटील भडकल्या, भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीही फरक नाही, राज ठाकरेंना कार्यकर्ते हेच कवच, राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या बाबतीत सरकारने निर्णय घ्यावा
पुणे बंगळुरु महामार्गावर चौथा अपघात, कंटेनरची रिक्षा आणि पोलिसांच्या गाडीला धडक, नऱ्हे पुलाजवळ झाला अपघात, रिक्षामध्ये असलेल्या सहा महिन्यांच्या बाळासह तीन जण जखमी, सकाळपासून महामार्गावर झालेल्या चार अपघात तीन जणांचा मृत्यू
नाशिक -सिन्नरमधील शेतकऱ्यांची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे इच्छा मरणाची मागणी, विविध सहकारी बँकांनी गौडबंगाल करत शेतकऱ्यांना शेकडो पटींनी वसूली मोहीम राबविल्याचा आरोप, शेतकऱ्यांच्या नावाने खोटे कर्ज काढून फसवणूक केल्याची केली तक्रार, यावर तोडगा तसेच चौकशी न केल्यास जीवन संपवण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी, प्रहार संघटना आक्रमक
सतत दोन दिवस पडलेला अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचे नुकसान, शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडून पंचनामा करण्याची मागणी करण्यात येत आहे, मात्र कृषी विभागाकडे सध्या तरी लक्ष द्यायला तयार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे
सांगलीत ऊस दराच्या एफआरपीचे आंदोलन चिघळलं, एक रकमी एफआरपी मिळावी यासाठी शेतकरी आक्रमक, राजारामबापूसह साखर कारखान्याचे सावळवाडी येथील येथील गट ऑफिस पेटवले, राजारामबापूसह साखर कारखाना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा आहे.
नागपूर मनपा आयुक्ताविरोधात हॅास्पिटल असोसिएशन उच्च न्यायालयात, कोरोना रुग्णाच्या बिलाची तपासणी करण्यासाठी मनमानी आदेश काढण्याचा आरोप, खाजगी रुग्णालयासोबत बेकायदेशीर व्यवहाराचा आरोप, हॅास्पिटल असोसिएशनने उच्च न्यायालयात दाखल केली याचिका, दोन आठवल्यानंतर होणार सुनावणी
शक्ती कायद्याच्या विधीमंडळ समितीची पहिली बैठक आज नागपुरात, कायदा आणखी बळकट करण्यासाठी बैठक, निमंत्रित महिला आणि वकील संघटनांसोबत बैठक, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक
कोरोना काळात नागपूर मनपाला सर्वाधिक फटका, मनपाच्या उत्पन्नात 295.24 कोटी रुपयांची घट, कोरोनाच्या काळात मालमत्ता करवसूलीकडे दुर्लक्ष, मनपाचं उत्पन्न घटल्याने शहरातील विकास कामांवर परिणाम, उत्पन्न वाढीसाठी आता मनपाचा मालमत्ता करवसूलीवर दिला भर
परभणी : देशातील मध्य प्रदेश, हरियाणा, केरळसारख्या राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आता हे संकट महाराष्ट्रातही धडकलं आहे. राज्यातील परभणी जिल्ह्यातील मुरुंबा गावात तब्बल 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याची माहिती भोपाळच्या राष्ट्रीय प्रयोग शाळेने दिलीये. 3 दिवसांपूर्वी मुरुंबा गावातील आठशे कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्याचे नमुने भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठवले होते. भोपाळच्या प्रयोगशाळेने या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचं सांगितलं आहे.
नागपूर जिल्ह्यात 23 शाळा अनधिकृत, अनेक वर्षांपासून अनधिकृत शाळा सुरु असूनही कारवाई नाही, अनधिकृत शाळांबाबत शिक्षण विभाग गप्प का?, संतप्त पालकांचा शिक्षण विभागाला सवाल
औरंगाबाद जिल्ह्यातील गेवराई पायगा गावात सरपंच उपसरपंचाच्या खुर्च्या पेटवल्या, गावाला पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पेटवल्या खुर्च्या, प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्याने पेटवल्या खुर्च्या, सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवकाच्या पेटवल्या खुर्च्या, ग्रामपंचायतमधून खुर्च्या बाहेर काढून पेट्रोल टाकून पेटवल्या खुर्च्या, प्रहारचा कार्यकर्ता मंगेश साबळे याने केलं धक्कादायक कृत्य, पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर पदाधिकाऱ्यांना गावबंदी करण्याचा ईशारा, फेसबुक लाईव्ह करत खुर्च्या पेटवल्यामुळे सर्वत्र खळबळ, सरपंच उपसरपंच ग्रामसेवकाच्या खुर्च्या जळून खाक
वाराणसीहून आलेल्या 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, औरंगाबाद रेल्वेस्थानक परिसरतील घटना, मुलीला एकटं पाहून अज्ञातांनी रेल्वे स्थानकावर निर्जन स्थळी नेत केला बलात्कार, मुलीच्या नातेवाईकांची चुकमुक झाल्यानंतर घडला धक्कादायक प्रकार, औरंगाबादच्या उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, रात्री उशिरा पीडितेची घाटी रुग्णालयात करण्यात आली वैद्यकीय तपासणी, उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तीन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल
शरद पवार आज दिल्लीत, शेतकरी आंदोलनावर खलबतं, शरद पवारांच्या अध्यक्षतेत बैठक, पवार यांच्या दिल्लीतील
घरी होईल बैठक, 11 वाजता होणार बैठक, विरोधी पक्षातील नेते
परभणी तालुक्यातील मुरुंबा गावातील कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची माहिती, तीन दिवसात 1 हजार कोंबड्यांचा झाला होता मृत्यू
मुरुंबा गावात तीन दिवसात 1000 कोंबड्याचा मृत्यू झाला आहे, सेलू तालुक्यातील कुपटा गावात 8 दिवसात 500 कोंबड्या
भंडारा बंदला पाठिंबा देण्याचं बावनकुळेंचं आवाहन, भंडारा जिल्हातील जनतेने आणि व्यापारी बंधू भगिनींना आजच्या
भंडारा बंदला पाठिंबा द्यावा असं आवाहन भाजप नेते चंद्रकांत बावनकुळेंनी केलंय, भंडारा दुर्घटनेतील पीडितांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊनही कुठलाही ठोस निर्णय न घेतल्याने बावनकुळेंनी नाराजी व्यक्त केली
राज्य सरकारकडून सुरक्षेत कपातीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, ‘मी कधीही सुरक्षा घेतली नव्हती. मुख्यमंत्री झाल्यानंतर मला सुरक्षा मिळाली होती. याकूब मेमन आणि नक्षलवादी कारवायांनंतर केंद्र सरकारनं काही निर्देश दिले होते. याआधारावर माझी सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता राज्य सरकारला धोका कमी झालाय असं वाटतं असेल म्हणून त्यांनी सुरक्षा कमी केली असावी,’असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.