महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
चंद्रपूर : महाशिवरात्रीनिमित्त देवदर्शनासाठी गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
गोंडपीपरी तालुक्यातील येनबोथला गावातील नदीकाठची घटना
रोहित जोगेश्वर देठे असे मयत मुलाचे नाव
वैनगंगा नदीकाठी असलेल्या शिवमंदिरात कुटुंबासह दर्शनासाठी आला होता मुलगा
आंघोळीसाठी पाण्यात उतरल्यानंतर पोहता येत नसल्याने प्रवाहात गेला वाहून
स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य राबवून मृतदेह गोंडपीपरी ग्रामीण रुग्णालयात रवाना
पालघर : कोरोनाचा ग्रामीण भागातील आश्रमशाळांमध्ये शिरकाव
जव्हार तालुक्यातील हिरडपाडा येथील आश्रम शाळेतील 37 विद्यार्थी आणि 3 शिक्षकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
प्रशासनासह आदिवासी विकास प्रकल्पाची डोकेदुखी वाढली
अचानक 40 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची तारांबळ
जव्हार मधील कोव्हीड सेंटर मध्ये उपचार सुरू
सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात 26 कोरोना रुग्ण
जिल्ह्यात आज कोरोनामुळे 2 रुग्णाचा मृत्यू
सांगलीत कोरोनामुळे आतापर्यंत 1765 जणांचा मृत्यू
सांगलीमध्ये अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 305 वर
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 48823 वर
नागपुरात आज पुन्हा कोरोना ब्लास्ट, दिवसभरात 1979 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
दिवसभरात 10 जणांचा कोरोना मुळे मृत्यू, तर 947 जणांनी केली कोरोना वर मात
नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या 164032 वर
नागपुरात आतापर्यंत 146419 जण कोरोनामुक्त
नागपुरात आतापर्यंत 4425 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
आपण एमपीएससीच्या परीक्षा अनंत काळासाठी पुढे ढकलू शकत नाही. वय निघून जातं, संधी हुकतात, या परीक्षा घेतल्याच पाहिजेत. सरकारचा निर्णय चुकीचा आहे, आता ज्या परीक्षा आहेत, त्या व्हायला हव्यात, त्या परीक्षा आताच व्हायला हव्यात, या परीक्षा चारवेळा पुढे ढकलल्या आहेत – देवेंद्र फडणवीस
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथील संजीवन हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेतली. लसीबद्दल आजही अनेक लोकांच्या मनात काही गैरसमज असल्याचे दिसून येते. परंतु ही लस अतिशय सुरक्षित असून सर्वांनी लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नाशिक – नाशिकमध्ये सातपूर-अंबड लिंक रोडवर भीषण अपघात
6 वर्षीय मुलाला टँकर ने चिरडले
रस्त्याचे काम चालू असल्याने अपघात झाल्याचं स्पष्ट
रस्त्याचं खोदकाम करताना एकही सूचना फलक नसल्याने ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
रत्नागिरी : खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची बदली रायगडला
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात माजीमंत्री आणि आमदार रामदास कदम यांनी खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याविरोधात जोरदार आवाज उठविला होता.
त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची बदली करण्याचे आश्वासन सभागृहात दिले होते.
पत्की यांची बदली करू नये म्हणून खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस व नवनिर्माण सेना यानी आवाज उठविला होता.
मात्र आता सुवर्णा पत्की यांची बदली रायगड येथे झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाच आणखी 227 रुग्ण आढळले
ऐकून कोरोना बाधितांचा आकडा 20187 वर
अकोल्यात कोरोनामुळे आतापर्यंत 391 जणांचा मृत्यू
अकोला जिल्ह्यात सध्या 5133 कोरोनाबाधितांवर अपचार
नांदेड जिल्ह्यात 10 दिवसाचा रात्रीचा लॉकडाऊन
12 मार्च ते 21 मार्चदरम्यान दुकाने सकाळी सात ते सांयकाळी सात वाजेपर्यंत उघडी ठेवता येणार
कोचिंग क्लासेस, आठवडी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश,
नांदेडमध्ये लग्न सोहळ्याला पन्नास लोकांची मर्यादा
कोरोनाचा धोका वाढतो आहे, पात्र असल्याने सर्वांनी मनात शंका न ठेवता नागरिकांनी लस टोचून घ्यावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन, लसीकरण वेगाने वाढत आहे, तरी काही दिवसात काही ठिकाणी कडक लॉकडाऊन करावे लागेल, त्यामुळे काळजी घ्या, लॉकडाऊनबाबत येत्या एक दोन दिवसात निर्णय घेऊ
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोविड लसीचा पहिला डोस घेतला.
CM Uddhav Balasaheb Thackeray took his first shot of COVID vaccine today. pic.twitter.com/3JWlmvKpHL
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 11, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना लस घेतली, मुंबईतील जे जे रुग्णालयात त्यांनी सहकुटुंब जाऊन कोरोनाची लस घेतली आहे, त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या मातोश्री यांनी लस घेतली, यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते
नितीन राऊत –
एक वर्षा पूर्वी नागपुरात आज च्या दिवशी कोविड चा पहिला रुग्ण आढळला होता
तेव्हा पासून कोरोना शी झुंज सुरू आहे
नागपुरातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण आढळून येत आहे
शनिवार रविवार बंद ला प्रतिसाद मिळाला नाही
बाधित रुग्ण बाहेर पडत असल्याचे माहिती आहे
मद्य विक्री बंद राहील, लसीकरण सुरू राहील, अत्यावश्यक सेवा सुरू राहील, डोळ्यांचे दवाखाने आणि चष्म्याच दुकान सुरू राहील
खाद्य पदार्थाची घर पोहच सेवा सुरू राहील, बँक पोस्ट , अंडे , मास विक्री सुरु राहील, आमदार निवासात क्वॉरंटाईन सेंटर सुरू होणार आहे, डॉक्टरांसाठी वनामती मध्ये व्यवस्था करण्यात आली, 21 मार्च च्या आधी एक बैठक घेऊन पुढील परिस्थिती बघून विचार केला जाईल, बेड , ऑक्सिजन ची व्यवस्था पूर्ण आहे, लसीकरण साठी येणाऱ्या लोकांसाठी येण्याजण्याची व्यवस्था लोक प्रतिनिधी कडून करू – नितीन राऊत
नागपुरात येत्या 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन, पालकमंत्री नितीन राऊतांच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत निर्णय, येत्या 15 मार्चपासून 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा, विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोरोनाची लस घेणार आहे. जे.जे. रुग्णालयात उद्धव ठाकरे कोरोनाची लस घेणार आहेत.
सातारा : मळणी मशीनच्या ट्रॅक्टरचे चाक छातीवरुन गेल्याने शेतकरयाचा मृत्यू, बबन शंकर शिंदे असे शेतकऱ्याचे नाव, जावली तालुक्यातील इंदवली येथील घटना
मला मुंबई पोलिस, महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान आहे. ही केस कोणी दाबली याची चौकशी व्हावी. केस कोणी दाबली काय झालं, माझे सर्व आरोप मागच्या सरकारवर आहे, त्याचवेळी मी मागच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला अजिबात दाद दिली नाही. जर गरज पडली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही भेटू : अन्वय कुटुंबियांचे कुटुंब
आम्ही आमचे बँक बॅलेन्सचे डिटेल देते. त्यांनीही त्यांच्या साताबारा बँक बॅलेन्सचे डिटेल्स द्यावेत, अन्वय नाईक कुटुंबियांची मागणी. किरीट सोमय्यांचा जीव वर खाली का होतो आहे, मला अजूनही उत्तर मिळालेले नाही. येत्या ५ मे रोजी आमच्या केसला तीन वर्ष पूर्ण होतील. आमची केस दाबली आहे, हे संपूर्ण जगाला माहिती आहे : अन्वय नाईक कुटुंबीय
गेल्या सरकारमध्ये आम्हाला दाद मिळाली नाही. सुसाईड नोट मिळाली आहे, त्यात तिघांची नावं आहेत. त्यावेळी IO ला विचारवं, गुन्हेगारांना बोलवलं आणि CP ऑफिसला चौकशी करता. हा भेदभाव का केला जातो? अन्वय नाईक कुटुंबियांची पत्रकार परिषद
आम्हाला न्याय कधी मिळणार, आमचाही सीडीआर का काढला नाही? मागच्या सरकारने प्रकरणं दाबलं, अन्वय नाईक प्रकरणाचा तपास का केला नाही. आम्हाला मारण्याची धमकी आली, अन्वय नाईक कुटुंबियांची पत्रकार परिषद
– पुणेकरांवर लॉकडाऊनची टांगती तलवार,
– पुण्यातील आयसर आणि टाटा इन्स्टिट्यूटनं विभागीय आयुक्त कार्यालयाला बूधवारी दिला सुधारित अहवाल,
– निर्बंध कठोर करण्याची गरज असल्याचं नोंदवलं निरीक्षण,
– उद्या पालकमंत्री अजित पवार प्रशासनासोबत घेणार बैठक,
– उद्याच्या बैठकीत निर्बंध लागण्याची शक्यता,
– अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दूकाने, चित्रपटगृहे बंद करावे,
– सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करावी,
– शक्य असलेल्या क्षेत्रात वर्क फ्रॉम होम सुरू करावं,
– सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय सभा संमेलनाला स्थगिती द्यावी,
– आयसर आणि टाटा इन्स्टिट्यूटनं असा अहवाल दिला विभागीय आयुक्तांना
एकीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्ण पुन्हा मोठ्या संख्येने वाढत असले तरी दुसरीकडे नागरिकांमध्ये अद्यापही मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळण्याबाबत निरुत्साह दिसून येत आहे.
काल कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना संख्येने उचचांक गाठल्यानंतर केडीएमसी प्रशासनाने कडक निर्बंध जारी केले. त्यानंतरही लोकांमध्ये मात्र नियम पाळण्यबाबत प्रचंड निरुत्साह दिसून येत आहे. सामान्य नागरिकांबरोबरच कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचारीही मास्क लावत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील कोरोना आटोक्यात येणार कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बारामती : बारामतीत रक्ताचा तुटवडा, बारामतीतील रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठ्यात घट, रक्तदानासाठी नागरीकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन, शिबिरे होत नसल्यानं जाणवतोय रक्ताचा तुटवडा, रक्तदानासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज
रत्नागिरी – दापोली तालुक्यातील जालगाव ब्राह्मणवाडी येथे अमोल जाधव यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत, वनविभागातर्फे बिबट्याला बाहेर काढण्यात येणार, वन विभाग व दापोली पोलीस घटनास्थळी दाखल
फडणवीस सामना वाचतात हे समजलं. ही चांगली गोष्ट आहे. सामना वाचत राहा, सामना वाचणे ही सुंदर सवय आहे. संपूर्ण जग सामनाची दखल घेतं. देवेंद्र फडणवीसांनी सामना वाचण्याची सवय लागली, याबद्दल त्यांचे कौतुक करतो : संजय राऊत
साताऱ्यातील महागाव येथील मातोश्री वृद्धाश्रमात आतापर्यंत 23 जणांना कोरोनाची लागण,
वृद्धाश्रमातील 55 ते 75 वयाच्या वृद्धांचा बाधितांमध्ये समावेश
प्रशासनाकडुन वृध्दाश्रमात सॅनिटायजेशन
मागील दोन दिवसापुर्वी झाली होती कोरोनाची लागण
पिंपरी चिंचवड : वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे फेसबुक अकाउंट हॅक
-वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांचा फोटो वापरून हुबेहूब तसेच अकाउंट तयार केले
-हॅकरने केली फ्रेंडलिस्ट मधील मित्राकडे पैशाची अवास्तव मागणी
-फ्रेंडलिस्ट मधील अनेकांना ह्या हॅकर ने 21 हजार,10 हजार,15 हजार रुपयांची मागणी केली त्यानंतर या मित्रांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांना फोन करून ह्याबाबत विचारणा केली असता घटना आली उघडकीस
-यापूर्वी पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील अनेक अधिकाऱ्यांची खाती ही हॅक झालेच समोर
रत्नागिरी- शिमग्याला कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची तपासणी होणार
जिल्ह्याच्या सिमेवर तपासणी नाके उभारण्यात येणार
तपसाणीकरूनच चाकरमान्यांना मिळणार जिल्हात प्रवेश
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची माहिती
येत्या दोन दिवसात प्रशासनाचे आदेश काढले जाणार
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गणेशोत्सवाप्रमाणे होळीला देखील नियमावली
होळी सणाला लाखो चाकरमानी येतात कोकणात
अहमदनगर –
द्राक्षाने भरलेला टेम्पो घुसला बस स्थानकात
या अपघातात एक तरुण जागीच ठार
पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील घटना
श्रीगोंदा येथून द्राक्षे घेऊन जाणार टेम्पो रात्री अचानक बस स्थानकात घुसला
टेम्प चालक पोलिसांच्या ताब्यात
नागपूर –
खासगी रुग्णालयांचा कोव्हिड ट्रिटमेंट प्रोटोकॉल तपासा
नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे निर्देश
टास्क फोर्स कमिटीची झाली बैठक
कोव्हिड संदर्भात शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत आहेत.
या रुग्णांच्या पाच दिवसाचा कोव्हिड ट्रिटमेंट प्रोटोकॉलतपासून त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करा,
असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.
सोलापूर- सरपंच निवडीनंतर पहिल्याच मासिक सर्वसाधारण सभेला निघालेल्या सरपंचाला मारहाण
सर्वसाधारण सभा न घेण्यासाठी मारहाण
मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे ग्रामपंचायत कार्यालयातील घटना
वाल्मीकि जालिंदर निळे असेच मारहाण झालेल्या सरपंचाचे नाव
मोहोळ पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूर –
कोल्हापुरात हस्तिदंत विकणारी टोळी जेरबंद
कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर वनविभागाच्या फिरत्या पथकाची कारवाई
तीन हस्तिदंत,मोबाइल तसेच इतर साहित्य जप्त
याप्रकरणी तिघा संशयितांना घेतलं ताब्यात
अंबरनाथ एमआयडीसीत बिस्कीट कंपनीला भीषण आग
आर के 1 नावाच्या बिस्कीट कंपनीला लागली आग
सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान आग लागल्याची माहिती
आगीने घातला संपूर्ण कंपनीला वेढा, ब्रिगेड कॉल असल्याची फायर ब्रिगेडची माहिती
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंबरनाथ पालिकेच्या २ आणि एमआयडीसीच्या २ अशा चार फायरब्रिगेड घटनास्थळी
नागपूर –
– नागपूर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाची भयावह स्थितीकडे वाटचाल
– जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १७१० नव्या कोरोना रुग्णांची भर
– २४ तासांत ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू
– गेल्यावर्षीच्या सप्टेंबर सारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता
– जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या पोहोचली १२१६६ वर
नाशिक –
जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख कायम
गेल्या 24 तासात धक्कादायक वाढ
1330 नवे रुग्ण
अवघ्या 5 दिवसात 4 हजार 130 नवे बाधीत
जिल्ह्यात आज 6 मृत्यू
बळींची संख्या झाली 2155
कोरोना प्रादुर्भावात होतेय दररोज धक्कादायक वाढ
आम्ही वीज कट करणार नाही. त्याला स्थगिती दिली असं सांगितलं. अधिवेशन काढून घेतलं. आणि शेवटच्या दिवशी अतिशय थातूरमातूर निवदेन करुन पुन्हा एकदा वीज जोडणी कापण सुरु केलं आहे. आम्ही याचा विरोध करणार, आंदोलन करणार हे सरकार शेतकरी विरोधी गरीब विरोधी आहे हे स्पष्ट झालं आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
त्यांना टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. सामनात अग्रलेख आला. त्यामुळे घाव वर्मी बसला आहे, असेही फडणवीसांनी सांगितले.
काहीच मिळालं नाही, विदर्भ आणि मराठवाड्याची घोर निराशा, कोरोना वाढतो कोणतीही व्यवस्था होत नाही. हा कोरोना अधिवेशनाच्या आधी वाढतो. अधिवेशन सुरु असतो त्यावेळी तो कमी असतो. अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा वाढतो. सरकारला अधिवेशन टाळण्याकरिता अधिवेशन दिसतं. ज्या प्रभावी उपाययोजना करायला हव्या.
औरंगाबाद :
औरंगाबादेत सलग दुसऱ्या दिवशीही रेकॉर्ड ब्रेक रुग्ण वाढ
एका दिवसात कोरोनाचे तब्बल 532 रुग्ण वाढले
रुग्णांचा आकडा पोचला 54439 वर
आजपर्यंत 49613 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
तर आजपर्यंत 1311 रुग्णांची झाली वाढ
सध्या रुग्णालयात 3515 रुग्णांवर उपचार सुरू
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाशिवरात्रीवर बाबूलनाथ मंदिर भाविकांसाठी बंद, मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रबंधक यांनी घेतलेला आहे, मंदिर 10 मार्च सकाळी 7.30 ते 12 मार्च सकाळी 7.30 वाजेपर्यंत भाविकांसाठी बंद राहणार आहे, महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्री बाबूलनाथ मंदिर प्रबंधकने भाविकांना दर्शनासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे
हिंगोली – औंढा-नागनाथ येथील नागनाथाचं मंदीर बंद, महाशिवरात्री निमित्त आमदार आणि संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते रात्री बारा वाजता पूजा संपन्न, कोरोनामुळे आज दिवसभर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर बंद
पुणे – श्री क्षेत्र भीमाशंकर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांविना महाशिवरात्री उत्सव साजरा, पुणे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते महाशिवरात्री निमित्त शिवलिंगावर महाभिषेक करत शासकीय महापुजा संपन्न