Maharashtra News Live Update : उल्हास नदीत बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू, चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह सापडला
Maharashtra News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
आज दिनांक 26 ऑगस्ट 2022 (26 August 2022) जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी (Maharashtra News Live Update). राज्यातील काही भागात पाऊस पडतोय. जाणून घेऊयात राज्यातील प्रत्येक अपडेटस (Maharashtra Breaking News Live) क्षणा क्षणाची माहिती. राज्यातील राजकारणासह इतरही घडामोडींची अपडेट जाणून घ्या…
LIVE NEWS & UPDATES
-
उल्हास नदीत बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू
उल्हास नदीत बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू
शाळेच्या नावाखाली मित्रा सोबत उल्हास नदी पोहण्यासाठी सकाळी 11 वाजता आले असताना घडली घटना
चार तास अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी शोध घेत दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांचा काढला मूर्त देह
सूर्यदेव संतराज यादव असे मृत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून उल्हासनगर मधील सेंचुरी हायस्कूलमध्ये घेत होता शिक्षण
घटनास्थळी पोलीस पोचले असून पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे
-
मराठवाड्यात बैलपोळा उत्सवाला सुरुवात
मराठवाड्यात बैलपोळा उत्सवाला सुरुवात
बैलपोळा उत्सवात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे सहभागी
बैलपोळा हा मराठवाड्यातील बैलांचा महत्त्वाचा सण
बैलांना सजवून गावातील मंदिराभोवती मारल्या जातात फेऱ्या
पारंपारिक सणामध्ये रावसाहेब दानवे सहभागी
-
-
सोलापूर जिल्ह्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा
– सोलापूर जिल्ह्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा
– बार्शी तालुक्यातील शेतकरी अविनाश कापसे यांनी बैलाच्या पाठीवरून संदेश देत उद्धव ठाकरे यांचे मानले आभार
– मुख्यमंत्री म्हणून तुमचं योगदान महाराष्ट्र विसरू शकत नाही अशा आशयातून मानले आभार
– अविनाश कापसे या शेतकऱ्यांन बैलाच्या पाठीवर काढलेलं तालुक्यात चर्चेचा विषय ठरलाय
– त्यांच्या सोन्या आणि शिल्या या बैलाचं सगळीकडे कौतुक होतंय..
-
भाजप गावागावात मतदार वाढवण्याचा प्रयत्न करतेय – रविंद्र चव्हाण
– माझं हेच व्हिजन की कोकणाचा विकास व्हायला हवा…विकास हे स्वप्न, कोंकणवासीयांना रस्ता गडकरींनी मंजूर केलाय, ५५० किलोमिटरचा रस्ता आहे,
– रायगड, रत्नागिरी या ठिकाणी तांत्रीक अडचणी, काम रखडलं, मार्ग काढला, सकारात्मक विचार केलाय, लवकर रस्ता पुर्ण होईल…
अतीवृष्ठीमुळे खड्ड्यांचं साम्राज्य, हा पुरेण रस्ता कांक्रीटचा हवा, ८४ किलोमिटर रस्त्याचं टेंडर झालंय, पण वर्क आॅर्डर झाली नाही, गेल्या काही वर्षात अडचणी आल्या.. मी मार्ग काढेन..
– अडचणी कुणी आणल्या, हे सगळ्यांना माहीत आहे, आम्ही मार्ग काढतो..
– मोदींच्या नेतृत्वात देश विकासाचं राजकारण करतंय, २०२४ चा लोकसभेचा खासदार हा भाजप-शिंदे गटाचा असेल, – imp
– राज्यात असणार्या १६ जागेचा भाजपने विचार केलाय, सगळ्या जागा कशा जिंकता येणार यासाठी प्रयत्न करतोय…
– भाजप शिवसेना युतीचा जो ऊमेदवार ठरेल तो रायगडचा खासदार होईल.. – imp
– कोकणात भाजप-शिंदे गट एकत्र येऊन काम करणार…
– किसान सन्मान योजनेचा पैसा लोकांच्या खात्यात जातोय, मोदींना पीएम बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार…
– माझी मानसिकता की या खात्यात वेगळं काम करावं…
– भाजप गावागावात मतदार वाढवण्याचा प्रयत्न करतेय…
– येतानाही प्रवास करण्याबाबत अद्याप ठरलं नाही पण लवकरच ठरवू…
-
जातीयवादी विचार करणे हे वारंवार संभाजी ब्रिगेडकडून झालं आहे
जातीयवादी विचार करणे हे वारंवार संभाजी ब्रिगेडकडून झालं आहे
हिंदू विरोधी विधाने करणाऱ्या संभाजी ब्रिगेड सोबत शिवसेना युतीचे संकेत देत आहेत हे योग्य आहे का ?
उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आधीच सोडून गेलेले आहेत मात्र आता ही युती झाली तर बाकीचे शिवसैनिक निश्चितच अस्वस्थ होतील
नवी मुंबईतील अवैद्य धंदे संदर्भात मंदा म्हात्रे यांनी काल अधिवेशनात आवाज उठवला होता ऑन
महापालिकेमध्ये प्रशासनाचा सुळसुळाट चालू आहे त्याचाच हातात सत्ता आहे
सरकारला विनंती आहे व पोलीस प्रशासनाला सगळे अवैध धंदे बंद झाले पाहिजे
अधिवेशनात आमदार आणि सांगितलं आहे त्या आमदारांनी रस्त्यावर सुद्धा उतरायला पाहिजे
रस्त्यावर जर उतरणार असाल तर मनसे आपल्या सोबत असेल
-
-
नालासोपारा रेल्वे स्थानकातून चिमुकल्याचे अपहरण
– नालासोपारा रेल्वे स्थानकातून चिमुकल्याचे अपहरण;
– अपहरण झालेला मुलगा एका अज्ञात महिले सोबत जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; मुलाला घेऊन जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या महिलेसह अपहरण झालेला मुलाला आज सुखरूप पोलिसांनी घेतले ताब्यात
– नालासोपारा रेल्वे स्थानकातून काल गुरुवारी दुपारी सव्वा 12 च्या सुमारास चिमुकल्याचे अपहरण झाले असल्याची घडली होती घटना..
– वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून, ताब्यात घेतलेल्या महिलेची पोलीस करत आहेत कसून चौकशी
– हा मुलगा भिक्षेकरी कुटुंबातील असून आपल्या कुटुंबीयांसह नालासोपारा परिसरामध्ये आला असल्याची प्राथमिक माहिती.
– गुरुवारी दुपारी तो नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म वर फिरत असताना तो अचानक बेपत्ता झाल्याने मुलाच्या कुटुंबीयांनी शोधाशोध करून, रात्री उशिरा वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
– सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुलाला घेऊन जाणारी महिलेने मुलाचे अपहरण केले होते की मुलगा एकटा पाहून घेऊन गेली होती याचा पोलीस आता याचा तपास करीत आहेत.
-
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीच्या घोषणेनंतर पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
– संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीच्या घोषणेनंतर पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष,
– डेक्कन परिसरातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करून जल्लोष,
– लाईव्ह फ्रेम चेक करा
-
अव्यध्य गावठी पिस्टल व जिवंत काडतुसा सह दोन आरोपींना APMC पोलिसांनी केले गजाआड
अव्यध्य गावठी पिस्टल व जिवंत काडतुसा सह दोन आरोपींना APMC पोलिसांनी केले गजाआड
Anchor – ऑगस्ट रोजी रात्री नवी मुंबई कोपरी गाव स्मशानभूमी समोरील रस्त्यावर एका भर धाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कारने फुटपाथ वरून चालणाऱ्या एका 80 वर्षीय वृद्धास धाडक दिली होती उपचारादरम्यान त्या वृद्धाचा मृत्यू झाला होता. यात कार चालक सलमान कलदाणी वय 24 हा अपघात करून फरार झाला होता. APMC पोलिसांना सलमान हा MH 43 या हॉटेल येथे येणार असल्याची माहिती गुप्त बतमीदारकडून मिळाली असता पोलिसांनी सापाळा रचला यात एक मारुती ग्रँड विटारा ही गाडी हॉटेल समोर संशयीत रित्या फिरताना दिसून आली गाडी ताब्यात घेऊन चौकशी केली असता गाडीत फरार आरोपी सलमान कलदाणी वय 24 व त्याचा साथीदार जितेंद्रसिंग भदोरीया वय 26 हे आढळून आले यांची झडती घेतली असता एक देशी बनावटीचा कट्टा व जिवंत एक काडतुस भेटले न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे. Apmc पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे अधिक तपास करत आहेत.
-
जातीयवादी विचार करणे हे वारंवार संभाजी ब्रिगेडकडून झालं आहे
जातीयवादी विचार करणे हे वारंवार संभाजी ब्रिगेडकडून झालं आहे
हिंदू विरोधी विधाने करणाऱ्या संभाजी ब्रिगेड सोबत शिवसेना युतीचे संकेत देत आहेत हे योग्य आहे का ?
उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आधीच सोडून गेलेले आहेत मात्र आता ही युती झाली तर बाकीचे शिवसैनिक निश्चितच अस्वस्थ होतील
नवी मुंबईतील अवैद्य धंदे संदर्भात मंदा म्हात्रे यांनी काल अधिवेशनात आवाज उठवला होता ऑन
महापालिकेमध्ये प्रशासनाचा सुळसुळाट चालू आहे त्याचाच हातात सत्ता आहे
सरकारला विनंती आहे व पोलीस प्रशासनाला सगळे अवैध धंदे बंद झाले पाहिजे
अधिवेशनात आमदार आणि सांगितलं आहे त्या आमदारांनी रस्त्यावर सुद्धा उतरायला पाहिजे
रस्त्यावर जर उतरणार असाल तर मनसे आपल्या सोबत असेल
-
गडचिरोली महाराष्ट्राचे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या प्रकृतीत अडीच महिन्यानंतर सुधारणा आज होणार डिस्चार्ज
गडचिरोली महाराष्ट्राचे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या प्रकृतीत अडीच महिन्यानंतर सुधारणा आज होणार डिस्चार्ज
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात कॅन्सरवर दीड महिन्यापासून प्रकाश आमटे यांच्यावर उपचार सुरू होता
पाच किमोथेरपी ने काम केले असून दीड महिन्यानंतर प्रकृती सुधारणा झालेली आहे
पुण्यातून आज सायंकाळपर्यंत प्रकाश आमटे नागपूर येथे येणार
गडचिरोली जिल्ह्यातील मागासलेला भाग भामरागड तालुक्यात लोकबिरादरी प्रकल्पाने अनेक समाज कार्य प्रकाश आमटे यांनी आदिवासींची चाळीस वर्षे सेवा केली
-
साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची बैठक सुरू
साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची बैठक सुरू …. हार – फुल प्रसादावर बंदीवर अद्याप चर्चा नाही…. आजच्या विषय पत्रिकेत विषय नसल्याने शेवटच्या सत्रात यावर चर्चा होण्याची शक्यता…. हार प्रसादावरील बंदी हटवावी या मागणीसाठी फुलविक्रेते , सामाजिक कार्यकर्ते तसेच मजुरांचे सुरू आहे आंदोलन…. विश्वस्त मंडळाने आजच्या बैठकीत निर्णय घ्यावा अशी आंदोलकांची मागणी….
-
संभाजी ब्रिगेड बरोबर युती हा शिवसेनेचा आत्ता पर्यंत चा सर्वात दुर्दैवी निर्णय – आनंद दुवे
संभाजी ब्रिगेड बरोबर युती हा शिवसेनेचा आत्ता पर्यंत चा सर्वात दुर्दैवी आणि चुकीचा निर्णय ठरणार ही भीती आम्हाला आहे
-
मोहन भागवत यांनी ज्या पद्धतीने दोन वर्षातं वक्तव्ये केली, तसे कोणी भाजपवाले वागताना दिसत आहेत आहेत का ?
संघाची विचारसरणी मान्य आहे का ?
मोहन भागवत यांनी ज्या पद्धतीने दोन वर्षातं वक्तव्ये केली, तसे कोणी भाजपवाले वागताना दिसत आहेत आहेत का ?
लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहे
उद्धव ठाकरेंचे भाजपाला टोला
संघाची विचारसरणी मान्य आहे का ?
मोहन भागवत यांनी ज्या पद्धतीने दोन वर्षातं वक्तव्ये केली, तसे कोणी भाजपवाले वागताना दिसत आहेत आहेत का ?
लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहे
उद्धव ठाकरेंचे भाजपाला टोला
सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नसतात, मराठी माणसाला जो शाप आहे, काडून टाकण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.
मी महाराष्ट्र फिरणार म्हणजे माझ्या घरात फिरणार आहे. मी महाराष्ट्रातील काही नेत्यांनी बांधणी करीत आहे.
सगळे मिळून ज्यावेळी एकत्र येऊ त्यावेळी आम्ही निर्णय घेऊ,
-
Shiv sena : भाजपची साथ सोडल्यानंतर शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती
भाजपची साथ सोडल्यानंतर शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती
-
Gulam Nabi Azad resignation : आझाद यांची राहुल गांधींवर जोरदार टीका
गुलामनबी आझाद यांची राहुल गांधींवर जोरदार टीका
राहुल गांधींनी पक्षातील विचार विनिमयाची यंत्रणा संपवली आहे,अनुभवी नेत्यांना बाजूला केले आहे
अध्यादेश फाडण्याची राहुल गांधी यांची कृती अत्यंत‘बालिश’- आझाद
-
Kirit Somaiya : मालाडमधील स्टुडिओची किरीट सोमय्यांकडून पाहणी
स्टुडिओची सोमय्यांकडून पाहणी
मालाडमधील स्टुडिओची किरीट सोमय्यांकडून पाहणी
अस्लम शेख यांनी बनवलेल्या स्टुडिओची पाहणी
आदित्य ठाकरेंनी परवानगी दिलीच कशी
-
Gulam Nabi Azad : राहुल गांधींचे पीए आणि सुरक्षारक्षक निर्णय प्रक्रियेत ढवळाढवळ करतात, आझाद यांचा गंभीर आरोप
राहुल गांधींचे पीए आणि सुरक्षारक्षक निर्णय प्रक्रियेत ढवळाढवळ करता
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद गंभीर आरोप
‘दुर्दैवाने राहुल गांधींच्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर आधी अस्तित्वात असलेली संपूर्ण सल्लागार यंत्रणा त्यांनी उद्ध्वस्त केली,”
युपीए सरकारची संस्थात्मक अखंडता उद्ध्वस्त करणारे ‘रिमोट कंट्रोल मॉडेल’ काँग्रेसमध्ये कार्यरत आहे
यापेक्षाही वाईट गोष्ट आहे की पक्षात इतर कोणाला महत्त्व न देता सर्व महत्त्वाचे निर्णय राहुल गांधी घेत आहेत
राहुल गांधी यांचे पीए आणि सुरक्षा रक्षक ही या निर्णय प्रक्रियेत ढवळाढवळ करत आहेत
सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात आझाद यांचा खळबळ जनक आरोप
-
Delhi Legislative Assembly session : दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनात भाजप आमदारांचा गदारोळ
दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनात भाजप आमदारांच्या गदारोळात
Amidst uproar in the Delhi Legislative Assembly session by BJP MLAs, Deputy Speaker ordered the entire opposition MLAs to be marshalled out for the whole day. MLAs begin a protest outside after being marshalled out. pic.twitter.com/zk5MNXpbcX
— ANI (@ANI) August 26, 2022
-
Maharashtra News Live Update : पाथरी विकास आराखड्यासंदर्भात मोठी बातमी
साईबाबांच्या जन्मभूमी असलेल्या पाथरी विकास आराखड्यास यावर्षीच हप्ता देवू
राज्य सरकारकडून मंत्री शंभूराजे देसाई यांचे आश्वासन
149 कोटींच्या साई मंदिराच्या विकास आराखडा अनेक दिवसांपासून प्रलंबित
मंत्र्यांच्या उत्तरामुळे आता साई भक्तात उत्साहाचे वातावरण दिसून येते.
-
Congress leader Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
Ghulam Nabi Azad quits Congress
Read @ANI Story | https://t.co/Bb8HWDzck2#GulamNabiAzad #Congress pic.twitter.com/wMJYXnpYlN
— ANI Digital (@ani_digital) August 26, 2022
-
Congress leader Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
मोठी बातमी! गुलाम नबी आझाद यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा
Congress leader Ghulam Nabi Azad resigns from all positions including primary membership of Congress Party pic.twitter.com/hOFp1FQkCj
— ANI (@ANI) August 26, 2022
“It is therefore with great regret and an extremely leaden heart that I have decided to sever my half a century old assocation with Indian National Congress,” read Ghulam Nabi Azad’s resignation letter to Congress interim president Sonia Gandhi pic.twitter.com/X49Epvo1TP
— ANI (@ANI) August 26, 2022
-
Arvind Kejriwal Government : केजरीवाल सरकारचे एक दिवसीय अधिवेशन
केजरीवाल सरकारचे एक दिवसीय अधिवेशन
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गोंधळ
खोका खोका 20 खोका – आप आमदारांची जोरदार घोषणाबाजी
गोंधळानंतर काही वेळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब
Delhi Legislative Assembly adjourned for 10 mins following an uproar by BJP MLAs over Deputy Speaker’s decision to not take questions under Rule 280
— ANI (@ANI) August 26, 2022
-
अध्यात्मिक नेते दलाई लामा तीन वर्षांच्या कालावधीनंतर दिल्लीत
तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा तीन वर्षांनंतर दिल्लीत
#WATCH | Tibetan spiritual leader Dalai Lama arrives in Delhi after a gap of three years. pic.twitter.com/usyo3HD5qA
— ANI (@ANI) August 26, 2022
-
Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोर्टाचा दिलासा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा दिलासा
सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
2007 साली केलं होतं भडकाऊ भाषण
भाषणासंदर्भात खटला दाखल होणार नाही
सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
Supreme Court dismisses plea challenging the decision to deny sanction to prosecute Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath in a matter pertaining to alleged hate speech in 2007. pic.twitter.com/xEc2tFP5Ii
— ANI (@ANI) August 26, 2022
-
मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर किवळे ते सोमाटणे दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक
दुपारी 12 ते 2 ओव्हर हेड गॅन्ट्री बसविन्यासाठी एक्सप्रेस हायवेवर ब्लॉक
मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर किवळे ते सोमाटणे दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक
यशवंतराव चव्हाण द्रूतगती महामार्गवर स्वागत फलक लावण्यासाठी हा मेगा ब्लॉक असणार आहे
या कालावधीदरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या महामार्गे सोमाटणे येथून ती पुन्हा सोमाटणे ते मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर उर्से टोलनाक्यावर वळविण्यात येणार
सर्व वाहन चालक आणि प्रवाशांनी या कालावधी दरम्यान वरील पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या वतीने करण्यात आले आहे
-
Supreme Court of India : देशवासियांना सुप्रीम कोर्टाचे कामकाज पाहण्याची संधी
सर्वोच्च न्यायालयात आज पहिल्यांदाच लाईव्ह स्ट्रीमिंग
सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या सेरेमोनियल बेंचचे कामकाजचे live striming
देशवासियांना सुप्रीम कोर्टाचे कामकाज पाहण्याची संधी
-
Maharashtra News Live Update : छत्रपती संभाजीराजे यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
मुंबईतील बैठकीत संभाजी राजे यांनी दमदाटी केल्याचा समन्वयकांचा आरोप
छत्रपती संभाजीराजे यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
संभाजीराजेनी बैठकीत काहीच बोलू न दिल्याचा मराठा समन्वयकांचा आरोप
संभाजीराजे यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक एकवटले
मुंबईतील बैठकीत संभाजीराजेंनी कुणी काही बोलले तर निघून जाण्याची दिली होती धमकी
संभाजीराजे मराठा क्रांती मोर्चा संपवत असल्याचा केला आरोप
-
Milind Narvekar : शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांचं ट्विट
शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांचं ट्विट
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) August 26, 2022
-
Maharashtra News Live Update : पिंपरीजलसेनमधील 60 वर्षीय वृद्धाचा स्वाईन फ्ल्यूनं मृत्यू
पारनेर तालुक्यातील पिंपरीजलसेनमधील 60 वर्षीय वृद्धाचा स्वाईन फ्ल्यूनं मृत्यू
सून आणि मुलाला देखील स्वाईन फ्ल्यूची लागण
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आरोग्य विभागाकडून आवाहन.
-
Nashik : अधिकाऱ्याकडे कोट्यावधीचे घबाड
- नाशिकमध्ये आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्याकडे कोट्यावधीचे घबाड सापडल्याची सूत्रांची माहिती
- – आदिवासी विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यांच्या घरांची झाडाझडती अद्यापही सुरू
- – नाशिक पुणे मुंबई आणि धुळ्यातील घरांवर ACB चे छापे
- – दोन घरामध्ये करोडो रुपयांची रोकड सापडण्याची सूत्रांची माहिती
- – इतर घरे आणि लॉकरची मोजदात अद्यापही बाकी
- – रोकड,सोन,बेनामी संपत्ती अशी कोट्यावधी रुपयांची माया जमवल्याचा ACB ला संशय
- – दिनेश बागुलशी संबंधित असलेले अधिकारी आणि कर्मचारी ACB च्या रडारवर
- – सापडलेल्या रोख रकमेची मोजदात करण्यासाठी मागविले मशीन
-
Delhi Government : दिल्ली सरकारचे आज विशेष अधिवेशन
दिल्ली सरकारचे आज विशेष अधिवेशन
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बोलावलं 1 दिवसाच अधिवेशन
दिल्ली विधानसभेत सकाळी 11 वाजल्यापासून अधिवेशन सुरू होणार
ईडी, सीबीआय यांच्या कारवाईनंतर केजरीवाल यांनी बोलावलं अधिवेशन
अधिवेशनात मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता
-
Maharashtra News Live Update : डोंबिवलीमधील खोणी पालवा ओर्चिड इमारतीत आग
डोंबिवली हाय प्रोफाईल खोणी पालवा ओर्चिड इमारतीत आग
पहाटे 5:30 वाजता शॉर्ट सर्किटमुळे लागली आग
अग्निशामक दलाच्या दोन गाडी घटनास्थळी दाखल
प्लास्टिक आणि केमिकलच्या गोडाऊनला आग लागल्याची माहिती
परिसरामध्ये धुराचे साम्राज्य, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
-
Jammu and Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा
जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला
उरीमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
दहशतवाद्यांना इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे शोधण्यात आलं
-
Maharashtra News Live Update : शिवसेना नेते अंबादास दानवे आज नाशिक दौऱ्यावर
नाशिकच्या शिवसेना कार्यालयात आज दानवे यांचा सत्कार सोहळा
शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार सत्कार
अडचणीच्या काळात देखील सेनेची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या दानवे यांचा नाशिककर शिवसैनिक करणार सन्मान
-
Maharashtra News Live Update : पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल फेऱ्या वाढणार
दिवाळीआधी पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल फेऱ्या वाढणार
20 एसी लोकल आणि दहा साध्या लोकलच्या फेऱ्या वाढणार
-
Maharashtra News Live Update : कैद्याचा उपचारादरम्यान स्वाईन फ्लूमुळे मृत्यू
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याचा उपचारादरम्यान स्वाईन फ्लूमुळे मृत्यूमागील पाच दिवसांपासून कैदी मेडिकलमध्ये भरती होता, पांडू नारोटे असे कैद्यांचे नावस्वाईन फ्लू ने मृत्यू झाल्याच कळताच कैदी आणि जेल प्रशासनाची उडाली खडबडविशेष म्हणजे हा कैदी नक्षल चळवळीतील साई बाबा याचा सहकारी होता -
Maharashtra News Live Update : प्रशांत बंब यांची कथिक ऑडिओ क्लिप व्हायरल
भाजप आमदार प्रशांत बंब यांची कथिक ऑडिओ क्लिप व्हायरल
शिक्षकानंतर, शिक्षक पत्नीचीही आमदार बंब यांच्यासोबत खडाजंगी
-
Maharashtra News Live Update : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज ट्रॉफिक ब्लॉक
एक्सप्रेस वेवर किवळे ते सोमाटणेदरम्यान वाहनांना बंदी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज ट्रॉफिक ब्लॉक
दुपारी 12 ते 2 वाजेदरम्यान महामार्गावर ओव्हर हेड गॅन्ट्री बसवण्याचं काम
-
5G : देशात 12 ऑक्टोबरपासून 5G सेवा, टप्प्या टप्प्यानं लागू होणार
5G : देशात 12 ऑक्टोबरपासून 5G सेवा
टप्प्या टप्प्यानं लागू होणार
केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णवांची माहिती
देशातील तेरा महानगरांचा समावेश
-
Maharashtra News Live Update : गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाची बैठक
आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी होणार बैठक
गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाची बैठक
दुध दरवाढीवरील बोजा, कर्मचारी बदल्या यासह अन्य विषयावर विरोधक महाडिक गट सत्ताधाऱ्यांना घेण्याच्या तयारीत
विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून ही आज आखली जाणार रणनीती
29 ऑगस्टला होतेय गोकुळची वार्षिक सर्वसाधारण सभा
गोकुळ मधील सत्तांतर नंतर पहिल्यांदाच जाहीर पणे होतेय गोकुळची सर्वसाधारण सभा
-
Maharashtra News Live Update : अनिल अंबानी यांना आयकर विभागाची नोटीस
प्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी यांना आयकर विभागाची नोटीस
कर चुकवल्याचा ठपका ठेवत आयकर विभागाची नोटीस
814 कोटी रुपयांची माहिती लपवल्याचा आरोप
-
Maharashtra News Live Update : मुंबईत आणखी वर्षभर मालमत्ता करात वाढ नाही
कोरोना महामारीच्या जानेवारी पार्श्वभूमीवर
मुंबईतील मालमत्ता करात वाढ करण्यात आली नव्हती.
आता आणखी एक वर्ष मालमत्ता करात वाढ केली जाणार नाही,
अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.
-
Maharashtra News Live Update : प्रकाश सुर्वे यांची विभागप्रमुख म्हणून नियुक्ती
शिवसेना आमदार दिलीपमामा लांडे यांची शिवसेनेच्या चांदीवली घाटकोपर विधानसभा क्षेत्राचे विभागप्रमुख तर आमदार प्रकाश सुर्वे यांची शिवसेनेच्या मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे विभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
-
Maharashtra News Live Update : ‘सामना’च्या अग्रलेखातून पुन्हा केंद्रावर टीकास्त्र
केद्रं सरकार, त्यांच्या सूत्रधारांना 2024चे भय वाटते
‘सामना’च्या अग्रलेखातून पुन्हा केंद्रावर टीकास्त्र
‘केद्रं सरकार व त्यांच्या सूत्रधारांना 2024 चे भय वाटते आहे. हे भय केजरीवाल, ममता, उद्धव ठाकरे, नितीश कुमार व शरद पवारांचे आहे. इतके मोठे बहुमत असताना या मंडळींना
भय का वाटावे ? याचे उत्तर एकच . त्यांचे बहुमत निखळ नाही. ते चोरलेले आहे. धाडसत्र
व सुडाची छापेमारी ही त्यांची शस्रे. त्याच शस्त्रांनी त्यांचे आँपरेशन कमळ होते, पण कमळाच्या
लाभार्थीवर सरकारी छाप्यांचे वार होत नाहीत. देशाच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे.
पण या न्याननिवाड्यास विलंब होउ नये, एवढीच जनतेची अपेक्षा आहे. अर्थात आज
राज्यकर्त्यांचा कारभारच असा सुरु आहे की देशात एक संभ्रमित युग अवतरले आहे.
या संभ्रमित युगात आता कोण अवतार घेणार ? नाहीतर जनतेलाच नरसिंहाचा अवतार धारण करावा लागेल.’
Published On - Aug 26,2022 6:28 AM