करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या “बारामती ऍग्रो’ला 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय झाला आहे. राज्य शिखर बॅंकेचे कर्ज असल्याने बॅंकेकडून हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू होती. मुंबईत आज (ता. 12 जानेवारी) राज्य बॅंकेच्या कार्यालयात झालेल्या लिलाव प्रक्रियेत हा कारखाना “बारामती ऍग्रो’कडे देण्यात आला.
यवतमाळ- महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी यवतमाळच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांची निवड
पक्ष्याच्या वरिष्ठ नेत्याचे आभार, माझ्यावर जो विश्वास दाखविला तो सार्थकी ठरवेल आणि राज्यात महिलांसाठी काम करणार
राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. आज सिरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार डोसेस प्राप्त झाले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जाणार आहे.
देशात संविधानिक संस्थां न मानण्याचा ट्रेंड निर्माण झालाय. सुप्रीम कोर्ट इज सुप्रीम असं मानून आंदोलकांनी सुप्रीम कोर्टाचा आदेश मान्य केला पाहिजे
सुप्रीम कोर्टानं एक प्रकारे विन सिच्युएशन निर्माण केलीये… मी त्यावर भाष्य करणं योग्य नाही. परंतु केंद्र सरकारने आणि एकूणच भाजपने निवडणूक आयोग, हायकोर्ट, ईडी, सुप्रीम कोर्ट ह्या संविधानिक व्यवस्था आहेत अन त्या मान्य केलेल्या आहेत…
महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक सुरु… अजित पवार, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात यांच्यात बैठक सुरु…
आगामी महानगरपालिका आणि औरंगाबादच्या नामातरांवरून सुरु असलेल्या मतभेदांवर चर्चा होण्याची शक्यता तसेच रखडलेल्या महामंडळांच्या अध्यक्षपद आणि सदस्यपदावर होणार चर्चा
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये नामांतरावरून मतभेद सुरु आहेत या वादावर तोडगा काढू असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं.
महावितरणच्या नेरूळ विभागाची वीजचोरी विरुद्ध धडक मोहीम… नेरूळ, पाम बीच तसंच सीबीडी बेलापूरमध्ये 116 प्रकरण पकडली. यामध्ये एकूण 24 लाखाची वीजचोरी पकडली गेली. महावितरणच्या भांडूप परिमंडलात वीजचोरीवर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या आदेशाप्रमाणे परिमंडलातील विविध विभागात वीजचोरांविरोधात धडक मोहीम राबविण्यात आली आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून पनवेलकरांना भरावा लागणार मालमत्ता कर… 40 टक्के नागरिकांना मालमत्ताकराच्या नोटिसा बजावल्या… ग्रामीण भागाला जुन्या ग्रामपंचायतीचाच कर लागणार… शहरी भागालाही कमी प्रमाणात कर आकारणी केली जाणार… महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली माहिती
नंदुरबारचे खासदार डॉक्टर हिना गावित आणि त्यांचे वडील आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांना कोरोनाची लागण… दोघांची प्रकृती स्थिर… डॉ. विजयकुमार गावित हे डायबेटिक असल्याने रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणी खाली दाखल… तर डॉक्टर हिना गावित या घरीच होम क्वारटाईन… दोघांची प्रकृती स्थिर… संपर्कात आलेल्या व्यक्तीने कोरोना चाचणी करण्याचं गावित कुटुंबाचे आवाहन
कर्नाटकचे माजी मंत्री जीवनराज अल्वा यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याचा मेव्हणा आदित्य अल्वा याला ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. त्याला बेंगळुरू पोलिस गुन्हे शाखेने चेन्नई येथून अटक केली.
मुंबई पोलीस नितीन खैरमोडे यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांच्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांच्या विरोधात शिवसेना भवन इथं आंदोलन सुरू…
खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मानले आभार… केंद्र सरकारचा अत्याचार सहन करत शेतकरी न्याय मागतोय… असंवेदनशील सरकारकडून अनेकदा चर्चा होवूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय झाला नाही… सरकारनं संवेदनशील व्हायला हवं… चर्चेची मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष केलं… आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारला संधी… सर्वांशी चर्चा करावी… शेतकरी प्रश्नावर निर्णय घ्यावा, असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय.
भाजप सरकार शेतकऱ्यांचं ऐकत नव्हतं… आता तरी कोर्टाच्या निर्णयानंतर सरकारने शेतकऱ्यांचं ऐकावं.. सरकारला आता कळलं असेल कायदा किती अडचणीचा आहे. आतातरी त्यात बदल करण्यासाठी काही भूमिका घ्यावी, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष फायटर असावा. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नवीन अध्यक्ष करण्याचा ठरवला तर लढावू अध्यक्ष द्यावा. विदर्भात काँग्रेस मजबूत आहे. अध्यक्ष विदर्भाचा झाल्यास आनंद होईल. माजी सुरक्षा चुकुन कमी केली असावी. मुख्यमंत्र्यांनी माझ्या सुरक्षा बाबत पूर्णविचार करावा. काँग्रेस सरचिटणीस के वेणूगोपाल यांच्याकडे पक्ष संघटना आणि ओबीसीच्या मागण्यांवर चर्चा केली आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. तसेच या कृषी कायद्यांवर तोडगा काढण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
भाजप नेते आशिष शेलार शरद पवारांच्या भेटीला; अर्ध्यातासापासून खलबतं सुरू, शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या बैठक, क्रिकेटच्या मुद्द्यावर बैठक असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली.
मनमाडमध्ये पुणे-इंदूर महामार्गावर ट्रक-कार आणि मोटारसायकलचा विचित्र अपघात, कार आणि मोटारसायकलवर ट्रक झाली पलटी, अपघातात दोघांचा मृत्यू, 2 जखमी, तर कारमधील 4 जण बचावले, अपघातामुळे ट्रॅफिक जाम, पोलीस घटनास्थळी दाखल
नाशिक ग्रामपंचायत निवडणूक लिलाव प्रकरण, 2 कोटी 5 लाख रुपयांची बोली लागलेल्या लिलावाची चौकशी पूर्ण, बोली लावणाऱ्यावर होणार कारवाई, निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष, राज्यात गाजलेल्या 2 कोटी 5 लाख रुपयांच्या लिलावाचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर, बिनविरोध निवडणूक आणि सरपंचपदासाठी लिलाव झाल्याचा ठपका, अहवाल निवडणूक आयोगाला सादर, महादेव मंदिरच्या आवारात लागली होतो बोली, जिल्ह्यातील पहिलीच घटना
पाचाड येथील समाधी स्थळी राजमाता जिजाऊंची जयंती साधे पणाने साजरी, किल्ले रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे राजमातांचे वास्तव्य होते, त्यामुळे प्रतीवर्षी मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा होते, पण यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर केवळ समाधी स्थळाचे पुजन करून राजमातांची जयंती साजरी करण्यात आली, महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते जिजाऊंच्या समाधी स्थळी पुतळ्याचे अभिषेक आणि पुजन करण्यात आले
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी काळया कायद्याची पोलखोल यात्रा पंढरपुरात दाखल, संयुक्त किसान मोर्चाने काढली पोलखोल यात्रा, कायदे रद्द होईपर्यंत आम्ही घरी जाणार नाही, आंदोलन कर्त्यांचा निर्धार, कायदा रद्द करण्याची सदबुध्दी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याना मिळावी यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणीमातेला घातले साकडे
महाराष्ट्रातल्या आणखी एका बँकेचं लायसन्स आरबीआयनं रद्द केलंय. उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचं लायसन्स रद्द करण्यात येत असल्याची घोषणा आरबीआयनं केलीय. बँकेची जी सध्याची स्थिती आहे, त्यात बँक ग्राहकांची देणी देण्यात किंवा व्यवहार करण्यास असमर्थ असल्याचंही आरबीआयनं म्हटलंय. विशेष म्हणजे बँकेचं लायसन्स रद्द झालं तर कोणत्याही ग्राहकाची 5 लाखापर्यंतची रक्कम सुरक्षित आहे. ती त्यांना परत मिळण्याची गॅरंटी आहे. त्यानुसार उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेच्या 99 टक्के ग्राहकांचा पैसा सुरक्षित आहे.
महिला आणि बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्या भंडारा सांत्वन भेटीत कार्यकर्ते आणि अधिकारी कर्मचारी यांनी मारला चिकन अन फ्रीश फ्रायवर ताव, अधिकारी,कार्यकर्ते पोलिसांची चिकन खाण्यासाठी गर्दी, विरोधकांकडून टिकेची झोड
मध्यंतरी अवकाळी पाऊस पडल्याने शेतीच्या कामाला ब्रेक लागला होता, मात्र हवामानामध्ये परत बदल झाल्याने शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे, नंदुरबार जिल्ह्यात प्रमुख्याने मिरची, कापूस, तूर, सोयाबीन आणि उसाच्या उत्पन्न घेतले जात असतं, सध्या उसाचा हंगाम सुरु असल्याने परत ऊसतोडीला सुरुवात
मुक्ताईनगर शहरातील संतांजीनगर मधील सचिन तुळशीराम मनसुटे 35 वर्षीय इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या, मुक्ताईनगर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद, आत्महत्या ग्रस्त मणक्याच्या आजाराने त्रस्त असल्याची माहिती
बीडमधील पाटोदा तालुक्यातील मुगाव संसर्गक्षेत्र जाहीर, बीडच्या जिल्हाधिकऱ्यांनी दिले आदेश, 9 गावात कोंबडे खरेदी-विक्रीवर बंदी, आष्टी 2 आणि पाटोदा तालुक्यातील 7 गावात प्रतिबंध, मुगावमध्ये आतापर्यंत 26 कावळ्यांचा झालाय बर्ड फ्लू ने मृत्यू
नाशकात मनसेने लावलेला ‘छत्रपती संभाजी महाराज नगर’चा फलक चोरीला, औरंगाबाद नाका परिसरात आंदोलन करून लावला होता ‘छत्रपती संभाजी नगर’ नावाने फलक, फलक चोरीला गेल्याची मनसेकडून पोलिसांत तक्रार, फलक चोरला की राजकीय सूडबुद्धीने काढला याची सध्या चर्चा, औरंगाबादच्या नामांतरणा बाबत मनसे आक्रमक
जानेवारी महिन्यातील प्लस पोलिओ लसीकरण मोहीम रद्द, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे पुढच्या आदेशपर्यंत लसीकर रद्द, सर्व राज्यांच्या आरोग्य आणि कुटुंब खात्यांच्या प्रधान सचिवांना पत्र, औरंगाबाद हद्दीतही प्लस पोलिओ लसीकरण मोहीमे रद्द, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांची माहिती
नाशिकात 10 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचं नियोजन, शहरातील सहा मुख्य केंद्रांवर केले जाणार लसीकरण, दिवसभरात 100 जणांना लस देण्याचं टार्गेट, महापालिका प्रशासन अॅक्शन मोड मध्ये
गीते-बागुल यांच्या सोडचिट्ठी नंतर भाजपात अस्वस्थता, उद्या होणाऱ्या फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याच नियोजन सुरु, भाजपातील पडझड रोखण्यासाठी फडणवीस घेणार महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, भाजपातील डॅमेज कंट्रोल साठी आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात
नागपुरात शिवसेना समन्वयकाच्या बैठकीत तणाव, शिवसेना समन्वयक प्रकाश वाघ यांच्या बैठकीत तणाव, नागपुरातील अनेक निष्ठानवंत शिवसैनिकांचे राजीनामे, शहर संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदींवर शिवसैनिकांची नाराजी, बैठकीत काँग्रेसी भगावच्या घोषणा, ‘दुष्यंत चतुर्वेदींना यवतमाळ वाशिममध्ये पाठवा’, माजी जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधेंची मागणी, काँग्रेसमधून आलेल्यांना मुख्य पदं दिल्यानं नाराजी, मनपा निवडणूकीच्या पूर्वी शहरात शिवसेनेत असंतोष
मुछड पान वाल्यापैकी एकाला अटक, रामकुमार तिवारीला अटक, काल एनसीबी कार्यलयात बोलावण्यात आला होता त्याला चौकशीसाठी, तिवारी याच्या दुकानातून अर्धा किलो ड्रग्सशी साधर्म्य असणारी वस्तू जप्त.
राज्याच्या उपराजधानीत भुमाफिया झाले बेलगाम, प्लॉट, जमिन हडपणे, बेकायदा प्लॉट पाडून विक्री, गृहमंत्र्यांच्या शिबीरात भुमाफियांविरोधातील तक्रारींचा पाऊस, अनिल देशमुख यांनी ऐकूण घेतली 75 प्रकरणं, भुमाफियांविरोधात कठोर कारवाई करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश, मनपा आणि एनआयटीच्या अधिकाऱ्यांसमोर तक्रारीचा निपटारा, शहरातील भुमाफीयांना वेसण घालण्याची प्रक्रिया सुरु
भंडारा 10 नवजात बालकांचं मृत्यू प्रकरण, चौकशी अहवाल येण्यास आणखी विलंब होणार, चौकशी अहवाल येण्यास आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता, आरोग्य मंत्र्यांनी तीन दिवसांत अहवाल देण्याचे दिले होते निर्देश, मुख्यमंत्र्यांनी समितीच्या अध्यक्षांची केली होती उचलबांगडी, चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाईची दिशा ठरणार, भंडारा पोलीसांनी 10 बालकांच्या आकस्मिक मृत्यूची केली नोंद
निसर्गाच समतोल राखण्यासाठी होणारे प्रदूषण रोखण्यासाठी लोणावळा येथे आज सायकल डे चं आयोजन करण्यात आलं आहे, यावेळी प्रसिद्ध हिंदी चित्रपटातील अभिनेते सुनील शेट्टी हे उपस्थित, थोड्या वेळात सुरु होणार सायकल डे
वसई-विरार नालासोपाऱ्यात आज पासून सागरी सुरक्षा अभियानाला सुरुवात, समुद्राकडे जाणारे मुख्य रस्ते, समुद्र किनाऱ्यावर पोलिसांचा बंदोबस्त, सागरी सुरक्षा अभियानाअंतर्गत सर्व वाहनांची कसून चौकशी सुरू
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची तयारी, एक जिल्हास्तरीय नियंत्रण समिती आणि 13 अति जलद प्रतिसाद पथक नियुक्त, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आढावा बैठक घेत नियुक्त केली पथकं, संभाव्य संकटाचे गावपातळीवर सूचना देण्यासह नेसल स्वॅब आणि रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याच्या ही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या सूचना
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हद्दवाढी साठी कृती समिती आक्रमक, हद्दवाढीच्या फेर प्रस्तावाबाबत लवकर निर्णय घेण्याची कृती समितीची आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्याकडे मागणी, 42 गावांसह तीन एमआयडीसीचा समावेश करा अशी ही केली मागणी, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यावेळी हद्दवाढीचा फेर प्रस्ताव देण्याबाबत केली होती सूचना
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर परिसरात 250 कोंबड्यांचा मृत्यू, 250 कोंबड्यांच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट, संबंधीत पोल्ट्रीतील नमुने तपासणीसाठी पाठवल्याची माहिती, कोंबड्यांच्या मृत्यूनं परिसरात चर्चांना उधाण, बर्ड फ्लूच्या भीतीने नागपूर जिल्ह्यातील पोल्ट्रीमालक चिंतेत
जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना रोगावर भारतातील पहिल्या वहिल्या कोविशिल्ड लसीचे डोस आज पहाटे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास विमानतळाकडे रवाना झाले. तीन कोल्डस्टोरेज कंटेनर प्रथम पाठवण्यात आले आहेत. काल सायंकाळी 6 कंटेनर इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. त्यातले पहिले तीन कंटेनर आज पहाटे रवाना झाले आहेत, औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळुरु, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा, हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या 13 शहरांमध्ये लसीचे हे डोस पाठविण्यात येणार आहेत
Maharashtra: Three trucks loaded with Covishield vaccine leave for the airport from vaccine maker Serum Institute of India’s facility in Pune. pic.twitter.com/S8oYq6mMgN
— ANI (@ANI) January 11, 2021
2 मृत कावळ्यांचे नमुने पॉझिटीव्ह, मुंबईत कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाल्याची धक्कादायक माहिती पुण्याच्या
पशुसंवर्धन प्रयोग शाळेच्या तपासणी अहवालातून समोर आली, राज्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना मुंबईतही चेंबूरच्या टाटा कॉलनीत 9 आणि गिरगाव येथील बालोद्यानात 12 कावळ्यांचा मृत्यू झाल्याचा घटना घडल्या होत्या, या घटनेनंतर पालिका प्रशासन अलर्ट झाली असून दोन मृत कावळ्यांचे नमुने पुण्याच्या पशुवैद्यकीय प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले होते, या अहवालात हे नमुने पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर मनपाची खबरदारी, मार्गदर्शक सूचना जाहीर, मुंबईसह राज्यात बर्ड फ्लूचे प्रादुर्भाव वाढत
असल्याने मांस आणि मटण विक्रेत्यांच्या दुकानांचे सर्वेक्षण करून स्वच्छता आराखडा, तयार करून घ्यावा, असे निर्देश प्रशासनाने सहाय्यक आयुक्तांना दिले
एक कोटी 10 लाख लसीच्या डोससाठी, सरकारकडून सीरम इन्स्टिट्यूटला ऑर्डर, लसीच्या प्रत्येक डोसची किंमत 210 रुपये, सीरमच्या अधिकाऱ्याची पीटीआयला माहिती