LIVE | नागपुरात गर्दी टाळण्यासाठी कोरोना लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणार

| Updated on: Mar 24, 2021 | 6:56 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | नागपुरात गर्दी टाळण्यासाठी कोरोना लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणार
Breaking News
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Mar 2021 08:28 PM (IST)

    मालेगावात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

    मालेगावमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक

    आज मालेगाव मनपा क्षेत्रांत सापडले तब्बल 60 नवीन रुग्ण

    तर गेल्या तीन दिवसात सापडले 111 नवीन कोरोना रुग्ण

    मालेगावतील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा गेला अडीचशे च्या पार

    रोज मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली

  • 03 Mar 2021 08:27 PM (IST)

    नागपुरात गर्दी टाळण्यासाठी कोरोना लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणार, नागपूर विभागीय आयुक्तांचे आदेश

    -नागपुरात गर्दी टाळण्यासाठी कोरोना लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणार

    – नागपूर विभागीय आयुक्तांचे मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

    – दररोज 10 हजार लस देण्याचे नियोजन करणार

    – लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठांना पिण्याचं पाणी, बसण्याची सोय करणार

    – लसीकरण केंद्रात गर्दी आणि ज्येष्ठांची गैरसोय, ही बातमी टीव्ही ९ ने लावून धरली होती

    – शेवटी प्रशासनाला आली जाग, लसीकरण केंद्र वाढविण्याचा निर्णय


  • 03 Mar 2021 07:39 PM (IST)

    सांगली कोरोना अपडेट, पाहा किती रुग्ण बरे, किती रुग्णांना कोरोनाची लागण

    सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात 35 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 1761 वर

    ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 187 वर :

    तर उपचार घेणारे 31 जणआज कोरोना मुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 46625 वर :

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 48573 वर

  • 03 Mar 2021 06:52 PM (IST)

    जळगाव वसतिगृहातला प्रकार निंदनीय, सविस्तर चौकशी करा : खासदार रक्षा खडसे

    जळगाव आशादीप वस्तीग्रह या ठिकाणी ज्या प्रकारे काल महिलांवर अत्याचार झाले आहेत. अशाप्रकारे अनेक वेळा अत्याचाराचे प्रकार त्या ठिकाणी महिलांवर घडत असतात. अशा तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत, त्यामुळे याची कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी केली आहे.

  • 03 Mar 2021 05:40 PM (IST)

    हायलँड पार्क ढोकाळीत आगीचा भडका

    हायलँड पार्क ढोकाळी येथे आगीचा भडका, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

    हायलँड पार्क ढोकाळी येथे आगीचा भडका, आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
    आसपासच्या परिसरातील वीज पुरवठा खंडित

  • 03 Mar 2021 05:11 PM (IST)

    घरफोड्या करणारे सराईत गुन्हेगार नवी मुंबई क्राईम ब्रँच कडून गजाआड

    घरफोड्या करणारे सराईत गुन्हेगार नवी मुंबई क्राईम ब्रँच कडून गजाआड
    262 ग्राम सोन्याच्या दागिन्यांसह 12 लाख 58 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

    नवी मुंबईतील नेरुळ रबाळे, एपीएमसी परिसरात दिवसाढवळ्या घरफोडया होण्याचे प्रमाण वाढले होते त्यामुळे परिसरात नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.त्यामुळे या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश पोलीस उपायुक्त बिपिन कुमार सिंग यांनी दिले होते. तसेच नेरुळ, एपीएमसी, राबाळे पोलीस ठाण्यात घरफोड्यां संदर्भात गुन्हे नोंद झाले होते. या गुन्ह्यांचा समांतर तपास करून, सीसीटीव्ही फुटेज, गुप्त बातमीदार, तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे, महेश भिका चौधरी (51)व आदित्य/दीपक रामचंद्र राणा उर्फ रैना या मूळचा ओडीसा येथील मात्र वाशीतील जुहू गाव येथे राहणाऱ्या व्यक्तीला असे दोघांना गजाआड केले.

  • 03 Mar 2021 02:37 PM (IST)

    महापालिकेच्या निवडणुकीच्या वर्षभराआधी मनसेच्या पुणे विभागात खांदेपालट, वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदी नियुक्ती

    पुणे : महापालिकेच्या निवडणुकीच्या वर्षभराआधी मनसेच्या पुणे विभागात खांदेपालट, मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदी नियुक्ती, तर विद्यमान अध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती, मुंबईमध्ये राज ठाकरे यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली

  • 03 Mar 2021 02:20 PM (IST)

    विधानपरिषदेत प्रविण दरेकर मविआच्या आणखी एका आमदाराला घेरणार?

    विधानपरिषदेत प्रविण दरेकर मविआच्या आणखी एका आमदाराला घेरणार आहेत. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतोय, असं प्रविण दरेकर म्हणाले. संबंधित प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

  • 03 Mar 2021 01:36 PM (IST)

    विदर्भातील अकोला, चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

    विदर्भातील अकोला, चंद्रपूर जिल्ह्यात उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा इशारा, विदर्भात सरासरीपेक्षा 4 ते 5 अंश सेल्सिअस जास्त तापमान, यंदाच्या उन्हाळ्यात पारा 45 अंशाच्या पुढे जाणार, नागपूर हवामान विभागाचा अंदाज

  • 03 Mar 2021 12:55 PM (IST)

    तापसी पन्नू, अनुराग कश्यप आणि विकास बहलच्या घरी इनकम टॅक्स विभागाची धाड

    अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विकास बहलच्या घरी इनकम टॅक्स विभागाची धाड, मुंबईत अनेक ठिकाणी शुरु आहे धाडसत्र

  • 03 Mar 2021 11:19 AM (IST)

    सहा महिन्यांपासून पगार नाही, सिल्लोड शहरात सफाई कामगारांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

    औरंगाबाद : सिल्लोड शहरात सफाई कामगारांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन, सहा महिन्यांपासून पगार मिळत नसल्यामुळे कामगार आक्रमक, कोव्हिड काळात सेवा देऊनही कामगार पगारापासून वंचित, शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात आहे सिल्लोड नगरपरिषद, सहा महिन्यांपासून पगार थकल्यामुळे काम बंद करून कामगारांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन, सफाई कामगारांच्या आंदोलनात भाजपचे कार्यकर्तेही सहभागी, सिल्लो पाण्याच्या टाकीवरून सफाई कामगारांची जोरदार घोषणाबाजी सुरु

  • 03 Mar 2021 11:18 AM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत पुन्हा कोरोनाचा शिरकाव

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत पुन्हा कोरोनाचा शिरकाव, रोजगार हमी योजना शाखेतील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, रोजगार हमी योजना शाखा तात्पुरती बंद, जिल्हा परिषदेमध्ये ऑगस्ट 2020शिक्षक बदलीच्या समुपदेशनावेळी एका शिक्षकाला झाली होती कोरोनाची लागण, त्यानंतर शिक्षण विभागासह काही विभागातील कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती

  • 03 Mar 2021 10:31 AM (IST)

    नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पदवी प्रदान

    नाशिक – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पदवी प्रदान, एकनाथ शिंदे यांनी य.च.मु विद्यापीठातून उत्तीर्ण केली बी.ए परीक्षा, व्हर्चुअल रिएलिटी तंत्रज्ञान वापरून झाला पदवीदान सोहळा, अधिवेशन सुरू असताना देखील, एकनाथ शिंदे व्हर्च्युअल पद्धतीने राहिले पदवीदान सोहळ्याला उपस्थित, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या निमित्ताने,महाराष्ट्रात पहिल्यांदाच झाला प्रयोग

  • 03 Mar 2021 09:43 AM (IST)

    नागपुरात ज्येष्ठ नागरीकांच्या लसीकरणाचा आज तिसरा दिवस

    ज्येष्ठ नागरीकांच्या लसीकरणाचा आज तिसरा दिवस, नागपुरात लसीकरण केंद्राबाहेर लागल्या लांबच लांब रांगा, गर्दी टाळण्यासाठी लसीकरण केंद्राबाहेर रांगा

  • 03 Mar 2021 09:23 AM (IST)

    मौज मजा करण्यासाठी 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने सुरू केला सायकल चोरीचा नवा फंडा

    नाशिक – मौज मजा करण्यासाठी 13 वर्षीय अल्पवयीन मुलाने सुरू केला सायकल चोरीचा नवा फंडा, नाशिकच्या इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या या अल्पवयीन मुलाला पाहून पोलीस ही झाले आवाक, 8 चोरीच्या सायकली पोलिसांनी केल्या हस्तगत, गेल्या अनेक दिवसांपासून इंदिरानगर परिसरात सायकल चोरी होत असल्याने पोलीस होते चोरट्यांच्या मागावर, गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केली कारवाई

  • 03 Mar 2021 09:22 AM (IST)

    अंबानी धमकी प्रकरणात तपास अधिकारी बदलला गेला

    अंबानी धमकी प्रकरणात तपास अधिकारी बदलला गेला, सदर प्रकरणाची तपास आता एसीपी नितिन अलखनुरे ह्याच्यकडे दिला गेला, पूर्वी ह्या प्रकरणाच तपास करत होते API सचिन वजे, मुंबई पोलिसांच्या माहिती प्रमाणे है रूटीन बदल आहे कारण हा केस हाई प्रोफाईल आहे, अंबानी धमकी प्रकरणात अनेक दिवसानान्तर अजूनही काहीच निष्पन्न झालेला नाही , मात्र तपास अजूनही शुरू आहे

  • 03 Mar 2021 08:47 AM (IST)

    नागपूरच्या कोराडी भागातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

    नागपूर : नागपूरच्या कोराडी भागातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, छाप्यात 1 लाख 8 हजार रूपयांच्या रोख रकमेसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, यात 12 आरोपींना पोलिसांनी केली अटक, तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी

  • 03 Mar 2021 08:46 AM (IST)

    नागपूरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब, जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 995 नवे रुग्ण

    नागपूरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब, जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 995 नवे रुग्ण, 10 जणांचा मृत्यू, गृह विलीनीकरणातील रुग्णाची संख्या 6501 वर पोहोचली, दक्षिण – पश्चिम आणि पश्चिम नागपूरात सर्वाधिक रुग्ण, महिनाभरात गृह विलिनीकरणात असलेल्या रुग्णसंख्येत चारपट वाढ, रुग्ण वाढल्याने मनपा प्रशासन सतर्क

  • 03 Mar 2021 07:53 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेच्या खुल्या चौकशीसाठी केवळ चार तक्रारी दाखल

    पुणे : पुणे जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेच्या खुल्या चौकशीसाठी केवळ चार तक्रारी दाखल, तक्रारी दाखल करण्यासाठी पुरेसा वेळ दिला नसल्याचे सांगत तक्रारदारांनी पुन्हा संधी देण्याची केली मागणी, खुल्या चौकशी समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजयकुमार यांनी 5 मार्च रोजी पुन्हा वेळ देणार असल्याचे केलं स्पष्ट, जलयुक्त शिवार योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यात झालीत तब्बल 22 हजार 523 कामे, जिल्ह्यातील हवेली, इंदापूर, आंबेगाव आणि भोर तालुक्यातील प्रत्येकी एक तक्रार दाखल, आता येत्या 5 मार्च रोजी पुन्हा एकदा तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार

  • 03 Mar 2021 07:53 AM (IST)

    पुणे महापालिकेच्या वतीनं आणखी सात केंद्रांवर लसीकरण सुरु

    पुणे – महापालिकेच्या वतीनं आणखी सात केंद्रांवर लसीकरण सुरु, एकूण 11 केंद्रावर लसीकरणाची सुविधा उपलब्ध, खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना लसीकरणाचे प्रशिक्षण, येत्या काही दिवसात ४० केंद्र कार्यान्वित केली जाणार, सीजीएचएस आणि एमजीपीवाय या योजनांसह एकूण 70 ते 80 रुग्णालयातील केंद्रांवर आगामी काही दिवसात लसीकरण सुरु होणार, लसीकरणासाठी आतापर्यंत 1 लाख 92 हजार डोस पालिकेला प्राप्त, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची माहिती

  • 03 Mar 2021 07:52 AM (IST)

    नागपूरात वाढतं तापमान, पारा चाळीशीकडे,  विदर्भात थंडी संपली

    नागपूरात वाढतं तापमान, पारा चाळीशीकडे,  विदर्भात थंडी संपली, आर्द्रतेत झाली कमालीची घट,  गेल्या 24 तासांत कमाल 37.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता

  • 03 Mar 2021 07:51 AM (IST)

    पुणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रामधील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण

    पुणे – पुणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रामधील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण, यात 0 ते 18 या वयोगाटातील जवळपास 10 लाख 24 हजार 280 विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणामध्ये 4 हजार 279 जण शाळाबाह्य, त्यामध्ये 3 ते 6 वयोगटातील 2 हजार 50, तर 6 ते 11 या वयोगाटातील 914 शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा समावेश, त्याचबरोबर शाळाबाह्य दिव्यांग बालकांमध्ये 387 विद्यार्थ्यांचा समावेश

  • 03 Mar 2021 07:14 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी 1410 ज्येष्ठ नागरीकांनी घेतली कोरोना लस

    नागपूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी 1410 ज्येष्ठ नागरीकांनी घेतली कोरोना लस, नागपूर मनपाहद्दीत 957, तर ग्रामीणमध्ये 443 ज्येष्ठांचं लसीकरण, शहरातील तीन खाजगी रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात, खाजगी केंद्रांवर लसीकरणासाठी कमी प्रतिसाद

  • 03 Mar 2021 06:24 AM (IST)

    सांगली जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 48538 वर

    सांगली जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 48538 वर

    जिल्ह्यात आज दिवसभरात 24 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 1 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 1761 वर

    अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 183 वर

    तर उपचार घेणारे 6 जण आज कोरोना मुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 46594 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 48538 वर

  • 03 Mar 2021 06:19 AM (IST)

    अकोल्यातील ‘या’ खाजगी रुग्णालयात आजपासून होणार कोविड लसीकरण

    अकोला जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातून लसीकरण आज पासून सुरू करण्यात येणार आहे, यात शहरातील संत तुकाराम हॉस्पीटल, सिटी हॉस्पीटल, माऊली मॅटरनिटी व सर्जिकल हॉस्पीटल, डॉ. के.एस. पाटील हॉस्पीटल ॲन्ड पॉलिक्लिनिक हॉस्पीटल, श्रीमती बी.एल. चांडक रिसर्ज फाऊंडेशन(वसंती हॉस्पीटल) आणि शुक्ला मल्टीस्पेशलीटी हॉस्पीटलचा समावेश आहे

  • 03 Mar 2021 06:19 AM (IST)

    पोलीस अधिकारी पदी रुजु होण्यापूर्वीच अंजुमआरा दस्तगीर शेख यांची उस्मानाबाद आर्थिक शाखेत बदली

    अकोला जिल्हातल्या अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी पदी रुजु होण्यापूर्वीच अंजुमआरा दस्तगीर शेख यांची उस्मानाबाद आर्थिक शाखेत बदली, अकोट येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पद रिक्तच