महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पहिल्यांदाच चाळीस वर्षानंतर मतदानाचा हक्क बजवणार नाहीत, तब्येत ठीक नसल्यामुळे मुंबईला आहेत, त्यांच्या कोथळी गावाची ग्रामपंचायत निवडणूक आहे, 15 जानेवारीला मतदान आहे
पालघर – तलासरी डहाणू परिसरात भूकंपाचे पुन्हा हादरे, मागील काही महिन्यांपासून भूकंपाचे धक्के थांबले होते. मात्र, बुधवारी दुपारी आणि सायंकाळी 7.12 मिनिटाला बसले तलासरी भागात दोन हादरे, दुपारी 1.6 रिस्टर स्केल तर सायंकाळी बसला 1.7 रिस्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का, कुठंही पडझड किंवा जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती
नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची 10 तासांच्या चौकशी नंतर अटक
नवाब मलिक यांना मोठा झटका
एनसीबीने केली चौकशी
ड्रग्ज प्रकरणी अटक
-राज्याच्या राजकरणात कॅबिनेट मंत्र्यांचे एका महिलेसोबत संबंध घेते हे पहिल्यांदाच समोर आलं.
-हे कुणी आरोप केले नाहीत, त्यांनीच मान्य केले आहे.
-धनंजय मुंडे हे संवेदनशील आहेत, त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे.
-ते देणार नसतील तर उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांनी राजीनामा घ्यावा.
-राजीनामा नाही घेतला तर भाजप राज्यभर आंदोलन करेल.
सोनू सूद प्रकरणात मुंबई हाय कोर्टाने निकाल राखीव ठेवला आहे. या प्रकरणात आज हायकोर्टात सुनावणी झाली. सोनू सूदच्या वकीलानी कोर्टात सांगितला की आमच्याकडे आवश्यक असणारी परवानगी आहे .मात्र, बीएमसी तर्फे युक्तिवाद करण्यात आला की निवासी इमारतीमध्ये व्यावसायिक वापरास परवानगी देता येणार नाही.
संशयाचं वातावरण राहणं योग्य नाही. पोलिसांनी याप्रकरणातील सत्य बाहेर आणावं. याप्रकरणी पूर्ण सत्य बाहेर आल्यानंतर आम्ही भूमिका मांडू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नाशिक: जेष्ठ स्वयंसेवक नाना नवले यांच्या पुस्तकाचं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा होत आहे. माजी मंत्री जयकुमार रावल, खासदार भारती पवार , महापौर सतीश कुलकर्णी तसेच सर्व आमदार पदाधिकारी उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात तिळगुळ देऊन माझा सत्कार झाला. पण मी विरोधी पक्ष नेता असल्याने तिखट बोलावं लागत पण एका गोड व्यक्तीच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम असल्याने तिळगुळ दिला असल्यानं तिखट बोलणार नाही.
माध्यमांच्या प्रतिनिधींना माझ्या भाषणाची उत्सुकता पण त्यांची निराशा होणार कारण त्यांना हवा असलेला मसाला मी देणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
– धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल,
– किरीट सोमय्या यांच्याकडून तक्रार दाखल,
– दोन लग्नांची कबुली दिल्यानंतर आयोगाकडे तक्रार
धनंजय मुंडे आणि अजित पवारांची बैठक
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी दादा आणि धनंजय मुंडेंची मंत्रालयात बैठक
परभणी जिल्ह्यात रात्री 8 वाजे पर्यंत लस येण्याची शक्यता आहे.
– उस्मानाबाद उद्या कोरोना लस येण्याची शक्यता
नाशिक – जेष्ठ स्वयंसेवक नाना नवले यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा, माजी मंत्री जयकुमार रावल, खासदार भारती पवार , महापौर सतीश कुलकर्णी तसेच सर्व आमदार पदाधिकारी उपस्थित
महाराष्ट्रमध्ये प्रदेश अध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदाची निवड होणार आहे. मी काँग्रेस अध्यक्षपदाच्या रेस मध्ये नाही आणि अध्यक्षपद मागणे ही सयुक्तिक नाही, असं काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
लैंगिक शोषणाचा आरोप असणाऱ्या खासदार धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची मागणी
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या @dhananjay_munde यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ! @OfficeofUT @PawarSpeaks pic.twitter.com/PVrlONAoBb
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 13, 2021
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे काही नेते, ईडीच्या फेऱ्यात अडकत असतानाच आता काही नेत्यांचे नातेवाईक एनसीबीच्या रडार वर आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान यांना एनसीबीने चौकशी साठी बोलावलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार हे गप्प का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
भाजपचे शहर सरचिटणीस शशी थोरात यांनी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळेंची हकालपट्टी केली आहे. काळे यांच्यावर पालिका उपायुक्त धनराज पांडे यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे काळे यांचा अहवाल पाठविण्यात आला होता
जम्मू काश्मीर – श्रीनगर विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सचे विमान बर्फाच्या ढिगाऱ्यावर धडकले, सुदैवाने अपघात टळला, विमानातील सर्व 233 प्रवासी सुखरुप,
भाजपचे प्रभारी होताच पहिल्यांदाच आशिष शेलार नवी मुंबईत दाखल झाले आहेत. निवडणुकीपूर्वी नवी मुंबई भाजप मधील मतभेद दूर करण्यासाठी भाजप नेते आशिष शेलार नवी मुंबईत पोहोचले आहेत. शेलार यांनी आमदार मंदा म्हात्रे यांची निवासस्थानी भेट घेतली. शेलार आणि म्हात्रे यांच्यामध्ये निवडणुकीसंदर्भात जवळपास एक तास चर्चा झाली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली आहे, रुग्णालायाला लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या बालकांच्या कुटुबीयांना 2 लाखांची मदत देण्याची घोषणा राज्यपालांनी केली. राज्य सरकारनं यापूर्वी 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती.
मुंबईकरांना मोठी संजीवनी मिळणार आहे, काही लोक गैरसमज पसरवत आहेत , हे योग्य नाही, जे कोणी बोलत आहेत त्यांनी अस बोलून लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका, नागरिकांनी घाबरू नये
आरोग्य सेवकांची नोंदणी 1 लाख 30 हजार झाली आहे, 9 ठिकाणी लसीकरण केंद्र सज्ज आहेत, परळ येथील कोल्ड स्टोर मधून ही लस सर्व ठिकाणी पाठवली जाईल, मुंबई महापालिकेने कोरोना आल्यापासून काम करत आहे
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर पत्रकार परिषद घेत आहेत. कलीयुगातील संजीवनी आज मुंबईत आली आहे. सीरमची लस मुंबईत आणली आहे. यामुळे कोरोनाचा खात्मा होणार आहे. मुंबईत 1, 39 , 500 डोस आल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली. यावेळी मुंबई महापालिकेतील अधिकारी सुरेश काकाणी यांचं विशेष कौतुक केले आहे.
कलीयुगातील संजीवनी आज मुंबईत आली आहे, सीरम लस मुंबईत आणली आहे, यामुळे कोरोनाचा खात्मा होणार आहे, 1, 39 , 500 लस आली आहे
31 जानेवारीपर्यंत अंगणवाडी सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्यसरकारने घ्यावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. कोरोना मुळे अंगणवाडी सेवा बंद झाली होती. ही सेवा राज्य सरकारने पुन्हा सुरू करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.
हरियाणा मध्ये भाजप सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.कृषी कायद्याच्या विरोधात हरियाणा उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटालांच्या पक्षाचे काही आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. अपक्ष आमदार हरियाणा सरकारचा पाठिंबा काढण्याच्या तयारीत असल्याची सूंत्रांची माहिती आहे. दुष्यंत चौटाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेणार आहेत.
मुच्छड पानवालाला अटक झाल्यानंतर आता ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांचा जावई समीर खानला एनसीबीचं समन्स, ड्रग्ज प्रकरण भोवण्याची शक्यता, समीर खान हा नवाब मलिक यांची मुलगी निलोफरचा पती आहे
राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलन, कृषी कायदे यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी याबाबत ट्विट केलं आहे.
60 से ज़्यादा अन्नदाता की शहादत से मोदी सरकार शर्मिंदा नहीं हुई लेकिन ट्रैक्टर रैली से इन्हें शर्मिंदगी हो रही है!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 13, 2021
आरे जंगल संरक्षित का करायचं, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सांगितले कारण
Precisely why Aarey has to be protected from human encroachment. Thank you CM Uddhav Thackeray ji, Minister Sunil Kedar ji and Minister Sanjay Rathod ji for your efforts to ensure that Aarey was declared as “forest”@UNEP @c40cities @UNFCCC https://t.co/j8Oh67vNmL
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 13, 2021
न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्क आणि लंडनच्या हाईड पार्कच्या धर्तीवर शिवाजी पार्कला नवं रुप देण्याचा प्रयत्न मुंबई महापालिका करणार आहे. शिवाजी पार्कच्या सुधारणेसाठी 6 कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. शिवाजी पार्कच्या बाजूच्या रहिवासी भागात धुळीच्या वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी शिवाजी पार्क मैदानात सुधारणा करण्यात येणार आहे.
कोरोनाची लस नाशिक मध्ये दाखल झाली आहे. थोड्या वेळात जिल्हा रुग्णालयातून लसीच्या वाटपाला सुरुवात होणार आहे. शहरातील 6 केंद्रांवर लस पाठवली जाणार आहे. प्रशासनाकडून याविषयी तयारी पूर्ण केली आहे.
अभिनेता सोनू सूदने आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली, सदिच्छा भेट असल्याची माहिती
पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरात गाड्यांची तोडफोड, चारचाकी गाड्याच मोठं नुकसान, 4 गाडया फोडल्या, शिवशंकर सोसायटी, निलकमल सोसायटी बिबवेवाडी येथील घटना, आरोपी सीसीटीव्हीत कैद पोलीस तपास सुरु, पूर्व वैमानस्यातून केली तोडफोड
जर्मनीत शिक्षणासाठी लागणारे सर्टिफिकेट देतो, अस सांगून तरुणाला 7 लाखांचं गंडा, ऑनलाईन पद्धतीने सर्टिफिकेट देतो असं सांगत उकळले 7 लाख रुपये, नाशिकच्या तरुणाची सायबर क्राईम मध्ये तक्रार, अनोळखी नंबर वरून वारंवार येत होते व्हॉट्स अप कॉल
पिंपरी-चिंचवड परिसरात वाहनं तोडफोडीनंतर आता वाहनं पेटविण्याची घटना समोर, वाहन पेटवत असतानाची घटना जवळ असलेल्या सीसीटीव्हीत कैद, मित्रांमध्ये पैश्याच्या देवाण-घेवणीवरून हा वाद झाला, त्याचा बदला घेण्यासाठी एकाने दुसऱ्याचे वाहन पेटवले, मात्र आगीने रौद्ररूप धारण केले आणि शेजारच्या वाहनांचे ही नुकसान झाले, त्यामुळे एकूण दहा वाहनं जळून खाक झालीत, याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 2 हजार जणांना शनिवारी दिली जाणार कोरोना प्रतिबंधक लस, लसीकरणासाठी आरोग्य प्रशासनाकडून 20 आरोग्य केंद्र निश्चित, तालुक्याच्या 12 ठिकाणांचं महापालिका कार्यक्षेत्रात आठ ठिकाणी 80 कर्मचारी देणार लस, शुक्रवारी लस होणार कोल्हापुरात दाखल, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडून घेतला जातोय लसीकरणाचा आढावा
कोल्हापूर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले, जिल्ह्यातील गोकुळ, जिल्हा बँकेसह स्थगित झालेल्या सर्व निवडणुकांचा मार्ग मोकळा, ज्या टप्प्यावर निवडणूक प्रक्रिया थांबल्या होत्या त्या 18 जानेवारीपासून पुढे सुरु करण्याचे निवडणूक प्राधिकरणाचे आदेश, गोकुळची कच्ची मतदार यादी 18 जानेवारीनंतर प्रसिद्ध होणार तर केडीसीसी बँकेचे उर्वरित ठराव जमा करण्यासाठी काही दिवसांची मुदत मिळणार, ग्रामपंचायत निवडणूक सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा उडणारा धुरळा
धुळे जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या धास्तीने पौल्ट्री चालक हैराण, लेअर फार्म चालकाचा समोर आता बँकांचे कर्जाची परत फेडचं संकट, अंडीची विक्री घटल्यानं, उत्पादन खर्चात वाढ
बर्ड फ्लूमुळे आष्टी तालुक्यातील 12 गांवामध्ये कन्टेनमेंट झोन, आतापर्यंत परिसरात 32 कावळ्यांचा मृत्यू, कंटेनमेंट परिसरात वाहतूक, बाजारपेठावर बंदी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आदेश, मुगावसह 11 गावात नागरिकांना प्रवेश बंदी
परभणीतील चिकन, मटण आणि अंडी विक्रेत्यांना RTPCR चाचणी करणं बंधनकारक, 13 जानेवारी ते 18 जानेवारीपर्यंत राबवणार विशेष मोहीम, सर्व मांस विक्रेत्यांना टेस्ट करून घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
नागपुरातील रस्त्यांवर 2704 वीजेच्या खांबांचा सापळा, शहरातील रस्त्यांवर आहे 368 वीजेच्या डीपी, रस्त्यांवरील वीजेच्या खाबांमुळे अपघाताचा धोका, उपाययोजनांबात उच्च न्यायालयाची मनपाला विचारणा, रस्त्यावरील वीजेचे खांब, डीपी, 100 ट्रान्सफार्म कधी काढता?, उच्च न्यायालयाची मनपाला विचारणा
ब्रिटनहून परत आलेल्या प्रवाश्यांचा अखेर शोध लागलाय, बेपत्ता प्रवाशांपैकी पुण्यातील 35 प्रवाशांचा शोध लागला आहे, या प्रवाशांची करोना चाचणी केली असता, दोघांना करोनाचा संसर्ग, त्यांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, उर्वरित प्रवासी पुण्याबाहेरचे असून, त्यांची माहिती राज्य रोग सर्वेक्षण विभााकडे पाठविण्यात आलीय, पुणे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले, ब्रिटिश सरकारने दिलेल्या यादीनुसार जवळपास 542 प्रवासी ब्रिटनमधून मुंबईमार्गे पुण्यात आले आहेत, त्यापैकी 109 प्रवाशांचा पत्ता सापडत नव्हता, या प्रवाशांचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाने पोलिसांची मदत घेतली होती
कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताची गळफास घेत आत्महत्या, करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला येथील घटना, नेताजी खाडे असे मृत संशयिताचे नाव, रविवारी अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून केला होता अत्याचार, करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच होता पसार, हिरवडे गावातील शेतातील शेडमध्ये नेताजी खाडे यांन गळफास घेतल्याच आल उघडकीला, घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता
नागपूर जिल्ह्यातील 250 कोंबड्यांच्या मृत्यूवर तर्क वितर्क, डीजेच्या आवाजाला घाबरलेल्या कोंबड्यांचा चेंगरुन मृत्यू, कळमेश्वरच्या उबगी फार्मवरील कोंबड्यांच्या मृत्यूवर पशूसंवर्धन विभागाचा तर्क, कोंबड्यांच्या मृत्यूचे वैद्यकीय कारण अद्याप अस्पष्ट, मृत कोंबड्यांचे नमुने पाठवले तपासणीसाठी, पोल्ट्री फार्म संचालकांना दक्ष राहण्याच्या सूचना
राज्यात 14 जानेवारीपर्यंत नियोजित ठिकाणी लस पोहचणार, राज्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट मधून 9 लाख 43 लाख लसीचे डोस, राज्यात पहिल्या टप्प्यात मुंबई 3, कोल्हापूर 1, पुणे 2 लसीच्या व्हॅन पोहचल्या, दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच आज राज्यातील 26 ठिकाणी लसीच्या व्हॅन जाणार, राज्यात विविध शहरांत बायरोड लस पोहचवली जातेय, देशात विमानाच्या माध्यमातून लसीचे वितरण, 14 जानेवारी लस वितरणाचा टप्पा पार पडणार, 16 जानेवारीला लसीकरणाच्या अभियानास सुरूवात
राज्यात करोनामुक्तांचे प्रमाण वाढले, मृत्यूदरही आटोक्यात, काल दिवसभरात 3 हजार 282 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात, त्यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट आता 94. 77 टक्के इतका झाला आहे
मुरुंबा गावातील कोंबड्या आज नष्ट करणार, परभणीच्या मुरुंबा गावात 800 कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाला, त्यानंतर फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी गावातील 8 हजार कोंबड्या आज नष्ट करण्यात येणार आहेत, त्यासाठी गावाबाहेर खड्यांचं खोदकाम पूर्ण झालंय
देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर, गीते-बागुल यांच्या सोडचिट्ठीनंतर आज माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आहेत, आजच्या दौऱ्यात फडणवीस महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत
नव्या प्रायव्हसी पॉलिसीवर WhatsApp कडून अखेर स्पष्टीकरण, युजर्सचे मेसेज आणि कॉल सर्व सुरक्षित असल्याचा दावा, असल्याचा विश्वास व्हॉट्सअॅपने दिला आहे.व्हॉट्सअॅपने आपल्या ट्विटमध्ये खासगी, मेसेज, ग्रुप चॅट, कॉन्टॅक्ट, कॉल आणि डेटा यासारख्या पॉइंट्सवर जोर दिला, ट्विट मध्ये सांगितले आहे की, फेसबुक आपले प्रायव्हेट मेसेज अॅक्सेस करु शकत नाही किंवा कॉल ऐकू शकत नाही, व्हॉट्सअॅपने हेही शेयर केले आहे की, कंपनी युजर्सच्या कॉलला ट्रॅक ठेवत नाही, तसेच फेसबुक सोबत कॉन्टॅक्ट शेयर करीत नाही. ट्विटमध्ये व्हॉट्सअॅपने हेही सांगितले की, युजरकडून शेयर करण्यात आलेले लोकेशन सुद्धा हाईड केलेले आहे. ग्रुप चॅट सोबत सुद्धा असेच आहे.
राज्यात पाच दिवसांत 1839 पक्ष्यांचा मृत्यू, संबंधित नमुने तपासणीसाठी भोपाळ तसेच पुण्यात पाठवले
मुंबईत एकाच दिवसांत 70 कावळे, कबुतरे मेल्याच्या तक्रारी, काल एकाच दिवशी मुंबईत सुमारे 70 कावळे आणि कबुतर मृत झाल्याच्या तक्रारींची नोंद झाल्याची माहिती पालिका आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली
राज्यात लसीकरणाची तयारी पूर्ण, 511 ठिकाणी केंद्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव
डॉ. प्रदिप व्यास यांची माहिती
16 जानेवारीपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात, यातील 3 कंटेनर मुंबई विमानतळावरुन 27 शहरांमध्ये या लस पोहोचवणार आहेत, 16 तारखेपासून देशभरात लसीकरणाला सुरूवात होणार आहे
दुसऱ्या खेपेत 6 कंटेनर सीरम इन्स्टिट्यूटमधून पाठवले, सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीची दुसरी खेप पुण्याहून
काल रात्री रवाना झाली, या दुसऱ्या खेपेत 6 कंटेनर सीरम इन्स्टिट्यूटमधून पाठवण्यात आले