Cyclone Tauktae Tracker and Updates | तौत्के वादळानंतर सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, कोट्यावधींचं नुकसान, 3 दिवसापासून बत्ती गूल

| Updated on: May 19, 2021 | 12:32 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Cyclone Tauktae Tracker and Updates | तौत्के वादळानंतर सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, कोट्यावधींचं नुकसान, 3 दिवसापासून बत्ती गूल
tauktae

भीषण तौक्ते चक्रीवादळ (Cyclone Tauktae) हे सोमवारी रात्री गुजरातच्या सौराष्ट्र किनाऱ्यावर धडकलं. यादरम्यान 185 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वारे वाहात होते. तर महाराष्ट्रासह मुंबईतही या चक्रीवादळाने हाहाकार माजवला. तौत्के चक्रीवादळामुळे मुंबई शहर, उपनगर तसेच ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आणखी 24 तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 May 2021 10:16 PM (IST)

    तौत्के वादळानंतर सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, कोट्यावधींचं नुकसान, 3 दिवसापासून बत्ती गूल

    सिंधुदुर्गात कुडाळ येथे पुन्हा जोरदार पाऊस पडतोय. विजेच्या कडकडाटासह कुडाळमध्ये मुसळधार पाऊस बरसला. तौत्के चक्रीवादळानंतर एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर पाऊस पुन्हा सुरू झाला. तौत्के चक्रीवादळाचा सिंधुदुर्गाला मोठा तडाखा बसलाय. मालवण तालुक्यात गेले 3 दिवस वीज पुरवठा खंडित आहे. सिंधुदुर्गात कोट्यवधींच्या मालमत्तेची हानी झालीय.

  • 18 May 2021 08:36 PM (IST)

    पालघरमध्ये चक्रवादळाच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक दुकानं सुरु करण्यास परवानगी

    पालघरमध्ये चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, मंगळवार (18 मे) आणि बुधवार (19 मे) इलेक्ट्रिकल्स आणि हार्डवेअरची दुकाने अत्यावश्यक बाब म्हणून सुरु करण्यास परवानगी, सकाळी 7 ते रात्री 8 दरम्यान दुकानं खुली राहणार

  • 18 May 2021 07:33 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार, चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार

    रत्नागिरी: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची  पाहणी करणार आहेत.  20 मे आणि 21 मे रोजी करणार दौरा, कोकणातले भाजपचे पदाधिकारी सुद्धा राहणार उपस्थित राहणार असल्याची माहिती.

  • 18 May 2021 07:31 PM (IST)

    क्ते चक्रीवादळाने मुंबईच्या विलेपार्लेत ठिकठिकाणी 25 ते 30 झाडंकोसळली

    तोक्ते चक्रीवादळाने मुंबईच्या विलेपार्लेत ठिकठिकाणी कोसळली 25 ते 30 झाडं… – झाडं ऊचलण्यासी महापालिकेच्या मदतिला पोहोचली पार्लेस्वर प्रतिष्ठन संस्था… – पार्लेस्वर प्रतिष्ठान द्वारे सुरू करण्यात आलं Tree Cutters चं उद्घाटन.. – विले पार्ले पोलिस निरीक्षक राजेंद्र काणे आणि पार्लेस्वर प्रतिष्ठानचे संस्थापक चेतन बेलकर यांनी दिवसभर महंत रोडवर कोसळलेली झालं कापून बाजूला केली… रस्ता मोकळा करण्यात आला.

  • 18 May 2021 06:28 PM (IST)

    सांगली जिल्ह्याला तोक्ते चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका, 32.60  हेक्टरवरील शेतीचे नुकसान

    तौक्ते चक्रीवादळाचा फटका सांगली जिल्ह्यालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे.वादळी वारा आणि पावसामुळे जिल्ह्यातील 32.60
    हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसाना मध्ये मोठ्या प्रमाणात फळपिकांचा समावेश आहे.प्रमुख्याने जिल्ह्यातील 15 गावांना व्यक्ती चक्रीवादळाचा फटका बसला आहे. साधारणपणे 72 शेतकऱ्यांचं यामध्ये शेतीचे नुकसान झाले आहे.ज्यामध्ये केळी, आंबा,नारळ,कलिंगड आणि भाजीपाला या पिकांना मोठा फटका बसला आहे.
  • 18 May 2021 03:40 PM (IST)

    कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 40 टक्के कमी शेतमालाची आवक

    कल्याण: तौत्के वादळाचा फटका शेतमालास बसला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 40 टक्के कमी शेतमालाची आवाक झाली आहे. त्यात वीज पुरवठा खंडीत असल्याने आलेला शेतमाल व्यापारी वर्गाला विकण्यात अडचणी आल्या. फासरा मालही विकला गेला नाही. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असा कल्याण बाजार समितीचा नावलौकीक आहे.

  • 18 May 2021 01:44 PM (IST)

    गेल्या 24 तासात तौत्के वादळामुळे मुंबईत घडलेल्या घटना, झाडांची पडझड

    मुंबई :

    गेल्या 24 तासात तौत्के वादळामुळे घडलेल्या घटना कुलाब्यात 207.6 मिमी पावसाची नोंद सांताक्रुझ 230.3 मीमी पावसाची नोंद शहरात 169.28 मीमी पुर्व उपनगर 104.29 पश्चिम उपनगर-209.75 मीमी झाड पडून बीडीडी चाळ येथे 1 महिलेचा मृत्यू मढ येथे बोटीतील 1 जण बुडाल्याची माहिती माहिम ध्ये एका बोटीतील 1 जण बुडाल्याची शक्यता मदतसेवा केंद्रावर 9817 जणांचे फोन आले काही ठिकाणी घर पडण्याच्या घटना

  • 18 May 2021 01:42 PM (IST)

    कराडमध्ये काढणीस आलेली सात एकर केळीची बाग भुईसपाट, शेतकऱ्यांची मदतीसाठी याचना

    कराड तौक्ते’ चक्रीवादळात कराड तालुक्यातील चचेगाव येथील काढणीस आलेली सात एकर केळीची बाग भुईसपाट

    तीन शेतकऱ्यांचे पंचवीस लाखांचे नुकसान

    हतबल शेतकरयांची सरकारकडे मदतीची याचना

  • 18 May 2021 01:41 PM (IST)

    सांगलीत पेरुच्या बागेचे प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल

    सांगली -मिरजेत वादळी वारा आणि पावसाने पेरू बागेचे 25 लाखांचे नुकसान,

    बागेत पेरुचा सडा

    कृषी विभाग महसूल विभागाने पंचनामे न केल्याने शेतकरी हवालदिल

  • 18 May 2021 12:19 PM (IST)

    विरार पूर्वेकडील वीटभट्टी मजुरांच्या सगळ्या झोपड्या पाण्याखाली

    विरार पुर्वेच्या आरटीओ परिसरात असलेल्या वीटभट्टी मजुरांच्या सगळ्या झोपड्या पाण्याखाली… – आसपासच्या गावात राहणाऱ्या नागरिकांच्या घरातही शिरलं पाणी… – आसपासच्या गावालाही बसला मोठा फटका… शिरगावला पाण्याचा वेढा… – २४ तासांपासून वीजही गुल… नागरीक हैराण… – प्रशासनाकडून २४ तास पाणीपुरवठा खंडीत करण्यात आल्याच्या सुचना… – सगळ्या शेतजमिनी पाण्याखाली आल्याचं चित्र…

  • 18 May 2021 12:17 PM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 33.89 मिमी पावसाची नोंद

    रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 33.89 मिमी तर एकूण 305 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

    मंडणगड 13 मिमी ,

    दापोली 42 मिमी,

    खेड 16 मिमी,

    गुहागर 18 मिमी,

    चिपळूण 22 मिमी,

    संगमेश्वर 48 मिमी,

    रत्नागिरी 101 मिमी,

    लांजा 32मिमी

    राजापूर 13 मिमी

  • 18 May 2021 11:23 AM (IST)

    पालघरमध्ये पावसाचा थैमान कायम, सखल भागात पाणी साचले

    पालघर : पालघरमध्ये पावसाचा थैमान कायम,

    पालघर जिल्ह्यात वादळाचा प्रभाव अजूनही कायम असून सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू

    अनेक सखल भागात पाणी साचले,

  • 18 May 2021 11:18 AM (IST)

    सिंधुदुर्गाला तौत्के चक्रीवादळाचा फटका, कुठे किती घरांचे नुकसान?

    सिंधुदुर्गाला तौत्के चक्रीवादळ फटका, कुठे किती घरांचे नुकसान?

    दोडामार्ग 44 सावंतवाडी 116 वेंगुर्ले 87 कुडाळ 102 मालवण 972 देवगड 133 वैभववाडी 145

  • 18 May 2021 11:16 AM (IST)

    सिंधुदुर्गाला तौत्के चक्रीवादळ तडाखा, 5 कोटी 77 लाखांचे नुकसान

    सिंधुदुर्गात तौत्के चक्रीवादळ तडाखा

    5 कोटी 77 लाखांचे नुकसान

    एकूण 2 हजार घरांची पडझड

    मालवण तालुक्यात 972 घरांचे नुकसान, 7 घरे पूर्ण जमीनदोस्त

    बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित 306 विद्युत वाहिन्या तुटल्या

    2 हजार घरांचे 3 कोटी 42 लाख नुकसान

    139 गोठयांचे 16 लाख 94 हजार नुकसान

    19 शाळांचे 9 लाख 75 हजार नुकसान

    11 शासकीय इमारतींचे 1 लाख 70 हजार नुकसान

    13 शेडचे 1 लाख 10 हजार नुकसान

    4 सभागृहांचे 6 लाख 16 हजार नुकसान

    इतर किरकोळ नुकसान 6 लाख 38 हजार

    वीज वितरण चे दहा इंजिनिअर आणि 130 कर्मचाऱ्यांची टीम दाखल

  • 18 May 2021 11:15 AM (IST)

    तौत्के चक्रीवादळाचा नवी मुंबईलाही फटका, ऐरोली, घणसोलीत 14 तास ब्लॅकआऊट

    नवी मुंबई : तौत्के चक्रीवादळाचा नवी मुंबईलाही फटका त्यात आधीच कोरोनाचे थैमान

    गणेश नाईकयांनी नगरसेवक यांच्या सह घेतली आयुक्तांची भेट

    आयुक्तांच्या दालनात बैठक सुरू

    पाम बीच वर अंगावर पोल कोसळून मृत्यू झालेल्या तरुणाला आर्थिक मदत मिळावी

    नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात नुकसान

    वादळामुळे काल एरोळी, घणसोली 14 तास ब्लॅक आऊट

    थोड्याच पावसात सखल भागात पाणी

    मनपा काय करते आहे नाईकांनी विचारला प्रश्न

  • 18 May 2021 10:29 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Raigad | खालापूर तालुक्यातील उबंरविरा गावात 41 घरांचे नुकसान

    रायगड

    खालापूर तालुक्यातील उबंरविरा गावात 41 घरांचे नुकसान.

    बीड जाभंरुग ग्रामपचांयत मध्ये डोगंरावर असलेल्या दुर्गम अश्या भागात असलेल्या या गावात खालापुर तहसीलदार तळ ठोकुन होते.

    येथील गावक-यांना स्थलांतरीत करण्याचा प्रयत्न फोल ठरले.

    खालापुर तहसिलदार ईरेश चप्पलवार, उपसरपंच कुमार दिसले, तीन तलाठी, ग्रामसेवक यांनी गावक-यांनां दोन्ही वेळचे जेवण देउन ग्रायस्थांना दिलासा दिला.

    सर्व घरांचे कालच पचंनामे पुर्ण केले.

  • 18 May 2021 10:27 AM (IST)

    Cyclone Tauktae Live | आतापर्यंत 146 जणांना सुरक्षितरित्या वाचवण्यात यश

    आतापर्यंत 146 लोकांना बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता यांनी 111 लोकांची सुटका केली आहे

    ओएसव्ही ग्रीटशिप अहिल्याने 17 जणांना वाचवले

    ओएसव्ही ओशन एनर्जीने 18 लोकांचे प्राण वाचवले आहेत

    आयएनएस तलवार सागर भूषण आणि बर्गे एसएस 3 वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत

    उर्वरित लोकांचे बचावकार्य अद्याप सुरु आहे

    हवामान पाहता भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टरही बचाव कार्यात सामील लावण्यात आले आहेत

  • 18 May 2021 10:22 AM (IST)

    Cyclone Tauktae Live | समुद्रात 700 जण अडकले

    चक्रीवादळाच्या वादळामुळे 700 लोक समुद्रात अडकले आहेत, बॉम्बे हाय टाइड्सही पाहायला मिळत आहेत. पश्चिमेकडून दक्षिणेकडील किनारी भागात चार जहाजे अडकली आहेत.

    4 जहाजांवर अडकलेले लोक

    बार्ज P305 – 273,

    सागर भूषण – 101

    बार्ज एस एस 3 – 196

    बार्ज गल कन्ट्रेक्टर – 137

  • 18 May 2021 10:21 AM (IST)

    Cyclone Tauktae Live | अमित शाहांची महाराष्ट्र-गुजरात आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा, चक्रीवादळ तौक्तेमुळे झालेल्या नुकसानीची घेतली माहिती

    गृहमंत्री अमित शाह यांची महाराष्ट्र-गुजरात आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

    चक्रीवादळ तौक्तेमुळे झालेल्या जीवितहानी आणि नुकसानीची घेतली माहिती

    गृहमंत्र्यांनी दादर नगर हवेलीच्या प्रशासकांशीही चर्चा केली आणि परिस्थितीची माहिती घेतली

  • 18 May 2021 10:18 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Mumbai | मुंबईत हाय टाइड

    मुंबईत समुद्रात हाई टाइड्स दिसत आहेत, गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ हाय टाइड

  • 18 May 2021 10:03 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Mumbai | तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात मढ येथील बोटिंगचे अतोनात नुकसान

    मुंबई –

    तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात मढ येथील बोटिंगचे अतोनात नुकसान

    सात ते आठ बोटी तुटलेल्या आहेत

    काही बोटी बुडलेल्या व दगडावर लागलेले आहेत

    त्यामुळे खूप सारे नुकसान झाले आहे तसेच एक खलाशी बेपत्ता

  • 18 May 2021 10:01 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Palghar | पालघरमध्ये मुसळधार पाऊस, बोईसर-पालघर मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद

    पालघर –

    बोईसर पालघर मुख्य रस्ता बंद ,

    मुसळधार पावसा मुळे कोळगाव येतील जिल्हा मुख्यालय कार्यालया समोर मुख्य रस्ता वाहून गेल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प,

    वाहतुकी साठी पालघर बोईसर रस्ता पूर्ण बंद,

    पहाटे पासून रस्ता बंद असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा

  • 18 May 2021 09:55 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Palghar | डहाणू ,तलासरी परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस

    पालघर : तौक्ते चक्रीवादळाचा तडाका पालघर जिल्ह्यात अनेक भागात झालेला पाहायला मिळतोय, डहाणू ,तलासरी परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस अद्यापही अधूनमधून सुरूच आहे. डहाणू ,तलासरी परिसरात अनेक भागात झाडे ,झाडाची फांद्या तसेच काही घरांची छपर देखील उडल्याचा घटना घडल्या आहेत. तर दापचरी दुग्ध प्रकल्पातील वसाहत भागातील 8 ते 9 बंद घरांची पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

  • 18 May 2021 09:18 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Ratnagiri | चक्रीवादळामुळे कोकणात मोठे नुकसान

    रत्नागिरी – चक्रीवादळामुळे कोकणात मोठे नुकसान

    रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग साडेचार हजाराहून अधिक घरांचे नुकसान

    अनेक भागातील वीज पुरवठा अद्याप खंडित

    नुकसानीचा आकडा काही कोटींमध्ये

    पंचनामे करण्यास आजपासून सुरुवात

    काजू आणि आंबा बागा तिचे मोठे नुकसान

  • 18 May 2021 09:17 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Vasai Virar | वसई-विरार नालासोपाऱ्यात सकाळपासून विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी

    वसई-विरार नालासोपाऱ्यात सकाळपासून विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी

    सुसाट चा वारा आणि जोरदार पावसामुळे शहरातील मुख्य रस्ते झाले जलमय.. रस्त्यावर साचले गुडगाभर पाणी.. संपूर्ण शहरातील वीज पुरवठा खंडित

    नालासोपारा पूर्व आचोले रोड, सेंत्रालपार्क रोड, अल्कापुरी, वसई एव्हरशाईन, विरार विवा कॉलेज रोडवर पाणीच पाणी

    रस्त्यावरील साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची मोठी कसरत सुरू.. दिवसभर असेच पाऊस राहिले तर शहरात माजाणार हाहाकार

    नालासोपारा पूर्व आचोले रोडवरील सकाळी 8 वाजताची ही दृश्य

  • 18 May 2021 09:00 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Gujrat | 410 जण अरब समुद्रात अडकले

    तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि गुजरातमधील दोन लाखाहून जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे, तर यादरम्यान दोन नावे किनाऱ्यापासून दूर अरब समुद्रात गेली, या दोन नावेवर 410 लोक अडकल्याची माहिती आहे

  • 18 May 2021 08:56 AM (IST)

    Cyclone Tauktae Live | यूपी, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागात दोन तासात पावसाची शक्यता

    येत्या दोन तासांत उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे

  • 18 May 2021 08:54 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Amreli | चक्रीवादळामुळे अमरेलीमध्ये मोठं नुकसान

    गुजरात –  तौक्ते चक्रीवादळामुळे अमरेलीमध्ये मोठं नुकसान झालं आहे, अजूनपर्यंत वादळी वारे सुरु आहेत आणि पाऊसही सुरु आहे

  • 18 May 2021 08:51 AM (IST)

    सौराष्ट्रमध्ये तौक्तेचं केंद्र, हवामान विभागाची माहिती

    हवामान विभागाच्या माहितीनुसार, सौराष्ट्रमध्ये तौक्ते चक्रीवादळाने आपलं केंद्र बनवलं आहे, जे उत्तरी पूर्वी दिवीपासून 95 किलोमीटर आणि अमरेलीच्या दक्षिणेत आहे

  • 18 May 2021 08:49 AM (IST)

    आज सकाळपासून जामनगरात वादळी वारे, सूरत विमानताळही बंद

    आज सकाळपासून जामनगरात वादळी वारे, सूरत विमानताळही बंद,

  • 18 May 2021 08:30 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Raigad | “तौत्के” चक्रीवादळाच्या परिणामामुळे रायगड जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू

    रायगड –

    “तौत्के” चक्रीवादळाच्या परिणामामुळे रायगड जिल्ह्यात चार जणांचा मृत्यू.

    यामध्ये सौ.निता भालचंद्र नाईक, वय ५०, सौ. सुनंदाबाई भिमनाथ घरत, वय ५५ या दोघीही उरण तालुक्यातील रहिवासी असून त्यांचा मृत्यू सिमेंटचा ब्लॉक अंगावर पडल्याने झाला.

    रामा बाळू कातकरी, वय ८० वर्षे, पेण तालुक्यातील रहिवासी असून त्यांचा मृत्यू आंब्याची फांदी अंगावर पडून झाला.

    रमेश नारायण साबळे, वय ४६ वर्षे, धाटाव एमआयडीसी, रोहा (रा. डोंबिवली, ठाणे) येथील असून त्यांचा मृत्यू अंगावर झाड पडून झाला.

  • 18 May 2021 08:29 AM (IST)

    Cyclone Tauktae Live Pune | तौक्ते चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यातील 191 घरांचे नुकसान झाल्याचा अंदाज

    पुणे –

    तौक्ते चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यातील 191 घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

    जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला अंदाज

    यामध्ये खेड तालुक्यातील सर्वाधिक ९५ घरे तर खेड पाठोपाठ मुळशी तालुक्यातील ७५, मावळमधील १०, भोर तालुक्यातील ९, आणि शिरूर व आंबेगाव तालुक्यातील प्रत्येकी एका घराचे नुकसान

    यामुळे ९० नागरिकांचे स्थलांतर करावे लागले तर अन्य तीन नागरिक जखमी

    जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील तालुक्यांना या वादळाचा मोठा फटका

    काही ठिकाणी शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे पत्रेही उडाले

    जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

  • 18 May 2021 08:26 AM (IST)

    चक्रीवादळाचा प्रभाव रत्नागिरी जिल्ह्यात 48 तासानंतर ही कायम

    रत्नागिरी- चक्रीवादळाचा प्रभाव रत्नागिरी जिल्ह्यात 48 तासानंतर ही कायम

    रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस

    सकाळ नंतर पावसाची विश्रांती

    रत्नागिरी राजापूर गुहागर चिपळूण मध्येही पाऊस

  • 18 May 2021 07:28 AM (IST)

    नालासोपाऱ्यात चक्रीवादळाचा बळी, अंगावर निलगिरीचे झाड पडल्याने एकाचा जागीच मृत्यू

    नालासोपारा –

    नालासोपाऱ्यात चक्रीवादळाचा बळी, अंगावर निलगिरीचे झाड पडल्याने एकाचा जागीच मृत्यू, नालासोपारा पूर्व पेल्हार जाबरपाडा परिसरात काल सकाळी 6 च्या सुमारास घडली घटना

  • 18 May 2021 07:03 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील मोहगाव झिल्पी तलावात बुडून बाप लेकाचा मृत्यू

    – नागपूर जिल्ह्यातील मोहगाव झिल्पी तलावात बुडून बाप लेकाचा मृत्यू

    – वाढदिवसानंतर मौज म्हणून तलावात उतरल्याने घडली घटना

    – दोघांना वाचवण्यात यश

    – अब्दुल आसिफ अब्दुल गनी शेख आणि शैबील अब्दुल शेख यांचा मृत्यू

    – मोहगाव झिल्पी धोकादायक तलाव, वर्षाला सात ते आठ जणांचा होतो मृत्यू

  • 18 May 2021 06:44 AM (IST)

    तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरील बोटींना बसला

    विरार – तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरील बोटींना बसला आहे

    जोरदार वारा आणि पाऊस यामुळे किनार्यावर असलेल्या छोट्या बोटी चक्क वाऱ्याच्या प्रवाहात येऊन तुटून पडल्या आहेत..

    किनाऱ्या वरील अनेक छोट्या मोठ्या घरावरील पत्रे तुटून पडले आहेत..

    छोट्या बोटींची तोडफोड झाल्याने सामान्य मच्छिमार वर उपासमारीची वेळ आली आहे..

    काही बोटी वाहून गेल्या आहेत तर काही बोटी पूर्णपणे तुटून पडल्या आहेत..

  • 18 May 2021 06:43 AM (IST)

    माहिम समुद्रात एक मच्छीमार बेपत्ता , बुड़ाला असल्याच्या संशय

    माहिम समुद्रात एक मच्छीमार बेपत्ता , बुड़ाला असल्याच्या संशय

    बबन पाटील ( 50 ) आहे बेपत्ता मच्छीमाराच नाव

    दुपारी समुद्रात दोन बोटांची टक्कर झाल्याने त्यातून एक बोट फुटली

    त्या फुटलेल्या बोटात असलेल्या एका मच्छीमाराना वाचविन्यासाठी दुसऱ्या बोटितले बबन पाटील आणि त्यांचे दोन साथीदार पाण्यात उतरले

    त्यातून 3 लोक तर सुखरूप समुद्रातुन आलेत परत

    मात्र बब्बन पाटील हे परतले नसून अद्याप ही आहेत बेपत्ता

    पाटील यांचा शोध घेण्यात आला असून मात्र पत्ता लागलेला नाही

  • 18 May 2021 06:35 AM (IST)

    रायगडमध्ये 2 महिलांसह चार जणांचा मृत्यू, 5249 घरांचे नुकसान

    तौत्के चक्रीवादळाने महाराष्ट्रात दाणादाण उडवून दिली. रायगड जिल्ह्यात दिवसभरात 2 महिलांसह 4 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 5244 घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे, तर 5 घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 500 हून अधिक वीजेचे खांब कोसळले आहेत. अलिबाग आणि मुरूड येथे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, नुकसानीचे पंचनामा करण्याचे काम उद्यापासून सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

  • 18 May 2021 06:34 AM (IST)

    ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये वीजयंत्रणेची प्रचंड हानी

    गेल्या 24 तासांमध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे मुसळधार पावसासह प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधदुर्ग या जिल्ह्यातील 3 हजार 665 गावांमधील वीजयंत्रणेची प्रचंड हानी झाली आहे. यामध्ये 18 लाख 43 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला असून त्यापैकी 52 टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा आज दुपारपर्यंत पूर्ववत करण्यात आला आहे. चक्रीवादळ बाधीत उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा असे निर्देश देण्यात आले असून महावितरणचे 13 हजार 172 कर्मचारी दुरुस्तीची कामे अविश्रांत करीत आहेत, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे.

  • 18 May 2021 06:33 AM (IST)

    चक्रीवादळामुळे ऑनलाईन परीक्षांमध्ये व्यत्यय; राहिलेल्या परीक्षांचं वेळापत्रक नव्यानं जाहीर होणार

    चक्रीवादळामुळं आज राज्यातील विविध विद्यापीठांच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा होऊ शकल्या नाहीत, अनेक ठिकाणची इंटरनेट सेवा झाली खंडित होती. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर झाला आहे. परंतु विद्यार्थ्यांनी काळजी न करण्याचं कारण नाही, राहिलेल्या परीक्षांचं वेळापत्रक नव्यानं जाहीर करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सामंत यांनी विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

  • 18 May 2021 06:33 AM (IST)

    वसई-विरार नालासोपाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु

    वसई-विरार नालासोपाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु

    काल पासून सुरू झालेले चक्रीवादळी पावसाने अनेकठिकाणी विजेचे खांब, झाड पडल्याने वसई विरार करणी रात्र अंधारात काढली आहे..

    सलग पडणाऱ्या पावसाने शहरातील अनेक सकल भागात ही फूट दोन फूट पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे..

    नालासोपारा निलेमोरे गाव, सेंत्रालपार्क, वसई समता नगर, नवजीवन, सतीवली, विरार विवा कॉलेज रोड यासह अन्य भागात काही प्रमाणात पाणी साचले आहे…

    विरार पश्चिम म्हाडा परिसरातून आज सकाळी सववा सहा वाजता घेतलेली ही दृश्य

Published On - May 18,2021 10:16 PM

Follow us
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.