महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
मुंबई : मराठा आरक्षणावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
राखीव निकालावर होणार सुनावणी
सर्वोच्च न्यायालयाचं खंडपीठ घेणार सुनावणी
उद्या मराठा आरक्षणावर अंतिम निकाल होईल का याबाबत संभ्रम कायम
टिटवाळ्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टिटवाळ्यानजीक रुंदे पूलाखाली एका तरुणाचा मृतदेह नदीत सापडला आहे. धक्कादायक म्हणजे तरुणाच्या शरीराचे तुकडे करुन एका प्लास्टीक गोणीत टाकून ती गोणी एका बाईकला बांधून फेकण्यात आली आहे. बाईकला बांधलेली गोणी दिसल्यावर काही लोकांनी ही माहिती टिटवाळा पोलिसांना दिली. सध्या या प्रकरणाचा टिटवाळा पोलीस तपास करीत आहे. जी बाईक मृतदेहाच्या तुकड्यांसोबत मिळून आली. तिचा नंबर एमएच-०५ ए वाय ३६७७ असा आहे.
“परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद, त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाची बदली झाल्यानंतर माझ्यावर आरोप केले. परमबीर सिंग यांच्याप्रकरणी रोज नव्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे”, अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची बदली. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादीत, मुंबई या पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे.
“पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते उद्या, बुधवारी राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने करणार आहेत”, अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
औरंगाबाद :-
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहरात दुकानांना भीषण आग
भोकरदन रोडवरील दुकानांना लागली भीषण आग
आगीत चार ते पाच दुकाने जळून खाक
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
आगीत लाखो रुपयांचे झाले नुकसान
एक तास उलटूनही पोचले नव्हते सिल्लोड नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन
टँकरच्या पाण्याने नागरिकांना विझवावी लागली आग
कोल्हापूर :
गोकुळ दूध संघाच्या निकालात सतेज पाटील गटाचं पारडं जड
सतेज पाटील गट आणि महादेवराव महाडिक गटात यांच्यात चुरस कायम
दोन्ही गटातील उमेदवारांमध्ये काही मतांचाच फरक
शेवटपर्यंत निकालाची उत्सुकता राहणार
औरंगाबाद :-
कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून माजी आमदाराच्या मुलाचे थाटात लग्न
लग्नासाठी झाली शेकडो लोकांची गर्दी
पैठणचे राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाकचौरे यांच्या मुलाचं होतं लग्नाला
लग्नाला शेकडो नातेवाईक आणि आप्तेष्टांची जमली गर्दी
संचारबंदी आणि कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून लावलं लग्न
लग्नाला शिवसेना मंत्री संदीपान भुमरे यांनीही लावली उपस्थिती
औरंगाबाद जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव या गावात लागलं लग्न
सांगली जिल्ह्यातील मिरजेत विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस
गेल्या अर्ध्या तासाहून अधिक वेळाने पाऊस पडतोय
वाहनचालक हैराण, उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा
कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात उद्या दुपारपासून कडक लॉकडाऊन
कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती
थोड्याच वेळात नियमावली जारी केली जाणार
कोल्हापूर जिल्ह्यात पुढचे 10 दिवस कडक लॉकडाऊन
भिवंडी :
भिवंडी तालुक्यातील वळगाव हद्दीत फर्निचर गोदामास भीषण आग,
घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल
कल्याण : मेल एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक,
कल्याण जीआरपी पोलिसांची कारवाई,,,,
कल्याण आणि कसारा दरम्यान कुशी नगर एक्सप्रेस मध्ये प्रवाशांना लुटीच्या होता कट,
पाचवा आरोपीच्या शोधात रेल्वे पोलिस,
पाचही दरोडेखोरांची जेल मधून 10 दिवसांपूर्वीच झाली होती जमीनवर सुटका ,
पुढील तपास सुरु
सोलापुर : सकाळी 11 नंतर विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांची कारवाई
शहरात 13 ठिकाणी नाकाबंदी करून कारवाई
दुचाकीवर फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई
विरार:- अर्नाळाच्या खोल समुद्रात भरकटलेला रानडुकरांचा दुर्मिळ कळप
सकाळी नऊ ते साडे नऊ च्या सुमारास मासेमारी करणाऱ्या बोटीला हा कळप दिसला
मासेमारी करणाऱ्या बोटीने त्यांना खोल समुद्रातून किनाऱ्याला ही लावण्याचा प्रयत्न केला पण बोटीच्या आवाजाने रान डुकरांचा कळप समुद्रातच गेला आहे.
पालघर ताल्युक्यातील डोंगराळ भागातून हा कळप समुद्रात येऊन भरकटून समुद्राच्या मध्यभागी अर्नाळा किल्ला परिसरात आला असावा असा अंदाज ही व्यक्त करण्यात आला आहे.
अहमदनगर : भाजीपाला विक्रीस बंदी असताना अनेक ठिकाणी भाजी विक्री सुरू,
भाजी घेण्यासाठी नागरिक करताय गर्दी,
तर अनेक ठिकाणी नाका बंदी, जिल्हा बाहेरून येणाऱ्याची पोलीस करताय चौकशी
वसई :- वसईच्या खोल समुद्रात एक जेसीबी बुडाला
काल दुपारच्या सुमारास पाचूबंदर किनाऱ्यावर असणारी एक बोट अचानक किनाऱ्यावरून सुटली आणि ती वाहत वाहत खोल समुद्रात रानगाव आणि मर्सेस च्या दरम्यान समुद्रात अडकली.
अडकलेल्या बोटीला काढण्यासाठी हा जेसीपी त्या ठिकाणी गेला मात्र अचानक समुद्राला भरती आल्याने जेसीपी पाण्यात रुतला आणि त्याच ठिकाणी अडकून पडलेला आहे.
सुदैवाने ड्रायव्हर हा सुखरूप बाहेर आलेला आहे.
अडकलेली बोट देखील बाहेर आहे
मात्र आज जेसीपी अद्यापही पाण्यात आहे.
समुद्राचं पाणी जेव्हा ओसरेल त्यावेळी हा जेसीपी बाहेर येऊ शकतो.
कोल्हापूर
गोकुळ निवडणुकीतील पहिला कल विरोधकांच्या बाजूने
भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातील बयाजी शेळके आघाडीवर
कोल्हापूर
गोकुळ दूध संघ निवडणूक
प्रवर्ग निहाय मतपत्रिकांच वर्गीकरण पूर्ण
आता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात
सर्वात आधी आरक्षित पाच जागांची मतमोजणी होणार
लकवरच येणार पहिला निकाल हाती
कोल्हापूर : गोकुळ दूध संघ निवडणूक
प्रवर्ग निहाय मतपत्रिकांच वर्गीकरण पूर्ण
आता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात
सर्वात आधी आरक्षित पाच जागांची मतमोजणी होणार
लवकरच येणार पहिला निकाल हाती
सोलापूर –
माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांचे निधन
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुणे येथील एका खासगी रुग्णालयात पहाटे निधन
मृत्यूसमयी ते 82 वर्षांच्या होत्या
अनुराधा ढोबळे सावली वूमन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा
त्यांच्या पश्चात पती लक्ष्मण ढोबळे, मुलगा अभिजित सुन आणि दोन मुली ,जावई असा परिवार
औरंगाबाद शहरातील सातारा परिसरात असलेल्या वृंदावन कॉलनीत आढळले धामण जातीचे दोन मोठे साप
परिसरात भीतीचं वातावरण
सर्पमित्र मनोज गायकवाड यांच्याकडून दोन्ही सापांना पकडून जंगली आदिवसात मुक्तता
दोन्ही सापांना पकडतानाचा थरारक व्हिडीओ व्हायरल
या दोन्ही सापांचा सुरुवातीला बराच काळ परिसरात मुक्त खेळ सुरू होता
पण त्यांना मानवी अधिवासाचा धोका होऊ नये म्हणून या सापांची सुटका करत जंगली अधिवासात मुक्तता करण्यात आली.
नाशिक –
गेल्या दोन दिवसांत अचानक छातीत दुखू लागल्याने पुन्हा पाच जणांचा मृत्यू
याआधी देखील चक्कर येऊन अचानक छातीत दुखू लागल्याने अनेकांचे झाले आहेत मृत्यू
वारंवार अशा घटना घडत असल्याने प्रशासनापुढे नव संकट
अचानक होणाऱ्या मृत्यबाबत मात्र संभ्रम
मुंबई –
लॉकडाऊनमध्ये झालेले स्थलांतर देशातील उत्तर, पूर्व आणि उत्तर पूर्व भागात आतापर्यंत 7 लाख 41 हजार जणांचे झाले स्थलांतर
गेल्यावर्षी केलेल्या लॉकडाऊनमध्ये 4 लाख 9 हजार जणांनी केले होते स्थलांतर
गेल्यावर्षीच्या तुलनेत अडीच लाखांचे अधिकचे स्थलांतर झाले
ही आकडेवारी एका महिन्यात झालेले स्थलांतराची आहे
मध्य व पश्चिम रेल्वेची माहिती
औरंगाबाद –
शेतीच्या वादातून दोन गटात तुफान मारहाण
फुलंब्री तालुक्यातील पिरबावडा गावात घडली घटना
मारहाणीत दोन्ही बाजूचे तीन ते चार व्यक्ती जखमी
लाठ्या काठ्या दगड आणि विटांनी झाली मारहाण
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल
भावकीच्या लोकांमध्ये अनेक दिवसांपासून होता शेतीचा वाद
शेतीच्या वादातून झाला जोरदार राडा
वर्धा
# पोह्याच्या पोत्यांमागून सुगंधित तंबाखुची वाहतूक
# वर्ध्यात सुगंधी तंबाखू जप्त
# रायपूरहून नांदेडला ट्रकमध्ये भरून नेला जात होता तंबाखु
# 18 लाखांचा तंबाखू, 10 लाखांच वाहन असा 28 लाखांचा मुद्देमाल जप्त
# दोन जण पोलिसांच्या ताब्यात
# रामनगर पोलिसांनी केली कारवाई
मुंबईी मुलुंड पश्चिमेत आशा नगर परिसरात असलेला नंदनवन इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास अचानक मोठी आग लागली होती, या आगीच्या घटनेत चार गाळे पूर्णपणे जळून खाक झाले आहेत, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळावर रवाना झाल्या असून जवळपास तीन तास नंतर आगीवर नियंत्रण आणण्यास यश आलं, सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारच्या जखमी किंवा जीवित हानी झाली नसून सर्व सामान जळून खाक झालं आहे, आग लागण्याचं कारण अद्याप अस्पष्ट असून शॉट सर्किटमुळे आग लागल्या असा संशय