महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी (Maharashtra Breaking News)
रत्नागिरी – मुंबई – गोवा महामार्गावर वनविभागाने सापळा रचून खवले मांजराची विक्री करणाऱ्या सहा शिकाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडे एक जिवंत दुर्मिळ खवले मांजर सापडले. वनविभागाने एकूण सहा शिकाऱ्यांनाप कडले असून त्यांच्याकडची दोन दुचाकीसुद्धा यावेळी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
मुंबई: शिवस्मारक अरबी समुद्रात उभारण्याच्या घोषणा हवेतच असल्याचे दिसून येत आहे, असे म्हणत शिव स्मारक अरबी समुद्रात उभारण्याऐवजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभारल्यास पर्यटन स्थळाचा विकास होईल, अशी मागमी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. तिथीनुसार आज शिवजयंती असल्याने या निमित्ताने आमदार पाटील यांनी राज्य सरकारचे लक्ष्य वेधले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबई येथील स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर असे मोठे नेते या कर्यक्रमाला उपस्थित होते.
मुंबई येथील शिवाजी पार्क येथील महापौरांच्या जुन्या बंगल्याच्या परिसरात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी शिवसेना तसेच महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची उपस्थिती होती.
पुणे : कोंढवा परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्याच्या नैराश्यातून एका तरुण अभियंत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ऋषिकेश मारुती उमाप असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.
पंढरपूर : महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके आणि भाजप उमेदवार समाधान आवताडे यांचे उमेदवारी अर्ज मंजूर झाले आहेत. राष्ट्रवादी उमेदवार भगिरथ भालके आणि भाजप उमेदवा समाधान आवताडे हे अध्यक्ष असलेल्या त्यांच्या दोन्ही कारखान्यावर आरआरसीची कारवाई झाल्याने अपक्ष उमेदवार माऊली हळणवर यांनी घेतला होता आक्षेप. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली तशी माहिती दिली आहे.
अकोला : वंचित बहुजन आघाडीने पंढपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उडी घेतली आहे. वंचितकडून विरप्पा मोटे यांच्या नावाची घोषणा आज प्रकाश आंबेडकर यांनी केली असून वंचित येथे संपूर्ण ताकदीने निवडणूक लढेल असे सांगण्यात आले आहे.
मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना अटक
जमावबंदी आदेश लागू असताना गर्दी केल्याचा ठपका
काही कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी घेतलं ताब्यात
उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी केली अविनाश जाधव यांना अटक
अविनाश जाधव यांना नेवाळी पोलीस ठाण्यातून हिललाईन पोलीस ठाण्यात नेलं
औरंगाबाद –
खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल
सिटी चौक पोलीस ठाण्यात भाजपकडून तक्रार दाखल
भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी केली तक्रार दाखल
इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी
इम्तियाज जलील यांच्यावर सात वाजेपर्यंत गुन्हा दाखल नाही झाला तर रस्त्यावर उतरण्याचा ईशारा
कोल्हापूर –
गोकुळ दूध संघाच्या इच्छुकांना माजी खासदार राजू शेट्टी यांचं आव्हान
संचालक व्हायचं असेल तर दहा लिटर दूध न दमता काढून दाखवा
संचालक पदाच्या अटी साठी अशा प्रकारच्या ही अटीची देखील गरज होती अशी व्यक्त केली अपेक्षा
जिल्ह्यातील नेत्यांच्या मुलांचे अर्ज दाखल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेट्टींच आव्हान
दरम्यान माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आज गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतली शेट्टीची भेट
गोकुळ वाचवण्यासाठी स्वाभिमानीन सत्ताधारी गटा सोबत राहण्याची केली विनंती
सोलापूर –
शरद पवार लवकर बरे व्हावेत म्हणून आरती
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने श्री सिदेश्वर मंदिरात आरती
ग्रामदैवत श्री सिदेश्वर मंदिरात आरती
नागपूर –
नागपुरातील दोन हत्या प्रकरणात फरार असलेला कुख्यात गुंड रणजित सफेलकरला पोलिसांनी घेतलं ताब्यात
एकनाथ निमगडे आणि मनीष श्रीवास हत्या कांड प्रकरणात होता सहभाग
दोन दिवसांपूर्वी त्याच्या घरून पोलिसांनी त्याचे 3 वाहन सुद्धा केले होते जप्त
नागपूर –
नागपुरातील श्रीकृष्ण नगर येथे आग,
डेकोरेशन गोडाऊनला आग
अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी विझविली आग,
आगीत डेकोरेशन साहित्याचं मोठं नुकसान
सांगली –
सांगली शहरात घुसला बिबट्या
सांगलीच्या राजवाडा परिसरात बिबट्या
एका कुत्र्याला टाकले फाडून
घटनास्थळी पोलीस, महापालिका कर्मचारी, अग्निशमन विभाग आणि नागरिकांची गर्दी..
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
औरंगाबाद –
औरंगाबादेत लॉकडाऊनमध्ये हॉटेलवर गोळीबार
दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांचा हॉटेलवर मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार
पडेगावं येथील हॉटेल मनीष इन या हॉटेल वर अज्ञाता कडून दोन राऊंड फायर
घटना सीसीटीव्हीत कैद
धमकवण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याचा पोलिसांचा संशय
गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ
सोलापूर –
नागरिकांच्या सर्वेक्षण तपासणीसाठी आता शिक्षकांची ड्युटी
285 शिक्षकांची यादी तयार करुन पालिकेने दिले नियुक्तीचे आदेश
संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश
संबंधित नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या हजेरी पत्रकावरूनच वेतनाची कारवाई करण्याचे आदेश
जे शिक्षक कोरणा काळात सेवा बजावणार नाहीत अशा शिक्षकांचे वेतन अदा न करण्याचे आदेश
पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
25 एप्रिल ऐवजी 23मे ला होणार परीक्षा
25 एप्रिल दरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा येत असल्यानं शिष्यवृत्ती परीक्षा ढकलली पुढे
राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात परीक्षेचं आयोजन केलं जातं मात्र कोरोनामुळं परीक्षा ढकलली पुढे
राज्यातील 6 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्जही भरलाय
आता परीक्षा होणार 23 मे ला राज्य परीक्षा परिषदेनं केलं जाहीर
सांगली –
सांगली जिल्ह्यातील न्यायालयाचे कामकाज 2 सत्रामध्ये
कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पाश्वभूमी वर जिल्हा न्यायालय प्रशासनानं निर्बंध आदेश केला जारी
वकील पक्षकार साक्षिदार आणि कर्मचारी यांनी सहकार्य करावे असे कोर्टा काढून सर्वाना आवाहन
पाहिले सत्र सकाळी 11 ते 1,30 आणि दुसरे सत्र 2 ते 4,30
सांगली –
सांगली जिल्ह्याचा पारा गेला 40 वर
उकाड्याने सर्वांच्या अंगाची होत आहे लाहीलाही
पुढील 4 दिवसात तापमान 41 ते 42 अशांपर्यंत जाण्याची शक्यता
गेल्या महिन्या भरापासून जिह्यातील तापमानात होत आहे वाढ
नागरिक लहान मुले वृद्धांना होत आहे खूप त्रास
नागपूर –
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात एकाची हत्या
38 वर्षीय संजय खवास राहणार कावरापेठ असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव,
होळीच्या पाडव्याला मृतक आणि आरोपींमध्ये आपसात वाद झाल्याचीही माहिती..
उमरेड येथील अक्की बार समोर संजय खवास याची दोन आरोपीनी मिळून केली हत्या
काल रात्री नऊच्या दरम्यान करण्यात आली हत्या, हत्येच कारण अद्याप अस्पष्ट
हत्येनंतर दोन्ही आरोपीच पोलीस स्टेशनला आत्मसमर्पण…
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचे कामकाज आजपासून पुन्हा दोन सत्रात होणार
राज्यभरात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर
सकाळी साडेदहा ते दीड आणि दुपारी दोन ते सायंकाळी पाच अशा दोन सत्रात चालणार काम
न्यायालयाच्या आवारात प्रवेश करताना आणि सोशल डिस्टन्सच्या नियमांची होणार काटेकोर अंमलबजावणी
एनसीबीने बॉलिवूड अभिनेता एजाज खानला अटक केली
शादाब बटाटा टोळीशी संबंध असल्याच्या आरोपामुळे अटक
काल संध्याकाळी एजाजच्या घरावर छापा टाकल्यावर काही गोळ्याही ज्प्त केल्या गेल्या होता
पिंपरी-चिंचवड
– शहरातील गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद
– रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार
– गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केल्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे सायंकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही. तर, शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागा कडून सांगण्यात आले आहे.
– त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आवाहन
अमरावती महानगरपालिकेच्या कर विभागाने एका दिवसात उच्चांकी 48 लाखांच्या मालमत्ता कराची वसुली
31 मार्च हा अंतिम दिनांक आहे
आतापर्यंत 29 कोटी 38 लाख 27 हजार 985 रुपये एवढी वसुली झाली
यावर्षी 47 कोटी 81 लाख 66 हजारांचे मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्यांक आहे
पुणे
लॉकडाऊनमध्ये गेलेली नोकरी अन् पबजी गेम खेळण्याचा लागलेला नाद यातून आलेल्या नैराश्यातून एका इंजिनिअर तरुणाची आत्महत्या
कोंढाव्यातील ऋषिकेश मारुती उमाप या 29 वर्षीय तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या
या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळकडून सायबर हल्ल्याविषयी खुलासा
खंडणीचा मेल आला आहे पण रकमेचा उल्लेख नसल्याचा खुलासा
सदरचा सायबर हल्ला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती
कामकाजावर परिणाम झाला असल्याची महाराष्ट्र औद्योगिक वीकास महामंडळाची माहिती
बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या कस्टडीतून फरार
महाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यातुन एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला
या आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल होता
शनिवारी त्याला पोलिसांनी आटक केली होती
मंगळवारी रात्री जेवणाच्या वेळी या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी दिली
रज्जाक असे या आरोपीचे नाव आहे