महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी
पावसामुळे उकाड्यापासून थोडा दिलासा
गेल्या आठ दिवस उकाड्यापासून अकोलेकर झाले होते हैराण
अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा
गोंदिया : जिल्हातील अति नक्षलग्रस्त असलेल्या देवरी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली
दोन्ही तालुक्यात विजेच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी गारपीट झाली
मुसळधार पाऊस पडला असून इतर तालुक्यात हलक्या स्वरूपात पाऊस पडला
अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामात पिकांना फटका बसणार आहे
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना आजपासून (1 मे) उन्हाळी सुट्टी लागू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या सुट्टीचा कालावधी 13 जून 2021 पर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये 14 जून 2021 पासून शाळा सुरू करण्यात येतील. तर जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर 28 जून रोजी शाळा सुरू होतील. या संदर्भात शिक्षण संचालकांनी नुकतेच सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना एका पत्राद्वारे कळविले आहे.
सोलापूर : सोलापूर शहरात पावसाला सुरुवात, सकाळपासून ढगाळ वातावरण होते
ज्येष्ठ नैपथ्यकार अशोक पालेकर यांचे आज निधन झाले. गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ त्यांनी हजारो नाटकांचे नेपथ्य केले. ते चांगले नाट्यनिर्माते ही होते. अनेक दिग्दर्शक, नाट्यनिर्माते, कलाकारांबरोबर त्यांनी काम केले होते.
कल्याण रेल्वे गोदामात आग
सिग्नल आणि टेलिकॉम विभागाच्या गोदामात आग
केबलला आग लागल्याची प्राथमिक माहिती
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल
अमरावती
वन अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण…
निलंबीत मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी याच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची पुन्हा वाढ..
धारणीच्या दिवाणी फौजदारी न्यायालयाचे आदेश…
सोलापूर -उजनीच्या धरणाच्या पाण्यात उतरून जनहित शेतकरी संघटनेचे आंदोलन
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातून इंदापूर कडे पाणी वळवण्याचा आरोप
जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे आंदोलन
पालकमंत्री दत्तात्रय भरणे किंवा जिल्हाधिकारी जोपर्यंत आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन माघार न घेण्याचा इशारा
केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ
आज 18 ते 44 वयोगटातील नागरीकांना कोरोनाची लस दिली जाईल. केडीएमसीत फक्त एका केंद्रावर लसीकरण होणार होता. मात्र या ठिकाणी मोठय़ा संख्येत नागरीक लसीकरणासाठी पोहचले होते. सहा ते आठ तासापासून रांगेत उभे असेल्याना नागरीकांना टोकन देण्यात आले. नंतर केवळ ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणा:यांनाच लस दिली जाईल. हे कळताच रांगेत उभे असलेल्या नागरीकांमध्य़े एकच गोंधळ उडाला.
नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर
– मौदा परिसरातील धानला आरोग्य केंद्रात कुणीच नाही
– धानला आरोग्य केंद्रात ना डॅाक्टर, ना आरोग्य कर्मचारी
– २३ एप्रिललाच झालं धानला आरोग्य केंद्राचं उद्घाटन
– ॲम्बूलंस देण्यासाठी गेले असता आमदाराच्या लक्षात आला प्रकार
– आरोग्य केंद्रात कुणीच नसल्याने आ. टेकचंद सावरकर यांनी व्यक्त केली नाराजी
– रिकाम्या आरोग्य केंद्रात कोरोना रुग्णांवर उपचार कशे होणार?
औरंगाबाद –
औरंगाबादेत इंग्रजी शाळा संस्था चालक करणार आत्मक्लेश आंदोलन
औरंगाबादच्या क्रांती चौकात करणार आंदोलन
इंग्रजी शाळांना शासकीय मदत मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने इंग्रजी शाळा संस्थाचालकांचे आंदोलन
आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
कोल्हापूर
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उद्या होणार मतदान
मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
मतपत्रिका आणि मतपेट्यांच तहसीलदारांना वाटप
35 केंद्रांवर 70 बूथ वर होणार मतदान
कोरोना प्रादुर्भावामुळे यावेळी पहिल्यांदाच होत तालुक्यांच्या ठिकाणी मतदान
गोकुळ साठी 3647 धारक सभासद पात्र
तर 21 जागांसाठी 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
कोरोना नियमांचं पालन करूनच राबवली जाणार मतदान प्रक्रिया
निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांची माहिती
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी उद्या होणार मतदान
मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
मतपत्रिका आणि मतपेट्यांच तहसीलदारांना वाटप
35 केंद्रांवर 70 बूथ वर होणार मतदान
कोरोना प्रादुर्भावामुळे यावेळी पहिल्यांदाच होत तालुक्यांच्या ठिकाणी मतदान
गोकुळ साठी 3647 धारक सभासद पात्र
तर 21 जागांसाठी 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
कोरोना नियमांचं पालन करूनच राबवली जाणार मतदान प्रक्रिया
निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांची माहिती
औरंगाबाद नगर रोडवरील गोलवाडी परिसरात एका चारचाकी गाडीला भीषण आग
चारचाकी गाडी पूर्णपणे जाळून खाक
गाडीत चार प्रवाशी प्रसंगावधान राखून खाली उतरल्याने दुर्घटना टळली
काही वेळातच गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी
गाडीत एक स्फोट सुद्धा झाला
या आगीत गाडीचं पूर्णपणे नुकसान झालं आहे
मात्र कुठलीही जीवित हानी झाली नाही
औरंगाबाद :
औरंगाबादेत इंग्रजी शाळा संस्था चालक करणार आत्मक्लेश आंदोलन
औरंगाबादच्या क्रांती चौकात करणार आंदोलन
इंग्रजी शाळांना शासकीय मदत मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने इंग्रजी शाळा संस्थाचालकांचे आंदोलन
आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
औरंगाबाद :-
पैश्यांच्या वादातून चार महिलांची तरुणीला मारहाण
वाळूज महानगरातील सिडको उद्यानात घडला प्रकार
चारचाकी वाहनाच्या व्यवहार फसवणूक झाल्याचा आरोप
चार महिलांनी तरुणीला केली बेदम मारहाण
परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर थांबली मारहाण
मारहाण प्रकरणाची अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार नाही
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या चापाणेर परिसरातील हसनखेडा गावात ज्वारीच्या शेतात एक बिबट्याचा बछडा आढळून आला आहे.
अत्यंत लहान बिबट बछडा आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ पसरली आहे.
यापूर्वी याच परिसरात तीन वेळा बिबट्याचे बछडे आढळून आल्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचं समोर आलं आहे.
सध्या बिबट्या आढळल्यामुळे मादी बिबट हल्ला करण्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.
रत्नागिरी –
शहरातील लसीकरण केंद्रावर सावळा गोंधळ
पहाटे पाच वाजल्यापासून लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा
लसीकरण सुरु होण्याआधीच लस संपल्याची दिली जातायत कारणे
लसीकरणाशिवाय रत्नागिरीकरांना हात हलवत जावं लागतंय परत
लसीकरणासाठी रत्नागिरीकरांच्या लाईन, सोशल डिस्टसिंगचे तीन तेरा
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या एकसष्टाव्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (शनि. दि. १) राजभवन मुंबई येथे राष्ट्रध्वज फडकवला तसेच राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी सामूहिक राष्ट्रगीतगान झाले. राज्यपालांनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व पोलिसांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
खोपोलीतील तिघांना रेमडेसीव्हीरच्या काळाबाजर प्रकरणी नारायण गाव (जुन्नर) पोलिसांनी केली अटक
तीघांपैकी एक उद्योगपतीचा चा मुलगा
– काँग्रेस नेते डॅा. आशिष देशमुख यांचं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र
– महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभुमीवर पाठवलं स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी पत्र
– ‘देशातील छोट्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी’
– ‘नियोजनासाठी फायदेशीर असल्याने स्वतंत्र विदर्भ करा’
– आशिष देशमुख यांची पत्राद्वारे केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी
– पत्राची प्रत विभागीय आयुक्तांनाही सोपवली
वर्धा फ्लॅश
– कोरोना रुग्णांसाठी रेमडेसीव्हीर हे संजीवनी नाही
– गंभीर स्वरुपाचे आजार असलेल्यांना रेमडेसीव्हीरचे प्रतिकूल परिणाम
– कोरोनावरील उपचार पद्धती शास्त्रीय असायला हवी
– सेवाग्राम रुग्णालयात क्वचितच दिल्या जात आहे रेमडेसीव्हीर इंजेक्शन
– मागील पंधरा दिवसात सेवाग्राम रुग्णालयाकडून प्रशासनाला रेमडेसीव्हीरची नवीन मागणी नाही
– सेवाग्राम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एसपी कलंत्रींची माहिती
रत्नागिरी –
जिल्ह्यातील रेशन दुकानदार आक्रमक
कोरोनाच्या संकटात रेशनदुकानदारांच्या थंबने धान्य वाटपाला परवानगी मिळावी
रेशन दुकानात येणाऱ्या ग्राहकांचे मशिनवर दुकानदारांना घ्यावे लागतात बोटाचे ठस्से
थंबने धान्य वाटप पाॅस मशिनद्वारे करण्याची मागणी
मागणी मान्य न झाल्यास आजापसून रेशन दुकाने बंदचा इशारा
पुरवठा अधिकाऱ्यांनी बोलावली संघटनेची बैठक
कोल्हापूर :
गोकुळ दूध संकलनासाठी उद्या होणार मतदान
3 हजार 650 ठरावधारक बजावणार मतदानाचा हक्क
21 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात
जिल्ह्यातील विविध 70 केंद्रांवर होणार मतदान
निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज, आज दुपार नंतर मतपत्रिका आणि साहित्य मतदान केंद्रांवर पोहोचणार
गोकुळ निवडणुकीमुळे गेल्या महिन्याभरापासून ढवळून निघालंय जिल्ह्याचे राजकारण
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हुतात्मा स्मारकावर दाखल,
मुंबई महापौर किशोरी पेडणेकर, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सीएस सिताराम कुंटे, विश्वास नांगरे पाटीलही उपस्थित
उद्धव ठाकरेंकडून हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन
विरार –
राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांचा आज पालघर दौरा
12 वाजता मोटारीने वसई ताल्युक्यातील उसगाव डोंगरी येथे आगमन,
1.30 वाजता श्रमजीवी कोव्हिडं रुग्णालयाचे उदघाटन, 3 वाजता पालघर जिल्हाधिकारी यांच्यासोबत भेट
सांगली –
जिल्ह्यात आज दिवसभरात 1280 कोरोना रुग्ण
जिल्ह्यात आज कोरोनामुळे 24 रुग्णाचा मृत्यू
जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 2266 वर
ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 13148 वर
तर उपचार घेणारे 1026 जण आज कोरोना मुक्त
आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 60264 वर
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 75678 वर
सोलापूर-
उजनी धरणातील सोलापूर जिल्ह्याच्या वाटणीचे एक थेंबही इंदापूर साठी नेणार नाही या मताशी आजही ठाम
सोलापूरचे एक थेंबही पाणी घेतले तर आमदार की मंत्री आणि राजकारणातून कायमचा संन्यास घेईन
ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है हा हा माझा जुना व्हिडिओ मोडतोड करून केला जात आहे व्हायरल
पालकमंत्री सोलापूर मध्ये एक बोलतात आणि इंदापूरला एक बोलतात असा गैरसमज पसरविला जात आहे
काही राजकीय लोक विनाकारण गैरसमज पसरवत आहेत
पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांचे वक्तव्य