LIVE | नाशिकच्या ननाशी परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
LIVE NEWS & UPDATES
-
नाशिकच्या ननाशी परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के
– नाशिकच्या ननाशी परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के
– सायंकाळच्या सुमारास 2.4 रिश्टर स्केलचा सौम्य धक्का बसल्याने नागरिकांमध्ये घबराट
– 14 मे रोजी या परिसरात जाणवले होते भूकंपाचे धक्के
– नाशिकपासून 40 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू
– मात्र सौम्य धक्के असल्याने काहीही नुकसान नाही
– दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांची माहिती
– दिंडोरी,सुरगाणा,कळवण तालुक्याचे सीमावर्ती भागातील घाटमाथा परिसरात वारंवार भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत
असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
-
पालघर तालुक्यातील गिरणोली येथे अचानक आग, लाखोंचे नुकसान
पालघर : पालघर तालुक्यातील गिरणोली येथील भावेश पाटील ,प्रफुल पाटील यांच्या घराला रात्री 8.30 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली आहे. ही घटना मसजताच बोईसर अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक तसेच अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले आहे. मात्र आगीत संपूर्ण घर जळून राख झाल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे.
-
-
नागालँडमध्ये झालेल्या चकमकीत महाराष्ट्राचा जवान शहीद
नागालँड येथे झालेल्या चकमकीत गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील परसोडी येथील केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले जवान प्रमोद विनायक कापगते शहीद झाले आहे. चकमकीदरम्यान, गोळी लागून त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव गुरूवारी त्यांचे मूळ जन्मगावी परसोडी येथे सकाळी 8 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या वीरमरणाने गोंदिया जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आहे.
-
पुढील 48 तासात मान्सून पश्चिम बंगालच्या पूर्व भागात दाखल होण्याची शक्यता
पुणे : पुढील 48 तासात मान्सून पश्चिम बंगालच्या पूर्व भागात दाखल होण्याची शक्यता
यास चक्रीवादळ उद्या ओडिशा आणि पश्चिम बंगालला धडकणार
पारादीप आणि बालासोर इथं यास वादळ धडक देण्याची शक्यता
बंगालच्या उपसागरात याचं अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर झालंय
पुढील 48 तासात बंगालचा पूर्व भाग आणि पश्चिम बंगाल उपसागरात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे.
यास चक्रीवादळ आणि मान्सून एकाच वेळी दाखल होण्याची शक्यता
पश्चिम बंगाल आणि ओडीशाच्या किनारपट्टी भाग असलेल्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलाय,
राज्यात कोकण, गोवा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
पुणे हवामान वेधशाळेने वर्तवला अंदाज
-
कल्याणमधील आधारवाडी डंपिंग ग्राऊंड आजपासून बंद, केडीएमसी उपायुक्त रामदास कोकरे यांची माहिती
कल्याण : कल्याण डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी
कल्याणमधील आधारवाडी डंपिंग ग्राऊंड आजपासून बंद
कचऱ्यावर उंबर्डे आणि बारावे प्रकल्पात होणार प्रक्रिया
केडीएमसी उपायुक्त रामदास कोकरे यांची माहिती
अनेक वर्षापासून डंपिंग ग्राऊंड बंद करण्याची होत होती मागणी
डंपिंगमध्ये आग आणि धुराचा नागरिकांना होत होता त्रास
-
-
अनिल देशमुख ईडी चौकशी प्रकरण, तीन बार मालकांना ईडीच्या नोटिसा
मुंबई : अनिल देशमुख ईडी चौकशी प्रकरण
तीन बार मालकांना ईडीच्या नोटिसा
तीन बार मालकांना 26 मे रोजी ईडी कार्यलयात हजर राहण्याचे आदेश
ईडीच्या अधिकाऱ्यांनी काल एका बार मालकाची चौकशी केली आहे
यानंतर आता इतर बार मालकांना ईडी चौकशीसाठी बोलावले जाणार
-
पीएसआय पदभरतीसाठीचे निकष बदलले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा एमपीएससी, पीएसआय भरतीसंदर्भात घेतला महत्वपूर्ण निर्णय
यापुढे पीएसआय पदाची मुलाखत देण्यासाठी शारीरिक चाचणीत 60 गुण मिळवणं आवश्यक
शारीरिक चाचणीत 60 गुण असतील तरच देता येणार मुलाखत
मैदानी गुण फक्त क्वॉलिफिकेशनसाठी गृहीत धरले जाणार
पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा त्यानंतर मैदानी परीक्षेत 60 गुण आवश्यक
त्यानंतरच देता येणार मुलाखत
2020 मध्ये निघालेल्या जाहिारातीला हे नियम लागू
एमपीएससीनं परिपत्रक काढत दिली माहिती
या आधी शारीरिक चाचणीचे गुण निकालासाठी केले जात होते एकत्रित
अंतिम गुणवत्ता यादीतून शारीरिक चाचणीचे गुण वगळले, फक्त पात्रतेसाठी धरले जाणार ग्राह्य
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बुद्ध पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा
मुंबई : तथागत गौतम बुद्धांचा शांती, प्रज्ञा आणि करुणेचा संदेश आज जगासाठी मार्गदर्शक असाच आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“भगवान बुद्धांच्या जीवनातूनच आपल्याला आव्हानांवर मात करण्याची दिशा मिळते. त्यांनी दिलेला प्रज्ञा, शील, करुणेचा संदेश आजच्या घडीला अधिक समर्पक आहे. यातच त्यांच्या विचारांची सार्वकालिकता आहे. बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्धांना कोटी कोटी प्रणाम आणि या पवित्र पर्वानिमित्त राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छ,” असा उद्धव ठाकरे यांनी जनतेला शुभेच्छा संदेश दिला आहे.
-
नागपुरात तीन ठिकाणी ईडीची कारवाई
नागपूर : नागपुरात तीन ठिकाणी ईडीची कारवाई
सागर भाटेवारा, समित आयजॅक्स यांच्याकडे 9 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी
सकाळी 7 ते 4:30 पर्यंत समित यांच्या घरी होती इडीची टीम
4.30 वाजता इडीची टीम पडली बाहेर
तीन लोकांची ईडीची टीम, त्यात एक महिला अधिकारी
-
नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक 6, 7 मध्ये आग, कोणतीही जीवितहानी नाही
नागपूर – नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक 6 आणि 7 मध्ये आग
सुकलेले गवत आणि झुडपांना आग
मिळालेल्या माहितीनुसार कुठलेही नुकसान नाही
अग्निशमन दलाच्या जवानांनी विझविली आग
-
राजभवनातून 12 आमदारांच्या नावांची यादी गहाळ झाल्याचा आरोप, गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी
पुणे – राजभवनातून 12 आमदारांच्या नावाची यादी गहाळ झाल्याबद्दल संबंधितांवर गुन्हा दाखल करा
– पुण्यातल्या शिवसेना शहर प्रमुखांचे पोलीस आयुक्तांना निवेदन, कारवाई करण्याची केली मागणी
– राजभवनसारख्या अती महत्त्वाच्या वास्तूमधून यादी गहाळ होणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे शिवसेनेचे मत
– राजभवनातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे तसेच याची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा,
– पुणे शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी
-
पुण्यात मेट्रो प्रकल्पात आडव्या येणाऱ्या झोपडपट्टीधारकांना 31 मेपर्यंत अल्टीमेटम, नागरिकांचा स्थलांतराला विरोध
पुण्यात मेट्रो प्रकल्पात आडव्या येणाऱ्या झोपडपट्टी धारकांना 31 मे पर्यंत अल्टीमेटम,
मेट्रो प्रकल्पग्रस्ताच स्थलांतर करण्यासाठी आजपासून पोलीस प्रोटेक्शन देऊन कारवाईला सुरुवात,
बाधित कुटुंबाना दूसरीकडे देणार घरं,
पर्यायी घरं द्यायला सुरुवात, मात्र 400 झोपडपट्टी धारकांचा स्थलांतर करण्याला विरोध,
पोलीस बळाचा वापर करून झोपडपट्टी धारकांचं स्थलांतर करायला सुरुवात,
स्थलांतरासाठी 4 हजार रुपयांचा दिला जाणार भत्ता,
मात्र स्थलांतराला नागरिकांचा जोरदार विरोध…
कामगार पुतळा आणि राजीव गांधी झोपडपट्टी इथल्या नागरिकांच होणार स्थलांतर,
महापालिका, महामेट्रो आणि झोपडपट्टी पुर्नविका, प्राधिकरणाकडून झोपडपट्टीतील सदनिका ताब्यात घ्यायला सुरुवात ….
-
इम्तियाज जलील दुकाने उघडायला आले तर शिवसैनिक उत्तर देतील, चंद्रकांत खैरे यांची सडकून टीका
औरंगाबाद :-
लॉकडाऊन प्रकरणी चंद्रकांत खैरे यांची इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका
इम्तियाज जलील हे दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचे काम करतो
इम्तियाज जलील हे दुकाने उघडायला आला तर शिवसैनिक उत्तर देतील
लॉक डाऊन उघडलं तर तिसऱ्या लाटेचा धोका
इम्तियाज जलीलवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची मागणी
-
नाशिकमध्ये पेट्रोल शंभरी पार, पेट्रोल विक्री 100.17 रुपये प्रति लिटर
नाशिक – पेट्रोलने केली शंभरी पार
नाशिकमध्ये पेट्रोल 100.17 रुपये प्रति लिटर
लॉक डाऊन मुळे आर्थिक अडचणीत असलेल्याना आणखी एक धक्का
पेट्रोलचे भाव कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी
-
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी आपरेशनला सी सिक्स्टीमुळे यश
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी आपरेशनला सी सिक्स्टी मुळे यश
नक्षलवाद नियंत्रण करणे छत्तीसगड राज्यापेक्षा महाराष्ट्र राज्यातील पोलिसांना जमले,
महाराष्ट्र राज्य सी.सिक्स्टी पथकाला निर्मिती करून या सी.सिक्स्टी पथकात स्थानिक पोलिसांना प्रशिक्षण देऊन नक्षल ऑपरेशन राबवितात यामुळे नक्षल ऑपरेशन यश आला आहे,
मागील अडीच वर्षात 142 नक्षलवादी आऊट ऑपरेशन मध्ये ६० नक्षलवाद्यांना अटक, चकमकीत 41 नक्षलवाद्यांना ठार तर 41 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केला,
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी नक्षलवादी संघटनेला मोठा हादरा
-
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको, राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी
नागपूर – मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको
– ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्यास तिव्र आंदोलन करणार
– राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा इशारा
– ओबीसी समाजाची जातीनुसार जनगणना करावी
– राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॅा. बबनराव तायवाडे यांची मागणी
-
सारथीच्या तारादूतांचा प्रश्न पुन्हा पेटणार, तारादूत सेवकांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
राज्यातील तारादूतांच आज राज्यभरात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण,
सारथी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिलं निवेदन,
लॉकडाऊन संपला की सारथी संस्थेच्या बाहेर करणार तीव्र आंदोलन,
गेल्या दीड वर्षापासून सारथी संस्थेमार्फत चालवल्या जाणाऱ्या तारादूत प्रकल्पातील तारादूतांच्या नियुक्तया रखडल्या, .
आज राज्यभरात तारादूत सेवक घरातील कुटंबियांसोबत करतायेत लाक्षणिक उपोषण
तारादूतांनी दहा दिवसांचा सारथी संस्थेला दिला अल्टीमेटम,
सारथीच्या तारादूतांचा प्रश्न पुन्हा पेटणार …
-
नाशिकमध्ये पेट्रोल 100.17 रुपये प्रति लिटर
नाशिक – पेट्रोलने केली शंभरी पार
नाशिकमध्ये पेट्रोल 100.17 रुपये प्रति लिटर
लॉक डाऊन मुळे आर्थिक अडचणीत असलेल्याना आणखी एक धक्का
पेट्रोल चे भाव कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी
-
गडचिरोलीत दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी राज नगरीत दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात,
प्रणहिता नदीतून अहेरी राजनगरी ला पाणी पुरवठा नगरपंचायत कडून करण्यात येतो
परंतु गेल्या काही दिवसात पाणीपुरवठा ची पाईपलाईन फुटल्याने नागरिकांना दूषित पाणी पिऊन आजारी होऊ लागलेले आहेत
नागरिकांनी अनेक तक्रार केल्यानंतर सुद्धा या पाईपलाइनच्या काम होत नसल्यामुळे नागरिकांनी ३जुन नंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालयास आंदोलन करणार आहे अशी भूमिका घेतली
-
अहमदनगर महापौर पदाची मुदत संपत आल्याने निवडणूक तारीख जाहीर होणार
अहमदनगर
30 जूनला महापौर पदाची मुद्दत संपत आल्याने लवकरच निवडणूक तारीख जाहीर होणार,
नगर सचिवांकडून आयुक्तांना प्रस्ताव सादर
मात्र सध्याच्या कोरोना परिस्थिती पाहता महापौर निवडणुकीला मंजुरी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष
-
लासलगाव बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी गर्दी
लासलगाव
– लासलगाव बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली वाहन नोंदणीसाठी मोठी गर्दी
– गर्दी केल्याने उडाला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
– कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाहन नोंदणी दरम्यान पडला का कोरोनाचा विसर असा प्रश्न या गर्दीमुळे होतोय उपस्थित
– मोबाईल वरून बाजार समितीच्या क्रमांकावर फोन करत वाहन नोंदणीची सुविधा असतानाही शेतकऱ्यांची मोठी गर्दी
– बाजार समिती सचिव व पोलिसांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा केला प्रयत्न
– पण शेतकरी समजून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसले यावेळी चित्र
-
उदय सामंत यांनी घेतली फडणवीसांची गुप्तभेट
सिंधुदुर्ग:-
उदय सामंत यांनी घेतली फडणवीसांची गुप्तभेट.
तौक्ते चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या कोकण दौऱ्या वेळी रत्नागिरीत झाली दोघांमधे बंद दाराआड चर्चा.
माजी खासदार निलेश राणेंचा गौप्यस्फोट
तौक्ते वादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा सोडून उदय सामंत यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेण्यासाठी तातडीने रत्नागिरीत येण्याचं नेमक कारण काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
-
राज्यातील विद्यार्थ्यांना मोफत वाटप केल्या जाणाऱ्या पुस्तकांची छपाई अपूर्ण, बालभारतीकडे 2 कोटी पुस्तकांचा तुटवडा
पुणे : राज्यातील शाळा सुरू झाल्यास पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार नाहीत पुस्तके,
राज्यातील विद्यार्थ्यांना मोफत वाटप केल्या जाणाऱ्या पुस्तकांच्या छपाईचं काम अद्याप अपुर्णचं,
बालभारतीकडे 2 कोटी पुस्तकांचा तुटवडा,
कागद खरेदीचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्यानं छपाईला लागतोय वेळ,
बालभारतीला दरवर्षी साडे न ऊ कोटी पुस्तकांची छपाई करावी लागते, मात्र यंदा साडे चार कोटीचं पुस्तकांची छपाई झालीये, ही पुस्तके बाजारात विकत घ्यावी लागतील,
सर्व शिक्षा अभियानांतर्गत वाटप केल्या जाणाऱ्या पुस्तकांची कागदाअभावी छपाई थांबली…
-
नागपुरात सागर भटेवार यांच्याकडे ईडीची रेड, तीन अधिकाऱ्यांकडून विचारपूस
– नागपुरात सागर भटेवार यांच्याकडे ईडीची रेड
– नागपुरातील शिवाजी नगर परिसरात आज सकाळी पडली ईडीची रेड
– एका मोठ्या नेत्याशी व्यायसायिक संबंध असल्यामुळे रेड पडल्याची माहिती
– ईडीचे तीन अधिकारी विचारपूस
-
स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या अस्थी कलश यात्रेला सुरुवात
हिंगोली-
स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या अस्थी कलश यात्रेला सुरुवात
कमनुरी येथील कोहिनुर निवास्थानातून निघाली अस्थि यात्रा
कळमनुरी-बाळापूर -वारंगा फाटा मार्गे नांदेड कडे रवाना
सोबत पाकमंत्री वर्षा ताई गायकवाड यांच्या सह शकडो गाड्यांचा ताफा
नांदेड येथील गोदावरी काठी होणार अस्थी विसर्जन
-
नंदूरबारमध्ये रासायनिक खतांचे दर दुपटीने वाढवले
नंदूरबार : यंदाच्या कृषी हंगामासाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचे दर दुपटीने वाढले आहेत. हे दर शासनाने मागे घेण्याचे म्हटले असले तरी जिल्ह्यात मात्र नव्या दरांनुसार खत विकी झालेलं नाही. जिल्ह्यात दरवर्षी सुमारे तीन लाख हेक्टरवर होणाऱ्या खरीप पिकांच्या पेरण्यासाठी किमान एक लाख मेट्रिक टन किंवा त्यापेक्षा अधिक खताचा साठा लागतो त्यामुळं शासनाने लवकर काही तरी निर्णय घ्यावा असे मागणी शेतकरी वर्ग करता आहे
-
राज्यातील शाळा सुरू झाल्यास पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार नाहीत पुस्तके
राज्यातील शाळा सुरू झाल्यास पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार नाहीत पुस्तके,
राज्यातील विद्यार्थ्यांना मोफत वाटप केल्या जाणाऱ्या पुस्तकांच्या छपाईचं काम अद्याप अपुर्णचं,
बालभारतीकडे 2 कोटी पुस्तकांचा तुटवडा,
कागद खरेदीचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्यानं छपाईला लागतोय वेळ,
बालभारतीला दरवर्षी साडे न ऊ कोटी पुस्तकांची छपाई करावी लागते, मात्र यंदा साडे चार कोटीचं पुस्तकांची छपाई झालीये, ही पुस्तके बाजारात विकत घ्यावी लागतील,
सर्व शिक्षा अभियानांतर्गत वाटप केल्या जाणाऱ्या पुस्तकांची कागदाअभावी छपाई थांबली…
-
उद्योगांना ऑक्सिजन उपलब्ध करून द्या, नाशकातील उद्योजकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
नाशिक – उद्योगांना ऑक्सिजन उपलब्ध करून द्या
शहरातील उद्योजकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याने आता अर्थचक्र सुरू होणे गरजेचे – उद्योजकांचा सूर
100 टक्के नाही पण काही प्रमाणात तरी ऑक्सिजन द्यावा अशी मागणी
कोरोना काळात उद्योगांना लागणारे ऑक्सिजन सिलेंडर वळवले होते हॉस्पिटलला
-
नाशिक जातपंचायत विरोधी तक्रारींसाठी आता हेल्पलाईन नंबर जारी
नाशिक – जातपंचायत विरोधी तक्रारींसाठी आता हेल्पलाईन नंबर जारी
राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांची माहिती
चार वर्षांत जात पंचायत विरोधी कायद्याचे केवळ 100 गुन्हे
जनजागृती होण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता हेल्पलाईन नाम्बर
लॉक डाऊन मध्ये जातपंचायत अधिक सक्रिय झाल्याचा चांदगुडे यांचा दावा
-
पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यासाठी आता जनरल ट्रान्सफर पोलीस मॅनेजमेंट सिस्टीम अॅपचा वापर करणार
पुणे
पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यासाठी आता जनरल ट्रान्सफर पोलीस मॅनेजमेंट सिस्टीम (जीटीपीएमएस) अॅपचा वापर करण्यात
या अॅपद्वारे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार
विशेषतः सर्वसाधारण कालावधी पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदलीसंदर्भात अॅपमुळे पारदर्शकता येणार
पदनिहाय व कामानिहाय बदल्यांच्या नोंदी होणार असल्यामुळे कामातील अडचणी दूर होणार
पोलिस ठाण्यांना योग्य कर्मचारी मिळावे यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार नवीन अॅप करण्यात आलं तयार
-
आदित्य नारायणकडून त्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त
एका टीव्ही शो मध्ये आदित्य नारायणाने अलिबागचा आक्षेपार्ह उल्लेख केला होता.
त्यावर अलिबाग वासीयांकडून तीव्र नाराजीचे पडसाद उमटले होते.
त्यानंतर मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आदित्य नारायणला 24 तासांच्या आत माफी मागण्याचा धमकी वजा इशारा दिला होता
त्यानंतर आदित्य नारायणने फेसबुकवर याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे
-
पत्नीबरोबर अनैतिक संबंधांचा संशय, नालासोपाऱ्यात मित्राकडून मित्राची रहात्या घरात हत्या
नालासोपारा –
नालासोपाऱ्यात मित्राकडून मित्राची रहात्या घरात हत्या
पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन ही हत्या केल्याच समजतयं
याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
-
अकोल्यातील बार्शीटाकळी येथे कापूस खरेदीवरुन दोन गटात वाद, 8 जण ताब्यात
अकोला –
अकोला जिल्ह्यातल्या बार्शीटाकळी येथे कापूस खरेदीवरुन दोन गटात वाद आणि हाणामारी
या वादात दोन ते तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात रवाना करण्यात आले
या घटनेदरम्यान गोळीबार देखील झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून
आतापर्यंत पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतले आहे
Published On - May 25,2021 11:18 PM