महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. आता अमुक उघडा तमुक उघडा अशा मागण्या होतील. पण हे संकट नुकतंच कमी झालं आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरु नका. रस्त्यावर उतरायचं असेल तर कोरोना योद्धा म्हणून अतरा. कोरोना साथ ही सरकारची योजना नाही. असा गैरसमज असेल तर तो मनातून काढून टाका. रस्त्यावर उतरणं म्हणजे तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे. संपूर्ण राज्याच्या आरोग्याचा प्रश्न आहे. अजूनही आपण ऑक्सिजनची व्यवस्था वाढवत आहोत.
आता आपण निर्बंध लावतो आहोत. सध्या कडक लॉकडाऊन केलेला नाही. काही ठिकाणी रुग्णसंख्या कमी होत असली तरी महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या हलकीशी वाढत आहे. शहरी भागात कोरोनाचे प्रमाण कमी होत आहे. तर ग्रामीण भागात हे प्रमाण वाढत आहे. ते कमी करणे गरजेचे आहे. आपण अनुमान लावतो आहोत की तिसरी लाट येऊ शकते. तिसरी लाट तारीख सांगून येणार नाही. ती किती दिवसांनी येणार हेही आपण सांगू शकत नाही. आजही व्हायरस आपल्यात आहे. मागील लाटेतील व्हायरस आणि या लाटेतील व्हायरस यामध्ये फरक आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की या व्हायरसमध्ये म्युटेशन्स आहेत. हा व्हायरस वेगाने पसरत आहे. हा विषाणू कित्येक पटीने लोकांना झपाट्याने ग्रासतोय. रुग्णाला बरे होण्यासाठी वेळही लागतो आहे.
सध्या कोरोना रुग्ण कमी होत आहेत. त्यामुळे निर्बंध उठवण्यात येतील का असा प्रश्न उभा राहतोय. सध्या रुग्णसंख्या ही मागील लाटेच्या सर्वोच्च शिखराएवढी आहे. साधारण 17 ते 19 सप्टेंबर 2020 च्या सुमारास आपल्या राज्यात 24 हजार 886 रुग्ण एका दिवसात सापडत होती. आता 26 मे रोजी बघायचं झालं तर साधारण 24 हजार 752 रुग्ण आढळले आहेत. म्हणजेच म्हणावे तेवढे रुग्ण कमी झालेले नाहीयेत. पहिल्या लाटेच्या उच्चांकात सक्रिय रुग्ण साधारण 3 लाख 1752 होते. आज 26 मे रोजी तीन लाख 1542 रुग्ण आहेत. म्हणजे मागील लाटेच्या उच्चांकाच्या आपण आज बरोबरीला आहोत. एक मात्र दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण त्यावेळी 78 टक्के होते. आता यावेळी या दिवसांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्के आहे. मृत्यूदरसुद्धा गेल्या वेळेला 2.65 टक्के होता यावेळा तो 1.62 टक्के आहे.
अन्न सुरक्षा येजनेत आपण आतापर्यंत दोन लाख 74 हजार मेट्रिक टन धान्याचे मोफत वितरण केले आहे. तसेच एकूण 54 ते 55 लाख शिवभोजन थाळ्यांचे मोफत वितरण केले आहे. संजय गांधी निराधार, दिव्यांग निवृत्ती, विधवा निवृत्ती वेतन अशा योजनांमध्ये साडे आठशे कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. बांधकाम कामगारांना 154 कोटी 95 लाख रुपयांचा निधी वितरित केला असून हा निधी त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आला आहे. फेरिवाल्यांसाठी साधारण 52 कोटींचा निधी दिला आहे. आदिवासींसाठी काही लाख निधी त्यांच्या खात्यात वितरित केला आहे.
सांगली :
मिरज पंढरपूर रस्त्यावर परप्रांतीय मजुरांच्या घरात घुसून पाच दरोडेखोरांनी लुटले. रस्त्यावर चारचाकी गाडीची पारेने काच फोडून मोबाईल घेऊन पसार. सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद.
सातारा :
पुणे-बंगरुळू महामार्गवर केमिकलने भरलेल्या पिकअप टेम्पो झाला पलटी
या पिकअपमधील केमिकलचा पिवळ्या रंगाचा धूर महामार्गावर पसरत असल्यामुळे या ठिकाणाहुन जाणाऱ्या नागरिकांच्या डोळ्याला होतोय त्रास
महामार्गवर साताऱ्यातील वाढे फाटा या ठिकाणी झाला पिकअपचा अपघात
अग्निशमन दलाचा बंब आणि पोलीस घटनास्थळी दाखल
सांगली – मिरजेत डीवायएसपी अशोक वीरकर पथकाने कर्नाटक-महाराष्ट्र मार्गावर सापळा रचून गोवा बनावटीची विदेशी दारूसह 7 लाखाचा मुद्देमाल जप्त तीन पळून गेले एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
पुणे –
– भोर पोलीसांनी पकडलाय 1 लाख रूपये किंमतीचा गुटखा,
– भोर पोलीसांची महाड पंढरपूर रोडवर वरंध घाटात कारवाई,
– भोर पोलीसांनी गुटखा आणि गाडी असा दोन लाख बारा हजार किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला,
– याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलंय.
पृथ्वीराज चव्हाण –
On मराठा आरक्षण
– सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सांगितलं आहे
– राष्ट्रपती किंवा केंद्राने एखादा घटक मागासवर्गीय ठरवायचं आहे
– आता सगळी जबाबदारी केंद्राची आहे
– जबाबदारी कोणाची ते एकदा स्पष्ट करा .
– भाजपने कायदा केला, मागास ठरवण्याचा अधिकार केंद्राने केला
– सप्टेंबर २०१८ मध्ये नवा कायदा केला, फडणवीस ने त्यावर उत्तर द्यावं
On पदोन्नती
– हा विषय रस्त्यावर सोडवायचा नाही
– कॅबिनेट मध्ये हा विषय सोडवलं जाईल
मंत्रालयात आक्षेपार्ह काहीही आढळून आले नाही..
नागपुरातल्या सागर काशिनाथ मंदरे या व्यक्तीने हा फोन केल्याचं समोर
12/2/2020 रोजी या इसमाने आत्मदहनाचा इशारा दिला होता आणि मुख्य सचिवांना अटक करण्याची मागणी केली होती
सदर तरुण मानसिकरित्या स्वस्थ नसल्याची माहिती
सोलापूर : भीमा नदीच्या पात्रात बुडालेल्या चार लहान मुलांचे मृतदेह सापडले
दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावात चार लहान मुले गेली होती काल वाहून
मृतात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश
सकाळपासून सुरू होती नदी पात्रात शोध मोहीम
शिवाजी रामलिंग तानवडे हे भीमा नदी पात्रात काल गेले होते पोहण्यासाठी
त्यांच्यामागे त्यांच्या दोन्ही मुली समीक्षा आणि अर्पिता तर मेहुण्याची मुलगी आरती पारशेट्टी आणि मुलगा विठ्ठल पारशेट्टी ही गेले होते पोहण्यासाठी
मात्र शिवाजी यांनी त्यांना नदीपात्राजवळून या चार ही मुलांना पाठवले होते घराकडे
शिवाजी पोहोत नदीपात्रात आतपर्यंत गेल्यानंतर चौघे परत नदीमध्ये पोहण्यासाठी होते उतरले
प्राथमिक माहितीनुसार समीक्षा आणि अर्पिता तानवडेला येत पोहणे
मात्र आरती आणि विठ्ठल पारशेट्टी या दोघांना मात्र पोहता येत नव्हते.
नदी पात्राचा अंदाज न आल्याने आऱती आणि विठ्ठल दोघेही बुडू लागले
तेव्हा समीक्षा आणि अर्पिता या दोन्ही बहिणींनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला
मात्र या मुळे चौघे देखील पाण्यात होते बुडु लागले
मुले बुडत असल्याचा आवाज शिवाजी यांना यांनी वाचविण्याचा केला होता प्रयत्न
मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने चारही मुले त्यांच्या हातातून होते निसटले
काल रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम
आज दुसऱ्या दिवशी दुपारी सापडले चारही मुलांचे मृतदेह
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी समाजात खळबळ निर्माण झाली- विजय वडेट्टीवार
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याने ओबीसीला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत
मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे
निवृत्त न्यायाधीशयाच्या नेतृत्वात समिती बनवून ओबीसी जनगणना करुनच ओबीसीला न्याय मिळू शकेल
मी सगळ्या ओबीसी नेत्यांना विनंती करतो राजकारण दूर ठेऊन एकत्रित या
न्यायालयाने दिलेल्या सूचनांच पालन करावं
ठरवलं तर महिनाभरात जनगणना होऊ शकते, संख्याबळ वरून वाद विवाद आहे, ते दूर होतील
केंद्र सरकारला सुद्धा विनंती आहे की त्यांनी देशभर जनगणना करावी, राष्ट्रीय स्तरावर आयोग निर्माण करावा
मराठा समाजाच्या आरक्षणात राज्य सरकारनं मोठ मोठ्या वकिलांची फौज लावली होती, राजकीय स्वरूप देण्याचं काम, फायदा घेण्याचं काम करत आहे
मोदी सरकारच्या 7 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाने नागपूरात निषेध आंदोलन केले.
नागपूर शहर काँग्रेसचे कार्यालय देवडिया काँग्रेस भवन समोर हे आंदोलन करण्यात आले..
नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली…
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्यभर भाजपचा ‘सेवा ही संघटन’ उपक्रम
उपक्रमांतर्गत आज कोल्हापुरात आशा वर्कर चा भाजपच्या वतीने सन्मान
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील बाभूळगाव गंगा या गावात कोरोना नियम धाब्यावर बसवून बेफाम वाळू उपसा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. असंख्य मजूर एकाच वेळी वाळू भरत आहेत मात्र या ठिकाणी एकही कामगाराच्या तोंडाला मास्क दिसत नाही किंवा सोशल अंतरही पळाला जात नाही असं असतानाही या परिसरातील महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दारूबंदी समीक्षा समितीसाठी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे सोबत चर्चा करणार, विजय वडेट्टीवार गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी उठविण्यासाठी प्रयत्न सुरु
दारूबंदी उठल्यास जिल्ह्यात पर्यटन स्थळावर बाहेरून येणाऱ्या पर्यटकाकडून उद्योग मिळेल व विकासासाठी चालना मिळेल
गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदीच्या मुद्द्यावर जिल्ह्याच्या नागरिकांचे सर्वांचे लक्ष
मालवाहतुकीमुळे एसटी मालामाल मात्र चालकांच्या खिशाला बसते खीळ,
बुलडाणा जिल्ह्यातील आगारातील चित्र, तुटपुंजा मानधन मिळत असल्याने चालकांमध्ये नाराजी,
परतीची वाहतूक मिळेपर्यंत त्याच ठिकाणी करावा लागतो मुक्काम, त्यामुळे खिशाला बसते झळ,
तर मानधन ही वेतनातून कपात केल्या जात आहे, या कपातीला चालकांनी विरोध दर्शविला असून पगारातून कपात न करण्याची मागणी
रेशनचे धान्य खुल्या बाजारात विक्रीला नेताना केले जप्त, लोहारातील परवाना धारक रेशन दुकानदारचे धान्य कॉटन मार्केट चौकातील दुकानदाराकडून 1 मेटेडोर भरून धान्य जप्त
58 पोते गहू, 39 पोते तांदूळ केला जप्त, जिल्हा पुरवठा अधिकारी पथकाची कारवाई
पोलीस उपनिरीक्षकांचे खोटे ओळखपत्र बनवून अनेकांना गंडा घालणाऱ्या एका भामट्याला वसईत अटक …
वसईच्या माणिकपूर पोलिसांची कारवाई
पोरस विराफ जोखी असं भामट्याचं नाव असू न तो वसईचा राहणारा आहे.
अटक भामटा हा वसई विरार महापालिकेचा ठेकेदार आहे.
हा व्यक्ती पोलीस असल्याचं सांगून लोकांची फसवणूक करत होता. काही लोकांना त्यानं लुटलंही होतं.
विशेष म्हणजे स्वतःच्या वर्गमैत्रिणीला त्यानं पोलीस असल्याचं सांगून लुटलं. त्यांनंतर पीडितेनं तक्रार माणिकपूर पोलिसांत केल्याने या भामट्याची भांडाफोड झाली आहे.
लॉकडाऊनमुळे शेतजमीन मोजणीची प्रकरणं रखडली
– जिल्ह्यात आठ तालुक्यातील मोजणीचे २ हजार ६१८ प्रकरणे रखडली
– यातील सीमा मोजणीसंदर्भात १ हजार ४१७ तर उपसिमा मोजणी संदर्भात १ हजार १५४ प्रकरणे आहे प्रलंबित
– खरीफ हंगाम तोंडावर असतांना अडचणीत वाढ
– १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असल्याने कामे रखडल्याची भूमी अभिलेख कार्यालयाची माहिती
नाशिक
– महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन
– मोदी सरकारला 7 वर्षे पूर्ण होत असल्याने,कामकाजाच्या विरोधात करणार आंदोलन
– काँग्रेस कमिटी बाहेर सकाळी 10 वाजता करणार आंदोलन
– 12 वाजता पत्रकार परिषद घेणार
येत्या 1 जूनपासून विमान प्रवास महागणार
नागरी विमान उड्डाण मंत्रालयाची (Civil Aviation Ministry) माहिती,
सरकारने हवाई भाड्याची मर्यादा 13 ते 16 टक्क्यांनी वाढविली
येत्या 1 जूनपासून हे नवे दर लागू केले जाणार
देशांतर्गत विमान प्रवास महागणार आहे.
मुंबई पश्चिम उपनगरात येत्या ऑक्टोबरमध्ये मेट्रो २अ आणि मेट्रो ७ सुरू
दोन मेट्रोमध्ये अर्धा तासाचे अंतर असेल.
मेट्रोची संख्या वाढवितानाच दोन मेट्रोमधील वेळेचे अंतर कमी करण्यासाठी विचार
मेट्रो सुरू झाल्यानंतर त्याचे जाळे वाढणार, साहजिकच मुंबई आणखी जोडली जाणार, महत्त्वाची केंद्रे जोडली जातील. उपनगर जवळ येईल. त्यानंतर प्रवास सुखकर होईल
‘मुंबई इन मिनिट्स’ हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले
मुंबईच्या पश्चिम उपनगरात येत्या काही दिवसांत मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ प्रवाशांना घेऊन धावणार
या दोन्ही मेट्रो रेल्वेचे तिकीट सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणारे असेल, असा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) दावा
सहा डब्यांच्या ट्रेनकरिता प्रवासी भाडे दराचा विचार सुरु
हे भाडे कमीत कमी 10 रुपये, तर जास्तीत जास्त 80 रुपये असेल.
मान्सूनच्या तोंडावर चक्रीवादळ येणार हे गृहीत धरून तसेच चक्रीवादळात वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून चक्रीवादळरोधक वीज पायाभूत सुविधा कशा उभारता येतील, याचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे.
चक्रीवादळाचा मुकाबला करण्यासाठी महावितरण, महापारेषण यांच्यासह मुंबईतील बेस्ट, अदानी, टाटा यांच्यासारख्या संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेला एक कोअर गटाची स्थापन
याशिवाय २४ तास सक्रिय असलेला एक नियंत्रण कक्षही महावितरणच्या मुख्यालयात स्थापन करण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशात येथून ऊस पाठविला जातो.
रसवंतीला तीन हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे दर मिळतो, तर तोच ऊस कारखाने २२०० ते २५०० रु. प्रतिटनाने घेतात.
निफाड तालुक्यातील चांदोरी पंचक्रोशीत सुमारे ५०० ते ७०० व्यापारी कमिशन एजंट म्हणून उसाचा व्यापार करतात.
दरवर्षी निफाड तालुक्यातून रसवंतीसाठी ऊस पाठविला जातो. मागील वर्षापासून असलेल्या कोरोना संकटामुळे उसाच्या व्यापारांवर मोठा परिणाम झाला आहे.
गतवर्षी आणि याही वर्षी ऐन हंगामात लॉकडाऊन असल्यामुळे उसाची मागणी घटली. ज्या व्यापाऱ्यांनी बाहेर ऊस पाठविला होता, त्यांचे लाखो रुपये बुडाले आहे.
यामुळे ऊस व्यापाऱ्यांना लाखोंचा फटका सहन करावा लागला आहे.
बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगारांचा ऐतिहासिक वेतन करार
भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कामगार सेनेची कामगिरी
तब्बल 10 हजार 700 रुपयांची घसघशीत पगारवाढ
तीन वर्षांचा हा वेतन करार झाला आहे
यंदाच्या पुण्यतिथी दिनी भारतीय डाक विभागाकडून गोपीनाथ मुंडेंचा त्यांचे छायाचित्र असलेल्या तिकिटाचे प्रकाशन करत गौरव केला जाणार आहे.
हे उदघाटन कोणाच्या हस्ते होणार याबद्दल माहिती भेटू शकली नाही.
हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे.
याआधी राष्ट्रसंत भगवान बाबा, यशवंतराव चव्हाण, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर अशा महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींच्या तिकिटाचे प्रशासन भारतीय डाक कार्यालयाकडून करण्यात आलेले आहे