Maharashtra News : मराठा क्रांती मोर्चाने जाहीर केली नवी भूमिका; मराठा समाजाला आता हवं ओबीसीतून आरक्षण; राज्यव्यापी बैठकीत निर्णय
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज मंगळवार 2 ऑगस्ट 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. दरोड्याच्या गुन्ह्यात गुजरात मध्ये न्यायालयीन कोठडीत शिक्षा भोगत असलेल्या अट्टल गुन्हेगारास रामनगर पोलिसांनी डोंबिवलीतून अटक केली आहे . महेश उर्फ भुऱ्या उर्फ रमेश चंदनशिवे असे अटक आरोपीचे नाव असून पॅरोलच्या रजेवर फेब्रुवारी महिन्यात बाहेर आलेला महेश हा पुन्हा जेलमध्ये न जाता डोंबिवलीत दहशत माजविण्यासाठी कमरेला पिस्तुल लावून नागरिकांना मारहाण करत असल्याने संतप्त जमावाने चोप देत रामनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.
LIVE NEWS & UPDATES
-
सेल्फी काढू न दिलेल्या युवकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढू दिला सेल्फी
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चांगुलपणा समोर
-गर्दीमध्ये सेल्फी घेणाऱ्या युवकाला पोलिसांनी सेल्फी काढू न दिलेल्या युवकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढू दिला सेल्फी
-माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इमोशनल ड्रामा संपवण्यासाठी तेवढाच इमोशनल ड्रामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा
-
नागपुरात 15 दिवसांत एक लाखावर लसीकरण
15 दिवसांत एक लाखावर लसीकरण
15 ते 31 जुलै दरम्यान नागपुरकरांनी घेतले लसीकरणाचे 1 लाख 21 हजार 579 डोस
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने 15 ऑगस्टपर्यंत राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेला नागपुरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
अवघ्या 15 दिवसांत एक लाखावर लसीकरणाचे डोस शहरात देण्यात आलेले आहेत.
शहरात वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागपूर शहरात लसीकरण मोहिमेला गती दिली.
-
-
राज्यात दोन लोकांचे जम्बो मंत्रिमंडळ आहे; आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
गद्दार आणि वाचाळाची थोबाड बंद करण्यासाठी आदित्य ठाकरे यांची आसूड भेट चाबकाची गरज नाही असं आदित्य ठाकरे यांचे उत्तर आज याच जिल्ह्यात काही गद्दार फिरत आहेत अनेक लोक मला विचारत होते तुम्ही गद्दारांना उत्तर देणारं का मी म्हटलं जनताच उत्तर देणार राज्यात दोन लोकांचे जम्बो मंत्रिमंडळ आहे वा दिवस आहे यांना तिसरा माणूस मिळाला नाही मंत्री बनवायला या दोघांनाही कळल नाही मुख्यमंत्री कोण आहे महिन्यात हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार
-
उत्साहात त्याने माझं नाव उद्यानाला दिल होतं; एकनाथ शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका
– उत्साहात त्याने माझं नाव उद्यानाला दिल होत, अरे बाबा मला अजून काम करायचं आहे, एवढ्या लवकर कुठे
– या राज्यातील लहान मुलांना हा एकनाथ शिंदे माहीत झालं आहे,
– ब्रिटन, लंडनमध्ये महाराष्ट्र मॉडेल वापरलं जातं आहे
– भविष्यात इतर ठिकाणी महाराष्ट्र मॉडेल वापरलं गेलं तर नवल वाटायला नको
-
बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे विचार पूढे घेऊन जात आहोत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-आम्ही बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेतली,
– राज्यातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेत त्याचा भूमिपूजन आणि उद्घाटनाचा कार्यक्रम घेत आहोत
– बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे विचार पूढे घेऊन जात आहोत
– भाजप सेना युतीचे सरकार आलं आहे
– ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली तिकडे आम्ही गेलो
-मी ज्या-ज्या ठिकाणी जातो या राज्यातील जनता हजारोंच्या संख्येने आमचं स्वागत आणि आशिर्वाद देण्याचं काम करत आहेत
– गोरगरिबांचे सरकार या राज्यात काम करत आहे
– मोदीसाहेब आणि गृहमंत्री असतील त्यांचा पूर्ण पाठींबा आम्हाला
– सर्व सामान्य नागरिकांसाठी हे राज्य काम करणार आहे
-
-
जे मंत्री होण्यासाठी पाया पडण्यासाठी वेळ मागत होते, ते आज म्हणतायेत, कोण आदित्य ठाकरे ; सचिन आहिरांची टीका
जे मंत्री होण्यासाठी पाया पडण्यासाठी वेळ मागत होते, ते आज म्हणतायेत, कोण आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे एकदिवस तुमचा बाप झाल्याशिवाय राहणार नाही
पुरंदर तालुक्यातील झोपी गेलेला एक जागा झाला
ज्या ताटात जेवला त्या ताटात मिठाचा खडा टाकला, जनता तुम्हाला माफ करणार नाही
-
पाटण मतदारसंघात राष्ट्रवादी पुरस्कृत आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा; आमदार शंभुराज देसाई यांची टीका
पाटण मतदारसंघात राष्ट्रवादी पुरस्कृत आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा
आमदार शंभुराज देसाई यांची टीका
पारंपरिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधकांनी भगवा गमचा गळ्यात घातला यांचे समाधान
-
ख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आणि सासवड-बारामती रस्तावर मोठी वाहतूक कोंडी गेले देऊन
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आणि सासवड-बारामती रस्तावर मोठी वाहतूक कोंडी गेले देऊन
-सासवड शहरात मोठी वाहनांची रांग
-स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे,
-स्थानिकांना मोठा मनस्ताप
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा सोडण्यासाठी पोलिसांनी वाहतुक ठेवली अडवून
-
माजी आमदार विजय शिवतारे यांच्या शिवसेना कार्यालयाचं मुख्यमंत्र्यांनी केलं अनावरण
माजी आमदार विजय शिवतारे यांच्या शिवसेना कार्यालयाचं मुख्यमंत्र्यांनी केलं अनावरण
– बाहेरील फलकावरून ऊद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो गायब…
-
पुण्यात गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर कारवाई; 1.56 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुण्यात गुन्हे शाखेनं जुगार अड्ड्यावर केली कारवाई
1.56 लाखांचा मुद्देमाल केला जप्त
सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत केली कारवाई
35 जणांविरुद्ध केली कारवाई
गेल्या आठवड्यापासून पुणे शहरात जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पोलीसांकडून कारवाईचं सत्र
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन
– मुख्यमंत्रीपदानंतर प्रथमच एकनाथ शिंदे येणार जेजुरी गडावर
-
आदित्य ठाकरे काही बोलले तरी जनताच याच उत्तर देईल; मुख्यमंत्री शिंदे
आदित्य ठाकरे काही बोलले तरी जनताच याच उत्तर देईल
जनता ठरवते, जनता उत्तर देते
माझं थेट काम करायचं आहे, आज आढावा घेतलाय
मी भाषणात जे बोलायच आहे ते बोललोय
-
गद्दार लोक आधी सांगत होते उद्धव ठाकरे,आदित्यबद्दल आदर; पण हेच लोक आम्हाला व्हिलन ठरवत आहेत; आदित्य ठाकरे
कराड
गद्दार लोक आधी सांगत होते उद्धव ठाकरे,आदित्यबद्दल आदर
पण हेच लोक आम्हाला व्हिलन ठरवत आहेत
सत्तेच्या काळात खा खा खाल आता अति झाल्यावर पलीकडच्या बाजूला उडी मारून गेले
कोविड काळात लोकांचे जीव वाचवत असताना कधी राजकारण केलं नाही
वार छातीवर करायला हवा होता
ज्या महाराष्टारने तुम्हाला इतका मान दिला त्या बद्दल अस कसं बोलू शकता
मताच विभाजन करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न होतोय
-
शिंदे-फडणवीस सरकार अधिवेशन घेत नाहीः अजित पवार
शिंदे-फडणवीस सरकार अधिवेशन घेत नाहीः अजित पवार
मंत्रिमंडळाचा चार दिवसात विस्तार होणार असेल तर चांगलीच गोष्ट
विदर्भ-मराठवाड्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान
-
थोडी जरी लाज उरली असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा; आदित्य ठाकरे
33 देशांनी तुमच्या बेईमानी पाहिले
कितीही नावं बदलली तरी गद्दार तो गद्दार
जिथं पूर आला होता तिथं हे 40 निर्लज्ज लोक मजा मस्ती करत होते
हे शिवसैनिक असते तर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यावर टेबलवर चढून नाचले नसते
या लोकांनी स्वतःला विकलं
माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला याचं दुःख
थोडी जरी लाज उरली असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जा
-
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात गोंदवले खुर्द येथे तिहेरी गाड्यांच्या अपघातात 3 जण ठार तर 2 जण गंभीर
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात गोंदवले खुर्द येथे तिहेरी गाड्यांच्या अपघातात 3 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी
अपघातात स्विफ्ट कार, क्रुझर जीप आणि बुलेटचा समावेश
क्रुझर जीपला ओव्हरटेक करताना बुलेटची समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारला धडक
जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल
माण तालुक्यातील गोंदवले खुर्द येथील घटना
-
शिवसैनिकांना या अडीच वर्षात काय मिळालं, तडीपारची कारवाई; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– शिवसैनिकांना या अडीच वर्षात काय मिळालं, तडीपारची कारवाई करण्यात आली
– अडीच वर्षात आम्हाला कुणी विचारलं नाही, सामान्य शिवसैनिकांची भावना होती
– आम्ही उघड्या डोळ्यांनी हे पहात बसायचं
– नगरपंचायती निवडणुकीत सेना चार नंबरवर फेकली गेली
– सेना भाजपच सरकार आलं असतं तर आज काँग्रेस-राष्ट्रवादी कुठे राहिली असती औषधालाही पुरली नसती
-
आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात;कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात
मल्हारपेठ येथे दाखल झाली असून कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत
-
भेटायला माझ्याकडेच वेळ होता मला वाटत नाही बाकी कुणाकडे भेटायला वेळ होता उद्धव ठाकरेंना टोला
-भेटायला माझ्याकडेच वेळ होता मला वाटत नाही बाकी कुणाकडे भेटायला वेळ होता उद्धव ठाकरेंना टोला
– मला जेवढं जेवढं शक्य होतं ती मदत मी करत होतो
– आमच्याकडे मंत्री पद असताना आम्ही पायउतार झालो
– मला निवडून यायला कुठलीही निशाणी लागत नाही,
-एवढं काम मी माझ्या मतदारसंघात केलं आहे
-
बाळासाहेब,अटलबिहारी आणि प्रमोद महाजन यांच्या संकल्पनेचं सरकार आलं; मुख्यमंत्री शिंदे
मी काम करणारा माणूस आहे , फाईली फिरत असतात, मला त्यात इंटरेस्ट नाही
– बाळासाहेब,अटलबिहारी आणि प्रमोद महाजन यांच्या संकल्पनेचं सरकार आलं आहे
– आपण निवडणूक लढवत असताना एककिडे मोदींचा अंडी एकीकडे बाळासाहेबांचा फोटो लावला
– जनतेने त्यावेळी पूर्ण बहुमत आपल्याला दिलं
-
दिल्लीतील नॅशनल हेराल्ड कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन; कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न
दिल्लीतील नॅशनल हेराल्ड कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन
हेराल्ड कार्यालयात घुसण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न
पोलिसांनी गेटवरच कार्यकर्त्याना रोखलं
ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
नॅशनल हेराल्ड प्रकरणात सुरू आहे सोनिया गांधी आणि राहुल गांधींची चौकशी
आज सकाळी ईडीनं टाकलीये कार्यालयावर धाड
आंदोलनाचा आढावा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी
-
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने सात्विक राजकरण आणलं; विजय शिवतारे
– बाजारू राजकरण कुणी आणलं असेल तर यांनी आणलं,
– एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने सात्विक राजकरण आणलं
– 2024 पर्यंत गुंजवणीचे पाणी पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या शेतात असेल। । – गुंजवणीचे पाणी आणि विमानतळ आणल्याशिवाय या विजय शिवतारे याना देव मरणाची परवानगी देणार नाही
– आताचा आमदार अपघाताने आला आहे, बारामतीचा बटीक झाला आहे
-
संजय जगताप हा गाढव आमदार; विजय शिवतारे यांची टीका
-अपघाताने हे आमदार निवडून आले आहेत, संजय जगताप यांच्यावर टीका
– पहिल्या कॅबिनेटमध्ये 4 टीएमसी पाणी अजित पवारांनी बारामतीला नेलं, हा गाढव आमदार एक शब्दही बोलला नाही, संजय आमदारांवर टीका
– अजित पवार यांनी राष्ट्रीय बाजार यशवंत कारखन्याकडे वळवला,
– पुरंदरच्या शेतकऱ्यांसाठी हा बाजार महत्वाचा होता,
– त्यावेळी का आम्हाला बोलवलं नाही
– 50 वर्ष शरद पवारांनी या पुरंदरला काही दिल नाही
– पाणी दिलं म्हणालेत मग काय उपकार केलेत
-
मराठा क्रांती मोर्चाने जाहीर केली नवी भूमिका; मराठा समाजाला आता हवं ओबीसीतून आरक्षण; राज्यव्यापी बैठकीत निर्णय
मराठा क्रांती मोर्चाने जाहीर केली नवी भूमिका
मराठा समाजाला आता हवं ओबीसीतून आरक्षण
मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीत निर्णय
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने टाईमलिमिट ठरवावी
तातडीने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे
अन्यथा पुन्हा एकदा मराठा समाजाचा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय
-
चारित्र्याच्या संशयावरुन पुण्यातील वाकडमध्ये पत्नीचा खून; 9 वर्षीय मुलासमोरच घडली घटना
-पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केल्याची घटना मध्यरात्री वाकड परिसरात घडली
-धक्कादायक बाब म्हणजे नऊ वर्षीय मुलीसमोरच ही घटना घडलीय
-रमेश हनुमंत पुजारी अस अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव
-तर ललिता रमेश पुजारी अस खून झालेल्या महिलेच नाव आहे
-रमेश हा मद्यपान करायचा, रात्री उशिरा पती-पत्नीमध्ये वाद झाले, चारित्र्यावर संशय असल्याने रमेश पत्नीचा खून केला आहे
-या प्रकरणी आरोपीला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात
-
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत आम्ही मागणी केली; शिवसेना गटनेते राहुल शेवाळेंची मागणी
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत आम्ही मागणी केली,
याबाबत प्रक्रिया पूर्ण करू सहकार्य करू असं शहा यांनी सांगितलं
आता आम्ही पुन्हा एनडीएसोबत आलो आहे,
राज्यात जनतेला आता अपेक्षा आहेत, त्यामुळं महाराष्ट्र राज्याचे प्रश्न मार्गी लावावेत ही मागणी आम्ही केली
आदित्य ठाकरे दौरा प्रतिसाद, मला माहित नाही, पण या यात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते
वरिष्ठ नेत्यांनी तशा सूचना दिल्याची माहिती आहे, शेवाळे यांची आदित्य यांच्या दौऱ्यावर टीका
-
राष्ट्रवादीने तिजोरी गिळून टाकलीः आमदार शहाजी पाटील
– राष्ट्रवादीने तिजोरी गिळून टाकली,
– अंतकरणापासून सांगतो कुठलं नेतृत्व पटलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांचे
– आम्हीही मेलेल्या आईच दूध पिलं नाही, आम्ही पण ठोका देणार
– एकनाथ शिंदे यांचे विचार घराघरात पोहचवायचे आहेत
– एक एक करून आमदार गेलेत, शिंदेसाहेब कधी गेलेत एकालाही कळलं नाही, तुमचं सीआयडी खातं काय करत होत
-
तुम्ही आम्हाला फरफटत नेलं आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं; आमदार शहाजी पाटील
– आज आपल्या नव्या भूमिकेत आपले मुख्यमंत्री आले आहेत
– मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद हवा आहे
– जे महाराष्ट्रात राजकारण झालं, त्याला कुणी गद्दार म्हटलं कुणी काय म्हटलं मात्र क्रांती घडवली आहे
– निवडणुका झाल्या नंतर आम्हाला वाटलं भाजप सेना युतीचे सरकार येणार अस वाटलं होतं
– मात्र तुम्ही आम्हाला फरफटत नेलं आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल
गडकरी रंगायतनमध्ये गुणवंतांचा सत्कार आणि करियर मार्गदर्शन
आयुक्तांना प्रशासकीय सेवेचा विसर
-
येत्या काळात भारत बंद करण्याची येणार वेळ; पारोळ्यात शिवसैनिक आक्रमक
शिवसैनिकांचे तोंडाला काळे कपडे बांधून अनोख्या आंदोलन
केंद्र सरकार करते आवाज दाबण्याचा प्रयत्न
संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईचा केला निषेध
पारोळा बस स्थानकावर केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून केले रास्ता रोको आंदोलन
येत्या काळात भारत बंद करण्याची येणार वेळ
पारोळ्यात शिवसैनिक आक्रमक
-
दिव्यांग कल्याण विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा; आमदार बच्चू कडू यांची मागणी
आमदार बच्चू कडू यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिव्यांग कल्याण विभागासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी.
प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्या दृष्टीने स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी
दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय नसल्यामुळे विशेष लक्ष दिले जात नसल्याने स्वतंत्र मंत्रालय देण्याची मागणी
-
शिंदे गटातील खासदारांची अमित शहा यांच्यासोबत चर्चा; मराठी भाषेला अभिषेक दर्जा द्या खासदारांची मागणी
शिंदे गटातील खासदारांची अमित शहा यांच्यासोबत चर्चा
20 मिनिटे संसदेतमधील कार्यालयात चर्चा
मराठी भाषेला अभिषेक दर्जा द्या खासदारांची मागणी
12 पैकी 7 खासदार होते उपस्थित
गटनेते राहुल शेवाळे यांच्या नेतृत्त्वाखाली अमित शहा यांच्यासोबत चर्चा
राज्यातील विकास कामांबद्दलही झाली चर्चा
-
शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत राडा; शिंदे समर्थक शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत घुसले
डोंबिवली : शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत राडा
शिवसेना कार्यकर्ते आणि शिंदे समर्थकांमध्ये झाला राडा
शिंदे समर्थक शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत घुसले
शिंदे समर्थकांनी शाखेत घुसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला
-
सत्ताधीशवाले ईडी आणि सीबीआयशिवाय काहीही करु शकत नाहीत किंवा तुम्हाला मारुन टाकू शकतात; यशोमती ठाकुरांचा गंभीर आरोप
मी सत्तांतराच्या वेळी बोलली तेव्हा मला भाजपच्या मोठ्या नेत्याचा फोन आला आणि बोलले असं बोलणं बरोबर नाही मी म्हटले धमकी देता का
काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकुरांचा मोठा गौप्यस्फोट
जे सत्तेत बसले आहेत ते दोनच काम करू शकतात एक तुमच्यावर ईडी किंवा सीबीआय नाहीतर बंदूक घेऊन मारून टाकू शकतात
यशोमती ठाकुर यांचा गंभीर आरोप;पानसरेंना मारलं दाभोलकरांना मारुन टाकलं
-
पुण्यातील मेट्रोच्या कामामुळे विस्थापित होऊन आंदोलन करणाऱ्या गरीब आंदोलनकर्त्यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुणे दौऱ्यात विभागीय आढावा बैठक पार पडल्यानंतर मेट्रोच्या कामात विस्थापित होऊन आंदोलन करणाऱ्या गरीब आंदोलनकर्त्यांची घेतली भेट
तुमचं पुनर्वसन आपण नक्की करणार अश्वासन.
-
सध्याचे राजकारण खालच्या पातळीवरचे सुरुः आमदार प्रणिती शिंदे
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका
– खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. जी केस 2015 साली क्लोज झालीय -ती आज पुन्हा काढून सोनिया गांधींना त्रास देण्याचा प्रयत्न
-केवळ हम बोले सो कायदा दाखवण्याचे काम सुरुय.
– सोनिया गांधी या देशाच्या वरिष्ठ नेत्या, एका मोठ्या पक्षाच्या प्रमुख असूनही त्यांची दहा दहा वेळा ईडी चौकशी
– राहुलजी गांधी यांना बोलावून घेताय. सहा सहा तास चौकशीला बसवताय आणि एकच तास चौकशी करताय ती ही व्यर्थ
– संसदेमध्ये भाजपच्या नेत्या स्मृती इराणी या हमरी तुमरीची भाषा करत आहेत
-‘तूम तूम तूम तूम म्हणजे भाजपची ही खालच्या पातळीला जाऊन अटॅक करण्याची संस्कृती
– मात्र स्मृती इराणींचे सिलीसोलचे प्रकरण काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. इंस्टाग्राम वर त्यांची पोस्ट डिलीट करतात.
-
परभणी जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाला जिल्हाध्यक्ष; शिवसेनेचे माजी खासदार सुरेश जाधव यांची निवड
परभणी जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाला जिल्हाध्यक्ष
शिवसेनेचे माजी खासदार सुरेश जाधव यांची जिल्हाध्यक्षपदी निवड
परभणीत पत्रकार परिषद घेत जाधवांनी दिली माहिती
जाधव शिवसेनेचे दोन टर्मचे खासदार आणि सध्या राष्ट्रवादीत प्रदेश उपाध्यक्ष पदावर होते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जिल्ह्यात मजबूत करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले .
-
विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, टर्मिनल 2 वर विमानाच्या खाली आली कार
विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
टर्मिनल 2 वर विमानाच्या खाली आली कार
अचानक कार आल्याने मोठा गोंधळ
वैमानिकाच्या प्रसंगावधानन मोठा अनर्थ टळल
इंडिगो फ्लाइट 6E-2022 ही दिल्ली-पाटणा जात होते
-
गुजरात विधानसभा निवडणूक, आम आदमी पक्षाकडून पहिली यादी जाहीर
गुजरात विधानसभा निवडणूक
आम आदमी पक्षाकडून पहिली यादी जाहीर
विधानसभा निवडणूक उमेदवारांची पहिली यादी आप कडून जाहीर
इतर पक्षांकडून अद्याप उमेदवारी यादी जाहीर नाही
मात्र आप कडून उमेदवारांची यादी जाहीर
सर्व 182 जागांवर आप पक्ष गुजरात निवडणूक लढवणार
-
राज्यसभेमधील महागाईवरची चर्चा, संसदेमधील पुढील रणनीती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मुद्द्यावर चर्चा
भाजपचे राज्यसभेतील नेते पियुष गोयल, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली
राज्यसभेमधील महागाईवरची चर्चा, संसदेमधील पुढील रणनीती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीच्या मुद्द्यावर चर्चा
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजप खासदारांचे मॉक व्होटिंग करण्यावरही चर्चा
-
दिल्लीतील नँशनल हेराल्ड कार्यालयावर ईडीचा छापा
दिल्लीतील नँशनल हेराल्ड कार्यालयावर ईडीचा छापा
ईडी अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची चौकशी
गेल्याच आठवड्यात सोनिया गांधींची झाली होती ईडी चौकशी
आज दिल्लीतील कार्यालयावर टाकला छापा !
सकाळी 10 पासून सुरू आहे चौकशी जवळपास 10 ते 12 अधिकारी कागदपत्रांची चौकशी करतायेत
थेट कार्यालयावर छापा टाकल्याने सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या अडचणी वाढणार ?.
-
शिवसेना खासदार घेणार केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट
शिवसेना खासदार घेणार केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट
शिंदे गटातील खासदार अमित शहा यांची घेणार भेट
राज्यातल्या विविध विषयांवर करणार महत्त्वपूर्ण चर्चा
शिवसेनेचा वेगळा गट स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच घेणार भेट
दुपारी सव्वा दोन वाजता होणार खासदार आणि केंद्रीय गृहमंत्री यांची भेट
संसद परिसरातल्या कार्यालयात होणार भेट
-
संजय राऊत यांच्या संबंधित दोन मालमत्तेवरती छापेमारी सुरु
गोरेगाव पत्राचा जमीन घोटाळा प्रकरणांमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आलेले आहेत. ते सध्या ईडीच्या कस्टडीमध्ये आहेत.
मात्र काल कोर्टाने आदेश दिल्यानंतर आत्ताची माहिती मिळते आहे
त्यानुसार मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये याच प्रकरणांमध्ये दोन ठिकाणी सुरू आहे
सकाळी ईडीची दोन पदक ही झापेमारी करण्यासाठी निघालेले आहेत आणि सध्या सर्च ऑपरेशन जे आहे ते दोन ठिकाणी सुरू आहेत.
या व्यतिरिक्त संजय राऊत सध्या एडीच्या कस्टडीमध्ये आहेत.
मात्र ज्या व्यवहाराचा आरोप त्यांच्यावरती आहे की गोरेगाव पत्राचा जमीन घोटाळा प्रकरणामधून त्याची मनी मनी रक्कम होती ती प्रवीण राऊत त्यांना मिळालेले होते
-
नॅशनल हेरॉल्ड केस प्रकरणी ईडीची छापेमारी, हेरॉल्ड हाऊसवर ईडीने छापा टाकला
नॅशनल हेरॉल्ड केस प्रकरणी ईडीची छापेमारी
हेरॉल्ड हाऊसवर ईडीने छापा टाकला
कागदपत्रांची अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू
ईडीच्या सहा अधिकाऱ्यांनी छापा टाकला
सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या चौकशीनंतर छापा
-
गावांच्यामध्ये अनेक दिवस पाणी होतं – अजित पवार
गावांच्यामध्ये अनेक दिवस पाणी होतं. विशेषतः या सगळ्या त्या नद्या इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी जात होतं,की दोन्ही बाजूंच्या शेतात ज्या शेतकऱ्यांनी व्यापून टाकली. मोठ्या प्रमाणावर हे पूरक परिस्थितीमुळं बाधित झालेले हंगाम आता निघून गेलेला आहे. पुढे काही महिन्यांनी रब्बीचा हंगाम येईल. मध्ये हस्तक्षेप केला पाहिजे, सरकारच्या हस्तक्षेप केला पाहिजे. तशाच विचारा दिल्या पाहिजेत पंचनामे सगळीकडचे 100% झालेले नाहीयेत किती वेळ लागणार आहे. असताना काही ठिकाणी तातडीची जी आर्थिक मदत मिळा श्री बाबतीमध्ये याच्यामध्ये राजकारण करणार नाही जिथे मनुष्यहानी झाली पत्रिकांना या काळामध्ये स्वतःचा जीव गमवावा लागला.
-
ठाण्यातील मनसेच्या पदाधिकारी यांची बैठक शिवतीर्थावर सुरू
ठाण्यातील मनसेच्या पदाधिकारी यांची बैठक शिवतीर्थावर सुरू
अँकर:मुंबई महानगरपालिका निवडणूक पाहता आता मनसे ॲक्शन मोडमध्ये आली आहे काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई मधील मनसेच्या पदाधिकारी यांची बैठक घेतली होती यातच आज ठाण्यातील मनसेच्या पदाधिकारी यांची बैठक आज पालिका निवडणूक संदर्भात घेण्यात येत आहे आता मनसेचे पदाधिकारी हे शिवतीर्थावर बैठकसाठी दाखल
-
स्वतःच्या काही गोष्टी आहेत जसे आता नवी मुंबईमध्ये आम्ही तिरुपती बालाजीचं मंदिर आणलेलं – आदित्य ठाकरे
स्वतःच्या काही गोष्टी आहेत जसे आता नवी मुंबईमध्ये आम्ही तिरुपती बालाजीचं मंदिर आणलेलं अयोध्येसाठी आम्ही मागणी केलेली यूपी सरकारकडे की तिथे महाराष्ट्र भवन व्हावं महाराष्ट्रात 10 मंदिर जी प्राचीन आहे त्याला आपण फंड दिलेलं पुन्हा दुसरी धाव घेत होतो आणि एक ठिकाणी मंदिर विकास असेल किंवा धार्मिक स्थळ असतील तर हे असं स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणत असेल तर ह्याची नक्की काय परिस्थिती आहे? काय स्थगिती दिली आहे की पुढे नेतात काम हा पण विचार करणे गरजेचे आहे.
-
मंकी पॉक्सपासून संपूर्ण देशाला मोठा दिलासा, पहिला रुग्ण झाला बरा
मंकी पॉक्स पासून संपूर्ण देशाला मोठा दिलासा
मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण बरा झाल्याने मोठा दिलासा
दिल्लीतील मंकीपॉक्सच्या रुग्णाला यशस्वीरित्या डिस्चार्ज
सर्व लक्षणे कमी झाल्यामुळे तो माणूस २५ दिवसांत बरा झाला
तो खूप निरोगी आणि आनंदी – सुरेश कुमार, एमडी, एलएनजेपी हॉस्पिटल, दिल्ली
-
भाजपच्या संसदीय समितीची बैठक संपली
भाजपच्या संसदीय समितीची बैठक संपली
स्वातंत्र्य महोत्सवी अमृत वर्षा निमित्त कार्यक्रमांच आयोजन
लाल किल्ला ते विजय चौक राजधानी नवी दिल्लीत तिरंगा यात्रा काढली जाणार
9 ते 11 ऑगस्ट हर घर तिरंगा प्रचार केला जाणार
11, 12, 13, देशात प्रभातफेरी काढली जाणार
प्रत्येक खासदार मतदारसंघात उपस्थित राहणार
-
तानाजी सावंतांची लायकी काय? खासदार विनायक राऊतांचा सवाल
ते बंडखोर 40 आमदार म्हणजे गद्दारांची कीड आहे, भाजप यांना पोसत आहे
भाजपला शिवसेना संपवायची आहे, आँपरेशन लोटस करत असताना त्यांचा डोळा मुंबईवर आहे.
लायकी नसताना कुणाबद्दल बोलतोय याचे भान असणे गरजेचे आहे.
-
माझ्या कार्यालयाची तोडफोड सेनेच्या नव्हे तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली होती – आमदार तानाजी सावंत
– माझ्या कार्यालयाची तोडफोड सेनेच्या नव्हे तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली होती,
– राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भगवे गळ्यात घालून माझी कार्यालयाची तोडफोड केली, राष्ट्रवादीवर सावंतांचा गंभीर आरोप
-कोण आदित्य ठाकरे, काय संबध, एक आमदार आहे तो, त्याच्यापेक्षा जास्त महत्व देत नाही मी
– हे शक्तिप्रदर्शन नाही तर शक्तिपात झाला आहे, तानाजी सावंतांचा सेनेवर हल्ला
-शक्ती जी काही आहे ती एकनाथ शिंदे साहेबासोबत आहे
-
10.30 वाजता संसद भवनात विरोधी पक्षनेत्यांची बैठक
10.30 वाजता संसद भवनात विरोधी पक्षनेत्यांची बैठक
बैठकीत केंद्र सरकारकडून होणाऱ्या केंद्रीय यंत्रणाचा दुरुपयोग यासंदर्भात सभागृहात चर्चा करण्यासाठी बोलावली बैठक
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी होणार शिवसेनेकडून सहभागी
स्थगन प्रस्थावासंदर्भात शिवसेना खासदार अनिल देसाईंनी राज्यसभा अध्यक्षांना दिलीये नोटीस
थोड्या वेळात पार पडणार विरोधी पक्षांची बैठक
-
भाजपच्या संसदीय समितीची बैठक सुरू
भाजपच्या संसदीय समितीची बैठक सुरू
राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह बैठकीला उपस्थित
थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बैठकीत सहभागी होणार
-
सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर
– सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर
– एम ए उर्दू भाषाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित विद्यार्थ्यांच्या हातात दिल्याचा प्रकार उघड
– एम ए या विद्यार्थ्यांना खुणांसह हस्तलिखित प्रश्नपत्रिका दिल्याची प्रश्नपत्रिका व्हायरल
– एम ए उर्दू अधिविभागाच्या विद्यार्थ्यांना चक्क हस्तलिखित प्रश्न पत्रिका दिल्याचा प्रकार उघड
– मागील महिन्यापासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेवरून सावळा गोंधळ सुरूच
-
हा शक्तीप्रदर्शन नाही ही शक्तीपात झालेला आहे
हा शक्तीप्रदर्शन नाही ही शक्तीपात झालेला आहे ही शेवटची धडपड आहे,आदित्य ठाकरेंच्या दोऱ्यावर सावंत यांची टिका कोण आदित्य ठाकरे,तो एक आमदार आहे माझं आँफिस राष्ट्रवादीच्या लोकांनी फोडलं ,त्यांना भविष्यात कळेलच
-
नवी मुंबईत श्रावणामुळे भाज्या महागल्या
नवी मुंबईत श्रावणामुळे भाज्या महागल्या
श्रावण सुरू होतात एपीएमसी बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढू लागली आहे
आज विक्रमी आवक झाली आहे
त्यामुळे भाज्यांचे दर प्रतिकिलो 5 ते 10 रुपयांनी वाढले आहेत
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात त्यांच्याच नावाने उभारण्यात आलेल्या उद्यानाचे उद्घाटन करणार,
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात त्यांच्याच नावाने उभारण्यात आलेल्या उद्यानाचे उद्घाटन करणार,
– मात्र हे नामकरण नियमबाह्य असल्याची स्वयंसेवी संघटनांची तक्रार,
– हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
– हडपसर परिसरात महापालिकेच्या जागेवर उद्यान,
– शिवसेनेचे शिंदे समर्थक माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव दिलं आहे.
-
नागपूर शहरात तब्बल 28 वर्षानंतर सर्वाधिक पाऊस
– नागपूर शहरात तब्बल 28 वर्षानंतर सर्वाधिक पाऊस
– जुलै महिन्यात तब्बल 631 मिलिमीटर पावसाची नोंद
– जून महिन्यात रुसून बसलेल्या वरूनराजची जुलै महिन्यात जोरदार बॅटींग
– चांगल्या पावसामुळं जिल्ह्यातील धरणं तुडूंब भरली
– उन्हाळ्यातील पुण्याच्या पाण्याचे संकट दूर
– विदर्भात सर्वाधिक पाऊस गडचिरोली जिल्ह्यात तर सर्वात कमी अकोला जिल्ह्यात पाऊस
-
पुण्यात प्लॅस्टिक पिशव्या जप्तीची धडक कारवाई
– पुण्यात प्लॅस्टिक पिशव्या जप्तीची धडक कारवाई,
– 1 ते 31 जुलै दरम्यान पालिकेने 205 प्रकरणांमधून 10 लाख 70 हजार रुपयांचा दंड वसूल,
– यातील सर्वाधिक पावणेदोन लाख रुपयांचा दंड नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने केला वसूल,
– प्लॅस्टिकबंदीचा भंग झाल्यास पाच हजार, दुसऱ्यांदा भंग झाल्यास दहा तर तिसऱ्यांदा भंग झाल्यास पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन महिने तुरुंगवास अशी तरतूद.
-
सायबर कॅफे चालक आणि आरटीओ एजंट स्वतःच परीक्षा देऊन काढतायत नागरिकांचे लर्निंग लायसंस
सायबर कॅफे चालक आणि आरटीओ एजंट स्वतःच परीक्षा देऊन काढतायत नागरिकांचे लर्निंग लायसंस
Anchor -: नवी मुंबईतील सायबर कॅफे आणि आरटीओ एजंट वर नवी मुंबई पोलिसांची आता करडी नजर राहणार आहे. नवी मुंबई परिवहन कार्यालयाकडे लर्निंग लायसन्स काढण्यासाठी स्वतः हजर न राहता सायबर कॅफे आणि आरटीओ एजंट मार्फत अधिकचे पैसे देऊन लर्निंग लायसन्स काढण्यात येत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. त्यानुसार काही सायबर कॅफे मध्ये आधार कार्ड घेऊन लर्निंग लायसन्स काढण्याची मागणी केली असता कोणतीही पडताळणी न करता एजंटच लर्निंग लायसन्सची परीक्षा देऊन लायसंस काढून देत असल्याचे निदर्शनास आल्यावर नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारी नुसार पोलिसांनी गैरप्रकारे लर्निंग लायसन्स काढून देणाऱ्या सायबर कॅफे आणि आरटीओ एजंट विरोधात गुन्हा दाखल केला असून अनेकांना नोटीस देण्यात आलेय.
-
शहर सायबर पोलिसांकडे तक्रारींचा पाऊस
नाशिक – शहर सायबर पोलिसांकडे तक्रारींचा पाऊस
-शहर व परिसरात आर्थिक फसवणूक, सोशल मीडियाद्वारे पाठलाग तसेच हॅकिंगचे प्रमाण वाढले
-सहा महिन्यांत तब्बल ३६१ तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल
-मात्र, या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना करावा लागतो अनेक अडचणींचा सामना
-
मनपा आरक्षण सोडतीवर एक हरकत दाखल
नाशिक – मनपा आरक्षण सोडतीवर एक हरकत दाखल
-प्रभाग ३५ मधील आरक्षणावर हरकत दाखल
-हरकती आणि सूचना दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस
-आणखी किती हरकती येतात, याकडे सर्वांचे लक्ष
-मनपा निवडणुकीसाठी २९ जुलै रोजी आरक्षण सोडत काढली होती
-
नाशिक जिल्हा परिषद आरक्षण सोडतीवर केवळ एक हरकत दाखल
नाशिक -नाशिक जिल्हा परिषद आरक्षण सोडतीवर केवळ एक हरकत दाखल
-हरकती आणि सूचना दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस
-देवळा तालुक्यातून आरक्षणावर हरकत दाखल
-जिल्हा परिषदेच्या ८४ गटांसाठी २८ जुलै रोजी आरक्षण सोडत काढली होती.
-
नागपूरात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या, छेडखानी, विनयभंग, बलात्कार रोखण्याचे आव्हान
– नागपूरात महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना
– गेल्या सहा महिन्यात शहरात महिला अत्याचाराचे १०० पेक्षा जास्त गुन्हे
– छेडखानी, विनयभंग, बलात्कार रोखण्याचे आव्हान
– ओळखीच्या व्यक्तीकडून सर्वाधिक महिला अत्याचाराचे गुन्हे
– २०२१ च्या तुलनेत यंदा पहिल्या सहा महिन्यात वाढले अत्याचाराचे गुन्हे
-
सोन्यासाठी सोन्यासारख्या मैत्रीत दिला दगा
सोन्यासाठी सोन्यासारख्या मैत्रीत दिला दगा
नवीन ज्वेलर्सचे दुकान सुरू केले असून डिस्प्लेला दाखवण्यात साठी सोने हवे असे सांगत मित्राच्या दुकानातून ३५ लाख रुपयाचे सोन्याचे दागिने घेऊन मित्र झाला पसार
दगाबाज मित्राला रामनगर पोलिसांनी पुण्यातून ठोकल्या बेड्या
विश्वनाथ जगताप असे या धोकेबाज मित्राचे नाव असून ३५ लाख रुपयाचे दागिने पोलिसांनी केले हस्तगत
-
महिला शिक्षकाची फुगडी ने सर्वांचे लक्ष वेधले
श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये मुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत पारंपरिक गीता वर ठेका धरत नागपंचमी सण उत्साहात साजरी,,, तर महिला शिक्षकाची फुगडी ने सर्वांचे लक्ष वेधले
-
गुजरात जेलमधून फरार असलेल्या आरोपीने आधी घातला धिंगाणा नंतर खाल्ला नागरिकांचा मार
कमरेला पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे
गुजरात जेलमधून फरार असलेल्या आरोपीने आधी घातला धिंगाणा नंतर खाल्ला नागरिकांचा मार
जखमी अवस्थेत पोलिसांनी एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस घेतले ताब्यात घेत आरोपीला उपचारासाठी मुंबईच्या शासकीय रुग्णालयात दाखल
3 दिवसाच्या उपचारा नंतर ताब्यात घेत त्याची रवानगी पुन्हा केली जेल मध्ये
महेश उर्फ भुऱ्या उर्फ रमेश चंदनशिवे असे आरोपीचे नाव असून दरोड्याच्या गुन्ह्यात सुरत येथील कारागृहात 7 वर्षाची शिक्षा भोगत असून पॅरोल रजा संपली तरी बाहेर राहून करत होता भाईगिरी व दहशत
Published On - Aug 02,2022 6:27 AM