Maharashtra News Live Update : गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत नवी दिल्लीत काँग्रेसची खलबत
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज गुरूवार 14 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. आज आंबेडकर जयंती सुध्दा राज्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. हातकणंगले येथील बेपत्ता 34 वर्षीय वखार व्यापारी दीपक हिरालाल पटेल यांचा तब्बल अठरा दिवसांनी राधानगरी तालुक्यातील पाट पन्हाळा येथे खून करून मृतदेह पुरल्याचे उघडकीस आले. हा खून पैशातूनच झाला असल्याचा संशय व्यक्त केला असून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले आहे.