Maharashtra News Live Update : बाहेर येताच सदावर्ते पुन्हा जोरदार कडाडले, जेलमध्ये काय केलं? हेही सांगितलं

| Updated on: Apr 26, 2022 | 11:12 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : बाहेर येताच सदावर्ते पुन्हा जोरदार कडाडले, जेलमध्ये काय केलं? हेही सांगितलं
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज मंगळवार 26 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे.पालघरच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांना 25 हजाराची लाच स्विकारताना रंगेहात पकडलं आहे. पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या वादग्रस्त उर्मट शिक्षणाधिकारी आहेत अशी माहिती मिळत आहे. एका शिक्षिकेकडून बदलीसाठी 25 हजाराची लाच मागितली होती. आपल्या घरात 25 हजाराची लाच स्वीकारताना पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Apr 2022 09:55 PM (IST)

    अमोल मिटकरी यांचा सदाभाऊ खोत यांच्यावर पलटवार!

    सदाभाऊंची अवस्था भाजपच्या फडात तुणतुणं वाजवणाऱ्यासारखी!

    तर महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचं भाजपचं सुप्त कारस्थान

    राणा प्रकरणावरून मिटकरी यांचा आरोप

  • 26 Apr 2022 09:54 PM (IST)

    पंतप्रधान मोदी संवाद साधणार

    कोविड आढावा संदर्भातील देशभरातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दृक्श्राव्य माध्यमातून संवाद साधणार आहेत . या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहे . दुपारी १२ वाजता ही बैठक पार पडणार असून , वर्षा या शासकीय निवासस्थानातून ते बैठकीला उपस्थित राहणार आहेत .

  • 26 Apr 2022 09:53 PM (IST)

    छत्रपती संभाजीराजे यांना पोलंड देशाचा बेणे मेरितो सन्मान प्रदान

    युवराज संभाजीराजे छत्रपती यांना आज पोलंड देशाकडून छत्रपती संभाजीराजे यांना बेणे मेरितो पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. पोलंड देशाच्या नागरिकांना अथवा पोलंड देशाला सहकार्य केलेल्या इतर देशातील नागरिकांना पोलंड देशाच्या परराष्ट्र मंत्रालयामार्फत हा पुरस्कार प्रदान केला जातो.

    दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलंडच्या ५००० निर्वासित नागरिकांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने आसरा दिला होता. या नागरिकांसाठी वळीवडे येथे मोठा कॅम्प उभारण्यात आला होता. २०१९ साली या घटनेस ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेऊन या कॅम्प मध्ये राहिलेल्यापैकी हयात असणाऱ्या नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना राज्य अतिथी म्हणून याठिकाणी निमंत्रित करून वळीवडे पोलंड कॅम्पच्या स्मृती जगविण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

    १४ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या या कार्यक्रमात पोलंडचे उप परराष्ट्र मंत्री मार्सिन प्रझिडाक आणि भारतातील पोलंडचे राजदूत अॅडम बुराकोव्स्की यांच्या हस्ते १९४२ ते १९४९ या काळात येथे वास्तव्य करणाऱ्या या पोलिश कुटुंबांच्या आणि नागरिकांच्या स्मरणार्थ एक स्मृतीस्तंभाचे अनावरण आणि संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली होती.

    यावेळी मनोगत व्यक्त करताना मी म्हणालो होतो की “ज्या वेळी जग युद्धाने उध्वस्त झाले होते, युरोप उद्ध्वस्त झाला होता आणि भारताचा काही भाग भयंकर दुष्काळाच्या खाईत होता, तेव्हा कोल्हापूरच्या छत्रपतींनी या पोलिश कुटुंबांना मानवतावादी आधारावर दत्तक घेतले. आम्हाला ही भावना स्मारक आणि संग्रहालयाच्या माध्यमातून जिवंत ठेवायची आहे, ज्यामुळे इंडो-पोलिश संबंध अधिक दृढ होतील.”

    भारत व पोलंड या दोन्ही राष्ट्रांमधील हा ऐतिहासिक बंध पुन्हा जोपासण्यासाठी मी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करण्यासाठी आणि त्यामाध्यमातून कोल्हापूरच्या जनतेचाही सन्मान करण्यासाठी पोलंडचे परराष्ट्र मंत्री झ्बिग्नीव राऊ यांच्या हस्ते त्यांना ‘द बेने मेरिटो’ हा सन्मान युवराज संभाजीराजे छत्रपती यांना दिल्ली येथील पोलंड दूतावासात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

  • 26 Apr 2022 07:44 PM (IST)

    वकील गुणरत्न सदावर्ते Live

    मी आत असताना बाहेर अनेक प्रकारची चर्चा झाली

    ब राजकारणी शोधण्याचा प्रयत्न झाला

    मात्र तपास करण्याची पद्धती मला समजली नाही

  • 26 Apr 2022 07:43 PM (IST)

    वकील गुणरत्न सदावर्ते Live

    ज्या वेळी मी पहिल्यांदा पोलीस कस्टडीत होतो तेव्हा मी पोलीस शिपायाचा जीव वाचवला

    त्याला अटॅक आला होता, कुणाला प्राथमिक उपचाराची माहिती नव्हती

    मी जिथं गेलो तिथे योगेचे शिक्षण दिलं

    वाईटाचं वाईट बाजुला सारून चांगल्याचं चांगलं शिकवू शकतो

    मी आत्मकलेश एक केला होता, कुठेतरी चिंतन करायचे असते,

    सरकारला कसे वागायचे तसे वागूदे, तत्व सोडायची नाहीत

    मी कोठडीत गेल्यापासून मी फक्त पाणी प्राशन केले आहे

    तुमच्या रक्तात खोट नसेल तर कुणी नमवू शकत नाही

    मी शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, येणाऱ्या काळात लढत राहीन

    नेल्सन मंडेलाही जेलमध्ये राहिले

    सर्वांचा वैचारीक वारसा माझ्यासोबत होता

    एसटी कर्मचारी कामावर गेले ते कुणाच्या सांगण्यावरून गेले नाहीत

    मी जेलमधून कामावर जाण्यास सांगितले होते

    काही लोकांनी फक्त राजकारण केलं

    विलीनीकरणाचा लढा अपुरा सुटणार नाही

    येणाऱ्या काळात कष्टकरी ही मिळवतील

    आम्ही हिंदुस्थानी आहोत,

    माझी हत्या झाली असती मात्र माध्यमांनी मागे गाड्या लावल्याने मला सहकार्य मिळालं

  • 26 Apr 2022 06:36 PM (IST)

    अशा प्रकारांना आळा कधी बसणार?

    -बारा वर्षीय अल्पवयीन मुलीसमोर येऊन हस्थमैथुन करणाऱ्या विक्षिप्त रिक्षाला चालकाला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात

    -सचिन शेंडगे अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव

    -शुक्रवारी दुपारी तीन च्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी क्लासवरून घरी जात असताना ह्या अल्पवयीन मुलीला पाहून रिक्षाचालक विरुद्ध दिशेने आला, पत्ता विचारण्याचा बहना करून तिच्या समोरच हस्थमैथुन केले

    -या घटनेमुळे मुलगी घाबरली. हा सर्व प्रकार पालकांना सांगितला त्यानुसार गुन्हा दाखल करत आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अटक केलीय

  • 26 Apr 2022 06:13 PM (IST)

    पुण्यात खळबळ उडवून देणारी घटना

    सासरच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणीची 11 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

    सासरी हुंड्यासाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून राहत्या घराच्या 11 व्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या

    सोमवारी रात्रीच्या सुमारास हंडेवाडी येथील नवरत्न एक्झॉटिका सोसायटीत ही घटना घडली

    दिव्या करून कानडे असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव

    याप्रकरणी मयत विवाहितेचा पती तरूण मदन कानडे , सासरा मदन कानडे या दोघांना अटक

    तर सासू सपना कानडे आणि दिर अरुण कानडे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

    या प्रकरणी शामराव आनंदा बनसोडे यांनी पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्यात दिली तक्रार दिली

  • 26 Apr 2022 06:12 PM (IST)

    राणा समर्थक राऊतांविरोधात आक्रमक

    खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल 20 फूट खड्ड्यात टाकन्याची भाषा केली होती नागपूर येथे..

    त्या अनुषंगाने युवा स्वाभिमान पार्टीने संजय खड्डा तयार करून संजय गौरी सुद्धा तयार केली आहे..

    त्याचे भूमीपूजन आज युवा स्वाभिमान पार्टी कडून करण्यात आला आहे…

  • 26 Apr 2022 05:39 PM (IST)

    आदित्य ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्र सदनाची पाहणी

    खासदार अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासोबत महाराष्ट्र सदनाची केली पाहणी

    राज्य सरकारमधील अधिकारीही पाहणी वेळी उपस्थित

    राजधानी मधील नव्या महाराष्ट्र सदनाचा घेतला आढावा

  • 26 Apr 2022 05:39 PM (IST)

    काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी

    बाळासाहेब थोरात

    सुनील केदार

    पृथ्वीराज चव्हाण

    राजभवनात दाखल

  • 26 Apr 2022 05:07 PM (IST)

    पुण्यात भीषण आग

    कोंढवा बुद्रुक, पारगे नगर येथे येथे एका गोडाउनमधे आग

    अग्निशमन दलाकडून 10 फायरगाड्या दाखल.

    आग विझवण्याचे काम सुरू

  • 26 Apr 2022 04:07 PM (IST)

    किरीट सोमय्या यांचा पोलिसांवर पुन्हा हल्लाबोल

  • 26 Apr 2022 04:03 PM (IST)

    प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये सामील होण्यास नकार

    गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या चर्चा

    सोनिया गांधी यांच्या अनेक भेटीही झालेल्या

  • 26 Apr 2022 03:59 PM (IST)

    उदय सामंत यांची सोमय्यांवर टीका

    रत्नागिरी- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फार सक्षमपणे राज्याचा कारभार पहात आहेत म्हणुनच काही जणांना पोटसुळ उठलंय असं सांगत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजप नेते किरिट सोमय्यांवर हल्लाबोल केला

    भाजपनेते किरिट सोमय्या यांच्या उल्लेख टाळत शिवसेना प्रवक्ते उदय सामंत यांची सोमय्यांवर टिका

    महाराष्ट्राच्या जनतेला किती हिन दर्जाचे राजकारण चाललंय हे समजतय

    विद्यापिठांच्या परिक्षा या ऑफलाईन घेतल्या जाणार

    कुलगुरुंच्या बैठकित एकमत झाल्याचं उदय सामंत यांचे सष्टीकरण

    मे महिन्यातील महाविद्यालयांच्या सर्व परिक्षा या 1 जून ते 14 जुलै पर्यंत करण्याचा निर्णय़

    महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष हे 1 ऑगस्टला सुरु होणार

  • 26 Apr 2022 02:49 PM (IST)

    नागपुरात खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नवनीत राणांची तक्रार

    संजय राऊतांच्या 20 फूट गड्डात गाडण्याची व स्मशानात गोवऱ्या रचून ठेवण्याच्या वक्तव्या विरोधात केली तक्रार…

    संजय राऊत यांच्या विरुद्ध अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी….

    नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे केली लेखी तक्रार…

  • 26 Apr 2022 02:28 PM (IST)

    नागपूरात खासदार संजय राऊत यांच्या विरोधात खा नवनीत राणांची तक्रार….

    नागपूरात खासदार संजय राऊत यांच्या विरोधात खा नवनीत राणांची तक्रार….

    संजय राऊतांच्या २० फूट गड्डात गाडण्याची व स्मशानात गोवऱ्या रचून ठेवण्याच्या वक्तव्या विरोधात केली तक्रार…

    संजय राऊत यांच्या विरुद्ध एक्ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी….

    नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या कडे केली लेखी तक्रार…

  • 26 Apr 2022 02:27 PM (IST)

    उल्हासनगरात ४ वर्षीय चिमुकल्याची अपहरण करून हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

    उल्हासनगरात ४ वर्षीय चिमुकल्याची अपहरण करून हत्या

    मुलाच्या आईवडिलांशी झालेक्या भांडणातून ओळखीच्या तरुणाचं कृत्य

    उल्हासनगर पोलिसांनी उत्तर प्रदेशातून आरोपी कांचनसिंग पासी (२४) याला केली अटक

    आरोपीला ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

  • 26 Apr 2022 02:26 PM (IST)

    किरीट सोमैय्या महाराष्ट्रच मनोरंजन करत आहेत

    किरीट सोमैय्या महाराष्ट्रच मनोरंजन करत आहेत – शरद पवार माझे मार्गदर्शक अस मोदी म्हणतात, त्यामुळे सदाभाऊ यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही – देशाला माहिती पवार साहेबांनी जातीयवाद केला नाही – केंद्राने अहवाल मागवला असेल तर 24 काय 12 तासात देऊ – सरकार आपलं काम करेल – राज ठाकरेंना परवानगी नाकारल्याच माहिती नाही – फक्त जागे बाबत विषय आहे – स्थानिक प्रशासन योग्य तो निर्णय घेईल

  • 26 Apr 2022 02:25 PM (IST)

    मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला नवनीत राणाचा खोा

  • 26 Apr 2022 01:41 PM (IST)

    शिक्षक संघटनेच्या रौप्यमहोत्सवी शिक्षक अधिवेशनाच्या कार्यक्रमाला सुरुवात

    राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांच्या उपस्थितीत मुप्टा या शिक्षक संघटनेच्या रौप्यमहोत्सवी शिक्षक अधिवेशनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे, मुप्टा ही राज्यातील अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षक आणि प्राध्यापकांची मोठी संघटना आहे, मुप्टा संघटना राष्ट्रवादी कॉंग्रेसला संलग्न असल्यामुळे शरद पवारांची या कार्यक्रमाला उपस्थिती असून यासाठी अजित पवार देखील उपस्थित होत आहे

  • 26 Apr 2022 01:36 PM (IST)

    उस्मानाबाद – 26 हजार रुपयांची लाच घेताना 2 जणांना अटक

    उस्मानाबाद – 26 हजार रुपयांची लाच घेताना 2 जणांना अटक

    उस्मानाबाद लाच लुचपत विभागाची कारवाई

    अंगणवाडी केंद्रांना पुरवठा केलेल्या पोषण आहाराचे बिल काढण्यासाठी घेतली लाच

    बालविकास प्रकल्प अधिकारी व कनिष्ठ सहायक या दोघांना अटक

    बालविकास प्रकल्प अधिकारी सतिश मुंढे व कनिष्ठ सहायक शहाबुद्दीन शेख यांनी 32 हजारांची लाचेची मागणी करून 26 हजार रुपये लाच स्वीकारले

    पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते यांच्या पथकाची कारवाई

  • 26 Apr 2022 12:44 PM (IST)

    केंद्रीय गृह मंत्रालयाने अहवाल मागवला

    खासदार नवनीत राणा अटक प्रकरण

    केंद्रीय गृह मंत्रालयाने अहवाल मागवला

    लोकसभा सचिवालयानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राज्य सरकारला पत्र

    खासदार राणा अटक आणि खार पोलिस ठाण्यात केलेल्या अमानवी व्यवहारबाबतचा अहवाल मागवला

    केंद्र सरकारकडून राज्य सरकारला दुसरा झटका

  • 26 Apr 2022 12:44 PM (IST)

    राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडुन राज्यात राष्ट्रपती राजवट लावायचा भाजपचा डाव आहे – बच्चू कडू

    हनुमान चालीसा हा भाजपचा अजेंडा आहे….

    राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडुन राज्यात राष्ट्रपती राजवट लावायचा भाजपचा डाव आहे….

    राणा दाम्पत्याला अमरावती मधून मुंबईत जाऊन हनुमान चालीसा म्हणायची गरज काय..भक्ती म्हणजे प्रदर्शन असत का??बच्चू कडू यांचा सवाल..

    राणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे घेऊन मत मागितले, तेव्हा मज्जीद, बौद्ध विहार मध्ये गेले,काजीला आणले होते आता त्यांनी भूमीका बदलली.

    आधी शिवसेना भाजप विरोधात मत मागितले आता भाजपच्या दावणीला बांधले गेले आणि शिवसेनेला बदनाम करत आहे…

    राष्ट्रपती राजवटची मागणी करत आहे.पण याचे परिणाम राणा यांना आगामी निवडणुकीत भोगावे लागतील..

    ऑन नवनीत राणा कारागृह तक्रार

    राणा म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी तयार केलेलं बुजगावन..

    राणा हे कलाकार आहे त्यांना रडायचं कधी हसायचं कधी हे जमते…

    जेल मध्ये काही फाईव्ह स्टार व्यवस्था मिळणार का जे सामान्य कैद्यांना ते राणा यांना मिळणार…

    राणा यांना जर जेल मध्ये जिलेबी पाहिजे असेल तर आम्ही पाठउ …

  • 26 Apr 2022 12:35 PM (IST)

    नवनीत राणाचा कसल्याही प्रकारचा छळ झालेला नाही – दिलीप वळसे पाटील

    त्याबाबत मला काहीचं माहित नाही

    यासंदर्भात मी चौकशी केली

    यासंदर्भात औरंगाबाद पोलिस निर्णय घेतील

    कालची सर्वपक्षीय बैठक झाली

    औरंगाबादचे पोलिस कमिशनरचा निर्णय आहे

    कायदा व्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यावर कारवाई होणार

    नवनीत राणाचा कसल्याही प्रकारचा छळ झालेला नाही

    राज ठाकरेच्या सभेच्या परवानगीचा निर्णय दोन दिवसात

    मुंबई पोलिस चांगल्या कामासाठी ओळख आहे

    कोणाला सुरक्षा पुरवायची आणि कुणाला नाही पुरवायची

    एक बैठक घेतली जाते. त्यानंतर सुरक्षा किती द्यायची हा निर्णय घेतला जातो

    जेव्हापासून हे सरकार महाराष्ट्रात आल्यापासून ते त्रास देत आहेत

  • 26 Apr 2022 12:35 PM (IST)

    नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आजही दिलासा मिळाला नाही

    अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आजही दिलासा मिळाला नाही. राणा दाम्पत्यांच्या जामीन अर्जावर येत्या 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत त्यांना तुरुंगातच राहावं लागणार आहे.

  • 26 Apr 2022 11:33 AM (IST)

    शिवशाही बसला लागलेल्या आगीत शिवशाही जळून खाक

    – शिवशाही बसला लागलेल्या आगीत शिवशाही जळून खाक… – नासिक-औरंगाबाद राज्यमार्गावरील निफाड तालुक्यातील बोकडदरे येथील घटना…. – औरंगाबाद येथील नाशिक कडे जात होती ही शिवशाही बस… – शिवशाही बस येवला तालुक्यातील देशमाने येथे झाली होती नादुरुस्त… – 10 ते 15 प्रवासी या शिवशाही बस मध्ये करत होते प्रवास… – नादुरुस्त झाल्याने दुसऱ्या एसटी बस मध्ये बसून दिल्यामुळे मोठी दुर्घटना टळली… – आगीचे कारण अस्पष्ट जरी असले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली ची प्राथमिक माहिती… – शिवशाही बसला लागलेल्या आगीचे अधिक तपास निफाड पोलिस करतात…

  • 26 Apr 2022 11:20 AM (IST)

    नवी मुंबईत वीज पुरवठा सुरळीत

    नवी मुंबईत खंडीत झालेला वीजपुरवठा पुन्हा सुरळीत झाला आहे.

  • 26 Apr 2022 11:19 AM (IST)

    भाजप नेते मोहित कंबोज यांनी सोलापूरमध्ये पाठवले भोंगे

    – भाजप नेते मोहित कंबोज यांनी सोलापूरमध्ये पाठवले भोंगे

    – कंबोज यांच्या आवाहानानंतर पावन मारुती मंदिर समितीने मागितले होते भोंगे

    – पावन मारुती मंदिर ट्रस्टच्यावतीने लावण्यात आले भोंगे

    – जुनी पोलिस लाईन भागातील पावन मंदिरावर भोंगे लावत वाजवली हनुमान चलीसा

    – भाजप नेते किरण पवार यांच्यावतीने मागणी केल्यानंतर आले भोंगे

    – सोलापूर शहर जिल्ह्यासह विविध भागात पाठवले भोंगे

  • 26 Apr 2022 11:14 AM (IST)

    शरद पवार आणि अजित पवार औरंगाबाद दौऱ्यावर आहेत

    शरद पवार आणि अजित पवार औरंगाबाद दौऱ्यावर आहेत

    औरंगाबादमध्ये ते दाखल झाले आहेत

  • 26 Apr 2022 10:56 AM (IST)

    किरीट सोमय्या यांच्यावर दोन वेळा झालेल्या हल्ल्यानंतर दिल्लीत सीआयएसएफच्या हेडक्वार्टरने घेतली गंभीर दखल

    ब्रेक – किरीट सोमय्या यांच्यावर दोन वेळा झालेल्या हल्ल्यानंतर दिल्लीत सीआयएसएफच्या हेडक्वार्टरने घेतली गंभीर दखल…

    – झेड सुरक्षा दिलेल्या व्यक्तीचा ताफ्यावर दुसर्यांदा हल्ला झाल्याने मुंबई पोलिसांकडे याबाबत विचारला जाब…

    – मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी सीआयएसएफचे कमांडर यांनी बातचित केल्याची सुत्रांची माहीती…

    – घडलेल्या घटनेनंतर किरीट सोमय्या यांच्या जवानांना प्रत्येक कार्यक्रमात अतीदक्ष राहून काम करण्याचे आदेश…

    – सुत्रांच्या माहीतीनुसार किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा हल्ला झाला तर शुट एट साईटचे आदेश देण्यात येणार…

  • 26 Apr 2022 10:55 AM (IST)

    – नागपूरात संतप्त शिवसैनीकांचा धिॅगाणा!

    – नागपूरात संतप्त शिवसैनीकांचा धिॅगाणा!

    – पाण्याच्या प्रश्नासाठी संतप्त शिवसैनीकांनी केली तोडफोड

    – आशिनगर झोन येथील ‘ओसीडब्लू’च्या कार्यालयात तोडफोड

    – ‘ओसीडब्लू’ कार्यालयातील कंप्यूटर, कुलर्सची तोडफोड

    – ‘ओसीडब्लू’ कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काढलं बाहेर

    – नागपूरात ‘ओसीडब्लू’ कडून होतो पाणी पुरवठा

    – पुरेसं आणि स्वच्छ पाणी मिळत नसल्याने केलं सेना स्टाईल आंदोलन

  • 26 Apr 2022 10:55 AM (IST)

    पडघा इथल्या वीज केंद्रात बिघाड झाल्यामुळे डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांच्या काही परिसरात वीजपुरवठा खंडित

    पडघा इथल्या वीज केंद्रात बिघाड झाल्यामुळे डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांच्या काही परिसरात वीजपुरवठा खंडित

    ग्रामीण भागातही झाली बत्ती गुल

    बिघाड दुरुस्त होऊन वीजपुरवठा सुरू व्हायला किमान एक ते दीड तास लागेल – महावितरण अधिकाऱ्यांची माहिती

  • 26 Apr 2022 10:55 AM (IST)

    ठाणे शहरात दुरुस्ती च्या नावाखाली शहरात गेल्या अर्ध्यातासापासून वीज गायब झाली आहे

    ठाणे शहरात दुरुस्ती च्या नावाखाली शहरात गेल्या अर्ध्यातासापासून वीज गायब झाली आहे..

    शासनाने लोडशेडिंगची अघोषित लोडशेडिंग केल्यामुळे ठाणे कर नागरिकांना ऐन उन्हाळ्यात गरमीचा सामना करावा लागतोय

    शहरातील पाचपाखडी ,घोडबंदर रोड, आणि नौपाडा या ठिकाणी वीज अचानक गायब झाली आहे

  • 26 Apr 2022 10:54 AM (IST)

    नवी मुंबईत देखील बत्ती गुल

    नवी मुंबईत देखील बत्ती गुल

    लाईट गेल्याने नवी मुंबईत नागरिकांना त्रास

    नवी मुंबईतील नेरुळ, जुईनगर परिसरात बत्ती गुल

  • 26 Apr 2022 09:56 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय बैठकीला गरज नव्हती, तो गृहखात्याचा विषय होता – संजय राऊत

    मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय बैठकीला गरज नव्हती, तो गृहखात्याचा विषय होता.. पण उगाच विरोधी पक्षानं उगाचच खाजवत बसू नये, एक दिवस कातडी हातात येईल..

    तुमचीच मागणी होती ना भोंग्याबाबत.. आम्ही केंद्रावर टाकलंय…

    अशा बैठकांमध्ये विरोधी पक्ष जाणीवपूर्ण येत नसेल.. तर हे चांगलं नाही.. अशा प्रकारे राजद्रोह करणाऱ्यांवर यूपीत खटले आणि गुन्हे दाखल केलेलेत..

    विरोधी पक्ष स्वतःच्या हातातली घंटा वाजवत बसली आहे… आमच्या हातातली गदा योग्य वेळी फिरले आणि ज्यांच्या डोक्यावर आपटायचची तेव्हा आपटेल….

  • 26 Apr 2022 09:55 AM (IST)

    फडणवीस लोकांना गुमराह करत आहेत – संजय राऊत

    जर या देशात कुणी लोकशाहीवर हल्ले करत असेल, तर जशात तसं उत्तर लोकशाहीचं रक्षण करणं गरजेचंय… म्हणून चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या कार्य़कर्त्यांनी काही चुकीची माहिती दिली असेल, तर त्यांनी माहिती घ्यावी… देशभरात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय… त्याचा शोध घ्यावा…

    फडणवीस लोकांना गुमराह करत आहेत…

  • 26 Apr 2022 09:54 AM (IST)

    फडणवीस आपल्या देवघरात हनुमान चालीसा वाचावी आणि मन शांत करावं – संजय राऊत

    एखादा माथेफिरू वेडा, स्वतःवर हल्ला झाला.. म्हणून ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणणि टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवट लावा असं म्हणत फिरत असेल, तर त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही…

    आसाम सरकारनं मेवानी यांना अटक केली. कारण त्यांनी मोदींवर एक ट्वीट केलं… अटक करुन सोडल्यानंतरही पुन्हा पुन्हा अटक केली.. हा सुद्धा एक मुद्दा आहे.. यावरही फडणवीसांनी मन मोकळं केलं पाहिजे…. कारण त्यांना जी उबग आलेली आहे… त्यांवर त्यांनी बोललं पाहिजे..

    फडणवीस आपल्या देवघरात हनुमान चालीसा वाचावी आणि मन शांत करावं..

  • 26 Apr 2022 09:51 AM (IST)

    न्यायालयांवर कसा दबाव आणला जातोय.. निवडूक आयोग कसा दहशती खाली आहे – संजय राऊत

    मला कौतुकही आहे नरेंद्र मोदी साहेबांच… पवारांनी चांगलं वक्तव्य केलंय, की सरकार पुन्हा येऊ शकलं नाही… येण्याची प्रबळ इच्छा होती.. तरीही सत्ते न आल्यामुळे जी अस्वस्थता आहे, त्यातून अशाप्रकारची वक्तव्य विरोधी पक्षाच्या लाऊडस्पीकरमधून बाहेर पडत आहेत… या देशात कोणत्या प्रकारचं वातावरण आहे.. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर कसा केला जातोय.. न्यायालयांवर कसा दबाव आणला जातोय.. निवडूक आयोग कसा दहशती खाली आहे.. याबाबत जागतीक पातळीवर चिंता व्यक्त केली आहे… राज्याचे विरोधीपक्षनेते यांना लोकशाहीची चिंता वाटतेय.. त्यावर चर्चा करु.. त्यांनी जी चिंता व्यक्त केली आहे, ती राष्ट्रीय पातळीवरची असे…

    एक तर जे राज्यात ठाकरे पवारांना ओळखतात, त्यांना कळेल, की इतकं लोकशाही सरकार संपूर्ण देशात नसेल..

    पुढची २५ वर्ष येण्याची शक्यता नाही

    शांतीसाठी त्यांनी त्यांच्या घरात हनुमान चाळिसा म्हणावा

    चंद्रकांत पाटील यांच्याकडे योग्य माहिती पाठवेन

  • 26 Apr 2022 09:28 AM (IST)

    नाशिकच्या ग्रामीण भागात उन्हाचा तडाखा वाढला

    -नाशिकच्या ग्रामीण भागात उन्हाचा तडाखा वाढला..

    -ढगाळ वातावरणामुळे कमी झालेल्या तापमानात पुन्हा झाली वाढ ..

    -मालेगाव,चांदवड, सटाणा, देवळा, मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत..

  • 26 Apr 2022 09:28 AM (IST)

    पुण्यातील गुन्ह्यासंदर्भात गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात धाव

    पुण्यातील गुन्ह्यासंदर्भात गुणरत्न सदावर्तेंची हायकोर्टात धाव

    जामीन मिळवण्यासाठी केला हायकोर्टात अर्ज

    पुणे पोलीस आज गुणरत्न सदावर्तेंचा घेणार ताबा

    भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आहे सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल…

  • 26 Apr 2022 08:40 AM (IST)

    गुणरत्न सदावर्तेंचा आज पुणे पोलीस ताबा घेणार

    गुणरत्न सदावर्तेंचा आज पुणे पोलीस ताबा घेणार

    पुणे पोलीस सदावर्तेना ताब्यात घेण्यासाठी ऑर्थर रोड कारागृहात पोहोचले

    कायदेशीर प्रक्रीया करून सदावर्तेंना पुणे पोलीस घेणार ताब्यात

    पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीसांत गुन्हा दाखल झालाय..

  • 26 Apr 2022 08:18 AM (IST)

    नागपूर विभागातील सर्वच एसटी कर्मचारी झाले रुजू

    नागपूर विभागातील सर्वच एसटी कर्मचारी झाले रुजू

    एसटी आली पूर्वपदावर

    मात्र सिल्वर ओक प्रकरणातील पाच कर्मचारी रुजू नाही

    435 बस धावायला लागल्या रस्त्यावर

    नागपूर विभागाचे रोजचे उत्पादन पोहचले 40 लाख पर्यंत

    आता सर्व बस मध्ये लागणार व्हिटीएस यंत्रणा

    अँप च्या माध्यमातून मिळणार बस च लोकेशन

  • 26 Apr 2022 08:11 AM (IST)

    आम्ही एक लाखापेक्षाही जास्त गर्दीची सभा यशस्वी करू

    मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर 121

    कुणाच्याही जाण्याने पक्षाला काहीही फरक पडत नसतो

    पक्षात असे हजारो कार्यकर्ते असतात

    सुहास दशरथे यांना माझ्या शुभेच्छा

    जमावबंदी आदेश लागू झाला तरीही आम्हाला पोलिसांची परवानगी मिळेल

    आम्ही एक लाखापेक्षाही जास्त गर्दीची सभा यशस्वी करू

    मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांचं स्पष्टीकरण

  • 26 Apr 2022 07:59 AM (IST)

    चौथी लाट वेशीवर असतानाच लसीकरण गती मंदावली

    चौथी लाट वेशीवर असतानाच लसीकरण गती मंदावली,

    दुसरा आणि प्रिकोशन डोजकडे नागरिकांनी फिरविली पाठ,

    देशात काही राज्यात कोरोना रुग्ण वाढताहेत,

    जिल्ह्यातील 80 टक्के नागरिकांनी पहिला डोज घेतला,

    तर त्या तुलनेत 56 टक्के लोकांनी दुसरा डोज घेतला,

    शिवाय बालकाचे लसीकरण ही संथगतीने सुरुय,

    त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज

  • 26 Apr 2022 07:58 AM (IST)

    जिल्ह्यातील 2 हजार 198 विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयात प्रलंबित

    जिल्ह्यातील 2 हजार 198 विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयात प्रलंबित,

    विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहण्याची शक्यता,

    अर्ज निकाली काढण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन,

    विद्यार्थ्यांनी ऑनलाईन केलेले अर्ज तपासणीला महाविद्यालयात पाठवले जातात,

    मात्र महाविद्यालय याकडे दुर्लक्ष करतात

  • 26 Apr 2022 07:58 AM (IST)

    महिलांसाठी सिटीलींकची आज पासून बस सेवा

    नाशिक – महिलांसाठी सिटीलींकची आज पासून बस सेवा

    आठ फेऱ्याच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष बस सुविधा

    महिलांसाठी स्वतंत्र प्रवासी सेवा देणार

    शहरातील विविध तीन मार्गांवर बसच्या आठ फेऱ्या

  • 26 Apr 2022 07:42 AM (IST)

    वकील संघाच्या निवडणुकीतून अकरा वकीलांची माघार

    नाशिक – वकील संघाच्या निवडणुकीतून अकरा वकीलांची माघार

    42 अंतीम उमेदवारांची यादी जाहीर

    वकील संघाची निवडणूक बेकायदेशीर असल्याची दिवाणी न्यायालयात अर्ज

    बार असोसिएशनच्या निवडणुकीला न्यायालयात आव्हान

  • 26 Apr 2022 07:41 AM (IST)

    पुण्यात मध्यप्रदेशातून पिस्तुले आणून त्याची सराईत गुन्हेगारांना विक्री,

    – पुण्यात मध्यप्रदेशातून पिस्तुले आणून त्याची सराईत गुन्हेगारांना विक्री,

    – याप्रकरणी चौघांना गुन्हे शाखेने केली अटक,

    – चौघांकडून देशी बनावटीच्या ११ पिस्तुलांसह १४ काडतुसे जप्त,

    – ज्ञानेश्वर उर्फ रुद्रा सर्जेराव डुकरे,निखिल उर्फ सनी बाळासाहेब पवार, युवराज बापू गुंड, अमोल नवनाथ तांबे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

  • 26 Apr 2022 07:36 AM (IST)

    राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देऊ नका

    राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देऊ नका

    आरपीआयच्या खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांची मागणी

    राज ठाकरे हे मनुवादी आणि बहुजन विरोधी नेते

    राज ठाकरे दलित आणि बहुजनांच्या विरोधात काम करतात

    त्यांच्या सभेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो

    त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देऊ नका

    सचिन खरात यांची औरंगाबाद पोलिसांकडे आग्रही मागणी

  • 26 Apr 2022 07:35 AM (IST)

    आरटीई कयद्याअंतर्गत आत्तापर्यंत राज्यात ५१.८२ टक्के प्रवेश निश्चित

    – आरटीई कयद्याअंतर्गत आत्तापर्यंत राज्यात ५१.८२ टक्के प्रवेश निश्चित,

    – पुणे जिल्ह्यात प्रवेशासाठी निवड झालेल्यांपैकी ५१.४९ टक्के प्रवेश आत्तापर्यंत निश्चित,

    – निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी पालकांना येत्या शुक्रवारपर्यंत मुदत आहे,

    – आरटीईनुसार विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव

  • 26 Apr 2022 07:35 AM (IST)

    शिक्षक महासंघाची राज्य सरकारकडे मागणी,

    – कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या रिक्त पदे भरावीत,

    – शिक्षक महासंघाची राज्य सरकारकडे मागणी,

    – गेली दहा वर्षे सातत्याने भरतीसाठी विलंब केला जात आहे.

    – परिणामी राज्यात पाच हजार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.

    – ही शिक्षक भरती प्रक्रिया उन्हाळ्याच्या सुटीत पूर्ण करावी,

    – जेणेकरून येत्या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयांमध्ये शिक्षक उपलब्ध होऊ शकतील,

  • 26 Apr 2022 07:34 AM (IST)

    फक्त महिलांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं

    -रमजान महिन्यात होणाऱ्या इफ्तार पार्टीत खासकरून पुरुषच दिसतात. पण पिंपरी चिंचवडजवळील बोपोडी मध्ये याला फाटा देण्यात आलाय

    -फक्त महिलांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं

    -शहरातील मुस्लिम महिलांनी ही यात सहभागी होत रोजा इफ्तार केला.पुणे महिला काँग्रेसने या इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते

  • 26 Apr 2022 07:34 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यावर भारनियमनाचे संकट

    कोल्हापूर जिल्ह्यावर भारनियमनाचे संकट

    विजेची तूट झाल्यास शहरात दोन तास तर ग्रामीण भागात चार तास होणार भारनियमन

    चंदगड,शाहूवाडी,शिरोळ गडहिंलज तालुक्यातील गावांमध्ये कराव लागणार भारनियमन

    भारनियमन टाळण्यासाठी महावितरण चे प्रयत्न

  • 26 Apr 2022 07:31 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार औरंगाबाद दौऱ्यावर

    औरंगाबाद ब्रेकिंग :-

    राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार औरंगाबाद दौऱ्यावर

    मूफटा शिक्षक संघटनेच्या अधिवेशनाला लावणार उपस्थिती

    सकाळी 10 वाजल्यापासून शरद पवार येणार औरंगाबाद दौऱ्यावर

  • 26 Apr 2022 07:30 AM (IST)

    शेतकऱ्यांनी घरगुती सोयाबीन बियाणे वापरल्याने झाली अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ३७ कोटींची बचत….

    शेतकऱ्यांनी घरगुती सोयाबीन बियाणे वापरल्याने झाली अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ३७ कोटींची बचत….

    कृषी विभागाचे निरीक्षण जिल्ह्यात गेल्यावर्षी ८७ हजार क्विंटल घरच्या सोयाबीन बियाण्याचा वापर….

    शेतकऱ्यांच्याच घरच्या सोयाबीन बियाण्याचा वापर वाढण्यासाठी कृषी विभागाचा प्रयत्न..

    बाजारपेठेत बियाण्याचा तुटवडा व भाव अधिक असल्याने शेतकऱ्यांनी वापरले घरचे बियाणे..

  • 26 Apr 2022 06:37 AM (IST)

    राज ठाकरे यांच्या सभेच्या तोंडावरच औरंगाबाद मनसेला मोठा झटका

    राज ठाकरे यांच्या सभेच्या तोंडावरच औरंगाबाद मनसेला मोठा झटका

    मनसेचे माजी जिल्हा अध्यक्ष सुहास दाशरथे यांची मनसेला सोडचिठ्ठी

    आज चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत करणार भाजपात प्रवेश

    मुंबईत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन भाजपात करणार प्रवेश

    सभेच्या तोंडावरच मनसेला सोडचिठ्ठी दिल्यामुळे गर्दीवर परिणाम होण्याची शक्यता

    चार महिन्यांपूर्वीच सुहास दशरथे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून केली होती उचलबांगडी

    उचलबांगडी केल्यापासून सुहास दशरथे होते भाजपच्या संपर्कात

  • 26 Apr 2022 06:36 AM (IST)

    राज ठाकरे यांच्या सभेसाठी मनसेकडून आणखी टीजर जारी

    औरंगाबाद ब्रेकिंग :-

    राज ठाकरे यांच्या सभेसाठी मनसेकडून आणखी टीजर जारी

    मी धर्मांध नाही मी धर्माभिमानी आहे

    1 मे रोजी चला संभाजीनगर सांगणारा टीजर जारी

    राज ठाकरे यांच्या भव्य सभांचे व्हिडीओ वापरून केला टीजर जारी

    1 मे रोजी सभेला येण्याचं टीजर मधून आवाहन

  • 26 Apr 2022 06:36 AM (IST)

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला औरंगाबादेत आणखी एक मोठा झटका

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला औरंगाबादेत आणखी एक मोठा झटका

    सभेच्या तोंडावरच औरंगाबाद शहरात जमावबंदी आदेश लागू

    औरंगाबाद शहराच्या हद्दीत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू

    औरंगाबाद पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी लागू केला जमावबंदी आदेश

    आज पासून 9 मे पर्यंत राहणार जमावबंदी आदेश लागू

    कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी लागू केला जमावबंदी आदेश

    जमावबंदी आदेशामुळे राज ठाकरे यांच्या सभेसमोर मोठे आव्हान

Published On - Apr 26,2022 6:29 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.