Maharashtra News LIVE Update | महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूरच्या दिशेला रवाना, प्रत्येक रेल्वे स्थानकावर किरीट सोमय्या यांच्या समर्थकांची घोषणाबाजी

| Updated on: Sep 20, 2021 | 12:44 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूरच्या दिशेला रवाना, प्रत्येक रेल्वे स्थानकावर किरीट सोमय्या यांच्या समर्थकांची घोषणाबाजी
Follow us on

किरीट सोमय्या अखेर कोल्हापूरला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये बसले आहेत. मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर सोमय्या पोहोचल्यानंतर मोठा हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सोमय्या यांची समजूत काढण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. पण सोमय्या कोल्हापूरला जाण्यावर ठाम होते. अखेर पोलिसांनीच त्यांना कोल्हापूरला जाण्यास परवानगी देत महालक्ष्मी एक्सप्रेपर्यंत आणून सोडलं. त्यानंतर सोमय्या गाडीत बसले. यावेळी सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा निशाणा साधला.

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Sep 2021 12:20 AM (IST)

    महालक्ष्मी एक्सप्रेस पुण्यातून पुढे रवाना

    महालक्ष्मी एक्सप्रेस पुण्यातून पुढे रवाना झाली आहे. पुणे रेल्वे स्थानकावर भाजप कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी किरीट सोमय्यांचे अभिनंदन केले. यानंतर महालक्ष्मी एकस्प्रेस पुणे स्थानकावरुन सुटली. ही एक्सप्रेस आता थेट सातारा रेल्वे स्थानकावर थांबेल.

  • 20 Sep 2021 12:03 AM (IST)

    महालक्ष्मी एक्सप्रेस पुणे रेल्वे स्थानकावर दाखल, भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

    महालक्ष्मी एक्सप्रेस पुणे रेल्वे स्थानकावर दाखल झाली आहे. विशेष म्हणजे भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्तेही पुणे रेल्वे स्थानकावर उपस्थित आहेत. कार्यकर्त्यांकडून सोमय्या यांचं अभिनंदन करण्यात आलं. तसेच त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.


  • 19 Sep 2021 11:32 PM (IST)

    कोल्हापुरात पोलीस प्रशासनाची बैठक सुरु

    कोल्हापुरात पोलीस प्रशासनाची बैठक सुरु आहे. किरीट सोमय्या कोल्हापुरात आले तर कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक आणि पोलीस महानिरीक्षक यांच्यात बैठक सुरु आहे. सोमय्या यांना नेमकं कुठे ताब्यात घेणार याबाबत गुप्तता बाळगली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

  • 19 Sep 2021 11:08 PM (IST)

    महालक्ष्मी एक्सप्रेस लोणावळा रेल्वे स्थानकावरुन सुटली, किरीट सोमय्या कोल्हापूरच्या दिशेला रवाना

    किरीट सोमय्या यांच्या समर्थनार्थ भाजप कार्यकर्तेही लोणावळा रेल्वे स्थानकावर दाखल झाले. त्यांनी सोमय्या यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी किरीट सोमय्या रेल्वेच्या दरवाज्यावर आले. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर महालक्ष्मी एक्सप्रेस लोणावळा रेल्वे स्थानकावरुन सुटली.

  • 19 Sep 2021 11:02 PM (IST)

    महालक्ष्मी एक्सप्रेस लोणावळा रेल्वे स्थानकावर पोहोचली, भाजप कार्यकर्त्येही उपस्थित, मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी

    महालक्ष्मी एक्सप्रेस लोणावळा रेल्वे स्थानकावर पोहोचली, भाजप कार्यकर्त्येही उपस्थित, मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी

  • 19 Sep 2021 09:48 PM (IST)

    कोल्हापुरात किरीट सोमय्या दाखल झाले तर त्यांना हिसका दाखवणारच, मुश्रीफ समर्थकांचा इशारा

    भाजप नेते किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरच्या दिशेला रवाना झाले आहेत. सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविरास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मुश्रीफ समर्थकांनी त्यांना कोल्हापुरात येण्याचं आव्हान दिलं आहे. दुसरीकडे सोमय्या कोल्हापूरला रवाना झाले तर कोल्हापुरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे कोल्हापुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कोल्हापुराला येण्यास मज्जाव केलाय. याबाबतची नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना पाठवली आहे. पण त्या नोटीसला न जुमानता ते कोल्हापुरला निघाले आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही घडामोडी घडताना दिसत आहेत. कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि मुश्रीफ समर्थक एकत्र जमले आहेत. त्यांनी सोमय्या कोल्हापुरात दाखल झाले तर त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा दिला आहे.

  • 19 Sep 2021 09:34 PM (IST)

    महालक्ष्मी एक्सप्रेसने कल्याण रेल्वे स्थानक सोडलं, किरीट सोमय्या कोल्हापूरच्या दिशेला रवाना

    महालक्ष्मी एक्सप्रेसने कल्याण रेल्वे स्थानक सोडलं, किरीट सोमय्या कोल्हापूरच्या दिशेला रवाना, महाराष्ट्र पोलीस सध्या गाडीत नाहीत. पण लोहमार्ग पोलीस गाडीत आहेत

  • 19 Sep 2021 09:31 PM (IST)

    महालक्ष्मी एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकावर दाखल, पोलिसांचा मोठा फौजफाटा

    महालक्ष्मी एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकावर दाखल, पोलिसांचा मोठा फौजफाटा, किरीट सोमय्या सध्या बोगीत बसले आहेत. तर बोगीबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

  • 19 Sep 2021 09:10 PM (IST)

    महालक्ष्मी एक्सप्रेस ठाणे रेल्वे स्थानकावरुन सुटली

    महालक्ष्मी एक्सप्रेस ठाणे रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर पोलीस गाडीत दाखल झाले. पोलिसांनी त्यांना कोल्हापूरला न जाता ठाणे रेल्वे स्थानकावर उतरावं, अशी विनंती केली. यावेळी किरीट सोमय्या यांनी पोलिसांना नकार दिला. त्यामुळे काही पोलीस रेल्वेतून खाली उतरले. तर काही पोलीस रेल्वेत थांबले. त्यानंतर गाडी ठाणे रेल्वे स्थानकावरुन सुटली.

  • 19 Sep 2021 08:57 PM (IST)

    ठाणे रेल्वे स्थानकावर पोलिसांचा फौजफाटा, किरीट सोमय्यांना ताब्यात घेण्याची शक्यता

    ठाणे रेल्वे स्थानकावर पोलिसांचा फौजफाटा, किरीट सोमय्यांना ताब्यात घेण्याची शक्यता

  • 19 Sep 2021 08:47 PM (IST)

    महालक्ष्मी एक्सप्रेस दादर रेल्वे स्थानकावरुन सुटली, पोलीस किरीट सोमय्या यांना ठाणे किंवा कल्याणला ताब्यात घेण्याची शक्यता

    महालक्ष्मी एक्सप्रेस दादर रेल्वे स्थानकावरुन सुटली, पोलीस किरीट सोमय्या यांना ठाणे किंवा कल्याणला ताब्यात घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

  • 19 Sep 2021 08:41 PM (IST)

    किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर जाण्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो : गृहराज्यमंत्री

    “भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्याचे आदेश दिले आहेत. सोमय्या वारंवार वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेते आणि मंत्र्यांवर आरोप करत असतात. त्यांच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. याशिवाय गणेशोत्सव सुरु आहे. पोलीस गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात आहेत. त्यांच्यावर ताण आहे. सोमय्या यांना केंद्र सरकारने सुरक्षा दिली आहे. त्यांच्या कोल्हापुरात जाण्याने त्यांच्या सुरक्षेसह कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना जिल्ह्यात येण्यास मनाई केली आहे. कायद्यामध्ये ज्या तरतूदी आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना जे अधिकार प्राप्त आहेत त्या अधिकाऱ्यांनुसार मनाईचे आदेश दिले आहेत”, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

  • 19 Sep 2021 08:35 PM (IST)

    किरीट सोमय्या यांना दादर किंवा ठाणे रेल्वे स्थानकावर पोलीस अडवणार, सूत्रांची माहिती

    किरीट सोमय्या यांना दादर किंवा ठाणे रेल्वे स्थानकावर पोलीस अडवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सोमय्या पुढे नेमकं काय पाऊल उचलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे.

  • 19 Sep 2021 08:06 PM (IST)

    महालक्ष्मी एक्सप्रेस सीएसएमटी रेल्वे स्थानकावरुन सुटली, किरीट सोमय्या कोल्हापूरच्या दिशेला रवाना

    किरीट सोमय्या अखेर कोल्हापूरला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये बसले आहेत. मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर सोमय्या पोहोचल्यानंतर मोठा हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सोमय्या यांची समजूत काढण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. पण सोमय्या कोल्हापूरला जाण्यावर ठाम होते. अखेर पोलिसांनीच त्यांना कोल्हापूरला जाण्यास परवानगी देत महालक्ष्मी एक्सप्रेपर्यंत आणून सोडलं. त्यानंतर सोमय्या गाडीत बसले. यावेळी सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा निशाणा साधला.

  • 19 Sep 2021 07:49 PM (IST)

    किरीट सोमय्या यांना पोलिसांनी रेल्वे स्थानकावर अडवलं

    किरीट सोमय्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर दाखल झाले आहेत. ते सीएसएमटी रेल्वे स्थानकावरुन सूटणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला जाणार आहेत. पण सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पोहोचताच मुंबई पोलिसांनी त्यांना अडवलं आहे. तिथे सोमय्या यांनी पोलिसांना न अडवण्याची विनंती केली. पण पोलिसांनी सुरक्षेचं कारण देत त्यांना कोल्हापूरला जाण्यास मज्जाव केला.

  • 19 Sep 2021 07:42 PM (IST)

    किरीट सोमय्या सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर दाखल

    किरीट सोमय्या सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर दाखल, पोलिसांनी अडवलं, पोलिसांसोबत बातचित सुरु

  • 19 Sep 2021 07:37 PM (IST)

    किरीट सोमय्या सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या दिशेला रवाना

    किरीट सोमय्या सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या दिशेला रवाना झाले आहेत. दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यात चर्चा सुरु आहे. त्यामुळे मुंबईतील घडामोडींना वेग आला आहे.

  • 19 Sep 2021 06:58 PM (IST)

    किरीट सोमय्या कोल्हापूरला जाण्यावर ठाम

    किरिट सोमय्या कोल्हापूरला जाणार, आधी गिरगाव चौपाटीवर बाप्पाचं दर्शन घेणार, त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजेची सीएसएमटी रेल्वे स्थानकावरुन महालक्ष्मी एक्सप्रेस ही ट्रेन पकडणार, किरीट सोमय्यांची माहीती, तर सीएसएमटी स्थानकावर किंवा कोल्हापूर स्थानकावर किरीट सोमय्या यांना पोलीस ताब्यात घेण्याची दाट शक्यता

  • 19 Sep 2021 06:48 PM (IST)

    मुंबईत घडामोडींना वेग, किरीट सोमय्या गिरगाव चौपाटीच्या दिशेला, महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापुरला जाण्यावर ठाम

    मुंबईतील घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे मुंबईच्या सर्वच चौपाट्यांवर गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा उत्साह आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचं राजकारणही ढवळून निघालं आहे. मुंबई पोलिसांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई केली. सोमय्या यांना कोल्हापुरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोमय्या यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसही पाठवली आहे. पण सोमय्या कोल्हापूरला जाण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत. सोमय्या आता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गिरगाव चौपाटीला निघाले आहेत. त्यानंतर ते महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापुरला रवाना होणार आहेत. सोमय्या यांनी स्वत: याबाबतची माहिती दिलीय.

  • 19 Sep 2021 06:41 PM (IST)

    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी मनसेची पक्षबांधणी, पक्षाध्यक्ष राज ठाकरे मुलासह नाशिक, पुणे, कल्याण-डोंबिवली दौरा करणार

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाचे नेते अमित ठाकरे यांचे पुढील दोन आठवडे भरगच्च वेळापत्रक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी व्युहरचना आणि पक्षसंघटन बांधणी

    राज ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्र दौरा करणार आहेत.

    21 ते 23 सप्टेंबर : नाशिक

    25 ते 27 सप्टेंबर : पुणे

    1 ते 3 ऑक्टोबर : कल्याण- डोंबिवली

    त्यानंतर मराठवाड्यातही जाणार

  • 19 Sep 2021 06:12 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 175 नवे कोरोनाबाधित, 5 जणांचा मृत्यू

    पुणे :
    दिवसभरात १७५ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
    – दिवसभरात २५३ रुग्णांना डिस्चार्ज.
    – पुण्यात करोनाबाधीत ०५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२.
    – १७६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
    – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९९२२८.
    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १७८१.
    – एकूण मृत्यू -८९९७.
    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८८४५०.
    – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७८९१.

  • 19 Sep 2021 03:48 PM (IST)

    किरीट सोमय्यांच्या कोल्हापूर दौऱ्याआधीच राडा, सोमय्या यांच्या घरी पोहोचले पोलीस

    किरीट सोमय्यांच्या कोल्हापूर दौऱ्याआधीच राडा

    किरीट सोमय्या यांच्या घरी पोहोचले पोलीस

    गृहमंत्र्यांनी आपल्याला अटक करण्याचा आदेश काढल्याचा सोमय्यांचा दावा

    मुश्रीफांच्या साखर कारखान्यावर जाणार आहेत सोमय्या

    तुम्ही येवूनच दाखवा मुश्रीफ सर्मथकांनी दिलाय इशारा

    सोमय्या विरूध्द मुश्रीफ समर्थकांचा उद्या कोल्हापूरात सामना

  • 19 Sep 2021 03:32 PM (IST)

    चिमूर तालुक्यात अंगणवाडी केंद्राबाहेर जादूटोण्याचा प्रकार

    चंद्रपूर : चिमूर तालुक्यात अंगणवाडी केंद्राबाहेर जादूटोण्याचा प्रकार,

    चिमूर तालुक्यातील आमडी- बेगडे येथील अंगणवाडी केंद्राबाहेर दोन दिवस लिंबू-हळद टाकल्याच्या प्रकार,

    अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिला प्रकार,

    भयभीत झालेल्या नागरिकांनी अंगणवाडी केंद्रातून बालकांसाठी  पोषण आहार नेण्यास दिला नकार,

    गावातील नागरिकांचे प्रबोधन होण्याची गरज स्थानिकांनी केली व्यक्त,

    छोट्याच्या आमडी- बेगडे गावात अंधश्रद्धेच्या नव्या प्रकाराने खळबळ,

    जिल्ह्यातील अंधश्रद्धा -जादूटोणा- भानामतीच्या प्रकारातील ही पाचवी घटना

  • 19 Sep 2021 03:17 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात वृद्ध दाम्पत्याचा खून

    वाशिम :

    जिल्ह्यातील चाका तीर्थ प्रकल्प परिसरात असलेल्या मंदिरावरील रखवालदार वृद्ध दाम्पत्याचा खून

    गजानन निंबाळकर 60 व निर्मला निंबाळकर 55 गजानन अशी मृतकांची नावं

    वृद्ध दाम्पत्याच्या खुनामुळं एकच खळबळ

    जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी घटनास्थळी पोहचले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जऊळका पोलीस पुढील तपास करीत आहेत

  • 19 Sep 2021 02:36 PM (IST)

    तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवावर कोरोनाचे सावट, भाविकांविना साजरे होणार विधी

    उस्मानाबाद

    तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवावर कोरोनाचे सावट, भाविकांविना साजरे होणार विधी

    29 सप्टेंबर पासून मंचकी निद्रेने सुरू होणार नवरात्र उत्सव

    29 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार आयोजित

    विविध अलंकार पूजा, घटस्थापना व उत्सव मंदिर संस्थान करणार साजरे

    मंदिरे बंद असल्याने भाविक पुजारी व्यापारी नाराज

  • 19 Sep 2021 12:55 PM (IST)

    मनोहरमामाला करमाळा पोलिसांकडे वर्ग करण्याची न्यायालयाने परवानगी दिली

    बारामती : मनोहरमामाला करमाळा पोलिसांकडे वर्ग करण्याची न्यायालयाने दिली परवानगी..

    – मनोहरमामावर करमाळा पोलिस ठाण्यात दाखल आहे बलात्काराचा गुन्हा..

    – करमाळा पोलिस करणार मनोहरमामाची चौकशी..

  • 19 Sep 2021 08:21 AM (IST)

    नाशिक मेनरोडवर एक आठवड्यापासून थांबलं स्मार्ट सिटीचे काम

    नाशिक –

    मेनरोडवर एक आठवड्यापासून थांबलं स्मार्ट सिटीचे काम

    संतप्त व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

    काम बंद असल्याने खोदून ठेवलेल्या खड्ड्यात झाली घाण

    ऐन सणासुदीच्या काळात शहरात पार्किंगला जागाच नाही

    इतक्या वर्षीय एकही खड्डा नसलेला रस्ता फोडल्याने व्यापाऱ्यांनी यापूर्वीच केला होता कामाला विरोध

    स्मार्ट सिटी प्रशासनाच्या कामाचा नाशिकरांना मनस्ताप

  • 19 Sep 2021 08:21 AM (IST)

    मास्क न वापरल्याने पुणे शहरातील 5 लाख 66 हजार 24 नागरिकांवर दंडात्मक कारवाई

    पुणे –

    – मास्क न वापरल्याने शहरातील 5 लाख 66 हजार 24 नागरिकांवर दंडात्मक कारवाई,

    – यातून एकूण 27 कोटी 79 लाख 76 हजार 660 रुपयांचा दंड वसूल,

    – महापालिकेने 29 हजार 769, तर पोलिसांना 5 लाख 36 हजार 255 नागरिकांवर कारवाई,

    – महापालिकेच्या तिजोरीत 1 कोटी 44 लाख 5304 रुपये, तर राज्य सरकारच्या तिजोरीत 26 कोटी 35 लाख 71,350 रुपयांची भर.

  • 19 Sep 2021 08:19 AM (IST)

    वाशिम तालुक्यातील बॅरेजस वगळता 26 प्रकल्पांत सरासरी 45.63 टक्केच जलसाठा

    वाशिम :

    वाशिम तालुक्यातील बॅरेजस वगळता 26 प्रकल्पांत सरासरी 45.63 टक्केच जलसाठा

    पावसाळा संपण्याच्या स्थितीत प्रकल्पांच्या पातळीत फारशी वाढ होण्याची शक्यता कमी..

    त्यामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या रब्बीत सिंचनाचाही प्रश्न गंभीर होणार आहे..

    जिल्ह्यातील एकूण 134 लघु प्रकल्पांत मिळून 75.38 टक्के जलसाठा…

    वाशिम तालुका वगळता सर्वच तालुक्यांतील प्रकल्पांची सरासरी पातळी 70 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा..

  • 19 Sep 2021 08:17 AM (IST)

    समग्र शिक्षा अभियानाच्या निधी खात्याचा निर्णय फिरवला

    बुलडाणा

    समग्र शिक्षा अभियानाच्या निधी खात्याचा निर्णय फिरवला,

    महाराष्ट्र बँके ऐवजी बडोदा बँकेत खाते उघडण्याचा गोंधळ,

    महाराष्ट्र बँकेत व्यवहाराचे खाते उघडण्याच्या निर्णयाला 3 आठवड्यातच बदलले,

    त्यामुळे तालुका , जिल्हास्तरावर गोंधळ उडालाय,

    बडोदा बँकेच्या शाखा कमी असल्याने व्यवहाराला अडचणी येनार असल्याचा शिक्षकांची ओरड

  • 19 Sep 2021 08:14 AM (IST)

    कोकण विभागात लाखो ग्राहकांची हजारो कोटी रुपयांची वीज बिले थकीत

    रत्नागिरी –

    कोकण विभागात लाखो ग्राहकांची हजारो कोटी रुपयांची वीज बिले थकीत

    त्यामुळे महावितरण कंपनीच्या डोक्यावर थकीत वीज बिलांचा डोंगर उभा

    ही थकबाकी वसूल होणे गरजेचे

    त्यामुळे या थकबाकीकडे गांभीर्याने लक्ष देऊन वीज बिलांची रक्कम तात्काळ वसूल करा,

    कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता भटकर

  • 19 Sep 2021 08:14 AM (IST)

    11 लाख बालकांना मिळणार आशाताई समक्ष जंतनाशक गोळ्या

    सोलापूर –

    11 लाख बालकांना मिळणार आशाताई समक्ष जंतनाशक गोळ्या

    वैयक्तिक व आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे लहान मुले येत असतात दूषित मातीच्या संपर्कात

    परिणाम म्हणून जंतदोषाचे  संसर्ग होत असल्याचे निदर्शनास

    या पासून बचावासाठी आरोग्य विभागातर्फे 11 लाख 27 हजार बालकांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार

    1 ते 19 वर्षे वयोगटातील मुलांना गोळ्यांचे वाटप केले जाणार

  • 19 Sep 2021 06:53 AM (IST)

    उजनी धरणातील पाण्याची आवक मंदावली

    सोलापूर –

    उजनी धरणातील पाण्याची आवक मंदावली

    धरण 100 टक्के भरण्यास लागणार विलंब

    मागील चार-पाच दिवसांपासून वेगाने वाढत असली उजनी धरणाची पाणी पातळी रात्री मंदावली

    काल रात्रीपर्यंत उजनी धरणात 82 . 27 टक्के पाणीसाठा

    दौंडमधून पाण्याचा विसर्ग झाला कमी

    दौंड मधून आता फक्त चार हजार 728  क्यूसेस इतका विसर्ग सुरू

  • 19 Sep 2021 06:52 AM (IST)

    अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना राहणार आज बंद

    सोलापूर –

    अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना राहणार आज बंद

    दूध, मेडिकल , दवाखाने वगळता सर्व व्यवहार राहणार बंद

    अनंतचतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी काढले आदेश

    गर्दी होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काढले आदेश

  • 19 Sep 2021 06:52 AM (IST)

    वीजबिल वसुलीला गेलेल्या अभियंत्याला मारहाण

    सोलापूर –

    वीजबिल वसुलीला गेलेल्या अभियंत्याला मारहाण

    कनिष्ठ अभियंतासह कर्मचाऱ्यास दोघांनी शिवीगाळ करत केली मारहाण

    मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील प्रकार

    पांडुरंग जाधव ,मोहन मारुती फडे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल

    थकित विजबीलामुळे वीज खंडित केल्याने केली मारहाण
    वारंवार होणार्‍या हल्ल्याच्या निषेधार्थ अधिकारी व कर्मचारी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात