महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्ष निवासस्थानी मुख्य सचिव सीताराम कुंटे, उपमुख्यमंत्री अजित पवार , ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी फोन टॅपिंग , पोलिसातल्या बढती संदर्भातील रॅकेट, परमबीर सिंग आरोप पत्र आणि परमबीर यांनी दाखल केलेल्या याचिके संदर्भात चर्चा झालीय. त्याचबरोबर गृहविभागाच्या रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केलाय. रश्मी शुक्ला यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करण्या संदर्भात निर्णय घेण्यात आलाय. बैठकीला राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक उपस्थित होते, तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे, अनिल परब उपस्थित होते. अजित पवार, सीताराम कुंटे बैठकीतून वर्षा बंगल्यातून बाहेर पडले आहेत. सध्या फक्त एकनाथ शिंदे आणि अनिल परब वर्षा बंगल्यावर आहेत .
अहमदनगर : रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे दुसऱ्या गुन्ह्यात कोतवाली पोलिसांच्या ताब्यात
बाळ बोठे फरार असताना बोठेवर विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता
बाळ बोठे यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना आज न्यायालयात केले होते हजर
मुंबई : ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. निवडीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.
खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणात हायकोर्टात पुढील सुनावणी 9 एप्रिल रोजी होणार
मोहन डेलकर यांनी काही दिवसापूर्वी मुंबईत केली होती आत्महत्या
या प्रकरणात मुंबईत गुन्हा दाखल आहे.
संगमनेर तालुक्यात भूकंपाचा धक्का
तालुक्यातील बोटा घारगाव परिसरात भूकंपाचा धक्का
2.6 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का
दुपारी 04:36 वाजता बसला धक्का
नाशिक पासून 76 किमीवर संगमनेर तालुक्यात भूकंपाचं केंद्र
नाशिकच्या MERI संस्थेत भूकंपाची नोंद
तहसीलदार अमोल कदम यांची माहिती
भुकंपाच्या हादऱ्याने नागरिकांत भीती
माळवाडी, कुरकुटवाडीसह परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का
84 सेकंद सुरू होते भुकंपाचे हादरे
गडचिरोली : आज जिल्हयात 56 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 24 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10328 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9828 वर पोहचली. तसेच सद्या 391 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकूण 109 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.16 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.79 टक्के तर मृत्यू दर 1.06 टक्क्यांपर्यंत पोहोचाल आहे.
मुंबई : मराठा समाजाच्या जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव आंदोलकांनी उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे उपोषण मागे घेण्यात आलं आहे. हे आंदोलक आता उपोषणाऐवजी ठिय्या आंदोलन करणार आहेत. तसेच आंदोलक मंत्री विजय वडेट्टीवार यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीवरही ठाम आहेत. यावेळी न्यायालयात मराठा समाजाच्या बाजूने निकाल लागू शकतो असे मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिल्यानंतर हा आंदोलकांनी हा निर्णय घेतला.
नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा आजपासून सुरु
अनेक विधर्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला
बरेच विध्यार्थी परीक्षा देण्यापासून वंचित
तांत्रिक अडचणींमुळे आजचा पेपर रद्द, लकवरच परिक्षेची पुढची तारीख निश्चित केली जाणार
विद्यापीठ प्रशासनाने माहिती परिपत्रक काढून दिली माहिती
मुंबई : मागील 65 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथे आंदोलन करत असलेलं मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला
– साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांचं मराठा आरक्षण मिळण्यासाठी 65 दिवसांपासून सुरू आहे आंदोलन
– आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आंदोलकांच्या शिष्टमंडळान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेतली भेट
– भेटीत मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा
या शिष्टमंडळात राजेश टोपेंसह मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरगे पाटील, भारतीताई कठारे, वैष्णवी ताई जाधव, गितताई तांबडे, मुक्ताबाई ढेपे यांची उपस्थिती
मंत्री जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद
100 फ्लॅट टाटा रुग्णालयासाठी
राज्यासह देशभरातील रुग्ण उपचारासाठी मुंबईत येत असतात
रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राहण्यासाठी सोय होणार
रुग्णांसाठी म्हाडाचा मोठा निर्णय
रुग्णांच्या नातेवाईकांना मदत व्हावी म्हणून म्हाडाचा निर्णय
कराड
थकीत एफ आर पी बाबत राजू शेट्टींची सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा
1एप्रिल पर्यंत सरकारला अल्टिमेट
एफ आर पी थकवलेल्या साखर कारखान्या बाबत सहकार आयुक्त निर्णय घेणार
निर्णय नाही झाल्यास 5 एप्रिला साखर आयुक्तांना घेराव घालणार
स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा इशारा
मालेगाव –
माजी आमदार असिफ शेख यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादीत केला प्रवेश
मुंबई येथे राष्ट्रवादीच्या कार्यलयात प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी शेख यांचे पक्षात केले स्वागत
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ होते उपस्थित
असिफ शेख यांनी गेल्या महिन्यात काँग्रेस पक्षाला दिली होती सोडचिठ्ठी
अजित पवार –
राज्य सरकार नियमानुसार काम करत आहे, विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही
बहुमत सरकारला आहे, विरोधक सरकार बरखास्त करा मागणी असली तरी, पोलिस दलातील काहीजण सरकार पाडण्याबाबत आहे हे उघड होत आहे
सीए्म यांनी सगळी माहिती मुख्य सचिव यांना दिल्या
बदल्या ह्या एका सांगण्यावरून झाल्या नाहीत समितीने सांगितले त्यानुसार बदल्या झाल्या
कॅबिनेट बैठकीत चर्चा फोन टॅप बदल्या यावर
आज सीएम यांनी राज्यपाल यांना वेळ मागितला होता. महाविकास आघाडी नेते भेटणार होते पण राज्यपाल नंतर भेटतील
काल सुप्रीम कोर्टाने भूमिका घेतली. सीएम सगळ्यांसमवेत चर्चा करत आहेत.
जनतेला विनंती, काही दिवसात वातावरण केले त्यात कोणास पाठीशी घातले जाणार नाही
राज्यात कोरोना संकट वाढत आहे, उद्या पुणे कोरोना आढावा बैठक घेणार
अजित पवार –
बदल्या रॅकेट आहे त्याची नाव येतात ती किती खरे…बदल्या ज्या शुक्ला यांनी सांगितले त्या बदल्या झालेल्या नाही, महत्व पद नाही त्याची नाव, जे कोणी यात नाव त्याची चौकशी केली जाईल
अनिल देशमुख यांची चौकशी बाबत सीएम यांनी वेगवेगळ्या मंत्री नेते चर्चा केली. विषय गंभीर आहे. राज्य प्रमुख सीएम निर्णय घेतील
बदल्या रॅकेट पू्र्ण माहिती घेऊन कट आहे का वैयक्तिक कारण आहे या सर्व बाजून् याची चौकशी केली जाईल
शरद पवार यूपीए अध्यक्ष व्हावे का यावर मी बोलणार नाही कारण केंद्र विषय यावर मी बोलणे योग्य नाही, राज्यातील विषयावर मी बोलतो, केंद्रीय विषयावर बोलणारे आमचे इतर नेते
सातारा :
मेढा येथे दाम्पत्याची विषप्राशन करुन आत्महत्या
अनिल काटेकर आणि शेवंता काटेकर अशी मृतांची नावे….
मानसिक त्रासाला कंटाळुन केली आत्महत्या…
जावली तालुक्यातील मेढा जवळच्या गांधीनगर भागातील घटना
कराड –
धरणं आंदोलनासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या साखर कारखान्यावर आज आंदोलन
कारखान्याकडे जाणाऱ्या कार्यकर्त्यांना मसूरजवळ अडवले
आक्रमक कार्यकर्त्यांनी केली मसुरमध्येच घोषणाबाजी
एफआरपीची पूर्ण रक्कम न दिल्याने राजू शेट्टी करणार आहेत आंदोलन
सुप्रिया सुळे यांची आज सकाळी सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली
राज्यातील परिस्थितीवर कॉंग्रेस हायकमांड नाराज असल्याची चर्चा होती यात पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली
सुप्रीया सुळेंनी सोनिया गांधींचे मत जाणून घेतले
महाराष्ट्रात सरकारच्या स्थिरतेबाबत सोनिया गांधी सकारात्मक असल्याची माहिती
नागपूर –
आजपासून नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा सुरू
ऑन लाईन पद्धतीने परीक्षा सुरू
25 मार्च ते 5 मे पर्यंत करण्यात आलं परीक्षा नच नियोजन
वेगवेगळ्या अभ्यास क्रमांच्या परीक्षा सुरू
मागच्या वेळी विध्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणी चा सामना करावा लागला होता
तांत्रिक अडचणी दूर करून घेतली जात आहे परीक्षा
पुणे
आमलकी एकादशी निमित्त आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी आणि गाभाऱ्याला देशी विदेशी फुलांची आकर्षक सजावट
गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील यांच्या कार्यपूर्ती अहवालाचे प्रकाशन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे
रत्नागिरी- रत्नागिरी नगरपरिषदेला प्रदुषण नियंत्रण मंडळाचा दणका
डपिंग ग्राऊंडवरील कचरा जाळून प्रदुषण होत असल्याप्रकरणी नगरपालिका अडचणीत
मोठ्या दंडासह कठोर कारवाई करण्याचे रत्नागिरी प्रदुषण नियंत्रण मंडळाचे विभागीय कार्यालयाला अहवाल
वर्षभरापुर्वी नगरपरिषदेला प्रदुषण मंडळाने ठोवावला होता ८ लाखांचा दंड
नंदूरबार –
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नंदुरबार तालुक्यातील 174 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात मोकळा झाला
प्राथमिक स्तरावर पंचनामा करण्यात आला आहे
गेल्या चार दिवसापासून अवकाळी पाऊस आणि काही भागात झालेल्या गारपिटीमुळे शेती शिवाराचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे
गहू हरभरा पपई केळी टरबूज या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे
परिवहन मंत्री अनिल परब सायंकाळी 4 वाजता शिर्डीहुन नाशिकमध्ये येणार
प्रादेशिक परिवहन कार्यलयात इन्स्पेक्शन सर्टिफिकेशन ट्रॅकची करणार पाहणी
पाहणी झाल्यानंतर मुंबईकडे करणार प्रयाण
अंडरवर्ल्ड ड्रग्स कनेक्शन प्रकरणात चिंकू पठानच्या जवळच्या व्यक्तीच्या ठिकाणी मागील रात्रीपासून सुरू आहे छापेमारी
मुंबईच्या डोंगरी परिसरात एनसीबी अधिकारी करत आहेत कार्रवाई
काही प्रमाणात ड्रग्स केली गेली आहे ज्प्त
धाड़ी संदर्भात महितीं मिळताच घटनास्थळावरुन पसार झाला ड्रग पैडलर
पुणे –
– शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे पित्याची दोन मुली सह विहिरीत उडी मारुन आत्महत्या, घटनेमुळे परिसरात खळबळ
-राजेंद्र भुजबळ,दीक्षा राजेंद्र भुजबळ, ऋतुजा राजेंद्र भुजबळ अशी मयत पिता व मुलींची नावे
-तळेगाव ढमढेरे येथील शेणाचा मळा याठिकाणी उत्तम भुजबळ यांच्या विहिरीच्या कडेला त्यांना मोठ्या माणसाच्या व लहान मुलींच्या चपला दिसल्या.त्याच्याबरोबर मोबाइल पैसे पडलेले असल्याचे दिसून आले त्यावेळी हि घटना उघडकीस आली
-आत्महत्येचे कारण अस्पष्ट
-शिक्रापूर पोलिसांनी ह्या घटनेची आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत
राज्यपाल हेच सरकार चालवतील असे नवे राष्ट्रीय राजधानी सुधारणा विधेयक म्हणत असेल तर मग दिल्लीची विधानसभा आणि मुख्यमंत्री हवेतच कशाला? केजरीवाल यांच्या जागी भाजपचे मुख्यमंत्री असते तर हे असले विधेयक मोदी सरकारने आणलेच नसते. पण महाराष्ट्र असो वा दिल्ली, राज्यपालांच्या माध्यमातुन भाजप सत्ता गाजवु इच्छिते. त्यासाठी लोकशाहीचा मुडदा पडला तरी चालेल हेच यांचे धोरण आहे. दिल्ली विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांच्य़ा अधिकारांचा कचरा करुन केद्रं सरकार एकाधिकारशाहीच्या युगाची तुतारी फुंकत आहे. देशासाठी हे घातक आहे
रायगड –
महाडमध्ये जोरदार पाऊस
बिरवाडी, औद्योगिक वसाहत परीसरात घरांचं नुकसान
रस्त्यावर झाड कोसळली
महाड शहरातील चवदारतळे, सरेकर आळी परीसरात तुरळक प्रमाणात गारा देखील पडल्या
अवकाळी पावसामुळे कडधान्य पिक आणि गुरांच्या वैरणीचा मोठ्या प्रमाणात फटका
सोलापुरातील मार्कंडेय सहकारी रुग्णालयात बंद ऑक्सिजन टॅंकचा स्फोट
केमिकल रिऍकॅशनमुळे स्फोट झाल्याचा अंदाज
सुदैवाने नवीन टाकीद्वारे ऑक्सिजन सप्लाय सुरू होता त्यामुळे कोणतीही जीवित हानी नाही
मात्र स्फोटमुळे टाकीतील पावडर (केमिकल) बाहेर पडली
रुग्णांच्या नातेवाईकमध्ये भीतीचे वातावरण
सुदैवाने कोणीतही जीवित हानी नाही
महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, घटनास्थळी
मुंबई –
चित्रपट अभिनेत्री आलिया भट्ट, संजय लीला भन्साळी आणि फ़िल्म रायटर यांना मुंबईच्या मझागाव कोर्टाने समन्स बजावले
गंगूभाई काठियावाडी चित्रपटाच्या प्रकरणात समन्स बजावले
21 मे रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले
गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आपल्या कुटुंबाची बदनामी केली जात असल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे.
चित्रपट खरा नाही, चित्रपट खोट्या गोष्टींवर आधारित आहे
चित्रपटात खोटी तथ्य दर्शविली आहे
याचिकाकर्ता गंगूबाई काठियावाडी यांचा मुलगा आहे