LIVE | नाशिकच्या सिडको कामटवाडा परिसरात भंगार गोदामाला भीषण आग

| Updated on: May 23, 2021 | 11:02 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | नाशिकच्या सिडको कामटवाडा परिसरात भंगार गोदामाला भीषण आग
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 May 2021 09:50 PM (IST)

    नाशिकच्या सिडको कामटवाडा परिसरात भंगार गोदामाला भीषण आग

    – नाशिकच्या सिडको कामटवाडा  परिसरात भंगार गोडाऊनला लागली आग – अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल – आगीच कारण स्पष्ट नाही – आगीमुळे मोठं नुकसान झाल्याचा अंदाज

  • 23 May 2021 07:57 PM (IST)

    नाणार रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे, नाना पटोले यांचं मोठं विधान

    रत्नागिरी- नाणार रिफायनरी प्रकल्पावरून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे मोठे विधान

    नाणार प्रकल्प झाला पाहिजे

    नाणार प्रकल्पाला नानाच न्याय देऊ शकतात

    हा प्रकल्प होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील

    स्थानिक मच्छीमार आणि प्रकल्पग्रस्तांशी बोलून निर्णय घेणे आवश्यक

    गुजरातच्या भूमाफियांनी खरेदी केलेल्या जमिनींची चौकशी होणे आवश्यक

  • 23 May 2021 07:09 PM (IST)

    आता बारावीच्या परीक्षांचा निर्णय 1 जूनलाच होणार, केद्रींय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांची माहिती

    केद्रींय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल : 12 वीच्या परिक्षेसाठी देशातील अनेक राज्यांची तयारी 1 जूनला परिक्षे संदर्भात शेवटचा निर्णय घेऊ जो पण निर्णय होईल तो तुमच्या हिताचा असेल भविष्याचा असेल सर्व राज्यांचे धन्यवाद

  • 23 May 2021 06:55 PM (IST)

    यास चक्रीवादळाचा धोका, पुण्यावरून सुटणारी पुणे हावडा एक्स्प्रेस रद्द

    पुणे :

    यास चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पुण्यावरून सुटणारी एक्स्प्रेस गाडी रद,

    25 तारखेला पुण्यावरून सुटणारी पुणे हावडा एक्स्प्रेस केली रद्द,

    तर 27 तारखेला हावड्यावरून सुटणारी हावडा पुणे एक्स्प्रेस रद करण्यात आलीये,

    मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय कार्यालयाची माहिती,

    प्रवाशांनी पुणे हावडा एक्स्प्रेससाठी प्रवास करण्यासाठी घराबाहेर न पडण्याचं रेल्वे प्रशासनाचं आवाहन

    यास चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल आणि ओडीशाला हाय अलर्ट

  • 23 May 2021 06:18 PM (IST)

    शिरुरमध्ये दोन शेतकऱ्यांचा चार एकर ऊस जळून खाक, 7 ते 8 लाखांचं नुकसान

    शिरूर (पुणे) :

    -शिरूर तालुक्यातील वडगांव रासाई गावामधील शेतकरी स्वप्नील ढवळे आणि सुभाष ढवळे या दोन शेतकऱ्याचा चार एकर ऊस जळून खाक

    -ह्या दोन्ही शेतकऱ्याच्या शेतामधून महावितरणच्या वीजवाहक तारा गेल्या आहेत त्या वीज वाहक तारा जीर्ण झाल्याने त्या तुटल्या आणि एकमेकांना घर्षण झाल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे

    -ह्या आगीत शेतकऱ्याचं अंदाजे 7 ते 8 लाखाचा नुकसान झाल्याचा अंदाज

  • 23 May 2021 06:13 PM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरात पावसाची हजेरी

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवड शहरात पावसाची हजेरी

    -सकाळ पासून ऊन होतं

    -मात्र अचानक दुपारी वातावरणात बदल झाला. नंतर पावसाला सुरुवात झाली

    -यामुळे बाहेर पडलेल्यांची तारांबळ उडाली.

  • 23 May 2021 03:33 PM (IST)

    कुटुंबियांनी लग्नाला परवानगी दिली नाही म्हणून प्रेमी युगुलाची आत्महत्या, पुण्याच्या दौंडमधील घटना

    दौंड (पुणे) :

    कुटुंबियांनी लग्नाला परवानगी दिली नाही म्हणून प्रेमी युगुलाची आत्महत्या विष प्राशन करून केली आत्महत्या आत्महत्या केलेली मुलगी अल्पवयीन पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुसेगाव येथील घटना कुसेगाव येथील वनविभागाच्या हद्दीतील जाऊन विषारी औषध घेऊन केली आत्महत्या घटनास्थळी पाटस पोलीस दाखल

  • 23 May 2021 02:42 PM (IST)

    आर्थिक विवंचनेत असलेल्या कुटुंबावर पोटच्या मुलाला विकण्याची वेळ, पोलिसांचा शोध सुरु

    कल्याण :  आधीच कजर्बारीत त्यात लॉकडाऊन आर्थिक विवंचनेत असलेल्या कुटुंबावर पोटच्या मुलाला विकण्याची वेळ

    महिला एजंटस आई वडिलांना अटक

    महिला एजंटने किती मुलांना विकले याचा शोध सुरु

  • 23 May 2021 02:05 PM (IST)

    इंदापूरमध्ये शेतकरी आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक, पाणी रद्द झाल्याने जल आंदोलन

    इंदापूर मध्ये शेतकरी व राष्ट्रावादी चे पदाधिकारी अधिक आक्रमक… उजनी धरणात सखोल भागात जावून केले जल आंदोलन… इंदापूर चे हक्काचे 5 टी एम सी पाणी रद्द झाल्याने आन्दोलक आक्रमक.. इंदापूर तालुक्यात रोज होतायेत आंदोलन…

  • 23 May 2021 12:19 PM (IST)

    वलसाडच्या समुद्रकिनारी मृतदेह मिळण्याचे सत्र सुरु, 2 मृतदेह आढळले

    पालघर

    गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्याचा समुद्रकिनारी मृतदेह मिळण्याचे सुरूच

    रविवारी 2 मृतदेह वलसाड तिथल जवळच्या साईबाबा मंदिरच्या समुद्र किनारी मिळून आले

    वलसाड तिथल आणि डुंगरी जवळच्या समुद्रकिनारी एकूण 4 मृतदेह आढळून

    त्यातील 2 मृतदेह लाईफ जॅकेट घातलेले होते.

    आजही आणखी दोन मृतदेह मिळून आल्यानंतर घटनेची माहिती मिळताच वलसाड पोलिसांच्या उच्च अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी

    चक्रीवादळदरम्यान मुंबई पासून समुद्रात बॉम्बे हाई जवळ ओएनजीसी बार्ज दुर्घटना मधील बेपत्ता असलेल्या क्रू सदस्याचे मृतदेह असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

    याबाबत गुजरात पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला असून वलसाड जिल्ह्याचा सतत दोन दिवसांपासून मृतदेह आढळून येत असल्याने समुद्र किनाऱ्यावरील शोध मोहीम हाती घेतली आहे. आता पर्यंत 6 मृतदेह मिळून आल्याने परिसरात चर्चा सुरू आहे

  • 23 May 2021 12:06 PM (IST)

    गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या पथकाचे जंगी स्वागत

    गडचिरोली जिल्ह्यात 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याबद्दल सी.सिक्स्टी पथकाचे जंगी स्वागत करण्यात आलेले व्हिडिओ खूपच व्हायरल

    गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुका अंतर्गत कोटमी पैडी जंगल परिसरात 13 नक्षलवाद्यांनाचा खात्माच सी सिक्स्टी पथकाने केला होता

    या अभियानासाठी गडचिरोली जिल्ह्यातील c-60 चे जवळपास 300 जवान जंगलात दोन दिवस आपरेशन राहिले होते

    पोलीस अधीक्षक व अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्याकडून या जवानांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले होते

    स्वागत करीत असताना जवळपास तीनशे जवान या व्हायरल झालेला व्हिडिओ मध्ये दिसत आहेत

    जिल्हा मुख्यालयात दाखल झाल्यानंतर एक जंगी स्वागत या जवानांचे करण्यात आले याचा व्हिडिओ गडचिरोली जिल्ह्यात खूपच व्हायरल

  • 23 May 2021 10:59 AM (IST)

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रत्नागिरी दौऱ्यावर, चक्रीवादळात नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी

    रत्नागिरी- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रत्नागिरी दौऱ्यावर

    चक्रीवादळात नुकसान झालेल्या ठिकाणांची करतात पहाणी

    नाना पटोले मिरकरवाडा बंदरात

    चक्रीवादळ नुकसान झालेल्या मच्छीमारांची साधणार संवाद

  • 23 May 2021 09:59 AM (IST)

    कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

    कराड कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्के सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाने जाणवला भूकंपाचा सौम्य धक्का

  • 23 May 2021 08:38 AM (IST)

    औरंगाबादमध्ये बांधांच्या वादावरून शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण

    औरंगाबाद :-

    बांधांच्या वादावरून शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण

    औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील हातनूर गावातली घटना

    ठिबक सिंचनचे पाईप उपसून फेकून केली मारहाण

    पुरुषांसह महिलांनाही केली बेदम मारहाण

    मारहाण होऊन दोन दिवस उलटले तरी गुन्हा दाखल नाही

    राजकीय दाबावातून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा पीडितांचा आरोप

    नारायण काळे आणि त्यांच्या कुटुंबाला झाली बेदम मारहाण

    कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना

  • 23 May 2021 08:10 AM (IST)

    दहावीच्या परीक्षासंदर्भात राज्य सरकार न्यायालयात सादर करणार प्रतिज्ञापत्र

    दहावीच्या परीक्षासंदर्भात येत्या गुरुवारी राज्य सरकार न्यायालयात सादर करणार प्रतिज्ञापत्र,

    राज्य सरकारने परीक्षा घेणार नाही असं स्पष्ट केल्यास याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णी घेणार सर्वोच्च न्यायालयात धाव,

    देशात महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोनच राज्यांनी परीक्षा रद्द केलीये, सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवणार असल्याची याचिकाकर्त्यांची माहिती,

    अंतर्गत मूल्यमापनानूसारचं निकाल लावण्याची शासनाची तयारी,

    मात्र न्यायालयाने परीक्षा घेण्याचा निकाल दिला तर माध्यमिक बोर्डाची परीक्षेची तयारी,

    16 लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेणं अशक्य

    न्यायालयाच्या निर्णयाची बोर्डालाही प्रतिक्षा …

  • 23 May 2021 08:07 AM (IST)

    आशा वर्कर एक दिवसीय राज्यव्यापी संप पुकारणार

    नाशिक

    – आशा,गटप्रवर्तक कर्मचारी 15 जूनला एक दिवसीय राज्यव्यापी संप पुकारणार – आपल्या विविध मागण्यांकडे राज्य सरकार,केंद्र सरकारच लक्ष वेधण्यासाठी करणार संप – कोरोना काळात आशा कर्मचारी इतकं पोटतिडकीने काम करत असतानाही,अगदी तूटपुंज मानधन दिल जात असल्याने आशा गटप्रवर्तक कृती समिती आक्रमक

  • 23 May 2021 08:06 AM (IST)

    पुणे जिल्हा सत्र न्यायालयात 6 लाख खटले प्रलंबित

    पुणे

    पुणे जिल्हा सत्र न्यायालयात 6 लाख खटले प्रलंबित ,

    न्यायालयात न्यायाधीशांची संख्या कमी असल्यानं बोर्डावर सुनावणी येण्यास लागतोय विलंब,

    सत्र न्यायालयात आजघडीला आहेत 89 न्यायाधिश तर जिल्ह्यात हीच संख्या 160 इतकी आहे,

    खटल्यांच्या तुलनेत न्यायाधिशांची संख्या खूप कमी,

    काम जास्त आणि न्यायाधिश कमी अशी स्थिती,

    न्यायाधिशांची संख्या वाढवण्याची बार असोसिएशनची मागणी,

    खटले असेच प्रलंबित राहिले तर मग न्याय कसा मिळणार ? वकिलांचा सवाल

  • 23 May 2021 08:05 AM (IST)

    पुण्यात सांबराच्या शिंगाची विक्री करणाऱ्या तरुणाला अटक

    पुणे

    पूर्ण वाढ झालेल्या सांबराच्या शिंगाची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक

    गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने केली अटक

    त्याच्या ताब्यातून सुमारे साडेतीन फुटाची ३ शिंगे करण्यात आली जप्त

    प्रविण दिलीप शिंदे (वय २७, रा. पिंपरखेड, ता. शिरुर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे तरुणाचे नाव

  • 23 May 2021 08:04 AM (IST)

    पुण्यातील प्राध्यापकांना मिळणार सातव्या वेतनश्रेणीची रक्कम

    पुणे

    प्राध्यापकांना मिळणार सातव्या वेतनश्रेणीची रक्कम,

    पात्र प्राध्यापकांना 1 जानेवारी 2016 ते 31 मार्च 2019 या कालावधीतील रक्कम सातवा वेतन जमा करण्याचा शासनाचा निर्णय,

    दोन समान टप्प्यात 1320 कोटी रुपयांच केलं जाणार वाटप,

    राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणार आर्थिक भार, 50 टक्के रक्कम देणार राज्य सरकार 50 टक्के केंद्र सरकार,

    राज्यातील प्राध्यापक शिक्षकांमध्ये आनंदाच वातावरण, अखेर सातव्या वेतन आयोगाची रक्कम होणार जमा ….

  • 23 May 2021 08:04 AM (IST)

    मुंबईतील पश्चिम उपनगरात पावसाला सुरुवात, जोरदार पावसाची हजेरी

    मुंबईचा पश्चिम उपनगरात पावसाला सुरवात…. – गोरेगाव, जोगेश्वरी, दिंडोशी या भागात पावसाला सुरवात… – आज सकाळपासून जोरदार पावसाची हजेरी…

  • 23 May 2021 08:02 AM (IST)

    एसटी महामंडळ घेणार 500 गाडे भाडेतत्त्वावर घेण्याच्या विचारात

    एसटी महामंडळ घेणार 500 गाडे भाडेतत्त्वावर घेण्याच्या विचारात

    महामंडळाच्या निर्णयास स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेचा विरोध,

    खासगी गाड्यांना परवानगी दिल्यास महामंडळाचं आर्थिक उत्पन्न घटणार,

    खासगी गाड्या जास्त प्रवाशी संख्या असणाऱ्याच मार्गावर सोडल्या जातील त्यामुळे एसटीचं दूसऱ्या मार्गावरील उत्पन्न घटणार,

    महामंडळानं खासगीकरणाचा निर्णय घेऊ नये अन्यथा आंदोलनाचा इशारा,

    स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांची माहिती ..

  • 23 May 2021 06:50 AM (IST)

    पालघरमध्ये तौक्ते’ वादळामुळे महावितरणचे 5.25 कोटींचे नुकसान, वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर

    पालघर
    पालघरमध्ये तौक्ते’ वादळामुळे महावितरणचे 5.25 कोटींचा नुकसान, महावितरणचे युद्धपातळीवर काम सुरु
    तौक्ते  चक्रीवादामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले असून आता युद्धपातळीवर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे, वादळामुळे 900 गाव अंधारात गेले होते,
    तौक्ते’ वादळामुळे महावितरणला 5.25 कोटींचा नुकसान
    ‘तौक्ते’ वादळाच्या प्रभावामुळे  पालघर महावितरण मंडळातील 900 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
    यापैकी 37 गावांचा पुरवठा अजूनही सुरू झालेला नाही.
    महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत असून येत्या दोन दिवसात या गावात वीजपुरवठा सुरळीत होईल,
     असे पालघर महावितरण मंडळाच्या अधीक्षक अभियंत्या किरण नागावकर यांनी म्हटले आहे.
  • 23 May 2021 06:48 AM (IST)

    देशाचे नेतृत्व निवडणूक जिंकण्याची रणनीती ठरवण्यात गुंतून पडले, शिवसेनेचा हल्लाबोल

    भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर यांना कोरोना झाला नाही. त्याचे श्रेय त्या नियमित गोमूत्र प्राशनाला देतात. गंगेत तरंगणाऱया शेकडो प्रेतांना ऑक्सिजन, लस मिळाली नाही. निदान त्यांना गोमूत्र तरी मिळायला हवे होते. कोरोना असो की चक्रीवादळ प्रत्येक संकटाचे राजकारण सुरूच आहे. म्हणून गंगेत फेकलेली प्रेते जिवंत होतील काय? असा सवाल शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून याबाबतचे वक्तव्य करण्यात आले आहे.

    संपूर्ण जग कोरोनाशी लढण्याची रणनीती ठरवण्यात गुंतले असताना आमच्या देशाचे नेतृत्व निवडणूक जिंकण्याची रणनीती ठरवण्यात गुंतून पडले. अमेरिका ‘मास्कमुक्त’ झाला. इस्रायल कोरोनामुक्त झाला. युरोपातील अनेक राष्ट्रे सावरली. चीनने कोरोनावर विजय मिळविला व मोठी आर्थिक झेप घेतली. आम्ही कोरोना काळातही निवडणुका आणि सीबीआय, ईडीचा खेळ करत बसलो. परिणाम काय? तर गंगेत प्रेते वाहताना आम्ही पाहिली. आता कोरोनाची तिसरी लाट येत आहे. काय सांगावे? असा सवालही शिवसेनेनं केला आहे.

Published On - May 23,2021 9:50 PM

Follow us
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.