Maharashtra News Live Update : सुप्रीम कोर्टात उद्या ओबीसी आरक्षणावर सुनावणी, आरक्षण टिकणार?

| Updated on: Apr 20, 2022 | 10:07 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : सुप्रीम कोर्टात उद्या ओबीसी आरक्षणावर सुनावणी, आरक्षण टिकणार?
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

आज बुधवार 20 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Apr 2022 09:09 PM (IST)

    संदीप कर्णिक पुण्याचे नवे सह पोलीस आयुक्त

    संदीप कर्णिक पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक असताना मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता.. या संपूर्ण घटनेची तेव्हा राज्यभरात चर्चा झाली होती.. त्यानंतर संदीप कर्णिक यांची तातडीने बदली करण्यात आली होती..

  • 20 Apr 2022 09:08 PM (IST)

    दीपक कुमार पांडे यांची अखेर बदली

    नाशिक – शहराचे पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांची अखेर बदली

    पोलिस आयुक्तपदी जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती.

    काही दिवसांपूर्वीच पांडे यांनी पत्र लिहून केली होती बदली करण्याची मागणी

    घरगुती कारणांमुळे बदली करण्याची केली होती विनंती

  • 20 Apr 2022 09:06 PM (IST)

    सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा ओबीसी बाबत सुनावणी

    राज्य सरकारने केलेल्या नव्या कायद्याला दिलंय आव्हान

    मध्य प्रदेशच्या धर्तीवर आरक्षित प्रभाग आणि निवडणुकांचे वेळापत्रक ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारकडे

    ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी पर्याय म्हणून हा कायदा आणला आहे, कोर्टात टिकणार की नाही उद्या निर्णय होणार

    नुकतेच मध्यप्रदेशच्या धर्तीवर आरक्षित प्रभाग आणि निवडणुकांचे वेळापत्रक ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारने स्वतःकडे घेण्याचा कायदा केला होता.

    या कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते आणि त्याची उद्या सुनावणी आहे.

  • 20 Apr 2022 07:40 PM (IST)

    बारामतीत सीबीआयची धाड; जीएसटी कार्यालय अधीक्षक लाच घेताना जाळ्यात..

    सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात सीबीआयने बारामतीतील जीएसटी कार्यालयाच्या अधीक्षकाला दहा हजार रुपयांची लाच मागताना पकडले आणि त्याला अटक केली आहे. या संदर्भातील माहिती अजूनही गोपनीय ठेवली असून त्याची चर्चा मात्र सुरू आहे. बारामती शहरातील तीन हत्ती चौकात जीएसटी भवन आहे. जीएसटी भवनच्या बारामती मंडळाच्या अधिक्षकाला सीबीआयने अटक केली आहे.. बारामतीतील एका बांधकाम व्यावसायिकाला ही लाच मागितल्याची प्राथमिक माहिती आहे. या बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या तक्रारीवरून थेट सीबीआयने ही कारवाई केली आहे.

  • 20 Apr 2022 07:22 PM (IST)

    बारामती ; छत्रपती कारखान्यावर शेतकरी मेळावा

    – खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा..

    – पवारांच्या होमपीचवर राजू शेट्टी यांची सभा..

    -थोड्याच वेळात राजू शेट्टी यांचं होणार आगमन

  • 20 Apr 2022 07:05 PM (IST)

    पुण्यातील दगडूशेठ हरवाई गणपती मंदिरात मोगरा महोत्सव

    50 लाख फुलांची मंदिराला आरास

    भाविकांच मन प्रसन्न करणारी मोगरा फुलांची सजावट

    पुणेकरांची गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी !

  • 20 Apr 2022 06:37 PM (IST)

     मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

    • शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा वाढविण्यास मान्यता. (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

    • जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करुन त्यासाठी किमान ५ टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय. (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)

    • मुंबईतील मौजे मनोरी (ता. बोरीवली) येथील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्टला भाडेपट्ट्याने मंजूर शासकीय जमिनीचा भाडेपट्टा पुढील ३० वर्षासाठी नुतनीकरणाचा निर्णय. (महसूल विभाग)

    • तिरुपती देवस्थानास नवी मुंबई येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणीसाठी भूखंड प्रदान करण्याचा निर्णय (नगरविकास विभाग)

    • पुणे महानगर मेट्रो रेल्वे टप्पा -१ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज पूर्णत: भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्प करण्यास मान्यता (नगरविकास विभाग)

    • महसूल वाढीसाठी विद्यमान एफएल-२ परवान्यातून अतिउच्च दर्जाची मद्यविक्री परवाना आणि उच्च दर्जाची मद्यविक्री परवाना असे उपवर्ग निर्माण करण्यास मान्यता. (गृह विभाग)

    • काजूबोंडे, मोहाफुले पासून उत्पादित केलेल्या मद्यास विदेशी मद्य असा दर्जा देण्याचा आणि या पदार्थांसह फळे, फुले यापासून मद्यार्क उत्पादन व त्यातून विदेशी मद्यनिर्मिती करण्यासाठी धोरण. (गृह विभाग)

  • 20 Apr 2022 06:08 PM (IST)

    मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संबूस यांची माहिती

    राज्य सरकारपेक्षा आम्हाला राज ठाकरेंचा आदेश महत्वाचा

    पुण्यात 3 तारखेनंतर मस्जिदसमोर भोंगे लागणार

    कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी राज्य सरकारची

    राज्य सरकारने लवकरात लवकर भोंगे उतरवावेत

  • 20 Apr 2022 05:52 PM (IST)

    आमदार रवी राणांचा मातोश्रीवर जाण्याचा मुहूर्त ठरला…

    22 तारखेला आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा आपल्या कार्यकर्त्यांसोबत मुंबईला जाणार….

    मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा आमदार रवी राणांचा निर्धार….

    विदर्भ एक्सप्रेसने आमदार रवी राणा जाणार मुंबईला…

    आमदार रवी राणांची माहिती…

  • 20 Apr 2022 05:21 PM (IST)

    दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला बेड्या

    दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलीय, या पाच आरोपीकडून चार पिस्टल , दोन जिवंत काडतुस ,एक एअरगण , चार मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय .शहरातील श्रावस्तीनगर भागातील नाल्याच्या झुडपात हे आरोपी लपून बसले होते .त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतलय. ही टोळी रात्रीच्या अंधारात रस्त्यावर लोकांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून लूट करत होती,दरोडा टाकण्यापूर्वी ही टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकलीय.

  • 20 Apr 2022 05:09 PM (IST)

    सदावर्तेंची वकिली धोक्यात? कायदे तज्ज्ञ असीम सरोदे काय म्हणातात?

    वकिल गुणरत्न सदावर्तेंविरोधात महाराष्ट्र बार कौन्सिल आणि गोवा बार कौन्सिलकडे तक्रार

    शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी केली तक्रार दाखल

    वकिल कायद्यातील 24 A सेक्शननुबार गंभीर गैरवर्तणूक वकिली पेशाशी अप्रामाणिक , फसवणूक केली असेल तर कारवाई होऊ शकते

    सेक्शन 36 नुसार अनूपालन समिती निर्णय घेऊ शकते

    दोन वर्षापर्यंत वकिली सनद दोन वर्षापर्यंत निलंबित केलं जातं

    त्यांना त्यांच म्हणणं मांडण्याची संधी दिली जाऊ शकते

    गुणरत्न सदावर्तें यांच वर्तन वकिली पेशाशी सुसंगत नाही

    बार कौन्सिलकडून सदावर्तेंवर दोन वर्ष वकिलीपासून निलंबित कारवाई होणार ?

  • 20 Apr 2022 04:52 PM (IST)

    मुंबई विद्यापिठाचा पिक्चर घोटाळा?

    ब्रेक – मुंबई विद्यापिठाचा पिक्चर घोटाळा आरटीआयमध्ये ऊघड-गगलानींचा दावा

    – १५ लाखांसाठी सिद्धेश इंटरप्राईजेस या कंपनीला राज्य सरकारची परवानगी न घेता आणि कायदेशीर तज्ञाचा सल्ला न घेता मुंबई विद्यापीठाने आपली ५ एकर जागा ८ महिन्याकरिता १५ लाख रुपये भाड्यावर दिली, माहिती अधिकारात बाब उघड…

    तसेच मुंबई विद्यापीठात फीचर फिल्मच्या चित्रीकरणाकरिता पाच एकर जागा ही मेसर्स सिद्धेश इंटरप्रायजेसला देण्यासाठी कोणत्याही निविदा मागविण्यात आल्या नाहीत.

    – अशा महसुल प्रकरणात शासन परवानगी सोबत कायदेशीर सल्ला घेत निविदा जारी करणं बंधनकारक, अनिल गलगलेंची माहीती…

    – मुंबईमध्ये गोरेगाव येथील फिल्मसिटीचे भाडेदर जास्त असल्याने भाडं वाचवण्यासाठी हा प्रकार घडल्याचा आरोप…

    – यात काही राजकीय व्यक्तींचे धागेदोरे असण्याची शक्यता,. म्हणून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी अनिल गलगली यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केलीये…

  • 20 Apr 2022 04:31 PM (IST)

    शिष्ट मंडळाने दिली राज ठाकरेंच्या सभा स्थळी भेट

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिष्ट मंडळाने दिली राज ठाकरेंच्या सभा स्थळी भेट..

    राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील सांस्कृतिक क्रीडा मैदान या ठिकाणी होणार सभा..

    राज्यातील पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन केली मैदानाची पाहणी..

    सभेच्या तयारीसाठी ही महत्त्वाची भेट..

    शेकडो मनसे सैनिक आले मैदानाच्या पाहणीसाठी…

  • 20 Apr 2022 04:06 PM (IST)

    संदीप देशपांडेंचा अमोल मिटकरींना अप्रत्यक्ष टोला

  • 20 Apr 2022 03:17 PM (IST)

    परिवहन मंत्री अनिल परब Live

    आधी सातवेळा कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केले की कामावर या कोणतीही कारवाई होणार नाही

    या आंदोलनामुळे एसटीचे आणि राज्यातील जनतेचे फार मोठे नुकसान झाले

    एसटीची कर्मचारी यांच्याबद्दल काही वादच नाही, ती त्यांची रोजी रोटी आहे

    असं नात्यापासून दुरावलेला माणूस जवळ येतो तेव्हा माणूस भावनिक होतो

    मात्र त्यांच्या भावना वेगळ्या पद्धतीन भडकवलं, त्यामुळे सर्वांचं मोठं नुकसान झालं

    यांच्या भावनेशी खेळण्याचं काम झालं, त्यांना विलीनीकरणाचे अमिष दिले गेले

    आणि एसटी कर्मचाऱ्यांकडून कष्टकरी म्हणत पैसे उकळले, हे सर्व बाहेर येईलच

    मात्र दुर्दैवाने यात एसटीचं आणि कर्मचाऱ्यांचं मोठं नुकासान झालं

    वेगळं सिंडीकेट तयार करून त्यांना लुटले गेले, त्यातून सदावर्ते यांनी कामगारांच्या पैशातून गाड्या आणि मालमत्ता घेतल्या

    पाच महीने कामगारांना पगार नव्हता, तरी त्यांना फसवलं गेलं

    समितीने सांगितलं आहे की विलीनीकरण शक्य नाही

    एसटीच्या कर्मचाऱ्यांबाबत आमची सहानुभूती नेहमी आहे

    त्यामुळे त्यांना करारातील सर्व मुद्द्याप्रमाणे फायदे दिले

    पगार आणि डीएही शासनाप्रमाणे दिला

    आजपर्यंत कधी एसटीच्या इतिहासात एवढी वाढ झाली नव्हती

    त्यानंतरही कामगारांना भडकवलं गेलं, सदावर्तेंनी भूलथापा दिल्या

    वाढीव पगार सर्व कर्मचाऱ्यांना मिळणारच आहे, आता कामावर येणाऱ्यांनाही मिळणार आहे

  • 20 Apr 2022 03:16 PM (IST)

    परिवहन मंत्री अनिल परब Live

    सत्तर हजाराच्या आसपास कर्मचारी कामवार हजर राहिले

    उद्या, परवा पर्यंत सर्व कर्मचारी कामावर हजर राहतील

    सर्व रूट चालू करण्याचे नियोजन झाले आहे

    दोन तीन दिवसात एसटी पूर्वपदावर येईल

    आम्ही हायकोर्टात ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केले आहे त्यांना कामावर घेण्याचे सांगितले होते

    तसे सर्व कर्मचारी कामावर घेत आहोत

    जे कर्मचारी 22 तारखेपर्यंत कामवर येतील त्यांच्यावर कारवाई होणार नाही

  • 20 Apr 2022 03:09 PM (IST)

    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटली Live

    कोण काय म्हणेल या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही

    मात्र पोलीस कारवाई करतील

  • 20 Apr 2022 03:06 PM (IST)

    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटली Live

    आपल्या राज्यात आणि देशात अनेक संघटना आहेत

    ज्या पद्धतीने सध्या ध्रुवीकरण करण्याचे काम सुरू आहे, त्यावर कारवाई करण्यात येईल

    पक्षाच्या कामाचा संदर्भात राष्ट्रवादीची बैठक होती

    कुठल्याही कायद्यात स्पीकर लावणे आणि उतरवणे ही कायद्याची जबाबदारी नाही

    कुठेही लाऊडस्पीकर लावताना पोलिसांची परवानगी हवीच

    ज्यांना लाऊडस्पीकर लावायचा आहे त्यांनी सुप्रीम कोर्ट आणि राज्याच्या जीआरची अंमलबजावणी केली पोहीजे

    त्यामुळे सरकारने हे करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही

    अमरावतीसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिसांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत

    नवनीत राणा यांना महत्व देण्याची गरज नाही

  • 20 Apr 2022 03:03 PM (IST)

    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटली Live

    कारवाईची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात येतील

    याचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी राज्यातील सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलवणार आहे

    तसेच काही संघनांचीही बैठक बोलवून चर्चा करणार आहे

    त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल

    काही जणांनी न्यायालयाच्या निर्णयची अंमलबजीवणी करण्याचे ठरवलेअसेल तर मी त्याचे स्वागत करतो

    राज ठाकरेंच्या सभेंविरोधात कोणतीही निवेदन माझ्याकडे आली नाही

    औरंगाबाद पोलिसांकडे आली आहेत, ते याबाबत निर्णय घेतील

    सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय स्वेच्छेने घ्यावा

    सर्व पक्षांंच्या बैठकीला राज ठाकरे यांनाही बोलवणार

  • 20 Apr 2022 03:02 PM (IST)

    गृहमंत्री दिलीप वळसे-पाटली Live

    लाऊडस्पीकरसंबंधी पोलीस महासंचालकांना बैठक घ्यायला सांगितली होती

    त्या बैठकीतला आढावा आला आहे

    आगामी काळात परिस्तिती निर्माण झाल्यास काय करून शकतो याचा आढावा घेतला

    कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे

    परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यात काय सुव्यस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे

    या बाबी कायदा गंभीरतेने घेत आहे

    सर्वांना विनंती आहे कायदा हातात घेऊ नका

    तेढ निर्माण करून नका, व्यवस्था बिघडवू नका

    असे काही झाल्यास कठोर कारवाई केली जाईल

    शांतता प्रस्थापित केली जाईल

    हा प्रश्न नवा नाही

    सुप्रीम कोर्टाचा निकाल जुना आहे

    2015 ला राज्य सरकारने काही जीआर काढले आहेत

    यात लाऊडस्पीकर लावण्याची पद्धत ठरवून दिली आहे

  • 20 Apr 2022 01:49 PM (IST)

    मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी

    एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईतील गिरगाव कोर्टानं सदावर्तेंना कोठडी सुनावली. बुधवारी गिरगाव कोर्टात याबाबत युक्तिवाद पार पडला. यावेळी स्वतः गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद केला. ‘एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 200, 300 रुपये मी मर्जीनं घेतले, ‘एवढे कमी पैसे कोणता वकील घेतो ते पोलिसांनी सांगावं, असं गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलंय. तसंच ‘माझ्याकडे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांपैकी 48 हजार क्लायंट होते’ असाही युक्तिवाद कोर्टात गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, एकीकडे गिरगाव कोर्टानं सदावर्तेंना न्यायलयीन कोठडी सुनावल्यानंतर आता कोल्हापूर पोलीस गुणरत्न सदावर्तेंचा ताबा मागण्याच्या तयारी आहेत. कोल्हापूर पोलीस गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्याच्या तयारी आहेत. मराठा समाजाबाबत केलेल्या आक्षेपार्य वक्तव्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी कोल्हापूर पोलीस मागणार ताबा घेणार असल्याचं सांगितलंय जातंय.

  • 20 Apr 2022 01:18 PM (IST)

    सोलापुरात गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल

    सोलापुरात गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल

    – सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला गुन्हा

    – कलम 153अ  ब, 500, 503, 506, 507 कलमानुसार गुन्हा दाखल

    – छावाचे योगेश पवार यांनी दिली फिर्याद

  • 20 Apr 2022 01:16 PM (IST)

    उद्या पुण्यात मुस्लिम संघटनांची महत्वपूर्ण बैठक

    उद्या पुण्यात मुस्लिम संघटनांची महत्वपूर्ण बैठक

    बैठकीत 50 संघटना सहभागी होण्याची शक्यता

    सध्या सुरू असलेल्या भोंग्याच्या वादावरून चर्चा होण्याची शक्यता

    मुस्लिम संघटनांचा सलोखा परिषद घेण्याचा विचार

    4 तारखेला सलोखा परिषद होण्याची शक्यता

  • 20 Apr 2022 01:14 PM (IST)

    अनिल बोडेंविरोधात गुन्हा दाखल, अचलपूर दंगल प्रकरणी

    अनिल बोडेंविरोधात गुन्हा दाखल, अमरावती गाडगेनगर पोलिसात गुन्हा दाखल

    मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर अचलपूर दंगलीच्या मास्टरमाइंड असल्याचा बोंडेंनी केला होता आरोप

    काँग्रेसचे प्रदेश सचिव हरिभाऊ मोहोड यांच्या तक्रारीवरून अनिल बोंडें यांच्या वर 502 अंतर्गत गुन्हा दाखल

  • 20 Apr 2022 12:30 PM (IST)

    गृहमंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी घेतली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट

    दुपारी माध्यमांना बोलणार असल्याची  गृहमंत्र्यांची माहिती

  • 20 Apr 2022 12:06 PM (IST)

    सदावर्तेंना गिरगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश, गुणरत्न सदावर्तेंचा ताबा गावदेवी की कोल्हापूर पोलिसांकडे?

    सदावर्तेंना गिरगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश

    गुणरत्न सदावर्तेंचा ताबा गावदेवी की कोल्हापूर पोलिसांकडे?

    क्रिस्टल टॉवरमधील सर्व रहिवाशांना पालिकेची नोटीस

    गुणरत्न सदावर्तेंचं क्रिस्टल टॉवरमधील घर अनधिकृती

  • 20 Apr 2022 12:03 PM (IST)

    राज्यातील सर्व मशिदींवर सीसीटीव्ही लावा, मनसे नेते बाळा नांदगावकरांची सरकारकडे मागणी

    राज्यातील सर्व मशिदींवर सीसीटीव्ही लावा मनसे नेते बाळा नांदगावकरांची सरकारकडे मागणी

  • 20 Apr 2022 11:57 AM (IST)

    मोठी बातमी, किरीट सोमय्यांप्रमाणे त्यांचे पुत्र नील सोमय्यांनाही कोर्टाचा दिलासा

    मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याप्रमाणे आता त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनाही उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. आयएनएस विक्रांत मदतनिधी घोटाळा प्रकरणात तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयानने मुंबई पोलीसांना आदेश आहेत. पोलीस चौकशीला हजर राहत तपासांत सहकार्य करण्याचे नील सोमय्यांना न्यायालयाकडून निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देशही त्याचवेळी न्यायालयाने दिले आहेत. एप्रिल 25 ते 28 दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 2 वाजता तपास अधिकाऱ्यांपुढे चौकशीला निल सोमय्यांना हजर रहावे लागणार  आहे.

  • 20 Apr 2022 11:19 AM (IST)

    औरंगाबादेत राज ठाकरेंच्या सभेच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन

    औरंगाबादेत राज ठाकरे यांच्या सभेच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन

    थोड्याच वेळात सुरू होणार बैठक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते येण्यास सुरुवात

    पक्षाचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या उपस्थित बैठक

  • 20 Apr 2022 11:11 AM (IST)

    गृहमंत्री वळसे पाटलांची पोलीस महासंचालकांसह बैठक

    गृहमंत्री वळसे पाटलांची पोलीस महासंचालकांसह बैठक

    दिलीप वळसे-पाटलांची रजनीश शेठ यांच्यासह बैठक

    भोंग्यांच्या मुद्द्यावर गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांची बैठक

    गृहमंत्र्यांना रजनीश शेठ मतांबाबत माहिती देणार

    सर्व सूचनांचा विचार करुन मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर करणार

  • 20 Apr 2022 11:09 AM (IST)

    जहांगीरपुरतल्या अतिक्रमणावरील कारवाईस सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

    जहांगीरपुरतल्या अतिक्रमणावरील कारवाईस सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती दिली आहे. दिल्ली सरकारकडून जहांगीरपुरीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती. रामनवमीला जहांगीरपुर दगडफेक झाली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, यावर आता कोर्टाने स्थगिती आणली आहे.

  • 20 Apr 2022 11:05 AM (IST)

    जहांगीरपुरीत अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर, दिल्ली सरकारची कारवाई

    दिल्ली सरकारकडून अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर जहांगीरपुरीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. रामनवमीला जहांगीरपुर दगडफेक झाली होती. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

  • 20 Apr 2022 11:03 AM (IST)

    माजी उपजिल्हाप्रमुख संजय मोहिते यांचे निधन

    कराड ब्रेकिंग

    शिवसेनेचे माजी सातारा उपजिल्हाप्रमुख संजय मोहिते याचे ह्रदयविकाराच्या झटक्याने कराड येथे निधन झालं. ते 52 वर्षांचे होते. सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून संजय मोहिते यांची ओळख होती.

  • 20 Apr 2022 10:43 AM (IST)

    हातभट्टी दारु तयार करणाऱ्या महिलांच्या हातात आली शिलाई मशीन

    – खासदार सुप्रिया सुळे पोहोचल्या ग्रामीण पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन परिवर्तनच्या उपक्रमाच्या कार्यक्रमात

    – हातभट्टी दारु तयार करणाऱ्या महिलांच्या हातात आली शिलाई मशीन

    – सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांचा अनोखा उपक्रम

    – खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत केले होते ऑपरेशन परिवर्तन उपक्रमाचे कौतुक

    – आज या उपक्रमाच्या प्रत्यक्ष कार्यस्थळाला दिली भेट

    – सोलापुरातील मुळेगांव तांडा येथे उभारलाय उपक्रम

  • 20 Apr 2022 10:42 AM (IST)

    साखर कारखाना संघ आणि चेअरमन, हार्वेस्टर मालकाची बैठक

    राज्यातील शिल्लक ऊसासंदर्भात आज राज्य सहकारी साखर कारखाना संघाची कारखान्यांचे चेअरमन आणि हार्वेस्टर मालकाची बैठक

    ऊस शिल्लक न राहता कारखान्यांनी शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जावा याचं नियोजन करण्यासाठी आयोजित केली बैठक

    सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होतीये बैठक

    ऊसतोड कामगार गावाकडे निघाल्यानं हार्वेस्टरनं ऊस नेण्याचं नियोजन !

    अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांची टीव्ही 9 मराठीला.माहिती

  • 20 Apr 2022 10:40 AM (IST)

    धक्कादायक! नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीचा तिघांकडून विनयभंग

    नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीचा तिघांनी केला विनयभंग

    – तू ओठांना एवढी लिपस्टिक का लावली ? तू सुंदर दिसतेस असे म्हणत काढली छेड

    – पिडीत मुलगी मैत्रिणीसोबत दुचाकीने जात असतांना रस्त्यात थांबवत केला प्रकार

    – काल संध्याकाळची म्हसरुळ परिसरातील घटना

    – म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 20 Apr 2022 10:38 AM (IST)

    दिल्ली सरकारकडून जहांगीरपुरीत अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर

    दिल्ली सरकारकडून अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर जहांगीरपुरीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई रामनवमीला जहांगीरपुर दंग झाली होती कडेकोट बंदोबस्तात जहांगीरपुरीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई

  • 20 Apr 2022 10:05 AM (IST)

    संजय राऊत यांचा केंद्रावर निशाणा

    रश्मी शुक्ला यांनी ज्यांचे ज्यांचे फोन टॅप केले.. त्या सगळ्यांचे एन्टी सोशल इलेमेन्ट्स दाखवून आमच्यावर पाळत ठेवली गेली..

    कुणाला ड्रग्स पेडलर म्हटलंय.. कुणाला गँगस्टर म्हटलंय..

    जेव्हा सरकार बनत होतं, तेव्हा हे सगळं सुरु होतं..

    आमच्यावर पाळत ठेवून सरकारमध्ये काय चर्चा होते.. आम्ही काय बोलते, याची प्रायव्हसी भंग झाली..

    पोलिस अधिकारी… जो निष्पक्ष काम करेल, अशी अपेक्षा असेल.. पण त्यानं राजकीय फायद्यासाठी काम केलं.. आणि अशा पोलीस अधिकाऱ्याला केंद्र सरकार पाठीशी घालतंय, हे दुर्भाग्यपूर्ण…

    खडसे, पटोले, मी स्वतः… फोन टॅपिंगची परवानगी घेताना.. आमचे तेच नंबर ठेवून नावं बदलून परवानगी घेण्यात आली…

  • 20 Apr 2022 08:55 AM (IST)

    औरंगाबाद खंडपीठात आज शिर्डी साईबाबा मंदिर विश्वस्तांसदर्भात सुनावणी

    शिर्डी साईबाबा विश्वस्त व्यवस्थेतील उर्वरीत 5 सदस्यांच्या निवडीबाबत सुनावणी

    औरंगाबाद खंडपिठात आज होणार सुनावणी

    17 विश्वस्त असलेल्या संस्थानच्या विश्वस्त मंडळात सध्या 12 सदस्य नियुक्त तर 5 पदे रिक्त

    शिवसेना 2 , कॉग्रेस 2 आणि राष्ट्रवादीच्या कोटयातुन 1 अशी 5 पदे बाकी

    सदस्य संख्या कमी असल्याने विश्वस्त मंडळास धोरणात्मक निर्णय घेण्याची परवानगी नाही

    सात महिन्यांपासुन उर्वरीत विश्वस्तांची नेमणुक नाही,  राज्य सरकारकडून आज यादी सादर होण्याची शक्यता

  • 20 Apr 2022 08:52 AM (IST)

    औरंगाबादेत राज ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात विरोध

    औरंगाबादेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात विरोध

    राजकीय पक्ष, संघटनानी दिले जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला परवानगी नाकारण्याचे निवेदन

    राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग, ऑल इंडिया पँथर सेना, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष आणि GAC संघटनेनी दर्शवला विरोध

    एकीकडे सभेची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात विरोध वाढतोय

    औरंगाबाद शहरातील एकता आणि शांती भंग होऊ शकते, असे निवेदनात उल्लेख आहेत

  • 20 Apr 2022 08:49 AM (IST)

    आंदोलनाबाबतचे खटले दोन आठवड्यात निकाली काढण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

    आंदोलनाबाबतचे खटले दोन आठवड्यात निकाली काढण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश..

    सार्वजनिक हिताच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक आणि राजकीय पक्षांचा संघटनांनी केले होते आंदोलने..

    ज्या आंदोलनात आणि मोर्चात जीवित हानी झाली नाही आणि पाच लाखांपेक्षा अधिक सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही असे खटले दोन आठवड्यांत निकाली काढण्याचे आदेश..

    राज्यातील सर्व फौजदारी न्यायालयांना औरंगाबाद उच्च न्यायालयाचा आदेश..

    शासन नियमाप्रमाणे प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ काढून घेण्यासंदर्भात याचिकेत विनंती..

  • 20 Apr 2022 08:48 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील 85 टक्के एसटी कर्मचारी कामावर परतले

    अमरावती जिल्ह्यातील 85 टक्के एस टी बस कर्मचारी कामावर परतले..

    2280 पैकी जवळपास 1930 एसटी कर्मचारी कामावर परतले…

    दररोज 225 बस रस्त्यावर धावत आहे.दरोरोज 70 हजार किलोमीटर प्रवास..

    अमरावती जिल्ह्याला मिळत आहे 20 लाखाचे उत्पन्न…

    22 तारखेनंतर पूर्ण क्षमतेने एस टी बस धावणार…

    574 एसटी बस चालक तर 619 वाहक कामावर परतले..

    विभागीय वाहतुक नियंत्रक श्रीकांत गभणे यांची माहिती…

  • 20 Apr 2022 08:47 AM (IST)

    राज ठाकरेंच्या स्वागतासाठी राज्यभरातील मनसे पदाधिकारी औरंगाबादेत येणार

    राज ठाकरेंच्या सभेच्या तयारीसाठी औरंगाबादेत मनसेचे राज्यभरातील पदाधिकारी आज औरंगाबाद मध्ये होणार दाखल..

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांचा राज ठाकरे यांच्या सभेच्या नियोजनासाठी आज औरंगाबाद दौऱ्यावर

    राज ठाकरे यांच्या सभेच्या नियोजनासाठी औरंगाबाद शहरासह औरंगाबाद जिल्ह्यात होणार आज बैठका..

    राज ठाकरे यांची सभा ऐतिहासिक व्हावी यासाठी मनसे सैनिकांचे शर्तीचे प्रयत्न सुरु..

    राज ठाकरे यांच्या सभेच्या तयारीसाठी राज्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची औरंगाबाद वारी..

  • 20 Apr 2022 08:44 AM (IST)

    औरंगाबाद येथे 90 टक्के कर्मचारी कामावर रुजू

    एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर औरंगाबाद येथे कर्मचारी कामावर हजर

    औरंगाबाद येथे 90 टक्के कर्मचारी कामावर रुजू

    मात्र हा संप पाच महिने चालल्याने अनेक गाड्या उभ्या होत्या.

    त्यामुळे तांत्रिक बिघाड या गाड्यांमध्ये झाल्याने त्यांच्या दुरुस्ती आणि मेंटन्स करण्याचं काम सध्या सुरू

    तर आणखीन किमान पंधरा ते वीस दिवस पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरू होण्यास लागतील.

  • 20 Apr 2022 08:06 AM (IST)

    पुण्यात चार हजार कर्मचारी कामावर परतले

    पुणे जिल्ह्यात एसटी वाहतुक पूर्वपदावर येण्यास सुरुवात

    जिल्ह्यातील 13 डेपोमधील जवळपास चार हजार कर्मचारी आत्ता पर्यंत कामावर परतले

    स्वारगेट डेपोतील 350 ते 400 कर्मचारी कामावर हजर

    स्वारगेट डेपोतून लांब पल्ल्यासह जिल्हाअंर्तगत एसटी वाहतूक सुरु

  • 20 Apr 2022 08:05 AM (IST)

    कोल्हापुरात अजूनही 1 लाख 14 हजार लोक लसवंत नाहीत, 41 हजारांहून अधिक जणांची बूस्टर डोसकडे पाठ

    कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल एक लाख 14 हजार लोकांनी घेतला नाही कोरोनाचा एक ही डोस

    तर 41 हजार हुन अधिक जणांची बूस्टर डोसकडे पाठ

    कोरोना संसर्ग कमी झाल्याचा परिणाम

    जिल्ह्यात आतापर्यंत 18 ते सहा वयोगटातील 97 टक्के लोकांचा लसीकरण झालय पूर्ण

    मात्र अनेक प्रयत्ना नंतर ही 1 लाख 14 हजार लोकांची लसीकरणाला नापसंती

    लसीकरण झालेल्या लोकांचा आरोग्य विभागाकडून पाठपुरावा

  • 20 Apr 2022 07:47 AM (IST)

    कोकणातील रिफायनरी विरोध आता प्रशासकीय पातळीवरही

    रत्नागिरी- कोकणातील रिफायनरी विरोध आता प्रशासकीय पातळीवर देखील!

    रिफायनरीविरोधकांचं आता थेट एमआयडीसीला पत्र

    बारसू – सोलगाव पंचक्रोशीतील जमिन संपादित करण्यास विरोध

    रिफायनरी, तत्सम रासायनिक प्रकल्पांसाठी जमिन संपादित न करण्याचा पत्रात उल्लेख

  • 20 Apr 2022 07:41 AM (IST)

    बालविवाहाला उपस्थित राहणाऱ्यांवरही आता होणार गुन्हा दाखल

    कोल्हापुरात बालविवाहाला उपस्थित राहणाऱ्यांवरही आता होणार गुन्हा दाखल

    जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचना

    चाईल्ड लाइन सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला निर्णय

    जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर झाली लाईनची यांची बैठक

    बालविवाहाला उपस्थित राहणाऱ्या बरोबरच मंगल कार्यालयांच्या मालकांवर होणार कारवाई

  • 20 Apr 2022 07:40 AM (IST)

    कायम वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना महावितरणचा दिलासा

    महावितरणच्या नागपूर परिमंडळातील कायम वीजपुरवठा खंडित असलेल्या 688 ग्राहकांना दिलासा

    – कायम वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनाविलासराव देशमुख अभय योजनेचा लाभ

    – कायम वीजपुरवठा खंडित असलेल्यांनी 3.03 कोटींपैकी 1.88 कोटींचा केला भरणा

    – या  ग्राहकांना 1.15 कोटी रुपयांची मिळाली सवलत

    – नागपूर परिमंडळात कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांची संख्या 1 लाख 5 हजारच्या वर

  • 20 Apr 2022 07:39 AM (IST)

    नाशकातील धरणात 76 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक

    नाशिक – धरणात 76 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक

    – गतवर्षीच्या तुलनेत नऊ धरणांमध्ये पाणी साठा कमी

    – तापमानाचा पारा वाढू लागल्याने तीव्र पाणीटंचाई

    – पाणी काटकसरीने वापरण्याचे पाणी पुरवठा विभागाचे आवाहन

  • 20 Apr 2022 07:38 AM (IST)

    21 ते 23 एप्रिलदरम्यान कोकणात अवकाळी पावसाची शक्यता

    रत्नागिरी- सतत बदलणाऱ्या वातावरणात आता कोकणवासीयांना मिळणार अवकाळी पावसाचा दणका २१ ते २३ एप्रिल कोकणात अवकाळी पावसाची शक्यता मेघगर्जेनेसह मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून वातावरण ढगाळ

  • 20 Apr 2022 07:37 AM (IST)

    नाशिकमध्ये स्ट्रक्चलर ऑडिटसाठी जुन्या इमारतींचे सर्वेक्षण

    नाशिकमध्ये स्ट्रक्चलर ऑडिटसाठी जुन्या इमारतींचे सर्वेक्षण

    – आयुक्तांच्या आदेशाने नगररचना बजावणार नोटीस

    – सर्वेक्षण आधी संबंधित इमारत मालकांना येणार नोटीस

    – पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर जुने इमारती वाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट

  • 20 Apr 2022 07:36 AM (IST)

    म्हाडा घोटाळा चौकशीला 25 विकासकांचा असहकार

    नाशिक – म्हाडा घोटाळा चौकशीला 25 विकासकांचा असहकार

    – 65 विकासकांना नोटीस 35 विकासकांकडूनच नोटिशीला उत्तर

    – प्रत्यक्ष पाहणीतील स्थिती आणि म्हाडाचे म्हणने यांचा अहवाल सादर करणार

    – पुढील आठवड्यात पालिका आयुक्तांच्या कोर्टात अहवाल सादर होणार

  • 20 Apr 2022 07:30 AM (IST)

    औरंगाबादेत होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टीझर जारी, ‘मनसे’कडून सभेची ब्रँडिंग

    औरंगाबाद ब्रेकिंग :-

    औरंगाबादेत होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेचा टीझर जारी

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सभेसाठी टीझर जारी

    टीजर मध्ये औरंगाबादचा संभाजीनगर म्हणून केला उल्लेख

    राज गर्जना आणि ऐतिहासिक सभा अशी मनसे कडून सभेची ब्रँडिंग

    वातावरण निर्मितीसाठी मनसेकडून पहिला टीजर जारी

  • 20 Apr 2022 07:23 AM (IST)

    नागपूर विद्यापीठासाठी राज्य सरकारकडे मागीतले 107 कोटी

    नागपूर विद्यापीठासाठी राज्य सरकारकडे मागीतले 107 कोटी

    – नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त विविध सोयीसुविधांसाठी मागीतले 107 कोटी

    – विद्यार्थ्यांसाठी कौशल्य, क्रीडा, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयीयुवीधांसाठी मागीतला निधी

    – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी वर्षांला ॲागस्टमध्ये होणार सुरुवात

  • 20 Apr 2022 07:12 AM (IST)

    नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर दोन तरुण बुडाले

    नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर दोन तरुण बुडाले

    – दिड वाजेच्या सुमारासची घटना

    – धर्मेंद्र मेहेर आणि आकाश पचोरी असे त्यांची नावे

    – चार मित्रापैकी दोन बुडाले

    – पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल

  • 20 Apr 2022 07:11 AM (IST)

    पुणे विद्यापीठाकडून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या सत्राचे सुधारित वेळापत्रक जाहीर

    यानुसार दुसरे सत्र मार्च ते मे दरम्यान सुरू होणारे दुसरे सत्र जून ते सप्टेंबरदरम्यान संपणार

    विद्यापीठाने प्रत्येक अभ्यासक्रमनिहाय शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिले

    या वेळापत्रकानुसार शैक्षणिक कामकाज करावे लागणार

  • 20 Apr 2022 07:09 AM (IST)

    कारागृहात असलेल्या नक्षलवादी नर्मदाक्काचं मुंबईत उपचारादरम्यान निधन

    कारागृहात असलेल्या जहाल नक्षलवादी नर्मदाक्काचं मुंबईत उपचारादरम्यान निधन

    – नर्मदाक्काच्या स्मृतीप्रित्यर्थ नक्षलवाद्यांचं दंडकारण्य बंदचे आवाहन

    – 25 एप्रिलला नक्षलवाद्यांचं दंडकारण्य बंदचे आवाहन

    – नर्मदाक्का गेल्या 42 वर्षे नक्षल चळवळीतील सक्रिय सदस्य

    – नक्षल चळवळीचा विस्तार करण्याची जबाबदारी होती नर्मदाक्कावर

    – तीन वर्षांपूर्वी सिरोंचा येथून नर्मदाक्काला झाली होती अटक

  • 20 Apr 2022 07:07 AM (IST)

    पुण्यातील विद्यापीठांंमध्ये वाहतूक नियमांबाबत अभ्यासक्रम येणार

    पुणे जिल्ह्यातील विविध पाच विद्यापीठांत देखील वाहतूक नियमांबाबत अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार

    उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली ही माहिती

    वाहतुकीच्या नियमांबाबत शाळांमधून बालभारती पाठय़पुस्तकांच्या माध्यमातून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येत आहे.

  • 20 Apr 2022 07:04 AM (IST)

    नाशिक महापालिका प्रशासक कैलास जाधव यांची बदली वादात

    नाशिक ब्रेकिंग

    – महापालिका प्रशासक कैलास जाधव यांची बदली वादात

    – महापालिका आयुक्तपदी नॉन केडर नियुक्तीवरून कॅटकडून विचारना

    – तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांची कॅटकडे धाव

    – आठ दिवसांत प्रतिज्ञापत्र आयुक्त जाधव यांच्या बदलीची फाईल सादर करण्याचे

  • 20 Apr 2022 07:03 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यात वर्षभरात रस्ते अपघातात 294 जणांनी गमावला जीव

    अमरावती जिल्ह्यात वर्षभरात रस्ते अपघातात २९४ जणांनी गमावला जीव….

    सर्वाधीक 45 अपघात नव्याने तयार झालेल्या अमरावती वरुड मार्गावर…

    वर्षभरात अपघात 195 लोक गंभीर जखमी; योग्य ठिकाणी पूल नसणे व गतिरोधक नसणे हेच कारण….

    अतीवेगाणे वाहन चालवणे तसेच गावानजीक उड्डाणपूल, गतिरोधक नसणे हे अपघाताचे कारण…

  • 20 Apr 2022 07:02 AM (IST)

    ‘बस डे’ उपक्रमाला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद

    पीएमपीएलएमच्या वर्धापन दिनानिमित्त राबवलेल्या ‘बस डे’ उपक्रमाला पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद

    ‘बस डे’ला सुमारे 11 लाख प्रवाशांनी केला पीएमपीएलएमच्या बसने प्रवास

    यातून पीएमपीएलएमला एका दिवसात मिळाले एक कोटी 65 लाख 37 हजार 498 रुपयांचे उत्पन्न

    कोविडनंतरच्या काळातला पीएमपीएलएमच्या उत्पन्नाचा हा सर्वांत जास्त आकडा

  • 20 Apr 2022 07:01 AM (IST)

    पीएमपीएलएम लवकरच रस्त्यावर उतरवणार 150 जादा बसेस

    प्रवाशांच्या सेवेसाठी पीएमपीएलएम लवकरच रस्त्यावर उतरवणार 150 जादा बसेस

    ज्या मार्गांवर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे, अशा मार्गांवर फेऱ्यांची संख्या वाढविली जाणार

    पीएमपीएलएम प्रशासनाचा निर्णय

  • 20 Apr 2022 07:00 AM (IST)

    नवव्या मजल्यावरुन पडून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू, नालासोपारा पूर्व आचोले रोड येथील घटना

    नालासोपारा : नवव्या मजल्यावरुन पडून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना उघड झाली आहे.

    नालासोपारा पूर्व आचोले रोड येथील ए वी क्रिस्टल या इमारतीच्या चालू बांधकामावर ही काल 4 च्या सुमारास ही घटना घडली आहे.

    सखाराम बिराजदार (वय 38) असे 9 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे.

    मयत सखाराम हा इमारतीच्या डक मध्ये प्लाय जोडण्याच काम करत होता. त्यावेळी तोल गेल्याने त्याचा पडून मृत्यू झाला आहे.

    त्याच्या पश्चात दोन मुले एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. इमारतीच्या मालकाने मजुरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना न केल्याने ही घटना घडल्याचा आरोप केल्या जात आहे.

  • 20 Apr 2022 06:59 AM (IST)

    नागपूर मनपा निवडणूकीत सन्मानपूर्वक जागा दिल्या, तरंच काँग्रेससोबत आघाडी-दिलीप वळसे पाटील

    – ‘नागपूर मनपा निवडणूकीत सन्मानपूर्वक जागा दिल्या, तरंच काँग्रेससोबत आघाडी’

    – गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नागपूर संपर्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे कार्यकर्त्यांना निर्देश

    – नागपूर मनपातील सर्व वॅार्डात निवडणुक तयारी करण्याच्या सूचना

    – पदाधिकाऱ्यांवर सोपविल प्रभागांची जबाबदारी

    – नागपूर मनपात काँग्रेसने आधीच दिला होता स्वबळाचा नारा

    – आता राष्ट्रवादीची स्वबळाच्या दिशेनं तयारी

Published On - Apr 20,2022 6:56 AM

Follow us
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.