Maharashtra News Live Update : किरीट सोमय्या यांच्या कार्यालयावर कार्यवाही करण्याची शिवसैनिकांची मागणी, नियमबाह्य काम केल्याचा आरोप
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज गुरूवार 21 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात प्रकल्पग्रस्तांची माहिती आता मिळणार एका क्लिकवर, जिल्हा प्रशासन राबवणार सांकेतिक क्रमांक देण्याची योजना. जिल्ह्यात आतापर्यंत किती प्रकल्प राबविण्यात आले. या प्रकल्पांसाठी किती जणांच्या जमिनी घेण्यात आल्या. संबंधितांना जमिनीच्या बदल्यात जमीन किंवा मोबदला देण्यात आला किंवा कसे. किती प्रकल्पग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन बाकी आहे. ही सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
नाशिकमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला यश
– विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला यश – नाशिक तालुक्यातील गिरणारेजवळच्या वाडगावमधील घटना – भक्ष्याच्या शोधात फिरताना विहिरीत पडला होता बिबट्या – विहीरीला पाणी असल्यानं जीव वाचवण्यासाठी बिबट्याची सुरू होती धडपड – विहिरीत पिंजरा सोडून वनविभागाने केलं बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन
-
सदावर्ते विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिस स्टेशनमध्ये
गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाविषयी अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये काही वक्तव्य केलेली आहेत
सदावर्ते विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल
-
-
चार दिवसांच्या चौकशीत आम्ही पोलिसांना चौकशीत सहकार्य करणार – किरीट सोमय्या
न्यायालयाने जी वास्तविकता दाखवली
त्यामुळे त्यांना मला अटक करता येणार नाही
चार दिवसांची चौकशी संपली आहे
१२ तास चौकशी झाली
आम्हाला न्याय मिळेल असं विश्वास आहे
जितकी चौकशी करायची आहे, तेवढी करा
मुंबई पोलिस दोघांन अटक करणार होती.
-
गेली दीड ते दोन वर्षांपासून हा त्रास होतोय, त्यांनी खोटी तक्रार माझ्या विरुद्ध केली – धनंजय मुंडे
गेली दीड ते दोन वर्षांपासून हा त्रास होतोय. त्यांनी खोटी तक्रार माझ्या विरुद्ध केली. ती तक्रार परत वापस घेतली. काही दिवसापासून जो त्रास होता तो मी सहन करत होतो. शेवटी सहनशीलता संपली आणि मला पोलिसांमध्ये तक्रार द्यावी लागली. या पुढे जे काही करतील ते पोलीस करतील…
-
आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या 12 कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे..
आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या १२ कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे…..
अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्ष सह अनेक पदाधिकारी यांनी राजीनामे..
आज आम्ही राजीनामे दिली आहे.. पार्टीची विचारधारा बदलली…
आमच्या फोटोचा त्यांनी वापर करू नये..राणा हे भाजप सोबत गेले आहे..
आमचे मन दुखावले आहेत…त्यांनी सर्व धर्मीयाच्या मंदिरांना भोंगे दिले पाहिजे होते….
आमदार रवी राणा आमचा वापर करतात आणि सोडून देतात…..
त्यांनी विकासाचा मुद्दा सोडला; महागाईचा देखील मुद्दा सोडला त्यांनी
बडनेरा मतदार संघात त्यांचा विकास नाही;विकासाच्या मुद्यावर त्यांच्या सोबत आम्ही होतो…
आम्ही एकत्र बसू नंतर कोण्या पक्षात जाऊ हा विचार करू… सध्या कोणत्या पार्टीत जायचा विचार नाही…
-
-
राज्यपालांनी माफी मागितली का ? माझ्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊंची अस्मिता महत्वाची – अमोल मिटकरी
जे ब्राम्हण समाजाची बदनामी केल्याचा आरोप करता आहेत त्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण तपासावा. कुठल्याही समाजाचे नाव त्यामध्ये घेतलं नाही. जातीय किंवा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या विधानाचे विपर्यास करण्याचे काम विरोधकांकडून केलं जातं आहे. काही संघटना माफी मागा म्हणता आहेत, कशाची माफी मागायची ? राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर बोलले त्यावर तुम्ही काही बोलत नाही. माझ्यासाठी राजकारण महत्वाचं नाही माझ्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊंची अस्मिता महत्वाची आहे. त्यामुळे जिजाऊंची राजा छत्रपती मध्ये जी बदनामी केली यावर या लोकांनी माफी मागावी.
-
ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांनी सगळं तपासावं – अमोल मिटकरी
ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांनी सगळं तपासावं, कन्यादान हा कन्या दान विरोध करण्याचा विषय नाहीय, स्थानिक महाराजांनी जो मंत्र उच्चारला तो मी सांगितला, माझा पूर्ण व्हिडीओ पाहावा, कुठल्याही समाजावर टीका केली नाही.
कशाची माफी मागायची? आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल महात्मा फुले सावित्रीबाईंबद्दल बोलले त्याबद्दल तुम्ही बोलले नाही, पुरंदरेंच्या लिखाणावर तुम्ही बोलले नाही, मला मां जिजाऊ महत्त्वाच्या आहेत, त्याबद्दल तुम्ही बोलत नाही.
ते माझी गोधडी बघायला आले असतील, बाळासाहेब ठाकरे खूप मोठे आहे, मी प्रबोधनकारांचा वारसा चालवतोय, मी लहान अस हम आह भी भरते है बदनाम हो जातें हे, वो कत्ल मी करते है तो चर्चा नहीं बनती, चर्चा तो जरुर बनेगी.
-
वडगावजवळ भीषण अपघातात 1 ठार, 4 जखमी
वडगावजवळ भीषण अपघातात 1 ठार, 4 जखमी
उस्मानाबाद आरटीओ कार्यालयाची जीप आणि कारची समोरासमोर भीषण टक्कर होऊन झालेल्या अपघातात 1 जण जागीच ठार झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडगाव (ज) गावाजवळ ही दुर्घटना घडली.जखमीना तातडीने उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये आरटीओ कार्यालयाच्या निरीक्षकांसह कर्मचारी व कारमधील प्रवाशांचा समावेश आहे.
-
ब्राम्हण महासंघाचं राष्ट्रवादीविरोधात आंदोलन
ब्राम्हण महासंघाचं राष्ट्रवादीविरोधात आंदोलन
मिटकरी मानसकी रुग्ण
अमोल मिटकरींच्या वक्तव्याविरोधात तीव्र पडसाद
काही मंडळी येऊन आंदोलन करत होती.. सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार
आंदोलन कर्त्यांना स्वागत म्हणून मी स्वतः बुके आणून ठेवला होता… आम्ही हे आंदोलन शांततापूर्ण करत होतो.. मी त्यांना काहीही बोललो नाही..
त्यांना काय करायचं ते करु दे…
पण अश्लिल घोषणा जर त्यांनी दिलेल्या असतील तर त्या ऐकून घेतल्या जाणार नाही….
भाषा आणि भाषाशैली योग्यच वापरली आहे..
अमोर मिटकरींचं भाषण हा त्यावेळचा एक विनोद होता..
महाराष्ट्रात आज काल विनोद बुद्धी राहिलेली नाही.. राजकीय इश्यू करुन त्याचे फायदे घ्यायचे…
मिटकरींनी भाषण खुलवण्यासाठी विनोद केलेला होता…
ज्या वेळेला कार्यकर्ते शांतपणे उभे होते, त्यांनी मला सांगितंल की आपलं निवेदन द्या…
पण नेत्यांबद्दल वाईट वाईट घोषणा देणार असाल, तर कुणीही हे शहन करणार नाही…
तुम्ही जसे वागाल तसंच उत्तर दिलं जाईल..
पुण्यात ब्राम्हण महासंघाचं आंदोलन
अमोल मिटकरी हे सिंधुदुर्गात असल्यानं पुण्यात उपस्थित नाही…
आंदोलन करत असताना मंत्रोच्चार करत असाना गोंधळ उडाला..
बाचाबाची झाली….राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात चुकीची भाषा वापरल्याला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आरोप
लग्नाचा विधीचा चुकीचा अर्थ काढलाय मिटकरींनी….
-
गणेश नाईकांनी अटकपूर्व जामिनासाठी केला अर्ज, अटकेपासून बचावासाठी नाईकांची धावाधाव
नवी मुंबई — आमदार गणेश नाईक बलात्कार प्रकरण
गणेश नाईकांनी अटकपूर्व जामिनासाठी केला अर्ज
अटक करण्यापूर्वी नोटीस बजावण्यात यावा यासाठी अर्ज दाखल
ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात केला अर्ज दाखल
गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार
अटकेपासून बचाव व्हावा यासाठी गणेश नाईकांनी धावाधाव
-
नवी दिल्लीनंतर पंजाब मध्येही मास्क सक्ती
नवी दिल्लीनंतर पंजाब मध्येही मास्क सक्ती
पंजाब राज्य सरकारने घेतला निर्णय
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मास्क बंधनकारक असणार
हरियाणा दिल्लीनंतर पंजाब मध्ये आता मास्क बंधनकारक
-
पुण्यात मुस्लिम समाजाच्या बैठकीला सुरुवात
पुण्यात मुस्लिम समाजाच्या बैठकीला सुरुवात
अवामी महाज संघटनेच्या वतीनं बैठकीचं आयोजन
आझम कँम्पसमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय.
मुलनिवासी मुस्लिम मंच ,महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट,इनक्रेडीबल समाज सेवा ग्रुप सहभागी झाल्यात !
महाराष्ट्रात सुरू असलेल्या मस्जिदीवरील भोंग्याच्या वादासंदर्भात होणार चर्चा
-
हिंदू समाजाला टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे – देवेंद्र फडणवीस
अमरावती जिल्ह्यामध्ये इंग्रजांन सारख राज्य होतं, तसं सध्या सरकार तसं वागत आहे. हिंदू समाजाला टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे. तसेच वसुली रॅकेटमुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत का ? त्याची चौकशी झाली पाहिजे ?
-
सदावर्ते यांना थोड्याच वेळात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं जाणार
सदावर्ते यांना थोड्याच वेळात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं जाणार
जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात मोठा पोलिस बंदोबस्त
दुपारनंतर न्यायालयाच्या आवारात गर्दी होण्याच्या शक्यतेने खबरदारी म्हणून सदावर्ते ना सकाळच्या सत्रात हजर केलं जाणार
-
हायकोर्टाने मला आणि किरीटजींना अटकेपासून संरक्षण दिलं आहे – नील सोमय्या
– हायकोर्टाने मला आणि किरीटजींना अटकेपासून संरक्षण दिलंय, याचा अर्थ हाच की केसमध्ये दम नाही…
– जे लोक मोठी वक्तव्य करत होते, त्यांच्याकडे ५७ कोटींचा एकही दमडीचा हिशोब नाही, २८ एप्रिलला कोर्टात आत्ता सुद्ध करावं लागेल की हा आकडा आला कुठून…
– २५ ते २८ एप्रिलला ११ ते २ मी चौकशीसाठी इओडब्ल्युला जाणार… चौकशीला सामोरं जाणार… सगळे जबाब नोंदवणार…
– २०१३ मध्ये जेव्हा कार्यक्रम झाला मी २२ वर्षांचा युवा कार्यकर्ता होतो, चर्चगेटला आम्ही पैसे गोळा केले, प्रतिकात्मक मोहीम होती, अनेकांनी या डब्यात १० , २०, ५०, १०० रुपये टाकले…
– मी तुमचेया समोर ऊभा आहे, कुणीही आम्हाला जोड्याने मारत नाहीत, हा भिरम निर्माण करणायाचा काही लोकांचा प्रयत्न आहे की किरीट सोमय्या नील सोमय्या हे भ्रष्टाचार करतात.. हे सगळे आरप खोटे आहेत..
– बर्याच वेळा आपली कामं करण्यासाठी बाहेर जावं लागतं… मी माझ्या कामासाठी बाहेर गेलो होतो..
– पोलिसांचा कुठलाही दबाव नाही, माझ्या घरावर नोटीस चिपकवली ही पोलियांची स्टाईल आहे… २५ ते २८ पोलिसांच्या चौकशीला हजर राहणार…
-
अमरावती जिल्ह्यात १०० दिवसांत ८८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
अमरावती जिल्ह्यात १०० दिवसांत ८८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या….
विदारक चित्र दर २१ तासात जिल्ह्यातील एक शेतकरी मृत्यूला कवटाळतो…
फेब्रुवारी महिन्यात शेतकरी आत्महत्या मध्ये झाली वाढ…
जानेवारी महिन्यात २७ ,फेब्रुवारी महिन्यात ३० तर मार्च महिन्यात २३ शेतकरी आत्महत्या….
शासनाच्या मदतीसाठी ३० प्रकरणे पात्र तर ५२ प्रकरने चौकशीसाठी अद्यापही प्रलंबित…
-
विदर्भात आम्ही प्रामुख्याने लक्ष घालायला सुरूवात केली आहे – संजय राऊत
एकेकाळी शिवसेनेची ताकद चांगली होती
शिवसेनेसोबत काम करण्याची इच्छा आहे
आदित्य ठाकरे सुध्दा येणार आहेत
विदर्भात आम्ही प्रामुख्याने लक्ष घालायला सुरूवात केली आहे
मोठ्या प्रमाणात काम कराव लागेल
मुख्यमंत्री सुध्दा अधिक लक्ष घालतील
संघटनात्मक बांधणीला सुरूवात
नागपूर हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे
नागपूरात शिवसेना वाढणार
आमची तिथं आमदार, खासदार
आम्हाला नागपूरवरती लक्ष द्याव लागेल
विदर्भात मुख्यमंत्री सुध्दा येणार
सरकारनं गृहखात्यांन कठोर कारवाई केल्यानंतर संप मिटला आहे
कोणती तरी शक्ती कामगारांना भडकावण्याचा प्रयत्न केला आहे.
आयएनएस विक्रांत मोठा घोटाळा आहे
प्रत्यक्ष तपासात काय निष्पन्न होईल
आमचा हवेतला गोळीबार नाही
राजभवनातून आलेले पत्र हा पुरावा आहे
आज त्या जमिनीवर काय आहे
आयएनएस घोटाळा साधा नाही.
-
आमदार संदीप क्षीरसागर यांना मातृशोक
आमदार संदीप क्षीरसागर यांना मातृशोक
रेखा क्षीरसागर यांचा हृदयविकाराने निधन
राजुरी येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार
थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार
रेखा क्षीरसागर जिल्हा परीषदेच्या माजी सदस्या
त्यांच्या निधनानंतर क्षीरसागर कुटुंबांवर शोककळा
-
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी
जूनच्या पहिल्या आठवड्यातच बोर्डाचा निकाल जाहीर होणार
पेपर तपासणीचं काम अंतिम टप्प्यात 30 तारखेपर्यंत पेपर तपासणीचं काम पुर्ण होणार
जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार निकाल
निकालाचं कामकाज युद्धपातळीवर सुरू
माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डातील सूत्रांची टीव्ही 9 मराठीला.माहिती
-
पुणे शहरात मेट्रोच जाळ विस्तारणार
पुणे शहरात मेट्रोच जाळ विस्तारणार…
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी महत्वाच्या अशा स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाला राज्य सरकारने दिली मान्यता दिली.
पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्पाच्या टप्पा-१ ची ही विस्तारीत मार्गिका…
हा संपूर्ण मार्ग भूयारी असणार…
एकूण मार्ग साडे पाच किलोमीटरचा असणार असून यामध्ये तीन स्थानके असणार…
यासाठी सुमारे ३ हजार ६६८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
२०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याच नियोजन….
-
भारतात आज 2,380 नवीन कोरोनाची प्रकरण
भारतात आज 2,380 नवीन कोरोनाची प्रकरण; 13,433 वरती सध्या सक्रीय रूग्ण
-
मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करण्याआधीच काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी समृद्धी महामार्गावरुन चालवली कार
– मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करण्याआधीच काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी समृद्धी महामार्गावरुन चालवली कार
– नागपूरपासून २०० किमोमीटर आशिष देशमुख यांचा समृद्धी महामार्गावरुन प्रवास
– तासी १७० च्या स्पीडने चालवली बीएमडब्ल्यू कार
– आशिष देशमुख यांच्या समृद्धीवरील प्रवासाने वाद होण्याची शक्यता
-
शासकीय अधिकाऱ्यांच्या जीवनात बदली ही नॉर्मल प्रक्रिया – दीपक पाण्डेय
शासकीय अधिकाऱ्यांच्या जीवनात बदली ही नॉर्मल प्रक्रिया
२०-२५ दिवसांपूर्वी मीच बदलीसाठी अर्ज केला होता.. व्यक्तिगत कारणास्तव..
सरकारनं विनंती ऐकली त्याबद्दल मी आभारी.. माझ्यावर आता अधिक मोठी जबाबदारी देण्यात आली..
राणेंच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा, भोंगे किंवा हेल्मेटचा निर्णय यामुळे बदली झाली का.. –
रुल ऑफ रॉ चे हे सर्व विषय एकदम सोपे विषय आहेत… माझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हात.. मी रुल ऑफ रॉ समोर ठेवूनच काम केलं.. आमच्या आदेशावर शासन आहे.. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आहे.. तिथं आमच्या आदेशाला आव्हान देता येऊ शकेल..
पण आम्ही शपथ घेतो.. की आमची संविधानाच्या रक्षणासाठी काम करणार आहोत… आमची जबाबदारी नागरिकांप्रती आहे..
समाजाला काही फायदा होणार की नाही… मला एखाद्या आदेशानं समाधान वाटतंय की नाही, याचं ट्रेनिंगही दिलं जातं…
-
नाशिकच्या सातपूर परिसरात गॅस गळती होऊन स्फोट
– नाशिकच्या सातपूर परिसरात गॅस गळती होऊन स्फोट
– स्फोटात अर्चना सिंग या महिलेचा जागीच मृत्यू
– स्फोटात महिलेसह आस्था सिंग ही 16 वर्षीय तरुणी देखील भाजली
– जखमी तरुणीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु प्रकृती स्थिर
– गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज स्फोटात घर
-
पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण
पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण
पुणे आणि परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज
हवेमध्ये गारठा निर्माण झाल्याने उकाडयाने हैराण झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा
-
जिलेटीन कांड्याचा वापर करून एटीएम फोडले
-पिंपरी-चिंचवडमध्ये जिलेटीन कांड्याचा वापर करून एटीएम फोडलेय, पहाटे तीन च्या सुमारास चिखली परिसरातील कॅनरा बँकेचे एटीएम ला जिलेटीन कांड्या लावून एटीएम उडवले
-यात लाखो रुपये जळून खाक झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केलीय
-दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एटीएम लुटण्याचा उद्देशाने हा ब्लास्ट घडवून आणला
-यात ब्लास्ट मध्ये किती नोटा जळून खाक झाल्यात ह्याचा अंदाज बँक अधिकारी आल्यावर लागणार
-
राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिल्यास काही संघटना कोर्टात जाण्याच्या तयारीत
राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिल्यास काही संघटना कोर्टात जाण्याच्या तयारीत
राज ठाकरे यांच्या सभेला दहा दिवस बाकी
मात्र मनसे सभेच्या परवानगीच्या प्रतीक्षेत
तर सभेला वाढता विरोध पाहता राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह
-
नाशिक विभागात 70 टक्के एसटी कर्मचारी कामावर रुजू
– नाशिक विभागात 70 टक्के एसटी कर्मचारी कामावर रुजू
– विविध मार्गावर नाशिकमधून धावल्या 400 एसटी बस
– नाशिक विभागात 3 हजार 738 कर्मचारी हजर
– विभगातील 952 कर्मचारी अद्यापही कामावर हजर नाही
-
मनसेकडून राज ठाकरे यांच्या सभेचे काऊंट डाऊन सुरू
मनसेकडून राज ठाकरे यांच्या सभेचे काऊंट डाऊन सुरू
सोशल मीडियावर सभेला येण्यासाठी केलं जातंय अहवान
सत्तेसाठी ज्यांनी लाचारी पत्करली त्या लाचारांचा समाचार घेण्यासाठी आतां फक्त १० दिवस बाकी.
१ मेच्या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार व्हा….
ऐकण्यासाठी नाही अनुभवासाठी या मनसेकडून नागरिकांना आव्हान
सभेला नागरिकांना खेचण्यासाठी मनसेचा सोशल मीडिया ट्रेंट
औरंगाबाद येथील मनसे सैनिक सोशल मीडियावर सक्रिय
-
पुण्यात अवैध धंद्याना प्रोत्साहन देत असल्याने पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन, वरिष्ठ निरीक्षकांच्या नावाखाली सुरू होती वसुली
पुण्यात अवैध धंद्याना प्रोत्साहन देत असल्याने पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन, वरिष्ठ निरीक्षकांच्या नावाखाली सुरू होती वसुली
अवैध धंद्याना प्रोत्साहन देत असल्याचा ठपका ठेवून पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन
वरिष्ठ निरीक्षकांच्या नावाने करत होता वसुली
सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यावर कारवाई
श्रीधर पाटील असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव
पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी केली निलंबनाची कारवाई
-
अखेर कोल्हापूर जिल्हा झाला कोरोना मुक्त
अखेर कोल्हापूर जिल्हा झाला कोरोना मुक्त
गेल्या 24 तासात एकही नवा रुग्ण नाही तर जुने सर्व बाधित ही झाले कोरोनामुक्त
1 ते 15 एप्रिल दरम्यान एकही नवा रुग्ण आढळला नाही
तिसरा लाटेत 13 हजार 332 लोक झाले होते कोरोना बाधित
तर 112 जणांचा झालाय मृत्यू
-
जिल्हाधिकारी कार्यालयात रोज ७६ कर्मचारी उशिरा येतात कामावर
जिल्हाधिकारी कार्यालयात रोज ७६ कर्मचारी उशिरा येतात कामावर
बायोमेट्रिकच्या नोंदीतून समोर आला प्रकार
तर ३२ जणांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कारणे दाखवा नोटीस दिली
तसेच विभागप्रमुखांची बैठक घेत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवरून केली कानउघाडणी
जिल्हाधिकारी कार्यालयात एकूण १७६ कर्मचारी
सकाळी ९.४५ वाजता कार्यालयात येण्याची वेळ
मात्र अनेक कर्मचारी १०.३० ते ११ वाजेदरम्यान येतात
अर्धे कर्मचारी रोज १ तास उशिराने कार्यालयात येत असल्याचे समोर
-
राजगर्जनेनंतर शहरात हनुमान चालीसा पुस्तकाचा खप वाढला
– राजगर्जनेनंतर शहरात हनुमान चालीसा पुस्तकाचा खप वाढला,
– मात्र हनुमान स्तोत्राला पुणेकरांची अधिक पसंती,
– राज ठाकरेंच्या आवाहनानंतर एका दिवसात हनुमान चालीसाचा अचानक खप वाढला,
– पुण्यातील हनुमान मंदिरात आणि तालमीत हनुमान चालीसा पठण करण्याचं प्रमाण वाढलं.
-
नवाब मलिक यांच्या पत्नीला आणि मुलांना समन्स देऊनही चौकशीसाठी अनुपस्थित, फराज मलिकला आतापर्यंत पाच वेळा समन्स
नवाब मलिक यांच्या पत्नीला आणि मुलांना समन्स देऊनही चौकशीसाठी अनुपस्थित,
पत्नी मेहजबीन, फराज आणि अमीर यांना ईडीकडून अनेक वेळा समन्स
फराज मलिकला आतापर्यंत पाच वेळा समन्स- सूत्र
मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी बजावलं होतं समन्स
15 एप्रिलला शेवटचं समन्स बजावण्यात आलं आहे
मलिकची पत्नी आणि मुले हे सॉलिडस इन्व्हेस्टमेंट आणि मलिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मेजर शेअर होल्डर आहेत.
तिघे हजार होत नसल्यामुळे नवाब मलिक यांचा समावेश असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर अडकली आहे.
-
गुणरत्न सदावर्ते यांना घेऊन मध्यरात्री पोलीस मध्ये रात्री कोल्हापुरात दाखल
ऍड गुणरत्न सदावर्ते यांना घेऊन मध्यरात्री पोलीस मध्ये रात्री कोल्हापुरात दाखल
मध्यरात्रीच वैद्यकीय तपासणी करून केली अटकेची कारवाई
सदावर्ते सध्या राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये
सदावर्ते ना दुपारी न्यायालयासमोर हजर केल जाणार
गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात 153 अ अंतर्गत कोल्हापुरातील शाहुपुरी पोलीस ठाण्यात आहे गुन्हा दाखल
-
विदर्भातील तीन शहरे जगतातील सर्वाधिक उष्ण
– विदर्भातील तीन शहरे जगतातील सर्वाधिक उष्ण
– ब्रम्हपूरी ४५.३ तापमानासह जगतातील सर्वाधिक उष्ण शहर
– चंद्रपूर ४५.२ तापमानासह जगतातील दुसरे उष्ण शहर
– अकोला ४४.९ तापमानासह जगतातील तिसरे उष्ण शहर
– जगातील पहिल्या १५ उष्ण शहरांमध्ये विदर्भातील अमरावती वर्ध्यासह पाच शहरं
– कडाक्याच्या उष्णतेमुळे विदर्भात जिवाची लाही लाही
-
मनसे पोलिसांना देणार शहरातील भोंग्यांची यादी
– मनसे पोलिसांना देणार शहरातील भोंग्यांची यादी,
– त्यानुसार पोलिसांकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती,
– शिवाय ३ मेला होणाऱ्या महाआरतीसाठी पोलिसांना निवेदन दिले जाणार,
– तसेच हनुमान चालीसा लावण्याबाबात कार्यकर्त्याना दक्ष राहण्याचे दिलेत आदेश.
-
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात उच्च न्यायालयाकडून सौरभ त्रिपाठीला जामीन
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात उच्च न्यायालयाकडून सौरभ त्रिपाठीला जामीन
निकालात गैरव्यवहार केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता
22 डिसेंबरला पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातून त्याला अटक केली होती
सौरभ त्रिपाठी हा विनर कंपनी चालवतो
पैसे घेऊन विद्यार्थी पास करण्यासाठी त्याने कट रचल्याचा त्याच्यावर आरोप होता
मात्र कोणताही आर्थिक फायदा झाला नसल्याचं निष्पन्न झाल्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केलाय..
-
नागपूरात विनाहेल्मेट सरकारी बाबूंवर आजपासून होणार कारवाई
– नागपूरात विनाहेल्मेट सरकारी बाबूंवर आजपासून होणार कारवाई
– नागपूर जिल्ह्यातील सरकारी कार्यालयात आजपासून हेल्मेट सक्ती
– नागपूर आरटीओ आजपासून सरकारी कार्यालयात तपासणी करणार
– सरकारी कार्यालयात विना हेल्मेट असलेल्या दुचाकी चालकावर होणार कारवाई
– नागपूरात हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीची सुरुवात सरकारी कार्लायलयातून!
– राज्याच्या परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार होणार कारवाई
-
पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावरून संबोधित करणार
पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावरून संबोधित करणार
गुरु तेज बहादुर सिंह यांच्या चारशेव्या प्रकाशपर्वा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
पंतप्रधान काय बोलणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष
-
राज्यातील 281 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका घेणं गरजेचं
राज्यातील 281 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका घेणन गरजेचं
त्यापैकी 100 बाजार समित्यांवरील संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची गरज
22 एप्रिलनंतर बाजार समित्यांना मुदतवाढ मिळणार नाही
त्यामुळे बाजार समित्यांवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करावी राज्य सरकारचे आदेश.
पुणे जिल्ह्यातील 5 बाजार समित्यांवर येणार प्रशासक
ज्यामध्ये खेड ,जुन्नर, आंबेगाव ,निरा आणि भोर या समित्यांचा समावेश आहे…
-
नागपूर मनपा निवडणूकीच्या पार्शभुमीवर शिवसेना नेते खा. संजय राऊत पुन्हा नागपूर दौऱ्यावर
– तिकडे मुंबईत भाजपकडून सेनेची पोलखोल, इकडे संजय राऊत फडणवीसांच्या गडात
– नागपूर मनपा निवडणूकीच्या पार्शभुमीवर शिवसेना नेते खा. संजय राऊत पुन्हा नागपूर दौऱ्यावर
– ४५ दिवसांत खा. संजय राऊत यांचा तिसरा नागपूर दौरा
– नागपूरातील पक्ष संघटन मजबूत करण्याचे सेनेचे प्रयत्न
– संजय राऊत नागपूरात घेणार कार्यकर्ता मेळावा, विधानसभा प्रचार प्रमुखांच्या बैठका
– संजय राऊत यांच्या हस्ते नागपूरात सेनेच्या नविन शाखेचं उद्घाटन
-
माहीमच्या जरीवाला चाळवासीयांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दिलासा
गेले दोन दशकांहून अधिक काळ पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या माहीमच्या जरीवाला चाळवासीयांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे.
या प्रकरणी दाखल असलेल्या अवमान याचिकेवर आदेश देताना पुनर्विकासात दिरंगाई करणाऱ्या विकासक तसेच म्हाडा या दोहोंना न्यायालयाने जबाबदार धरले असून यापुढे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला तर अधिक गांभीर्याने घेतले जाईल, असा इशाराही दिला आहे.
जरीवाला चाळीचा पुनर्विकास २००४ मध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मे. राज दोशी एक्स्पोर्ट प्रा. लि. यांच्यावर सोपविण्यात आला होता. मात्र मे. मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या विकासकालाही या चाळीच्या पुनर्विकासात रस होता.
या वादात रखडलेला पुनर्विकास सुरू व्हावा, म्हणून रहिवाशांनी २००६ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली.
उच्च न्यायालयाने रहिवाशांचे मत अजमावण्यास मुंबई इमारत व दुरुस्ती मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांना सांगितले.
मात्र दोन्ही विकासकांना ७० टक्के मंजुरी नसल्याचा अहवाल मुख्य अधिकाऱ्यांनी सादर केला.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयास मे. राज दोशी एक्स्पोर्ट प्रा. लि.ने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांची पुन्हा बैठक बोलावून निर्णय घेण्याचे आदेश दिले.
त्यानुसार झालेल्या बैठकीत मे. राज दोशी एक्स्पोर्ट प्रा. लि. यांना ७८ टक्के मंजुरी असल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे तेच विकासक ठरले व त्यांना ४२ महिन्यांत पुनर्विकास पूर्ण करण्याचे व विकासकाला संपूर्ण प्रकारचे सहकार्य करण्याचे आदेश म्हाडा-महापालिकेला न्यायालयाने दिले.
-
नागपूरातील नदी आणि नाले स्वच्छता अभियान वेगाने सुरु
– नागपूरातील नदी आणि नाले स्वच्छता अभियान वेगाने सुरु
– नागपूर महानगरपालिका हद्दीत आतापर्यंत ८४ नाल्यांची स्वच्छता पूर्ण
– शहरातील २२७ नाल्यांपैकी आतापर्यंत ८४ नाल्यांची स्वच्छता पूर्ण
– नागपूरातील ८४ नाल्यांमधून ४० लक्ष मेट्रीक टन गाळ आणि कचरा काढला
– ३१ मे च्या आधी शहरातील सर्व नाले स्वच्छ करण्याचं मनपाचं उद्दिष्ट
– यावर्षी नदी स्वच्छता अभियानात नद्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करण्यात येतेय
-
प्रशांत किशोर यांच्याबाबत काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये
प्रशांत किशोर यांच्याबाबत काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये
किशोरांच्या प्रस्तावावर काँग्रेस 72 तासात अहवाल सादर करणार
प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
काँग्रेस पक्षाकडून अधिकृत दुजोरा नाही
कॉंग्रेस मजबूत करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी सुचवल्या उपाययोजना
आतापर्यंत प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस हायकमांडशी चार वेळा बैठका
-
परीक्षा संचलनातील त्रूटी आणि चुकांसंदर्भात विद्यापीठानं उगारला कारवाईचा बडगा
परीक्षा संचलनातील त्रूटी आणि चुकांसंदर्भात विद्यापीठानं उगारला कारवाईचा बडगा
9 महाविद्यालयांवर केली कारवाई
विद्यापीठाच्या प्रमाद समितीनं केली कारवाई
महाविद्यालयांना नोटीस बजावत दंडही आकारण्यात आलाय
या 9 महाविद्यालयात नामांकित महाविद्यालयांचा समावेश आहे…
-
जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून किमान पाच टक्के निधी शालेय शिक्षणाशी संबंधित योजनांसाठी कायमस्वरूपी राखून ठेवण्यास मंजूरी
एंकर – राज्यातील शालेय शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजन विभागाकडून जिल्हा नियोजन समितीस (डीपीडीसी) उपलब्ध होणाऱ्या जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून किमान ५ टक्के निधी शालेय शिक्षणाशी संबंधित योजनांसाठी कायमस्वरूपी राखून ठेवण्यास बुधवारी मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शाळांमधून विद्यार्थ्यांना अधिक सुविधा देणे शक्य होईल, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.
या निधीतून राज्यातील जिल्हा परिषदांच्या क्षेत्रातील शाळांची इमारत आणि वर्ग खोल्यांची दुरुस्ती तसेच स्वच्छतागृहांची दुरुस्ती केली जाईल.
तसेच वर्गखोल्यांचे बांधकाम, स्वच्छतागृहांचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वाचनालय, शैक्षणिक बोलक्या भिंती निर्माण करणे, विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र कक्षाचे बांधकाम, क्रीडांगणाची सुविधा, शाळांना संरक्षक भिंत उभारणे, आदर्श शाळांमध्ये विविध पायाभूत सुविधा निर्माण करणे, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल शाळा, इंटरनेट-वायफाय सुविधा निर्माण करणे आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
-
अवकाळी पावसाने बळीराजाची झोप उडवली, नाशिकच्या काही भागात पावसाची हजेरी
अवकाळी पावसाने बळीराजाची झोप उडवली..
नाशिकच्या देवळा तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी..
मेशी, महालपाटने, निंबोळा,देवपूरपाडे वासोळ आदी भागांत अचानक पाऊस आल्याने काढणीला आलेला आणि काढून ठेवलेल्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धांदळ उडाली असून सध्या कसमादे परिसरात कांदा काढणीची लागबग सुरू आहे.
-
धार्मिक स्थळावरील भोग्यांच्या परवानगीसाठी अर्ज येण्यास सुरुवात
नाशिक – धार्मिक स्थळावरील भोग्यांच्या परवानगीसाठी अर्ज येण्यास सुरुवात
– भोंग्यांच्या परवानगीसाठी नाशिक मधील भद्रकालीत पाहिला अर्ज
– भद्रकाली पोलिस ठाण्यात पहिला अर्ज दाखल
-कादरी मशिदीचे विश्वस्त हाजी आरिफ सय्यद यांच्याकडून अर्ज दाखल
-
पुणे विभागातील तेरा एसटी डेपोमध्ये 50 टक्के कर्मचारी कामावर परतले
पुणे विभागातील तेरा एसटी डेपोमध्ये 50 टक्के कर्मचारी कामावर परतले
पुणे विभागात एकूण 4,192 कर्मचारी असून सध्या 2 हजार 959 जण हजर
कामावर रुजू झालेल्यांमध्ये 948 चालक, 899 वाहक, 635 यांत्रिक विभागातील आणि 477 प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश
संपापूर्वी 950 बसेसद्वारे 2 हजार 624 फेऱ्या होत होत्या तर सध्या 430 बसेसच्या 1 हजार 330 फेऱ्या दररोज होत असून, एसटीचे दैनंदिन उत्पन्नदेखील 87 लाखांवर पोहोचले
-
राज्यात गाजलेल्या टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी सौरभ त्रिपाठी याला उच्च न्यायालयाने केला जामीन मंजूर
राज्यात गाजलेल्या टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी सौरभ त्रिपाठी याला उच्च न्यायालयाने केला जामीन मंजूर
अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र करणाऱ्याच्या कटामध्ये अभिषेक सावरीकर, डॉ. प्रीतिश देशमुख यांच्याबरोबर त्याने दिल्लीत बैठक घेऊन कट रचला असल्याचा त्रिपाठीवर आरोप
टीईटी प्रकरणात आतापर्यंत 35 हून अधिक जणांना अटक करण्यात आली असून जामीन मिळालेला त्रिपाठी हा पहिलाच आरोपी
-
नादुरुस्त बसेसमुळे पुण्यातील एसटी वाहतूक 5 मे पर्यंत पूर्ववत होणार
नादुरुस्त बसेसमुळे पुण्यातील एसटी वाहतूक 5 मे पर्यंत पूर्ववत होणार
जवळपास 100 बसची दुरुस्ती व 50 बसचे आरटीओ पासिंग अद्याप बाकी
त्यासाठी आणखी किमान 15 दिवस लागणार असल्याने पुणे विभागाची एसटी वाहतूक 5 मे नंतरच पूर्ववत होईल
गेल्या पाच महिन्यांपासून अनेक बस जागेवरच असल्याने अनेक बसचे इंजिन देखभाल दुरुस्तीचे काम बाकी
पुणे विभागातील बसची सद्यःस्थिती
प्रवासी वाहतूक करणाऱ्या : 830
मालवाहतूक करणाऱ्या : 73
देखभाल व दुरुस्तीसाठी गेलेल्या : 100
पासिंग रखडलेल्या : 50
-
पुणे महापालिकेतर्फे इयत्ता 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची 20 कोटी रुपयांची तरतूद संपली
पुणे महापालिकेतर्फे इयत्ता 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची 20 कोटी रुपयांची तरतूद संपली
तरतूद संपल्याने 2 हजार 777 विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळाली नाही
महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसाहाय्य योजनेतंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते
-
नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत्यावर प्रशासक नियुक्त्या होण्याची शक्यता.
जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांवर प्रशासकीय राजवट लागू होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २२एप्रिल नंतर हि कारवाई केली जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यात बारा बाजार समितीच्या असून मागील विरहात त्यांची मुदत संपली होती. परंतु राज्य सरकारने कोविड मुळे निवडणूकीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. उच्चन्याल्यानं सोसायट्यांच्या निवडणुकांच्या नंतरच बाजार समितीच्या निवडणुका घ्या असे आदेश केले होते. त्यामुळे आता चांदवड, नांदगाव, मनमाड पिंपळगाव येवला,सिन्नर याठिकाणच्या बाजार समित्यांवर आता प्रशासक नियुक्ती केली जाणार असल्याची शक्यता आहे.
Published On - Apr 21,2022 6:18 AM