LIVE | मोठी बातमी ! पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांच्या जावयावर कारवाई, कमर्शियल मालमत्ता जप्त
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
मुंबई : सचिन वाझे प्रकरणी ठाकरे सरकारमध्ये घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरला पार पडत आहे त्याच वेळेस मुंबईचे कायदे व्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत. दोघांच्या आधी पोलीस उपायुक्त मिलिंद भारंबेनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. भारंबे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी अनिल परब यांनाही भेटले. म्हणजे एकीकडे राजकीय भेटीगाठी होत असतानाच दुसऱ्या बाजुला मुंबई पोलीस दलातले अधिकारीही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचत आहेत. एनआयएने ज्याप्रमाणे सचिन वाझे प्रकरणी ठाकरे सरकारची कोंडी झालीय ती पहाता, ह्या घडामोडींना महत्व आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांच्या जावयावर कारवाई, कमर्शियल मालमत्ता जप्त
सुशीलकुमार शिंदे यांचे जावई राज श्रॉफ यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. श्रॉफ यांची कमर्शियल मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पीएमएलए कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रीतीचे राज हे पती आहेत
-
शरद पवार किंवा प्रमुख नेते का बोलत नाहीत? राष्ट्रवादी-शिवसेनेकडून फक्त वातावरण तयार करण्याचा प्रयत्न : फडणवीस
“वाझे प्रकरण अजून संपलेलं नाही, जोपर्यंत मन्सुख हिरेण यांचा मृत्यू कसा झाला, त्यांचा खून कुणी केला याबाबत खुलासा होत नाही तोपर्यंत आम्ही हे प्रकरण लाऊन धरु, कुस्तीत एखादा पहिलवान चित होतो, पण चित झाल्यानंतरही पहिलवान माझं बोट तर वर होतं पण मी चित झालो नाही, असं तो पहिलवान म्हणतो. निव्वळ मुजोरी चाललेली आहे. जनतेला सगळं समजतं. जनता पाहतेय. हा मुंबई पोलिसांना विरोध नाही. पण मुंबई पोलिसात काही लोकं अशा प्रकारे वागत असतील तर त्यांना फुलं द्यायची का? त्यांची पाठराखण करत असतील तर तेच खऱ्या अर्थाने मुंबई पोलिसांची बदनामी करत आहेत”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.
‘राष्ट्रवादी आणि शिवसेना फक्त वातावरण तयार करण्याचं काम करतात’
“मला समजतच नाही, अशा काही घटना घडल्यानंतर शरद पवार किंवा प्रमुख नेते काहीच बोलत नाहीत. केवळ माध्यमचं बातम्या चालवतात. हे बातम्या सोडण्याचं काम आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना फक्त बातम्या सोडण्याचं काम करतात. त्यातून ते वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत डॅमज कंट्रोल होऊ शकत नाही”, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली.
-
-
अधिकारी मोठा असला तरी कारवाई करा, राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांचं मत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत गृहमंत्री अनिल देसणुख यांनी मनसुख हिरेन मृत्यू आणि सचिन वाझे प्रकरणाची संपूर्ण माहिती दिल्याची सूत्रांची माहिती, या प्रकरणात कुठलाही अधिकाऱ्याचा थेट संबंध येत असल्यास संबंधित अधिकाऱ्याची आधीच बदली करावी, असे मत शरद पवारांनी मांडलं, त्यामुळे पुढील काळात मुंबई पोलिस विभागात काही अधिकारी बदल्या तात्काळ होण्याची शक्यता, गृहमंत्र्यांचा राजीनामा जरी विरोधकांनी मागितला असला तरी तुर्तास याबाबत निर्णय घेण्यास राष्ट्रवादी अनुकूल नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
-
राज्यात दिवसभरात 15 हजार 51 नव्या रुग्णांची नोंद
राज्यात कोरोनाचा पुन्हा स्फोट, दिवसभरात तब्बल 15 हजार 51 नव्या रुग्णांची नोंद, तर 48 रुग्णांचा मृत्यू
-
सचिन वाझे यांच्याकडून तपासात सहकार्य नाही, NIA ची मुंबई सत्र न्यायालयाला माहिती
‘सचिन वाझे यांच्याकडून तपासात सहकार्य नाही, वाझे चौकशीत फोन घेऊन आले नाहीत, कुटुंबियांचा नंबरही ते देत नव्हते’, अशी माहिती NIA ने मुंबई सत्र न्यायालयाने दिली.
-
-
देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणेला सीडीआर द्यावा : जयंत पाटील
“एफआयआर दाखल झाल्यानंतर इंटरनेटवर ती माहिती मिळते. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सीडीआर असेल तर त्यांनी तपास यंत्रणेला तो सीडीआर द्यावा. NIA वाहन कुणी ठेवले त्याचा तपास करत आहे”, असं जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“कुणी दोषी आढळलं तर त्याला योग्य ती शिक्षा मिळेल, अशी आमच्या सरकारची स्पष्ट भूमिका आहे. कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला जात नाही. शिवसेनेकडूनही तसा प्रयत्न केला जात नाही. गृहमंत्र्यांनी त्यांच्याकडची माहिती सभागृहात दिली होती. त्यांची तेव्हाची त्यावेळेची योग्य भूमिका होती. अधिकारी त्यात सामील असेल तर तपास यंत्रणा कारवाई करतील. तपास यंत्रणेचा निष्कर्ष झाल्यावर निर्णय घेण्यात येईल”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
मन्सुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास ATS करत आहे. त्यामुळे योग्यवेळी त्या त्या गोष्टी समोर येतील, असंदेखील जयंत पाटील यावेळी म्हणाले.
-
नितेश राणे यांनी आरोप सिद्ध करावे, वरुण सरदेसाई यांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर
“आमदार नितेश राणे यांनी अतिशय घाणेरडे आरोप केले. ते सगळे आरोप तथ्यहीन असून आज त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. नितेश राणे यांनी आरोप सिद्ध करावे. नाहीतर कायदेशीर कारवाईला समोर जावं”, अशा शब्दात युवासेना नेते वरुण सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिले.
वरुण सरदेसाई नेमकं काय म्हणाले?
आपण सगळे मला युवासेनेचा सचिव म्हणून ओळखतात. त्याच्या आधीची मी माझी पार्श्वभूमी सांगतो. दहावीत मला 91 टक्के मिळाले. त्यानंतर बारावीत मला डिस्टिन्क्शन मिळालं. त्यानंतर मुंबई विद्यापीठात मी सिव्हिल इंजिनिअरची पदवी मिळवली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलं अशा जगातील प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठात मी मास्टर्स इन सिव्हिल इंजिनिअरची पदवी मिळवली. ही पदवी अगदी एका वर्षात मिळवली. मी ते करुन परत आलो. माझ्या वडिलांचा व्यवसाय आहे. युवा सेनेत काम करत असताना मी युवा सेनेत काम करतो. माझे वडील मॅकेनिल इंजिनिअर आहेत. त्याचबरोबर माजे आजोबाही इंजिनिअर आहे. मी सुसंस्कृत कुटुंबात आहे. मला राजकारणाची आवड आहे. पण आज जे आरोप केले तसे कामं माझ्याकडून घडणारही नाहीत. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्या राणे कुटुंबाची पार्श्वभूमी सर्वश्रूत आहे. त्यांची सुरुवातीची गँग पासून खून, किडनॅपिंग सारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत
राणे कुटुंबियांच्या आरोपांना फारसं महत्त्व देत नाही. पण नितेश राणे यांचे आजचे आरोप मनाला वेदना देणारे. या आरोपांमुळे माझं राजकीय करियरला पुढे धोका निर्माण होऊ शकतं. त्यामुळे अखेर कायदेशीर पाऊल उचलणार आहे. त्यांनी कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. त्यांना सात दिवसांची माफी मागण्याची मुदत दिली जाईल. त्यानंतर कारवाई होईल.
-
तीन तासांच्या तपासणीनंतर सचिन वाझे जे जे रुग्णालयातून बाहेर
सचिन वाझे गेल्या तीन तासांपासून जे जे रुग्णालयात होते, त्यांची वैद्यकीय तपासणी सुरु होती, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात आणलं गेलं होतं, तपासणीत त्यांना मधुमेहाचा त्रास होत असल्याचं समोर आलं, आता आरोग्य तपासणीनंतर त्यांना NIA कार्यालयात नेलं जात आहे
-
सचिन वाझे प्रकरणावरुन राजकीय हालचालींना वेग, राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी बैठक सुरु
सचिन वाझे प्रकरणावरुन राजकीय हालचालींना वेग, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पहिली बैठक संपल्यानंतर आता दुसऱ्या बैठकीला सुरुवात, या बैठकीला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार, जयंत पाटील, शरद पवार, अनिल देशमुख उपस्थित, या बैठकीत सचिन वाझे प्रकरण तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरु असल्याची शक्यता
-
सचिन वाझे यांच्या साकेत सोसायटीतील घरात NIA चे अधिकारी दाखल
सचिन वाझे यांच्या साकेत सोसायटीतील घरात NIA चे काही अधिकारी दाखल, वाझे यांच्या घरात अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू, काही अधिकारी घराच्या आतमध्ये तर काही अधिकारी बाहेर उभे
-
राष्ट्रवादीची बैठक संपली, शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली जवळपास दीड तास बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसची यशवंतराव चव्हाण सेंटर येथील बैठक संपली, जवळपास दीड तास ही बैठक झाली, बैठकीत सचिन वाझे प्रकरणासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली
-
खोट्या नंबर प्लेट बनवणारा NIA टीमला सापडला
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती. या गाडीची नंबर प्लेट बनावट होती. याप्रकरणाचा तपास सध्या NIA कडून सुरु आहे. दरम्यान, NIA च्या टीमने खोट्या नंबर प्लेट बनवणाऱ्याला शोधून काढलं आहे. याच संदर्भात रियाज काझी यांच्यासह काही अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे.
-
सचिन वाझे प्रकरणाचा सरकारला कोणताही धोका नाही, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचं विधान
“उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाबेर जी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती त्याचा तपास आम्ही एटीएसकडे दिला होता. असं असताना अचानकपणे केंद्रीय यंत्रणेकडे हा तपास देण्यात आला आहे. त्यांना जे योग्य वाटतंय, त्यांना जो काही तपास करायचा आहे तो तपास ते करतील”, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली आहे.
“सरकार बिलकूल धोक्यात असण्याचं कारण नाही. विधीमंडळात याबाबत जेव्हा चर्चा झाली तेव्हा अतिशय समर्पक उत्तर गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे. या प्रकरणावरुन सरकारवर कोणताही धोका होण्याची शक्यता नाही”, असं ते म्हणाले.
“एखाद्या प्रकरणात एखाद्या अधिकाऱ्याचं नाव असेल आणि त्या प्रकरणाला तपासाला वेळ लागत असेल तर त्या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत रुजू करण्याचं कायद्यात नमूद आहे. नियमबाह्य कोणताही निर्णय घेतलेला नाही”, अशी भूमिका देसाई यांनी मांडली.
-
शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरला दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरला दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी सध्याच्या घडामोडींवर चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान, शरद पवार यांनी आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली होती.
-
विश्वास नांगरे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. मुंबईचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले आहेत. याआधी पोलीस उपायुक्त मिलिंद भारंबे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, त्यानंतर विश्वास नांगरे पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे.
-
राज्याचा तपास सुरु असताना NIA ची आवश्यकता काय? अशोक चव्हाण यांचा सवाल
“राज्याच्या तपास यंत्रणेकडून तपास सुरु होता. राज्याकडे सक्षम यंत्रणा आहे. असं असताना NIA ची का गरज पडावी? राज्याची यंत्रणा चांगली आहे. त्यामुळे राज्याकडून हे काम झालं असतं. पण केंद्र सरकारने हे काम NIA कडे सोपवलं आहे. त्यामुळे राज्याच्या कामात केंद्र सरकार हस्तक्षेप करतंय”, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.
-
गुन्हे शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारंबे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपली
गुन्हे शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारंबे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपली, जवळपास 45 मिनिटे बैठक झाली, सचिन वाझे प्रकरणावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती, या बैठकीवेळी एकनाथ शिंदे आणि अनिल परब हे देखील ‘वर्षा’वर उपस्थित होते.
संबंधित व्हिडीओ :
-
खांदेपालट होण्याची शक्यता नाही : जयंत पाटील
राज्यातील गृहमंत्रीपदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यावर सोपवली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, खांदेपालट होण्याची शक्यता नाही, असं स्पष्टीकरण जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. “गृहमंत्री अनिल देशमुखचं राहणार. व्यवस्थित काम सुरु आहे. कोणतेही बदल करण्याची आवश्यकता नाही”, असं जयंत पाटील म्हणाले.
चूक केली असेल तर शिक्षा होईलच
वझे यांना एनआयएने ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर जी शिक्षा व्हायची ती होईल. आधी या प्रकरणाचा एटीएस तपास करत होती. आता एनआयए करत आहे. एटीएसने तपास केला असता तरी जे सत्य बाहेर यायचं ते आलंच असतं, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. कोणी कशात गुंतलेले असतील. काही चूक केली असेल तर त्यांना त्यांचं प्रायश्चित मिळालंच पाहिजे ही सरकारची भूमिका आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
-
औरंगाबादेत 17 तारखेपासून शहरातील हॉटेल व्यवसाय राहणार बंद
औरंगाबाद : कोरोना रोखण्यासाठी औरंगाबादेत जिल्हाअधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, औरंगाबाद शहरातील हॉटेल पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय, हॉटेलमधील पार्सल सुविधा राहणार सुरू, 17 तारखेपासून औरंगाबाद शहरातील हॉटेल व्यवसाय करणार बंद, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा मोठा निर्णय
-
एटीएस टीमकडून मनसुख हिरेन यांच्या कुटुबियांची चौकशी
मनसुख हिरेन यांचे भाऊ विनोद हिरेन आणि मुलगा मीत हिरेन दोघांना घेऊन एटीएस टीम ठाणे एटीएस कार्यलयात पोहोचली, एटीएसचे अधिकारी मनसुख मृत्यू प्रकरणात महत्त्वाची चौकशी करणार, एटीएसची टीम कार्यालयात उपस्थित
-
‘मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास NIA कडे द्या’, नवनीत राणा यांचं अमित शाह यांना पत्र
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात सापडलेल्या स्पोटक गाडीचा आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास NIA कडे द्यावा, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. खासदार नवनीत राणा यांचं पत्र मिळाल्याच ग्राम मंत्री अमिषा यांनी नवनीत राणा यांना कळवलंय.
-
‘वर्षा’वर बैठकांचे सत्र, अनिल परब वर्षावर दाखल
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावर बैठकांचे सत्र, अनिल परब आता तातडीने वर्षावर दाखल झाले, मंत्री एकनाथ शिंदे आणि सह आयुक्त गुन्हे मिलिंद भारंबे वर्षावर दाखल, त्यापूर्वी मिलींद भारंब आणि एकनाथ शिंदेंची भेट घेतली.
-
गृहमंत्री अनिल देशमुखांना हटवलं जाण्याची शक्यता
राष्ट्रवादी नेत्यांची महत्त्वाची बैठक, गृहमंत्री अनिल देशमुखांना हटवलं जाण्याची शक्यता, गृहमंत्रीपद मोठ्या नेत्याकडे जाण्याची शक्यता, गृहमंत्रीपदासाठी दोन मोठ्या नेत्यांची चर्चा, अजित पवार, जयंत पाटील यांचे नाव चर्चेत,
-
सचिन वाझेंचा गॉडफादर कोण? : नितेश राणे
वाझे हे WHO चे सदस्य आहेत का? याचं उत्तर द्यावं. NIA ने याची चौकशी करावी. त्यांना ज्या दिवशी अटक केली गेली, त्यापूर्वी ते कोणत्या शिवसेना नेत्याला भेटले, सचिन वाझेंचा गॉडफादर कोण? : नितेश राणे
-
उद्धव ठाकरे वाझेंची वकिली का करत होते? : नितेश राणे
एक साधा API अशापद्धतीची भूमिका घेतो. तो कोणाचा नातेवाईक आहे, ही देखील चौकशी झाली पाहिजे. वाझेचा गॉडफादर कोण? वरुण सरदेसाईंना कोणी सांगितले. हा सर्व तपास झाला पाहिजे. उद्धव ठाकरे वाझेंची वकिली का करत होते याचे उत्तर मिळायला हवं : नितेश राणे
-
वाझेंनी IPL खेळाडूंकडे खंडणी मागितली : नितेश राणे
मुंबई पोलिसांनी आयपीएलच्या रॅकेटचा पदार्फाश केला, असे आम्ही दाखवू. 150 कोटींची रक्कम मागितली गेली. सचिन वाझेंनी ही रक्कम मागितली आहे. वरुण सरदेसाईंचे आणि वाझेंचे संभाषण महत्त्वाचं, वाझेंनी IPL खेळाडूंकडे खंडणी मागितली : नितेश राणे
-
शिवसेना सचिन वाझेंची वकिली का करते : निलेश राणे
सचिन वाझेकडे असे काय आहे, की सरकार त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, शिवसेना सचिन वाझेंची वकिली का करते : निलेश राणे
-
नागपुरात 15 दिवसांपासून रेशन दुकानातील धान्य पुरवठा बंद
गेल्या 15 दिवसांपासून रेशन दुकानातील धान्य पुरवठा बंद
– पॅाश मशीन बंद असल्याने धान्य वाटप बंद
– नागपुरातील गरीबांच्या चुलीचं लॅाकडाऊन
– रेशनवरील धान्य मिळत नसल्याने गरीबांच्या अडचणी वाढल्या
– आधीच लॅाकडाऊनमुळे काम बंद, त्यात रेशनवर धान्यंही मिळेना
– नागपूर जिल्ह्यात हजारो गरीब लाभार्थ्यांना फटका
-
रत्नागिरीच्या केमिकल कंपनीत रिऍक्टरचा स्फोट, कामगार आत अडकल्याची शक्यात
रत्नागिरी : लोटे एमआयडीसी येथे सुप्रिया केमिकल कंपनीत रिऍक्टरचा स्फोट
स्फोटामुळे कंपनीतील कामगार जखमी काही कामगार आत अडकले
अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल
-
खासदार संभाजीराजे केंद्रीयमंत्री थावरचंद गहलोत यांच्या भेटीला
मराठा समाजाचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या भेटीला. खासदार संभाजी राजे आणि राजेंद्र कोंढरे केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीला 102 वी घटनादुरुस्ती संदर्भात होणार चर्चा केंद्र सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
-
मंगल कार्यालयातील निर्बंधानंतर आता केटरींग व्यावसायिकांवरही पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्बंध
पुणे –
– मंगल कार्यालयातील निर्बंधानंतर आता केटरींग व्यावसायिकांवरही जिल्हाधिकाऱ्यांचे निर्बंध !
– 50 पेक्षा जास्त ताटं दिसल्यास होणार कारवाई, नियमांच पालन न केल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश,
– 50 ताटांच्यावरती ऑर्डर न स्वीकारण्याच्या सूचना,
– पोलीस स्टेशनची परवानगी आवश्यक , पोलीस स्टेशननं परवानगी दिली नाही तर मग मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करता येणार अपील,
– जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रशासनाकडून कडक निर्बंध
-
मराठा आरक्षण सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु
मराठा आरक्षण सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु
सुनावणी दरम्यान युक्तीवाद 50 टक्के संदर्भात करा-सुप्रीम कोर्टाने सांगितले.
मराठा आरक्षण साठी 11सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी देण्याची आवश्यकता आहे – अरविंद दातार
आरक्षणावर भूमिका मांडण्यासाठी
प्रत्येक राज्याला अतिरिक्त एक आठवड्याचा अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे
103 ही जी घटना दुरुस्ती आहे ज्यामध्ये उच्च मागासवर्ग ला 10 टकके आरक्षण देण्यात आले त्यावर चर्चा करू नये.
पाच राज्यानी सुप्रीम कोर्टोकडे वेळ मागितली आहे.
केरळ ने देखील हाच मुद्दा उपस्थित केला
त्यामूळे सुप्रीम कोर्टाने एक आठवड्यांची मुदत सर्वाना दिली आहे
-
नागपुरात विना कामाने बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांची जोरदार कारवाई
नागपूर –
नागपुरात विना कामाने बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांची जोरदार कारवाई सुरू
चौका चौकात केली जात आहे कारवाई
दुचाकी वर दोन जण प्रवास करत असल्यास 500 रुपये दंड आणि केली जात आहे गाडी जप्त
नागपुरात आज पासून कडक लॉक डाऊन ला झाली सुरवात
लॉक डाऊन च्या पार्श्वभूमी वर केली जात आहे कारवाई
नागरिक मात्र हैराण
-
वाझे प्रकरणावर भाजपची पत्रकार परिषद
वाझे प्रकरणावर भाजपची पत्रकार परिषद, सचिन वाझेंवर शेवसेना नेत्यांचं इतकं प्रेम का, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल
-
सचिन वाझेंना पोस्टिंग देण्यासाठी घाई केली – भाजपची पत्रकार परिषद
सचिन वाझेंना पोस्टिंग देण्यासाठी घाई केली, 16 वर्ष निलंबित असलेल्या अधिकाऱ्याला पुन्हा कसं घेतलं, नियम तोडून वाझेंना पोस्टिंग दिली, भाजप नेत्यांचा राज्य सरकारवर आरोप
-
पुणे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत सव्वा तीन लाख जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस
पुणे :
पुणे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत सव्वा तीन लाख जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस
यात ३८ टक्के लसीकरण ज्येष्ठ नागरिकांचे असून, त्यातही पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक
पुणे शहरात ८३, पिंपरी चिंचवडमध्ये २१ आणि ग्रामीण भागात ३१ लसीकरण केंद्र
त्यातून आतापर्यंत तीन लाख २६ हजार ४८ जणांनी लस घेतली
-
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील वादामुळे स्वारगेट आगाराच्या बस महाराष्ट्र सीमाभागापर्यंतचं धावल्या
पुणे –
– कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील वादामुळे स्वारगेट आगाराच्या बस धावल्या महाराष्ट्र सीमाभागापर्यंतचं,
– कर्नाटक सीमाभागात गाड्या घेऊन न जाण्याच्या कर्मचाऱ्यांना सूचना,
– कोल्हापूर आगारात बससेची तोडफोड झाल्यानंतर घेतला निर्णय,
– रविवारीही बसेस सीमाभागापर्यंतच धावल्याच्या अधिकाऱ्यांची माहिती,
– रोज स्वारगेटमधून बिदर, कर्नाटका, गुलबर्गा, गाणगापूर, इथे गाड्या धावतात,
– गाड्यांच नुकसान नको निर्माण झालेल्या तणावामुळे प्रशासनानं घेतला निर्णय
-
ताकारी जल सिंचन योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांनी थकीत पाणीपट्टी 31 मार्चपूर्वी भरा, पाट बंधारे विभागाचा इशारा
सांगली –
ताकारी जल सिचन योजने च्या लाभधारक शेतकऱ्यांनी थकीत पाणीपट्टी 31 मार्च पूर्वी भरा
अन्यथा सातबारावर बोजा चढविणार पाट बंधारे विभागाने शेतकऱ्यांना दिला इशारा
सन 2002 पासून आज परेयन्त शेतकऱ्यां कडे कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकीत
ताकारी योजनेच्या पाण्यानी खानापूर कडेगाव तासगाव या दुष्काळी तालुक्यातील गावांना तारले आहे
-
रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार मच्छिमारांची नोंदणी रद्द
रत्नागिरी- जिल्ह्यातील एक हजार मच्छिमारांची नोंदणी रद्द
सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाची कारवाई
नोंदणीकृत आणि प्रत्यक्ष परवाना घेतलेल्या नौकांमध्ये तफावत आढलल्याने निर्णय
एक हजार नौकांनी परवाना घेतले नसल्याचे निदर्शनास
-
सचिन वाझेंच्या सोसायटीतील सीसीटीव्हीचा डिव्हीआर मुंबईच्या पोलिसांनी नेला
ठाणे :
सचिन वाझेंच्या सोसायटीतील सीसीटीव्हीचा डिव्हीआर मुंबईच्या पोलिसांनी नेला
२ मार्च रोजीच सोसायटीतील डिव्हीआर काढून नेल्याची सिक्युरिटी गार्डची माहिती
ठाण्याच्या साकेत सोसायटीत वास्तव्याला आहेत सचिन वाझे
या सोसायटीत ५१ सीसीटीव्ही कॅमेरे असून त्याचा डिव्हीआर मुंबईहून आलेल्या पोलिसांनी २ मार्च रोजी काढून नेल्याची सिक्युरिटी गार्डची माहिती
हा डिव्हीआर नेमका कोणत्या पोलिसांनी नेला, हे मात्र स्पष्ट नाही
-
नागपूरच्या महाल परिसरात निघाली लग्नाची वरात, शेकडो वऱ्हाडी उपस्थित
नागपूर –
नागपूरच्या महाल परिसरात निघाली लग्नाची वरात
या वरातीमध्ये शेकडो वऱ्हाडी होते उपस्थित
अनेक जण बिना मास्क घातलेले
या लग्नाच्या वरातीत सोशल डिस्टनसिंगचा उडाला फज्जा, लोक नाचण्यात दंग
नागपुरात मिनी लॉकडाऊन काळात निघाली लग्नाची वरात
एकीकडे मागच्या तीन दिवसांपासून नागपूरात 2 हजार च्या वर कोरोना रुग्ण दररोज निघत असून सुद्धा नागपूरात लोकांना कोरोना ची भीती राहिली नाही असं दिसू येत आहे
लग्न समारंभ ला मोठ्या स्वरूपात बंदी असली तरी महाल या परिसरात एक लग्नाची वरात रविवारी निघाली
त्या मध्ये शेकडो वराती सहभागी झाले असून सोशल डिस्टनसिंग चा मोठा फज्जा उडाला आहे
-
सक्तीची वीज बिल वसुली थांबवण्याच्या मागणीसाठी विविध संघटना आल्या एकत्र
सोलापूर –
सक्तीची वीज बिल वसुली थांबवण्याच्या मागणीसाठी विविध संघटना आल्या एकत्र
महावितरणकडून सक्तीने केले जात आहे वीज बिल वसुली
एकत्रित आलेल्या संघटनेच्यावतीने 19 मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार
स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, शेतकरी कामगार माकपचा समावेश
एकत्रित आलेल्या संघटनेमार्फत राज्यस्तरीय राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार
-
नागपूर शहरात आज पासून 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन
नागपूर –
नागपूर शहरात आज पासून 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन
शहरात कडक बंदोबस्त , चौका चौकात पोलीस बंदोबस्त
अडीच हजार पोलीस आहे रस्त्यावर
ठिकठिकाणी केली जाणार नाकाबंदी
जीवनावश्यक सेवा राहणार सुरू
शहराबाहेरून येणाऱ्या ची केली जाणार तपासणी
बिना कामाने बाहेर पडणाऱ्यांवर केली जात आहे कारवाई
-
सोलापुरात महापालिकेच्या स्थायी आणि परिवहन समितीच्या सभापती पदासाठी आज निवडणूक
सोलापूर –
महापालिकेच्या स्थायी आणि परिवहन समितीच्या सभापती पदासाठी आज निवडणूक
एमआयएमच्या नगरसेवकांनी गैरहजर राहण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही पदावर भाजपचा मार्ग मोकळा
स्थायी समितीच्या सभापती पदासाठी भाजपकडून अंबिका पाटील, तर शिवसेनेकडून अमोल शिंदे व मनोज शेजवाल यांनी केला आहे अर्ज दाखल
शिवसेनेच्या दोघांपैकी एकाकडून अर्ज मागे घेण्यात येणार
समितीतील पक्षीय बलाबल पाहता भाजप साठी निवडणूक होणार सोपी
-
सोलापुरात नगरसेविकेला नियमबाह्य लस दिल्याने डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस
सोलापूर-
नगरसेविकेस नियमबाह्य लस दिल्याने डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस
पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी बजावली नोटीस
आजार असलेल्या 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना लस देण्याचा नियम तर साठ वर्षाच्या पुढील नागरिकांना सरसकट लस
मात्र नियम डावलून नगरसेविका श्रीदेवी फुलारी यांना देण्यात आली लस
अहिल्याबाई होळकर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर मुलाणी यांना नोटीस
-
पिंपरी-चिंचवडमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई
पिंपरी-चिंचवड
– कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे बंधनकारक, त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे
-पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिवसभरात 534 जणांवर कारवाई केली
-पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे.
-गेल्या तीन दिवसांपासून शहरात 800 हून अधिक रुग्ण सापडत आहेत.
-त्यामुळे पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
-
कांदा उत्पादकांना अनुदान मिळऊन द्या, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांची शरद पवार यांच्याकडे मागणी
अहमदनगर
कांदा उत्पादकांना अनुदान मिळऊन द्या
जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांची शरद पवार यांच्याकडे मागणी
राज्यात अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे
त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन मिळावे यासाठी अनुदान द्यावी
-
पिंपरी-चिंचवडमध्ये दोन युवक पवना नदीत बुडाले
पिंपरी चिंचवड
-पिंपरी-चिंचवडमध्ये दोन युवक पवना नदीत बुडाले तर दोघे सुखरूप बाहेर पडलेत.
-काळेवाडी भागात ही घटना रविवारच्या सायंकाळी घडली. हे चौघे क्रिकेट खेळायला चिंचवड भागात गेले होते.
-तिथून परतत असताना ते नदी जवळ आले, तेंव्हा मागून कोणीतरी आलंय आणि आपल्याला पकडणार. म्हणून एक जण लवकर पळा असं म्हणाला म्हणून या चौघांनी नदीत उड्या मारल्या, पण दोघे बुडाले.
-रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दल आणि एनडीआरएफ कडून शोधकार्य सुरू होतं.
-
मराठवाड्याला दिलासा, जायकवाडी धरणात 69 टक्के पाणीसाठा
औरंगाबाद –
यावर्षी मराठवाड्याला मिळाला दिलासा
जायकवाडी धरणात 69 टक्के पाणीसाठा
400 गावांचा मिटला पाणीप्रश्न
ऐन उन्हाळ्यात रब्बी पिकांना मिळणार जीवनदान
शेतीसाठी शेतकऱ्यांना मिळणार पाच पाणी पाळ्या
मराठवाड्याला सलग तिसऱ्या वर्षी दिलासा
4000 उद्योग आता पाणी प्रश्नापासून बचावले
औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नगर, नांदेडला मिळणार पाण्याचा लाभ
-
कोल्हापुरात घरगुती वीज ग्राहकांना वीज तोडण्याची धास्ती, एकाच दिवसात 3,265 ग्राहकांनी भरले 1 कोटी 72 लाख रुपये
कोल्हापूर :
घरगुती वीज ग्राहकांना वीज तोडण्याची धास्ती
रविवारी एकाच दिवशी 3265 ग्राहकांनी भरले एक कोटी 72 लाख रुपये
जिल्ह्यात आतापर्यंत दीड हजारावर ग्राहकांची वीज तोडली
ग्रामीण भागातील ग्राहकांमध्ये वीजबिल भरण्या वरून अजूनही संभ्रम
ग्रामस्थांच्या विरोधामुळे अनेक ठिकाणी वीज तोडणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना जाव लागतय माघारी
-
माजी आमदार, भाजपचे जेष्ठ नेते संभाजी पवार यांचे निधन
सांगली –
माजी आमदार, भाजपचे जेष्ठ नेते संभाजी पवार यांचे निधन
वयाच्या 80 व्या वर्षी निधन
बिजलीमल्ल म्हणून संभाजी पवार यांची होती विशेष ओळख
-
इगतपुरीच्या खेडमध्ये बिबट्याची दहशत, घोडे वाडीतील युवकावर बिबट्याचा हल्ला
नाशिक –
इगतपुरीच्या खेडमध्ये बिबट्याची दहशत, घोडे वाडीत राहणाऱ्या पंढरी घोडे या युवकावर बिबट्याचा हल्ला
शेतात पेरणी करत असताना, दबा धरून बसलेल्या बिबट्याने केला हल्ला
युवकाच्या पाठीवर आणि हातावर बिबट्याने घेतला चावा
वनविभागाने 4 पिंजरे लावून देखील बिबटे मात्र मोकाट
डोंगराला आग लागल्यानंतर, वन्यजीव घुसताहेत थेट गावात
-
नागपूरच्या धंतोली परिसरातील एलआयसी कॉलोनी सील
नागपूर –
नागपूरच्या धंतोली परिसरातील एलआयसी कॉलोनी सील
या कॉलोनी मध्ये 18 रुग्ण पॉझिटिव्ह आले
त्यामुळे करण्यात आली सील
या परिसरात आणखी फैलाव होऊ नये म्हणून महापालिकेने संपूर्ण कॉलोनी केली सील
कॉलनी तील प्रत्येक व्यक्ती ची केली जात आहे तपासणी
-
कोल्हापूर घरगुती वीज कनेक्शन तोडणीविरोधात कोल्हापूरकर आक्रमक
कोल्हापूर
घरगुती वीज कनेक्शन तोडणीविरोधात कोल्हापूरकर आक्रमक
वीज बिल भरणार नाही कृती समितीच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात आंदोलन
आंदोलकांनी जाळला नितीन राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा
शहरातील मिरजकर तिकटी चौकात झालं आंदोलन
कृती समिती महावितरणच्या अधिकार्यांना घेराव घालणार
-
मुंबई-नाशिक महामार्गावर कारला ट्रकची मागून धडक, अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू
नाशिक –
मुंबई-नाशिक महामार्गावर कारला ट्रकची मागून धडक
अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू
तर इतर 4 जण गंभीर जखमी
अपघाता नंतर परिसरातील नागरिकांनी केली मदत
कार मध्ये दाबल्या गेलेल्या प्रवाशांना बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात केलं दाखल
प्रवाशांना वेळेत बाहेर काढल्याने 4 जणांचा जीव वाचला
नागरिकांनी केलेल्या मदतीचा व्हडियो सोशल मीडियावर व्हायरल
अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्या नागरिकांवर कौतुकाचा वर्षाव
-
रायगाव फाट्याजवळ वाहनांचा तिहेरी अपघात, आयशर, इनोव्हा, कंन्टेनरचा अपघात
सातारा :
रायगाव फाट्याजवळ वाहनांचा तिहेरी अपघात
आयशर, इनोव्हा, कंन्टेनरचा अपघात
भरधाव वेगात पुण्याच्या दिशेने निघालेल्या कंन्टेनरची इनोव्हा कार आणि आयशरला जोरदार धडक
अपघातात आयशर आणि कंन्टेनर चालक गंभीर जखमी
सातारा पोलीस घटनास्थळी दाखल
-
लासलगाव दोन दुचाकींच्या अपघातात चौघे गंभीर जखमी
लासलगाव –
– दोन दुचाकींच्या अपघातात चौघे गंभीर जखमी
– निफाड तालुक्यातील शिरवाडे फाट्यानाजीकची घटना
– चौघे गँभिर जखमींवर शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
-
येवल्यात दीड हजारावर नागरिकांनी घेतली कोव्हिड लस
लासलगाव –
– येवल्यात दीड हजारावर नागरिकांनी घेतली कोव्हिड लस
– येवला तालुक्यात सात ठिकाणी लसीकरण केंद्र
– येवला ,सावरगाव ,भारम, मुखेड, अंदरसुल आणि पाटोदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरण सुरू
-
नागपूर शहरात आज पासून 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन
नागपूर –
नागपूर शहरात आज पासून 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन
शहरात राहणार कडक बंदोबस्त
अडीच हजार पोलीस असणार रस्त्यावर
ठिकठिकाणी केली जाणार नाकाबंदी
जीवनावश्यक सेवा राहणार सुरू
शहराबाहेरून येणाऱ्या ची केली जाणार तपासणी
-
निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला सहा लाखांचा गंडा
लासलगाव
– निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला सहा लाखांचा गंडा
– 247 क्विंटल द्राक्ष 29 रुपये प्रमाणे केले होते खरेदी
– पंजाबमधील लुधियाना येथील द्राक्ष व्यापारी
– अमितकुमार अर्जुनदेव असे गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव
– याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
-
पुण्यात चांदणी चौक पुलावरुन कोथरुड आणि साताऱ्याच्या दिशेने जाणारा सेवारस्ता वाहतुकीसाठी बंद
पुणे
चांदणी चौक पुलावरुन कोथरुड आणि साताऱ्याच्या दिशेने जाणारा सेवारस्ता वाहतुकीसाठी बंद
उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने आज पासून होणार सेवा रस्ता बंद
पर्यायी मार्ग म्हणून भूगाव, एनडीए आणि कोथरुड रस्त्यावरुन येणारी वाहतूक ही चांदणीचौक पुलावरुन पाषाणकडे जाणा-या रस्त्यावरील व्हीवा हॉटेल येथून डाव्या बाजूस वळून महामार्गावरुन चांदणी चौक वा साताऱ्याच्या दिशेने जाता येणार
-
पुणे जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरु
पुणे
पुणे जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू
१ हजार ४३१ गावांपैकी जवळपास १ हजार १४४ गावात कामे सुरू
रोहयोसाठी २ लाख २३ हजार ३७२ जॉब कार्ड धारकांची नोंद
या पैकी ४२ हजार ५३६ जॉब धारक रोहयोच्या कामावर
इंदापुर, जुन्नर, खेड तालुक्यात रोहयोची सर्वाधिक कामे सुरू
तर हवेली, मुळशी आणि वेल्हे तालुक्यात सर्वाधिक कमी कामे सुरू
आतापर्यंत रोजगार हमी योजने अंतर्गत मजुरांना कामे देण्याचे ४१ टक्के उद्दीष्ट पुर्ण
-
रुपी को-ऑप. बॅंकेच्या विलीनीकरणाबाबत रिझर्व्ह बॅंकेचा अद्याप निर्णय नाही
पुणे
रुपी को-ऑप. बॅंकेच्या विलीनीकरणाबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या प्रस्तावावर रिझर्व्ह बॅंकेचा अद्याप निर्णय नाही
या विलंबामुळे ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांना त्रास होत असून रिझर्व्ह बॅंकेने याबाबत लवकर निर्णय घेण्याची बॅंक कर्मचारी महासंघाची मागणी
या संदर्भात बॅंक कर्मचारी महासंघाने रिझर्व्ह बॅंकेला दिल पत्र
-
नाशकातील वाढता कोरोनाचा संसर्ग बघता शहर आणि जिल्ह्यातील निर्बंध कायम
नाशिक –
वाढता कोरोनाचा संसर्ग बघता शहर आणि जिल्ह्यातील निर्बंध कायम
पुढच्या शनिवार आणि रविवार देखील शहरात पूर्ण लोकडाऊन
काल झालेल्या लोकडाऊन मध्ये व्यापारी आणि नागरिकांचा प्रतिसाद
बाजारांमध्ये मात्र नियमांची सर्रास पायमल्ली
नागरिकांना सहकार्य करण्याचं जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचं आवाहन
-
रेम्डेसिव्हर इंजेक्शनची विक्री छापील किमतीवर न करण्याचे आदेश
पुणे
रेम्डेसिव्हर इंजेक्शनची विक्री छापील किमतीवर न करण्याचे आदेश
खरेदी किमतीवर १० टक्के किंमत आकारून त्याची विक्री करण्याचे आदेश
अन्न व औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी दिले किरकोळ औषध विक्रेत्यांना आदेश
यामुळे हे इंजेक्शन स्वस्त होण्यास मदत होणार
वेगवेगळ्या कंपन्यांनी उत्पादित केलेल्या रेम्डेसिवीर इंजेक्शनची शहरात विविध किमतींना विक्री
या इंजेक्शनची एमआरपी आणि प्रत्यक्ष खरेदी किमतीत मोठी तफावत
यामुळे एमआरपीच्या किमतीला विक्री न करता खरेदीवर दहा टक्के किंमत आकारून या इंजेक्शनची विक्री करण्याचे आदेश
-
पुणे-अहमदाबाद-पुणे मार्गावर विशेष त्रिसाप्ताहिक सुपरफास्ट दुरंतो एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय
पुणे
पुणे-अहमदाबाद-पुणे मार्गावर विशेष त्रिसाप्ताहिक सुपरफास्ट दुरंतो एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय
पुणे-अहमदाबाद मार्गावर आजपासून दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी गाडी धावणार
पुण्याहून रात्री 9.35 वाजता सुटणार दूरंतो
दुसऱ्या दिवशी सकाळी 6.40 वाजता अहमदाबादला पोहोचणार
तर, अहमदाबाद-पुणे मार्गावर 16 मार्चपासून दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी धावणार
अहमदाबादहून ही गाडी रात्री 10.30 वाजता सुटणार असून, पुणे येथे सकाळी 7.10 वाजता पोहोचणार
ही गाडी लोणावळा आणि वसई रस्ता या स्टेशनवर थांबणार आहे
-
नाशिक जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी कोरोनाचे रुग्ण हजार पार, दिवसभरात 1356 नवीन रुग्ण
नाशिक –
जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी कोरोनाचे रुग्ण हजार पार
दिवसभरात 1356 नवीन रुग्ण, तर दोघांचा मृत्यू
सर्वाधिक 942 रुग्ण महापालिका क्षेत्रात, तर ग्रामीण भागात 269 रुग्णांची नोंद
प्रत्येक तालुक्यात कोव्हिडं केअर सेंटर
प्रशासनाकडून 2000 खाटा देखील आरक्षित
-
नाशिक मुद्रांक छेडछाड प्रकरण, विक्रेत्याचा परवाना अखेर कायमस्वरुपी रद्द
नाशिक –
मुद्रांक छेडछाड प्रकरण
बनावट मुद्रांक प्रकरणी प्रशासनाची कठोर भूमिका
विक्रेत्याचा परवाना अखेर कायमस्वरुपी रद्द
मुद्रांक जिल्हाधिकारी दवंगे यांनी केली कारवाई
मुख्य आरोपी चंद्रकांत वाघ याचा परवाना कायमस्वरूपी रद्द
दुय्यम निबंधकाला पोलिसांनी यापूर्वीच घेतले आहे ताब्यात
-
औरंगाबादेत कोरोना रुग्णांची विक्रमी संख्येने वाढ
औरंगाबादेत कोरोना रुग्णांची विक्रमी संख्येने वाढ
1023 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर
आजपर्यंत एकूण 1339 जणांचा मृत्यू
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 57701 वर
आजपर्यंत 51381 रुग्ण कोरोनामुक्त
एकूण 4981 रुग्णांवर उपचार सुरू
1023 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर
आजपर्यंत एकूण 1339 जणांचा मृत्यू
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 57701 वर
आजपर्यंत 51381 रुग्ण कोरोनामुक्त
एकूण 4981 रुग्णांवर उपचार सुरू
-
पिंपरी चिंचवड मध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना दुचाकी चालकांना पोलिसांनी दिला लाठीचा प्रसाद
पिंपरी-चिंचवड
-पिंपरी चिंचवड मध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना दुचाकी चालकांना पोलिसांनी दिला लाठीचा प्रसाद
-अनेक नागरिक संचारबंदीचे उल्लंघन करून बाहेर फिरत असल्याचं निदर्शनास
-शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना नागरिक बेजबाबदारपणे वागताना दिसत आहे
Published On - Mar 15,2021 11:02 PM