LIVE | संगमनेरमध्ये पोलिसांवर जमावाचा हल्ला, 6 जणांसह अज्ञातांविरोधात हल्ला
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
संगमनेरमध्ये पोलिसांवर जमावाचा हल्ला, 6 जणांसह अज्ञातांविरोधात हल्ला
अहमदनगर : पोलिसांवर दगडफेक करत जमावाचा हल्ला
संगमनेर शहरातील धक्कादायक घटना
संचारबंदीच्या काळात गस्त घालत असताना केला हल्ला
जमावबंदीचे आदेश असताना गर्दी का केली विचारले असता हल्ला
संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरातील घटना
संध्याकाळी 6.30 च्या सुमारास घडली घटना
6 जणांसह अज्ञात जमावाविरोधात गुन्हा दाखल
हल्ल्याचा व्हीडिओ सोशल मिडियावर व्हायरल
-
शहापूर तालुक्यात 14 वर्षीय मुलाचा अंगावर वीज पडून मृत्यू
ठाणे : शहापूर तालुक्यातील फर्डेपाडा गावातील पारस अरुण फर्डे या 14 वर्षीय मुलाच्या अंगावर वीज पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे
शेतावर गेलेला असताना तेथे वीज पडून झाला मृत्यू
-
-
लासलगाव तसेच इतर परिसरात पावसाची हजेरी, कांदा कांदा पिकाला फटका बसणार
नाशिक : लासलगाव तसेच इतर परिसरात अर्धा तास पावसाची जोरदार हजेरी
– काढणीला आलेल्या कांदा आणि इतर पिकांना बसणार फटका
– उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा
-
उस्मानाबादेत मृतदेहांचा सावळा गोंधळ, एकाच वृद्ध महिलेचा मृतदेह दोन वेळा देण्याचा प्रकार
उस्मानाबाद -एकाच वृद्ध महिलेचा मृतदेह दोन वेळा देण्याचा धक्कादायक प्रकार उघड
रक्षाविसर्जन करुन घरी आजीचा मृतदेह घेऊन जा, म्हणून आला फोन
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत
जिल्हा शासकीय रुग्णालयात मृतदेहाचा सावळा गोंधळ उघड
उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथील 70 वर्षीय महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल
-
इंदोरीकर महाराजांविरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल
इंदोरीकर महाराजांविरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल
पुत्रप्राप्ती संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर अंनिसने केली याचिका
संगमनेर जिल्हासत्र न्यायालयाने खटला रद्द केल्यानंतर अंनिसची उच्च न्यायालयात याचिका
आठ आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार
इंदोरीकर महाराजांसह सरकारी पक्षाला केले प्रतिवादी
अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या राज्यसचिव तथा याचिककर्त्या रंजना गवांदे यांची माहिती
-
-
मराठा आरक्षणासाठी अजूनही दरवाजा खुला, केंद्राने आरक्षण द्यावे- अशोक चव्हाण
मुंबई : साडे पाचशे पानी निकाल आला आहे. ते पाहता आपल्याकडे आजूनही दरवाजा खुला आहे. केंद्र सरकारच्या मागास आयोगाकडे आपल्याकडे कागदपत्रं सोपवता येतील. त्यानंतर केंद्र सरकार, राष्ट्रपती आणि राष्ट्रीय मागास आयोग यांच्याकडून मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला जाऊ शकतो, असे अशोक चव्हाण म्हणाले.
तसेच त्यांनी फडवीस यांना आवाहन केले आहे. त्यांनी फडणवीस यांना महाराष्ट्र शांत आहे. सध्या कोरोना सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये जो कोणी सहकारी चिथावणी देत असतील त्या सहकाऱ्यांना सांगावं, असे चव्हाण म्हणाले. महाराष्ट्रात सत्तेसाठी तसेच राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ज्यांनी जो उद्योग सुरु केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेने सहभागी होऊ नये. सर्वेच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर पुढचे पाऊल उचलण्यासाठी आपण सज्ज आहोत. त्यामुळे कोरोनाची स्थिती असताना कृपया चिथावणी देण्याचे काम कोणीही करु नये, असे चव्हाण म्हणाले.
काल दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्राला आरक्षण देण्याचा अधिकार राहिलेला नाही. अशा प्रकारे घेतलेला निर्णय हा वैध ठरत नाही. तीन विरुद्ध दोन न्यायाधीशांनी जजमेंट दिले आहे. त्यामुळे आधीच आमच्याकडे आरक्षण देण्याचा अधिकार राहिलेला नाही. केंद्राने निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावा अशी मागणी विरोधकांनी यापूर्वीच करायला हवा. आज केंद्रात सत्ता भाजपची आहे. भाजपने राम मंदीर, कलम 370 जसे निर्णय घेतले, तसाच आरक्षणाचा मुद्दा हाताळायला हवा होता. आरक्षणाचा अधिकार केंद्राचा आहे. त्यामुळे फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारकडून आरक्षण मंजूर करुन घेतलं असतं तर राष्ट्रपतींची सही मिळाली असती.
आपला हा न्यायालयीन लढा आहे. आपण सगळे एक आहोत. राजकीय फायद्यासाठी चुकीचे विधान करु नये, असे माझे आवाहन चव्हाण यांनी केला. आता नव्याने केंद्र सरकारकडे जाऊन, मराठा समाजासाठी आरक्षण देण्यासाठी लढायचं आहे. मराठा आरक्षणावर राष्ट्रपतींची स्वक्षरी मिळवाची आहे. आमच्यात संवाद नव्हता. समन्वय नव्हता हे आरोप फक्त खोडसाळपणे करण्यात आले आहेत. आगामी काळात एक दोन दिवसांत मंत्रिमंडळाची बैठक घेऊन पुढची पावलं टाकण्यात येणार आहेत. तसेच यापूर्वी राज्य सरकारने ज्या योजना जाहीर केल्या आहेत, त्यांचा पाठपुरावा करुन त्यांची अंमलबजावणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.
माझा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही
मी माझा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे विरोधकांना माझा अधिकार राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही, असेसुद्धा चव्हाण म्हणाले. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना फायदा होण्यासाठी महाराष्ट्राची दिशाभूल करण्यासाठी मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असा माझे स्पष्ट मत आहे. सुप्रिम कोर्टाने जजमेंट दिला आहे. कोणत्याही राज्याला कोणत्याही सामाजिक घटकाला मागासलेपण असल्याचा निर्णय घेण्यचा अधिकार राहिला नाही. तो अधिकार आता केंद्राकडे आहे. केंद्रीय मागास आयोगाला हे अधिकार आहेत. केंद्र निर्णय घेऊन नंतर तो राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवला जाईल. नंतर मग मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल. 102 वी घटना दुरुस्ती करताना केंद्राने कोणत्याही समाजाला मासाग ठरवण्याचा राज्यांचा अधिकार अबाधित असल्याचा दावा केला होता. मात्र, आता कोर्टाने वेगळाच निर्णय दिला आहे. त्यामुळे आता केंद्राने मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. कोर्टाचे ऑब्झर्वेशन यांच्या अस्तित्वाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. फडणवीस आमचा कायदा परिपूर्ण असल्याचे सांगितले होते. मात्र, आता कुठे चूक झाली, असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला.
-
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर भिवंडीत सकल मराठा संघटनतर्फे आंदोलन
भिवंडी : मराठा समाजास आरक्षण नाकारल्याने भिवंडीत सकल मराठा संघटनतर्फे शिवाजी चौक येथे आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर मुंडन करून नोंदविला निषेध
-
वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस
वाशिम : वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस
रिमझिम पावसाला सुरुवात
-
राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड
पुणे : राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड
भापज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले काकडे यांना नियुक्तीपत्र
-
साताऱ्यात राष्ट्रवादी कार्यालयासह काँग्रेसच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींची दगडफेक
सातारा –
राष्ट्रवादी कार्यालयासह काँग्रेसच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींची दगडफेक
कारमधुन आलेल्या व्यक्तीं दगडफेक करुन झाल्या फरार
मराठा आरक्षण रद्द केल्याचा निषेधार्थ हे कृत्य केल असल्याचा प्राथमिक अंदाज…
सातारा शहर पोलिसांकडुन संबधित कारचा शोध सुरु….
आ.शशिकांत शिंदे यांनी केलेल्या कृत्याचा तीव्र शब्दात केला निषेध
-
राष्ट्रवादी कार्यालयासह काॅग्रेसच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींची दगडफेक
सातारा: राष्ट्रवादी कार्यालयासह काॅग्रेसच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींची दगड फेक…
कारमधुन आलेल्या व्यक्तीं दगडफेक करुन झाल्या फरार…
मराठा आरक्षण रद्द केल्याचा निषेधार्थ हे कृत्य केल असल्याचा प्राथमिक अंदाज…
सातारा शहर पोलिसांकडून संबधित कारचा शोध सुरु….
आ.शशिकांत शिंदे यांनी केलेल्या कृत्याचा तीव्र शब्दात केला निषेध
-
मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन भाजपने राजकारण करु नये, राष्ट्रवादीच्या आमदाराचा इशारा
मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन भाजपने राजकारण करु नये…,आ.शशिकांत शिंदेचा भाजपला इशारा
रेमडिसिव्हर,ED,CBI या सर्वाच्या राजकारणात महाराष्ट्र पिचला आहे आता मराठा बांधवाच्या खाद्यावर बंदुक ठेऊन राजकारण करु नये..
समाज तुम्हाला माफ करणार नाही
राष्ट्रवादी पक्ष जशासतसे उत्तर देणार
-
बीडमधील मराठा आरक्षण संदर्भातील बैठक संपली, उद्या जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन
बीड :
मराठा आरक्षण संदर्भातील बैठक संपली
उद्या जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन
लॉकडाऊन संपल्यावर 16 तारखेला मोर्चाचे आयोजन
सरकारची डोकेदुखी वाढणार
राज्यभरात मोर्चे निघणार
मोर्चाची सुरुवात बीड मधून होणार
-
कराडमध्ये तहसील कार्यालयासमोर मराठा तरुणांचे मुंडन आंदोलन
कराड : पाटण तहसील कार्यालयासमोर मराठा तरुणांचे मुंडण आंदोलन
मराठा क्रांती चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केले मुंडण आंदोलन
मराठा आरक्षणाबाबत ठोस भुमिका न मांडणार्या राज्यकर्त्यांचा केला मुंडण करुन निषेध
-
बीडमध्ये मराठा आरक्षण संदर्भातील बैठक संपली, उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार
बीड: मराठा आरक्षण संदर्भातील बैठक संपली
उद्या जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन
लॉकडाऊन संपल्यावर 16 तारखेला मोर्चाचे आयोजन
सरकारची डोकेदुखी वाढणार
राज्यभरात मोर्चे निघणार
मोर्चाची सुरुवात बीड मधून होणार
-
मराठा आरक्षणासाठी विनोद पाटील पुन्हा ठोठावणार न्यायालयाचे दार
औरंगाबाद –
मराठा आरक्षणासाठी विनोद पाटील पुन्हा ठोठावणार न्यायालयाचे दार
सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार पुनर्विचार याचिका
मराठा आरक्षणासाठी दाखल करणार पुनर्विचार याचिका
नवीन मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार
इतर राज्यातील आरक्षणाची स्थिती न्यायालयाच्या आणणार निदर्शनास
इतर राज्याच्या धर्तीवर करणार आरक्षणाची मागणी
तीस दिवसांच्या आत करणार दाखल पुनर्विचार याचिका
-
मीरा-भाईंदरमध्ये मराठा समाजाकडून निषेध आंदोलन
मीरा भाईंदर :- मीरा भाईंदर परिसरातील गोल्डन नेस्ट चौकावर सकल मराठा समाज मीरा भाईंदरतर्फे आंदोलन करण्यात आलं. आंदोलन करणारे सर्व मराठा समाजाचे नागरिकांना नवघर पोलिसांनी ताब्यात घेतला. मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णयामुळे मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी आहे.
मराठा समाजाला शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये दिलेल्या आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती . त्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी मराठा आरक्षण अवैध असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सुनावल्यामुळे मीरा भाईंदर मध्ये गुरुवारी सकाळी ९ वाजता निषेध आंदोलन करण्यात आले.
-
सकल मराठा समाज मीरा-भाईंदर तर्फे आंदोलन करण्यात आलं
मीरा-भाईंदर –
मीरा-भाईंदर परिसरातील गोल्डन नेस्ट चौकावर सकल मराठा समाज मीरा-भाईंदर तर्फे आंदोलन करण्यात आलं
आंदोलन करणारे सर्व मराठा समाजाचे नागरिकांना नवघर पोलिसांनी ताब्यात घेतला
मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णयामुळे मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी आहे
-
मराठा आरक्षण रद्द, प्राध्यापक, शिक्षक भरती, एमपीएससीच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता
पुणे –
मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानं भरती प्रक्रीयेला बसणार मोठा फटका
लाखो पदांची भरती प्रक्रीया रखडणार
प्राध्यापक,शिक्षक भरती, एमपीएससीच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता
जाहीरात काढलेल्या जागांमध्ये आरक्षणानुसार करावा लागणार फेरबदल
परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊनही नियुक्त्या न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मराठा आरक्षण रद्दचा बसणार मोठा फटका
राज्य सरकारने लवकरात लवकर भूमिका जाहीर करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
-
सांगलीत कारागृहात युवकाची आत्महत्या
सांगली –
कारागृहात युवकाची आत्महत्या, दीपक आबसो आवळे असे नाव
वय 20 राहणार सांगली इंदिरानगर
चोरी प्रकरणातील मधील सवसयित आरोपी
9.30 वाजता कारागृहात टॉवेलने गळफास घेत केली आत्महत्या, कारण अज्ञाप अस्पष्ट
5-6 महिन्यापूर्वी गुन्ह्यात कारागृहात गेला होता
तासगांव सांगली शहरामध्ये होता गुन्हा दाखल
-
सोलापुरात भाजी विक्री करण्यासाठी दिलेल्या मोकळ्या जागेत गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरु
सोलापूर –
गर्दी काढण्यासाठी पोलिसांकडून माईक वरून सूचना
भाजी विक्री करण्यासाठी दिलेल्या मोकळ्या जागेत गर्दी होऊ नये म्हणून दिल्या जात आहेत वारंवार सूचना
शहरातील चार भाजीमंडई चे मोकळ्या जागेत करण्यात आले आहे स्थलांतर
-
बीकेसीतील लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांचा गोंधळ
– बीकेसीतील लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांचा गोंधळ
– बीकेसीत आज दुसरा डोस होणार नाही
– केवळ १८-४४ मधले केवळ ५०० लोकांचं होणार वॅक्सिनेशन
– वॅक्सिनेशन सेंटरबाहेर पोलिसांचीही सुरक्षा वाढवली
– मनपाचे अधिकारी नागरीकांना परत जाण्याचं करत आहेत आवाहान
– दुसऱ्या डोजसाठा आलेल्या लोकांची पायपीट
-
ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने अपघात, दोघांचा मृत्यू, खोपोलीतील घटना
रायगड –
ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने अपघात, दोघांचा मृत्यू, मात्र क्लीनर सुखरुप.
मुबंई-पुणे एक्सप्रेस हायवेने खोपोली एक्झिट मार्गे खोपोलीतील इदिंरा गांधी चौकात सिमेटं च्या गोण्याने भरलेला ट्रक तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावरच पलटी झाला.
प्रसगांवधान साधुन ट्रक चालकाने चालत्या ट्रक मधुन उडी घेतली मात्र ट्रक चालकासह एका पादचा-याचा म्रुत्यु. मात्र क्लीनर सुखरुप.
सिमेटंच्या गोण्या रस्त्यावर पडल्याने काही काळ जुना मुबंई पुणे हायवेची पुण्याहुन मुबंईकडे जाणारी वाहतुक विस्कळीत.
स्थानिकाच्यां मदतीने पोलीस यत्रंणा, आय आर बी यत्रंणा रस्ता मोकळ्या करण्यासाठी मदत कार्य करीत आहे.
-
जायकवाडी धरण प्रशासनाने एका वर्षात वसूल केली 26 कोटींची पाणीपट्टी
औरंगाबाद –
जायकवाडी धरण प्रशासनाने एका वर्षात वसूल केली 26 कोटींची पाणीपट्टी
20 कोटी रुपये पाणीपट्टी वसुलीचे होते उद्दिष्ट
तरीही बिगर सिंचनाच्या थकबाकीचा आकडा 94 कोटींवर..
जायकवाडीतून औद्योगिक कंपन्या, कृषी सिंचन,आणि पिण्यासाठी होतो पाणीपुरवठा..
20 कोटी पेक्षा जास्त रुपयांची वसुली करत यावर्षीचे उद्दिष्ट पूर्ण
-
निवृत्ती महाराज इंदोरीकर प्रकरण आता उच्च न्यायालयात
औरंगाबाद –
निवृत्ती महाराज इंदोरीकर प्रकरण आता उच्च न्यायालयात
महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे इंदुरीकर महाराजांना हायकोर्टाची नोटीस..
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बजावली नोटीस..
कीर्तनात महिलां संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा इंदुरीकर महाराजांवर आरोप..
सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात तक्रार कर्त्यांनी खंडपीठात मागितली दाद..
पुढील सुनावणी होणार एक आठवड्यानंतर..
-
नाशिकमध्ये सिडकोच्या सिंहस्थ नगरमध्ये बिबट्याची दहशत
नाशिक –
सिडकोच्या सिंहस्थ नगरमध्ये बिबट्याची दहशत
बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद
अश्विन नगर परिसरात बिबट्या असल्याची चर्चा
बिबट्या समोरून गेल्याने गाडीवरच नियंत्रण सुटल्याने तरुण जखमी
वनविभागाने सुरू केलं सर्च ऑपरेशन
-
पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मतिमंद मुलीवर 23 वर्षीय तरुणाचा बलात्कार
पिंपरी चिंचवड
-अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार
-अल्पवयीन मतिमंद मुलीवर 23 वर्षीय तरुणाने केला बलात्कार
-याबाबत पीडित मुलीच्या 35 वर्षीय आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे
-पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे.
-दीपक लक्ष्मण शिनगारे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव
-16 वर्षीय मतिमंद मुलीला आरोपी दीपक शिनगारे याने एका बिल्डिंगमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला
-मुलीने हा प्रकार घरातील लोकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबत तात्काळ गुन्हा दाखल
-
आठवडाभर पावसाळी वातावरण कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज
पुणे –
– कमी दाबाचे पट्टे आणि हवेच्या चक्रीय स्थितीमुळे राज्याच्या सर्वच विभागांत आठवडाभर पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज
– तर काही भागांत दुपारपर्यंत निरभ्र आकाश आणि त्यानंतर अंशत: किंवा सामान्यत: ढगाळ स्थिती राहणार
– दिवसाच्या कमाल तापमानात या कालावधीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता
– दक्षिणेपासून मध्य प्रदेशाच्या दरम्यान कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन त्याचप्रमाणे हवेच्या चक्रीय स्थितीचा परिणाम म्हणून गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाचे सावट आहे
– काही भागांत पावसाच्या जोरदार सरींबरोबरच गारपीटही झाली आहे
– राज्यातील पावसाळी वातावरण आणि मेघगर्जनेसह पावसाचे सावट आणखी आठवडाभर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट
– कोकण विभागात आणखी एक दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून, ९ मे पर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता
– तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र ९ मेपर्यंत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याचा वारा वाहून हलक्या पावसाचा अंदाज
-
नागपूर मध्यवर्ती कारागृहातील तीन अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी
– नागपूर मध्यवर्ती कारागृहातील तीन अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी
– लाच घेऊन कैद्यांना अमली पदार्थ पुरवणे, सुविधा देण्याचा आरोप
– कृष्णा चौधरी, गुलाब खरडे आणि रविंद्र पारेकर यांची होणार चौकशी
– गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांमार्फत होणार चौकशी
– उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे चौकशीचे आदेश
– चौकशी होईपर्यंत तिन्ही अधिकाऱ्यांना निलंबीत करण्याचे आदेश
-
विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध बीडमध्ये गुन्हा दाखल
बीड :
विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल
भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांचाही गुन्ह्यात समावेश
इतर दहा जणांवर देखील गुन्हा दाखल
बीडच्या शिवाजी नगर पोलिसांत गुन्हा दाखल
भाजपकडून आज तृणमूल काँग्रेस विरुद्ध झाले होते आंदोलन
-
स्टॅंड अप कॉमेडियन सुनील पालविरोधात गुन्हा दाखल
मुंबईत स्टॅंड अप कॉमेडियन सुनील पालविरोधात गुन्हा दाखल
डाक्टरांच्या विरोधात आक्षेपाहार्य टिप्पणी केल्या प्रकरणी गुन्हा
मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
आयपीसीच्या कलम 505 (2), 500 अंतर्गत गुन्हा दाखल
Published On - May 06,2021 11:02 PM