महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेची मोठी कारवाई
वेबसीरिजच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड
मुंबईतील वर्सोवा परिसरातील एका पॉश हॉटेल येथे समाजसेवा शाखेने सेक्स रॅकेटचा केला उघड़
याप्रकरणी एका महिलेस अटक करण्यात आली आहे, तर 3 मॉडेल्सची सुटका करण्यात आली आहे
मोठा सेक्स रॅकेट असल्याची शक्यता
पुढील कायदेशीर कारवाई एस एस ब्रांच करत आहे
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात आज मान्सूनची सुरुवात होताच पावसाने जोरदार हजेरी लावली. विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस आणि गारा पडल्यामुळे विजेचा वज्रघाताने शेतकऱ्याच्या गाय व बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यात आज सायंकाळी 6 वाजता हेमचंद सदाराम मेळेकर मु. भोयरटोला / टेकाबेदर तालुका देवरी यांच्या घरासमोरील झाडावर वीज पडून 1 गाय व 1 बैल ठार झाले आहे. सदर घटनेमुळे शेतकऱ्यावर दुःखाचे डोंगर पडला आहे.
चंद्रपूर : जिल्ह्यात दारू सुरू करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यावर प्रत्यक्ष शासन परिपत्रक झाले निर्गमित, राज्य उत्पादन शुल्क विभागाने 8 जून 2000 21 रोजी काढले परिपत्रक, या आधी रमानाथ झा समितीने दिला होता दारू सुरू करण्याबाबत सकारात्मक अहवाल, 1 एप्रिल 2015 च्या आधी ज्या दारू परवानाधारकांनी नूतनीकरण केले होते त्या सर्व दारू दुकानांना ‘जैसे थे’ स्थितीत दुकाने सुरू करण्यास दिली परवानगी, या परवानाधारकांना चालू आर्थिक वर्षासाठी नूतनीकरण शुल्क भरणे केले आवश्यक, नवे दारू दुकान सुरू करताना राज्य शासनाने ‘एक खिडकी योजना’ केली सुरू, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महामार्गालगतच्या दुकानांना सुरू करण्यासाठी राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी केली आवश्यक, चंद्रपूर जिल्ह्यात आता अन्य जिल्ह्यातूनही दारू दुकाने स्थलांतरित होऊ शकणार
भिवंडी : खोणी ग्रामपंचायत हद्दीतील बाळाराम शास्त्री चाळीतील बंद खोलीत सुरू असलेल्या विद्युत वाहिनीचा झटका लागल्याने एका अल्पवयीन मुलाचा जागीच तडफडून मृत्यू . सोनू सुभाष शहा वय वर्षे 13 असे मृत्यू पावलेल्या मुलाचं नाव. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.
– उरवडे आगीच्या दुर्घटनेस कंपनी मालक जबाबदार,
– एसव्हीएस या कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल,
– पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी संपूर्ण घटनेची प्राथमिक चौकशी केली,
– प्राथमिक चौकशीत कंपनीच्या मालकांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे निदर्शनास,
– पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ याप्रकरणाचा तपास करत आहेत.
अहमदनगर
पत्रकार बाळ बोठे विरोधात अखेर दोषारोपपत्र दाखल
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार बोठेवर पुरवणी दोषारोप पत्र पारनेर न्यायालयात दाखल
साडे चारशे पानांच दोषारोपपत्र दाखल
जरे यांच्या हत्ये नंतर बोठे फरार झाला होता, मोठ्या शिताफीने पोलिसांनी त्याला हैदराबाद येथून अटक केली होती
“नवनीत राणा यांच्यामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं”, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केला आहे.
नाशिक:
– नाशिकमध्ये तब्बल 1184 जुने वाडे धोकादायक
– पावसाळा सुरू होण्याआधी मनपाने केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक आकडेवारी
– मनपा प्रशासनाकडून सर्व धोकादायक इमारती खाली करण्यासाठी दिल्या नोटिसा
– संबंधित लोकांनी इमारती खाली न केल्यास मनपा प्रशासनाकडून करण्यात येणार खाली
वसई – 9 ते 12 जून या कालावधीत पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी चा हवामान खात्याकडून इशारा
वसई तालुक्यातील समुद्र किनाऱ्या वरील गावात, खेड्या पाड्यातील नागरिकांनी सतर्क राहावे
वसई च्या तहसीलदार उज्वला भगत यांचे अहवान
कोल्हापूर –
उदय सामंत प्रेस –
शिवसेनेची भूमिका उद्धव ठाकरे स्पष्ठ करतात
ते मराठा आरक्षण मिळाव याच बाजूने आहेत
त्याच अनुषंगाने आजची भेट होत आहे..
भेटी नंतर मुख्यमंत्री स्वतःच तपशील देतील
पुणे –
– पुण्याच्या उरवडे आगीची दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान कार्यालयाकडून मदत जाहीर,
– मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत,
– तर जखमींना 50,000 रुपये मदत देणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं जाहीर केलं,
– या दुर्घटनेत 18 कामगारांचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगर –
जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास सरासरी ६१.२ मिलीमीटर पावसाची नोंद
तर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १३ महसूल मंडळांमध्ये सर्वाधिक पाऊस
या सर्व मंडळांमध्ये एकूण सरासरी १०० मिलीमीटर पाऊसाची नोंद
सर्वाधिक पाऊस श्रीगोंदा तालुक्यामध्ये झाला असून आतापर्यंत एकूण सरासरी १२७ मिलीमीटर पाऊस
नाशिक – अल्पवयीन मूकबधिर मुलाचा सावत्र आई कडून अमानुष छळ
सावत्र आईने रागाच्या भरात दिले मुलाच्या गुप्तांगाला चटके
चटके देत मारहाण देखील केल्याचं उघड
दिंडोरी तालुक्यातील निळवंडी पाडे गावात घडली घटना
ग्रामस्थांनी अल्पवयीन मुलाला केलं नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल
सांगली –
ओढ्यात बुडालेल्या तिघांचा मृत्यू
पाण्यात बुडूनच मृत्यू झाले चे झाले स्पष्ट
तिघांचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला सोमवारी आले यश
होनमाणे यांच्या एकाच कुटुंबातील आनंद होनमाणे ,विजय होनमाणे वैभव होनमाणे या तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू
आटपाडी तालुक्यातील जाभूळणी- घानंद येथे रविवारी घडली घटना
मासेमारीसाठी गेलेल्या तिघांचा झाला बुडून झाला मृत्यू
अतिशय शोकाकुल वातावरणात तिघांच्या वर झाले अंत्यसंस्कार
गावासह संपूर्ण परिसरात होत आहे हळहळ व्यक्त
– नागपूर मेट्रोच्या बांधकामादरम्यान अपघातांची मालिका सुरुच
नाशिक – स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरातील रस्ते खड्ड्यात
अन लॉक नंतर नाशिककरांना शहरातील खोडकामामुळे मनस्ताप
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहरात खोदकाम केल्याने नाशिककरांमध्ये संताप
खोदकाम करून रस्ते फोडून ठेवणाऱ्या ठेकेदाराला दंड ठोठावण्याची मागणी
शहरात एकीकडे अन लॉक मुळे गर्दी, तर दुसरीकडे वाहतूक कोंडी
नाशिक – अजितदादांच्या द्विसदस्यीय प्रभाग रचनेला शिवसेनेचा पाठिंबा
आगामी महापालिका निवडणुकीत द्विसदस्यीय रचना झाल्यास सेनेला फायदा
दादांच्या वक्तव्याने सेनेत उत्साहाचं वातावरण
तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मात्र अस्वस्थता
द्विसदस्यीय प्रभाग रचना झाल्यास बंडखोरी टळेल असा सेनेला विश्वास
तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस समोर मात्र उमेदवार निवडीचं आव्हान
कराड
कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तिरंगी होणार
सत्ताधारी पॅनल विरोधात एकत्रित विरोधी आघाडीची शक्यता मावळली
आघाडी व मनोमिलनाच्या प्रक्रियेतुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पडले बाहेर
कारखान्यांबाबत सभासद निर्णय घेतील पृथ्वीराज चव्हाण यांनी केले स्पष्ट
नाशिक – शहरात दुचाकी चोरांचा सुळसुळाट
गोळे कॉलनी परिसरातून दिवसाढवळ्या चोरट्याने दुचाकी नेली चोरून…
संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद…
याआधी देखील अनेक दुचाकी येथून चोरी झाल्याच्या घटना समोर
सीसीटीव्ही च्या आधारे पोलिसांचा तपास सुरू
गोडाऊन मधील साहित्याने पुन्हा पेट घ्यायला सुरुवात केलीये
अग्निशमन दलाची कोणतीही यंत्रणा घटनास्थळी नाही
पुणे
मुळशीतील उरवडे कंपनीतील आग अजूनही पूर्णतः विझली नाही
या आगीत होरपळून जवळपास 15 महिलांसह 18 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला
डीएनए टेस्ट केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार
डीएनए टेस्टसाठी पूर्ण होण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी लागणार
सोलापूर –
ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे काम 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश
शहरात चार ठिकाणी तर ग्रामीण भागात दहा ठिकाणी हवेतील ऑक्सिजन निर्मिती करणारे ऑक्सीजन प्लांट उभारण्यास आहे मंजुरी
ग्रामीण भागात दोन ठिकाणी तर शहरातील सिविल हॉस्पिटल मधील ऑक्सीजन प्लांट 15 जून पर्यंत
तर उर्वरित ठिकाणी 30 जून पर्यंत उभारण्याचे आदेश
मुंबईमध्ये सकाळ पासून पाऊस सुरु आहे
रात्री ढगाळ वातावरण पाहायला मिळत होते तर काही ठिकाणी रिमझिम पाऊसही सुरु होता
पावसामुळे आता हवेत गारवा तयार झाला आहे