Maharashtra News Live Update : हनुमान चालीसा म्हटलं म्हणून आम्ही कोणाला जेलमध्ये टाकणार नाही – देवेंद्र फडणवीस

| Updated on: Aug 26, 2022 | 1:38 PM

Maharashtra News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : हनुमान चालीसा म्हटलं म्हणून आम्ही कोणाला जेलमध्ये टाकणार नाही - देवेंद्र फडणवीस
Big breakingImage Credit source: tv9

आज दिनांक 21 ऑगस्ट 2022 (21 August 2022) जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी (Maharashtra News Live Update). शनिवारी भाजपाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान या टिकेला आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज देखील राजकीय आरोप -प्रत्यारोप पहायला मिळू शकतात. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील दोन दिवस राज्यात पाऊस पडू शकतो (Monsoon Live Update) असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. शनिवारी विदर्भाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Aug 2022 08:34 PM (IST)

    गडचिरोलीतील विद्यार्थी एक दिवस आपल्या पायावर उभा होईल; नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास

    जगात आणि देशात इंटरनेट सर्वत्र पोहोचलं मात्र गडचिरोलीच्या दुर्गम भागात अजूनही ती सेवा नाही सेवा उपलब्ध केली तर नक्षलवादी टावर तोडून टाकतात आता आम्ही त्यासाठी सुद्धा काम करत आहोत. गडचिरोली भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांच्याजवळ असलेल्या वनसंपदेतून रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी बांधकाम मंत्री असताना अनेक रोड पूल बनविले आता गडचिरोली मध्ये पुलाचं काम सुरू आहे. त्या ठिकाणी मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं तिथल्याच युवकांना तिथे काम द्या आणि ते होत आहे. ग्रीन हायड्रोजन बनविण्याची टेक्नॉलॉजी गडचिरोलीत पोहोचवायची आहे. आदिवासींची संस्कृती कायम ठेवून त्यांना उच्चशिक्षित केलं पाहिजे लहानपणापासून या विद्यार्थ्यांवर संस्कार झाले पाहिजे त्याने गडचिरोलीतील विद्यार्थी एक दिवस आपल्या पायावर उभा होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केला आहे.

  • 21 Aug 2022 06:44 PM (IST)

    सोलापुरातील शिवसैनिक शरद कोळी यांची युवासेनेचे राज्य विस्तारकपदी नियुक्ती

    सोलापुरातील शिवसैनिक शरद कोळी यांच्यावर युवासेनेची राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शरद कोळी यांची युवासेनेचे राज्य विस्तारकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या सुचनेनुसार सांगोल्यातील मेळाव्यात खासदार विनायक राऊत यांनी कोळी यांच्या नियुक्तीची घोषणा केली.  शरद कोळी यांच्याकडे युवासेनेच्या राज्य विस्तारकपदाची जाबाबदारी देण्यात आली आहे.  शरद कोळी यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत हजारो समर्थकासह पक्षप्रवेश केला होता.

  • 21 Aug 2022 06:41 PM (IST)

    अखिल भारतीय किसान सभेचे नेते अजित नवले यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

    लोकशाहीची एक प्रकारे चेष्टा करून आणि खून पाडून हे सरकार अस्तित्वात आले. हे सरकार टिकणार नाही. लवकरच महाराष्ट्रामध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका होतील. अखिल भारतीय किसान सभेचे नेते अजित नवले यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

  • 21 Aug 2022 05:25 PM (IST)

    सोलापुरातील शिवसैनिक शरद कोळी यांच्याकडे युवासेनेची राज्याची जबाबदारी

    – सोलापुरातील शिवसैनिक शरद कोळी यांच्याकडे युवासेनेची राज्याची जबाबदारी

    – युवासेनेचे राज्य विस्तारकपदी केली नियुक्ती

    – युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या सुचनेनुसार सांगोल्यातील मेळाव्यात खासदार विनायक राऊत यांनी केली घोषणा

    – शरद कोळी यांच्याकडे युवासेनेच्या राज्य विस्तारकपदाची जाबाबदारी

    – शरद कोळी यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत हाजारो समर्थकासह केला होता पक्षप्रवेश

  • 21 Aug 2022 04:18 PM (IST)

    आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू

    आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू

    दादरच्या भाजपा कार्यालयात भाजपची बैठक सुरू

    मुंबई अध्यक्ष आशिष शेलार , प्रवीण दरेकर, प्रसाद लाड बैठकीला उपस्थित

    सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, जयभाण पवय्या, ओमप्रकाश दुर्वे उपस्थित

    वसंत स्मृती या ठिकाणी बैठकीला सुरुवात

  • 21 Aug 2022 04:17 PM (IST)

    हनुमान चाळीसा म्हटलं म्हणून आम्ही कोणाला जेलमध्ये टाकणार नाही – देवेंद्र फडणवीस

    हनुमान चाळीसा म्हटलं म्हणून आम्ही कोणाला जेलमध्ये टाकणार नाही – देवेंद्र फडणवीस

    फडणवीसांचे जोरदार भाषण

  • 21 Aug 2022 03:36 PM (IST)

    रवी राणा यांच्या व्यासपीठावर प्रथमच मोठया संख्येने भाजप पदाधिकारी उपस्थित

    आमदार रवी राणा व खासदार नवनीत यांच्या दहीहंडीला कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह अनेक भाजप नेत्यांची उपस्थिती.

    रवी राणांच्या व्यासपीठावर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अनिल बोंडें, खासदार रामदास तडस यांची उपस्थिती.

    भाजप जिल्हाध्यक्ष निवेदीता चौधरी, शहर अध्यक्ष किरण पातुरकर यांचीही उपस्थिती

    रवी राणा यांच्या व्यासपीठावर प्रथमच मोठया संख्येने भाजप पदाधिकारी उपस्थित.

  • 21 Aug 2022 03:29 PM (IST)

    या गद्दरांनी कुटुंबाला समाजात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही

    – या गद्दरांनी कुटुंबाला समाजात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही

    – महाराष्ट्रात जेव्हा जाल तेव्हा लोक म्हणतील गद्दार..

    – खोके येवू दे नाहीतर बोके येवू दे

    – आम्ही कायम शिवसेनेसोबत आहोत.

    – मरताना भगवी शाल आमच्या अंगावर असेल

  • 21 Aug 2022 03:24 PM (IST)

    खेड तालुक्यातील निमगाव दावडी येथे कालवा फुटला, दावडी – राजगुरूनगर मार्ग वाहतूकसाठी बंद

    – खेड तालुक्यातील निमगाव दावडी येथे कालवा फुटला

    – चासकमान धरणाचा डावा कालवा फुटला ने सर्वत्र पाणीच पाणी

    – कालवा फुटल्याने कालव्या लगत शेतात पाणी

    – पाणी रस्त्यावर आल्याने दावडी – राजगुरूनगर मार्ग वाहतूकसाठी बंद

    – कालव्याचे पाणी शेतात आल्याने शेतातील पिकाचे मोठे नुकसान

    – खेड आणि शिरूर तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी महत्वाचा कालवा

  • 21 Aug 2022 03:21 PM (IST)

    23 तारखेला शिवसेना केंद्रीय निवडणूक आयोगात हजर राहणार

    23 तारखेला शिवसेना केंद्रीय निवडणूक आयोगात हजर राहणार

    शिवसेनेनं कागदोपत्री पुरावे निवडणूक आयोगाला केले सादर

    23 तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगात सुभाष देसाई, अनिल देसाई, अनिल परब आणि वकिल राहणार उपस्थित

    कागदोपत्री पुरावे सादर केल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती

    केंद्रीय निवडणूक आयोगात हजर राहून प्रत्यक्ष मांडणार शिवसेना भूमिका

  • 21 Aug 2022 03:01 PM (IST)

    कोर्टात काय उद्या होईल ते होईल माझा न्याय देवतेवर विश्वास आहे

    कोर्टात काय उद्या होईल ते होईल माझा न्याय देवतेवर विश्वास आहे

    जनतेच्या भावना आपल्या सोबत आहेत

    लोक निवडणुकीची वाट बघत आहेत कधी एकदा निवडणूक येते आणि या गद्दाराना धडा शिकवू

    निवडणुका लवकर घेण्याची यांच्यात हिंमत नाहीय

    आज तुम्ही सुरुवात केली असे मी मानतो

    पुढच्या वेळी आपल्या निष्ठेचे खोके वाढले पाहिजेत

    उद्या प्रसार मध्यम म्हणतील इकडे देखील खोके येत आहेत होय येत आहेत पण ते आपल्या शिवसैनिकांच्या निष्ठचे खोके आहेत

  • 21 Aug 2022 02:59 PM (IST)

    अमरावतीत राणा दाम्पत्याचे वतीने दहीहंडी स्पर्धेचे आयोजन

    अमरावतीत राणा दाम्पत्याचे वतीने दहीहंडी स्पर्धेचे आयोजन

    दहीहंडी स्पर्धेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित

    देवेंद्र फडणवीस मंचावर दाखल

    देवेंद्र फडणवीस यांची होणार रक्ततूला

    दहीहंडी स्पर्धला हजारोंच्या संस्थेने गर्दी

  • 21 Aug 2022 02:11 PM (IST)

    मातोश्रीवर निलम गोऱ्हेंच्या पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन

    मातोश्रीवर निलम गोऱ्हेंच्या पुस्तकाचं प्रकाशन

    उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाश

    महिला अत्याचाराविरोधात पक्षभेद विसरुन एकत्र यायला हवं – उद्धव ठाकरे

  • 21 Aug 2022 02:06 PM (IST)

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाके लाईव्ह

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाके लाईव्ह

  • 21 Aug 2022 01:27 PM (IST)

    मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसंदर्भात चर्चा

    मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची बैठक

    बैठकीला वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती

    पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती

  • 21 Aug 2022 12:59 PM (IST)

    मंत्री उदय सामंत लाईव्ह

    मंत्री उदय सामंत लाईव्ह

  • 21 Aug 2022 12:56 PM (IST)

    महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा उद्या फैसला; शिवसेनेच्या याचिकांवर होणार उद्या सुनावणी

    महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा उद्या फैसला

    शिवसेनेच्या याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

    खटला न्यायालयाच्या यादीमध्ये समाविष्ट

    सरन्यायाधीश एन व्ही रमन्ना यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी

    शिवसेना कोणाची, शिवसेना पक्षाचे चिन्ह कोणाचं यावर सुनावणी

  • 21 Aug 2022 12:19 PM (IST)

    मग तेव्हा मेळघाटला का आला नाहीत? रानांचा अजित पवारांना सवाल

    यशोमती ठाकुर पालकमंत्री असताना 52 मुलांचा मृत्यू झाला तेव्हा मी आवाज उठवला होता. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार कधी मेळघाटमध्ये आले नाहीत.  अजित पवार मेळघाटबद्दल बोलत आहेत,  मात्र त्यांनी यशोमती ठाकूर यांची कधी चौकशी केली नाही. आता ते कुपोषणाचा मुद्दा उपस्थित करत आहेत असे म्हणत रवी राना यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

  • 21 Aug 2022 11:35 AM (IST)

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिकमध्ये सदभावना रॅलीचे आयोजन

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिकमध्ये सदभावना रॅलीचे आयोजन

    संविधानप्रेमी नाशिककर संघटनेच्या वतीने सर्वधर्मीय राष्ट्रीय एकात्मता सदभावना रॅली

    नाशिकच्या काळाराम मंदीरापासून रॅलीला सुरुवात

    शहरातील मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारामध्ये जाणार रॅली

    बुद्धविहारमध्ये होणार रॅलीचा समारोप

    विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव होण्यासाठी रॅलीचे आयोजन

  • 21 Aug 2022 11:22 AM (IST)

    हरिहरेश्वर संशयित बोट प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्यावे; निलेश राणेंची मागणी

    तीन दिवसांपूर्वी हरिहरेश्वर येथे एक संशयित बोट आढळून आली होती. या बोटीत मोठा शस्त्रसाठा देखील आढळून आला होता. हे प्रकरण सरकारने गांभीर्याने घ्यावे अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे. हरिहरेश्वरमध्ये मिळालेली बोट नेमकी इथे कशी आली? त्या बोटीवर कोण होत याबाबत अजून स्पष्टता नाही. ही फार गंभीर बाब आहे. 26/11 ला असेच आले होते आणि त्यांनी हल्ला घडवला होता. मला परत परत संशय येतोय की ते गेले कुठे? कसे गेले? काही अधिकाऱ्यांना निलंबित करून कोणी हे प्रकरण हलक्यात घेऊ नये. बोटीवर हत्यारे सापडली मात्र बोटीवरील फ्रीजमध्ये जेवणाचे सामान मिळाले ते कुजलेले नव्हते याचा अर्थ काहीवेळा पूर्वीच बोटीवरून ते खाऊन पिऊन गेले होते. सरकारने गंभीरतेने या विषयाकडे लक्ष द्यावे असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

  • 21 Aug 2022 10:55 AM (IST)

    रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाली; दोन जण बेपत्ता

    रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाली

    बोटीवरील दोन खलाशी बेपत्ता तीन खलाशांना वाचवण्यात यश

    बेपत्ता असलेल्या दोन जणांचा  शोध सुरू

    छोट्या बोटीने मासेमारी करण्यासाठी पाच जण गेले होते समुद्रात

  • 21 Aug 2022 10:06 AM (IST)

    विनायक राऊत आज सोलापूर दौऱ्यावर; सांगोल्यात शिवसेनेचा मेळावा

    शिवसेना खासदार विनायक राऊत हे आज सोलापूर दौऱ्यावर असून, ते आज शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू यांच्या सांगोला मतदारसंघात मेळावा घेणार आहेत. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर विनायक राऊत हे प्रथमच सांगोल्यात मेळावा घेणार आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटलांबाबत या मेळाव्यात खासदार विनायक राऊत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • 21 Aug 2022 10:02 AM (IST)

    पारनेरमधील शिवसेनेचा एक गट लवकरच शिंदे गटात सामील होणार!

    पारनेर तालुक्यातून मोठी बातमी समोर येत आहे. पारनेरमधील शिवसेनेचा एक गट लवकरच शिंदे गटात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. आता केवळ अधिकृत घोषणाच बाकी असल्याचे बोलले जात आहे. पारनेरमधील काही शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवक शिंदे गटास प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. माजी विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांच्यासाठी हा मोठा धक्का माणण्यात येत आहे.

  • 21 Aug 2022 09:06 AM (IST)

    दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांविरोधात सीबीआयची लूक आऊट नोटीस

    दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांविरोधात लूक आऊट नोटीस

    सिसोदिया यांच्या परदेश प्रवासावर निर्बंध

    सिसोदया यांच्यासह 14 जणांविरोधात लुक आऊट नोटीस

    सीबीआयकडून सिसोदया यांच्यासह 14 जणांविरोधात लुक आऊट नोटीस

    सिसोदिया यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्याता

    दारू घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांच्या विरोधात लूक आउट नोटीस

  • 21 Aug 2022 08:43 AM (IST)

    यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत मराठवाड्यात 52 जणांचा मृत्यू , अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका

    यंदा मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. जून आणि जुलै महिन्यात काही दिवस अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा मोठा फटका हा मराठवाड्याला बसला आहे. पावसामुळे घडलेल्या विविध अपघातांमध्ये जूनपासून ते  आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो जनावरे पुरात वाहून गेली आहेत.  पावसामुळे लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकबाधित झाले आहे.

  • 21 Aug 2022 08:17 AM (IST)

    TET Scam : टीईटी गैरप्रकारातील 576 अपात्र शिक्षकांचे वेतन रोखले

    टीईटी घोटाळ्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. टीईटी गैरप्रकारातील तब्बल 576 अपात्र शिक्षकांचे वेतन रोखण्यात आले आहे.  ऑगस्टपासूनचे वेतन न देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक डॉ. दिनकर पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे आता संबंधित शिक्षकांचे नाव ऑगस्टच्या वेतन देयकातून वगळून अन्य कर्मचाऱ्यांचे वेतन देयक तयार करण्यात येणार आहे.

  • 21 Aug 2022 07:42 AM (IST)

    नाशिकमध्ये कोरोनाच्या बूस्टर डोसकडे नागरिकांची पाठ

    नाशिकमध्ये कोरोनाच्या बूस्टर डोसकडे नागरिकांची पाठ

    13 लाख लोकांचा पहिला तर साडेदहा लाख लोकांचा दुसरा डोस पूर्ण

    एक लाख 40 हजार 348 लोकांनीच घेतला बूस्टर डोस

    कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या कमी

  • 21 Aug 2022 07:39 AM (IST)

    मंदिरातील 14 तोळे दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला; सीसीटीव्ही फुटेजही पळवले

    लक्ष्मी मंदिरातील 14 तोळे दागिन्यांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना आजरा तालुक्यातील हालेवाडी गावात घडली आहे.  भरवस्तीत असलेल्या लक्ष्मी मंदिरातील मूर्तीवर असलेले दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. एवढंच नव्हे तर मंदिरात बसवण्यात आलेले सीसीटी टीव्ही कॅमेरे देखील चोरट्यांनी पळवले आहेत. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • 21 Aug 2022 07:23 AM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती  दौऱ्यावर

    आमदार रवी राणांच्या दहीहंडी स्पर्धेला लावणार हजेरी

    आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला

    आमदार देवेंद्र भुयार यांच्या विवाहासही राहणार उपस्थित

    फडणवीस यांच्या हस्ते श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमचे  होणार उद्घाटन

  • 21 Aug 2022 06:48 AM (IST)

    मुंबईत कोरोनाचा धोका वाढला, गेल्या 24 तासांमध्ये 840 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

    मुंबईत कोरोनाचा धोका वाढला असून, गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 840 रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 51 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या मुंबईतील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 5835 वर पोहोचली आहे.

Published On - Aug 21,2022 6:36 AM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.