जयंत पाटील आणि नितीन गडकरींची दिल्लीत बैठक, महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांवर चर्चा, देवेंद्र फडणवीस, गिरीश बापट यांचीही उपस्थिती. महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स
पंतप्रधान योजना आणि बळीराजा योजनेतून जे प्रकल्प सुरु आहे ते लवकर पूर्ण व्हावे याबाबत चर्चा झाली. महाराष्ट्रातील जलसंपदा विभागाचे जे विकास प्रकल्प आहेत त्याला पाठबळ देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. हातात घेतलेले प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी केंद्रसरकारच्या व्याख्येत बसवण्याचा प्रयत्न झाला. नितीन गडकरी आणि केंद्रीय जलसंपदा मंत्री गजेंद्र शेखावत यांच्यासोबत चर्चा झाली. गोसीखुर्द प्रकल्पासाठी पाच हजार कोटीची तरतूद केली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्प लांबला. केंद्र निधी देण्यास तयार आहे. तांत्रिक अडचणी सोडवून लवकर प्रकल्प मार्गी लावू – जयंत पाटील
पुणे : बालभारतीत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याविरोधात घोषणाबाजी, पालकांनी दिल्या वर्षा गायकवाड हाय हायच्या घोषणा, फी आकरणीच्या मुद्द्यावरुन पालक संघटना आक्रमक
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील भोसरी पोलिसांनी मध्यप्रदेश येथे जाऊन सापळा रचून 12 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून 24 पिस्तुल आणि 38 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. यातील सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत अस सांगण्यात आले आहे
बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीची (Sourav Ganguly) प्रकृती पुन्हा बिघडली. गांगुलीला बुधवारी पुन्हा हृदयाशी संबंधित त्रास जाणवू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही दिवसापूर्वीच गांगुलीला छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांच्या उपचारानंतर गांगुली घरी परतला होता. मात्र आज पुन्हा त्याला त्रास जाणवू लागला आहे.
संयमाचे श्रेय सीमावासीयांना… सीमा भागातला तरुण पिढ्यान पिढ्या यातना सहन करतोय…महाराष्ट्रात राहायचे आहे यासाठी हवी ती किंमत द्यायला तयार आहेत – शरद पवार
बऱ्याच दिवसांनंतर या प्रश्नाला वाचा फुटतेय
दीपकजी मनोगत व्यक्त करताना मनातल्या गोष्टी सांगितल्या
या पुस्तकात नेमकं काय आहे, त्यावर बोलण्यापेक्षा अनेक वर्षांनंतर या विषयावरती सर्व पक्षांना एकत्र आणलं
हा विषय किती जुना आहे, त्याच्यात काय काय घडलं याची उजळणी या पुस्तकात झालेली आहे.
नुसतं पुस्तक म्हणजे रडकथा नको आहेत.
आता जिंकण्याच्या दृष्टीनं प्रत्येक पाऊल पडलं पाहिजे. आजपर्यंत झालं ते झालं, सगळं भोगलं,
येरवडा तुरुंग पर्यटकांसाठी आपण ओपन करतोय, पण तिकडे आपल्याला झुंबड करायची नाही.
मी शिवसेनाप्रमुखांचं पुस्तक आणलंय, गजाआडील दिवस, त्या येरवड्यामध्ये शिवसेनाप्रमुख याच विषयासाठी तीन महिने तुरुंगात होते. तेव्हा मोरारजी भाई उपपंतप्रधान होते.
ते मुंबईत आल्यानंतर त्यांना माहीममध्ये शिवसैनिकांच्या वतीनं एक निवेदन देण्यात येईल. आणि ते निवेदन घेऊन ते पुढे जातील.
राज्यकर्त्यांची मस्ती काय असते आणि त्यांचा या विषयाबद्दल किती आकस आहे. हे तेव्हा मी प्रत्यक्ष पाहिलं आणि अनुभवलं.
पुस्तकात लिहिल्यानं माहिती मिळते, पण जे अनुभवतात त्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. माहीम इथला परिसर शिवसैनिकांनी फुलून गेला होता. मोरारजी भाई येणार आणि त्यांना शिवसैनिक निवेदन देणार आणि ताफा पुढे जाणार, पण आक्रित घडलं, पण पहिला पायलटचा ताफा सुस्साट निघून गेला. पण नंतर मोरारजी देसाईंचा जो ताफा आला तोसुद्धा थांबला नाही, सुस्साट निघून गेलाच. पण एक आपला फोटोग्राफर अशोक करंबेळकर आणि एक कार्यकर्त्याला उडवून गेला. त्यानंतर धुमश्चक्री सुरू झाली, पोलीस लाठीचार्ज, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.
LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह
हा अत्याचार मोडून काढण्यासाठी नवी सुरुवात करुया, मतभेद गाडून टाका, प्रत्येकाची वेगवेगळी चूल केली तर त्या चुलीवर कर्नाटक सरकार पोळ्या भाजते, हे आतातरी तुम्ही लक्षात घ्या, प्रत्येक पाऊल धीराने, गांभीर्याने आणि मजबुतीने टाकूयात, जोपर्यंत मराठी शक्ती ताकद एकत्र येत नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही – मुख्यमंत्री
कानडी भाषेचा नाही तर कानडी अत्याचाराचा दुश्वास करणारच, कानडी अत्याचाराचा विरोध करणार, त्या अत्याचाराची मोडतोड करणारच, आता हा काल अपव्यय बस झाला, कालबद्ध कार्यक्रम झाला पाहिजे, बेळगाव मध्ये मराठी आमदार निवडून आले पाहिजेत – मुख्यमंत्री
हे सरकार करू शकणार नाही तर कोणीच करू शकणार नाही, महाजन अहवाल कसा बोगस आहे ते बॅ अंतुले यांनी चिरफाड केली – मुख्यमंत्री
राज्यातील सर्व पक्ष तुमच्या पाठीशी आहेत. पण एककीकरण समितीची एकजूट तुटली कशी, तुमच्या मायबोलीची ताकद कशासाठी उधळून टाकली, बेलगाम कर्नाटक सरकार नावाप्रमाणे तसेच बेलगाम वागत आहेत – मुख्यमंत्री
कर्नाटकात सरकार असो, पण अन्याय करण्याचीच भूमिका, हा भाग महाराष्ट्रात आणणार म्हणजे आणणार , कोर्टात प्रकरण आहे, मग हा भूभाग केंद्र शासित का नाही करीत? – मुख्यमंत्री
हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे, मुद्दा असा आहे, ज्या उर्मटपणाने कर्नाटक सरकार एक एक पाऊल टाकत आहे, एखादं प्रकरण कोर्टात असताना कुठला बदल करणे हा न्यायालयाचा अपमान, तरी बेळगावचं नामांतर, त्याला उपराजधानी केली गेली
पुस्तक म्हणजे फक्त रडकथा नको, आता जिंकण्याच्या दृष्टीने पाऊल टाकलं पाहिजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते संघर्ष आणि संकल्प पुस्तकाचं प्रकाशन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याहून मुंबईकडे रवाना, राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते, काल राज यांनी पुण्यातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती, पुणे महापालिका आणि पक्ष बांधणीसाठी पुणे दौरा, शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया विचारली असता, नंतर बोलणार असल्याची राज ठाकरे यांची प्रतिक्रिया
मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या “डी” विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी लावण्यात
आलेल्या ” फेस रेकग्नाईज आधार व्हेरिफाईड अटेंडन्स सिस्टिम ” चे उद्घघाटन करण्यात आले. या सिस्टीममुळे कार्यक्षमता वाढेल आणि गैरवापर होणार नाही असा दावा. पायलट प्रोजेक्ट म्हणून D वॉर्ड आणि नायर रुणालयात ही सिस्टिम बसवण्यात आली.
कोरोना जरी कमी झाला आहे तरीही सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे. लहान मुलांच्याबाबतीत अत्यंत दक्ष राहणे गरजेचं आहे. म्हणून उशिरा का होईना मुलांच्या शाळांबाबतीत योग्य ते निर्णय घेतले जातील.
मी सुद्धा तुमच्याप्रमाणे ऐकलं आहे की लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरु होण्याची शक्यता आहे. कदाचित 29 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीपासून ट्रेन सर्वांसाठी सुरू करण्याच्या निर्णय घेतला जाऊ शकतो. जर ट्रेन सुरू झाली तर लोकांनी सोशल डिस्टनसिंग , मास्क , सॅनिटाइयरचा वापर जेवढं शक्य असेल तेवढा करावा
सिद्धिविनायक ट्रस्टवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची वर्णी, महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच शासकीय पदांवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची वर्णी, आंदेश बांदेकर यांच्या अध्यक्षपदाला तीन वर्ष मुदतवाढ, ट्रस्टमध्ये पाच पदे सेनेकडे तर प्रत्येकी तीन पदं काँग्रेस राष्ट्रवादीकडे, काँग्रेसच्या राजाराम देशमुख यांचा सदस्यांमध्ये समावेश
डोंबिवलीतील हायप्रोफाईल लोढा हेवन परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैशाच्या वादातून भररस्त्यात काही तरुण आपसात भिडले. भांडण सोडवण्यासाठी महिलाही मध्ये पडली. याप्रकरणात मानपाडा पोलिसांनी भररस्त्यात राडा घालणाऱ्या दोन्ही गटातील तरुणावर परस्परविरोधी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरस झाल्याने एकच खळबळ उडाली आहे, सध्या मानपाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. भांडण सोडवायला गेलेली महिला एका गटातील असल्याचे समोर आले आहे
पुरंदर : पुरंदर तालुक्याला भूकंपाचे धक्के, काल सायंकाळी ७ वाजून २८ मिनिटांनी झाला भूकंप, २.६ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा झाला भूकंप, नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीकडून देण्यात आली भूकंपाची माहिती, भूकंपात कोणतीही वित्त व जीवितहानी नाही, प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना सुरु
नाशिक – साहित्य संमेलन नगरीला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्यावे, रिपब्लिकन पार्टीची मागणी, नाशिकच्या भूमीपुत्राचे समरण होण्यासाठी नाव देण्याची मागणी, साहित्य संमेलन निवड समिती समोर मांडणार प्रस्ताव, रिपब्लिकन पक्षाचे सचिन खरात यांची मागणी
वाशिम : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दिक वाद, या वादामुळे जिल्ह्यात एकच खळबळ तर आज मालेगाव शहर कडकडीत बंद, मालेगाव मध्ये भाजप कार्यकर्ते रस्त्यावर खासदार भावना गवळी विरोधात नारे लाऊन घोषणाबाजी, या वादामुळे कोणतीही अनुसूचित घटना घडू नये यासाठी जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचा चोक बंदोबस्त
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पुण्यातील आपटे प्रशाला शाळेला भेट, वर्षा गायकवाड 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तयारीची पाहणी करणार
नागपूर : नागपूर मेट्रोमध्ये जुगार आणि नाचणाऱ्यांवर गुन्हे दाखल, जुगार खेळणे, सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन, कोविड नियमांचं उल्लंघन आणि मेट्रो नियमांच्या उल्लंघन असे गुन्हे दाखल, मेट्रो ने केली होती तक्रार दाखल, आयोजकांचा मेट्रोमधील असुरक्षितता आणि भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात आंदोलन केल्याचा दावा
रत्नागिरी – नाणार रिफायनरी संदर्भातलं पालकमंत्री अनिल परब यांचे मोठे विधान, नाणार रिफायनरी समर्थकांची बाजू मुख्यमंत्री ऐकून घेणार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ही जबाबदारी, नाणार रिफायनरी समर्थकांचा भेट देण्यास संदर्भातला मेल मुख्यमंत्री कार्यालयात आला आहे, मुख्यमंत्री कार्यालयातून त्यासंदर्भातले प्रोसेस सुरू आहे, नाणार रिफायनरी समर्थकांना मुख्यमंत्र्यांच्या भेटी संदर्भात लवकरच कळवले जाईल, नाणार रिफायनरी समर्थकांना मुख्यमंत्र्यांनी भेट द्यावी म्हणुन बसले होते उपोषणाला
येवला – कोरोनाबाधित 5 रुग्णांच्या अहवाल पॉझिटीव्ह, आता पर्यंत 52 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, येवल्यातील कोरोना बधितांची एकूण संख्या पोहचली 1219, कोरोनावर 1153 जणांनी मात करत केली घरवापसी, उर्वरित 7 जण कोरोणा उपचार घेत आहे
कोल्हापूर – तब्बल दहा महिन्याच्या कालावधी नंतर शाळांचा परिसर गजबजला, कोरोना सुरक्षेचे नियम पाळत सुरू झालेल्या कोल्हापूर मधील शाळा, थर्मल चेकिंग,सॅनिटाझेशन करूनच विद्यार्थ्यांना दिला जातोय शाळेत प्रवेश, पालकांचे संमतीपत्र ही आवश्यक
अबंरनाथ – बदलापुर च्या मधे TRT ट्रँक मशीनमध्ये बिघाड, रात्री 2 ते 5.10 पर्यंत या भागात दुरुस्ती चे काम चाल होते, अबंरनाथ ते बदलापुर रेल्वे वाहतुक सेवा ठप्प, सीएसटी ते अबंरनाथ व बदलापुर ते खोपोली लोकल सेवा सुरु, वाहतुक सुरळीत करण्याचे रेल्वेचे प्रयत्न सुरु.
आजपासून नागपूर ग्रामीणमध्ये 5 ते 8 वी चे वर्ग सुरु, 10 महिन्यानंतर 1668 शाळांमध्ये वर्ग सुरु, नागपूर ग्रामीणमध्ये 5 ते 8 वी चे 1 लाख 48 हजार विद्यार्थी, पालकांचं संमतीपत्र घेऊनंच शाळा सुरु होणार, शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणीचे बंधन, शाळेच्या निर्जंतूकीकरणासह कोवीडचे नियम पाळणं बंधनकारक
नागपूर जिल्ह्यात कोरोना लसीबाबतची संभ्रम दूर करण्याचे डॅाक्टरांचे प्रयत्न, भाजपच्या आरोग्य आघाडीनेही घेतला पुढाकार, भाजप आरोग्य आघाडीचे अध्यक्ष डॅा. गिरीश चरडेंनी घेतली लस, आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेण्याचं आवाहन, नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ६१ टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण
रत्नागिरी- जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळांचा आज होणार श्रीगणेशा, कोरोना काळात लॉक डाऊन मुळे बंद होत्या शाळा, जिल्ह्यातील सर्व माध्यमातील 3202 शाळा आज उघडणार, पाचवी ते आठवी शिकणाऱ्या मुलांची संख्या 80 हजार, शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर ती 3695 शिक्षकांच्या झाल्या कोरोना चाचण्या
पुणे – पुण्यातील शाळा 1 फेब्रुवारीला सुरू होणार, आज शाळा सुरू होणार नाहीत, 1 फेब्रुवारीपासून कोरोनाच्या उपाययोजना करून शाळा उघडल्या जाणार, 1 फेब्रुवारीला शाळा उघडण्याचा महापालिकेनं घेतलाय निर्णय
मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत, अंबरनाथ-कर्जत दरम्यान वाहतूक बंद, अंबरनाथ आणि बदलापूरच्या दरम्यान रात्री खडी टाकणारी मशीन रुळावरून घसरलीय, कर्जत खोपोलीतील वस्तीकरिता असलेल्या ट्रेन सध्या मुंबईच्या दिशेने सोडण्यात येत आहेत, वस्तीकरिता असलेल्या ट्रेन निघून गेल्या नंतर वाहतूक पूर्ववत होत नाहीत तो पर्यंत सर्व वाहतूक ठप्प होण्याची शक्यता, कामावर जाणाऱ्या चाकरमन्यांचे ऐन सकाळी होणार हाल
पश्चिम रेल्वे मार्गावर येत्या 29 जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने लोकल रेल्वे सेवा बहाल केली जाणार, तसा निर्णय घेण्यात आला आहे, लॉकडाऊन लागू होण्याआधी पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर नियमितपणे 1 हजार 367 लोकल चालवण्यात येत होत्या, निर्णयानुसार 29 जानेवारीपासून या सर्व लोकल पूर्ववत धावतील, तब्बल दहा महिन्यांनंतर पश्चिम रेल्वेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले, दुसरीकडे मध्य रेल्वेने मात्र अजूनही असा कोणताही निर्णय घेतलेला नसला तरी येत्या एक दोन दिवसांत याबाबत निर्णय होऊ शकेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.