महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाच्या निर्णयावर मी ठाम आहे, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले आहे. 30 जानेवारी रोजी अण्णा हजारे कृषी कायद्यांविरोधात उपोषणाला बसणार आहेत.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धी येथे दाखल झाले आहेत. फडणवीसांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची घेतली भेट घेतली असून दोघांमध्ये चर्चा सुरु आहे. 30 जानेवारी रोजी अण्णा हजारे केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणार आहेत. अण्णांनी हे आंदोलन करु नये यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांकडून अण्णांची मनधरणी सुरु आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आगीची घटना जिथे घडली, तिथे कोव्हिडची लस ठेवण्यात आली नव्हती. त्यामुळे लस पूर्णपणे सुरक्षित आहे. तसेच लसीच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “आगीच्या घटनेची चौकशी सुरु आहे. या चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतरच समजेल की हा अपघात होता की घातपात. दरम्यान, या दुर्घटनेत ज्या कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यांची जबाबदारी कंपनीने घेतली आहे. तरीदेखील काही आवश्यकता असल्यास सरकारही त्यासंबंधी पुढाकार घेईल.”
जिथे कोरोनावरील लस बनवली जात होती. तसेच लस जिथे ठेवली जाते तिथे कोणतीही दुर्घटना झालेली नाही. त्यामुळे लस पूर्णपणे सुरक्षित आहे. तसेच कोरोनावरील लसीच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये काल लागलेल्या आगीमुळे पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर मोठी वित्तहानीदेखील झाली आहे. दरम्यान, या घटनेची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहेत.
धनंजय मुंडे प्रकरणात राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांना सल्ला, अशावेळी राजकीय राग लोभ द्वेष मध्ये आणू नका, किमान अशा प्रकरणात माणुसकी ठेवा, सत्यता तपासून मत व्यक्त करा, तपास यंत्रणांना वेळ द्या : संजय राऊत
हनी ट्रॅप ही आपली संस्कृती नाही, राजकीय दबावात काय होतं, हे आम्ही त्या नटीच्या प्रकरणात पाहिलं : संजय राऊत
समीर वानखेडे यांच्या सुरक्षिततेत वाढ , “डी” कंपनीच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर वानखेडेंची सुरक्षा वाढवली. दाऊदच्या डोंगरीत घुसून केली होती कारवाई, दाऊदच्या हस्तकांच्या आवळल्या होत्या मुसक्या. तसंच करीमलालाच्या नातवालाही अटक, समीर वानखेडेंची सुरक्षा वाढवली
त्यांनी (रेणू शर्मा) वेगळा आरोप केला, काल वेगळं स्टेटमेंट दिलं, आज तक्रार मागे घेतली, त्यांना जे वाटतं त्यांनी ते केलं, पण गेले सात-आठ दिवस जो भयंकर त्रास सहन करावा लागला त्याचं काय, त्यात पक्षाचीही बदनामी होते, सर्वजण राष्ट्रवादी पक्षाने त्यांचा राजीनामा का घेतला नाही, हे विचारत होते, पवार साहेबांना प्रश्न विचारण्यात आलं, आम्ही बोललो तर त्याला वेगळ्या पद्धतीने घेण्यात आलं, आमचं म्हणणं इतकंच होतं की पूर्ण तपास होऊ द्या, म्हणूजे खरं काय ते पुढे येईल
मलाही ही गुड न्यू मिळाली, हा विचार करण्याचा विषय, तक्रार मागे घेतल्यानंतर आमचं शक्ती म्हणून जो नवीन कायदा आहे, त्याबाबत बारकाईने विचार करण्याची गरज आहे, पण, काही दिवसांपूर्वी ती बातमी आल्यावर सगळीकडे ब्रेकिंग न्यूज आली, एखादा राजकीय व्यक्ती राजकारणात , सामाजिक क्षेत्रात काम कराय.ला लागला तर त्याला काम करायला त्याचं नाव लोकांमध्ये चांगलं होण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात, बरेच दिवस गालवावे लागतात, पण, जर असा कोणा आरोप केला तर, एका झटक्यात त्या व्यक्तीची बदनामी होते, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलतो, विरोधक हा मुद्दा उचलून धरतात, महिला संघटना आंदोलन करण्यास सुरुवात करतात आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे म्हणून मागणी केली जाते, धनंजय मुंडेंबाबत कुठलीही माहिती न घेता ज्यांनी वक्तव्य केलं त्याला जबाबदार कोण, त्याला कोण उत्तर देणार, एक तरुण नेतृत्त्व धनंजय मुंडे यांनी संधीचं सोनं केलं, त्यानी पंकजा मुंडेंचा पराभव केला, ते त्यांचं काम करत होते, गेले पाच-सात दिवस त्यांचं कुटुंब आणि ते डिस्टर्ब झाले होते, याला कोणी वाली आहे का?
वेगवेगळ्या प्रकारे चढउतार होत असतात, वारे बदलत असतात, आमचं सरकार नसताना काहींनी तिकडे उड्या मारल्या, ते जे इकडे जातात, तिकडे जातात त्यांना पक्ष, धोरणं, एकनिष्ठा यांच्याशी काहीही घेणं-देण नसतं, त्यात एकच ध्येय, आपल्या विभागातील कामं व्हावी, त्यासाठी सत्तेवर असलेल्या पक्षात जातात, असं भाष्य पक्ष सोडणाऱ्यांवर अजित पवारांनी केलं
एका ठिकाणी घटना घडली म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकत नाही, फायर ऑडिच करुन घेऊन, जी काळजी घ्यायला हवी ती सर्व काळजी घेतली जाते, काल सीरम इन्स्टिट्यूटमधील स्प्रिंकलर्स सुरु झाले होते, पण आग मोठी होती, तिथे जे साहित्य होते, जे काम सुरु होतं त्यातून आग भडकली, त्यामुळे कालजी घटना घडली, पण फायर ऑडिट झाल्यावर स्पष्ट चित्र आपल्यासमोर येईल
तुम्ही लस कधी घेणार, आम्हाला ज्या वेळेस लस घेण्याची परवानगी मिळेल त्यावेळी घेऊ. आम्ही डॉक्टर, पॅरामेडिकल, पोलिस यामध्ये मोडत नाही, परवानगी मिळाली की घेऊ : अजित पवार
आम्हाला ज्यावेळी लस घेण्याची परवानगी मिळेल तेव्हा आम्ही घेऊ, आम्ही डॉक्टर नाही, नर्स नाही, पोलीस नाही, ज्यावेळी आदेश येतील तेव्हा आम्हा घेऊ आमि तुम्हला सांगू
गैरसमज पसरवू नये, कोरोनाचं संकट लवकरात लवकर राज्यातून, देशातून हद्दपार करायचं आहे
ज्यांनी लस घेतली त्यांनीही माहिती दिली की त्यांना कुठल्याही प्रकारचे साई़ड इफेक्ट्स जाणवले नाहीत, मात्र, लसीकरणाला लोकांना अल्प प्रतिसाद
लसीकरणाबाबत काही अडचणी कानावर येत आहेत, एका सेंटरला १०० जणांना लस देण्याचं नियोजन होतं, तीन दिवसांच्या कार्यक्रमात, ग्रामीण भागात १०० पैकी ६१ लोकांनी केलं. तीन दिवसात, ६० ते ६२ टक्के लसीकरण झाल, पण शहरी भागात पहिल्या दिवशी टक्केवारी चांगली होती, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी टक्केवारी घसरली, अधाकाऱ्यांनी वेगवेगळी कारण दिली, यामध्ये ज्यांना लस द्यायची होती त्यांनी लस घेतली नाही, आज मी बैठक घेतली, च्याम
नाशिक महापालिकेतील आग सॅनिटायझरमुळे लागल्याचा संशय, केबिन सॅनिटाईज करण्यासाठी इमारतीत सॅनिटाईझर बॉक्स आणल्याची माहिती, आग लागण्यापूर्वी सॅनिटायझर ठेवल्याचे व्हिडिओ टीव्ही 9 कडे
मुंबईत अर्णव गोस्वामींविरोधात आंदोलन सुरु, जांभोरी मैदानात एकवटले हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते, अर्णव गोस्वामींना अटक करा ही मुख्य मागणी, मुंबई ऑफीससमोर कांग्रेस कार्यकर्त्यांचा मोर्चा, पुलवामा प्रकरणी चॅट्स लीक झाल्याने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा निर्माण झालाय, केंद्राने कारवाई करावी, अटक करावी या मागणीसाठी आंदोलन सुरु, अर्णव यांच्या मुंबई ऑफिसबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त, कार्यकर्त्यांची घेषणाबाजी सुरु
नाशिक महापालिकेतील शिवसेना गटनेता कार्यालयाला भीषण आग, कार्यालयातील सामानाचं मोठं नुकसान, सुदैवाने ही आग इतर कुठल्या कार्यालयापर्यंत पोहोचलेली नसल्याने मोठी अनर्थ टळला आहे
पालिका कर्मचाऱ्यांनी आग लागलेल्या रुमचे दरवाजे तोडलेले, आग्निशामक दलाचे जावान घटनास्थळी पोहोचले, सध्यातरी आगीच्या कारणाचा प्राथमिक अंदाज सांगता येणार नाही, नंतर आगीच्या कारणाची सविस्तर चौकशी करु – पालिका कर्मचारी
नाशिक महापालिकेमधील शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग , महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाला ही आग लागली, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत, परिसरात धुराचे लोट पसरले आहेत, अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत, कर्मचारी आणि अधिकारी सामान बाहेर आणण्याचं काम सुरु आहे, मात्र सुदैवाने कार्यालयात कुणीही नसल्याने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही
नाशिक महापालिका कार्यालयाला आग, दुसऱ्या मजल्यावर आग, शिवसेना गटनेता कार्यालयाला आग, अग्निशमन दलाकडडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु
नाशिक महापालिकेच्या शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग, महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर आगीच्या ज्वाळा, अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल, आग विझवण्याचं काम सुरु
नाशिक महापालिकेत शिवसेना गटनेत्याच्या कार्यालयाला आग #Nashik | #Fire | #NashikMunicipalcorporationfire pic.twitter.com/tkBrcq8deB
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 22, 2021
नोकरभरती पुढे ढकला, विनायक मेटे यांची मागणी, अन्यथा 24 तारखेपासून आंदोलनाचा इशारा, नोकरभरती वेळीच केली नाही तर ओबीसी रस्त्यावर उतरेल, जिल्ह्यात आंदोलन करेल, असा ओबीसी नेते प्रकाश शेंडगेचा एल्गार, दोन्ही समाज नोकरभरतीसाठी मंत्र्यांना घालणार घेराव, काल विनायक मेटेंनी केली घोषणा, आज प्रकाश शेंडगेंचा आक्रमक पवित्रा, मराठा-ओबीसी वाद चिघळण्याची शक्यता
भाई ठाकूरांच्या विवा ग्रुपवर ईडीच्या पाच ठिकाणी धाडी, विरारमध्ये ईडीच्या धाडी सुरु, सकाळपासून ईडीच्या पाच ठिकाणी धाडी, विवा संस्थेच्या मालकांच्या घरी धाडी, त्याशिवाय त्यांच्या चार कार्यालयांवर ई़डीची धाड
देशभरात कोरोना लसीकरण सुरु आहे. मात्र, माजी आमदार अनिल गोटे यांनी या लसीकरणावर आक्षेप नोदंवत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी अजून लस का घेतली नाही, असा सवाल केला आहे. तसेच, मोदी, शहा यांनी सादी नावनोंदणी सुद्धा केली नसल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे.
नागपुरातील नाराज शिवसैनीकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतील ज्येष्ठ नेत्याला नागपूर शिवसेना संपर्कप्रमुख करण्याची मागणी या पत्रात नागपुरातील शिवसैनिकांनी केली आहे. शिवसेनेच्या 3 माजी जिल्हाप्रमुखांची सही या पत्रावर आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईतील नेत्यांनी समन्वय साधण्याची मागणी या पत्रात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शुक्रवार 22 जानेवारी 2021 चे कार्यक्रमाची रुपरेषा
दुपारी 3.30 वाजता : मुंबई विमानतळावरुन पुणे येथे रवाना
दुपारी 4 वाजता : पुणे विमानतळ येथे आगमन
दुपारी 4.30 वाजता : पुणे येथे सीरम इन्स्टिट्यूटच्या आग लागलेल्या इमारतीची पाहणी
सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात
सरकारने माघार घ्यावी असं मी म्हणत नाही. पण सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन लवकर तोडगा काढावा
शेतकरी मागे हटणार नाहीत. केंद्र सरकारला चर्चेच्या फेऱ्यांचा रेकॉर्ड बनवायचा आहे.
अर्णव गोस्वामी यांनी केलेला प्रकार हे देशद्रोह आहे. केंद्रात दुसरं कुणाचं सरकार असतं तर भाजपने तांडव केलं असतं. भाजपने संसद चालू दिली नसती.
लष्करासंदर्भात गोपनीय माहिती एखाद्या लष्करी शिपायाने लीक केली असती तर त्याचं कोर्ट मार्शल करण्याची मागणी भाजपने केली असती. देशाच्या सुरक्षेला धोका आहे.
सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग हा संवेदनशील विषय आहे. ही आग कट नसून हा अपघात आहे.
जयंत पाटलांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती, मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं, शरद पवारांची मिश्किल प्रतिक्रिया
साखरेचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे, त्याबाबत बैठक झाली, यंदा ऊसाचं उत्पादन जास्त, पुढच्या वर्षीही ऊसाची लागवड वाढेल, दोन पर्याय आहेत, डायरेक्ट इथेनॉल बनवण्याचे आणि केंद्र सरकारने इथेनॉलचे भाव चांगले केलेले आहेत, आणि दुसरा पर्याय म्हणजे ऊसापासून साखर तयार केल्यानंतर त्यातून सीएनजी तयार करणे
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये काम करणारे तज्ञ्ज आणि शास्त्रज्ञांच्या प्रामाणिकपणाबाबत आम्हाला जराही शंका नाही, ही दुर्घटना
सुरक्षेसाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप केला, धोका असेल तर सुरक्षा दिली जाते, यासाठी केंद्राने हस्तक्षेप करुन राज्य सरकारचा कायदा सुव्यवस्थे संबंधिचा अधिकारात हस्तक्षेप करावा, याचं आश्चर्य वाटतं- शरद पवार
विरोधक तेच करतात, आधी ते दुसऱ्या गोष्टींवरुन टीका करत होते, आता दुसऱ्या विषयावर टीका करत आहेत, पण हे सरकार पाच वर्ष चालणार
LIVETV | विरोधकांना कितीही आरोप करुद्या, महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष चालणार : शरद पवार https://t.co/atVRNYvTQS #SharadPawar | @PawarSpeaks pic.twitter.com/0fRcZPh9ZW
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 22, 2021
मराठा आरक्षणासाठी जोरदार प्रयत्न सुरु, राज्य सरकारकडून उत्तम वकिलांची नियुक्ती कतरण्यात आली आहे
बिल परत घेतल्याशिवाय चर्चेला बसणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे, समिती मधील काहींचा बिलाला पाठिंबा आहे, दीड वर्ष पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असला तरी शेतकऱ्यांना हे मान्य नाही
सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय निष्कर्षाला येऊ नये, असं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, त्यानुसार आमचा निर्णय योग्य, महिलेने तक्रार मागे घेतल्याचं कळतंय, रेणू शर्माने धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतली, त्याविषयी फारशी माहिती नाही, कागदपत्रं जेव्हा आमच्या हातात आली, तेव्हा खोलात जाण्याची गरज आहे, असा आम्ही निष्कर्ष काढला, तो बरोबर होता असं म्हणायला लागेल : शरद पवार
शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर, शेतकरी कृषी कायदे रद्द करण्यावर ठाम, तीन कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे, कृषी कायद्याला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी सहमत नाही, सरकारची तात्पुरती स्थगिती शेतकऱ्यांना अमान्य आहे- शरद पवार
रेणू शर्मा यांनी जरी तक्रार मागे घेतली असली तरी भाजपने मात्र यासंदर्भात धनंजय मुंडे यांच्यावर दबावाच्या राजकारणाचा आरोप केला आहे. अगोदरपासून तिच्यावर तक्रार मागे घेण्यासंबंधी दबाव होता. आता तिने ही तक्रार मागे घेतली आहे. आम्हाला याचं आश्चर्य वाटत नाही. आमचा मुद्दा हा आहे की धनंजय मुंडे यांनी प्रतिज्ञापत्रात दुसऱ्या बायकोचा उल्लेख तसंच तिच्यापासून झालेल्या दोन मुलांचा उल्लेख केला नाही ते कायद्याच्या परिघाबाहेर आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी प्रतिक्रिया उमा खापरे यांनी दिली.
धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप आमच्यासाठी धक्कादायक होते, त्याबरोबरच रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली तेही माझ्यासाठी धक्कादायक आहे, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करुन ते मागे घेतल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशा प्रकारामुळे खऱ्या पीडितांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, त्यामुळे रेणू शर्मा यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली
बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली, भाजप नेते कृष्णा हेगडेंकडून समाधान व्यक्त, “रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली असल्यास मी खुश आहे. सत्याचा नेहमीच विजय होतो. सत्यमेव जयते… रेणू शर्मा रिलेशनशीपसाठी माझ्याही मागे लागली होती. पण हे प्रकरण संपलंय, त्यामुळे त्यांच्याविरोधात मला काहीही सांगायचं नाही. बॉलिवूडमध्येही मीटूचे अनेक प्रसंग घडले होते. खऱ्या पीडितांसोबत आपण कायम उभं राहायला पाहिजे, पण या प्रकरणात मला आणखी काही बोलावंसं मला वाटत नाही.” अशी प्रतिक्रिया भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.
औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता सरपंच निवडीसाठी मोर्चेबांधणी, औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचे सदस्य सहलीवर, जोगेश्वरी ग्रामपंचायतीचे 16 सदस्य गेले सहलीवर, सदस्यांची फोडाफोडी होऊ नये म्हणून सहलीवर, पश्चिम महाराष्ट्रातील रिसॉर्टवर सदस्यांचा मुक्काम, सरपंच निवडीदिवशीच सहलीवर गेलेले सदस्य निघणार माघारी
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर नागपूर शिवसेनेतील गटबाजी, बाळासाहेब ठाकरे यांची जयंती नागपुरात दोन गट साजरे करणार, पाच विधानसभा मतदारसंघात सेनेच्या दुसऱ्या गटाचे कार्यक्रम, संपर्कप्रमुख दुष्यंत चतुर्वेदी विरोधात निष्ठावंत शिवसैनिकांची नाराजी, शेखर सावरबांधे, सतीश हरडे, बंडू तागडे गट आक्रमक, 26 तारखेला नाराज शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार
नागपूर जिल्ह्यात 4 फेब्रुवारीपर्यंत सरपंचपदाचं आरक्षण, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांचे सर्व तहसिलदारांना आदेश, जिल्ह्यातील 13 ठिकाणी सरपंचपदाचं आरक्षण काढण्यात येईल, जिल्ह्यातील एकूण 768 ग्रामपंचायतीसाठी सरपंच आरक्षणाची सोडत काढणार, नुकत्याच निवडणूक झालेल्या 130 ग्रामपंचायतीसाठी आरक्षणाची सोडत काढणार
नागपूर पोलीस आयुक्तांच्या फेसबुक अकाऊंटशी छेडछाड, आयुक्त अमितेशकुमार यांच्या फेसबुक अकाऊंटशी छेडछाड, गुरुवारी दुपारी उघडकीस आला खळबळजनक प्रकार, पोलिसांकडून आरोपीला शोधण्याचा प्रयत्न सुरु, नागपुरात वाढती सायबर गुन्हेगारी, नागरिकांनी सतर्क राहण्याचं पोलिसांचं आवाहन
गडचिरोली : जिल्ह्यातील बारा तालुक्यातील 360 ग्राम पंचायतींसाठी आज मतमोजणी, सकाळी 11 वाजेपासुन होणार सुरुवात, बारा तालुक्यातील तहसिल कार्यालयात होणार मतमोजणी, जिल्ह्यातील पहिला व दुसऱ्या टप्पयात एकूण 80% मतदान, निकालाकडे सर्वांचे लक्ष
नाशिक – पिंपळद गावात बिबट्याचा धुमाकूळ, गावातील कुत्रे आणि जनावरे बिबट्याचे लक्ष्य, पिंपळद गावातील तुकाराम दुशिंगे यांच्या घरा बाहेर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला, कुत्र्याला मारत ओढून नेतानाचा व्हिडीओ CCTV कॅमेऱ्यात कैद, बिबट्याच्या मुक्तसंचारा मुळे गावातील नागरिकांन मध्ये भीतीच वातावरण
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना दिलासा, बलात्काराची तक्रार मागे, रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप लावत पोलिसांत तक्रार दाखल केली होती, मात्र आता त्यांनी ही तक्रार मागे घेतली आहे
नागपूर : जिल्ह्यात अनेक पोल्ट्रीफार्म नोंदणीविनाच, कळमेश्वर तालुक्यात तब्बल 40 पोल्ट्रीफार्मची नोंदणी नाही, जिल्ह्यात बर्ड फ्लू नियंत्रणासाठी पोल्ट्रीफार्मची नोंदणी करण्याचं आवाहन, कळमेश्वर तालुक्यातील मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले
नागपूर : नागपूर महापालिकेने मालमत्ता कर धारकांसाठी सुरू केलेल्या अभय योजनेला फारसा प्रतिसाद नाही, मुदत वाढ दिल्या नंतरही आर्थिक स्थिती बिकटच, 14 डिसेंबरला योजना सुरु झाली, या योजनेअंतर्गत कर भरणाऱ्यांना 80 टक्के व्याज माफ केले जात आहे, 293 कोटी रक्कम या योजनेच्या माध्यमातून येणे अपेक्षित होतं, मात्र अजूनही 181 कोटी थकबाकी ची रक्कम आहे
नागपूर : जिल्ह्यात 5 ते 8 वी चे वर्ग सुरु होणार, 27 जानेवारीपासून वर्ग सुरु करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात होणार वर्ग सुरु, पालकांची संमती घेऊनच मुलांना शाळेत बोलावणार, ग्रामीण भागात 1810 शाळा, 1 लाख 50 हजार विद्यार्थी संख्या
कल्याण : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाबाबत नाना पटोले यांचे मोठे वक्तव्य, राज्यात स्वबळावर सत्ता कशी स्थापन करता येईल आणि महाराष्ट्राला पुनः वैभव प्राप्त करुन देण्यासाठी काँग्रेस काम करणार
पुणे – सीरम इन्स्टिट्यूट आग प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुण्यात जाऊन प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करणार, दुपारी 3.30 वाजता मुख्यमंत्री सीरम इन्सटीट्युटला भेट देतील
मुंबई : पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या मृत्यूवर आनंद व्यक्त करण्याऱ्या देशद्रोही अर्णब गोस्वामी यांच्या निषेधार्थ आणि त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी प्रचंड मोर्चा, आज सकाळी साडे अकरा वाजता हा मोर्चा निघेल
कोल्हापूर – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, त्यानंतर दुपारी एक वाजता त्यांची पोलीस ग्राउंड इथे सभा असेल
रायगड : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आज महाड येथील वायुगळतीमधील बाधित कामगारांना भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करणार, महाड एमआयडीसी येथील कंपनीत वायू गळतीतील सर्व बधित कामगारांच्या प्रकृती स्थीर, काल 21 जानेवारीला संध्याकाळी उशिरा महाड तालुक्यातील इंन्डो अमाईन्स कंपनीमध्ये वायुगळती होऊन सात कामगार जखमी आणि बधित झाले होते, जखमी कामगारांवर महाड येथील देशमुख रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, H2S गॅस ची प्राॅडक्शन वायु गळतीमुळे अपघात, सर्व बाधित कामगारांची सध्या प्रकृती स्थीर असल्याचे डॉ. फैजल देशमुख यांनी सांगितले