महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
मुंबई पोलीस मुख्यालयातील काही दिवसांचा सीसीटीव्ही फुटेजचा डेटा गहाळ झाल्याची सूत्रांची माहिती
एटीएसच्या चौकशीत मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर पोलीस आयुक्त कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज स्टोअर केलेला डीव्हीआर गायब असल्याचे सांगण्यात येत आहे.
“विरोधकांनी विचारलं पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये रुमालचा उल्लेख का नाही? पोस्टमॉर्टममध्ये बॉडीचं डिसेक्शन होतं. रुमालचं डिसेक्शन होत नाही. रुमाल जप्त होतो. त्यानंतर फॉरेन्सिक डिपार्टमेंटला तपासणीसाठी पाठवण्यात आला”, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले.
“मनसूख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास अतिशय योग्य गतीने चालू होता. उगाच भूई थोपटीत बसायची आणि संभ्राम निर्माण करायचा, हाच त्यांचा प्रयत्न आहे. याशिवाय काहीही होत नाही. माझ्यावर अहवाल लिहिण्याचा आरोप करण्यात आला. म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवण्याचं काम आहे. सीताराम कुंटे हे कधीकाळी तुमच्याही जवळचे होते. सरकारी अधिकाऱ्यांनी राज्य सरकारसाठी काम केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. कुंटे यांनी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात अहवाल लिहिल्यामुळे नाराज झालात का? तपास योग्यरितीने सुरु होता. महाराष्ट्र सरकारमधील कोणत्याही मंत्र्यांनी फोन केलेला नाही. उगाच मंत्र्याची बदनामी करायची कामे सुरु आहेत”, असा घणाघात आव्हाड यांनी केला.
मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीनं सुरु होता. भाजप नेते भुई थोपटत बसत आहेत. माझ्यावर अहवाल लिहिल्याचा आरोप कशाला करता. कुंटे तुमच्याही जवळ होते. कुंटेंनी रश्मी शुक्लांविरोधात अहवाल दिला त्यामुळं वाईट वाटतेय का? अहवाल तुम्हीच फोडला आणि आमच्यावर आरोप करता. संभ्रम निर्माण का करता, असा सवाल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
रायगड जिल्ह्यात काँग्रेसचे आंदोलन
दिल्लीच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला 120 दिवस पूर्ण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लाक्षणिक उपोषण
या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी तसेच नवीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी रायगड जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीने प्रत्येक तालुका पातळीवर आंदोलन करण्यात आले.
अलिबाग येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.
यावेळी भाजप हटाव , देश बचाव, मोदी हटाव, शेतकरी बचाव असे फलक झळकावत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
नाशिक : नाशिकच्या गोदावरी नदी परिसरात जाळपोळ सुरूच
– तीन चायनीज गाड्या अज्ञात इसमाने जाळल्या, आगीत गाड्या जळून खाक
– व्यक्तीगत वादातून घटना घडल्याचं पोलिसांचा अंदाज
– दोनच दिवसांपूर्वी गांधी तलावातील बोटी अज्ञात इसमानी जाळ्याची घटना ताजी असताना पुन्हा अशा प्रकारची घटना घडल्याने खळबळ
रत्नागिरी-
पुढील दोन दिवस रत्नागिरी आणि सिंधुदूर्गात उष्णतेची लाट
हवामान खात्यानं दिला इशारा, दोन्ही जिल्ह्यात अनेक ठिकाणी होणार तापमानात वाढ
रत्नागिरी जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३८ अंशाच्या पुढे
सलग तिसऱ्या दिवशी रत्नागिरीकरांना उन्हाचे चटके
24 एप्रिलला राज्यातील सर्वात जास्त तापमानाची नोंद रत्नागिरी जिल्ह्यात
वाढलेल्या तापमानामुळे रत्नागिरीकर हैराण
वाढलेल्या तापमानामुळे आंब्याची मोठी गळ, बागायतदार चिंतेत
भांडूप : तात्काळ उपचारासाठी परवानगी दिलेली आहे, त्यातील हे मॉलमधलं हॉस्पिटल आहे. राज्यभर जिथे शक्य तिथे कोव्हिड हॉस्पिटल्सना परवानगी दिली होती. या हॉस्पिटलला तात्पुरती परवानगी होती, येत्या १ तारखेला संपत होती. दुर्दैवाने हॉस्पिटलच्या खाली असलेल्या दुकान, तळमजल्यांना आग लागली. ती हॉ,स्पिटलपर्यंत आली. जे कोरोना रुग्ण अॅडमिट होते, त्यातील बाहेर काढताना काहींचा मृत्यू झाला. अशा घटना झाल्यानंतर आपण जागे होतो, चौकशी होते.. या प्रकरणातही चौकशी करुन कारवाई करु… अशा घटना होऊ नयेत, म्हणून .. कमला मिलमध्येही आग लागली होती, अशा दुर्घटना होऊ नयेत, कोव्हिड सेंटर, जम्बो फॅसिलिटी सेंटरमधील स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिटच्या सूचना दिल्या आहेत.. दुर्घटना टळल्या पाहिजे
कोरोनाच्या संसर्गामुळे आपण मॉल, सेंटर्समधील वर्दळीवर बंधनं आणली आहेत..मात्र ही दुर्घटना घडली आहे, ज्यांचं कौटुंबीक नुकसान झालं आहे, त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. जर यात दिरघांई, दुर्लक्ष असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल., असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले
अकोला महानगरपालिकेत महापौर यांच्या कक्षा समोर शिवसेनेचे ठिय्या आंदोलन.
नगर रचना विभागात प्रलंबित नकाशे मंजूर करून घरकुलाचे बांधकाम पूर्ण करा व PM आवास योजनेत समाविष्ट करून गुंठेवारीच्या लाभार्थ्यांना न्यायद्या
नळ कनेक्शन पूर्ण करून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करावी
या अशा अनेक विषयांना घेऊन आज शिवसेनेचे नगरसेवक यांनी आज महानगर पालिकेच्या महापौर अर्चना मसने यांच्या कक्षा समोर ठिय्या आंदोलन केले आहे.
अस्लम शेख –
मुंबईत कोव्हिड सेंटर आग प्रकरण
संबंधित प्रकरण चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांना दिले
माॅल ओसी परवानगी नव्हती अशी माहिती मिळत आहे तिथ हाॅस्पिटल कसे होते याची चौकशी
कोव्हीड सेंटर सेना पदाधकिरी चालवत होते का याची माहिती घेऊ पण कोणी दोषी त्यावर कारवाई केली जाईल
अमरावती वन अधिकार आत्महत्या यावर सुसाईड नोट नेमके काय आहे चौकशी केली जाईल त्या खात्याचे मंत्री करावाई आदेश देतील
सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना पुन्हा अटक, विजापूर नाका पोलीस ठाण्याची कारवाई
मित्राची वीज का कापली याचा जाब विचारात महावितरणच्या कर्मचाऱ्याला केली मारहाण
काल संध्याकाळी 8 च्या सुमारासची घटना, रात्री 2 वाजता आरोपी उपमहापौराना पोलिसांनी घेतले ताब्यात
महावितरणच्या कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून आरोपी राजेश काळे आणि त्याच्या साथीदारविरोधात कलम 353 अनुसार गुन्हा नोंद
या आधी देखील उपायुक्तांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी काळे याना झाली होती अटक
आरोपी राजेश काळे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता पोलीस तडीपार संदर्भात प्रस्ताव तयार करत असल्याची सूत्रांची माहिती
भांडूप मॉलच्या आगीत सहा जणांचा मृत्यू
A few more precious lives lost in the Bhandup West Fire at Dreams Mall taking the death toll up to six. Our deepest condolences to the families of deceased #MyBMCUpdates https://t.co/N0CGRSwdk8
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 26, 2021
नागपूर-
नागपूर महापालिकेत कर कमी करून देणारे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती सर्वसाधारण सभेत देण्यात आली
त्यावर महापौरांनी चौकशी समिती स्थापन केली
ही समिती चौकशी करून पुढील सभेत अहवाल सादर करणार
निवृत्त कर्मचार्यांन कडून पास वर्ड चा गैर वापर होत असल्याचा आरोप
यामुळे महापालिकेच होत आहे मोठं नुकसान
नवी मुंबई –
-पोटच्या पोरीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला एनआरआय पोलिसांकडून अटक
-३० मार्च पर्यंत पोलीस कोठडी
– आरोपी अरुण हंकारे याला उलवे येथून ताब्यात
– तीन मुलीसोबत आरोपी सेक्टर १९, उलवे येथे वास्तव्यास
– या प्रकारची वाच्यता केल्यास पीडितेला ठार मारण्याची धमकी
– लाकडी बांबूने पीडितेला जबर मारहाण
– पंडितेच्या समुपदेशनाने प्रकार उघड
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार 6 लोक अजूनही आत अडकले आहेत
सर्वांना लोकेट करण्यात आलं आहे
नाशिक
– महामार्गावर ट्रक चालकांना लुटणाऱ्या टोळीच्या नाशिक पोलिसांनी मुसक्या आवळल्या
– 6 जणांना मोठ्या शिताफीने पोलिसांनी ठोकल्या बेड्या
– या टोळीकडून धारदार शस्र आणि मुद्देमाल ही केला जप्त
– गेल्या काही दिवसांपासून ही टोळी होती सक्रिय
अमरावती –
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल रेंजच्या RFO दिपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून काल सायंकाळी साडे सात वाजता आत्महत्या केली
दिपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरक्षक रेड्डी यांच्या नावाने चार पाणाची सुसाईड नोट लिहिली
यात त्यांचे वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार हे आपल्याला गावकरी आणि कर्मचाऱ्या समोर अश्लील शिवीगाळ करतात
रात्री बेरात्री भेटायला बोलावतात त्यांची मनाप्रमाणे न वागल्याने ते वारंवार सस्पेंड करण्याची धमकी देत असल्याचे लिहिले आहे
सध्या अग्निशमन दलाच्या 20 ते 23 गाड्या घटनास्थळी दाखल
आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
अद्याप आटोक्यात आलेली नाही
या रुग्णालयात 76 रुग्णांवर उपचार सुरु होते
या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू
अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असताना महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल
ड्रीम मॉलमध्ये रुग्णालय नेमकं कसे गेलं, याबद्दल महापौर किशोरी पेडणेकरांकडून आश्चर्य व्यक्त
आतापर्यंत 61 जणांना वाचवण्यात यश
नवी मुंबईचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्या नातवाला मारहाण
नातू संकल्प संजीव नाईक व त्यांचे मित्र तेजेंद्रसिंग हरजितसिंह यांना मारहाण
संकल्प नाईक मारहाण केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल, इतर तिघांचा तपास सुरु
टोकावडे पोलिस ठाण्याअंतर्गत मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल
माळशेज घाटाच्या दिशेने जात असताना घडला प्रकार
१०८/२०२१ भदविस कलम ३२३,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल
शॉपिंग मॉल्स, डिपार्टमेंट स्टोअर्ससाठी पनवेल मनपाकडून कोविडचे नवे नियम बंधनकारक
कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी कोरोना नियम अधिक कडक
पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांचे आदेश
शॉपींग मॉल्स आणि डी मार्ट, स्टार बाजार, रिलायन्स फ्रेश यांसारख्या डिपार्टमेंट स्टोअरसाठी त्यांनी नवी नियमावली जाहीर
सेंट्रल पार्क वगळता उद्याने आणि मैदाने सकाळी ५.३० ते सकाळी १० वाजेपर्यंत खुली
होळी, धुलिवंदन, गुड फ्रायडे, ईस्टर संडे साधेपणाने साजरे करण्याचेही आदेश
शिमग्याआधीच नवी मुंबई, मुंबई, कोकण तापायला सुरुवात
पुढील ४८ तास उष्णतेची लाट मुंबईसह संपूर्ण कोकण प्रांतात कायम राहणार
शुक्रवारसह शनिवारी उष्णतेच्या लाटेचा अंदाज
हवामान खात्याने दिला इशारा
ईशान्य व उत्तरेकडून गरम व कोरड्या वाऱ्यांमुळे मुंबईसह पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणातील तापमानात वाढ
गुरुवारी दुपारी मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा ३९ अंश एवढा नोंदविण्यात आला
नवी मुंबई आणि मुंबई उपनगरात कमाल तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअस
पालघर येथे गुरुवार दुपारी कमाल तापमान ४१ अंश नोंदवले
भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला रात्रीच्या सुमारास भीषण आग
आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू
अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
Maharashtra: Fire breaks out at a hospital in Mumbai’s Bhandup; rescue operation on
“Cause of fire is yet to be ascertained. I’ve seen a hospital at mall for the first time. Action to be taken. 70 patients including COVID infected shifted to another hospital,” says Mumbai Mayor pic.twitter.com/sq1K29PVhe
— ANI (@ANI) March 25, 2021