LIVE | नागपुरात पोलिसांच्या गाडीवर जमावाकडून दगडफेक

| Updated on: May 03, 2021 | 11:26 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | नागपुरात पोलिसांच्या गाडीवर जमावाकडून दगडफेक
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 May 2021 09:03 PM (IST)

    नागपुरात पोलिसांच्या गाडीवर जमावाकडून दगडफेक

    नागपूर शहरा अंतर्गत असलेल्या अजनी पोलीस ठाण्याच्या गाडीवर संतप्त जमावाने केली दगडफेक

    अजनी पोलीस टोळी परिसरात अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी गेले असता पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या गाडीवर तुफान दगडफेक

    या घटनेनंतर संपूर्ण टोळी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात, पोलीस आयुक्त अमितेशकुमार देखील घटनास्थळी गेल्याची माहिती पुढे आली आहे

  • 03 May 2021 09:02 PM (IST)

    आंबेडकरी चळवळीचे अभ्यासू नेतृत्व अशोक गायकवाड यांचे निधन

    आंबेडकरी चळवळीचे अभ्यासू नेतृत्व अशोक काशीनाथ गायकवाड यांचे चेंबूर इथे दुःखद निधन, त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यांच्या आईचाही कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाला होता. आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू व अग्रणी व्यक्तिमत्त्वात अशोकभाऊ काशिनाथ गायकवाड यांच्या नावाचा समावेश. ते 72 वर्षाचे होते. अशोक गायकवाड हे नगरपिता काशीनाथ गायकवाड यांचे सुपुत्र होते. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी जनतेत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.

  • 03 May 2021 07:44 PM (IST)

    इचलकरंजी शहरात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह, पोलीस घटनास्थळी दाखल

    इचलकरंजी : शहरातील अमराई रोड जवळील तांबेमळा येथे आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह, विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली होती, काही नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली, घटनास्थळी पोलीस दाखल, ही आत्महत्या की हत्या ही अजून समजू शकले नाही, गावभाग पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस घटनास्थळी हजर, तपास सुरू

  • 03 May 2021 07:29 PM (IST)

    यवतमाळमध्ये वातावरणात बदल, वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाचे आगमन

    यवतमाळ : यवतमाळमध्ये वातावरणात बदल, वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाचे आगमन, उकाड्यातून नागरिकांची सुटका, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

  • 03 May 2021 07:25 PM (IST)

    गोंदिया जिल्हात जोरदार वादळासह अवकाळी पावसाची हजेरी

    गोंदिया जिल्हातील आज अचानक काळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन जोरदार वादळ आणि विजेचा गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. या अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामात धान पिकांना आणि भाजीपाला पिकांना बसणार आहे. यामुळे शेतकरी राजा चिंतातुर झाला आहे

  • 03 May 2021 07:22 PM (IST)

    चुकीच्या पोस्ट समाज माध्यमांवर पसरविणाऱ्यांवर कारवाई करणार, नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

    नागपूर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या कथित सूचनांचा संदर्भ घेऊन जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या नावाने एक चुकीचा संदेश व्हॉटसअप ग्रुप व अन्य समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. अशा प्रकारचे कोणतेही वृत्त जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आलेले नाही. अशा चुकीच्या, गैरसमज व भीती पसरवणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिले आहेत.

  • 03 May 2021 06:24 PM (IST)

    बोरघाटात ट्रकचा अपघात, चालक ठार

    रायगड (खोपोली) : पँडंल खाली पाण्याची बाटली अडकल्याने बोरघाटात ट्रकचा अपघात, चालक ठार. मुबंई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात अडांपाईटं जवळ पुण्याकडे ट्रक जात असताना झाला अपघात. चालक दिपक वाघमारे रा. लोणीकदं याचा जागीच म्रुत्यू

  • 03 May 2021 05:48 PM (IST)

    नागपूरच्या काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात

    नागपूर :

    नागपूरच्या काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात

    वाढलेल्या उकळ्या पासून काहीशी राहत

    वातावरणात गारवा निर्माण झाला

    आज सकाळपासूनच ढगाळ वातवरण

    तापमानाचा पारा घसरला

  • 03 May 2021 04:48 PM (IST)

    भाजप नेते किरीट सोमय्या यांची रेवदंडा पोलीस ठाण्याला भेट

    रायगड :

    भाजप नेते किरीट सोमय्या यांची रेवदंडा पोलीस ठाण्याला भेट

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खरेदी केलेल्या कोर्लई येथील जमिनी संदर्भात केली होती तक्रार

    या तक्रारीचे पुढे काय झाले, याच्या चौकशीसाठी आले होते सोमय्या.

    पोलीस ठाण्याचे प्रभारी अशोक थोरात यांची भेट घेऊन केली चर्चा

    रेवदंडा पोलिसांनी अद्याप एफआयआर दाखल केला नाही.

    7 दिवसात एफआयआर दाखल झाली नाही तर उच्च न्यायालयात जाणार

    या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशीची मागणी.

  • 03 May 2021 04:21 PM (IST)

    रस्त्याच्या मध्यभागी मारोती ओमीनीने घेतला पेट, औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

    औरंगाबाद :

    रस्त्याच्या मध्यभागी मारोती ओमीनीने घेतला पेट,

    धावती ओमीनी दुभाजकाला धडकल्याने उलटताच घेतला पेट

    औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

    रस्त्यावरील वाहने बराच वेळ उभी असल्याने वाहतूक ठप्प

    वाहनातील महिला आणि चालक जखमी.

    पाचोड जवळील माळीवाडा येथील अपघात

  • 03 May 2021 04:18 PM (IST)

    पोटच्या दोन मुलांना सह मातेने घेतली तिसऱ्या मजल्यावरून उडी

    औरंगाबाद : पोटच्या दोन मुलांना सह मातेने घेतली तिसऱ्या मजल्यावरून उडी, एक वर्षीय सोहमचा जागीच मृत्यू, तर आई आणि दोन वर्षीय चिमुकलीची रुग्णालयात मृत्यूशी झुंज, अनिता सतीश आटकर असे जखमी विवाहितेचे नाव असून प्रतीक्षा असे जखमी चिमुकलिचे नाव आहे. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वाळूज औधोगिक नगरीतील बजाजनगर भागातील घटना, शेजाऱ्यांशी भांडण झाल्यानंतर महिलेने उचलले टोकाचे पाऊल, जखमींना हलविले घाटी रुग्णालयात, वाळूज एम.आय.डी. सी. पोलीस घटनस्थळी दाखल.

    सविस्तर बातमी वाचा :

  • 03 May 2021 03:00 PM (IST)

    पनवेलमध्ये लसीकरण केंद्रात हमरी तुमरी, लसींचा मोजकाच साठा उपलब्ध

    पनवेल मध्ये लसीकरण केंद्रात हमरी तुमरी

    संतप्त नागरिक आणि लसीकरण केंद्रातील आरोग्य कर्मचारी यांच्यात वाद

    नागरिकांशी अरेरावी करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

    पनवेल पालिका हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्र-१ मधील प्रकार

    लसींचा मोजकाच साठा उपलब्ध

    मोजकाच साठा उपलब्ध झाल्यामुळे गर्दी

  • 03 May 2021 02:08 PM (IST)

    बारामतीत 7 दिवस कडक लॉकडाऊन, मेडिकल वगळता सर्व अस्थापने बंद

    बारामतीत परवापासून कडक लॉकडाऊन

    मेडिकल आणि दवाखाने वगळता सर्व आस्थापना बंद

    – दूध विक्रीसाठी सकाळी 7 ते 9 पर्यंत मुभा

    – बारामतीत 7 दिवसांचा कडक लॉक डाऊन..

    – वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर बारामती प्रशासनाचा निर्णय

    – 5 ते 11 मे दरम्यान बारामतीत कडक लॉकडाऊन..

    – किराणा, भाजी मंडई बंद राहणार..

    – दूध विक्री सकाळी 7 ते 9 यावेळेत केली जाणार…

  • 03 May 2021 01:46 PM (IST)

    अकोल्यात महिला बालकल्याण मंत्री यांची पत्रकारांवर दादागिरी, मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न

    अकोला

    अकोला महिला बालकल्याण मंत्री यांची पत्रकारांनवर दादागिरी

    पत्रकार परिषद घेण्यासाठी बोलवण्यात आले होते

    त्यावेळी पत्रकार परिषद दिलेल्या वेळेत घेण्यात आली नाही

    त्याची विचारणा केली असता त्यांनी पत्रकारांशी दादागिरी केली

    व्हिडीओ काढण्यास केली मनाई

    Tv9 वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींचा मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न

  • 03 May 2021 12:02 PM (IST)

    नाशिकमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम आढावा बैठकीला सुरुवात

    नाशिक – खरीप हंगाम आढावा बैठकीला सुरुवात

    पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात

    अवकाळी मुळे झालेल्या नुकसानाची बैठकीत चर्चा सुरू

  • 03 May 2021 11:01 AM (IST)

    चौकशी अधिकाऱ्यांकडून छळ, चौकशीला स्थगिती द्या, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला हायकोर्टात

    वरिष्ठ आय पी एस अधिकारी रश्मी शुक्ला हायकोर्टात

    हैदराबाद हायकोर्टात याचिका दाखल

    मुंबई पोलिसांनी दिलेल्या समन्सच्या विरोधात रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद उच्च न्यायालयात धाव घेतली

    शुक्ला यांनी आपल्या याचिकेत मुंबई पोलिसांच्या समन्सला बेकायदेशीर म्हटले आहे

  • 03 May 2021 10:15 AM (IST)

    यवतमाळमध्ये वादळी वाऱ्याने घेतला दीड वर्षाच्या चिमुकल्याचा जीव

    यवतमाळ- वावटूळीने घेतला दीड वर्षाच्या चिमुकल्याचा जीव वादळी वारा घरात शिरला टिनाला लोखंडी अँगल ने बांधलेल्या पाळण्याला टिनासह वादळी वाऱ्याने घेतले कवेत हवेत 60 ते 70 फूट वर पर्यन्त टिन पत्रे पाळण्यासह गेली उडत इतक्या वरून खाली पाळणा कोसळण्याने बालकाचा मृत्यू मंथन सुनील राऊत असे बालकाचे नाव यवतमाळ च्या लोणी येथील घटना

  • 03 May 2021 10:11 AM (IST)

    मुंबई आणि गोवा NCB ची संयुक्त कारवाई, गोव्यातील ड्रग्सचे मुख्य पेडलर टायगर मुस्तफाला अटक

    मुंबई एनसीबी आणि गोवा एनसीबी यांनी संयुक्त कारवाई केली

    गोव्यातील ड्रग्सचे मुख्य पैडलर टायगर मुस्तफाला काल रात्री अटक केली.

    टायगर मुस्तफा समवेत एका हॉटेलच्या मालकाला ही अटक केली आहे.

    गेल्या आठवड्यात एनसीबीने छापा टाकला असता टाइगर मुस्तफा पळून जाण्यात यशस्वी झाला होता

    या छाप्यात एनसीबीने मोठ्या प्रमाणात ड्रग्ज ही जप्त केला आहे

  • 03 May 2021 10:10 AM (IST)

    चंद्रपूर वनविभागाच्या कार्यालयात शिरलेल्या अस्वलाला रेस्क्यू करण्यात यश

    चंद्रपूर : वनविभागाच्या कार्यालयात शिरलेल्या अस्वलाला रेस्क्यू करण्यात यश

    मूल शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात असलेल्या ताडोबा (बफर) च्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात सकाळी एक अस्वल शिरल्याचे लक्षात आले

    त्यानंतर स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि रॅपिड रेस्क्यू टीमच्या मदतीने या अस्वलीला डार्ट मारून बेशुध्द करण्यात आले

    सध्या या अस्वलाला चंद्रपूरच्या TTC (ट्रान्सीट ट्रीटमेंट सेंटर) ला आणण्यात आले असून त्याला लवकरच निसर्गमुक्त करण्यात येईल

  • 03 May 2021 09:22 AM (IST)

    पुणे विद्यापीठाची दुसऱ्या सत्राची परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता

    पुणे –

    – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची दुसऱ्या सत्राची परीक्षा ही जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता,

    – विद्यापीठाकडून परीक्षेच्या तयारीला सुरुवात,

    – सध्या विद्यापीठाची सुरु आहे प्रथम सत्राची परीक्षा,

    – 15 तारखेला संपणार विद्यापीठाची प्रथम सत्राची परीक्षा

    – मे अखेर वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता,

    – पुणे नगर ,नाशिक या तीन जिल्ह्यातील विद्यार्थी देणार परीक्षा,

    – परीक्षा होणार ऑनलाइनच !

  • 03 May 2021 09:21 AM (IST)

    औरंगाबादेत शेतात आढलेल्या बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू

    औरंगाबाद शेतात आढलेल्या बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू..

    काही दिवसांपूर्वी शेतात काम करत असताना एक बिबट्याचे पिल्लू आढळून आले

    परन्तु त्यानंतर जेव्हा त्याचा शोध घेतला तर ते मृतावस्थेत आढळले

    शेतात आढलेल्या नर जातीच्या 40 ते 45 दिवसाच्या बिबट्याच्या पिल्लाचा मृतदेह आढळून आल्याने हळहळ व्यक्त

    महिनाभरात तीन बिबट्यांच्या मृत्यूने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

    वेळेवर जर वनविभागाने दखल घेतली असती तर नक्कीच बिबट्याच्या पिल्लाचे प्राण वाचले असते अशी प्रतिक्रिया प्राणिप्रेमींकडून व्यक्त होतेय.

  • 03 May 2021 08:50 AM (IST)

    भीमा नदीवरील वडापूर बंधाऱ्याला गळती, हजारो लीटर पाणी वाया

    सोलापूर – गळतीमुळे वडापूर बंधाऱ्यातून हजारो लिटर पाणी वाया

    भीमा नदीवरील वडापूर बंधाऱ्याला गळती

    गेल्या दहा वर्षापासून या बंधाऱ्यात बंधाऱ्यांची दुरुस्ती झालीच नाही

    सध्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया

  • 03 May 2021 08:34 AM (IST)

    सातारा जिल्हयात मुसळधार पाऊस, वीज पडून 3 जणांचा मृत्यू

    सातारा जिल्हयात मुसळधार पाऊस

    खंडाळा आणि माण तालुक्यात वीज पडून 3 जणांचा मृत्यू

    तर दोन ठिकाणी वीज पडून मंदिर आणि घराचे नुकसान

  • 03 May 2021 08:33 AM (IST)

    नाशिक जिल्ह्याला पुन्हा गारपिटीचा फटका, कांदा, गहू, द्राक्षाला फटका

    नाशिक – जिल्ह्याला पुन्हा गारपिटीचा फटका

    ऐन मे महिन्यात अवकाळीचा कहर

    नाशिक शहरासह, इगतपुरी, बागलाण, सुरगाणा सिन्नर तालुक्याला अवकाळीने झोडपले

    कांदा, गहू, द्राक्षासह इतर भाजीपाल्याला देखील फटका

    आणखी तीन दिवस मध्यम पाऊस राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज

  • 03 May 2021 07:45 AM (IST)

    राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

    पुणे –

    – राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता,

    – याआधीच पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांना अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलंय,

    – त्याचबरोबर राज्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे,

    – काल पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं आहे,

    – त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पीकांवर ताडपत्री अथवा इतर प्लॅस्टिकचं आवरण झाकावं असा सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

  • 03 May 2021 07:45 AM (IST)

    इचलकरंजीत कर्नाटकहून महाराष्ट्रात आणण्यात येणारा पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त

    इचलकरंजी

    गावभाग पोलीस यांनी गाडीसह पाच लाख रुपयांचा गुटखा केला जप्त

    कर्नाटकहून महाराष्ट्र राज्यात गुटखा आणला जात होता

    नाकाबंदीच्या दरम्यान पोलिसांनी पकडले

    पोलिसांनी दोन लाख रुपयांचा गुटखा व तीन लाख रुपयांची गाडी केली जप्त

    श्रीकांत गोळे ठीनवर याच्यासह नितीन केळकर एकाला घेतली ताब्यात

    पोलिसांनी पाटला करून पकडला टेम्पो लोक डॉन मधील मोठी कारवाई

    सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार पीएसआय रोहन पाटील मंगेश दगडे यांची कारवाई

  • 03 May 2021 07:43 AM (IST)

    नागपुरातील मनरेगाच्या कार्यालयात आग, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कागदपत्र जळाली

    – नागपूरातील मनरेगाच्या कार्यालयात आग लागून महत्त्वाचे कागदपत्र जळाले

    – आगीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कागदपत्र जळाली

    – रविवारी लागलेल्या आगीत मोठं नुकसान

    – आगीत कार्यालयातील संगणक, फर्निचर जळालं

    – अडीच तासांनंतर आग विझवण्यात अग्निशमन विभागाला यश

    – आग कशामुळे लागली याचा शोध सुरु

  • 03 May 2021 07:42 AM (IST)

    चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन मधील कोल हँडलिंग प्लांटला मोठी आग

    चंद्रपूर : चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन मधील कोल हँडलिंग प्लांटला मोठी आग

    पॉवर स्टेशन च्या युनिट नंबर 8 आणि 9 साठी या कोल हँडलिंग प्लांटचा वापर होत होता,

    रात्री अचानक या कोल हँडलिंग प्लांटच्या क्रशर हाऊसमध्ये आग लागली

    ज्या मध्ये या प्लांटचं मोठं नुकसान झालं, आगीचे कारण मात्र अज्ञात

  • 03 May 2021 07:17 AM (IST)

    बदलापूरच्या तरुणाची इस्त्रोच्या ज्युनिअर सायंटिस्ट पदावर झेप

    बदलापूरातील रिक्षाचालक सुरेश पाटील यांचे सुपुत्र देवानंद याची इस्रो संस्थेत ज्युनिअर सायंटिस्ट पदावर निवड झाली आहे.

    देवानंदने मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं असून सध्या तो जमशेदपूर येथील टाटा स्टिल कंपनीत ज्युनियर इंजिनियर पदावर कार्यरत आहे.

    देवानंदला टाटा स्टील कंपनीत नोकरी मिळाल्यानंतरही त्याने अनेक परीक्षा दिल्या.

    त्यातलीच एक परीक्षा पास होऊन देवानंदची इस्रो (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) या अंतराळ संशोधन संस्थेत जूनियर सायंटिस्ट पदावर निवड झाली आहे.

  • 03 May 2021 07:16 AM (IST)

    अकोल्यात ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता

    अकोल्यात सकाळपासून ढगाळ वातावरण,

    सकाळपासून सूर्यदर्शन नाही, पावसाची शक्यता

  • 03 May 2021 07:14 AM (IST)

    मुरबाडमध्ये गारांचा पाऊस, गारपीटीमुळे घरांची कौल आणि काचेच्या खिडक्या फुटल्या

    मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागात गारांचा पाऊस

    माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या हाल्याची वाडी, मेर्दी, मोधळवाडी, केळेवाडी वाल्हीवरे, धारखिड बांडेशेत या भागात जोरदार गारपीट

    गारपीटीमुळे घरावरचे कौलं आणि काचेच्या खिडक्या सुद्धा फुटल्या

    उन्हाळी शेती करणाऱ्या आदिवासी बांधवाचं मोठे नुकसान

    संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास झाली गारपीट

    जमिनीवर गारांचे जाड थर झाले जमा

  • 03 May 2021 07:13 AM (IST)

    पनवेलमध्ये चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड

    पनवेल
    पनवेलमधील पटेल हॉस्पिटलमध्ये चुकीच्या पद्धतीने उपचार केले म्हणून रुग्णाच्या नातेवाईकांची हॉस्पिटलमध्ये तोडफोड
    वकील अश्विनी थवई (36) यांचा मृत्यू
    पोटातील पिशवी साफ करण्यासाठी अश्विनी थवई या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या
    भूल जास्त प्रमाणात देण्यात आली, त्यामुळे रक्तस्राव जास्त झाले
    मात्र नातेवाईकांना कळवण्यात आले नाही
    पटेल हॉस्पिटलमध्ये या रुग्णच्या कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होता
    ऍडमिट करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र चुकीचे उपचार केले असा आरोप नातेवाईकांनी केला आहे
  • 03 May 2021 07:10 AM (IST)

    पश्चिम बंगालची जनता धूर धुक्यात हरवली नाही, कृत्रिम लाटेत वाहून गेली नाही, शिवसेनेचा टोला 

    पश्चिम बंगालची जनता धूर धुक्यात हरवली नाही, कृत्रिम लाटेत वाहून गेली नाही, शिवसेनेचा सामनाच्या अग्रलेखातून टोला

    ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने अत्यंत स्पष्ट बहुमत मिळविले. मोदी-शहा यांनी कृत्रिम ढगांचा गडगडाट केला, पण जमिनीवरील लाट ही प्रत्यक्षात ममता बॅनर्जी यांचीच होती. याचा अर्थ असा की, मोदी-शहांच्या भाजपकडे निवडणुका जिंकण्याचे तंत्र व यंत्र असले तरी ते अजिंक्य नाहीत व त्यांच्या बोलघेवडेपणावर शहाणीसुरती जनता विश्वास ठेवेलच असे नाही. प. बंगालची वाघीण ऐन निवडणुकीत जखमी झाली. त्या जखमी वाघिणीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. प. बंगालच्या जनतेचेही अभिनंदन करावे तेवढे थोडेच. प. बंगालची जनता धूर धुक्यात हरवली नाही. कृत्रिम लाटेत वाहून गेली नाही. आपल्या मातीतील माणसांच्या प्रतिष्ठेसाठी बंगाली जनता ठामपणे उभी राहिली. देशाने प. बंगालकडून शिकावे, असा प्रसंग घडला आहे!

Published On - May 03,2021 9:03 PM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.