Maharashtra News LIVE Update | नारायण राणेंना मंत्रिपद दिल्याने शिवसेनेला काहीच फरक पडणार नाही : उदय सामंत
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
कास पठारावर फिरण्यासाठी गेलेला युवक सेल्फी काढताना आठशे फूट खोल दरीत पडला
सातारा :
कास पठारावर फिरण्यासाठी गेलेला युवक सेल्फी काढताना आठशे फूट खोल दरीत पडला
शिवेंद्रराजे ट्रेकर्सच्या मदतीने 24 तासानंतर युवकाला काढले सुखरूप बाहेर
कास रस्त्यावर गणेश खिंडीतील कठड्यावरून सेल्फी काढताना काल संध्याकाळच्या सुमारास घडली होती घटना
जखमी युवकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल
-
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली
रत्नागिरी :
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या चेअरमन अँड म्यानेजिंग डायरेक्टर या पदावर बदली
त्यांच्या जागी अद्याप कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नसल्याची सूत्रांकडून माहिती
-
-
नारायण राणेंना मंत्रिपद दिल्याने शिवसेनेला काहीच फरक पडणार नाही : उदय सामंत
यवतमाळ : उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :
– कोकणातला मंत्रिपद असो किंवा राज्यात दिलेले 4 पद असो त्याचा कुठलाही फरक शिवसेनेवर पडणार नाही उलट आणखी जोमाने शिवसेना कामाला लागली आहे आणि आणखी पुढे येईल
– सामनाचेच म्हणणे नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हेच म्हणणे आहे की ज्या मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी संघटना तयार झाली जीच अस्तित्व दिल्लीत तयार झाला ते नसताना त्याच्या कुटूंबार अन्याय करणं हे महाराष्ट्राला सुद्धा आवडला नाही त्यामुळे सामानाचे मत नाही व्ययक्तिक न मांडता महाराष्ट्र चे मत मांडले आहे
– ऑनलाइन education सिस्टीम असताना विद्यार्थी शिक्षक यांच्यात समनव्यय असाल पाहिजे प्रॅक्टिकल केले पाहिजे असं वाटत पण सध्या तशी परिस्थिती नाही त्यामुळे जेव्हा कधी शाळा कॉलेज सुरू होतील तेव्हा आधी प्रॅक्टिकल exam आधी होतील.
-
अनेक दिवसांच्या खंडानंतर अखेर मनमाडमध्ये पावसाची हजेरी
मनमाड :- अनेक दिवसांच्या खंडानंतर अखेर पावसाने लावली हजेरी
मनमाड शहर परिसरात रिमझीम पावसाला सुरुवात
सकाळपासून जाणवत होता उकाडा
संध्याकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाला झाली सुरुवात
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभागाची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभागाची बैठक संपली
जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि अशोक चव्हाण उपस्थित
पश्चिमवाहीनी नद्यांचे पाणी पूर्ववाहीनी नद्यांकडे वळविण्याबाबत झाली चर्चा
वैनगंगा-नळगंगा प्रकल्पावर चर्चा
अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा आढावा
विभागाचे सचिव तसेच मुख्य सचिव, अमुस वित्त, अमुस नियोजन ही उपस्थित
-
-
लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरण थांबले : अजित पवार
अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :
– कोरोना आढावा बैठक पार पाडली -उद्या लस येण्याची शक्यता, केंद्राकडून जेवढा लसींचा पुरवठा झाला पाहिजे तसा होत नाहीय – लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरण थांबले – मुलांसाठी बेडसची उपलब्धता करण्यात आलीय
– 607 रुग्ण म्युकरमायकोसिस आहेत,
– ज्यांच्या लसींचा दोन्ही डोस घेतलेत ते मास्क घालत नाही,
– माझी विनंती आहे, निष्काळजीपणा करू नका मास्क वापरा,
– पुण्याचा मृत्यूदर 1.6 टक्के आहे, त्यामध्ये ससूनमध्ये जास्त आहे
– 4 नंतर सरसकट बंद झाले पाहिजे, पोलिसांना आदेश
– ऑक्सिजन वाढवला आहे,
– हेच निर्बंध कायम असणार आहेत
-
जालन्यात 20 लाख 60 हजारांचा गुटखा पकडला, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जालना : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
20 लाख 60 हजारांचा गुटखा पकडला
पुण्याहून यवतमाळला जात होता घुटखा
सापळा रचत गुटखा घेऊन जाणारा ट्रक पकडला
ट्रक चालक स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
-
भाजपचा मुळ विचार राहिलाच नाही : हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :
देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदींच्या जवळचे आहेत हे स्पष्ट झालं
प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न देण्यामागच ते कारण आहे
मी नाराज नाही हे सांगताना पंकजा मुंडेंचा चेहराच सांगत होता काय सुरू आहे ते
भाजपचा मुळ विचार राहिलाच नाही आता काँग्रेस विचारांची भाजपा झाली
-
फी भरली नाही म्हणून विद्यार्थींना शाळेत बसू न देणार्या राज्यातील 32 शाळांना नोटीस
– फी भरली नाही म्हणून विद्यार्थींना शाळेत बसू न देणार्या राज्यातील ३२ शाळांना नोटीस
– मुंबई, नवी मुंबईसह नाशिक, औरंगाबाद, नागपूर विभागातील शाळांना नोटीस
– यात मुंबई, नवी मुंबई – १० पुणे – १० नाशिक – ५ नागपूर – ५ औरंगाबाद – २ शाळांचा समावेश
– फी न भरलेल्या विद्यार्थींना ऑनलाईन क्लासला बसू न देणं, काही विद्यार्थींना शाळेतून काढून टाकण्याचे प्रकार करणार्या शाळांना मान्यता रद्द करण्याची नोटीस
-
गोकुळ दूध संघाच्या खरेदी दरात वाढ, म्हशीच्या दुधाला 2 तर गायीच्या दुधाला 1 रुपयांची वाढ
कोल्हापूर :
गोकुळ दूध संघाच्या खरेदी दरात वाढ,
म्हशीच्या दुधाला 2 रुपये तर गायीच्या दुधाला 1 रुपयांची वाढ
पालकमंत्री सतेज पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
11 जुलै पासून लागू होणार नवी दरवाढ
दूध खरेदीदर वाढीमूळे दूध उत्पादकांना दिलासा
-
चंद्रपुरात गेल्या तासाभरापासून जोरदार पाऊस
चंद्रपूर : गेल्या एक तासापासून चंद्रपुरात जोरदार पाऊस, अशा मुसळधार पावसाची होती धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीक्षा, आतापर्यंत सव्वा महिन्यात पडला केवळ 27 टक्के पाऊस, त्यात होती 20 दिवसांची उघडीप, काल दिवसभर पावसाने बॅटिंग केल्यावर सकाळपासून दिली होती उघडीप
-
ठाण्यात महागाई विरोधात महिला काँग्रेसचं आंदोलन
ठाणे : जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीच्या विरोधात मोदी सरकारच्या विरोधात महिला काँग्रेसच्यावतीने आज तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते. घरगुती गॅस सिलेंडर, डिझेल, पेट्रोल आणि खाद्य तेल, इंधन आणि इतर वस्तूचे भाव दिवसागणिक वाढत आहे. याचाच रोष सर्वसामान्य जनतेमध्ये आहे. तसेच बेरोजगारी देखील वाढलेली आहे. याच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर करण्यात आले. यावेळी मोदी सरकारला जागे करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या फोटोच्या कानाजवळ महिला पदाधिकाऱ्यांनी पिपाण्या भोंगे वाजवत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्याचबरोबर गॅस सिलेंडरचा दर वाढल्यामुळे शेणाच्या गौऱ्या मोदी सरकारला भेट वस्तू म्हणून देणार असल्याचे ठाणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा शिल्पा सोनोणे यांनी सांगितले.
-
जळगावात दहा दिवसांनंतर पावसाची हजेरी
जळगाव : जळगाव शहरामध्ये दहा दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. तापमान हे खूप मोठे वाढले होते. अंगाची लाही लाही व्हायची. पण आज अचानक पाऊस जोरदार बरसल्याने हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे.
-
भाजपमध्ये गोपीनाथ मुंडेंना जो त्रास झाला त्याचे आम्ही साक्षीदार : प्रकाश अण्णा शेंडगे
प्रकाश अण्णा शेंडगे यांची पंकजा मुंडे यांच्या वक्कव्यावर प्रतिक्रिया – प्रितम मुंडे यांची वर्णी न लागता भागवतराव कराड यांची वर्णी लागल्याने ओबीसी समाजाच्या मानत संशयाची भावना – हा अचानक झालेला निर्णय समाजासाठी धक्कादायक आहे – भाजपमध्ये गोपीनाथ मुंडेंना जो त्रास झाला त्याचे आम्ही सगळे साक्षीदार आहोत. असाच त्रास आत्ता पंकजांना तर होत नाही ना? हा प्रश्न – केंद्र सरकार न्याय देईल ही अपेक्षा
-
टीम देवेंद्र वगैरे असं आमच्याकडे नाही, पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला
केंद्रातील सर्व नव्या मंत्र्यांचं अभिनंदन
भागवत कराडांचं मनापासून अभिनंदन
वंजारी समाजातून कुणी मोठं होत असेल तर मी पाठिशीच
माझ्या नाराजीचं काहीही कारण नाही
मी आणि प्रितम नाराज नाही, आम्ही दोघीही नाराज असण्याचं कारण नाही
राज्यातून मंत्री झालेल्या सर्वांचं स्वागत
मंत्रिपद मिळालेल्याचं फोन करुन अभिनंदन
मला वाटत नाही भाजपला मला संपवायचंय
पक्षानं घेतलेला निर्णय मला मान्य आहे
मी ज्येष्ठ नाही, अजूनही लहान आहे
टीम देवेंद्र वगैरे असं आमच्याकडे नाही, पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला
आता मुंडे साहेबांची आठवण आली, पंकजा मुंडे गहिवरल्या
मी नेतृत्त्व नाही कार्यकर्ती आहे
-
फक्त ठराव करून चालणार नाही,ठराव हा एक भाग आहे – संभाजीराजे छत्रपती
कोल्हापूर
संभाजीराजे –
फक्त ठराव करून चालणार नाही,ठराव हा एक भाग आहे…
सहा मागण्यांपैकी सारथी बाबत काही मूहमेन्ट सुरू आहेत
पण बाकीच्या मागण्या बाबत अद्याप काही कल्पना नाही
एक महिन्याची मुदत 10 ते 15 दिवस वाढू शकेल
त्या नंतर मूक आंदोलन असेलच
मूक आंदोलन हाच करेक्ट ट्रक आहे
-
पेट्रोल, डिझेल,गॅसच्या दरवाढ विरोधात नाशिकमध्य काँग्रेस कडून सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन
– पेट्रोल, डिझेल,गॅसच्या दरवाढ विरोधात नाशिकमध्य काँग्रेस कडून सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन
– जिल्हाधिकारी कार्यलयाबाहेर चुलीवर स्वयंपाक करत निषेध आंदोलन
– काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
– दिवसागणिक वाढणाऱ्या गॅसच्या किमती सर्वसाधारण माणसाच्या आवाक्याबाहेर
-
इचलकरंजीत दुकानं उघडण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी मलाबादे चौकात केली निदर्शने
इचलकरंजी
इचलकरंजीत दुकानं उघडण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी मलाबादे चौकात केली निदर्शने
जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांवर केली घणाघाती टीका
आरोग्य मंत्र्यांनाच्या शब्दाला मंत्रिमंडळात किंमत नाही
पालक मंत्र्यांनी कोल्हापूर शहरासाठी कसाकाय निर्णय घेऊ शकतात
कोल्हापूर शहर सोडून दुसरे शहर काश्मीर मध्ये आहेत का असा सवाल राजू शेट्टी यांनी केला
जिल्ह्यातील तीनही मंत्री काय करत आहेत व्यापाऱ्यांनी दुकाने उघडावे स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी आहे
-
कोल्हापुरात पाऊस सुरू
कोल्हापूर
कोल्हापुरात पाऊस सुरू
गेल्या 15 दिवसापासून पावसाने घेतली होती विश्रांती
पाऊस सुरू झाल्याने बळीराजा सुखावला
-
इचलकरंजी शहरातील व्यापारी संघटना आणि व्यापारी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात केले ठिय्या आंदोलन
इचलकरंजी
शहरातील व्यापारी संघटना व व्यापारी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात केले ठिय्या आंदोलन
शहरातील पोलिसांनी सकाळी संचलन करून दुकाने केली होती बंद याच्या निषेधार्थ केले ठिय्या आंदोलन
राज्य सरकारने दुकान उघडण्यासाठी परवानगी द्यावी तो पर्यंत हे चालू राहणार आंदोलन
शहरातील जोपर्यंत व्यापार सुरू करण्यासाठी परवानगी देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार
कोल्हापूर जिल्ह्यातील तिने मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी
-
गॅस दरवाढीविरोधात पुण्यात काँग्रेसचे आंदोलन, रस्त्यावर मांडल्या चुली
पुणे
गॅस दरवाढीविरोधात पुण्यात काँग्रेसचे आंदोलन सुरू रस्त्यावर ती चुली मांडत आंदोलनाला सुरवात
-
बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत दिल्लीत दाखल
बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत दिल्लीत दाखल
राहुल गांधीं आणि के सी वेणुगोपाल यांना भेटण्याची शक्यता
पक्षांतर्गत मतभेदावरून वाद
नाना पटोले आणि नितीन राऊत यांच्यातील वाद
विधानसभा अध्यक्ष कांग्रेसला मिळाला नाही.
यावरून कांग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी.
-
आजरा तालुक्यात टस्कर हत्तीचा धुमाकूळ
कोल्हापूर :
आजरा तालुक्यात टस्कर हत्तीचा धुमाकूळ
हत्तीचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद
हाळोली,माद्याळ या गावात हत्तीचा संचार
उसासह अनेक पिकांच प्रचंड नुकसान
टस्कर हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी
वनविभाग लक्ष देणार का ?ग्रामस्थांचे विचारणार
मानवी वस्तीत हत्ती आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
-
शासनाच्या इनोवेशन इन एज्युकेशनचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून रणजितसिंह डिसलेची निवड
सोलापूर –
शासनाच्या इनोवेशन इन एज्युकेशनचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून रणजितसिंह डिसलेची निवड
महाराष्ट्र राज्य शासन कौशल्य विकास व रोजगार विभागाकडून महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीच्या वतीने राबविल्या जातात विविध योजना
अशा योजनांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी डीसले गुरुजींची स्वच्छता दूत म्हणून निवड
रणजितशिंह डिसले गुरुजी ग्लोबल पुरस्कार विजेते
-
सोलापूर नगरपालिका नगरपंचायती निवडणुका एकाच वेळी होणार
सोलापूर –
नगरपालिका नगरपंचायती निवडणुका एकाच वेळी होणार
माढा, मोहोळ, माळशिरस नगरपंचायतीची मुदत संपल्याने प्रशासक
उर्वरित 9 नगरपालिका आणि नव्याने झालेल्या वैराग ,महाळुंग ,श्रीपुर ,नगरपंचायतीची निवडणूक एकाच वेळी होण्याची शक्यता
नऊ नगरपालिकांची मुदत 3 डिसेंबर रोजी संपणार
मात्र कोरोनाची तिसरी लाट आल्यास 9 नगरपालिका वरही प्रशासकांची नियुक्ती होण्याची
नव्याने नगरपंचायत झालेल्या वैराग श्रीपुर महाळुंग येथे वॉर्ड रचना करण्याचे देण्यात आले होते आदेश
मात्र कोरोना संसर्गामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलला
त्यामुळे नगरपालिका, नगरपंचायती निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता
-
सोलापूर नगरसेवक मनोज शेजवाल यांचा शोध सुरुच
सोलापूर –
नगरसेवक मनोज शेजवाल यांचा शोध सुरुच
घरगुती गॅस अवैधरित्या रिक्षा भरण्याच्या प्रकरणात मनोज शेजवालचा घेत आहेत पोलीस शोध
शेजवालसह तिघेजण अद्याप फरार
रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे वसाहतीत घरगुती गॅस अवैधरित्या रिक्षात भरण्यात करत होते व्यवसाय
शहर गुन्हे शाखेने घातला होता छापा
-
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे पूर आलेला नाला ओलांडण्याचे धाडस करणारे २ जण गेले वाहून
पूर आलेला नाला ओलांडण्याचे धाडस करणारे २ जण गेले वाहून
– नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर शहराशेजारी गोवरी नदीवरील पुल ओलांडताना दुर्घटना
– अण्णा पुरुषोत्तम निंबाळकर, वय ५०आणि गुड्डू मधुकरराव शिंदे पुराच्या पाण्यात गेले वाहून
– वाहून गेलेले दोघेही कळमेश्वर तालुक्यातील गोवरी येथील रहिवासी आहेत
– नदीच्या पलीकडे दुचाकी ठेऊन पूल ओलांडणाऱ्या दोघांनाही पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत उतरताच दोघेही गेले वाहून
-
नाशकात उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी शहर बस सेवेला प्रतिसाद
नाशिक उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी शहर बस सेवेला प्रतिसाद
पहिल्या दिवशी शहरात धावल्या 27 बसेस
बसेस ने पूर्ण केल्या पहिल्याच दिवशी 164 फेऱ्या
100 हुन अधिक प्रवाशानी घेतला वास सेवेचा लाभ
-
रामदेवबाबाच्या नागपूर मिहानमधील पतंजली प्रकल्पाला इशारा
३१ डिसेंबरपर्यंत उत्पादन सुरु करा, अन्यथा कारवाई!
– रामदेवबाबाच्या नागपूर मिहानमधील पतंजली प्रकल्पाला इशारा
– महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने पतंजलीला इशारा दिल्याची माहिती
– मिहानमधील नॅान सेझमध्ये पतंजलीने घेतली २३० एकर जागा
– सप्टेंबर २०१६ साली जमीन घेतली, पण दिलेल्या मुदतीत उत्पादन सुरु केलं नाही
-
दूध उत्पादकांना गोकुळ दूध संघाकडून दोन रुपये दरवाढीची भेट मिळण्याची शक्यता
कोल्हापूर :
दूध उत्पादकांना गोकुळ दूध संघाकडून दोन रुपये दरवाढीची भेट मिळण्याची शक्यता
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील दूध दरवाढीची घोषणा करण्याच्या तयारीत
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवेळी दिलं होतं दरवाढीच आश्वासन
सत्ता येताच आश्वासन पूर्तीसाठी नेत्यांचे प्रयत्न
सध्या म्हशीच्या दुधाला आहे 39 रुपये तर गाईच्या दुधासाठी आहे 26 रुपये दर
दूध खरेदी दरात वाढ होत असली तरी विक्री दरात मात्र तूर्तास वाढ नाही
मुंबई शहरात मात्र दूध विक्री दरात वाढीबाबत चाचपणी
-
अकोल्यात मध्यरात्री ट्रक आणि कारचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू
अकोला जिल्हातल्या रिधोऱ्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक व कारचा भीषण अपघात या अपघातात तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी.
-
प्राणी, पक्षी पाळणारे आणि व्यवसाय करणाऱ्यांची नोंदणी बंधनकारक
प्राणी, पक्षी पाळणारे आणि व्यवसाय करणाऱ्यांची नोंदणी बंधनकारक
– पशुकल्याण मंडळाची शोधमोहिम सुरु
– नोंदणी न केल्यास होणार कायदेशीर कारवाई
– पाळीव पक्षी आणि प्राण्यांचा अवैध व्यापार रोखण्यासाठी पाऊल
-
फडणवीसांच्या गडात शिवसेनेचा ओबीसी मतांवर डोळा
– फडणवीसांच्या गडात शिवसेनेचा ओबीसी मतांवर डोळा
– नागपुरात शिवसेनेनं ओबीसींच्या मोहल्ला बैठका घेण्यास केली सुरुवात
– ‘बैठकांमध्ये ओबीसी आरक्षण जाण्यास केंद्र सरकार जबाबदार भुमिका’
– शिवसेना प्रवक्ते किशोर कन्हेरेंवर बैठकांची जबाबदारी
– नागपूरच्या विविध भागात सुरु झाल्या बैठका
– नागपूर महानगरपालिका निवडणूकीपूर्वी शिवसेना लागली कामाला
-
नागपूर मेट्रोचा दावा फोल, मनिषनगर अंडरपासखाली गुडघाभर पाणी
– नागपूर मेट्रोचा दावा फोल, मनिषनगर अंडरपासखाली गुडघाभर पाणी
– पहिल्याच पावसात मनिषनगर पुसाखाली पाणी साचल्याने लोक संतप्त
– पुलाखाली पाणी साचल्याने मेट्रोचा भोंगळ कारभार पुन्हा आला चव्हाट्यावर
– काही दिवसापूर्वी याच भागात मेट्रोच्या पिलरचा काही भाग खाली कोसळला होता
– जय जवान, जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांचे मेट्रोवर आरोप
– अंडरपासच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा प्रशांत पवार यांचा आरोप
-
अकोला जिल्हातल्या अनेक भागात रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू
अकोला जिल्हातल्या अनेक भागात रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू….
या पावसामुळे पिकांना मिळाले जीवदान….
गेल्या 15 दिवसापासून पावसाने मारली होती दांडी…
या पावसाने शेतकरी आनंदीत…
Published On - Jul 09,2021 6:21 AM