LIVE | राज्यात यंदा 5 दिवस आधीच बियाणे खत मिळणार : मंत्री गुलाबराव पाटील
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
कोरोनाग्रस्तांसाठी ठेवण्यात आलेल्या खाटांची माहिती द्या, नागपूर मनपाचे खासगी रुग्णालयांना आदेश
नागपूर : खासगी रुग्णालयांना कोरोनाग्रस्तांसाठी ठेवण्याता आलेल्या खाटांची माहिती तत्काळ देण्याचे मनपाचे निर्देश
तसेच कोरोना रुग्णांकडून कोणत्या दराने शुल्क घेतले याची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.
जास्तीचे बील घेतले जात असल्याचा कोरोनाबाधितांचा आरोप
कोरोनाबाधित रुग्णांची सतत तक्रार येत असल्यामुळे मनपाचे आदेश
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी नागरिकांच्या तक्रारीची तपासणी करण्याचे निर्देश दिले.
-
राज्यात यंदा 5 दिवस आधीच बियाणे खत मिळणार : मंत्री गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील :
– राज्यात यंदा 5 दिवस आधीच बियाणे खत मिळणार – 30 मे तारखेला बियाणे विक्री सुरू होणार होती – आता शेतकऱ्यांना 25 मे पासून बियाणे मिळणार – आज कॅबिनेट बैठकीय निर्णय – बियाणे लवकर खरेदी केला तरी पुरेशा पावसनानंतरच पेरणी करण्याची राज्य सरकार ची विनंती – कृषी दुकान सुरू ठेवण्याची मुदत 10 वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय
-
-
आमदार अण्णा बनसोडे यांच्यावरील गोळीबार प्रकरणानंतर एक सीसीटीव्ही समोर
पिंपरी चिंचवड :
-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर एक सीसीटीव्ही समोर आलाय
-सिजू ऍंथोनी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. यात शस्त्र घेऊन हल्ला केला आहे.
-त्याप्रकरणी ही आज गुन्हा दाखल होतोय. काल तिथं ऍंथोनी यांचे मॅनेजर तानाजी पवार मात्र उपलब्ध नव्हते.
-त्यामुळे आमदारांवर गोळीबार आणि ऍंथोनी यांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु
-
औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, टायर पेटवून देत केला रस्ता रोको
औरंगाबाद : औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
केम्ब्रिज बायपासवर मराठा क्रांती मोर्चाकडून जाळपोळ
रस्त्यावर टायर पेटवून देत केला रस्ता रोको
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारविरोधात संताप
रस्ता अडवून टायरची केली जाळपोळ
जाळपोळीमुळे एक तास वाहतूक ठप्प
-
कासवचा मृत्यू झाल्यामुळे मालकावर गुन्हा, 20 मजल्यावरुन पडून झाला कासवाचा मृत्यू
कासवचा मृत्यु झाल्याप्रकरणी मालकावर गुन्हा दाखल
इमारतीच्या 20 मजल्यावरुन पडून झाला कासवाचा मृत्यू
मालकाने सौजन्य न दावखवल्याचा आरोप
इमारतीच्या सफाई कामगाराने लावली कासवाची विल्हेवाट
ठाण्याच्या माजीवाडा परिसरात 1 मे 2021 रोजी घढली घटना
-
-
राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू, राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता
राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू
राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता
ऑक्सिजन प्लँट मिशनसाठी 1हजार 100 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळण्याची शक्यता
18 वर्षावरील लस बंद करत नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी नियोजन करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता
करोना आढावा आणि मराठा आरक्षण यावरसुद्धा महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारावर गोळीबार, कोणीही जखमी नाही
पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार
-दुपारी दीडच्या सुमारास घडली घटना
-ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती
-सुदैवाने घटनेत कोणीही जखमी नाही
-
कोरोना काळातही नेते राजकीय कार्यक्रम कसे काय घेतात ? मुंबई उच्च न्यायालयाने खडसावलं
औरंगाबाद : राजकीय नेत्यांना हायकोर्टाने खडसावलं
राजकीय कार्यक्रमांवरून मुंबई उच्च न्यायालयाची राजकारणी आणि पोलिसांना तंबी
कोरोना काळातही राजकीय नेते राजकीय कार्यक्रम कसे काय घेतात ?
पोलीस आणि राजकारण्यांचे साटेलोटे आहे का ? उच्च न्यायालयाचा सवाल
-
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवा, हरिभाऊ बागडे यांची मागणी
औरंगाबाद –
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवा
माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची मागणी
पत्रकार परिषद घेऊन केली विशेष अधिवेशन घेण्याची मागणी
राज्य मागास वर्ग आयोग नेमाने, आयोगाचा अहवाल स्वीकारणे, तो केंद्रीय आयोगाकडे पाठवणे ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा
मराठा समाजाचं आरक्षण मजबूत करण्यासाठी दोन दिवसांचं अधिवेशन बोलवा
माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची महत्वाची मागणी
-
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचं औरंगाबादेत निषेध आंदोलन सुरू
औरंगाबाद –
राज्य सरकारच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचं निषेध आंदोलन सुरू
आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारने पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे निदर्शने सुरू
काळे कपडे घालून आणि काळे झेंडे दाखवत निषेध आंदोलन सुरू
औरंगाबादच्या सिडको परिसरात केलं जातंय निषेध आंदोलन
आंदोलनाला अनेक समन्वयक उपस्थित
सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू
-
राज्यातील सगळ्या विभागाच्या महापोर्टलच्या परीक्षा या एमपीएससी मार्फत घेण्यास एमपीएससी आयोग सहमत
पुणे –
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी
राज्यातील सगळ्या विभागाच्या महापोर्टलच्या परीक्षा या एमपीएससी मार्फत घेण्यास एमपीएससी आयोग सहमत
आयोगानं गट ब क आणि ड वर्गाची पदं एमपीएससी मार्फत भरण्यास दाखवली तयारी,
राज्य सरकारने पत्र लिहून एमपीएससी ला केली होती विचारणा
त्यावर एमपीएससीनं पत्र पाठवून दिलं उत्तर, आयोग परीक्षा घेण्यास अनुकूल
आता राज्य सरकार काय घेणार निर्णय?
एमपीएससी मार्फत परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना होणार मोठा फायदा
सगळ्याच भरतीप्रक्रीयेत येणार पारदर्शकता
शासनाच्या निर्णयाची लवकरात लवकर निर्णयाची विद्यार्थ्यांना अपेक्षा
-
मराठा आरक्षणाचा फटका राज्य सरकारच्या लेखा व कोषागार विभागाला बसणार
मराठा आरक्षणाचा फटका बसणार राज्य सरकारच्या लेखा व कोषागार विभागाला
परीक्षाऐवजी कंत्राटी पद्धतीने लेखा आणि कोषागार विभागात लिपीत आणि लेखापालाची 170 पदं भरणार कंत्राटी पद्धतीने
सगळी पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा सरळसेवा पद्धतीने भरण्याची विद्यार्थ्यांची मागणी
कंत्राटी पद्धतीने पदं भरण्यास विद्यार्थ्यांना विरोध
मात्र लेखा व कोषागार विभागानं परीपत्रक पाठवलं वित्त विभागाला
मराठा आरक्षणाच्या निकालाचा परिणाम आता थेट भरतीवर
आरक्षण प्रश्न प्रलंबित असल्यानं कायमच्या नियुक्ती देण्यास राज्य सरकारची टाळाटाळ
-
विविध मागण्यांसाठी शिर्डीत परीचारकांचे रुग्णालयासमोर आंदोलन
पोलीस बळाचा वापर करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
शिर्डीत परीचारकांचे आंदोलन
विविध मागण्यासाठी रुग्णालयासमोर आंदोलन
पोलिसांचा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
अनेक वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर करताहेत काम
गेल्या वर्षभरापासून कोविड केअर सेंटरवर शेकडो जण करताहेत काम
पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात
सनदशीर मार्गाने आंदोलन करणारांवर पोलिसांची दडपशाही
पोलिसांच्या कारवाईमुळे आरोग्य कर्मचारी संतप्त
पोलिसांनी आरोग्य सेवकांना केली मारहाण
अनेक वर्षांपासून कमी पगारावार करताहेत काम
समान काम समान वेतन देण्याची मागणी
साईसंस्थानच्या रूग्णालयात करताहेत काम
अडीचशे आरोग्य सेवक संपावर
-
अहमदनगरला कुकडीच्या अवर्तनावरुन वाद चिघळण्याची शक्यता
अहमदनगरला कुकडीच्या अवर्तनावरुन वाद चिघळण्याची शक्यता
कर्जत-श्रीगोंदा तालुक्यातील शेकऱ्यांना दिलासा देणारे कुकडीच पाणी यंदा मिळणार नसल्याने शेतकरी नाराज
शेतकऱ्यांनी माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या समोर मांडली व्यथा
साहेब कुकडीचं पाणी आलं नाही, यामुळे अनेक अडचणी आल्या आहेत, आम्ही जगायचं कसं, आम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी का, असा संतप्त सवाल
तर आमदार रोहित पवारांवर राम शिंदे यांची टिक्का
कोरोना संकटात राजकारण करायचं नाही मात्र ज्यांच्या हातात राजकारण आहे त्याने अन्याय करायचा नाही
कुकडीच पाणी मिळालं नाही याचा होशोबी आमदारांनी दिला पाहिजे
अन्यथा तीव्र आंदोलन करू राम शिंदे यांचा इशारा
-
साताऱ्यातील पडळ येथील केमिस्ट अधिकारी मृत्यु प्रकरणात माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना अटक
सातारा :
पडळ येथील केमिस्ट अधिकारी मृत्यु प्रकरणात माजी आ.प्रभाकर घार्गे यांना अटक
न्यायालयात 15 मे पर्यंत मिळाली पोलीस कोठडी
के.एम अॅग्रो प्रोसेसिंग लि.पडळ साखर कारखान्यातील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांचा मारहाणीत दोन महिन्यापुर्वी झाला होता मृत्यु
या प्रकरणात 20 जणांवर गुन्हा दाखल असुन 8 संशयितांना आता पर्यन्त वडुज पोलिसांनी केली अटक
-
पुण्यात पेट्रोलचे भाव वाढले, साधे पेट्रोल 98 रुपये 6 पैसे, तर पॉवर पेट्रोल 101 रुपये 74 पैसे लिटर
पुण्यात पेट्रोलचे भाव वाढले
साधे पेट्रोल 98 रुपये 6 पैसे तर पॉवर पेट्रोल 101 रुपये 74 पैसे लिटर
तर डिझेल 88 रुपये 8 पैसे लिटर
-
औरंगाबादेत संतप्त नागरिकांनी पाणीटंचाईमुळे सिडको कार्यालयास ठोकले कुलूप
औरंगाबाद –
संतप्त नागरिकांनी पाणीटंचाईमुळे सिडको कार्यालयास ठोकले कुलूप..
सिडको वाळूज महानगर आणि नवीन म्हाडा कॉलनीत पाण्याची भीषण टंचाई..
पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने निषेधार्थ नागरिकांनी सिडको कार्यालयास ठोकले कुलूप..
अधिकारी आणि कर्मचारी तास भर ठेवले कोंडून..
लॉकडावूनमध्ये नागरिकांना लागते भरपूर पाणी परंतु पाण्याचा ठणठणाट
-
जुन्या घराच खोदकाम करताना शेतात टाकलेल्या मलब्यात कचरा साफ करताना आढळले सोने
वर्धा
# जुन्या घराच खोदकाम करताना शेतात टाकलेल्या मलब्यात कचरा साफ करताना आढळले सोने
# सोन्यात एक बिस्कीट आणि मोगलकालीन नाण असून एकूण 9 प्रकार आहेत
# 428 ग्रॅम वजन असलेल्या सोन्याची आजची किंमत 20 लाख 54 हजार किंमत आहे
# मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सोन ताब्यात घेतलं
# ही बाब पुरातत्व विभागाशी संबंधित असल्याने त्यांच्याशी संपर्क साधत पुढील कारवाई सुरू असल्याची पोलिसांची माहिती
-
नागपुरात दहाविच्या विद्यार्थीनीवर वर्गमित्राचा अत्याचार
– नागपुरात दहाविच्या विद्यार्थीनीवर वर्गमित्राचा अत्याचार
– पीडीतेच्या मैत्रीणीशीही होते प्रेमसंबध
– नागपूरातील एमआयडीसी परिसरातील घटना
– दोघेही आठवीपासून एकत्र शिकत होते
– पिडीतेच्या तक्रारीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल
-
खेड पोलिसांकडून अवैध गुटखा, पान मसाला आणि तंबाखू एक दुचाकी सह एक लाख 1,88,510 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
पुणे
– खेड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाच्या कामगिरीमध्ये वेगवेगळे प्रकारचा अवैध गुटखा, पान मसाला आणि तंबाखू एक दुचाकी सह एक लाख 1,88,510 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
– ह्या प्रकरणी खेड पोलिसांनी तिघांना केली अटक
– नारायणगाव येथून एक व्यक्ती दुचाकीवरून गुटखा घेवून त्याची विक्री करण्यासाठी खेड येथे येणार असल्याची माहिती खेड गुन्हे शोध पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एकाला ताब्यात घेऊन नारायणगाव येथील गोडाऊन मध्ये असलेला अवैध गुटखा व तेथे विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे
-
कोरोनाकाळातील सभा भोवली, 400 हून अधिक नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाली, 10 जणांचा मृत्यू
रायपूर – कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने गेल्या सव्वा महिन्यापासून देशभरात धुमाकूळ घातला आहे. देशातील विविध भागात कोरोनाचा फैलाव झाला असून, आता नक्षलवाद्यांचा अड्डा बनलेल्या महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवरील जंगलांमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. मिळत असलेल्या माहिती नुसार 400 हून अधिक नक्षलवाद्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 10 नक्षलवाद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
-
आग्नेय अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता; पश्चिम किनारपट्टीला धोका
पुणे : मॉन्सूनच्या आगमनापूर्वी आग्नेय अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाला असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
-
उत्तराखंडमध्ये ढगफुटी; डझनभर घरं, दुकानं जमीनदोस्त झाल्यानं मोठी हानी
देवप्रयाग: उत्तराखंडच्या देवप्रयागमध्ये ढगफुटी झाल्यानं शांता नदीला पूर आला आहे. त्यामुळे शांती बाजार परिसरात मोठं नुकसान झालं आहे. या ठिकाणी असलेली आयटीआयची तीन मजली इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. तर शांती नदीच्या पात्राजवळ असलेली दहापेक्षा अधिक दुकानं वाहून गेली आहेत. देवप्रयाग नगराहून बस आगाराकडे येणारा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे.
-
आठ दिवसांपासून ठाण्याचे पोलीस आयुक्त पद रिक्त; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ
ठाणे : गत आठ दिवसांपासून ठाणे शहराचा पोलीस आयुक्त नेमण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आणि गृह विभागाला एक अधिकारी नेमता येत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परिणामी कोणी पोलीस आयुक्त देता का पोलीस आयुक्त असे म्हणण्याची वेळ ठाणेकरांवर आली आहे
Published On - May 12,2021 8:48 PM